Wednesday, February 14, 2018

पुरोगामी अस्पृष्यता

Tripura: After we joined BJP, mosque turned us out, says group of villagers

तात्पुरत्या मशिदीचे छायाचित्र

भारतीय मुस्लिमांनी भाजपा़च्या विरोधात असले पाहिजे असा एक पुरोगामी अलिखीत नियम आहे. त्याचे उल्लंघन करणार्‍याला मुस्लिम मानायलाही पुरोगामी मंडळी तयार नसतात. जसजसे दिवस सरकत आहेत, तसतसा या ढोंगाचा मुखवटा फ़ाटत चालला आहे. पुरोगामी थोतांड इतके बेफ़ाम झालेले आहे, की त्यांनी आंबेडकरवाद किंवा इस्लाम यांच्याही नव्या व्याख्या तयार केलेल्या आहेत. अशा कुठल्याही नियमांचा निकष हिंदू द्वेष व भाजपाचा विरोध असा झालेला आहे. हळुहळू तो मुस्लिम समाजाच्या गळी उतरवण्याचा प्रयास चालू असून, तोच प्रयोग आंबेडकरी चळवळीवरही करण्यात आलेला आहे. तसे नसते तर इस्लामचे गाढे अभ्यासक असलेल्या मौलाना सलमान नदवी यांची मुस्लिम व्यक्तीगत कायदा संघटनेतून हाकालपट्टी झाली नसती. त्रिपुराच्या एका गावातील मुस्लिमांना मशिदीत नमाज पढण्यावर प्रतिबंध आला नसता. त्रिपुराच्या दक्षिणेस मोईदातिला नावाचे गाव आहे. तिथे ८३ मुस्लिम कुटुंबे रहातात. त्यापैकी २५ कुटुंबांनी भाजपाला मतदान करण्याचा निर्णय घेतला आणि स्थानिक मशिदीत त्यांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. मुस्लिम असण्याचा राजकारणाशी वा राजकीय पक्षाशी काय संबंध येतो? इस्लामच्या कुठल्या धर्मग्रंथामध्ये वा संहितेमध्ये भाजपाचा उल्लेख आहे काय? नसेल, तर या २५ कुटुंबांना मशिदीत येण्यास प्रतिबंध कशाला व्हावा? त्यांनी वेगळी मशिद बनवून आपले धर्मपालन कायम राखले आहे. पण मुस्लिमांच्या डोक्यात अशी खुळी कल्पना कोणी भरवली आहे? धर्माचे हे राजकीय अवडंबर कोण माजवतो आहे? भाजपावर धर्माचे राजकारण केल्याचा आरोप सातत्याने होत आला आहे. पण तोच आरोप करणारे लोकच बिगर हिंदूंनी भाजपाशी संपर्क साधला, की त्यांना धर्मबाह्य ठरवण्याचा अजब पवित्रा घेतात. अशा लोकांना आपल्या देशात धर्मनिरपेक्ष पुरोगामी म्हणून ओळखले जाते.

त्रिपुरा हा दिर्घकाळ मार्क्सवादी पक्षाच्या प्रभावाखाली राहिलेला प्रांत आहे. इशान्येच्या टोकाला असल्याने तिथे फ़ारसे राष्ट्रीय पक्ष जाऊन पोहोचले नाहीत. बंगालच्या विविध पक्ष वा नेत्यांचा तिथे थोडाफ़ार प्रभाव राहिला. पण भाजपाला मुळातच बंगालमध्ये फ़ारसे स्थान नसल्याचे त्रिपुरात भाजपाला आपले अनेक दशके बस्तान बसवता आले नाही. मागल्या लोकसभा निवडणूकीपासून भाजपाने प्रथमच तिथे प्रचाराची आघाडी उघडली होती. मोदी हा पंतप्रधान पदाचा पहिला उमेदवार या भागात प्रचारासाठी पोहोचला. त्यानंतर हळुहळू भाजपाने आपले संघटनात्मक स्वरूप विस्तारण्यास आरंभ केला. सहाजिकच मार्क्सवादी पक्षाच्या विरोधातील विविध राजकीय  व सामाजिक घटक भाजपाच्या बाजूने एकवटत गेले. कॉग्रेस, तृणमूल वा इतर स्थानिक पक्षाचे नेतेही भाजपाच्या गोटात दाखल होत गेले. खेरीज जे घटक मार्क्सवादी मुजोरीला कंटाळलेले होते, त्यांनाही नवा पक्ष मिळाला. त्रिपुरातील मुस्लिम समाजघटक त्यापैकीच एक आहे. सहाजिकच अल्प प्रमाणात मुस्लिमही मार्क्सवादी मुजोरीला पर्याय म्हणून भाजपाकडे आले. गंमत बघा मार्क्सवादी लोक धर्माला अफ़ूची गोळी मानतात. पण त्या पक्षात जायला कोणा मुस्लिमाला प्रतिबंध नाही. धर्माविषयी काही अटी न घालणार्‍या भाजपात जाणे मात्र मुस्लिमाला वर्ज्य आहे. हे खुळ कुठून आले? तर मागल्या दोनतीन दशकात भाजपावर हिंदूंचा पक्ष असल्याचा शिक्का मारून मुस्लिम विरोधी असल्याची आवई उठवण्यात आली. त्यामुळे जणू भाजपात सहभागी होणे म्हणजे हिंदू धर्म पत्करणे, असा आभास उभा करण्यात आला. त्याचाच हा परिपाक आहे. भारतातील सर्व पक्षांची धर्मनिरपेक्ष म्हणून नोंदणी होत असताना एका पक्षाला असे धर्माच्या नावाने बहिष्कृत करणेच घटनाबाह्य नाही काय? पण तसे होत राहिले आहे आणि त्यालाच पुरोगामीत्वाचा मुखवटा चढवण्यात आलेला आहे.

गंमत बघा, कोणीही पुरोगामी हिंदू असताना बाबरी मशिदीचे समर्थन करून राममंदिराला कडडून विरोध करत असला म्हणून त्याच्यावर कुठली हिंदू संस्था वा धर्मपीठ बहिष्काराची भूमिका घेत नाही. त्याची धर्मातून हाकालपट्टी करताना आढळणार नाही. राहुल गांधी मंदिरात जाऊ शकतात. त्यांना कोणी अडवले नसेल तर त्रिपुरातील  भाजपात दाखल झाले म्हणून मुस्लिमांना मशिदीत जाण्याला प्रतिबंध कसा असू शकतो? त्याच्या विरोधात कोणा पुरोगाम्याने मुस्लिमांचा मुलभूत अधिकार म्हणून आवाज उठावला आहे काय? नसेल, तर त्यांच्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे रहाते ना? आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी कंबर कसून ‘अभिनय’ करणार्‍या कमल हासन या तामिळी अभिनेत्याने किती आग्रहाने आपला रंग भगवा नसल्याचे सातत्याने सांगितले आहे? तितक्या आवेशात कुठल्याही पुरोगामी पक्षाचा मुस्लिम नेता अभिनेता आपला रंग हिरवा नसल्याचे सांगू धजावतो काय? त्याची अशी धर्मबहिष्कृत होण्याची भिती ही पुरोगामी असण्याची कसोटी मानली जाते. पण हिंदु असेल तर मात्र त्याला भगवा रंग वा धर्माचे कुठले प्रतिक घेऊन समोर येण्यास प्रतिबंध असतो. तरच त्याला पुरोगामी असण्याचे प्रमाणपत्र मिळू शकते. ही आधुनिक अस्पृष्यता पुरोगामीत्वाची कसोटी वा लक्षण बनले आहे. मग हिंदूत्वाचा अभिमान बाळगला वा धर्माचे कौतुक केले की तात्काळ पुरोगामी कसोटीवर अपात्र होण्याचा धोका असतो. कमल हासन याने आपला जुना मित्र रजनीकांत याच्याशी राजकीय युती असंभव असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. कशासाठी युती असंभव आहे? रजनीकांतचा गुन्हा काय आहे? तर रजनीकांतला भगव्या रंगाचे वा हिंदू धर्माचे आकर्षण असल्याचा कमल हासनला संशय आहे. त्रिपुराच्या त्या खेड्यातील ते धर्मांध मुस्लिम व कमल हासन यात कुठला गुणात्मक फ़रक आहे?

तमाम पुरोगाम्यांना भाजपा वा संघाविषयी तिटकारा आहे. त्याचे एकमेव कारण या पक्ष व संघटनेतले लोक हिंदूत्वाचा मान राखू बघतात. बाकी त्यांची गुणवत्ता किती का असेना? हिंदू धर्माचे कौतुक वा अभिमान असणे हा पुरोगमीत्वाला बाधा आणणारा मुद्दा असतो. बाकी अन्य कुठल्याही धर्माचा अभिमान असो किंवा आग्रह असो, त्याने पुरोगामीत्वाला बाधा येत नाही. थोडक्यात पुरोगामी भारतात हिंदू असणे व त्याविषयी अभिमान बाळगणे हे सर्वात अघोरी पाप आहे. तात्काळ तुम्ही अस्पृष्य होऊन जाता. बाकीच्या धर्मातील कालबाह्य परंपरा, रुढी पवित्र व पुरोगामी असतात. तिहेरी तलाक हा अल्लाचा म्हणजे परमेश्वराचा शब्द असतो. पण श्रीकृष्णाने कथन केलेली भगवत गीता मात्र भिंगाखाली धरून तपासायची असते. तिची वैज्ञानिक छाननी पुरोगामी असते आणि कुराण मात्र विज्ञानसिद्ध पुरोगामी गाथा असते. असली नवी वर्णव्यवस्था आता भारतात मांडली जात आहे. त्यातूनच मग इस्लामचे अभ्यासक मौलाना सलमान नदवी इस्लामचे गुन्हेगार होऊन जातात. अयोध्येतील मशिद अन्यत्र हलवता येऊ शकते असे त्यांनी इस्लामचे दाखले देऊन मान्य केल्यावर ते बहिष्कृत होतात. हे नवे पुरोगामी वेदशास्त्र असते. त्यात नवे वेदशास्त्रसंपन्न उदयास आलेले आहेत. त्यांनी आज सूर्याला चंद्र संबोधले की तात्काळ खगोलशास्त्रही बदलून जाते. त्यात राहुल गांधींनी कुठल्याही थापा मारल्या तर त्याच्या पुराव्याची गरज नसते. पण नरेंद्र मोदींनी पुराव्यानिशी सत्य मांडले तरी त्याची छाननी वर्षानुवर्षे चालू रहाते. ही नवी आधुनिक शरियत अस्तित्वात येत चालली आहे. त्यात हिंदूंच्या विरोधात काहीही बोला, हिदूत्वाच्या विरोधात कुठलेही आरोप करा, ते सत्य असते आणि त्याला आव्हान दिले तर मात्र पुरावे सज्जड आणावे लागतात. आयडीया ऑफ़ इंडिया युगात भाजपा वा संघ ही अस्पृष्य जातजमात झाली आहे.

7 comments:

  1. खूप छान अगदी मनातल्या भावना मांडल्या तुम्ही भाऊ .मला वाटते ही शरियत भारतात ग्रुह्युद्ध करून राहील .भारताचे भविष्य विनाशाकडे वाटचाल करत आहे .फक्त मोदी हे सर्व थोपवू शकतात (आपली पण जबाबदारी आहेच).जर फुरोगमी यशस्वी झाले तर भ्र्म्हदेव सुद्धा या देशाला वाचवू शकणार नाही .
    बाकी फक्त तुमच्या मुळे आम्हला या सर्व गोष्टी कळू लागल्या आहेत .नाहीतरी आम्हीपण 80 कोटी सामन्य हिन्दू सारखेच होतो .भाऊ मला वाटते आपण (10लाख आपले वाचक -चाहते )सर्वांनी काही तरी करायला पाहिजे .नाहीतरी आपल्याला इतिहास माफ करणार नाही .पण नेमके काय करायचे ते माहीत नाही .तरी तुम्ही सर्वांना जोडणारा काहितरी मार्ग अथवा कार्य सांगा . कसं आहे आपल्या वर अन्याय होत आहे हे माहीत असूनही ते सहन करतना खुप वेदना होतात .बाकी भारतीयांना अन्याय होतो आहे हेच मान्य नाही .कारण ते या क।रस्थनपसून अनभिज्ञ आहेत . आपला नम्र शिष्य

    ReplyDelete
    Replies
    1. सहमत काहीतरी करायलाच हवं असं नेहमी वाटतं



      पण नक्की काय ?????
      भाऊ आपले मार्गदर्शन आवश्यक आहे

      Delete
    2. मंत्र साधा तंत्र सोपे : शाखा हे असे ठिकाण की त्यात सर्व स्वत:ला भारतमातेचे पुत्र मानणारे एकत्र येऊ शकतात
      Coming together Being Together and Sticking up togather संघ ही समाजातली एक संघटना नाही तर संपूर्ण समाजालाच संघटित करणारी प्रणाली आहे हे जसे होत जाईल तसे जे आता प्रश्न वाटतात त्यातले अनेक विरत जातील

      Delete
  2. चांगलं आहे भाऊ, हे झालं तर ते मुस्लिम निदान हिंदू होण्याची संधी आहे. अर्थात सध्या भारतात वरचं वाक्य बोलणं हा पण गुन्हाच म्हणावा लागेल. पण तुमचा ब्लॉग आहे त्यामुळे तो गुन्हा मी करू शकतो.

    ReplyDelete
  3. हिंदू म्हणुन एक होणे हाच एक मात्र पर्याय आहे.अख्या जगात हेच एकमेव छत्र आहे ज्याच्या खाली सर्व धर्माचे लोक गण्या गोविंदाने नांदु शकतात.

    ReplyDelete