कुठल्याही खेळात तुमच्या हातात काय आहे? यापेक्षा आहे, त्याचा किती खुबीने तुम्ही वापर करता, यावर परिणाम अवलंबून असतात. गेल्या मंगळवारी कर्नाटक विधानसभा मतदानाची मोजणी चालू होती आणि त्याच्याही आधी विविध मतचाचण्यांचे निकाल आलेले होते. त्यावर चाललेल्या चर्चेत प्रत्येकजण देवेगौडांच्या जनता दल सेक्युलर पक्षाला तिसरा क्रमांक दाखवत होता. त्या ३०-४० जागांच्या बळावर गौडा त्रिशंकू विधानसभेत किंगमेकर होतील, असेही सांगितले जात होते. पण गौडांचे प्रवक्ते व नेते मात्र आपणच किंग होणार, असे ठामपणे सांगत होते. त्याचा अर्थ आपणच बहूमताने सत्तेत येऊ असाच होता. त्यात तथ्य नाही याची त्याही पक्षाच्या नेत्यांना खात्री होती आणि झालेही तसेच. गौडांचा पक्ष तिसर्या क्रमांकावर फ़ेकला गेला, तरी कॉग्रेसला आपल्या जागा टिकवता आल्या नाहीत आणि भाजपाला बहूमताचा पल्ला गाठता आला नाही. अशावेळी मग कॉग्रेसची लाचारी वापरून घेण्याची चलाखी गौडांनी केली. निकाल लागत असताना त्यांनी मौन धारण केले व कसलीही प्रतिक्रीया देण्याचे टाळले. कारण बहूमत गमावलेली कॉग्रेस भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कुठलीही नामुष्की पत्करू शकते, हे गौडांचा अनुभवी मेंदू त्यांना बजावत होता. कारण दिल्लीत कॉग्रेसने चार वर्षापुर्वी तोच मुर्खपणा केलेला होता आणि गौडा त्याच प्रतिक्षेत आपल्या घरात शांत बसून राहिले होते. झालेही तसेच. निकाल अंतिम टप्प्यात आल्यावर भाजपाचे बहूमत हुकले आणि कुठल्याही मार्गाने भाजपा सत्तेत येण्याचा प्रयत्न करण्याच्या भयाने कॉग्रेस व्याकुळ झाली. तिने परस्पर गौडांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देऊन टाकले. अवघ्या ३७ आमदारांची इतकी मोठी किंमत गौडांना संयम व शांत बसून मिळाली. मग ६३ आमदार जिंकलेल्या शिवसेनेला साडेतीन वर्षापुर्वी महाराष्ट्रात इतके नतमस्तक होऊन बारा मंत्रीपदे पत्करण्याची नामुष्की कशाला आली?
२०१३ सालाच्या अखेरीस चार राज्यांच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि तेव्हाच लोकसभेच्या निवडणुकांचे वेध लागलेले होते. भाजपाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केलेले होते आणि त्यांच्या लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक तेव्हा माध्यमातून झळकवले जात होते. त्याची काहीशी प्रचिती चारपैकी तीन राज्यांच्या निकालातून आलेली होती. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तिन्ही राज्यात मोदींनी प्रचार केलेला होता आणि त्यात भाजपाने कॉग्रेसला संपुर्णपणे लोळविले होते. फ़क्त दिल्लीत मोदींची जादू चालली नव्हती. पण तिथेही कॉग्रेस साफ़ जमिनदोस्त झालेली होती. मात्र भाजपाने मोठा पल्ला गाठला तरी बहूमताचा आकडा पार करता आलेला नव्हता. त्याला नव्याने मैदानात आलेला आम आदमी पक्ष कारणीभूत होता. मोदींच्या भयाने व्याकुळ झालेल्य कॉग्रेसने मग नवख्या आम आदमी पक्षाला दिल्लीत सरकार बनवण्यासाठी परस्पर पाठींबा देऊन टाकला होता. त्यासाठी कुठली खलबते झाली नव्हती की सत्तेचे वाटपही मागितलेले नव्हते. केजरीवालनी कॉग्रेसला शिव्याशाप देतच ती ऑफ़र स्विकारली व शपथही घेतली. कॉग्रेसला भाजपाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचे मोठे समाधान मिळाले. पण पुढल्या काळात कॉग्रेस दिल्लीतून जवळपास नामशेष होऊन गेली. कारण त्यानंतर सहा महिन्यांनी लोकसभेच्या निवडणूका झाल्या, त्यात भाजपाने दिल्लीतील सातही जागा जिंकल्या आणि कॉग्रेसने तिसर्या क्रमांकावर जात आपला सत्यानाश करून घेतला. भाजपाला रोखण्यासाठी वाट्टेल ते; ही रणनिती तिथून सुरू झाली आणि मागल्या चार वर्षात त्याचे अत्यंत प्रामाणिकपणे अनुकरण सुरू आहे. कर्नाटक त्याचीच पुढली पायरी आहे. ह्या घायकुतीला आलेल्या कॉग्रेसी भूमिकेवर विश्वास ठेवूनच देवेगौडा निकाल लागत असताना शांत बसले होते. पण भाजपाने सत्तेचा दावा करण्याकडे त्यांचे लक्ष लागलेले होते.
निकाल स्पष्ट होईपर्यंत कॉग्रेसने सत्ता गमावल्याचे समोर आलेले होते आणि भाजपा थोड्या फ़रकाने सत्तेवर आरुढ होण्याची चिन्हे दिसू लागलेली होती. मग आपल्याला सत्ता मिळण्यापेक्षा भाजपाला रोखण्याची अगतिकता कॉग्रेसमध्ये आली. दिल्लीप्रमाणेच त्यांनी परस्पर जनता दल सेक्युलरला पाठींबा जाहिर करून टाकला. असेच शरद पवारांनी महाराष्ट्रातही विधानसभेचे निकाल स्पष्ट होण्यापुर्वीच केलेले होते. राज्यात भाजपाला बहूमत मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आणि पवारांनी परस्पर स्थीर सरकार यावे, म्हणून भाजपाला बाहेरून पाठींब्याची घोषणा करून टाकली. तसे झाले नसते तर भाजपाला बहूमतासाठी शिवसेनेच्या मनधरण्या कराव्या लागल्या असत्या. कारण १२३ आमदारांची संख्या झाल्याने भाजपाला २२ आमदार कमी पडत होते आणि राष्ट्रवादीच्या ४१ आमदारांचा पाठींबा घेऊन भाजपा सरकार बनवू शकत नव्हता. उजळमाथ्याने भाजपाला पवारांच्या पक्षाचा पाठींबा घेणे शक्यच नव्हते. कॉग्रेस कुठल्याही परिस्थितीत भाजपाला पाठींबा देऊ शकत नव्हती. म्हणजेच सत्तेसाठी अखेरीस भाजपाला शिवसेनेलाच शरण येण्याखेरीज अन्य पर्याय नव्हता, मात्र त्या प्रसंगी आपली सोयीची वेळ येईपर्यंत शिवसेनेच्या वाघाने दबा धरून शांत बसण्याची गरज होती. पण नको त्यावेळी गुरगुरून डरकाळ्या फ़ोडण्याच्या हौशेने सेनेच्या तोंडाशी आलेली शिकार गेली. किंबहूना पवारांनी धुर्तपणा करीत सेनेच्या वाघाला विचलीत केले आणि गुरगुरायला भाग पाडले. सावजाला जसे देवेगौडांनी गाफ़ील ठेवून शिकार केली, तसे त्यावेळी शिवसेना शांत बसली असती, तर भाजपाची शिकार अजिबात अवघड नव्हती. या खेळात मित्रशत्रू गाफ़िल पकडण्याला महत्व असते. तिथेच उत्साही शिवसेनेने आपला घात करून घेतला आणि तेच सावज होऊन भाजपाचे शिकार होऊन गेले. म्हणून देवेगौडांच्या ३७ पेक्षा अधिक आमदार असूनही सेनेला सत्तेत नामुष्कीने सहभागी व्हावे लागले.
पवारांनी भाजपाला उघड पाठींबा दिला तरी तो उघडपणे भाजपाला स्विकारणे शक्य नव्हते. त्याचा स्विकार न करताच भाजपाने फ़डणविसांचा शपथविधी उरकून घेतला. विधानसभेतही आवाजी मतदानाने विश्वासमत संमत करून घेतले. म्हणजे राज्यपालांकडे पुर्ण बहूमताची पत्रे दिली नसतानाही शपथविधी पुर्ण झाला व विश्वासप्रस्तावही संमत झालेला होता. फ़ार कशाला विरोधी नेता म्हणून एकनाथ शिंदे यांचीही निवड होऊन गेलेली होती. त्यामुळे सेनेला उल्लू बनवण्यात भाजपा-पवार पुर्णपणे यशस्वी झालेले होते. आजचा कर्नाटक व तेव्हाचा महाराष्ट्र यांची परिस्थिती सारखीच होती. पण फ़रक कसा जमिनअस्मानाचा आहे? शिवसेनेला आपल्या हाती हुकूमाचा पत्ता आहे याचेही भान नव्हते. म्हणून ते भाजपाच्या चक्रव्युहात फ़सत गेले. आवाजी बहूमत कामाचे नव्हते. तिथेच फ़डणविसांचा येदीयुरप्पा होऊ शकला असता. किंबहूना तशीच परिस्थिती निर्माण झालेली होती. कारण सेनेला भाजपाची चुक उमजली नसली व पवारांचा डाव कळला नसला, तरी एका राजकीय नेत्याला त्याचे नेमके भान होते. त्याने हायकोर्टात जाऊन पाचर मारली होती. कर्नाटकप्रमाणे त्याची सुनावणी झाली असती, तर नाक मुठीत धरून भाजपाला सेनेचे पाय धरावे लागले असते. भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आवाजी मतदानाने संमत झालेल्या प्रस्तावाला आव्हान दिले. त्यासाठी कोर्टात याचिका केलेली होती. त्यातला धोका ओळखून फ़डणवीसांनी धावपळ केली. दिल्लीहून भाजपाचे काही नेते धावत मातोश्रीवर आले. धर्मेंद्र प्रधान, सुरेश प्रभू अशा लोकांना पुढे करून शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवले गेले. भाजपा इतका शरणागत कशाला झाला आहे आणि आपल्या हातात असे कुठले हुकूमाचे पत्ते आहेत, त्याचीही चाचपणी करायची सेनेच्या पक्षप्रमुख वा नेत्यांनी केली नाही. परिणामी भाजपाने सेनेचा पाठींबा जवळपास फ़ुकटात मिळवला.
आंबेडकरांच्या याचिकेची सुनावणी झाली असती तर आवाजी मतदान फ़ेटाळून नव्याने बहूमत सिद्ध करण्याचाच आदेश हायकोर्टाने दिला असता. सहाजिकच नव्याने विधानसभा बोलावून विश्वासमत घ्यावे लागले असते. अशा स्थितीत फ़डणविसांच्या समोर दोन पर्याय राहिले असते. सेनेला शरण जाऊन सत्तावाटपाची बोलणी करणे किंवा उघडपणे राष्ट्रवादी पक्षाचा पाठींबा घेणे. गैरहजर राहून राष्ट्रवादी फ़डणवीस सरकार वा़चवू शकले असते. पण ते पवारांना परवडणार नव्हते, की भाजपाच्या अब्रुला पेलणारे नव्हते. सहाजिकच फ़डणविसांचा येदीयुरप्पा होणे किंवा सेनेच्या हातापाया पडून पाठींबा मिळवणे; इतकाच पर्याय शिल्लक उरला असता. त्यासाठी सेनेने शांत बसून आपल्या टप्प्यात सावज येण्यापर्यंत प्रतिक्षा तीच बहूमोल संधी होती. पण सेनेचा धीर सुटत चालला होता. योगायोगाने कर्नाटकात ज्या अफ़वा व वावड्या उडवण्यात आल्या, त्याच तेव्हा महाराष्ट्रातही उडवल्या गेल्या होत्या. सेनेचे आमदार फ़ुटणार. सेनेचा एक गट फ़ुटणार, अशा वावड्या तेव्हा माध्यमात उडवल्या जात होत्या. सेना त्यालाच जास्त बळी पडली. आपल्या हातात ६३ आमदारांचा हुकमी पत्ता आहे, याचेही भान सेनेला नव्हते, की त्याचा विचारही झाला नाही. उलट भाजपा गोत्यात असताना सेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचे उदात्त नाटक रंगवण्यात आले. जणू सेनाच गरजू असल्याप्रमाणे त्यांना वागवण्यात आले. त्या सापळ्यात सेना आयती फ़सली. फ़ुटकळ खाती व बारा मंत्रीपदावर सेनेची बोळवण करण्यात आली. पण यासाठी भाजपाला दोष देता येणार नाही. सेनेला आपल्या शक्तीचे भान नव्हते की आपल्याकडे असलेले ६३ आमदार कसे वापरावेत, याची चतुराई नव्हती. त्यापेक्षा सेनेचे बहुतांश नेते तोंडाची वाफ़ दवडून डरकाळ्या फ़ोडण्यातच मशगुल राहिले आणि भाजपाला आपली शिकार आरामात करू दिली.
तेव्हा सेनेकडे दोन घसघशीत पर्याय होते. एक म्हणजे अडचणीत सापडलेल्या भाजपाच्या मुख्यमंत्र्याला बाहेरून पाठींबा देत जगायची मोकळीक देणे आणि कायम पाठींबा काढून घेण्याच्या दबावाखाली ठेवणे. हा प्रकार फ़ारकाळ चालला नसता आणि सेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याची अगतिकता भाजपावर आली असती. मग त्यासाठी सत्तावाटपाची रितसर बोलणी करता आली असती. जागांच्या प्रमाणात आणि महत्वाची खाती मागूनच भाजपाला पाठींबा देण्याचे पाऊल उचलता आले असते. शिवाय अवघ्या जगाने भाजपाला शिवसेनेसमोर नाकदुर्या काढतानाही बघितले असते. कारण भाजपा तेव्हा गोत्यात सापडला होता. एकतर त्याला कोर्टाकडून थप्पड बसली असती आणि नाहीतर राष्ट्रवादीशी असलेला छुपा समझौता चव्हाट्यावर आला असता. शिवाय सेनेचा पाठींबा हवा तर तो सेनेच्या अटीवर देण्याचीही मोकळीक राहिली असती. पण सेनेला उतावळेपणाने इतके घेरलेले होते, की कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या काही नेत्यांना मंत्रीपदावर जाऊन आरुढ व्हायचे होते. त्यात पक्षाची नाचक्की होवो किंवा कुठलेही महत्वाचे पद नाकारले जावो. त्यामुळे ६३ इतकी मोठी आमदारसंख्या असूनही सेनेला अजून भाजपाला शह देता आलेला नाही. उलट मागल्या साडेतीन वर्षात नुसत्या उखाळ्यापाखाळ्या काढण्याच्या पुढे शिवसेना जाऊ शकलेली नाही. राजिनामे खिशात आहेत आणि कधीही राजिनामे देऊ, अशा नुसत्या डरकाळ्या फ़ोडण्यापलिकडे सेनेची मजल जाऊ शकलेली नाही. आजही सेनेसे ६३ आमदार ही जमेची बाजू आहे. पण आपला हुकूमाचा पत्ता वापरण्याची हिंमत सेनेच्या नेतृत्वापाशी नाही. म्हणून मग संख्येने लाचार असूनही भाजपा महाराष्ट्रात सेनेची टवाळी करू शकतो आहे आणि संख्येनुसार आपले पारडे जड असूनही शिवसेना मात्र अवहेलना सहन करून सरकारमध्ये टिकून राहिली आहे.
वेळ आली तेव्हा चंद्राबाबूंनी मोदी सरकारला झुगारण्याची हिंमत दाखवली आहे. त्याने मोदींना फ़रक पडणार नव्हता. शिवसेनेची स्थिती तशी अजिबात नाही. आजही सेनेने सत्तेतून बाहेर पडायचे ठरवले, तरी फ़डणवॊस सरकारला उघडपणे राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन सरकार टिकवता येणार नाही. परिस्थिती बदलली असल्याने पवारही आता भाजपाच्या समर्थनाला कशाही पद्धतीने उभे रहाणार नाहीत. मग आपल्या ६३ आमदारांची किंमत मागायचे धाडस शिवसेनेपाशी कशाला नाही? त्यांच्या नेत्यांना आपली शक्ती कळत नसावी, किंवा हाती आहे ते गमावण्याचे भय त्यांना सतावत असावे. म्हणून स्वाभिमानाच्या नुसत्या गमजा केल्या जातात. पण त्या दिशेने एक पाऊलही टाकायची हिंमत होत नाही. कर्नाटक वा गोव्यासारख्या क्षुल्लक राज्यासाठी भाजपाने केलेला आटापिटा बघता महाराष्ट्र हातचा जाण्याच्या भयाने भाजपा किती नाकदुर्या काढू शकतो, हे सहज लक्षात येऊ शकते. पण त्यासाठी आपल्या ६३ आमदारांचे बळ वापरण्याची इच्छा व हिंमत सेनेपाशी असायला हवी. मुखपत्रात डरकाळ्या फ़ोडून साधा ससाही घाबरणार नाही. तर सत्तेची चटक लागलेले भाजपाचे शिकारी कशाला भयभीत होतील? गरजणारे पडत नाहीत, हे ओळखूनच भाजपाचे चाणक्य शिवसेनेला मागली चार वर्षे खेळवित आहेत. त्यांनाच कर्नाटकातल्या देवेगौडांना खेळवता आले नाही. ना कॉग्रेस त्यांना खेळवू शकली नाही. अवघ्या ३७ जागा जिंकल्या असताना म्हणूनच गौडांनी आपल्या लाडक्याला मुख्यमंत्रीपदी बसवण्यात यश मिळवले. उलट ६३ ढाण्या वाघांना गोंजारत बसलेले शिवसेनेचे नेतृत्व, आजही नुसते गुरगुरते आहे. आपले शक्तीस्थान माहिती असले पाहिजे, तसेच शत्रूचे दुर्बळस्थानही ओळखता आले पाहिजे. छगन भुजबळ फ़ुटले तेव्हा तात्कालीन कॉग्रेस मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी बोललेले एक वाक्य आठवते. सावज टप्प्यात आल्याशिवाय गोळी झाडायची नसते.
ekadam khray bhau ,karnataka ch natak chalu astana media wa lokana sudha maharashtrachi athwan yet hoti,teva pan shivsena ka itaki zuktey te kalal nawat,mulat adhi khup akhadali hoti jaga thodya jast dilya asatya tar aj dycm kiwa cm pan asata ,khati pan milali asati,nako tewa akhadupana nako tewa lachari dohni pan samjal nahi.uddhav la khrach rajkaran jamat nahiye,ata palghar madhye pan har honarey,mag yuti anakhi tanel,bjp la ata garaj ahe kran opposition ekjut zalay ata tari nit rajkarn karave lagel.
ReplyDeleteअप्रतिम आणि अचूक विश्लेषण...
ReplyDeletebhau karnat ani maharashtrachi paristithi mulat vegli aahe
ReplyDeletekarnatakat 3 mukhya pakshat nivadnuk jhali
maharashtrat 4 pakshat nivdnuk jhali.sene cha pathimba ghetla nasta tar rashtravaadicha baherun pathimba gheun sarkar chalavla asta.
kiva bahumat siddha karyacha hota teva rashtravadiche aamdaar sadnabaher gele aste ani tyancha sankhyabal siddha jhala asta.
mhnun maharastrachi stithi karnatakshi jodna saaf chukicha aahe
Ho bhavu seneche daat-nakh aani akkal naslele vagh
ReplyDeleteपहचानिए 'गद्दारों' को :-
ReplyDeleteतारीख बुधवार 23 मई 2018 । दिल्ली का पांच सितारा भव्य हॉल । प्रकाशक हार्पर कोलिन्स और लेखक असद दुर्रानी की पुस्तक का विमोचन समारोह । इसका विमोचन किया पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह, ओमर अब्दुल्ला, बरखा दत्त, फारूख अब्दुल्ला, कपिल सिब्बल, पूर्व उपराष्ट्रपति हामिद अंसारी, यशवंत सिन्हा, शिव शंकर मेनन आदि ने । सभी नामों को ध्यान से पढ़िए । फिर जानिए पर्दे के पीछे का पूरा सच ।
दिल्ली में पुस्तक ‘द स्पाई क्रॉनिकल्स : रॉ, आईएसआई एंड द इलूजन ऑफ पीस’ का विमोचन समारोह रखा गया । इस पुस्तक को दुर्रानी के साथ सह लेखक के रूप में रॉ के पूर्व उपमुखिया ए एस दुलत और पत्रकार आदित्य सिन्हा द्वारा लिखे जाने का समाचार सामने आया । पहले तो जानिए दुर्रानी को ।असद दुर्रानी इस नाम से आप बेशक परिचित ना होंगे, लेकिन इस पोस्ट को पढ़ने के बाद आप इस नाम को कभी भूल नही पाएंगे । असद दुर्रानी पाकिस्तान की खुफिया आतंकी एजेंसी ISI के चीफ रहे हैं। जी "आईएसआई"के चीफ , सही पढ़ा आपने ।
इन्ही दुर्रानी साहब ने पाकिस्तान के इशारे पर अपनी एक किताब लिखी है जिसमें भारत को गलत ढंग से दर्शाया गया है। भारत की नीतियों को गलत, दादागिरी भरी व दुर्भावना से ग्रसित बताया है। इस पुस्तक में उन्होंने भारत की बेहतरीन खुफिया एजेंसी RAW और भारतीय सेना पर भी गंभीर झूठे आरोप लगाये हैं ।इस किताब में उन्होंने वर्तमान NSA चीफ अजित डोवाल की भी बहुत बुराई की है । इसमे वर्तमान भारत सरकार की नीतियों और मोदी की भी आलोचना की गई है । दुर्भाग्य देखिये । 2 कौड़ी का भाड़े का टट्टू असद दुर्रानी जो कल तक भारत मे आतंकवाद फैलाता था, जो कल तक भारत मे आतंकवादी भेजता था, जिसकी ISI ने कसाब को भेज कर मुम्बई पर हलमा करवाया था ; आज वही असद दुर्रानी जब सेनानिवृत हो गया तब इसने पाकिस्तान की सेना और ISI द्वारा फेंके गए टुकड़ों की ख़ातिर भारत के खिलाफ एक किताब लिख डाली । मजा देखिये कांग्रेस का पूरा समर्थन इस दुर्रानी को मिला ।
अब आगे सुनिए । इस पुस्तक को भारत मे भव्य पैमाने पर लांच करने का कार्यक्रम बना । असद दुर्रानी की भारत के प्रति नफरत और भारत मे आतंक फैलाने के इरादों को देखते हुए मोदी सरकार ने इन्हें बुक लॉन्च के लिए भारत आने के लिए वीज़ा देने से साफ इनकार कर दिया। अब जब वीजा नही तो दुर्रानी मियां भारत आ नही सकते । देश विरोधी बुक लॉन्च खटाई में पड़ गया। मने हिम्मत देखिये दुश्मन देश की खुफिया एजेंसी का चीफ भारत मे पहले तो आतंकवाद फैलाता है । फिर भारत के खिलाफ किताब लिखता है और फिर उसे भारत मे लॉन्च करने भी आने की हिम्मत दिखाता है । जानते हैं क्यों? क्योकि इस देश मे उसके कई दोस्त उसकी मदद को तैयार बैठे हैं। वे बाहें फैलाये उसे गले लगाने का इंतज़ार कर रहे हैं ।
असद दुर्रानी ने ये सब पैसे और अपने देश पाकिस्तान के प्रति निष्ठा के चलते किया । लेकिन पूरे विश्व मे जब भी कोई मोदी विरोध करे तो भला कांग्रेस कैसे चुप बैठ सकती है? सो कांग्रेस जो बाहें फैलाये ex ISI चीफ का इस्तकबाल करने का प्लान बनाया । लेकिन वीजा नही मिला । पूरी कांग्रेस बहुत मायूस हुई और इसे अभिव्यक्ति की आज़ादी खत्म करने वाला कदम बता दिया । कांग्रेस के साथ इनकी पूरी गैंग भी मैदान में उतर आई । जब असद दुर्रानी को वीज़ा नही दिया गया तो कांग्रेस ने बाकायदा एक 5-Star होटल में आयोजन कर इस पुस्तक को रिलीज़ करवाया ।
कांग्रेस ने अब खुलकर इशारा किया है कि मोदी सरकार चाहें जितना ज़ोर लगा ले अगर कांग्रेस ने ठान लिया है कि वे किसी पाकिस्तानी को भारत बुला के रहेंगे तो वे हर हद्द को पार कर उसे बुलाएंगे। और उसने ऐसा किया भी । कांग्रेस ने कार्यक्रम में बाकायदा पूर्व ISI Chief असद दुर्रानी को वीडियो कॉन्फ्रेंस के ज़रिए इस पूरे कार्यक्रम का हिस्सा बनाया। यह एक चैलेंज है कि लो देशवासियों अब उखाड़ लो जो उखाड़ना है । हमने तो बुला लिया और किताब का विमोचन भी करवा दिया ।
आप जानिए इस हकीकत हो । ये सब कांग्रेसी मोदी विरोध में इतने अंधे हो चुके हैं कि अब देश विरोध तक पर उतर आए हैं? मोदी विरोध तो ठीक है पर भारत सरकार का विरोध? RAW का विरोध? भारतीय सेना का विरोध? भारतीय संवैधानिक संस्थाओं का विरोध कहाँ तक ठीक है?
हां पूर्व रॉ अधिकारी दुलत का शामिल होना एक गंभीर संकेत है । क्या पिछले 70 सालों से सुरक्षा तंत्र में इतने बड़े स्तर के अधिकारी भी बतौर काँग्रेसी एजेंट कार्य कर रहे थे । देखिये । समझिए ।
सुधांशु
Fakt NCP ch paryay nhavata BJP kade tar apakshanchi sankhya pan jast ahe MH madhe, tyamule SS ne jar ghaie keli nasti tar tyanna ahe ha vata pan milala nasta...ajun ek paryay mhnje pawaranni swathacha paksha phodla asata ani ti kumak bjp la dili asti....tyamule uddhav thakrenni je kele ani jya ghaiene kele te yogyach hot.
ReplyDeleteKarnatakat apakshya ani chote pakshaanchi sankhya kiti ahet ani Maharashtrat kiti ahet, tar karnatakat ti naganya ahe tar Maharashtrat ti BJP la satta anun denya evdhi ahe, mhnjech karnatak congress samor dusra paryay nhavata maharashtrat shivsenene support kela nasta tari bjp samor paryay ahet.
ReplyDeleteAjun ek mhnje congress chi rajkiya parithiti ashi ahe ki te bjp la satte pasun dur thevnyasathi kahihi karu shaktat, bjp chi ekvdhi vaiet parithiti nahi tyamule karnatakat te JDS la milavata ale te konalach MH madhe BJP samor milavata ale naste, donhi rajya ani donhi paksha(congress ani bjp) hyanni parithiti, apeksha, desperation vegele ahet tyamule karnatak ani maharashtrachi tulnach hou shakat nahi. Baki rahila chandrababunch tar tyanchyakade purn rajya ahe ho, tyanna kiti garaj asnar bjp chi tyamule ti pan tulna hou shakat nahi.
SS ne je kel ani je kartiye te jogyach ahe.
भाऊ, ही लाचारी का आहे तर लोकसभा2014 नंतर विधानसभा2014 ला युति होणार म्हणून 2कंगीतिल लोकांनी आपली जागा सेनेला जाणार म्हणून सेनेत उड़ी मारली यातील जवळ जवळ 10 ते 15 जण सेनेच्या तिकीटावर निवडून आलेत आता ते फुटले तर सेनेची नाचक्की होईल म्हणून ही शरणागती आहे
ReplyDeleteया परिस्थितीत बाळासाहेब अस्ते तर चित्र वेगळे दिसले असते.
ReplyDeleteबाळासाहेब असते तर युती तुटली नसती. जुनेच जागा वाटपाचे सूत्र कायम राहिले असते आणि सेने चाच मुख्यमंत्री झाला असता.
Deleteमहाराष्ट्राबाबत आपले अंदाज चुकणार आहेत हे आपल्याला लवकरच समजेल . कारण आपण जमिनीपासून पुरेसे दुरावलेत भाऊ .
ReplyDeleteतेथ पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम काय?
ReplyDeleteलेख चिथावणीखोर आहे.. . . .
Instead of spending time writing virtual scenarios that serves no good for people of Maharashtra, try writing something on how Sena + BJP can effectively work as a joint force in government for the betterment of people of Maharashtra. We do not care what could have been a wise strategy of Sena supporting or opposing BJP. They are part of government now and should behave and deliver like one.
ReplyDelete