Sunday, September 2, 2018

सनातनी आणि नक्षलवादी

naxal intellectuals arrested के लिए इमेज परिणाम

जगात वा आपसास घडणार्‍या अनेक घटना वरकरणी आपोआप वा सहज घडून गेलेल्या वाटतात. त्याची आपण गंभीर दखल घेत नाही. पण म्हणून सगळ्याच घटना नैसर्गिक वा कालक्रमाने घडलेल्या असतात, असेही नसते. त्यामागे काही योजना असते आणि त्या घडवून आणलेल्याही असू शकतात. अनेकदा तर समोरून काय प्रतिक्रीया वा प्रतिसाद हवा, त्यासाठी आधीची घटना घडवून आणलेलीही असू शकते. नंतरच्या घडामोडीची पुर्वतयारी म्हणूनही काही वेगळ्या घटना घडवून आणल्या जात असतात. मागल्या दोन आठवड्यात सनातन व नंतर माओवादी नक्षली संदर्भात झालेल्या अटका, छापे व धरपकड, काहीशी परस्पर संबंधित असावी काय, याची म्हणूनच शंका येते. कुठेही कसली चाहूल नसताना आधी सनातनच्या काही लोकांच्या घरी छापे पडले. नंतर त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी काही अटका व छापे झाले. त्यातील निवडक तपशील माध्यमातून प्रसारित झाला आणि त्यावर धुरळाही उडवला गेला. अर्थात असा धुरळा उडवणारा एक वर्ग किंवा ठराविक घटक आहे. त्याची भूक अशा छापे व अटकांमधून भागवली गेली. तेव्हा त्यांच्याकडून पोलिस व तपास यंत्रणांची पाठ थोपटून घेण्यात आली, त्या तपासाविषयी शंका व संशय घेणारे आक्षेपही असे पुरोगामी घटक स्वत:च खोडून काढण्यात पुढे होते. यात एक आठवडा गेला आणि मग त्यांच्याच गोटातल्या अनेकांवर छापे घातले गेले व अटकाही झाल्या. आता त्यांनी आपल्यावर अन्याय होतो असे कसे म्हणावे? कारण आठवडाभर आधी त्यांनीच सनातनवरच्या कारवाईसठी तपास यंत्रणांची पाठ थोपटली आहे ना? मग पहिली कारवाई योग्य निष्पक्ष असेल, तर दुसरी कारवाई पक्षपाती कशी ठरवता येईल? की अशा पोपटांची वाचा बंद करण्यासाठी आधी सनातनवर छापे घालून पुरोगाम्यांना जाळ्यात ओढले गेलेले होते?

वैभव राऊत नावाच्या कुणा सनातन साधकाला नालासोपार्‍यातून अटक झाली. त्याच्या घरावर छापे घालून कागदपत्रे स्फ़ोटके जप्त करण्यात आल्याच्या बातम्या आल्या. मग त्याच्या जबानीच्या आधारे आणखी काहींना इतरत्र छापे घालून पकडले गेले. त्यांच्यावर दाभोळकर, लंकेश वा अन्य हत्याकांडाचे आरोप ठेवले गेले. मात्र त्यातले सज्जड पुरावे अजून समोर आलेले नाहीत. कारण कुठलाही गुन्हा सिद्ध होण्यासाठी कायद्याला मान्य होऊ शकणारे पुरावे असावे लागतात. तसे कोणते पुरावे राऊत वा अन्य कोणापाशी सापडले असतील, तर ते अजून कोर्टात आलेले नाहीत. पण सनातनला किंवा त्यांच्यासहीत हिंदूत्ववादी गटाला कोंडीत पकडण्यासाठी उतावळे असलेल्यांना तशा भक्कम पुराव्याशी कुठे गरज असते? सहाजिकच त्यांनी विनाविलंब सनातनच्या अटकेचे समर्थन केले आणि यंत्रणांची पाठ थोपटून घेतली. कारणही स्पष्ट आहे. त्यांनाही सत्य पुरावे अशा गोष्टींशी कर्तव्य नसते की दाभोळकरांच्या हत्येशी कर्तव्य नसते. त्यांना अशा अर्धवट वा अपुर्‍या माहितीचे राजकीय भांडवलच करायचे असते. तो मसाला कोणीही पुरवला तरी चालतो. सहाजिकच एटीएसच्या नालासोपारा धाडीचे पुरोगाम्यांनी टाळ्या पिटून स्वागत केले. माध्यमातून खुप धुरळा उडवून झाला. त्यानंतर त्याच तपास यंत्रणांनी आपला मोर्चा पुरोगाम्यांचे अतिरेकी नक्षली व माओवादी यांच्यासह सहानुभूतीदारांकडे वळवला आहे. मंगळवारी मध्यरात्री व दुसर्‍या दिवशी पहाटे अनेक संशयित नक्षली व माओवादी बुद्धीमंत, लेखक पत्रकार व सहानुभूतीदार यांच्या घरावर ‘नालासोपार्‍या’सारख्याच धाडी पडल्या. एकाचवेळी पाच राज्यात ह्या धाडी घालण्यात आल्या आणि त्यात एकाहून एक नामांकित व ख्यतनाम पुरोगामी चेहर्‍यांना पोलिस यंत्रणांनी ताब्यात घेतले. इतके होऊनही कुणा पुरोगामी नेत्याला वा बुद्धीमंताला प्रोत्साहक प्रतिक्रीया देण्यासाठी पुढे यावेसे वाटलेले नाही. याचा अर्थ काय होतो?

सनातनच्या कुणाला पकडले, मग तो हिंदू दहशतवाद असतो. तर नक्षली वा पुरोगामी लोकांना अशाच कारणासाठी पकडले गेल्यास तो पुरोगामी दहशतवाद का होणार नाही? कारण जी प्रारंभिक माहिती उघडकीस आलेली आहे, ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घातपाती हत्याकांडाची पुर्वतयारी असल्याचे सांगते. खरे तर या संदर्भात खुप आधी म्हणजे गेल्या जुन महिन्यात पहिली कारवाई झालेली होती. दिर्घकाळ तुरूंगात असलेले नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक साईबाबा यांच्या उपदव्यापांचे धागेदोरे शोधताना पोलिसांना खुप काही माहिती मिळालेली होती. त्यातच वर्षारंभी पुण्यात एल्गार परिषद झाली आणि त्यानंतर भीमा कोरेगाव येथे भयंकर हिंसाचार माजवला गेला. त्याचेही धागेदोरे शोधताना अनेक दुवे तपास यंत्रणांच्या हाती लागले. त्याचा मागोवा घेताना थेट पंतप्रधानांच्या हत्येविषयी झालेल्या चर्चा विचारविनिमयाचे काही कागदपत्र पोलिसांना मिळालेले होते. पण त्यात गुंतलेली नावे खुप मोठी होती. म्हणजे उदाहरणार्थ गौतम नवलाखा हे नाव मोठे आहे, युपीएच्या कारकिर्दीत सोनियांच्या नेतृत्वाखाली जे राष्ट्रीय सल्लागार मंडळ कार्यरत होते, ते मनमोहन सरकारला सल्ला देत होते आणि नवलाखा त्याचे सदस्य होते. मानवाधिकार वा समाजसेवा म्हणून जे थोतांड मागल्या दोनतीन दशकात बोकाळले, त्यातून घातपाती संघटनांनी पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी हा मुखवटा धारण केला. त्यांनी हळुहळू आपल्या दोन शाखा केल्या. त्यापैकी एक शाखा भूमीगत राहून हिंसाचार माजवणार आणि दुसरी उजळमाथ्याने समाजात सेवाव्रती म्हणून मुखवटा लावणार. घातपातासाठी पैसा व निधी उभारण्याचे काम करणार. पकडल्या जाणार्‍या घातपाती अतिरेक्यांसाठी कायदेशीर पळवाटांची सुविधा उभी करणार. त्याखेरीज क्रांतीच्या स्वनांनी भारावलेल्या सुखवस्तु व सुशिक्षितांना बेसावधपणे आपल्या सापळ्यात ओढायचे काम या पांढरपेशी गटाने करायचे असते. मंगळवारी त्यांच्यावरच धाडी पडल्या आहेत.

इथे सनातन आणि माओवादी नक्षली यांची तुलना करून बघण्यासारखी आहे. सनातनच्या अर्धा डझन लोकांना पकडल्यानंतरही कुठल्या मोठ्या राजकीय पक्ष किंवा राजकीय संघटनेशी त्यांच्या संबंध असल्याचा पुरावा समोर आलेला नाही. आणखी एक गोष्ट अशी, की कुठला राजकीय पक्ष सनातनवरील कारवाईच्या विरोधात आवाज उठवायला पुढे सरसावला नाही. पण नक्षली अटकसत्रानंतर अनेकांचे पुरोगामी मुखवटे फ़ाटणार आहेत. अटकेला काही तास होण्यापुर्वीच अनेक पुरोगामी अटकेमागे काही काळेबेरे असल्याचा कांगावा करायला पुढे आलेले आहेत. माओवादी जर घातपाती म्हणून पकडले गेले असतील, तर त्यांनाही सनातन प्रमाणेच वागवा, असे पुरोगामी का म्हणत नाहीत? दहशतवादाला धर्म नसेल वा विचार नसेल, तर पुरोगामी शहाण्यांच्या युक्तीवादामध्ये पक्षपात कशाला होतो? हेच नेहमी होत आलेले आहे. नक्षलवादी पकडला गेल्यावर झाडून सगळे मानवाधिकारवादी मैदानात उडी घेऊन त्यांना वाचवायला पुढे येतात. पण सनातनवाल्यांना माणसे असूनही कुठले मानवाधिकार नाहीत, अशी पुरोगाम्यांची धारणा आहे. इथे सगळी गफ़लत होऊन जाते. कर्नल पुरोहित यांनी नुकताच सुप्रिम कोर्टाकडे अर्ज केला असून, आपली अनेक वर्षे तुरूगात छळणूक झाली त्याच्या चौकशीची मागणी केली आहे. पण त्यांच्या मानवाधिकारासाठी यापैकी कुठला पुरोगामी नामवंत वकील पुढे सरसावलेला नाही. मात्र तेच लोक अफ़जल गुरू वा याकुबच्या फ़ाशीसाठी मध्यरात्रीही सुप्रिम कोर्टाला कामाला लावत असतात. आताही त्याचेच प्रत्यंतर येईल. पण नक्षली असे शहरात का येऊ लागले आहेत? त्यांना मोदी सरकारची इतकी दहशत कशाला वाटू लागली आहे? त्यांना युपीए वा मनमोहन सरकारची भिती कशाला नव्हती? आमचे सरकार सत्तेत आल्यावर एकेकाला बघून घेऊ, असे प्रकाश आंबेडकर कशाला म्हणत होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या ताज्या अटकांमध्ये दडलेली आहेत.

प्रकाश आंबेडकरांपाशी इतकी शक्ती नाही, की ते देशात आपल्या पक्षाचे सरकार आणू शकतील. पण कॉग्रेस वा युपीए सरकार आले तर पुन्हा नक्षली नवलाखा किंवा तत्सम मानवाधिकारी सल्लागार मंडळाच्या तालावर ते सरकार नाचेल, याची त्यांना खात्री आहे. असे सरकार सत्तेत असले मग कर्नल पुरोहित वा साध्वी प्रज्ञासिंग यांचे मानवाधिकार पायदळी तुडवले जाणार, याविषयी सर्वाना खात्री आहे. त्याच्या उलट नक्षली माओवादी किंवा जिहादी घातपात्यांना कायद्यासह सरकारने संरक्षण मिळणार याचीही हमी आहे. ती हमी मोदी सरकार सत्तेत आल्यापासून संपली, ही खरी अडचण आहे. मागल्या चार वर्षात पुर्वेकडील अनेक राज्यात बोकाळलेला जंगली प्रदेशातला नक्षलवाद अस्ताला लागलेला आहे. जंगल कपारीत लपून बसलेल्या नक्षल्यांना शोधून व त्यासाठी स्थानिकांची मदत घेऊन मोदी सरकारने मोठी मोहिम चालवली. त्यामुळे या लोकांना जंगलात लपून बसणे अशक्य झाले आहे. त्यांची संख्या पुर्णपणे घटली आहे आणि त्यासाठी मिळणारा पैसाही ओहोटीला लागलेला आहे. सोनिया गांधींच्या सल्लागार मंडळात बसून दहा वर्षे विविध अनुदान योजना आखण्यात आल्या व राबवण्यात आल्या. त्यातून कोट्यवधीची रक्कम नक्षली व दहशतवादी कारवायांकडे अलगद वळवली जात होती. मोदी सरकार आल्यावर हे सल्लागार मंडळ संपले आणि त्यातून येणारा मलिदाही आटोपला आहे. तेही कमी म्हणून की काय, जंगल भागात सर्व यंत्रणांचे सुसुत्रीकरण करून नक्षली हिंसाचार मोडीत काढला गेला आहे. मागल्या चार वर्षात देशात कुठेही मोठा नक्षली वा जिहादी घातपात झालेला नाही. त्यातून सावरण्यासाठी शहरात या लोकांनी आश्रय घ्यायला आरंभ केला आहे आणि या सर्वांच्या मुळाशी असलेला नरेंद्र मोदी नावाचा काटा काढायचा बेत शिजला होता. त्याचेच धागेदोरे शोधताना ही ताजी धरपकड झालेली आहे.

मार्क्सवाद किंवा कम्युनिस्ट तत्वज्ञान कधी़च लोकशाही मानत नाही. सर्वहारा वर्गाची हुकूमशाही म्हणजे गरिब वंचितांचे नेतृत्व करणार्‍यांची हुकूमशाही, असे कम्युनिस्टांचे तत्वज्ञान आहे. ते शक्य नसल्याने सहा दशकापुर्वी मुख्यप्रवाहातील कम्युनिस्टांनी लोकशाही मार्गाने निवडणूकांनी सत्ता मिळवण्याचा मार्ग पत्करला. तशी सत्ता मिळाली तरी पक्षाची व नेत्याची हुकूमशाही प्रस्थापित करता येत नाही. म्हणून चारू मुजूमदार वा कनु सन्याल अशा मुठभरांनी सशस्त्र क्रांतीचा भूमीगत मार्ग पत्करला. त्यांनी वेगळी चुल मांडून त्याला मार्क्सवादी लेनिनवा़दी कम्युनिस्ट पक्ष असे नाव दिले. त्याच्याच विभिन्न गटांना आपण आज नक्षली म्हणतो. या लोकांनी १९७० च्या सुमारास बंगालच्या नक्षलबाडी गावात सश्स्त्र उठाव केला व अनेक जमिनदारांचे मुडदे पडले होते. त्या उठावानंतर अशा सशस्त्र घातपाती कार्यशैलीला नक्षलवादी असे नाव पडले. आज त्या गावात कोणी कम्युनिस्टांचे नावही घेत नाही. पण तिथून सुरू झालेल्या कम्युनिस्ट उठावाला नक्षलवादी हे नाव कायमचे चिकटून गेले. हळुहळू त्याला अनेक बुद्धीमान अभ्यासू व पुस्तकी कम्युनिस्टांची साथ मिळत गेली आणि विद्यापीठात शिरकाव करून घेतलेल्या पढतमुर्ख कम्युनिस्टांनी सुशिक्षित तरूणाला त्यात ओढले. अनेक विद्यापीठाला त्यांनी त्यासाठी लक्ष्य केले. हळुहळू डाव्या पुरोगामी पक्षांनीही त्यांची तळी उचलून धरली आणि आता तर पुरोगामी आंबेडकरवादी व डाव्यांसह विवेकवादी म्हणवून घेणारे समाजवादीही नक्षलवादाच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यापैकी अनेकांना संघ भाजपा वा हिंदूत्वाचे वावडे आहे. त्याचाच फ़ायदा घेऊन शहरी भागात नक्षली व जिहादींनी आपले हातपाय पसरले आहेत. नक्षली व जिहादी दहशतवादाकडे संघाला वा हिंदूत्वाला पर्याय म्हणून बघण्यातून ही रोगराई देशाच्या अनेक शहरात व विद्यापीठात बोकाळत गेलेली आहे.

मग जेव्हा हिंदूत्वाला शिव्याशाप द्यायचे असतात, तेव्हा हेच पुरोगामी सनातनकडे बोट दाखवतात. पण हिंदूत्ववा़दी मानल्या जाणार्‍या संघटना वा राजकीय पक्ष कधीच सनातनच़्या समर्थनाला उभे राहिलेले नाहीत. फ़ार कशाला कालपरवा ज्यांना सनातनचे साधक म्हणून पकडले गेले, तेही आपले सदस्य नसल्याचे सांगून सनातन संस्थेने हात झटकले आहेत. पण तसेही सोवळेपण कोणी पुरोगामी दाखवणार नाही. आता ज्यांना अटक झाली आहे वा जिथे धाडी छापे पडले आहेत, त्यांना गुन्हेगार मानण्यापेक्षा निष्पाप व निरपराध ठरवण्यासाठी तात्काळ पुरोगामी लोकांनी हलकल्लोळ सुरू केला आहे. हा दोन्हीतला फ़रक आहे. एक दहशतवाद राजकीय आश्रयावर चालतो, त्याला जिहाद नक्षलवादी असे नाव आहे. तर दुसरा दहशतवाद काहीसा हौशी व भावनांच्या आहारी गेलेली उत्स्फ़ुर्त प्रतिक्रीया आहे. त्याला टोळीबाजी म्हणता येईल. एका प्रवृत्तीचे जाळे देशाच्या विद्यापीठे, राजकीय संघटना व न्यायालये व थेट कलाक्षेत्रापर्यंत पसरलेले आहे आणि दुसर्‍या दहशतवादाला पाठीशी घालायला यापैकी एकाही क्षेत्रातला कोणी मान्यवर पुढे येत नाही. हा जमिन अस्मानाचा फ़रक आहे. म्ह्णूनच नक्षली व जिहादी दहशतवादाला हात लावणे कायद्यालाही भयभीत करते. त्याचे बोलविते धनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात मोक्याच्या जागी बसलेले आहेत. दुसरा म्हणजे हिंदू दहशतवाद जवळपास नगण्य आहे. नालासोपार्‍यात मिळालेली स्फ़ोटके व बंदुका वगैरे नक्षली वा जिहादी शस्त्रसाठ्य़ाच्या तुलनेत दिवाळीचे फ़टाकेही म्हणता येणार नाही. पण त्यांना आधी पकडून पोलिसांनी व एटीएसने आपली पाठ पुरोगाम्यांकडूनच थोपटून घेतली. आता त्याच कर्तव्यदक्ष व कर्तबगार यंत्रणेने नक्षली व माओवादी पकडले असतील, तर पुरोगामी त्यांना खोटे कसे पाडणार? नक्षलीची धरपकड खोटी व बिनबुडाची असेल, तर सनातन्यांची धरपकड योग्य कशी म्हणता येईल?

9 comments:

  1. श्याम मराठेSeptember 2, 2018 at 10:40 PM

    पर्फेक्ट भाऊ पर्फेक्ट. माझ्या मनात हेच आले होते. तुमच्या ब्लागच्या वाचनाने वस्तुनिष्ठ विश्लेषणाची सवय लागत आहे.
    -- श्याम मराठे

    ReplyDelete
    Replies
    1. Agree, वस्तुनिष्ठ विश्लेषणाची सवय लागत आहे .... 😁👍

      Delete
  2. भाउ हाच प्रश्न सर्वांना पडलाय नवलखा हे सोनियांच्या सल्लागार मंडळात होते हेवाचुन धक्काच बसला उद्या समजा सनातनी जाउ देत rssच कोनी अस मोदीसरकारमधे उघडपने दिसलतरपुरोगामी कायहाल करतील मोदींचे आणिहा नक्षलवादी एकप्रकारचा मंत्रीचहोताकी तेव्हा कोनी काही कस बोललनाही सगळ्यांची रसदएकदम तुटल्याचा परीनाम कांगरेसने ६०वरषात कुनाकुनाला पाळलय कहर आहेचीनशी पन यांचे लागे बांधे दिसतात राफेलची किंमत काढायला सांगितली असेल राहुलला पनतो फेलगेला तरीच अचानक यात्रा काढली नवीनटिप देनार असतील जिनपिंगला दुस्रया देशाच्या राजकारनात तोंड खुपसायची वाइट सवय आहे भारतच बाकी होता कांगरेस पैसाची कमी आहे आणि चीन पैसे देउनच देश विकत घेते हे जगजाहिर आहे सोनियांनी तरीच सगळ खानदान पाठवल होत चीन राजदुताकडे ते पन अपरात्री ते का ?क

    ReplyDelete
  3. Good ,factual article. It is shocking to learn that Navlakha was in Gandhi's National Council of Advisers. That is treachery and selling Nation to Naxals. What a shame.

    ReplyDelete
  4. भाऊ हा तुम्ही वर्णन केलेला घटनाक्रम हा दहा ऑगस्ट पासूनचा आहे म्हणजेच 9 ऑगस्टला आणि त्याच्या आधी काही दिवस राज्यात जी हिंसक आंदोलने चालू होती त्यानंतरचा आहे चाकण औरंगाबाद येथील औद्योगिक परिसरात जी तोडफोड आणि नुकसान करण्यात आले कदाचित त्याच्या मागेही हे शहरी नक्षलवादी असू शकतात त्यामुळे तुमच्या विवेचनात खुपच तथ्य वाटते

    ReplyDelete
  5. गडकरी रंगायतनमध्ये सनातन च्या लोकांनी देवांचे विडंबन करणारे नाटक बंद पाडण्यासाठी दिवाळीतील फटाके फोडले व त्यांना शिक्षा झाली. हा प्रसंग वगळता इतर कोणत्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाली ?

    ReplyDelete
  6. पुरावे दोघांविरुद्ध आहेत. पण एकाला कट्टर हे विशेषण तर दुसऱ्याला कथित हे विशेषण.
    एकाविरुद्धचे पुरावे खरे तर त्याच यंत्रणेने शोधलेले दुसर्याविरुद्धचे पुरावे खोटे
    दक्षिणेत इसिसचे अतिरेकी सापडले आहेत. तेथे तर हिंदुत्ववादी सरकार नाहीये आता नावे कुणाला ठेवणार?
    सकाळ मध्ये शेखर गुप्ता यांचा लेख वाचला. चक्क नक्षलवादाचे समर्थन केले आहे.
    आणि हे लोक आपले घातली विचारांचा प्रसार करतात आणि अनेकजण यात फसतात.

    ReplyDelete
  7. It is surprising that the cases of so-called activists directly stand in the Supreme Court whereas others have to go through regular sessions courts etc.

    ReplyDelete
  8. भाऊ, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताताना पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली, म्हणून न्यायालयाने पोलिसांना त्याचे स्पष्टीकरण विचारले अशी बातमी वाचली. परंतू 'सकाळ' वृत्तपत्राच्या काळाच्या अंकात या गुन्ह्यातील एक आरोपी प्रा. तेलतुंबडे याची, त्याच्या कृत्याचे समर्थेन करणारी मुलाखत छापली होती. हा न्यायालयाचा अवमान नाहीका ?

    ReplyDelete