बुधवारी प्रियंका गांधी राजकारणात उतरल्याची बातमी आली, तेव्हा त्याला कॉग्रेस अध्यक्ष व प्रियंकाने बंधू राहुल गांधी यांचा मास्टरस्ट्रोक ठरवण्याची वाहिन्यांपासून विविध राजकीय विश्लेषकांमध्ये स्पर्धा लागलेली होती. मास्टरस्ट्रोक नक्कीच आहे. कारण कर्नाटक विधानसभेचे निकाल लागल्यापासून राहुल गांधी गठबंधनाची भाषा बोलत आहेत आणि त्यांनाच बाजूला ठेवून मायावती व अखिलेश यांनी उत्तरप्रदेशातील जागावाटप उरकून घेतलेले आहे. किंबहूना त्यांनी अमेठी रायबरेली या दोन गांधी घराण्याच्या जागा परस्पर सोडून, त्यालाच कॉग्रेसची लायकीही ठरवलेले आहे. त्यामुळेच आता प्रियंका राजकीय आखाड्यात उतरल्या व त्यांच्याकडे उत्तरप्रदेशची काही जबाबदारी सोपवण्यात आलेली असेल, तर त्याची पार्श्वभूमी भाजपा नसून सपा बसपा आहेत. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. कॉग्रेस असो की सपा बसपा, त्यांना उत्तरप्रदेशात भाजपालाच हरवायचे आहे. त्यामुळेच यापैकी प्रत्येक पक्षाची कुठलीही रणनिती वा मास्टरस्ट्रोक, भाजपाच्या विरोधातलाच असायला हवा आहे. पण प्रियंकाचे राजकारणातील आगमन हे कोणासाठी आव्हान आहे आणि कोणासाठी मास्टरस्ट्रोक आहे? त्याची विशेषकांना तपासणी करण्याचीही गरज भासलेली नाही. प्रियंकाचे कौतुक तोंड फ़ाटेस्तवर इतके चालू आहे, की जणू उत्तरप्रदेशात मोदींचा भाजपा व राहुलची कॉग्रेस इतकेच दोन पक्ष लढतीमध्ये असावेत. अखिलेशचा समाजवादी पक्ष आणि मायावतींचा बहुजन समाज पक्ष त्या राज्यातील नसावेतच, असे एकूण वर्णन चाललेले आहे. कारण प्रियंकाचा जो करिष्मा मोदींना पराभूत करणार आहे, त्या वादळात सपा बसपा कसे टिकणार? असा सवाल कुठल्याही विश्लेषकाला पडलेला नाही. हे नवल नाही का? कारण विषय गठबंधनाचा होता आणि मोदींना गठबंधनाशिवाय हरवता येणेच अशक्य होते. पण आता प्रियंका एकहाती भाजपाला संपवण्याची भाकिते सुरू झाली आहेत. हे काय आक्रित आहे?
मुळात तमाम पुरोगामी माध्यमांची व संपादक विश्लेषकांची एक रणनिती कर्नाटकपासून ठरलेली होती. सर्व विरोधकांनी एकत्र येऊन महागठबंधन करून मोदींना हरवले पाहिजे. त्यासाठी एकास एक उमेदवार उभा केला पाहिजे. ते काही अजून शक्य झालेले नाही. उलट मध्यप्रदेश छत्तीसगड व राजस्थान या तीन राज्यात कॉग्रेसने इतर लहान पक्षांना सोबत घेतले नाही आणि दोन ठिकाणी थोडक्यात भाजपाचे नुकसान झाले. त्याचा वचपा म्हणून सपा बसपा यांनी मोठ्या उत्तरप्रदेशात कॉग्रेसला बाजूला ठेवून जागावाटप उरकलेले आहे. परिणामी संतप्त झालेल्या कॉग्रेसने त्यांना शिव्याशाप देण्यापेक्षा आपल्या बळावर उत्तरप्रदेशच्या सर्व जागा लढवण्याचा पवित्रा जाहिर केला. त्याची प्रतिक्रीया देताना राहुल म्हणाले होते, सपा बसपाला चकीत व्हायची पाळी येईल. त्यांनी कुठेही भाजपा वा मोदींना चकीत करू, असे म्हटलेले नव्हते. मग त्यांनी अकस्मात आपल्या भगिनीला मैदानात आणलेले असेल तर ते कोणाला चकीत करण्यासाठी असेल? मोदी की सपा बसपा? त्यामुळेच भगिनीला उत्तरप्रदेशच्या राजकारणाची महत्वपुर्ण जबाबदारी राहुलनी सोपवण्यात कुठला मास्टरस्ट्रोक असेल, तर तो भाजपासाठी नसून सपा बसपासाठी असू शकतो. पण हे तथ्य तटस्थपणे विश्लेषण करणार्याला बघता येईल. ज्यांना जागेपणी वा स्वप्नातही मोदींना पराभूत झालेले बघायचे असते, अशा विश्लेषकांना कुठल्याही बाबतीत मोदींना दणका बसलेला बघायचा असतो. तो मोदींना बसायचीही गरज नसते. दणका कोणालाही बसला तरी तो मोदींनाच फ़टका बसलाचे सांगण्याला आजकाल पुरोगामी विश्लेषण असे संबोधन मिळालेले आहे. त्यामुळेच राहुलनी आपल्याला वाळीत टाकणार्या सपा बसपाला दणका देण्यासाठीच भगिनी प्रियंकाला मैदानात आणलेले असताना, विश्लेषकांना सपा बसपा नावाचे काही पक्ष आहेत याचेही स्मरण राहिलेले नाही. हाच राहुलचा खरा मास्टरस्ट्रोक म्हणावा लागेल.
अभ्यासू व जाणत्या विश्लेषक पत्रकारांना उत्तरप्रदेशात मागल्या दोन मुदती सत्तेत असलेले व आजही तिथे आपला २० टक्के मतदार जपून असलेले सपा बसपा नावाचे पक्ष आठवत नसतील, तर राहुलचे कौतुक करावे तितके थोडे आहे. कालपर्यंत सतत उत्तरप्रदेशातून दिल्लीची सत्ता मिळते आणि मोदी भाजपाला उत्तरप्रदेशातच पराभूत करावे लागेल, अशी रणनिती मांडणारे तमाम लोक सपा बसपाच्या युती व जागावाटपाचे गुणगान करीत होते. त्या दोघांची बेरीज कशी भाजपाला तुल्यबळ आहे आणि त्याच्यासमोर मोदींचा भाजपा कोलमडून पडणार, त्याची वर्णने चाललेली होती. ते काम जर परस्पर मायावती अखिलेशने उरकलेले होते, तर राहुलना मास्टरस्ट्रोक का मारावा लागलेला आहे? आणि आधीच्या जागावाटपाने भाजपा पराभूत झालेला असेल तर राहुलच्या मास्टरस्ट्रोकने राजकारणात आलेल्या प्रियंका, कोणाला कुठे पराभूत करणार आहेत? कारण त्यांच्यासाठी भाजपा व मोदींना सपा बसपा युती व विश्लेषकांनी मैदानात शिल्लकच ठेवलेले नाही ना? मग मास्टरस्ट्रोक आता कोणाला लोळवणार आहे? तिथे उरलेले सपा बसपाच प्रियंकाचे लक्ष्य असणार ना? सपा बसपाच्या जागावाटपामुळे भाजपा स्पर्धेतून बाहेर फ़ेकला गेला होता आणि आता खरी लढत प्रियंका-राहुल यांची कॉग्रेस व सपा बसपा यांच्यात होणार ना? मग मोदींची वारणशी वा योगींचे गोरखपूर धोक्यात कुठून आले? ते तर केव्हाच पराभूत झालेत. राहिलेत सपा बसपा. हा हस्यास्पद प्रकार अजिबात नाही. तो गंभीर मामला आहे. भाटगिरी करण्यात हयात घालवलेल्यांना मालकाच्या खर्या कर्तबगारीचाही कधी गंध नसतो. म्हणून अशा लोकांना राहुलचा मास्टरस्ट्रोक सपा बसपाच्या विरोधातला आहे, त्याचा साक्षात्कार होऊ शकलेला नाही. जी पुरोगामी मानली जाणारी मते सपा बसपा आघाडीकडे गेली असती, त्यात राहुलच्या मास्टरस्ट्रोकने बिब्बा घातला आहे. पण त्याचा अशा शहाण्यांना निकालानंतरच पत्ता लागेल.
लोकसभेच्या निवडणूकीत राष्ट्रीय पक्ष म्हणून सपा बसपाला मिळणार्या मोठा मतदार घटकाचा ओढा कॉग्रेसकडे असतो. त्याचे प्रतिबिंब आपल्याला पुर्वीच्या अनेक निवडणूक निकालातही दिसू शकते. हा मतदार विधानसभेला अमेठी रायबरेलीत राहुल सोनियांच्या उमेदवारांनाही मते देत नाही. पण लोकसभेला मात्र अगत्याने कॉग्रेस पक्षाला मते देत असतो. अशा मतदाराला गोळा करण्याचे काम प्रियंकावर सोपवण्यात आलेले आहे. त्यामुळे सपा बसपाकडे जाऊ शकणारी अशी मते आपल्याकडे यावी, म्हणून राहुलनी भगिनीला मैदानात आणलेले आहे. तिच्या करिष्म्याने भाजपाला मिळणारी मते कॉग्रेसकडे फ़ारशी जाणार नाहीत. पण सपा बसपाची घाऊक मते मात्र कॉग्रेसकडे वळवली जाऊ शकतील. अशा रितीने पुरोगामी मानल्या जाणार्या मतांची विभागणी करण्याला प्रियंकाचा करिष्मा उपयोगी ठरणार आहे. त्याचा लाभ कॉग्रेस पक्षाला कितीसा मिळू शक्तो? तो मिळण्यासाठी कॉग्रेस पक्ष तिथे मजबूत असला पाहिजे आणि लढण्याच्या स्थितीत असला पाहिजे. तशी स्थिती असती तर सपा व बसपा यांनी कॉग्रेसला झटकून टाकले नसते. अमेठी रायबरेली वगळता कॉग्रेसला आणखी जागा देऊ केल्या असत्या. पण अन्यत्र कॉग्रेस लढायच्या स्थितीत नाही म्हणून त्या दोन प्रमुख पक्षांनी कॉग्रेसला झटकले आणि आता प्रियंकाचा करिष्मा सूड घेतल्याप्रमाणे त्यांची मते खाऊन दोन्ही पक्षांना अपशकून करणार आहे. त्यामुळे विश्लेषक ज्याला राहुलचा मास्टरस्ट्रोक म्हणतात, तो कॉग्रेसला उत्तरप्रदेशात मोठे यश मिळवून देण्यासाठी उपयुक्त नसून, मोदी विरोधातील सपा बसपा महागठबंधनाला दुबळे व पराभूत करायला हातभार लावणार आहे. त्याचा एक अर्थ असा, की राहुलनी प्रियंकाचा पत्ता वापरून मोदी व भाजपासाठी काम सोपे करून ठेवलेले आहे. मग मास्टरस्ट्रोक कोणाचा ते महत्वाचे नसून, कोणासाठी लाभदायक याला खरे महत्व आहे. पण ते समजेल त्याला राजकीय विश्लेषक कोणी म्हणायचे?
भाऊ तुमचं याच विषयावर मत हवं होतं. थँक्स भाऊ.
ReplyDeleteखरं सांगायचं तर गांधी घराण्याच्या अस्तित्वाची निकराची लढाई सुरू झाल्याची ही खूण आहे । पण मोदींद्वेषाची कावीळ झालेल्या पत्रकारांना प्रियंकाच्या नियुक्तीच्या घोषणेने आनंदाचे जे भरते आले आहे ते पाहून करमणूक होते आहे ।
ReplyDeleteराजकुमारी प्रियांका वड्रा हिने फक्त अमेठी आणि रायबरेली इथे प्रचार केलेला आहे. त्यामूळे तिला त्या दोन मतदारसंघाची माहिती आहे. बाकीच्या उत्तर प्रदेशाची माहिती नसेल. असलीच तर Air Conditioned खोलीत बसून Google Maps बघून जे कळले असेल तेवढेच. गेल्या वेळेला विधानसभेसाठी युवराजांनी प्रचंड जाहिरातबाजी करून प्रचार केला, त्याचे काय फळ मिळाले ते ती विसरून गेलेली दिसते. त्यामूळे तिच्यामूळे विशेष फरक पडणार नाही.
ReplyDeletePriyanka wadhera liha
ReplyDeleteRafale has failed to stick. Now, it is like desperate situations require desperate responses. My feeling...
ReplyDeleteOr may be it is tacit understanding between SP, BSP & Congress. They claim to have kept Congress out of coalition. But that may be just a show off. Internally they might have decided to leave Eastern UP seats to Congress. So SP & BSP coalition may field weaker candidates in Eastern UP & ask their supporters to vote for Congress.
ReplyDeleteKadhi
DeleteKase
Kuthe
Te supporters Kay Cambridge University che pass out ahet ka??
खरच कहर केलाय या पुरोगामी?लोकांनी सतत बोलतायत की प्रियंकामुळे भाजपची उच्चवर्णीय मते जाणार पण प्रियंका लोकसभेत कितीतरी जास्त मुसल्िम मते घेइल हे कोणाच्या लक्षात कस येत नाही जे सामान्य माणसाला कळतय की कळुन घ्यायच नाही?म्हणे भाजप किरकिरतय त्यांना विचारल तर ते बोलनारच ना आणि विरुद्धच बोलनार साहजिक आहे ते पण यैमुळे लढत तिरंगी होउन भाजपलाच फायदा होणार हे स्पष्ट दिसतय पण कुणाला बघायच नाही
ReplyDeleteभाऊ आत्ता एबीपी,इंडिया टुडे आणि रिपब्लिक या तीन चॅनेल्स वर ओपिनियन पोल दाखवला जात आहे या पैकी इंडिया टुडे वर nda ला 237 तर बाकीच्या दोन चॅनेल्सनी ज्यांचे c voter मार्फत सर्वेक्षण केले जात आहे त्यांनी 233 जागा दाखवल्या आहेत आणि यात उत्तर प्रदेशात मोदींचा दारुण पराभव होणार असल्याचे दाखवले आहे,म्हणजेच मोदींना 5 ते 10 जागा आणि बाकीच्यांना 70 ते 75 जागा दाखवल्या आहेत आपण वर जे माध्यम तज्ज्ञांचे वर्णन केले आहे त्याच्याशी तंतोतंत हे सर्व्हे जुळतात,मुळात मागच्या खेपेस उत्तर प्रदेशातील जनतेने मोदींच्या पदरात एवढ्या जागा का टाकल्या याचा मुळातून अभ्यास न करता केवळ दोन पक्षांच्या मतांचे अंकगणित करून भाजपचा पराभव होईल असे भाकीत करणे हा बिनडोक पणा आहे हे मे महिन्यात जनता या तज्ज्ञ मंडळींना दाखवून देईल
ReplyDeleteLike
ReplyDeleteBhau atishay yogya vivechan kele aahe.
ReplyDeleteCongress madhye aai cha jasti ladka kon ahe mahiti nahi. pan aho bhau he congress wale itke nalayak ahet ki samja priyanka rajkaranat yashaswi hotiye asa disla tar rahul chya rajakiya karkirdichi antyayatra pan kadhayla kami karnar nahit.
ReplyDeleteभाऊराव,
ReplyDeleteएकदम जबरदस्त विश्लेषण !
माझ्या मते प्रियांका वद्रा यांना लोकसभा निवडणुकींत आणणं हे थोडं बोळा काढून पाणी वाहतं करण्यासारखं वाटतंय. प्रियांकांसोबत ज्योतिरादित्य शिंद्यांना त्याच पातळीची जबाबदारी दिली आहे. ज्योतिरादित्य यांचं कर्तृत्व फारसं नसलं तरी त्यांना लोकप्रियता नक्कीच लाभलेली आहे. त्यांचं जी काही राजकीय मालमत्ता ( = political assets ) आहे ती पप्पूच्या नेतृत्वाखाली सडत होती. तिला प्रियांका ठीकठाक वाव मिळवून देईल असा पक्षश्रेष्ठींचा होरा दिसतोय. पप्पू पूर्णपणे निरुपयोगी तर आहेच, शिवाय इतरांनाही निरुपयोगी बनवण्यात तरबेज आहे. कुठेतरी हे थांबायला हवं म्हणून प्रियांकास आणलंय.
आपला नम्र,
-गामा पैलवान
योग्य विश्लेषण. ऊलट आतातर मोदी व भाजपासाठी निवडणूक सोपी होऊ शकते, पण हे जर सपा-बसपाच्या लक्षात आल आणी त्यांनी कॉंग्रेस बरोबर युतीचा फेरविचार केला तर चित्र वेगळ असेल.
ReplyDeleteभाऊ लेख वाचला. अतिशय सुंदर विश्लेषण. मला सुदधा हीच शंका होती की प्रियांका चा उत्तरप्रदेशातील राजकारण प्रवेश भाजपा पेक्षा सपा, बसपाला डोकेदुखी ठरणार आहे. तुमच्या अभ्यासपूर्ण लेखाने खात्रीच पटली. भाऊ आणखीन एक गोष्ट हे तमाम पुरोगामी चोर जनतेच्या मनात संभ्रम उत्पन्न करण्यासाठी जाणीव पूर्वक प्रियांका वडेरा न म्हणता प्रियांका गांधी म्हणत आहेत आणि आत्ताच काही पत्रकारांनी कोल्हेकुई सुरू केलीय की आता भाजपा रॉबर्ट आणि प्रियांका वर चिखलफेक करायला सुवात करणार. प्रत्यक्षात यांची चौकशी सुरू आहे हे ते कसे विसरतात. त्यांना जनता काय मुर्ख वाटते असो. भाऊ पुन्हा आभार.
ReplyDeleteभाऊ लेख वाचला. अतिशय सुंदर विश्लेषण. मला सुदधा हीच शंका होती की प्रियांका चा उत्तरप्रदेशातील राजकारण प्रवेश भाजपा पेक्षा सपा, बसपाला डोकेदुखी ठरणार आहे. तुमच्या अभ्यासपूर्ण लेखाने खात्रीच पटली. भाऊ आणखीन एक गोष्ट हे तमाम पुरोगामी चोर जनतेच्या मनात संभ्रम उत्पन्न करण्यासाठी जाणीव पूर्वक प्रियांका वडेरा न म्हणता प्रियांका गांधी म्हणत आहेत आणि आत्ताच काही पत्रकारांनी कोल्हेकुई सुरू केलीय की आता भाजपा रॉबर्ट आणि प्रियांका वर चिखलफेक करायला सुवात करणार. प्रत्यक्षात यांची चौकशी सुरू आहे हे ते कसे विसरतात. त्यांना जनता काय मुर्ख वाटते असो. भाऊ पुन्हा आभार.
ReplyDeleteTe purogami vishleshak khup junat ani apali chuk kadhihi Manya karaun mafi magat nahit. Kitihi tondavar aapatale Tari te mafi nahi maganar. Tumhi fact Kumar ketkarani 2014 cha bhajapala milanarya seats ch aakada paha less than 180 hota pan te kadhihi maza andaz chukala aas mhanale nahiyat ajun.ase barech vish-le- shak ahet.
ReplyDelete' झाकली मूठ सव्वा लाखाची ' .....आता उत्तर प्रदेश ( पूर्वांचल ? )मधील या लोकसभा निवडणुकीत ' प्रियांका ' ( का बियांका व्हिन्सी ) हा फटाका वाजणार की ' फुसका बार ' निघणार हे स्पष्ट होऊन जाईल ..हे बरे झाले. त्या नंतरही ' मोदीच ' बहुमताने आले तर खांग्रेसच्या भात्यात कोणतीच अस्त्रे शिल्लक नसतील. सपा / बसपा युती आणि कांग्रेसच्या लढतीत मोदी / भाजपा याना फायदा व्हावा हीच प्रार्थना !!
ReplyDeleteव्वा भाऊ
ReplyDeleteVery statistically opinion bhau.
ReplyDeleteमग असं तर नसेल ना की उच्चवर्णीय मते ह्यांच्यात वर्गीकरण काँग्रेस आणि भाजप आणि बाकीची सपा बसपा
ReplyDeleteवेगळाच दृष्टीकोन दिलात. पटतय...
ReplyDeleteAgree
Deleteभाऊ जबरदस्त लेख लिहिला सणसणीत चपराक भाटांना
ReplyDeleteप्रियांका शेवटी रणांगणात उतरल्या ह्याचा एक अर्थ होऊ शकतो तो असा, की स्वतंत्रपणे राहुलच्या जिवावर निवडणूक जिंकता येईल अशी खात्री मातोश्रींना वाटेनाशी झाली. म्हणून प्रियांकाचा मोहरा उतरवला आहे. ह्याचा आणखी एक अर्थ असाही होतो की, हा हुकुमाचा एक्का म्हणून कायमच हाताशी धरलेला होता. देशाच्या दृष्टीने याचा परिणाम काय? तर प्रियांका, रॉबर्ट, आणि त्यानंतर गांधी कुटुंबाची दिल्लीतील खुर्ची ही विनाखंड सुरु राहील (त्यांच्या दोघा मुलांसह). वाऱ्याची दिशा पाहून आता राहुल किंवा प्रियंकांना पुढे-मागे करता येईल. कुमार केतकर यांच्यासारख्या गांधी घराण्याच्या प्रेमात असलेल्यांना आता आनंदाचे भरते आले असेल, आणि त्यात नवल नाही. एकुणात, काँग्रेसचा हा desperate प्रयत्न आहे असे वाटते.
ReplyDeleteदुसरे, याचा भाजपवर परिणाम काय होईल? जी मते सपा/बसपा वाटून घेऊ पाहत होता, ती आता काँग्रेसच्या पारड्यात पडण्याची शक्यता वाटते - म्हणजे भाजपासाठी हा जरासा धक्का असू शकतो - राहुल बोलले नसतील तरी. पण भाजपच्या काँग्रेसवरच्या घराणेशाही आणि nepotism च्या आरोपांना चांगलेच बळ मिळते - म्हणजे निवडणुकीत उचलून धरायला एक मुद्दा मिळाला. आता इतकीच अपेक्षा ठेवूयात की मतदार जरा सुज्ञपणे मतदान करेल.
अनेक पुरोगामी पत्रकारांना आनंदाचे भरते आले आहे. कर्नाटकातील निवडणुकी नंतर आपण महागठबंधन यावर मत व्यक्त केले होते. त्यामुळे आपल्यावर टीका पण झाली होती. पण आपले मत तेच खरे ठरले.गांधी घराण्याची काय करिश्मा आहे कुणास ठाऊक पण सर्व पुरोगाम्यांना त्यांची पालखी उचलायाला आनंद असतो.आताही आपले विश्लेषण खरे ठरेल आणि UP मध्ये चकित करणारे निकाल लागतील. 2 दिवसांपासून एक जात सगळे जण त्यांना यंग इंदिरा म्हणून दाखवू लागले आहेत.पण कर्तृत्व नावाची काही गोष्ट आहे का नाही की केवळ गांधी आडनाव असले की झाले?
ReplyDeletePerfect
ReplyDeleteकोण कोनाला हरवणार हीच चर्चा सुरु आहे
ReplyDeleteदेशहितासाठी कोण काय करनार हे मात्र दिसत नाही
दुरदैव आहे !
खेळातील भाषेत याला सेल्फ-गोल म्हणतात!
ReplyDeleteजो माइनो है वह गाँधी है
ReplyDeleteजो वाड्रा है वह गाँधी है
और जो गाँधी है वह कभी गाँधी था ही नहीं!
��
��
2034 में कांग्रेस का नारा
ReplyDelete"देश का नारा है, रेहान गांधी (वाड्रा) हमारा है"
मला वाटत नाही बीजेपी साठी निवडणूक सोपी जाईल
ReplyDeleteभाऊंचा अफलातून फटका !
ReplyDeleteफिरसे एक बार मोदी सरकार.
ReplyDeleteBhau ekdam khar vishleshan kelay tumhi. Priyankachya entry mule bhajpcha pakka matdar Sudha Shanka ghet hota. Pan bhajpcha khara fayda ya entry mule disun yeto ani tyat taghya Sudha ahe
ReplyDeleteSome times I wonder if the so called political analysts mortage themselves totally , their body and soul.
ReplyDeleteकॉंग्रेसच्या ह्या साठमारीत बीजेपीचाच फायदा होईल असे वाटते.
ReplyDeleteमला तरी एक नाही तर दोन मास्टरस्ट्रोक दिसतात...
ReplyDeleteपहिला बसलाय राहुलला...
तर दुसरा बसणार आहे राबर्ट ला...
पण शेवटी प्रादेशिक पक्षाची मते ही ऐकेकाळची काँग्रेस ची मते होती ,,प्रादेशिक पक्षांना वाढायला काँग्रेसचीच मते लागणार आहेत आणि परत काँग्रेस वाढायला प्रादेशिक पक्षांची मते ,,,ताज उदाहरण 'आप'..काँग्रेस एकवेळ भाजप ला पुढे जाऊन देईल पण आता पक्ष टिकवण्यासाठी साठी प्रादेशिक पक्षांचे पाय खेचनार ..
ReplyDeleteअखिलेश ने 2017 विधानसभेच्या च्या आधी अशीच बेरीज केलती,,2012 च्या हिशोबाने ,सपा आणि कॉंग्रेस मिळून41% मते ,प्रतकशात आले 27% ;;काय ह्यांची गणितं देव जाणे ,
ReplyDeleteRight bhau, Congress I'll hack votes of sp bsp
ReplyDeleteFinally gain for BJP
Tirangi ladhat BJP Sathi faydyachich rahil
Maharashtra madhyehi asech vhave
Sena will fight solo against BJP, Congress and rashtrwadi
Then 31 percent votes will perform magic
सफा-बसपा व कॉंग्रेसच्या भांडणात भाजपाला फायदा होईल.
ReplyDeleteएकदम छान विश्लेषण आहे भाऊ ..
ReplyDeleteराहूलनी ही लोकसभा स्वबळावर लढायला हवी होती
दोघा दोघांनी म्हणजे राहुल व प्रियांका यांनी एकाचवेळी पराभूत होण्यात काय अर्थ आहे 😂😂😂
Congress hi BJP ki "team B" he
ReplyDeleteHi maz nav mahesh paradkar mi daily reader aahe ya blog cha tasach webdesigner pan aahe tumachya blog che images nehami baher jatat mi te fix karun deu shakato te pan free of cost :) mobile number- 8097627767 email- mahesh.prdkr@gmail.com
ReplyDeleteभाऊ अभिनंदन.तुमचे अंदाज खरे ठरले. प्रियांका बाई च्या नाकावर टिच्चून ३०३ जागा आल्यात.
ReplyDelete