Monday, September 18, 2017

जिहादी मानवतावाद

rohingya के लिए चित्र परिणाम

भारताच्या पुर्वेला म्यानमार नावाचा एक देश आहे. पुर्वी त्याची ओळख ब्रह्मदेश अशी होती. नंतरच्या काळात तिथल्या सरकारने त्या देशाचे नाव बदलून म्यनमार असे करून घेतले. त्या देशाच्या पश्चीम सीमेलगत बांगला देश व भारताची सीमा लागलेली आहे. प्रामुख्याने हा देश बहूसंख्य बुद्धधर्मिय म्हणून ओळखला जातो. पण तुरळक प्रमाणात तिथे हिंदू, ख्रिश्चन व मुस्लिमांचाही आहे. त्यापैकी मुस्लिम संख्या मोठी असून त्यातले बहुतेक रोहिंग्या अशा नावाने ओळखल्या जाणार्‍या वंशाचे आहेत. त्या देशामध्ये ज्या लहानमोठ्या वंशाचे वा जमातीचे लोक शेकडो वर्षे असलेले आहेत, त्यांची जमातवार गणना झालेली असून, तितक्याच लोकांना नागरिक म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र त्यामध्ये रोहिंग्या जमातीचा समावेश नसल्याने त्यांना तिथे कुठलेही नागरी अधिकार नाहीत. अगदी थोडक्यात सांगायचे तर काश्मिर भारतात असूनही तिथे अन्य कुठल्या भारतीयांना नागरिकत्वाचा अधिकार नाही, तशीच काहीशी रोहिंग्यांची म्यानमारमध्ये स्थिती आहे. काश्मिर सरकार जसे आपल्या इच्छेनुसार कुणालाही नागरिकत्व देऊ वा नाकारू शकते, तशीच रोहिंग्याची म्यानमारची स्थिती आहे. त्यापैकी बहुतांश मुस्लिम असल्याने आणि त्यातल्या काहींना जगभरच्या जिहादची बाधा झाली असल्याने, अलिकडल्या काळखंडात हा जुना आजार बळावला आहे. आपल्याला पक्षपाती वागणूक मिळते, अशा आक्षेपातून तिथे रोहिंग्यांनी वारंवार उठाव केलेला असून, त्यापैकी काहींनी लष्कर सेना व सुरक्षा दलांच्या विरोधात हिंसेचा मार्ग पत्करला. सहाजिकच तिथल्या दिर्घकालीन लष्करी सत्तेने रोहिंग्यांचे निर्दालन करण्याचे काम हाती घेतले. नेमकी अशीच स्थिती पाकिस्तानात बलुची वा अफ़गाण मुस्लिमांच्याही वाट्याला आलेली आहे. आपल्याकडे यातले सत्य सांगण्याला कोणी पुढे येत नाही. अपुरी माहिती सांगून लोकांची दिशाभूल करण्याकडे बहुतांश शहाण्यांचा कल असतो.

रोहिंग्या मुस्लिम हा विषय नवा नाही. दिर्घकाळ त्यांनी तिथल्या बहुसंख्य बुद्धीस्ट लोकांशी धार्मिक शत्रूत्व पत्करलेले असून, त्याची परिणती त्यांच्या विरोधातली हिंसक कारवाईत झालेली आहे. पण तो विषय सध्या बाजूला ठेवून भारतातील तथाकथित पाखंडी मानवतावादी भामट्यांचा समाचार घेणे योग्य ठरेल. म्यानमार देशातील लष्करी कारवाईने रोहिंग्यांना संपवायचा प्रयास केलेला असून ते सत्य कोणी नाकारू शकत नाही. पण कमीअधिक प्रमाणात असाच प्रकार मागल्या दोनतीन वर्षात इराक सिरीयात प्रस्थापित झालेल्या इसिस नावाच्या सत्तेने केलेला होता. तेव्हा इथल्या कुणा मानवतावादी शहाण्याच्या काळजाला पाझर फ़ुटलेला नव्हता. तेव्हाही इसिस माणसांनाच मारत होती किंवा छळवाद करून त्यांना परागंदा होण्याची सक्तीच केली जात होती. त्यातले काही लाख सिरीयन इराकी मुस्लिम शेदिडशे मैलाचा समुद्र ओलांडून युरोपात आश्रय घेण्य़ासाठी जीव मुठीता धरून पळत सुटलेले होते. पण त्यापैकी एकालाही बाजूच्या सौदी अरेबिया वा दुबई इत्यादी अरबी मुस्लिम राष्ट्रांनी आश्रय दिला नाही. अशा सागर सफ़रीमध्ये एक कोवळा मुलगा बुडून मृत्यूमुखी पडला, तेव्हा जगभरच्या मानवतावादी शहाण्यांनी युरोपियन राष्ट्रांच्या विरोधात गलका केलेला होता. कुठल्याही झाडाझडतीशिवाय त्या लाखो मुस्लिम निर्वासितांना युरोपियन राष्ट्रांमध्ये आश्रय देण्याची सक्ती करण्यात आली आणि त्यातूनच अनेक इसिस जिहादी उजळमाथ्याने युरोपात घुसले. त्यांनी निर्वासितांच्या जमावात घुसून तिथे प्रवेश केल्याचे परिणाम युरोपियन देशांना अधूनमधून भोगावे लागत असतात. कालपरवाच ब्रिटनमध्ये भुयारी रेल्वेत स्फ़ोट झाला होता आणि मागल्या दोनतीन वर्षात प्रत्येक महिन्याला असे घातपात कायम चालू आहेत. म्हणूनच रोहिंग्या नावाचा विषय व्यापक नजरेने बघण्याची गरज आहे.

एका बाजूला मानवतावादी आणि दुसर्‍या बाजूला जिहादी घातपाती; अशी एक चमत्कारीक आघाडी अलिकडल्या काळात उभी राहिलेली आहे. तिने अवघ्या मानवतेवर संकट आणलेले आहे. युरोप त्याला आधीच बळी पडला आहे आणि आता भारतासह आशियाई देशावर तेच संकट रोहिंग्यांच्या रुपाने कोसळलेले आहे. जो विषय तेव्हा इसिसच्या निर्वासितांमुळे युरोपसमोर होता, तोच तसाच्या तसा रोहिंग्यांच्या निमीत्ताने भारतासमोर उभा राहिलेला आहे. भारतीय गुप्तचर विभागाने इथे भारतात येऊन पोहोचलेल्या रोहिंग्या निर्वासितांमुळे सुरक्षेला धोका असल्याची शंका व्यक्त केली आहे. तिकडे साफ़ काणाडोळा करून येतील त्यांना कुठल्याही तपासणीशिवाय प्रवेश द्यावा, असा मानवतावादी आग्रह आहे. बाकीचे विषय बाजूला ठेवून त्यातला दुटप्पीपणा तपासून बघणे योग्य ठरेल. रोहिंग्यांसाठी आज भारतात गळा काढणार्‍यांनी कधी काश्मिरातून परागंदा होऊन विविध शहरात रस्त्यावर आसरा घेणार्‍या काश्मिरी पंडीतांविषयी इतकी आपुलकी दाखवली नाही. कोणाला वाटेल मानवतावादी जमातीला हिंदूविषयी आस्था नसल्याने ते असे पक्षपाती वागत असतील. मुस्लिमांविषयी पक्षपाती असतील. पण तसेही दिसत नाही. स्वत:ला पुरोगामी मानणार्‍या या जमातीला मुस्लिमांविषयी देखील अजिबात आस्था नाही. त्यांना माणसाविषयी आस्था नाही. त्यांचे मुस्लिमप्रेम हे मुस्लिमांना कोण मारतो याच्यापुरते मर्यादित आहे. मुस्लिमाला अन्य कोणी मुस्लिम मारत असेल, तर कोणी पुरोगामी त्यातल्या बळीकडे ढुंकून बघणार नाही. पण कुणा बिगर मुस्लिमाकडून मुस्लिम मारला जाणार असेल, तेव्हाच यांना माणूसकीचा पुळका येत असतो. इराक सिरीयात मुस्लिमाकडून मुस्लिम मारला जात असल्यानेच त्यांनी तिकडे ढुंकून बघितले नाही. पण म्यानमारमध्ये बुद्धीस्ट सरकार असल्याने मरणार्‍या मुस्लिमांविषयी ही आपुलकी जागृत झालेली आहे.

जगभरच्या या अजब मानवतावादाची म्हणूनच चर्चा आवश्यक आहे. इराकचा हुकूमशहा सद्दाम आपल्या पोलादी टाचेखाली तिथल्या शिया मुस्लिमांना चिरडून काढत होता, तेव्हा यापैकी कोणी आवाज उठवला नाही. पाकिस्तानात गेली आठदहा वर्षे बलुची, पख्तुनी वा अन्य लहान जमातींच्या मुस्लिमांची कत्तल व होरपळ चालू आहे. पण कुणा मानवतावादी शहाण्याला त्या पाक निर्वासितांचा कळवळा आलेला नाही. अगदी राष्ट्रसंघाच्या बैठकीतही त्याविषयी कोणी बोलत नाही. आणि नेमके असेच शहाणे आज रोहिंग्या मुस्लिमांविषयी भारत सरकारला शहाणपण शिकवत आहेत. त्यांचा रोहिंग्यांविषयीचा कळवळाही खरा नाही की मुस्लिमांबद्दल वाटणारी आस्थाही खरी नाही. हे लोक प्रामुख्याने आपल्या मतलबासाठी अशी आस्था दाखवण्याची नाटके रंगवित असतात. हे मानवतावादी वास्तवात विध्वंसवादीच आहेत. म्हणूनच त्यांची माणुसकी केवळ हिंसाचारी व जिहादींच्या बाबतीत जागी होत असते. अफ़जल गुरू वा याकुब मेमनसाठी त्यांचा जीव तळमळत असतो. ओसामा बिन लादेन वा तत्सम घातपात्यांच्या घटनात्मक वा मानवी हक्कांसाठी हेच लोक हिरीरीने पुढे येतात आणि रोहिंग्यांमधील जिहादी प्रवृत्तीला तपासण्यालाही आक्षेप घेतात. कारण त्यांना खर्‍या दयनीय अवस्थेतील रोहिंग्यांशी कर्तव्य नसते. तर भारतात येऊन उच्छाद घालतील, अशा त्यातल्या जिहादी रोहिंग्यांना सुखरूप भारतात आणून विध्वंस घडवण्यात रस आहे वा असतो. कुठल्याही सुखरूप व सुरक्षित समाज वा राष्ट्रात उत्पात घडवून आणू शकतील, अशा सैतानांसाठी लढणारे ही आजच्या मानवता्वादी लोकांची ओळख झालेली आहे. मग ते भारतातील असोत किंवा अन्य जगभरातले असोत. त्यांना पिटाळून लावले, म्हणून श्रीलंका मागल्या चारपाच वर्षात सुरक्षित व शांत प्रदेश झालेला आहे. रोहिंग्यांपेक्षा अशा मानवतावादी शहाण्यांना भारतातून तडीपार केले, तर देश अधिक सुरक्षित होईल.

19 comments:

  1. काय ओ भाऊ किती वाट बघायला लावतात...
    किती दिवस झाले तुमच्या लेखाची आतुरतेने वाट पाहतोय...
    रोजची सवय आहे... इथे आल्याशिवाय राहवल जात नाही बुआ...

    ReplyDelete
    Replies
    1. खरच मी प्रत्येक दिवशी ब्लोगला भेट दिली लेख वाचण्यासाठी.....

      Delete
  2. नेहमीप्रमाणेच अत्यंत मार्मिक व परखड परंतु भाऊ दोन लेखांमध्ये इतके अंतर ठेवत जाऊ नका जीव टांगणीला लागला ना आमचा

    ReplyDelete
  3. भाऊ तुमच्या तब्येतिची कालजी घ्या...

    ReplyDelete
  4. फुरोगामी हे विसरले की भारत मुस्लिमाना असुरक्षित देश आहे award वापसी विसरले ???

    ReplyDelete
  5. bhau aapan aaplya tabyetichi kalaji ghya..

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेख नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण लिखाण वस्तुस्थितीची जाणीव करून देत असतात अश्यालेखमालेच्या रुपातुन धन्यवाद

    ReplyDelete
  7. नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण लिखाण मार्मिक आणि वस्तुस्थितीची जाणीव करून देणारी लेखमाला अप्रतिम आहे धन्यवाद

    ReplyDelete
  8. योगेश काळेSeptember 18, 2017 at 10:18 AM

    खुप छान... ह्या देशाची ही पुरोगामी किड लवकरच संपेल अशी आशा करतो अणि भाऊंच्या दर्जेदार लेखनीचा लाभ अम्हा सर्वांना दिर्घकाळ मिळत राहो ही इश्वर चरणी प्रार्थना करतो...

    ReplyDelete
  9. Tadipar nache tyanchya ghari ase jihadi thevnyachi sakti keli pahije.

    ReplyDelete
  10. "भारतातील तथाकथित मानवतावादी पाखंडी भामटे"...भाऊ तुम्ही वाट पाहायला लावली खरी पण पुन्हा बॅटिंग सुरू करताच पहिल्या चेंडूवर षटकार लागावलात. तब्येतीची काळजी घ्या.

    ReplyDelete
  11. भाऊ तुमची तब्बेत सांभाला.
    परत एकदा अफलातुन लेख वाचायला मिलाला.

    ReplyDelete
  12. भाउ तुमच्या लेखांवर आता पुस्तक काढा,इतरही लोक असे वाचनीय लेख वाचतील.

    ReplyDelete
  13. BHAU TUMHI TUMCHYA TABYETICHI KAALJI GHET JA. PLEASE

    ReplyDelete
  14. दररोज एक तरी लेख पोस्ट करा

    ReplyDelete
  15. चातकासारखी वाट पाहायला लावली ओ भाऊ...दररोज ब्लाॅगला भेट द्यायचो...तब्येतीची काळजी घ्या

    ReplyDelete