Friday, September 14, 2018

डॉ. कलाम आणि नंबी नारायणन

nambi narayanan apj kalam के लिए इमेज परिणाम

डॉ. अब्दुल कलाम आपल्याला ठाऊकच आहेत. भारताचा एक सुपुत्र व रॉकेटमॅन म्हणून त्यांची जगात दिगंत किर्ती झाली. त्यामुळेच त्यांना पंतप्रधान वाजपेयींनी थेट राष्ट्रपती बनवण्यापर्यंत मजल मारली होती. पण असाच आणखी एक भारताचा सुपुत्र व कलामांचा सहकारी नंबी नारायणन, त्याच काळात भारतीय व्यवस्थेकडून संपवला जात होता. याची आपल्याला अजिबात खबर नव्हती. कारण त्याला आपल्यासमोर देशद्रोही वा घरभेदी म्हणून पेश करण्यात आलेले होते. त्याचे नाव नंबी नारायणन. एका बाजूला त्याचे सहकारी कलाम देशात कौतुकाचा विषय झालेले होते आणि त्याचवेळी हा तितक्याच गुणवत्तेला शास्रज्ञ भारतीय व्यवस्थेतील सडक्या मनोवृत्तीच्या देशविघातक कारवायांचा बळी झालेला होत. आता सुप्रिम कोर्टाने त्याच्यावरचा अन्याय दुर केला असला व त्याला भरपाई दिलेली असली, तरी देशाचे झालेले नुकसान मात्र कधीही भरून येणार नाही. नंबी नारायणन यांची कथा म्हणूनच खड्या आवाजात व तपशीलाने कथन करणे अगत्याचे आहे. त्यापेक्षाही त्यातले घातपाती देशद्रोही कोण, त्यांचेही चेहरे मुखवटे टरटरा फ़ाडून समोर आणले पाहिजेत. ते मुखवटे फ़ाडले व हिडीस चेहरे समोर आणले, तरच लोकांना समाजात उजळमाथ्याने वावरणारे घातपाती गुन्हेगार ओळखणे सोपे जाईल. त्यापैकी एकाचे नाव श्रीकुमार आहे. जो गुजरातचा माजी पोलिस महासंचालक होता आणि तीस्ता सेटलवाड हिचा कांगावा करण्यातला भागिदार होता. माध्यमात त्याची ओळख आज तीस्ताचा साथीदार इतकीच आहे. पण त्यानेच भारताचा दुसरा डॉ. कलाम उर्फ़ नंबी नारायणन याला खच्ची करून देशाच्या रॉकेट व अवकाश संशोधनाला सुरूंग लावला होता. उशिरा का होईना त्याचा खरा चेहरा लोकांसमोर येईलच. कारण आता नंबीना न्याय देताना सुप्रिम कोर्टाने निवृत्त न्यायमुर्ती जैन यांची नेमणूक त्यासाठीच केलेली आहे.

nambi narayanan के लिए इमेज परिणाम

१९९० च्या जमान्यात डॉ. कलाम व नंबी नारायणन एकत्र इसरो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेत काम करीत होते. दोघे एकाच योजनेच्या दोन भागामध्ये काम करीत होते. कलाम रॉकेट इंधनाच्या घनपदार्थासाठी कार्यरत होते आणि नंबी द्रव इंधनावर काम करीत होते. त्यात उपग्रहाला अधिक उंच घेऊन जाणार्‍या क्रायोजेनिक इंजिनाचा समावेश होता. त्या काळात हे तंत्रज्ञान ही पाच देशांची मक्तेदारी होती. अमेरिका, फ़्रान्स, रशिया, चीन व जपान यांनाच ते शक्य होते आणि भारत मागेच होता. तर त्यात प्रगती करण्यासाठी रशियाशी भारताने करार केला होता आणि ते तंत्रज्ञान भारताला मिळायचे होते. त्यात प्रथम अमेरिकेने अडथळा आणला. कारण तीन अब्ज डॉलर्सचा धंदा या देशांसाठी मक्तेदारी होता. अमेरिका तेच तंत्र ९५० कोटी तर फ़्रान्स ६५० कोटींना देत होते. अखेरीस येल्तसीन दबावाखाली आले आणि भारताला ते तंत्रज्ञान मिळू शकले नाही. पण त्यातून पळवाट काढताना भारताने क्रायोजेनिक इंजिनाचे भारतातच उत्पादन करण्याचा पर्याय स्विकारला आणि तेच काम नंबी नारायणन करीत होते. त्यामुळे या पाच देशांची मक्तेदारी संपुष्टात आली असती व तेव्हाच स्वस्तातले उपग्रह प्रक्षेपण भारत जगाला विकू शकला असता. त्यातला मोक्याचा माणूस नंबी नारायणन होता. तो क्रायोजेनिक इंजिन व द्रव इंधनावर काम करीत होता. त्याने खुप प्रगतीही केलेली होती. त्याचवेळी केरळच्या एका पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याने नंबी यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला. त्यांनी मालदिवच्या दोन महिलांना भारताची गुपिते विकल्याचा आरोप ठेवून नारायणन यांना अटक केली. नंबींच्या मते त्यामागचा खरा सुत्रधार आयबी या गुप्तचर खात्याचा सहसंचालक श्रीकुमार होता. त्यानेच खोटेनाटे पुरावे उभे करून नंबींना त्यात गुंतवले आणि त्यांच्यासह सहा शास्त्रज्ञांना तुरूंगात डांबले.

त्यात विजयन नावाचा स्थानिक पोलिस अधिकारी ज्या काल्पनिक व धादांत खोट्या गोष्टी सांगत होता, त्या स्थानिक मल्याळी भाषिक वर्तमानपत्रात रसभरीत करून छापल्या जात होत्या. मग त्याची सुत्रे राष्ट्रीय माध्यमांनी आपल्या हाती घेतली आणि नारायणन यांना गद्दार वा देशद्रोही म्हणून रंगवण्याची जणु स्पर्धाच सुरू झाली. पन्नास दिवसांनी नंबीना जामिन मिळाला. दरम्यान त्यांना छळून इसरोच्या मुखाधिकार्‍यांनाच त्यात गोवण्यासाठी कबुलीजबाब देण्यासाठी दबाव आणला गेला. पण नबी त्याला बळी पडले नाहीत आणि काही दिवसातच गाजावाजा झाल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले. त्या चौकशीत नारायणन निर्दोष असल्याचे सिद्ध झालेच. पण त्यांच्याविरुद्ध कोणीतरी खोटे पुरावे निर्माण करून हे कुभांड रचल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला. त्यात पुढली चारपाच वर्षे गेली आणि नंबी आयुष्यातून उठलेले होते. एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकिर्द संपुष्टात आलेली होती. कोर्टाने त्यांना दहा लाखाची भरपाई देण्याचा आदेशही दिला. पण नंबींना तो मान्य नव्हता. कारण या गडबडीत त्यांची पत्नी निराशेच्या गर्तेत लोटली गेली व कुटुंबही उध्वस्त होऊन गेलेले होते. अन्य पाच शास्त्रज्ञही बरबाद झालेले होते. शिवाय या व्यक्तीगत नुकसानापेक्षाची देशाच्या महत्वपुर्ण संशोधनाची पुरती वाताहत होऊन गेलेली होती. त्यामुळेच नंबी यांनी हायकोर्टाच्या निकालावर अपील केले. त्यांनी मुळात हायकोर्टात आपल्या विरोधात आरोप करणारे व अन्याय करणारे, यांच्या चौकशीची मागणी केलेली होती. ती पुर्ण झाली नाही, म्हणून त्यांनी सुप्रिम कोर्टात अपील केलेले होते. आता शुक्रवारी त्याचा निकाल आला आहे आणि त्यासाठी खास निवृत्त न्यायमुर्तीची समितीही नेमली गेलेली आहे. त्यामुळे त्या चौकशीत अनेक चेहर्‍यांवरचे मुखवटे फ़ाटतील व देशाच्या राजकारणात व व्यवस्थापन, शासनात कोण देशद्रोही दबा धरून बसले आहेत, त्यांचा पर्दाफ़ाश होऊन जाईल.

गेल्या लोकसभा निवडणुकांचे पडघम सुरू झाले आणि प्रचारानिमीत्ताने केरळात गेलेल्या नरेंद्र मोदी यांची नंबी नारायणन यांनी मुद्दाम भेट घेतली होती. आपल्याला न्याय मिळावा म्हणून मागणी केली होती. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि योगायोगाने मोदी सुद्धा तशाच एका कुभांड कारस्थानाचे बळी झाले होते. पण आणखी एक समान दुवा दोघांमध्ये होता. गुजरातचे दंगल काळातील पोलिस महासंचालक असलेले श्रीकुमारच नंबींना गोत्यात आणणार्‍या कारस्थानाचे सुत्रधारही होते. खुद्द नंबीनी तसा आरोप केलेला आहे. कारण त्यांची धरपकड केरळच्या पोलिसांनी केली, तेव्हा तिथे आयबीचे सहसंचालक म्हणून श्रीकुमारच कार्यरत होते. त्यांच्याच इशार्‍यावर नारायणन व अन्य सहकार्‍यांना केरळ पोलिसांनी अटक केली व आरोप ठेवलेले होते. जे पुढे सीबीआयच्या तपासात खोटे पडले. कारण श्रीकुमार वा तत्सम अधिकार्‍यांची खोटे पुरावे निर्माण करण्यातली खासियत होती. त्यांचेच एक सहकारी संजीव भट काही वर्षापुर्वी त्यामुळेच सुप्रिम कोर्टातच खोटे पडलेले आहेत. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी गोध्रा जळितानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक आपल्या निवासस्थानी घेऊन दंगलीला दोनचार दिवस मोकळीक देण्याचे आदेश दिल्याचा खोटेपणा संजीव भट यांनी केला होता. बारा वर्षांनी तो सुप्रिम कोर्टात खोटा पडला. संजीव भट त्या बैठकीला नव्हते आणि तरीही त्यांनी आपल्या ड्रायव्हरला त्या बैठकीला गाडीने सोडल्याचे प्रतिज्ञापत्र द्यायला भाग पाडलेले होते. खोटे पुरावे निर्माण करून कोणालाही गोत्यात आणण्याच्या सोळा वर्षे जुन्या अन्य प्रकरणात अलिकडेच संजीव भट यांना कोर्टाने अटक करण्याचे आदेश दिले आहेत. श्रीकुमार त्यांचेच सवंगडी आहेत आणि एकत्रित ही मंडळी तीस्ता सेटलवाड कंपनीच्या सेवेत अखंड राबत होती, जे त्यांनी पुढल्या काळात गुजरातमध्ये केले, तेच श्रीकुमार यांनी नंबींच्या बाबतीत केरळात केलेले होते.

हा गुजरातचा धागा महत्वाचा आहे. कारण नंबी व मोदी या दोन्ही बाबतीत खोटे पुरावे निर्माण करून कुभांड रचण्यात दोन्हीकडे श्रीकुमार आहेत. माध्यमांना हाताशी धरून खोट्यानाट्य़ा गोष्टी पुढे करायच्या, खळबळ उडवून द्यायची आणि नामवंत लोकांना गोत्यात ढकलायचे, ही अशा पांढरपेशा गुन्हेगारांची मोडस ऑपरेन्डी राहिलेली आहे. अलिकडेच न्या. लोया मृत्यूचे भांडवल करून तसेच कुभांड रचले गेले आणि सुप्रिम कोर्टातच जाऊन तोंडघशी पडलेले होते. पण मुद्दा एका मोदी वा नंबीपुरता अजिबात नाही. अशा लोकांना बोलविता धनी सुत्रधार कोणी परदेशी बसलेला आहे. अन्यथा हे लोक इथले अन्न खाऊन स्वदेशाला अशा विध्वंसाकडे कशाला घेऊन जात असतील? कोणा व्यक्तीचे काय नुकसान झाले, तेही दुय्यम मानता येईल. पण देशाचे नुकसान दिर्घकालीन दुष्परिणाम घडवित असते. मोदींना तुरूंगात धाडले गेले नाही व नंबी मात्र उध्वस्त होऊन गेले. ह्या मंडळींना विविध क्षेत्रातून मिळणारा पाठींबा व उभी रहाणरी तथाकथित पुरोगामी फ़ौज बघितली, तर देशात किती खोलवर पंचमस्तंभिय पाळेमुळे रुजलेली आहेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. जिथे म्हणून संधी मिळेल तिथे देशाचे अधिकाधिक नुकसान करायला सज्ज असलेले संजीव भट वा श्रीकुमार, ही कुणाची पिलावळ आहे? आयबीमध्ये संधी मिळाली तर हा माणूस कलामांच्या दर्जाच्या शास्त्रज्ञाला गजाआड करून भारताच्या क्रायोजेनिक इंजिनाचे संशोधन भूईसपाट करून टाकतो. नरेंद्र मोदीसारखा भाई पंतप्रधान होऊ शकणार्‍याला मुख्यमंत्र्याला त्याच्या कारकिर्दीत पहिल्या वर्षीच संपवायचे कारस्थान यशस्वी होण्यासाठी सर्व मदत केली जाते? हे लोक कुठे कुठे दबा धरून बसलेत, त्याचा अंदाजही मेंदूला मुंग्या आणणारा आहे. म्हणूनच नंबी नारायणन याचा विषय ज्यांना शक्य असेल त्यांनी अधिकाधिक भारतीय लोकांपर्यंत घेऊन जाणे अगत्याचे आहे.


36 comments:

  1. मला अंधुकशी आठवतीय ही बातमी. १९९५च्या सुमाराची होती ती बातमी.
    नंतर रशियानेही क्रायोजनीक तंत्रज्ञान आपल्याला द्यायला नकार दिला होता.
    या एका कारस्थानामुळे आपला अवकाश कार्यक्रम २५ वर्षे मागे गेला.

    ReplyDelete
  2. खरोखरच हे सर्व प्रकरण डोक्याला मुंग्या आणणारेच आहे, सामान्यत: वाचकानां याचा माहिती नसते,व मनुष्यप्राण्याची स्मृती कमजोर असते त्यामुळे कधीतरी डोळ्याखालून गेलेली बातमी पुन्हा संदर्भ मिळाल्याविना आठवत नाही.यासाठी तर आम्ही जागता पहारा नियमीत वाचतो

    ReplyDelete
  3. ह्या मंडळींना मदत करणारी, तथाकथित पुरोगामी फ़ौज बघितली, तर देशात किती खोलवर पंचमस्तंभिय पाळेमुळे रुजलेली आहेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. जिथे म्हणून संधी मिळेल तिथे देशाचे अधिकाधिक नुकसान करायला सज्ज असलेले संजीव भट वा श्रीकुमार, ही कुणाची पिलावळ आहे? आयबीमध्ये संधी मिळाली तर हा माणूस कलामांच्या दर्जाच्या शास्त्रज्ञाला गजाआड करून भारताच्या क्रायोजेनिक इंजिनाचे संशोधन भूईसपाट करून टाकतो. नरेंद्र मोदीसारखा भाई पंतप्रधान होऊ शकणार्‍याला मुख्यमंत्र्याला त्याच्या कारकिर्दीत पहिल्या वर्षीच संपवायचे कारस्थान यशस्वी होण्यासाठी सर्व मदत केली जाते? हे लोक कुठे कुठे दबा धरून बसलेत, त्याचा अंदाजही मेंदूला मुंग्या आणणारा आहे.

    आम्हा पामर नागरीकांना, हे कळत नाही, की, असल्या देशद्रोही कारवाया करणाऱ्या लोकांवर कायद्याने कारवाई का केली जात नाही. निदान गुन्हे तर दाखल करून, त्या मंडळींना, त्यांच्याच उपाययोजनांची झलक दाखवता येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. kumpanach shet khatasel tar kai karnar

      Delete
    2. sir
      mi aapala pratipakshacha rojacha vachak aahe
      aapan he vishay navyane jari parat video madhun mandalet tari te shravaniy tharatil
      aapan avashya ase vishay video rupane parat ekada mandavet hi vinanti

      Delete
  4. भाऊ मिसा अस्तित्वात आहे का? असेल तर तिस्ता सारख्याना त्याखाली का डांबत नाहीत

    ReplyDelete
  5. भाऊ ..........हे सर्व भयानक आहे. वाचत असतानाच अंगावर काटा येतो. परंतु ज्या व्यक्ती या सर्व अनुभवातून जातात आणि त्यांचे कुटुंबीय / नातलग याना काय काय भोगायला लागत असेल कल्पना करवत नाही. तो जो कोणी श्रीकुमार नावाचा ' देशद्रोही ' प्राणी आहे आणि त्याचे ' पित्ते ' या सर्वाना फाशीचीच शिक्षा मिळायला हवी.....तेही त्या सर्वांची पुरेपूर देशद्रोही म्हणून बदनामी झाल्यावरच. या देशद्रोह्यांचे परदेशात बसलेले ' कपटी सूत्रधार ' लोक मग ते रशियन , ब्रिटिश , चिनी अथवा अमेरिकन ही असू शकतात. या परदेशातील लोकांना इथले अणुशास्त्रज्ञ , संशोधकाची माहिती मिळतेच कशी हाही महत्वाचा प्रश्न आहे. इथेच भारताच्या परदेशात काम करणाऱ्या गुप्तहेर संस्थांची कार्यक्षमता पणाला लागायला हवी. पण सध्या राजकारणी असो अथवा आपल्या गुप्तहेर संस्थांचे वरिष्ठ अधिकारी असोत ..........विश्वास कितपत ठेवावा अशीच परिस्थिती आहे. एखादाच ' कर्नल पुरोहित ' टिकून राहू शकतो पण त्यांचे कुटुंबीय अतिशय दारुण परिस्थितीतून जातात हे कटू सत्य आहे.

    ReplyDelete
  6. भाऊ नक्कीच तुम्ही ब्लॅगवर लेख लिहून सांगितले यामुळे तो भरपूर व्हायरल होईल. हे जास्तीत जास्त लोकांना समजले पाहिजे. तसेच सिरियल लाफ्टर शो मध्ये गुंग लोकांना धुंदीतुन बाहेर काढले पाहिजे व पेट्रोल डिझेल भाववाढ यांचे कारण म्हणुन दशकानु दशके भाजपला सारख्या पक्षाला पाठिंबा देणारा वर्ग मतदानाला बँगलोर पणे बगल देतो आहे. अशा लोकांना परत भाजपला मतदान करण्याकरण्यासाठी ऊद्यपीत केले पाहिजे नाहीतर परत कर्नाटक सारखे नाटक होईल. व देश परत खाईत लोटला जाइल.
    भाजपला पण धुदितुन बाहेर काढलं पाहिजे आपले लेख ईतर भारतीय भाषेत भाषांतर करुन प्रसारीत करावेत असे मी अनेक भाजपला नेते यांना सांगत आहे माधव भंडारी सकट पण यांना काही पडलेली नाही विशेषता हिंदी तुळु तामीळी बंगाली भाषेत अत्यंत आवश्यक आहे. अशीच पर्दाफार्ष आवश्यक आहे.

    ReplyDelete
  7. भाऊ पर्दाफार्श केल्या बद्दल धन्यवाद. भाजपला न्यायव्यवस्था नडली आहे. संथ गतीने काम करत आहे. यांच्या दिवाळी व मे महिन्याच्या ब्रिटीश सामन्यातील सुट्ट्या रद्द केल्या पाहिजेत. तसेच सत्तेवर असताना जास्तीत जास्त न्यान्यायाधीश पोलीस आएएस आयपीएस आधिकारी नेमुन पुढच्या पंचवीस वर्षांची तरतुदी करु न ठेवली पाहिजे.

    ReplyDelete
  8. भाउ डोक सुन्न झालय वाचुन ज्यांच्यावर देशाने डोळेबंद ठेवुन विश्वास ठेवायचा तेच गुप्तचर अधिकारी असे इमान विकत असतील तर भयानक आहे

    ReplyDelete
  9. आजच झी न्यज हिंदी वर ही बातमी 21-15 वा दाखवली आहे

    ReplyDelete
  10. झाड़ूवाला आहे हा श्रीकुमार

    ReplyDelete
  11. भाऊकाका फारच भयानक आहे हे,मी मागे एकदा लेख वाचला होता कुठे तो आठवत नाही,की सर होमी भाभांच्या दोन सहकारी असलेल्यांना समुद्रात बुडवुन मारले होते.हे खरे आहे का? असेल तर त्यावरही सवडीने त्यावरही लीहु शकाल का

    ReplyDelete
  12. खरंच भयानक आहे सगळं भाऊ..... फक्त एकच प्रश्न आहे तो म्हणजे कलामांचाच सहकारी असतानाही त्यांच्यावर अशी वेळ आली तर मग कलाम गप्प कसे बसले? राष्ट्रपती झाल्यानंतरही ते काही का करु शकले नाहीत?

    ReplyDelete
  13. Door Darshan sah sarvtr Hindusthan virodhi karmchari bharalele aahet .BJP ne aaplyaa satta kalate ..sarvtr aapli manase bharavit..Rajkaarnat jyast Sadhan suchita aatmghaataki aasate.Mamataa banergy v keralaat Hindu var honare atyachyaar sarkaar maadhymaani Muslim v CHRTIAN Chy navaasakat dakhvaavet.ugich 2 jamaatitil Dangal ASE dakhavalit naye nahitar gaafil hindunaa Hindu sarakaarache mahatv kalanaar naahi.

    ReplyDelete
  14. भाऊ, माझ्या आठवणीनुसार सन 2007 ते 2010 च्या आसपास बऱ्याच अणुशास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यु झाला होता. यावर आपण काही प्रकाश टाकू शकाल काय?

    ReplyDelete
  15. there are no straight answers in espionage.there are many such cases like nambi the famous one is samba spy scandal.ratan sehgal in bureau

    ReplyDelete
  16. श्री भाऊ अहो हे एक प्रकरण तुम्ही समोर आणल, असे अनेक नम्बी आपल्या देशात बरबाद झाले आहेत आमचं देशप्रेम किती बेगडी आहे आणि सत्ता पदावर बसल्यावर आम्ही कसा गैरवापर करतो त्याच हे ढळढलीत उदाहरण आहे मग आपली लोक परदेशात जातात म्हणून हे so called पुरोगामी गळा काढत फिरतात, आमचं दुर्दैव दुसरं काय

    ReplyDelete
  17. खोलवर चौकशी होऊन त्यांचे पाळे मूळे खोदुन काढले पाहिजेत

    ReplyDelete
  18. Why are you comparing Nandi and Naredra Modi?

    ReplyDelete
  19. भाऊ, हे कळत नाही की राष्ट्रीय पातळीवरच्या संशोधनात जो शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे, त्याला एका फडतूस पोलीस अधिकाऱ्याच्या गुन्ह्यावरून एकदम निलंबित कसे केले जाते? पुन्हा, त्यानंतर स्वतः कलाम राष्ट्रपती होते, तेव्हा ह्यात त्यांनी लक्ष का घातले नाही? नम्बी आणि कलाम ह्यांना एकमेकांची इतकी ओळख नव्हती असे म्हणणे धाडसाचे होईल. आपण हे एकवेळ समजू शकतो की कुठलाही छोटा हेरगिरीचा आरोप दुर्लक्षित करता कामा नये, कारण हा राष्ट्रीय संशोधनाचा विषय आहे, पण ही भानगड काही पूर्ण उलगडली नाही असे वाटते. नम्बी निर्दोष असतील हे अगदीच शक्य , पण इतकी सरकारे येऊन जाऊन त्यांनी याबाबत काहीच केले नाही? ही गोष्ट आपली शास्त्रज्ञांबद्दलची उदासीनता दाखवत नाही काय?

    ReplyDelete
    Replies
    1. हे वाचा.
      http://manushi.in/articles.php?articleId=1730#.W5_DBRrhXmo

      Delete
  20. Tiranga chitrapatatil shastradnya apaharanacha prasanga athavala, pan aplya deshat tar pratyaksha shastradnyala turungat takle, kevdhe durdaivi ahe he sarva.

    ReplyDelete
  21. Simply not acceptable ! Bhau dhanywad ..Midini kahitari karayala pahije

    ReplyDelete
  22. Bhau he far bhayanak ahe.deshbhakti ajun far rujawli pahije

    ReplyDelete
  23. सगळे विचार करण्यापलीकडे आहे, या सगळ्यापुढे केकता कपूरच्या मालिका फिक्क्या वाटतात, एव्हढी षडयंत्रे, पातळयंत्री माणसे त्या जर्मनीच्या गोबेल्सलाही मागे टाकतील असे बुध्दीभ्रम सगळे काही अनाकलनीय आहे आणि खाली सामन्य जनता मात्र भांडतेय जातीपातीच्या लुटूपूटूच्या लढाया चघळत, ज्या वाजपेयी यांना हरविण्यासाठी ग्वाल्हेर मध्ये हिजडे नाचवले, वाजपेयी यांना शारीरिक मारहाण केली, त्यांना जिवंतपणी दुस्स्सास करून हिणवले त्यांच्या बद्दल मृत्यूपश्चात गळे काढून रुदन करणारे विकाऊ कोन्ग्रेसी पहिले की देशाचे दुर्दैव समोर उभे राहते
    --- देवेंद्र

    ReplyDelete
  24. भाऊ तोरसेकर यांनी आजवर इतके लेख लिहिले परंतु कुठल्याही लेखातील माहिती प्रसृत करा असे विशेष आवाहन त्यांनी केले नव्हते ते या लेखांमध्ये केलेले आहे यावरून या लेखाची महती ओळखावी आणि प्रत्येकाने अधिकाधिक प्रचार प्रसार करावा ही नम्र विनंती

    ReplyDelete
  25. Ek prashan, Kalamanni aaplyaa yaa ex-sahakaryasaathi kahi kele kaa? Kaa naahi kele?

    ReplyDelete
  26. धन्यवाद भाऊ, दृष्टीकोन दिला म्हणून

    ReplyDelete
  27. आमच्या पिढीला तुमच्या मुळे हि माहिती समजली

    ReplyDelete
  28. aapalya vishayi kahich mahiti nahi
    aapala pratipaksha video mi niymit vachato aapalya doghanchehi video uttam asataat
    aapalyala khokala khup yeto tyache kaaran kaay aapan dhumrapan karata asaave ase bhasate kalaji ghyavi
    aapalaa janm maratha kadhi join kela hi kaahich maahiti naahi atre punyala shevati shevati aale asatana (omkareshwar mandirat ) tyanche darshan zale hote
    tyanche preeti sangam tyaveles gajat hote aapali adhik mahiti kuthe milel ?

    ReplyDelete
  29. 2006 ते 2010 ह्या काळात 159 शास्त्रज्ञ मारले गेले जे अणू शस्त्र बद्दल काम करत होते ज्यांचा कोणताही तपास किंवा वाचता झालेली नाही.. किंबहुना होऊ दिली नाही... ह्या सुगम काळात लिब्रेड ने खूप कांड केले आहेत खर त्यांचा तपास झाला पाहिजे... कश्यावरून नांबी ह्या प्रकरणात कलाम ही नसतील..जर अफ़जल गुरूंची दया याचिका स्वतः करायला लावुन गृहमंत्र्यांलय ती पाठवत नाही म्हणून 3 3 पत्र लिहिले राष्ट्रपती भवनात स्पेशल सेल निर्माण केला जो भारतात कुठे मुस्लिम अन्यायची तक्रार आली तर त्वरित त्याला मदत पोहचली पाहिजे यासाठी व ही सर्व माहिती राष्ट्र पती भवनात on रेकॉर्ड आहे अफजलगुरु च्या बायकोला 2 दिवसात मुलाखतीची वेळ दिली होती ... पाकिस्तान अणू स्फोटाचे जनक ही हेच आहेत म्हणे....

    ReplyDelete