Tuesday, October 17, 2017

समर्था घरीचे श्वान

pranab rajdeep के लिए चित्र परिणाम

कालपरवा ‘इंडियाटुडे’ या इंग्रजी वाहिनीवर माजी राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी यांची मुलाखत झाली. त्यांचे एक नवे पुस्तक प्रसिद्ध झाले असून. त्या निमीत्ताने अनेक वाहिन्यांवर व जाहिर कार्यक्रमात प्रणबदांनी आपले मतप्रदर्शन केलेले आहे. इंडियाटुडे वाहिनीवर त्यांची मुलाखत राजदीप सरदेसाई यांनी घेतली. मागली दोन दशके टेलीव्हीजन माध्यमात असलेल्या व अनुभवी मानल्या जाणार्‍या या इसमाकडे किमान सभ्यता कशी नाही, त्याचा नमूनाच त्या निमीत्ताने प्रणबदांनी जगासमोर सादर केला. आपल्या उथळ व निर्बुद्ध आगावूपणाने मागल्या दोन दशकात ज्या निवडक पत्रकारांनी खुप नाव करून घेतले, त्यात राजदीपचा क्रमांक खुप वरचा आहे. आपण सर्व बातम्यातले व विषयातले जाणकार असल्याचे दाखवताना, आपणच आमंत्रित केलेल्या पाहुण्यांना अपमानित करण्याची प्रत्येक संधी शोधणार्‍या राजदीपला, इतकी नेमकी थप्पड मारण्याचे धाडस फ़ार थोड्या लोकांनी केलेले आहे. जो आगावूपणा वा आक्रमकता त्याने विविध नेते व व्यक्तींच्या बाबतीत दाखवलेली आहे, त्याचे नेमके उलटे टोक राहुल वा सोनियांशी बोलताना त्याने दाखवलेले आहे. अतिशय नम्रतेने लाळघोटेपणा त्याने केलेला आहे. त्यातून आपण कोणाच्या घरीचे श्वान आहोत, तेही लपवण्याची त्याला गरज भासलेली नाही. पण अशा समर्था घरीच्या श्वानांना कितीही प्रतिष्ठा मिळाली, तरी मुळची उपजत वृत्ती जात नाही. कोणावरही केव्हाही भुंकावे हा त्यांचा स्वभाव असतो. प्रणबदांनी त्यालाच त्या मुलाखतीच चपराक हाणून बजावले. ‘ तू माजी राष्ट्रपतीशी बोलत आहेस, याचे भान ठेव. तुझ्या वाहिनीच्या पडद्यावर चमकण्याची मला हौस नाही. मुलाखत तुला हवी आहे. त्या मर्यादेत रहा.’ हे शब्द ऐकल्यावरही आपल्या पदावर कोणी बेशरमच कायम राहू शकतो. पण तोच तर राजदीपचा सर्वात खपावू गुण आहे ना?

भाजपा वा मोदी यांच्याशी वैचारीक मतभेद कोणाचेही असू शकतात. पण म्हणून अशा एका पक्षाचा द्वेष वा हेवा हे वैचारिकतेचे लक्षण नसते. राजदीप वा तत्सम लोक नेहमी वैचारिकतेचा आव आणत असतात. तटस्थतेचा मुखवटा चढवून आपला छुपा राजकीय अजेंडा पत्रकारितेतून पुढे रेटत असतात. त्यासाठी कुणाही मान्यवराची थेट जाहिर अक्कल काढण्यापर्यंतचा उद्दामपणाही करीत असतात. तसे नसते तर अशा लोकांना त्यांनीच आरंभ केलेल्या वाहिन्या व माध्यम समुहातून ढुंगणावर लाथ मारून कंपन्यांनी हद्दपार केले नसते. लोकसभेचे निकाल लागण्यापर्यंत अशा पत्रकार संपादकांनी आपला मोदीविरोधी अजेंडा पत्रकारितेच्या नावाखाली राजरोस राबवला होता. सहाजिकच त्यांच्या अशा पक्षपातामुळे वाहिन्या व त्या माध्यमांची प्रतिष्ठा, विश्वासार्हता लयाला गेली. म्हणून माध्यमगृहांना वा वाहिन्यांना अशा कॉग्रेस घरीच्या श्वानांना बाहेरचा रस्ता दाखवणे भाग पडले. त्यांचा शिरोमणी म्हणून राजदीपकडे बघता येईल. त्याचे कारण पडत्या काळात कुणाचेही पाय धरून आपला उल्लू सीधा करण्याची लवचिकता राजदीपने दिल्लीत बस्तान बसवताना आत्मसात केलेली आहे. अशा लाळघोटेपणाने सोनिया प्रियंका सुखावत असतील व त्यांचे आश्रीतही गप्प रहात असतील. पण प्रणबदा त्या पठडीतले राजकीय नेता नाहीत. म्हणूनच त्यांनी सोनिया घरच्या या श्वानाला तिथल्या तिथे चापले. अर्थात लाथा खाण्याची जन्मजात हौस असलेल्यांना एका लाथेने समाधान होते असे कुठे आहे? म्हणून तर राजदीप वारंवार कुणाकडूनही लाथा खात आलेला आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे अशा कुणाही अन्य समर्थाच्या लाथा खाल्ल्यावरही हसून दाखवण्याचे कौशल्य राजदीपपाशी ठासून भरलेले आहे. प्रणबदा स्पष्टवक्ते असलेल्याने त्यांनी शब्दात राजदीपची जागच्या जागी हजामत केली. मोदींनी तर याला त्याच्याच कॅमेरात अपमानित व्हायचे चित्रण करायला भाग पाडलेले होते.

सध्या गुजरातच्या विधानसभा निवडणूकीचे अनेकांना वेध लागलेले आहेत. पाच वर्षापुर्वी अशीच स्थिती होती आणि तेव्हा मोदी गुजरातभर सदभावना यात्रेतून पक्षाचा प्रचार करायच्या मोहिमेवर होते. अशा यात्रेत त्यांनी कुठल्याही पत्रकाराला मुलाखती देणे वा सहभागी करून घेण्याचे टाळलेले होते. एका भव्य बसमधून मोदी राज्यभर फ़िरत होते. लोकांचे अभिवादन स्विकारत होते आणि काही जागी भाषणेही देत होते. त्यात घुसून मुलाखत घेण्याची कसरत राजदीपने केलेली होती. बसमध्ये ड्रायव्हर शेजारी असलेल्या सीटवर बसून मोदी चालत्या बसमधून लोकांचे अभिवादन स्विकारत होते. तर बसायला व उभेही रहायला तिथे जागा नसताना राजदीप त्यांच्या पायाशी बसून त्यांना प्रश्न विचारत होता. त्यात आपल्याला सुसह्य वाटतील त्या प्रश्नांना मोदींनी उत्तरे दिली व खोचक प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत मोदी रस्त्यावर गर्दी केलेल्या लोकांना हात दाखवित होते. थोडक्यात त्या मुलाखतीतून त्यांनी राजदीपला त्याची जागा दाखवून दिली. एका नेटवर्कचा संपादक असूनही राजदीप अशी लाचारी करू शकतो, ही त्याची गुणवत्ता आहे. त्यातून मोदींनी काय सिद्ध केले? राजदीपची वाहिनी वा तत्सम पत्रकारांची मोदींना गरज नाही. त्यांनी बरेवाईट मतप्रदर्शन केले म्हणून मोदींचा बाल बाका होत नाही. किंबहूना राजदीपसारखे लोक सन्मानाने वागवण्यासारखेही नाहीत. याचीच साक्ष त्या मुलाखतीतून मोदींनी दिली होती. आपल्याला इतके अपमानित केले जात असताना कुठला पत्रकार ते मुलाखतीचे नाटक रंगवत बसला असता? पण ती लवचिकता राजदीपने आत्मसात केली आहे. त्याच्यातला बेभान होऊन मध्येच आपल्या ‘वळणावर’ जाण्याचा हव्यास संपत नाही. म्हणूनच त्याला प्रणबदा मुखर्जी यांच्याकडून चपराक सहन करावी लागली. त्यातून तो शहाणा होईल अशी कोणी अपेक्षा करू नये. समर्था घरीचे श्वान असेच असतात.

श्रीमंतांच्या घरातले श्वान अतिशय उच्च जातीचे व उच्च कुलीन असतात. पण म्हणून त्यांना कोणावर भुंकावे व केव्हा भुंकू नये, याचे भान रहाते असे अजिबात नाही. कुळ कितीही उच्च असले तरी स्वभाव श्वानाचा असला की गळ्यात पट्टा बांधणार्‍याच्या दारी इमान बांधले जात असते. एका प्रसंगी महानायक अमिताभनेही राजदीप सरदेसाईची अशीच कानउघडणी केलेली होती. कुठल्या जाहिर कार्यक्रमात सानिया मिर्झा वा अन्य कोणा सेलेब्रीटीवर मारलेल्या ताशेर्‍यांची तिथल्या तिथे राजदीपला माफ़ी मागावी लागलेली आहे. इतका बेताल बेशरमपणा त्याने कुठून आत्मसात केला, याचेही अनेकदा कौतुक वाटते. खरे तर अशा व्यक्तीला पत्रकार म्हणून स्विकारणे हा दिल्लीच्या पत्रकारांचाही अपमानच आहे. कारण त्यातून पत्रकारितेची प्रतिष्ठा धुळीला मिळत असते. हाती लेखणी वा कॅमेरा-माईक आल्याने जगातल्या कोणाचाही कसाही अपमान करण्याची मोकळीक पत्रकाराला मिळालेली नाही. समोरच्या व्यक्तीची प्रतिष्ठा विसरून त्याच्यावर कुठलेही आरोप व ताशेरे झाडण्याचे स्वातंत्र्य मिळत नसते. राजदीप व तत्सम लोकांनी आपल्या पत्रकारितेला समर्थांच्या दारी बांधल्याने त्यांच्यावर अशी लज्जास्पद वेळ आलेली आहे. टेलिव्हिजन पत्रकारितेच्या आरंभी त्यात सहभागी झालेला म्हणून सर्वात जुना अनुभवी राजदीप, आज आपल्याच कर्माने नगण्य इसम होऊन बसला आहे. वेळोवेळी त्याला माफ़ी मागावी लागते आहे व विश्वसार्हता तर कधीच संपून गेली आहे. ‘औकातमध्ये रहा’ असे त्याला प्रणबदांनी सांगावे, यातच त्याची लायकी स्पष्ट झालेली आहे. एकूणच दिल्लीतली व इंग्रजीतली पत्रकारिता व बुद्धीवादी जगत आपली प्रतिष्ठा कशी गमावून बसले आहेत, त्याचे हे बोलके उदाहरण आहे. आणखी एका दशकानंतर लोकही यांना रस्यावर दगड मारू लागतील, इतकी दयनीय वेळ आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.


8 comments:

  1. तीही वेळ येऊन गेली ना भाऊ... न्यूयॉर्कमध्ये मार यानेच खाल्लाय की।

    ReplyDelete
  2. Bhau. . he nakki paha. . .
    https://rightlog.in/2017/10/rajdeep-sardesai-slapped-01/

    ReplyDelete
  3. bhau ekdam zabardast...

    ReplyDelete
  4. भाउ त्या राजदीप ची सवयच आहे आगाऊपणा करण्याची, त्याला असे झटके देणे गरजेचे असते

    ReplyDelete
  5. युपी निवडनुकीत पन राजदिपने खोटारडेपना केला होता.बनारस विद्यापीठ चे कुलगुरू मोदींच्या रोड शो मध्ये आहेत हे दिवसभर ट्विट करत होता नंतर चुक झाली म्हनला.ndtv चा रविश कुमार पन असाच नि्र्लज्जा सारखे युपी बिहारी लोकांना कौन जात? असे विचारत असतो.

    ReplyDelete
  6. सुमार दर्जाचे काही कुमारही असेच वागत असतात याचे उत्तम उदा म्हणजे राहुल गांधी यांच्या अमेरीकेतील भाषणासंदर्भातील अर्णव गोस्वामीचा चर्चा कार्यक्रम

    ReplyDelete
  7. Kumar ketkar and Girish Kuber he pan tyach category madhle aahet

    ReplyDelete
    Replies
    1. aani va(t)wagle hehi tyat asayalach havet.

      Delete