Tuesday, January 9, 2018

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

udayan raje bhosle के लिए इमेज परिणाम

भीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपका ठेवलेला आहे, तर मराठा ज्ञातीशी निगडीत असलेल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेने आजवर पूजनीय मानलेल्या छत्रपतींच्या वंशजांवरच शरसंघान करण्यापर्यंत मजल मारली आहे. मराठा अभिमान म्हणून मागल्या काही वर्षात ज्या संघटनांचे पीक आले, त्यात सर्वात आक्रमक म्हणून संभाजी ब्रिगेड या संघटनेचा समावेश होतो. पण क्रमाक्रमाने त्यातले मराठापण बाजूला पडून, ब्राह्मण या जाती समुहाविषयीचा मत्सर व द्वेष याच पायावर ही संघटना उभारली गेल्याचे अनेकांच्या लक्षात आले. कारण मराठा हितापेक्षाही ब्राह्मण द्वेषासाठी वाटेल ते करण्यापर्यंत या संघटनांच्या नेत्यांची मजल गेलेली होती. आरंभीच्या काळात शिवराय किंवा शंभूराजे यांचा अभिमान व सन्मान यासाठीच आपण लढत असल्याचे चित्र निर्माण केले. पुढे या संघटनेने हळुहळू आपण ब्राह्मण जात व पर्यायाने हिंदू धर्माच्या विरोधातला आपला खरा चेहरा समोर आणला आणि जमा झालेले बहुतांश मराठा तरूणही त्यापासून दुरावत गेले. तरीही त्यांनी आपल्या आरंभीच्या काळात शिवरायांच्या विविध वंशज वारसांना पुढे करून आपला कार्यभाग साधलेला होता. जोवर अशा संघटनांना छत्रपतींचे वारस समर्थन देत होते व पाठ थोपटत होते, तोपर्यंतच त्या वारसांचे कोडकौतुक होते. परंतु या संघटनांच्या मूळ हेतूमुळे हे वारस वा मराठा तरूण दुरावत गेले, तेव्हा या संघटनेने मराठे व छत्रपतींच्या वारसांवरही आसूड ओढायला मागेपुढे बघितलेले नाही. कालपरवा त्यापैकी कोणीतरी थेट छत्रपती उदयनराजे यांनाही धमकावण्यपर्यंत मजल मारली, तेव्हा झुंडीचे मानसशास्त्र कसे असते आणि त्यातला सच्चा अंध अनुयायी कसा असतो, त्याचीच प्रचिती आली. प्रोटेस्टंट ख्रिश्चन पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर याचे बोल आठवले.

‘ख्रिस्ताच्या शिकवणूकीतून जे जग आमच्यासमोर मांडले गेले आहे त्या जगावर माझा इतका दृढ विश्वास आहे, की त्यातील शब्द न शब्दाला आपण घट्ट धरून रहायला हवे असेच मी म्हणेन. त्यामुळे उद्या स्वर्गातील सर्वच्या सर्व देवदूत जरी खाली उतरून नव्या कराराच्या विरुद्ध मला काही सांगू लागले तरी मी त्यातील एकाही अक्षराचा विश्वास धरणार नाही. उलट त्यांचे शब्द कानांनी ऐकावे लागू नयेत म्हणून मी कान आणि डोळे बंद करून घेईन.’ (प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टीन ल्युथर)

हा मार्टीन ल्युथर म्हणजे अमेरिकन कृष्णवर्णियांचे समतेचे आंदोलन चालविणारा नव्हेतर ख्रिश्चन धर्मातील पोपविरोधी वेगळ्या पंथाचा संस्थापक होय. आपले अनुयायी किती कडवे आणि अविवेकी निष्ठावान असावेत, याचे मार्गदर्शन करताना तो काय म्हणतो? जे काही येशूच्या नावाने वा देवविषयक येशूच्या शिकवणूकीतून समोर आले आहे, त्याला आपण घट्ट चिकटून राहिले पाहिजे. म्हणजे त्याची चिकित्सा वगैरे करायची नसते. सत्य वा तारतम्य आपल्याला वर्ज्य आहे. ही निष्ठा इतकी पक्की व आंधळी असली पाहिजे, की ज्या स्वर्गातील देवदूताकरवी धर्माची शिकवण आली, ते देवदूत सत्य नसून त्याविषयी येशूने दिलेली शिकवण मानली पाहिजे. मग खुद्द देवदूतच समोर अवतरला आणि तो काही वेगळे सांगत असेल, तर त्यालाही जुमानण्य़ाचे कारण नाही. किंबहूना तो देवदूत काही वेगळे सांगत असेल, तर ते ऐकूनही घेऊ नये. त्यासाठी आपले डोळे व कान बंद करून घ्यावेत. संभाजी ब्रिगेडच्या अनुयायांची कथा त्यापेक्षा वेगळी आहे काय? आरंभ काळात त्यांनी आपले बस्तान बसवण्यासाठी उदयनराजे वा संभाजीराजे अशा शिवछत्रपतींच्या वारसांचा उपयोग करून घेतला. त्यांचेही देव्हारे माजवले होते. पण जेव्हा खुद्द तेच आज़चे छत्रपती काही वेगळे सांगू इच्छित आहेत, तेव्हा त्यांचे शब्द ऐकायला ब्रिगेडच्या अनुयायांना प्रतिबंध आहे. याचा अर्थ इतकाच, की साक्षात शिवराय वा शंभूराजे पृथ्वीतलावर आज अवतरले; तरी त्यांच्याकडे बघायचे वा त्यांचे ऐकायचे कारण नाही. शिवराय व मराठेशाही याविषयी परमपूज्य खेडेकर कोकाटे इत्यादिकांनी जी शिकवण दिलेली आहे, त्यालाच आपण घट्ट चिकटून बसले पाहिजे. त्याला छेद देणारे काही ऐकायला लागू नये, म्हणून कान बंद करून घ्यावेत. असे काही बघायला लागू नये म्हणून डोळेही बंद करून घेतले पाहिजेत. अन्यथा या लोकांनी उदयनराजे यांना कशाला धमकावले असते?

ज्या शिवराय वा शंभूराजे यांच्या नावाने राजकीय संघटन उभारून डावपेच खेळले गेले आहेत, त्यांना खुद्द छत्रपती वा त्यांच्या विचारांशी किती कर्तव्य आहे? त्याची़च प्रचिती या आठवडाभरात आलेली आहे. उदयनराजे यांनी छत्रपती पदाचा गैरवापर करू नये, असे आज त्यांना कोणी ब्रिगेडी नेता वा पदाधिकारी दमदाटी करून सांगतो आहे. हे पद उदयनराजे यांना ब्रिगेडने बहाल केलेले आहे काय? त्याचा वापर संभाजीराजे वा उदयनराजे यांनी कोणत्या प्रकारे करावा, ते संभाजी ब्रिगेडने ठरवावे, असे कुठे घटनेत लिहून ठेवलेले आहे काय? उदयनराजे यांचा जन्म त्या घराण्यात होण्यापुर्वी तशी कुठली अट घातलेली होती काय? छत्रपतींच्या वारसाने काय करावे किंवा काय बोलावे, हे ठरवण्य़ाचा अधिकार काही आगावू उचापतखोरांनी पुर्वीच्या काळात वापरल्याचा दुर्दैवी इतिहास आहे. त्याचाच जातीय तेढ वाढवण्यासाठी उपयोग करून संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला. ती संघटना त्याच जातीद्वेषावर फ़ोफ़ावली होती. कुणा भुरट्या ब्राह्मणाने शाहू महाराजांना कोणते अधिकार आहेत किंवा नाहीत, त्याचा बागुलबुवा केला, हेच संभाजी ब्रिगेडचे स्थापनेपासूनचे भांडवल आहे. आज तीच संघटना वा तिचे कोणी पदाधिकारी नेमका तोच अधिकार आपल्या हाती घेऊन विद्यमान छत्रपतींना दमदाटी करीत आहेत. वैदिक म्हणून जे शाहू महाराजांच्या कालखंडात गाजलेले प्रकरण आहे, त्यातले भटजी आणि आजच्या संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांच्यात नेमका कोणता गुणात्मक वा व्यवहारी फ़रक आहे? ते भटजी महाराजांना त्यांची मर्यादा सांगत होते आणि आजचे ब्रिगेडी उदयनराजेंना त्याच थाटात पदाचा गैरवापर करू नका म्हणून दटावत आहेत. थोडक्यात बघितले तर आजची संभाजी ब्रिगेड शाहूकालीन भटजींच्या भूमिकेत आलेली आहे. त्यांनीच आजवर मांडलेल्या विकृतीच्या आहारी ही संघटना गेलेली नाही काय?

याला सच्चा अनुयायी वा अंधभक्ती म्हणतात. ज्यात दैवतापेक्षा त्याचा पुरोहित वा पुजारी महत्वाचा होतो. ज्या शिवछत्रपतींच्या पुण्याईवर अशा संघटना निर्माण झाल्या व त्यांच्याच वारसाला पुढे करून या संघटनांनी पत मिळवली, त्याच वारसांना आता यांनी दमदाटी सुरू केलेली आहे. त्यात मग उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याच्या धमकीपर्यंत मजल गेली आहे. सातार्‍यात या राजाला कुणाच्या मर्जीने उमेदवारी मिळत नाही, की कुठल्या पक्षाचे ओशाळे रहावे लागत नाही. संभाजी ब्रिगेडप्रमाणे त्या छत्रपतीला कोणाची मर्जी संभाळावी लागत नाही. या आजच्या छत्रपतींचा मतदार ब्रिगेडच्या अनुयायांइतका आंधळा नाही. शिवराय वा शंभूराजे म्हणजे काय व किती मोठे, ते सांगण्यासाठी मराठी माणसाला कुणा खेडेकरने कोकाटण्याची कधी गरज भासली नाही. म्हणूनच उदयनराजेंनाही कुणा संघटनेच्या धमक्यांनी काहीही फ़रक पडत नाही. मात्र हा वारस बोलू लागला, तर पुढल्या काळात ब्रिगेडपाशी उरलेसुरले मराठेही तिथे शिल्लक रहाणार नाहीत. कारण कितीही अंधभक्ती असली तरी त्यातल्या माणसांना कधीना कधी डोळे व कान उघडण्य़ाची इच्छा होते आणि त्यांचा भ्रमनिरास होतच असतो. कारण शिवराय ही नुसती अंधभक्ती नाही. तो एक विचार आहे, ती एक भूमिका आहे. ती कुठल्या संघटनेची मोताद नसते की लाचार नसते. ती स्वयंभू असते. तिला सरकारी अनुदानावर पुतळे उभारून जगावे लागत नाही. जातीचे ठेकेदार तिचे अपहरण करू शकत नाहीत. त्यांनी खुशाल डोळे कान बंद करून घ्यावेत. मराठा समाज वा मानसिकता तितकी अगतिक नाही. अशा लोकांनी आजच्या छत्रपतींना दम देऊ नये, की शहाणपण शिकवू नये.

21 comments:

  1. आत्तापर्यत छञपती शिवरायच नाव घेऊन ब्राम्हणानी तर इतिहासातील विकृत मांडणी केलेली आहे व त्यानी शिवरायच नाव घेऊन पक्ष काढलेले पाठिबा देत आहे...उलट या सघटना सत्य इतिहास सांगत आहेत....

    ReplyDelete
    Replies
    1. Mohite raje, tumhich liha na mag Khara itihas..

      Delete
    2. सत्य घटना??? या संघटनांना इतिहास काय असतो हे तरी समजत का??

      Delete
    3. भाऊ, हा पहा तुम्ही म्हणतात तसा डोळे आणि कान बंद करून घेतलेला माणूस सापडला. अगदी तंतोतंत!

      Delete
    4. या संघटनेच्या नेत्यांनी लिहलेला इतिहास म्हणजे पोर्न कादंबऱ्या आहेत. त्याबद्दल कोर्टाने त्यांची पुस्तके नाश केली आहेत. त्यापेक्षा दफा ३०२ वगैरे जुनी मासिके श्री दगडूशेट गणपतीच्या बाजूला फुटपाथ वर मिळतात. ती वाचलेली काय वाईट ?

      Delete
    5. मोहीते,शुद्धलेखनाचा सराव करा सर्वप्रथम.. ब्राह्मणांचा उल्ल्र्ख ब्राम्हण असा करणाऱ्यांकडुन इतिहास शिकायचा नाही आम्हाला..

      Delete
    6. खेडेकरने नाक मुठीत धरून माफीनामा दिलाय कोर्टात . असल्यांच्या चमच्यानी अक्कल न पाजळलेलीच बरी .

      Delete
    7. मोहिते, तुम्हाला 'छत्रपती' हा शब्दही लिहिता आला नाही. आपण "छञपती" लिहिले आहे.

      2. शिवरायांचा उल्लेख आपण एकेरीने केलेला आहे. "त्यानी शिवरायच नाव घेऊन".

      आपण काय इतिहास लिहिणार आणि सांगणार? डोळे आणि कान उघडा आणि शुद्धलेखनाचा सराव करा सर्वप्रथम

      Delete
  2. जबरदस्त लेखणी. भाऊ, असे दुसरा कोणता संपादक आज मराठीत लिहू शकेल. विद्यमान सरकारने या लेखातून फार काही घेण्यासारखे आहे. त्यांच्या भाषणात जसा च्या तसा वापरावा असा जबरदस्त मजकूर यात आहे. जय हो, भाऊ. बाळशास्त्री जांभेकरांनी म्हटल्याप्रमाणे तुम्ही गावातले जागले आहात. लोचट, बेईमान, आशालभूत मराठी पत्रकारितेच्या काळ्याकुट्ट आकाशात तुमची लेखणी धुमकेतूच्या शेपटीसारखे चमकते आहे याचा फार आनंद वाटतो.

    ReplyDelete
    Replies
    1. या संघटनेने अतिशय खालच्या स्तरावर जाऊन हिंदू वर टिका केलीली आहे. ब्राम्हणाला झोडपण्याची एकही संधी यांनी सोडली नाही. तरिही हे पुरोगामी आणी जात न माननारे. एवढी टीका होऊनही बामनानी कधी मोर्चे काढले नाहीत कि तोडफोड केली नाही. हे एवढे घसरले कि यांना औरंगजेब आणि अफजलखान चांगले वाटू लागले . तथाकथित विचारवंताची टिम ऊभारुन लोकांचा बुध्दीभेद केला . शिवराय ईतर धर्माचा कसा आदर करायचे हे सांगताना ते स्वतःच्या हिंदू धर्मावर अतिशय खालच्या पातळीवर आले. शिवधर्म या त्यांच्या मासिकात आलेल्या लेखावर शिवा संघटनेचे कार्यकर्ते खवळले असता यांनी माफी सदृश्य लेख दुसऱ्या अंकात लिहिला व त्यात भगवान शंकराची स्तुती केली. या खेडेकराची पत्नी bjp च्या चिखलीच्या आमदार होत्या .

      Delete
    2. काय दिवस आलेत नाही? सत्य लिहिलं एखाद्या पत्रकाराने तर तो आज लाखात एक म्हणून गणला जातोय आणि
      बाकीचे?
      पत्रकारितेने ह्या देशाचं प्रमाणाच्या बाहेर नुकसान केलंय!
      काळी पिवळी निळी कसली कसली पत्रकारिता आली आहे फक्त सत्य पत्रकारीता तेवढी शोधावी लागेल.. ती सापडते का बघा...

      Delete
  3. भाऊ जबरदस्त लेख लिहीलाय आपण.राजे आहेत उदयनराजे ते शरद पवार साहेबांना भीत नाहीत तर हे ब्रिगेडी तर काय?

    ReplyDelete
  4. रक्ताच्या नात्यापेक्षा वैचारिक नातं श्रेष्ठ नाही काय ?

    ReplyDelete
  5. एक नंबर भाऊ. असच डोळ्यात अंजन घालणारं लिहीत राहा. बाकीचे पत्रकार असं लिहिण्याची हिंमत करणार नाहीत कारण ते कोणाचे तरी मिंधे झालेले आहेत किंवा नेहमी बोटचेपी भूमिका घेणारे आहेत। आम्हाला तुमचा अभिमान आहे। निर्भीड , सत्य आणि स्पष्टता।

    ReplyDelete
  6. आपलीच बुद्धी व्यक्ती,संघटना,विचार आणि भूमिकेच्या दावणीला बांधलेली आहे की काय ? असं आता वाटायला लागले आहे.

    ReplyDelete
  7. भाउ
    शेवटि या विषयावर लिहले, धन्यवाद.

    हा विषय इतकाच नाहि, माजि राॅ अधिकारि कर्नल R S N Sing याना या सददर्भात गुगल व Youtube.com वर सर्च केल्यास खुप ङोळे उघङणारि माहिति मिळेल.

    कर्नल पुरोहित यानि Militry Intelligance तर्फे गोळा केलेल्या माहितिचे जे जुजबि Details नेटवर उपलब्ध आहेत ते जिज्ञासुनि जरुर पहावे.

    म्हणजे Subversin चा हा खरा खेळ काय आहे व तो आपल्याला कुठे नेणार हे स्पष्ट कळेल,

    भाउ आपण या समाज, देशभेदि Subversin या डाव्या पाताळयत्रि तत्राचे वाचकाना दर्शन घडवावे जेणेकरुन सुजाण लोक या घाण राजकारणाच्या पलिकडले सत्य समजु शकतिल व सहज त्याला बळि पडणार नाहित, हि विनति

    ReplyDelete
  8. Bamnala shivya deun bahujanala ekatr anane va kunya eka rajkiy pakshacha fayda karun dyaych ha uddesh aahe ya saghatnanca. Maratha samajala hindu dharmatun fodun aapla svatantra dharm chalvaycha ha khara tyancha uddesh aahe

    ReplyDelete
  9. Brigade is islamic funded organization

    ReplyDelete