Wednesday, August 15, 2018

हिडीस फ़ुटीरवादाचे जातीयवादी मुखवटे

maratha violence के लिए इमेज परिणाम

सांगली-मिरज आणि जळगाव महापालिकांचे निकाल लागेपर्यंत मौनव्रत धारण केलेले शरद पवार, किंवा देशाला न लाभलेले पंतप्रधान, यांनी तोंड उघडले आणि बहूमोल ज्ञानप्रदर्शन केले. त्यात पहिले ज्ञान असे, की सांगलीच्या ६५ टक्के मतदाराने भाजपाला नाकारले आहे. पण असे सांगताना राष्ट्रवादी व कॉग्रेस यांच्या आघाडीला जणू ६५ टक्के मतदाराने स्विकारले असावे, असा सूर आहे. जणू काही भाजपाला सोडून इतरांना मिळणारी मते पवार किंवा तत्सम पुरोगामीत्वाच्या मक्तेदारांनाच मिळतात, असे पवारांना सुचवायचे आहे. असली विधाने ऐकून भरकटण्याच्या वयापेक्षा मराठी माणूस व मराठा मतदारही पुढे गेला आहे, हे यांच्या अजून लक्षात आलेले दिसत नाही. अन्यथा त्यांनी असली विधाने केली नसती. पण सुंभ जळले तरी पीळ जात नाही म्हणतात, तशी अवस्था आहे. लोकसभा विधानसभेपासून जिल्हा परिषदा, तालुका पंचायतीपर्यंत सगळीकडून पवार किंवा त्यांच्या पुरोगामीत्वाची हाकालपट्टी चालू असताना, असली विधाने निदान वयाला शोभणारी नाहीत, याचे भान ठेवायला हवे ना? पण थोराडलेल्या सलमानखान वा शाहरूखने कोवळ्या नायिकांशी प्रणयराधन करावे, तसा एकूण पवारांचा प्रवास सुरू आहे. अन्यथा मोदी विरोधात अवघा देश पिंजून काढण्याची भाषा त्यांनी कशाला केली असती? सोनियाजी, देवेगौडा व आपल्याला पंतप्रधान पदाची आकांक्षा नसून, भाजपाला पराभूत करणे इतकेच उद्दीष्ट आहे. त्यासाठी त्यांना देश पिंजून काढायचा आहे. पिंजणे याचा अर्थ काय असतो? कापसाचे गठ्ठे व गुंते सोडवून तंतू मोकळे करण्याला पिंजणे म्हणतात. त्यातून उद्या कापसाचा सदूपयोग करायचा असतो, याचे तरी भान आहे काय? लोक पिंजार्‍याला कशाला बोलावून घेतात? त्याच्याकडून कापूस कशासाठी पिंजून घेतात? त्यातल्या तंतुंची गुंतवळ व दबलेपण मोकळे करण्यासाठी पिजणे होत असते. पवार तसे काही करू इच्छित आहेत काय?

आपल्या हातातून राजकारण निसटत गेल्यापासून मागली तीनचार वर्षे पवारांनी सातत्याने समाज व जातीपाती ‘पिंजून’ काढण्याचा सपाटा लावला आहे. पण त्यातून कापूस मोकळा होण्यापेक्षाही त्यातली गुंतवळ अधिकच गाठींची होत गेली आहे. त्यातल्या गाठी सोडवण्यापेक्षा अधिक घट्ट व निरगाठी करण्याला देश पिंजून काढणे मानता येत नाही. मग पवार नेमके काय करू इच्छितात? त्याचे उत्तर त्यांनी आधीच दोन महिन्यांपुर्वी देऊन टाकलेले आहे. शेतकरी आंदोलन पेटलेले असताना त्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, हा कसला संदेश होता? पिंजून गाठी मोकळ्या करण्याचा होता की ताणतणाव अधिक जटील करण्याचा उद्योग होता? तेवढेच नाही. कोरगाव भीमा प्रकरणाचा भडका उडाला, तेव्हाही पवारांनी असेच काहीबाही विधान करून आगीत तेल ओतण्याचे उद्योग केलेले होते. अर्थात सामान्य जनतेने त्यांचा मुखभंग केला ही गोष्ट वेगळी. त्याचा साधासरळ अर्थ ६५ टक्केच नव्हेतर ९० टक्के जनतेने त्यांना व तत्सम राजकारणाला नाकारलेले आहे. आपल्या हातात सत्ता असावी, हा अट्टाहास आहे आणि ती मिळणार नसेल तर अवघ्या देशाला आगडोंबात लोटून देण्याला मागेपुढे बघणार नाही, हे आजकाल पुरोगामी धोरण झालेले आहे. म्हणून तर देशातील घुसखोरांचा प्रश्न सुप्रिम कोर्ट आसामच्या घुसखोरांचा प्रश्न सोडवत असताना, त्यात अडथळे आणणार्‍या ममता बानर्जींना दोन खडेबोल ऐकवण्याची पवारांना हिंमत झालेली नाही. पण त्याच प्रश्नातून जनमानस पिंजून काढण्याचे प्रयास केंद्र सरकार करत असताना त्यालाच खिळ घालण्याची भूमिका पुरोगाम्यांनी घेतली आहे. आसामचा प्रश्न धर्माचा वा जातीचा नसूनही त्यात टांग अडवण्याला आवर घालण्यापेक्षा सरकारला कोंडीत पकडण्याचे राजकारण खेळले जात आहे. सत्ता भाजपाला मिळत असेल, तर देश बुडवण्याचे वा तुडवण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत. पवारांची भाषा त्याचीच चाहुल आहे.

अकस्मात महाराष्ट्रात भडकलेले मराठा मोर्चे हे मुळातच जातीशी संबंधित नव्हते की जातीय अस्मितेचा उन्माद नव्हता. कोपर्डीची घटना घडून गेल्यावरही राजकारणात त्याची दिर्घकाळ प्रतिक्रीया उमटली नाही. तेव्हा प्रक्षोभाचा भडका उडालेला होता. त्यात कुठल्या मराठा संघटना वा राजकीय नेत्याने पुढाकार घेतलेला नव्हता. जेव्हा मोठ्या संख्येने मराठा समाज व अन्य समाज घटक रस्त्यावर उतरले व त्यांनी मूकमोर्चाने आपल्या अस्वस्थ भावना व्यक्त केल्या; तेव्हा अशा अस्मितांचे राजकारण खेळणार्‍यांना जाग आली. अन्यथा मराठा समाजाच्या वेदनांचे याच तथाकथित नेत्यांनी कधी दु:ख पाहिले नाही. मुठभर दोनतीन हजार मराठा कुटुंबे वा घराणी वगळली, तर बाकीचा मराठा इतका दिर्घकाळ कुठल्या विपन्नावस्थेत आहे, त्याकडे ढुंकूनही कोणी पहात नव्हते. त्यांना मराठा मूकमोर्चाचा आवेश व आकार बघून मराठा विपन्नावस्थेत असल्याचे साक्षात्कार झाले आणि त्यात घुसून आपले राजकीय अजेंडे पुढे रेटण्याचा उद्योग सुरू झाला. पंण मोर्चेकर्‍यांनी अशा नेत्यांना खड्यासारखे बाजूला ठेवले आणि आपल्या भावनिक उद्रेकाला राजकीय झळ लागू दिलेली नव्हती. दिर्घकाळ जे जातीय राजकारण महाराष्ट्रात व देशाच्या अन्य राज्यात खेळले गेलेले आहे, त्याला मागल्या चार वर्षात व प्रामुख्याने मोदी सरकारच्या कारकिर्दीत ओहोटी लागल्याने, हे अस्मितांचे मक्तेदार व्यापारी दिवाळखोरीच्या कडेलोटावर येऊन उभे आहेत. हातून निसटलेल्या जातीसमुहांना पुन्हा आपल्या दावणीला बांधण्यासाठी मग जाती उपजातींचे आरक्षणाचे लढे उभे करण्याचे डाव खेळले जाऊ लागले. दिर्घकाळ तुम्हीच सत्ता उपभोगत असताना हे समाजघटक मागास कशाला राहिले आणि सुखवस्तु मानले जाणारे प्रगत समाजघटक मागासलेपणाच्या सीमारेषेवर येऊन कसे उभे रहिले? त्यांना अशा मागासलेपणापर्यंत मागे ढकलून देण्याला कोणाचे राजकारण जबाबदार आहे?

कालपरवा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फ़डणवीस वा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी, अशा समाजघटकांच्या मागासलेपणाला जबाबदार नाहीत. तर साठ सत्तर वर्षे देशाची सत्ता उपभोगणारे पक्ष व राजकीय नेतेच त्यातले खरे गुन्हेगार आहेत. त्यांची आर्थिक, सामाजिक वा औद्योगिक धोरणेच सुखवस्तु घटकांना मागासलेपणाच्या रेषेपलिकडे ढकलून देण्यास कारणीभूत झालेली आहेत. यात महाराष्ट्रातला मराठा घटक आहे, तसाच हरयाणारला जाट समुदाय आहे आणि राजस्थानचा गुज्जर समाज आहे. त्यात गुजरातचा पाटीदार समाज आहे आणि इतरही लहानमोठे समाजघटक येतात. त्यांच्यासमोर काल्पनिक जातीयवाद उभे करायचे आणि आपसात झुंज लावून द्यायची, असला उद्योग मागली कित्येक दशके चालू राहिला आहे. त्यातून हळुहळू सर्वच समाजघटक बाहेर पडू लागले आहेत आणि ते ६५ टक्के नसून ८०-८५ टक्क्याहून जास्त आहेत. हे सगळेच समाज घटक वा प्रामुख्याने त्यांची एकविसाव्या शतकातील नवी पिढी, खोट्या अस्मितेच्या सापळ्यातून बाहेर पडू लागली. म्हणून तर पवार किंवा त्यांच्यासारखे पुरोगामी सत्ताभ्रष्ट झालेले आहेत. म्हणून तर जळगाव वा सांगली अशा बहुसंख्य मराठा लोकसंख्या असलेल्या महापालिकांच्या क्षेत्रातही राष्ट्रवादी वा कॉग्रेसची धुळधाण उडालेली आहे. तो पराभव एका पक्षाचा नसून आजवरच्या खोटारडेपणाचा आहे. दिर्घकाळ उभ्या केलेल्या भुलभुलैचा पराभव आहे. किंबहूना भाजपा या पक्षाला लोकांनी मते वा सत्ता दिलेली नसून, पवार किंवा त्यांच्या दिशाभूल करणार्‍या राजकारणाला नाकारण्य़ाचा घेतलेला पवित्रा आहे. तेच जातीयवादी राजकारण जगवण्याचा केविलवाणा प्रयास म्हणजे सध्याच्या जातीय आंदोलनांचे भडकवले जाणारे राजकारण आहे. कधी शेतकरी तर कधी दूध उत्पादक तर कधी मराठा, असली पेटवापेटवी चालू आहे. त्याला समाजातून प्रतिसाद मिळत नसेल, तर घातपातालाही प्रोत्साहन देण्यापर्यंत मजल गेली आहे.

कोरेगाव भीमा हा भडका त्यातूनच उडवलेला होता. कित्येक वर्षापासून तिथे आंबेडकरी समाज येऊन अभिवादनाचा कार्यक्रम साजरा करून जातो आणि सर्वकाही शांततेत पार पाडले जाते. यावर्षी प्रथच शनवारवाड्यावर परिषद भरवून चिथावणी दिली गेली आणि भडका उडवून देण्यात आला. मग तिथे हजर नसलेल्यांवर आळ घेऊन त्यांच्या अटकेच्या मागण्या पुढे रेटण्यात आल्या. त्यासाठी पुन्हा जाळपोळ करण्यात आली. पण लौकरच त्याला विराम मिळाला, तो जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्यानेच. मराठा मूकमोर्चाला मिळालेला लाखोंचा प्रतिसाद आणि आज आरक्षणाच्या निमीत्ताने पेटवला जाणारा हिंसाचार, फ़रक साफ़ दाखवून देतो. रस्त्यावर येणारी संख्याच मूकमोर्चा व आरक्षण मोर्चातला फ़रक सांगते. म्हणून तर त्याचेच प्रतिबिंब जळगाव सांगलीच्या मतदानात पडले. दूधाचे टॅन्कर उपडे करणार्‍या वा शेतमालाच्या गाड्या पेटवून देणार्‍यांना किती मते मिळू शकली? त्या निमीत्ताने पंढरीच्या वारीत अडथळे आणणारे वा मुख्यमंत्र्याला सांगलीच्या प्रचारास येण्यातही हिंसे्चे अडथळे निर्माण करणार्‍यांना मतदाराने कशाला फ़ेटाळून लावले? तर हा समाज भारतीय आहे आणि त्याला कितीही जातीपातीमध्ये विभागण्याचा प्रयास झाला, तरी राष्ट्रीयत्व जपण्यासाठी तो जातीला मूठमाती देवून एकवटतो. असा इतिहास आहे. शिवरायांचा कालखंड असो किंवा स्वातंत्र्यलढा वा संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असो, त्यात कुठे जातीच्या अस्मिता आडव्या आल्या नाहीत. म्हणून तर विषय भाजपाचा नसून अशा प्रवृत्तीला ठेचून काढण्याचा पवित्रा सामान्य भारतीयानेच घेतलेला आहे. आपल्या हाती सत्ता नसेल तर जातीपातीपासून भाषिक अस्मितेसाठी देश बुडवायला निघालेल्यांना मतदार आपल्या पद्धतीने धडा शिकवतो आहे. म्हणूनच पवारांची पेशवाईची भाषा चालली नाही, की पुणेरी पगडीचा उल्लेख महागात पडलेला आहे.

महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री असल्याचे आडोशाने बोलून जातीय भावनांना चिथावण्या देण्याचा प्रयास पवारांसारख्या ज्येष्ठाने केल्यावर आगी लावणारे दिवाळखोर पुढे सरसावले तर नवल नव्हते. पण मतदारानेच त्यांचे दात पाडले आहेत. आता असल्या भाषेला तीन वर्षाचा कालावधी उलटून गेला असून, फ़डणवीस सरकार विनासायास चालले आहे. हेच देशाच्या अन्य भागातही चाललेले आहे. हरयाणात जाट वा राजस्थानात गुज्जरांना भडकावले जाते. गुजरातमध्ये पाटीदारांना तर अन्यत्र मुस्लिमांनाही चिथावण्या देऊन झालेल्या आहेत. ममता बांगलादेशी घुसखोरांवर विसंबून राहायला निघाल्या आहेत, तर राहुल गांधी कॉग्रेसला मुस्लिमांचा पक्ष बनवायला निघालेले आहेत. पवारांना राज्यात पेशवाई आलेली दिसते आहे आणि अन्य पुरोगाम्यांना हिंदूंचे निर्दालन करण्याची सुरसुरी आलेली आहे. अशावेळी ह्या देशाला नेतृत्व करणारा नेता फ़क्त हवा असतो. बाकी लढाई जनताच आपल्या हाती घेत असते. पक्ष वा संघटना नाममात्र पुरेशी असते. आज भाजपा त्याच लोकमान्य भूमिकेत उभा राहिलेला आहे आणि मतदार त्याला प्रतिसाद देतो आहे. कारण पुरोगामीत्व किंवा जातीय घटकांचे लढे पुकारणारे देशाचे तुकडे पाडायला निघालेत. हे सामान्य भारतीयाच्या लक्षात आलेले आहे. काश्मिरातील भारतीय सेनेवर हल्ले करणार्‍यांचे समर्थन करणारे कुठल्या शेतकर्‍याला वा मागासाला इथे सामाजिक न्याय मिळवून देऊ शकतात? जे देश बुडवायला निघालेले असतात, ते त्यातल्या कुठल्याही एका घटकाला न्याय देऊ शकत नाहीत. हे ओळखण्याइतका भारतीय समाज सुबुद्ध आहे. म्हणून तर मोदींना योग्यवेळी पंतप्रधानपदी आणुन बसवण्याची समयसुचकता त्या मतदाराने दाखवली. त्यातला हा आशय ओळखता आला असता, तर पुरोगाम्यांना विघातक मार्ग पत्करण्याची वेळच आली नसती. त्यांना जातीयवादातून देशाचे तुकडे पाडण्याचे दिवाळखोर डाव खेळायची नामुष्की आली नसती.

ईशान्येकडील आदिवासी, त्रिपुरातील मूळनिवासी, काश्मिरात स्वदेशी निर्वासित होऊ घातलेले हिंदू, किंवा उर्वरीत भारतात चोरासारखे वागवले जाणारे जातीपातींनी विभागलेले सामान्य हिंदू; म्हणूनच २०१४ नंतर एकवटत गेले आणि नरेंद्र मोदी हा त्यांचा चेहरा बनत गेला. अशा हजारो लहानमोठ्या समाजघटकांची जी वीण भाजपाने विणलेली आहे, ती पवारांना किंवा त्यांच्यासारख्या विविध पुरोगाम्यांना खटकते व टोचते आहे. म्हणून भाषा समजून घेतली पाहिजे. त्याच्याशी प्रत्यक्ष कृतीची सांगड घातली पाहिजे. मग अशा राजकारणातील कुटील डाव लक्षात येऊ शकतो. समाजातील एकजीनसीपणाला शह देण्यासाठी यांना देश ‘पिंजून’ काढायचा आहे, गुजरातचे पाटीदार वा हरयाणाचे जाट मुख्यप्रवाहापासून तोडायचे आहेत. अमूक कोणी हिंदू नाही वा तमूक कोणी वैदिक नाही, असली भांडणे उकरून काढायची. शिवराय किंवा अन्य कुठली भारतीय प्रतिके वा अभिमानाच्या जागा खिळखिळ्या करायच्या आणि त्यासाठी जातिय अस्मितेतून ह्या प्रतिकांना सुरूंग लावायचे डाव आहेत. त्यासाठी पवार मग फ़ुल्यांचे पागोटे प्रतिकात्मक बनवतात किंवा राहुल मुस्लिमांच्या टोप्या घालतात. लिंगायतांना वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याची खेळी होते. अमूक एक समाजघटक इतरांसारखा नाही आणि त्याची ओळख वेगळी असण्याचे विविध लोकसमूहाच्या मनात रुजवण्याचे हे खेळ, राष्ट्र उभारणीला हातभार लावणारे नसतात. तर एकजीव असलेल्या समाजाचे तुकडे पाडण्याचे कारस्थान असते. भावाभावात आणि मित्रामित्रांमध्ये दुहीची चुड लावण्याचा घातक खेळ असतो. कुठल्याही शत्रूला अशाच सहाय्यकांची गरज असते. कारण अशा दुभंगलेल्या समाजाला व त्यांच्या देशाला उध्वस्त करायला मग स्फ़ोटके वा क्षेपणास्त्रे लागत नाहीत. त्यांच्या भावनांचीच शस्त्रे बनवून त्यांना आतून पोखरता येत असते.

गंमत बघण्यासारखी आहे, देशातल्या प्रत्येक आरक्षण आंदोलनाचा बोलविता धनी हेच सत्ताभ्रष्ट झालेले पुरोगामी वा कॉग्रेसजन दिसतील. त्यांनीच आजवर या घटकांना वंचित ठेवणारे राजकारण केलेले आहे. ह्यांच्या हातात सत्ता असताना त्यांनी कधी अशा गोष्टींना चालना दिली नाही आणि सत्ता गेल्यावर त्यालाच खतपाणी घातले जात आहे. जातियवाद संपवण्याची भाषा आजवर करणारे आता प्रत्येक समाजघटकाला ‘जातीवंत’ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. पाटीदारांना गुजरातमध्ये एकाकी पाडताना कॉग्रेसने विविध समाजघटकांची मोळी बांधलेली होती. पण सत्ता गमावल्यावर त्याच पाटीदारांच्या न्यायासाठी राहुल गांधी कंबर कसून उतरलेले होते. हरयाणात जाट वा महाराष्ट्रात मराठ्यांना आजवर कोणी न्याय नाकारला होता? त्यांची सत्ता असताना बारामतीला शेतकरी मोर्चा आला, तेव्हा पवार वैश्य समाजाचे कोल्हापूरातील साखर कारखाने जोरात सुरू असल्याचे सांगत होते. तेव्हा शेतकर्‍याला जात होती आणि आता त्याच शेतकर्‍याला टोकाची भूमिका घ्यायला सांगणार. सत्ता मिळवताना मायावती ब्राह्मण संमेलने भरवणार आणि सत्ता गेल्यावर मनूवादाच्या नावाने टाहो फ़ोडणार. डाव्या आघाडीचे म्होरकेपण करणार्‍या मार्क्सवादी पक्षाला रा. स्व. संघाचा प्रमुख दलित हवा असतो. पण त्यांच्या पॉलिटब्युरोत आजवर कोणा दलिताला स्थान देत नाहीत. मात्र ते़च रोहित वेमुलाच्या नावाने गळा काढत बसणार. विसाव्या शतकात अनेक राज्यात कॉग्रेस सरकारे असताना मुस्लिमांची दंगलीत कत्तल झाली. तेच कॉग्रेसवाले पहलू खान वा अकलाखसाठी मगरीचे अश्रू ढाळणार. मुस्लिमांच्या न्यायासाठी आक्रोश करतानाच मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकच्या नरकातून बाहेर काढण्यात अडथळे आणणार. तालिबानी, जिहादी वा नक्षली हिंसाचाराला पाठीशी घालून देशाचे तुकडे पाडण्यासाठी सगळे हितशत्रू एकजुट करण्याचा आटापिटा लपून राहिलेला नाही.

नक्षली, व आंबेडकरवादी यांची मोट बांधण्याचा कोरेगाव भीमाच्या निमीत्ताने झालेला प्रयास असो, किंवा पाक राजदूताला मनमोहनसिंग अय्यर यांच्या निवासस्थानी जाऊन भेटणे असो. त्यातून ओवायसी यांच्यासारख्यांनी दलित मुस्लिमांची आघाडी करण्याचे मांडलेले प्रस्ताव असोत. असेच दिसेल की भारतीय समाजाला जातीयतेच्या नावाखाली विभागून पुन्हा त्यात उपजाती वा पोटजातीचे छेद देण्यासाठी अहोरात्र पुरोगामी मंडळी झटत आहेत. विद्यापीठतील संघटनांमध्ये घुसखोरी करण्यात आलेली आहे. मेवानी वा उमर खालीद यांचा कोरेगाव भीमाशी संबंध काय? केरळातील तालिबानी संघटनेच्या व्यासपीठावर हजेरी लावणा‍र्‍या न्या. कोळसेपाटील यांचाच पुढाकार शनवारवाड्याच्या परिषदेत असावा, हाही योगायोग नसतो. पाकिस्तानचे अनेक माजी हेरप्रमुख उघडपणे भारतीय समाजात जातीपातींचे भेदभाव पेटवण्याची भाषा करतात आणि भारतातले पुरोगामी त्याच भाषेला पुरक अशा हालचाली करतात. हे अकस्मात घडत नसते. त्यामागे एक ठराविक योजना असते. काही संस्था संघटना त्यामध्ये ठरवुन सहभागी होतात, तर काहींना राजकीय वैमनस्याच्या पराकोटीतून त्यात ओढले जात असते. पूर्वाश्रमीची समाजवादी मंडळी पराकोटीच्या द्वेषाने भारावून अशा गोष्टीत सहभागी झालेली दिसतील. हमीद दलवाई यांच्या तिहेरी तलाक विरोधी लढाईचे पहिले राजकीय समर्थक पुर्वीचे समाजवादी होत. आज ते़च मोदी विरोधासाठी असल्या तलाकचे समर्थन करायला पुढे आलेले दिसतील. विविध जातीय दुहीमध्ये खतपाणी घालताना दिसतील. कम्युनिस्टांना तर आता आपली काही ओळखही राहिलेली नाही, ते कुठल्याही जातीय धार्मिक वा फ़ुटीरवादी घोळक्यात घुसून आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत असतात. आपण कोणाच्या हातचे खेळणे होऊन बसलो आहोत, याचेही भान अशा लोकांना उरलेले नाही. त्यामुळेच जातीयवादाने आता फ़ुटीरवादाची कास धरली आहे.

देशाच्या कानाकोपर्‍यात भाजपाला मिळणारा प्रतिसाद व मतांचे वाढते प्रमाण बघितले, तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. हिंदूत्वापेक्षाही राष्ट्रीय एकात्मतेची भावना जनतेला भाजपाच्या जवळ घेऊन येते आहे. सगळे राजकीय पक्ष सत्ता व जातीयतेच्या फ़ुटीर मनोवृतीने देशाचे तुकडे पाडायला निघालेले असतील, तर त्यातून देशाच्या सोबतच आपल्या समाजाचाही कपाळमोक्ष ठरलेला आहे. याचे भान बहुतेक लहानमोठ्या समाजघटकांना येत चालले आहे. म्हणूनच असे समाज आपल्या जातीय व सामाजिक नेतृत्वापासूनही दुरावत चालले आहेत. त्यांची विण भाजपाच्या राजकारणाशी जुळत चालली आहे. त्रिपुरा ते सांगली आणि उत्तरप्रदेश ते कर्नाटक मतदाराचा कौल त्याची ग्वाही देतो आहे. त्यात क्रमाक्रमाने मुस्लिम व ख्रिश्चन समाजघटकही सहभागी होत चालले आहेत. जातिय अस्मिता व जातीय न्यायाच्या या आंदोलनाने आपल्याला न्याय मिळण्यापेक्षा एकूण देशाच्या अस्तित्वाला धोका असल्याची जाणिव त्यामागची चालना आहे. त्यातला भाजपा वा नरेंद्र मोदी निमीत्तमात्र आहेत. जेव्हा भारतीय अस्तित्वाला वा राष्ट्राला धोका उत्पन्न होतो, तेव्हा इथल्या लोकसंख्येने जातपात व धर्माच्या पलिकडे जाऊन राष्ट्र जगवण्यासाठी चमत्कार घडवलेले आहेत. विद्यमान परिस्थिती त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करताना दिसते आहे. म्हणूनच संघाला, भाजपाला वा मोदींना कितीही हिंदूत्ववादी म्हणून हिणवले गेले, दलितविरोधी भासवले गेले; तरी हे सर्व समाज मोदी सरकरला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसतात आणि त्याचेच प्रतिबिंब मतदानातही पडताना दिसते आहे. मोदी विरोधातली सर्व आंदोलने वेगळ्या जाती वा घटकांच्या नावाने समोर आलेली दिसतील. पण ती प्रत्यक्षात फ़ुटीर देशविघातक डावपेचांची रुपे आहेत. म्हणूनच आपल्या संकुचित अस्मिता झिडकारून प्रत्येक वर्गातला भारतीय मोदींच्या बाजूने उभा रहाताना दिसत आहे. कारण ही वेळ जातीय अस्मिता राखण्याची नसून राष्ट्रीय अस्मिता टिकवण्याची आहे. याची सामुहिक जाणीव सामान्य भारतीयाला कार्यरत करू लागली आहे.

32 comments:

  1. तुमच्या परखड लेखनाला वंदन.कोणीच हे सत्य मांडत नाही. कारण पत्रकार लेखक राहिलेत कुठे आज तुमच कापसांच गाठींच उदा.तर चपखल आहे जातीयतेच्या हैदोसामुळे कोनी जिंकेल हारेल पन fb whatsapp वरीलचर्चा पाहता गाठी पक्क्या झाल्यातप्रत्येक जातीच बेट तयार झालय

    ReplyDelete
  2. हे कमी म्हनुन की काय रामचंद्र गुहासारखे काॅंगरेसी मोहरे दक्षीनेत वेगळ्या देशाची आग लावतायत.परवाच यु ट्युब वर कोलसे पाटलांचा वीडिओ सहज पाहीला तर डोकसुन्न झाल की हा माणुस जज होता ते चक्क civil war करा म्हनत होते समोरील लोकांना पन जरा हायस वाटल २०-२५च श्रोते होते ते पन आणलेले वाटत होते रस्त्यावरील कोपरा होता बंगालमधील.बिचारे बंगाली मजुर असावेत त्यांना भाषा कळत नसावी पन कोलसेंच काम चालुय

    ReplyDelete
  3. खऱ्या जाती- गांडूळे (दुतोंडी राजकारणी आणि त्यांची पाळीव पिल्ले) आणि बकरे (बळी दिले जाणारे सामान्य अजापुत्र)

    ReplyDelete
  4. या पुढे जनतेने आंदोलने करायची नाहीत कारण काँग्रेस सत्तेवर नाही असे सूचित करत आहत का? भाजपने मागच्या निवडणुकीत मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते मग त्यांच्यासाठी वेगळा तराजू का? मनुवाद आपल्याला मान्य आहे का? ब्राम्हण समाजाला तरी तो जसाच्या तसा मान्य होईल का? मग जे मनुवादाचे जाहीर समर्थन करतात त्यांना कवच कुंडले का? त्यांची जवळीक कोणाशी आहे? किती भ्रष्ट नेते कैदेत टाकले गेले मागच्या ४ वर्षात? का परत विचारायचे काँग्रेस ने काय केले? काँग्रेस आणि सहकारी हे सध्या भारताचे दुर्दैव आहे पण फक्त त्यांच्याशी तुलना करणे हे खरे मागासाले पणाचे लक्षण होईल. सर्व भ्रष्ट नेत्यांना त्वरेने कैदेत टाकले तरच बदल झाला असेल म्हणता येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. Tumhi kharach kadhi Manusmriti vachli ka?
      Mediachi bhasha aahe tumchi, Swatavhi vatat nahi.

      Manula virodh kara pan aadhi kay aahe te ekda vachun tar paha.

      Delete
    2. Read the Anonymous reply at the bottom for this Manuvad argument.

      Delete
    3. खाली दिलेले उत्तर वाचले मनुवादावर, खरंच खूप पटले. तर खरा प्रश्न आहे जाती जाती मध्ये भेद लावणारे फळांच्या बागेवाले पण दोषी आहेत, नुसते बारामतीकर नाहीत. त्य्नाचे पण नाव घ्या !

      बरं पूर्वीचे भ्रष्टाचारी, त्यांची कैद आणि निवडणुकीत सर्व पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या आश्वासनाबद्दल पण बोला. फक्त काँग्रेस आरक्षणबद्दल आश्वासनं देते अस नाही !!

      Delete
  5. आंदोलनातून त्या नेत्यांना बाहेर ठेवलय कि मुद्दाम आपण हि आग लावलेली नाही दे दाखवण्यासाठी असं करायला भाग पाडलेलं आहे

    ReplyDelete
    Replies
    1. It is a wrong notion that these Maratha morchas were spontaneous and organized by the people. There is only one particular person behind every major event taking place in Maharashtra and any right=thinking person can guess his name,

      Delete
  6. परखड, अतिशय stinging असा लेख ! Worth saving for its insight into mass behavior...

    ReplyDelete
  7. जातिय अस्मिता व जातीय न्यायाच्या या आंदोलनाने आपल्याला न्याय मिळण्यापेक्षा एकूण देशाच्या अस्तित्वाला धोका असल्याची जाणिव त्यामागची चालना आहे.

    ReplyDelete
  8. True
    Even all so called National TV channel debate's are only concentrating on cast politics and issues.

    Not a single national issue or positive news they are broadcasting except Independence day

    ReplyDelete
  9. भाऊ .....मस्त !! तुमचा पत्रकारितेतील अनुभव इतका मोठा , दांडगा आणि अभ्यासपूर्ण आहे की समोरचे खांग्रेस प्रवक्ते ' सचिन सावंत ' हि काल ' ए.बी.पी माझा ' वरील चर्चेत गप्प झाले. इंदिरा गांधी यांची लोकसभेची निवडणूक न्यायालयाने रद्द केली होती. त्यामुळे त्या विरोधी पक्षनेता बनण्याचा प्रश्नच न्हवता हा मुद्दा तुम्ही उपस्थित केल्यावर सावंत चूप झाले. महाराष्ट्राचा हा बारामतीचा ' कण्हता ' राजा पूर्वी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ' काठीच्या आधाराने चाललेले नेतृत्व ' असे म्हणून हिणवत असे. आता याना त्याच चालीवर ' गांजलेले ' नेतृत्व निघाले देश पिंजायला.....!! असे म्हणावे का ?
    काळू बाळूच्या तमाशालाही पूर्वी चांगली गर्दी होत असे पण या त्रिकुटाला देश पिंजायला गेले तर देशात काय वातावरण आहे हे कळू शकेल. पण हे तिन्हीही ' पिंजारी ' सध्या ' मुंगेरीलाल ' झाल्यामुळे यांच्या स्वप्नांना कोण लगाम लावणार ?? राहुलबाबाला आता यांच्याकडून ' कुर्निसात ' बघणेच बाकी आहे.

    ReplyDelete
  10. Respected Bhau

    Absolutely to the point. Just amazing writing Bhau...
    100 % agreed to your post.

    These people are not aware that they are thoroughly exposed. Old times are gone. But keeping the fingers crossed as they can stoop to any level b4 2019..
    Wishing you a good health Bhau..
    Regards
    Daya

    ReplyDelete
  11. Bhau Namaskar,

    Aaj Ha Lekh Vachlyavar "Aamache Vichar" Tumhi Mandata Aahat Ase Agadi Manapasun Vatate, Hya Lekhabaddal Dhanyavad, Itakya Ughadpane Agadi Sarvakahi Vyavashit Pinjun Kadhalet Bhau Tumhi. Konahi SarvaSamanyache Dole Ughatil Ha Lekh Vachun. Aajchya Parishitit Tar Asha Lekhachi Khari Garaj Hoti Va Aahe. Barech Kahi Sangun Gela Ha Lekh.

    DoleUghadniBaddal Punha Ekada Dhanyavad.

    ReplyDelete
  12. जबरदस्त.
    बाकी शब्द सुचत नाहीत.

    ReplyDelete
  13. भाऊ, मी तुमचे लेख अनियमित वाचतो. मला तुमचे लिखाण फार आवडते. जातीपाती बद्द्ल केलेले हे सखोल चिंतन काळजीत पाडणारे आहे. कधी कधी फार भीती वाटते, आपण एकमेकात भांडून संपून तर जाणार नाही ना? आजही आपण या खऱ्या जातीयवादी /खोटे पुरोगामी यांच्या नादी लागून किती नुकसान करून घेत आहोत,
    तुमचा लेख फार विचार करायला लावणारा आहे

    ReplyDelete
  14. सद्यस्थिती चे अप्रतिम विश्लेषण

    ReplyDelete
  15. भाऊ, फारच झणझणीत अंजन आहे पुरोगाम्यांसाठी. अर्थात त्यांना मराठी समजले तर, नाहीतर परत नव्यप्रकारची आंदोलने व सामान्य माणसाची गैरसोय हे पुरोगामी शस्त्र बाहेर येईलच.
    'गंमत बघण्यासारखी आहे, देशातल्या प्रत्येक आरक्षण आंदोलनाचा बोलविता धनी हेच सत्ताभ्रष्ट झालेले पुरोगामी वा कॉग्रेसजन दिसतील' हे वाक्यपण सूर्यप्रकाश इतके स्वच्छ आहे. याचाच परिणाम सांगली व जळगाव आहे. पण म्हणतात ना जुगारी जसा हरत जातो त्यावेळी तो वेड्यासारखे डाव खेळतो व स्वतःला हरवत जातो. यांच्याकडून वेगळी अपेक्षा का करणार ! जुगरीच ते. सर्व सामान्य लोक, जाती व अस्मिता याना जुगारावर लावले आहे. जनताच आता निर्णय घेईल.

    ReplyDelete
  16. भाऊ निदान अंगावर कातड़ी तरी ठेवायची,तिही काढून घेतलित

    ReplyDelete
  17. श्री भाऊ अतिशय मांर्मिक विश्लेषण

    ReplyDelete
  18. अतिशय योग्य आणि परखड विश्लेषण । यामुळेच तुमच्या लिखाणाची नेहमीच प्रतीक्षा असते ।

    ReplyDelete
  19. आज भाऊंची लेखणी तलवारीचे स्वरूप घेऊन सपासप वर करत आहे...

    ReplyDelete
  20. आपकी बार भाऊजी की बल्लेबाजी धुवाधार

    ReplyDelete
  21. अत्यंत परखड विश्लेषण आहे

    ReplyDelete
  22. भाऊ देशाची घटना जाळणाऱ्या देशद्रोह्यांबद्दल नक्की लिहा.

    ReplyDelete
  23. हा जो सध्या मनुवादाचा गजर आणि ब्राह्मणांच्या नावे मनुवादाचे नाव घेऊन सतत चांगभले होत असते त्याला एक ब्राह्मण म्हणून हे उत्तर. तुमच्या मनुवाद आणि तत्त्सम गजराला ब्राह्मण उत्तरही देत नाहीत ह्याचे कारण कधी शोधले आहे का? कूळ कायद्यामुळे ब्राह्मणांची शेती गेली आणि समाजाला लक्षात आले की शिक्षण आणि नोकरी हाच मार्ग उरलाय. ब्राह्मणांनी निमूट तो मार्ग धरला, दरम्यान माहितीचे युग आले आणि त्यांची आर्थिक प्रगती झाली. ब्राह्मण समाजाचा एक दोष म्हणायचा झाला तर त्यांची मानसिकता आता-आतापर्यंत नोकरीची होती, व्यवसायाची नाही पण आता तेही चित्र बदलतंय. आणि ह्या दोषाने नुकसान झाले ते त्यांचेच, दुसऱ्या कुणाचे नाही. आज मनुवादाशी ब्राह्मणसुद्धा बांधिलकी ठेवत नाहीत कारण मनुवादाचा त्यांना काहीही उपयोग नाहीये.

    दुसरे, ब्राह्मण स्त्रियांचे उदाहरण घेऊ. आज ह्या समाजातल्या स्त्रियांनी स्वतःची इतकी प्रगती केलीये की कुणीही मनूच्या कल्पनांचा पुरस्कार करणार नाही. मी म्हणेन की शिक्षण आणि नोकरी उद्योग ह्यात ब्राह्मण स्त्रिया सर्वात आघाडीवर आहेत (सर्व स्त्रियांमध्ये). ५०% लोकसंख्या तर तिथेच गळाली. आजच्या काळात नवऱ्याने मनूचा उल्लेख केला तरी ब्राह्मण बायको त्याला फैलावर घेईल, कारण मनूचे रेप्युटेशन आहे स्त्रीद्वेष्टा म्हणून. विनोद म्हणूनही कुणी ऐकून घेणार नाही असे समर्थन. थोडक्यात, ब्राह्मणांना मनुवाद पाहिजे अशी काठी झोडपायला कितीही छान वाटली तरी त्या काठीत काहीही दम नाही.

    जर कुणाचा असा गैरसमज असेल की ब्राह्मणांच्या कार्यांमध्ये मनुवादावर, सती-प्रथेवर, विधवांच्या केशवपनावर चर्चा होतात, तर हा मूर्ख गैरसमज आहे. माझ्या एकही जवळच्या आणि लांबच्या नातेवाइकांच्यात मी मनूचा उल्लेखही ऐकला नाहीये. (फक्त शालेय पुस्तकात वाचला म्हणून कळले हा कोण प्राणी आहे ते, पण घरच्यांनी कधी त्यावर चर्चा सुद्धा केली नाही. आई आणि वडील ह्या दोघांनाही मुलींचे शिक्षण आणि स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटत होते, मनू नाही, आणि हे झाले ५० वर्षांपूर्वीचे चित्र.).

    थोडक्यात, brahmins have moved on, its high time everyone did!!

    ReplyDelete
    Replies
    1. आणि अशा प्रागतिक ब्राह्मणांना मनुस्मृति वाचलीय का असं विचारलं की राग येतो.मनु हा कोणी ब्राह्मण नव्हता.कायदा करणारा होता.
      जसे आज बाबासाहेबांनी केलेल्या घटनेला धरून न्याय होतो आणि न पटणाऱ्या न्यायासाठी न्यायालयाला कोणी दोषी मानत
      नाही.तसेच कायदा मनूने केला आणि ब्राह्मणानी तो चालवला तर ते दोषी कसे? यावर प्रागतिकांनी उत्तर द्यावे .

      Delete