Tuesday, September 8, 2015

पवित्र बलात्काराचे बाहू पसरून स्वागत करा

Brave: They gave a talk in London arranged by AMAR following the disappearance of 15-year-old Bristol schoolgirl Yusra Hussien last year

गेल्याच आठवड्याच्या अखेरीस एका कोवळ्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्यानंतरचे किनार्‍याला लागलेले एक शव असलेला फ़ोटो अवघ्या जगाचे हृदय हेलावून गेला. किंबहूना ते छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागचा हेतूच तसा होता. मग ज्या कारणाने असा मृत्यू झाला, त्यासाठी अवघ्या युरोपला गुन्हेगार ठरवण्याची तात्काळ शर्यतच सुरू झाली. अर्थात त्यात खुद्द युरोपातील उदारमतवादी गटांचा पुढाकार होता. सहाजिकच तिथले राजकारणी त्याला बळी पडले आणि येईल त्याला तिथे सामावून घेण्याची भाषा सुरू झाली. सवाल इतकाच आहे, की अशा सामावून घेण्याने मूळ समस्या सुटणार आहे काय? तुम्ही पिडीतांच्या जखमांवर मलमपट्ट्या करत बसल्याने कोणी जखमी व्हायचे वा प्राणाला मुकण्याचे थांबणार आहे काय? नसेल तर त्या मलमपट्टीने काय साधले जाणार? जेव्हा सर्व सज्जता असते आणि साधने हाताशी असतात, तेव्हा असाध्य आजारावर शस्त्रक्रीया आवश्यक असते. अशावेळी तुम्ही मलमपट्टी करत बसता तो उपाय नसतो, तर गुन्हा असतो. इथे नेमके तेच चालले आहे आणि त्यालाच मानवता ठरवण्याचा दांभिकपणा रंगवला जात आहे. म्हणजे असे की इराक वा सिरीयातील लोकांना जगणे अशक्य करून तिथले जिहादी मारेकरी नागरिकांना जीव मुठीत धरून पळायला भाग पाडणार आणि तो बोजा युरोपातील समाज व देशांनी निमूट उचलायचा आहे. पण अशा लाखो करोडो लोकांना त्या हिंसा व अत्याचारापासून वाचवण्याची कुवत असूनही त्याबद्दल काहीही करायचे नाही. ही खरी अमानुषता आहे. तसे नसते तर मुळात ही वेळच आली नसती. जर एका यझदी मुलीने फ़ोडलेला टाहो जगाच्या कानी पडला असता तर आयलान कुर्दी नामक कोवळ्या पोराचा बळीही पडला नसता. त्यानुसार मानवी प्रतिक्रीया आल्या असत्या, तर आयलान कशाला मेला असता? कोण ती मुलगी आणि तिचे काय झाले?

सिरीया इराकमध्ये जो इसिस नामक धुमाकुळ मागली दोन वर्षे चालू आहे, त्याचे एक अत्यंत हिडीस कृत्य दहा दिवस आधी उघडकीस आले. पण त्याला तितकी प्रसिद्धी मिळाली नाही, किंवा दिली गेली नाही. त्याचा कुर्दी इतका गवगवा झाला नाही. ही यझदी मुलगी अवघी बारा वर्षाची आहे आणि इसिसच्या हिंसाचारामुळे तिला कुटुंबासह घरदार सोडून निर्वासित छावणीत येऊन पडावे लागले. आधी ती कित्येक महिने इसिसच्या तावडीत सापडली होती. तिथे एखाद्या जनावराप्रमाणे तिला एका इसिस जिहादीला बक्षिस म्हणून देण्यात आले. मग तो रोजच्या रोज तिच्यावर बलात्कार करायचा (अशा शेकडो हजारो महिला मुली तोच नरकवास आज इसिस प्रभावक्षेत्रात भोगत आहेत). जगातला कोवळ्या बालिकेवरचा तो पहिलाच बलात्कार नाही. पण यातले वेगळेपण असे, की हा जिहादी एखादे पवित्र धर्मकार्य म्हणून तिच्यावर नित्यनेमाने बलात्कार करीत होता. रोज तो तिच्यापाशी येऊन हातपाय बांधायचा. मग निर्भेळ मनाने अल्लाची प्रार्थना करायचा. पुढे त्या जेरबंद मुलीवर बलात्कार करायचा. पुन्हा पापकर्म उरकल्यावर तितक्याच भक्तीभावाने अल्लाहची प्रार्थना करायचा. आपल्या धर्माची वा मुस्लिम नसल्याने तिच्यावर बलात्कार करणे हे धार्मिक पवित्र कार्य आहे, असे तो तिला निरागस मनाने समजावत होता. हे इसिस नामक जिहादी संघटनेचे खरे स्वरूप आहे. त्यांनी इराक व सिरीयामध्ये जो धुमाकुळ घातला आहे, त्याचे हे हिडीस स्वरूप आहे. त्यातून मग घरदार सोडून शेकडो हजारो लोक आश्रय घ्यायला कुठेही पळत सुटलेले आहेत. मात्र त्यांना इस्लामी अरबी देशात स्थान नाही. कारण इसिसच्या ‘धर्मकार्याला’ सौदी व अन्य अरबी देशांचा आशीर्वाद आहे. आर्थिक मदत सुद्धा तिथूनच मिळते आहे. अशा कितीतरी मुली लिलाव आजवर झालेत वा त्यांना भेटवस्तु म्हणून इसिसच्या लढवय्यांना बक्षिस देण्यात आलेल्या आहेत. बाकीच्या लोकांना मुस्लिम नाहीत म्हणून सामुदायिक कत्तल करून ठार मारण्याची मोहिमही जोरात आहे.

अशा काही हजार इसिस लढवय्यांना नुसते हवाई हल्ले करूनही युरोपियन सेना संपवू शकेल. कदाचित (लाखोंना वाचवण्यासठी) त्यात काही हजार सामान्य इराकी-सिरीयन नागरिकही मारले जातील. पण विनाविलंब इसिसचा खात्मा होऊ शकला असता. पण तसे युरोपियन राष्ट्रे करू शकत नाहीत. कारण त्यांचे हातपाय विविध कायदे, करार व मानवाधिकार यांनी बांधून ठेवले आहेत. म्हणजे असे, की कुठल्याही सामान्य नागरिकाला त्यांच्या कृतीमुळे मरण येता कामा नये अशी सक्ती आहे. ती इसिसवर नाही, तशीच अरबी देशांवरही ती सक्ती नाही. ते कायदा, कारवाई वा धर्म म्हणून कोणालाही ठार मारू शकतात, कुणावरही बलात्कार करू शकतात. पण त्यांचा बंदोबस्त करणार्‍यांना मात्र तशी मुभा नाही. थोडक्यात ती यझदी मुलगी जशी काही महिने अत्याचार्‍याचे ‘धर्मकार्य’ म्हणून निमूट बलात्कार सहन करत राहिली, तशीच आजकाल मानवाधिकार मान्य केलेल्या देशांची अवस्था आहे. त्यांना बलात्कार्‍याला रोखायला भाषण देण्याची मुभा आहे. पण काहीही झाले तरी त्यांनी बलात्कार्‍यावर हात उचललेला चालणार नाही. निमूट बलात्कार सहन करायचा आणि त्यातून सुटका झाली, तर जिथे कुठे कोर्ट व कायदा असेल तिथे न्याय मागायला जावे. बरे असे झाले म्हणून बिचारीला न्याय मिळेल अशाही भ्रमात राहू नका. उद्या तिच्यावर बलात्कार करणारा युरोपात पकडला गेला, तरी त्याला कोणी कुठली कठोर शिक्षा देवू शकत नाही. कारण ते अमानुष आहे ना? मुल्ला क्रेकर नावाचा एक जिहादी त्याच इराकच्या कर्डीस्थानातला आहे. त्याच्यावर मायदेशी फ़ाशीची तलवार लटकते आहे. त्याला फ़ाशीपासून सुट मिळावी म्हणून नॉर्वे नावाच्या युरोपियन देशाने आश्रय दिला आहे. पण तिथेही जिहादी हिंसेचा मार्ग पत्करल्याने त्याला मायदेशी पाठवण्याचा निर्णय कोर्टाने घेतला. पण मायदेशी फ़ाशी दिली जाईल म्हणून कोर्टानेच आपल्याच निर्णयाला स्थगिती दिली.

ही आजच्या युरोपची दुर्दशा आहे. जो माणुस तिथे जिहादी उचापती करतो, त्याला हाकलण्याचाही अधिकार तिथल्या सरकार वा न्यायालयाला शिल्लक उरलेला नाही. म्हणजेच मुल्ला क्रेकर नॉर्वेच्या कायद्यावरच बलात्कार करतो आहे आणि तिथली न्यायव्यवस्था त्या यझदी मुलीसारखा बलात्कार निमूट सहन करते आहे. कारण जे आपल्या धर्मातले नाहीत, त्यांना मारणे हे मुल्ला क्रेकरसाठी धर्मकार्य आहे आणि त्याला फ़ाशीपासून वाचवणे हे आजकाल युरोपचे धर्मकार्य झालेले आहे. दोघेही आपापले पवित्र कार्य पुर्ण करीत असतात आणि त्यात मधल्यामध्ये यझदी मुलीसारख्यांचा बळी जात असतो. हे खुप दूर कुठे युरोपात घडते आहे आणि आपण कसे सुदैवी सुखरूप आहोत, अशा भ्रमात रहाण्याचे कारण नाही. तो उधमपूरला पकडलेला नविद काय म्हणाला आठवते? हिंदूंना मारायला मजा येते. यझदी मुलीवर प्रार्थनेसह बलात्कार करणारा काय वेगळे सांगतो? आपल्या धर्मातले नाहीत त्यांना मारणे वा अशा बिगरमुस्लिम मुलींवर बलात्कार करणे पवित्र कार्य आहे. आपलेही काही पवित्र कार्य आहेच ना? अशा कुणाही सैतानी कृत्य करणार्‍याला अमानुष शिक्षा होऊ नये, हे कोणाचे पवित्र धर्मकार्य आहे? सर्व साक्षीपुरावे होऊन याकुब मेमन गुन्हेगार ठरला व त्याला कोर्टाने फ़ाशी फ़र्मावली, त्यावर कोणी अश्रू ढाळले होते? कुणा इसिसवाल्या जिहादी हिंसाचार्‍याने याकुबसाठी अश्रू ढाळलेले नाहीत. तुम्हीआम्ही ज्या भारतभूमीत वास्तव्य करतो, तिथल्याच बुद्धीमंत विचारवंतांनी याकुबसाठी आक्रोश केला ना? मित्रांनो, अन्याय अत्याचार सहन करून ते करणार्‍यांच्या धर्मकार्याला हातभार लावायला, आपण जन्माला आलोय. त्यासाठी मरण पत्करणे, बलात्कार सोसणे, हकनाक मारले जाणे वा जखमी जायबंदी होणे; हेच आपले पवित्र कार्य नाही काय? तर चला सिद्ध व्हा पवित्र कार्याला. बलात्कार्‍याचे, गोळ्या झाडत जिहाद करणार्‍यांचे बाहू पसरून स्वागत करा. आपली लायकी त्या यझिक मुलीपेक्षा तसूभर वेगळी नाही.

14 comments:

  1. It seems European population and policymakers becomes blind under intoxication of humanity. Finnish Prime minister is offering his house to
    refugee's, In Germany refugees welcomed as war heroes.Only Hungarian Prime minister is showing solidarity He's receiving harsh criticism from western European countries.If u decided to make suicide no body can save you.

    ReplyDelete
  2. Very true and eye opner.every one should realise this.

    ReplyDelete
  3. Krishna chi janmashtami fakt saajri karyachi ki Krishnacha "Adharmacha Naash" ha updesh lakshat theun yuddhala sajja vhayche hey Hinduni tharvave lagel !!!

    ReplyDelete
  4. People who preach human rights in these cases must be elimnated on Priority basis.

    ReplyDelete
  5. Very good article......

    ReplyDelete
  6. Bhau he sarve pahun ase wat te ki yazid lokana madat karun tayana tayar karun isis la sampavale jau shakte ka?? Bhau tumche mat kay ahi?? plz kalva

    ReplyDelete
  7. lekhatil karan mimansa ardhavat aahe. ISIS cha uday konamule jhala? Iraq ani Afganistan konamule udhvast jhale? Yala Europe visheshtah Britan ani America jawabdar aahet ki nahit?

    ReplyDelete
  8. आप्त सैन्य सह वधू रावणा असे राम सुग्रीवाला सांगतो , जो धर्माच्या बाजूनी नाही तो अधर्माच्या बाजूने आहे कृष्णाचे विधान हे जॉर्ज बुश ला कळले म्हणूंच तो म्हणाला कि "If you are not with us you are with them" आपण नेमके हेच विसरलो आणि म्हणूनच एकी कालचा गांधार / अहिगणस्थान आज अफगाणिस्थान झालाय. स्वार्थी राजकारणी आणि फेक्युलार्वाद्यानी ह्या राष्ट्राचे अपरिमित नुकसान केल.

    ReplyDelete
  9. Europeans liberals have become blind. Unfortunately, by the time they realize their blunder (of accepting huge numbers of muslim refugees) it will be impossible to undo the damage. It won't be a surprise if there are widespread demands of Sharia laws in 10-15 years in these countries. Since a 'true believer' does not recognize any laws except that of Allah, geographical boundaries or allegiance to nation does not mean anything to them. Given this, the world appears to be headed towards a conflict between Islam and every one else. Ominous signs indeed.

    ReplyDelete
  10. सध्या तरी झोपेचे सोंग घेतलेले बरे. मग मागेपुढे 'यदा यदा ही धर्मस्य...' नाहीतर 'राजे पुन्हा जन्माला या...' असं काहीसं म्हणू. मी षंढ आहे हे म्हणण्यापेक्षा मी दुबळा आहे हे जरा सोईस्कर आहे...

    ReplyDelete
  11. मानवाधिकार आयोग आता दहशतवादी गुन्हेगार बचाव आयोग झाला आहे यांना कधीच समाजातील खर्या गरजु लोकासाठी कीवा आपल्यासाठी जीव देणार्या सैन्यासाठी कधीच काही करताना बघितले नाही

    ReplyDelete
  12. वाचून डोक फुटायचीच वेळ आली आहे.

    ReplyDelete