आज सकाळी माध्यमात व अन्यत्र अनील अंबानी यांनी आपले थोरले बंधू व रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे जाहिर आभार मानल्याची बातमी वाचून कमालीचा धक्का बसला. तेवढेच नाही. मुकेश तर सख्खा भाऊच, त्याचे आभार मानणे समजू शकते. पण अनीलने मुकेशची पत्नी व रिलायन्स फ़ौंडेशनची मुखिया नीता अंबानी यांचेही सोबतच आभार मानून घेतले. कशासाठी त्यांनी हे आभार मानले? तर अनीलच्या गळ्याला लागलेला तुरूंगवासचा फ़ास त्यांनी वाचवला असे अनीलचेच म्हणणे आहे. आरकॉम नावाची अनीलची कंपनी दिवाळखोर ठरली असून त्यांनी एरिक्सन नावाच्या कंपनीला देणे असलेली रक्कम थकवल्याचे प्रकरण कोर्टात होते. ती रक्कम वारंवार सांगूनही अनीलने भरलेली नसल्याने त्याला थेट तुरूंगात टाकण्याची ताकीद सुप्रिम कोर्टाने दिलेली होती. त्या भरपाईची मुदत संपत आलेली असतानाही अनील त्याचा भरणा करू शकलेला नव्हता. अखेरीस ती रक्कम भरण्याचे औदार्य थोरला भाऊ मुकेशने दाखवले आणि अनीलचा तुरूंग थोडक्यात वाचला आहे. पण रक्कम तरी किती होती? अवघी ५०० कोटी रुपये? इतक्या किरकोळ रकमेसाठी अनील सुप्रिम कोर्टाचा आदेश झुगारून तुरुंगात जाण्याच्या प्रतिक्षेत कशाला बसला होता? ज्या भावाशी वैर घेतले त्याच्याकडे ५०० कोटीसाठी वाडगा घेऊन उभे रहाण्याची नामुष्की अनील अंबानीला कशाला आलेली आहे? ज्याच्या खिशात ३० हजार कोटी रुपये आयते मोदींनी घातलेत, त्याने ५०० कोटीसाठी इतका गळफ़ास कशाला लावून घेतला? की अनील अंबानीला ३० हजार कोटी हे पाचशे कोटीपेक्षा खुप मोठी रक्कम असल्याचेच अजून समजलेले नाही? मागल्या सहाआठ महिन्यांपासून अनील अंबानीच्या खिशात मोदींनी राफ़ायलच्या करारातून ३० हजार कोटी रुपये घातल्याचा बोभाटा राहुल गांधी करीत आहेत आणि अनीलनी अजून आपल्या खिशात हात घालून ती रक्कम चाचपूनही बघितलेली नाही काय? असती तर त्यांना भावाच्या दारात वाडगा घेऊन कशाला उभे रहावे लागले असते?
बिचार्या अनील अंबानीच्या निर्बुद्धतेची कींव करावी तितकी थोडी आहे. पित्याच्या निर्वाणानंतर वडिलार्जित रिलायन्स उद्योग समुहात या दोघा भावांचे पटत नव्हते, तर दोघे वेगळे झाले होते. त्यानंतर अनील अंबानीने अनेक उद्योग केले. अशा उद्योगात तो कमालीचा दिवाळखोर ठरला. अशा धाकट्या भावाला भांडणामुळेच थोरल्या मुकेशने कधीच कुठली मदत केली नाही की दयामाया दाखवलेली नव्हती. त्याच्यावर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यावर कृपादृष्टी केली आणि सगळा तोटा व दिवाळखोरीतून अनीलला बाहेर काढण्यासाठी त्याच्या खिशात गुपचुप ३० हजार कोटी रुपये घातलेले होते. पण बुद्दू अनीलला हजार लाख कोटी असले काही आकडेच कळत नसावेत. म्हणून त्यांनी कधी आपल्या खिशाला हातही लावला नाही. अन्यथा त्याने सुप्रिम कोर्टाचा आदेश येताच किंवा त्याच्याही आधी एरिक्सन कंपनीने मागणी करताच, फ़टाफ़ट साडेचारशे कोटी रुपये त्यांच्या तोंडावर मारले असते. नुसता खिसा हलवला तरी तितके कोटी रुपये सहज जमिनीवर पडले असते आणि त्या कंपनीने हसतखेळत त्या नोटा गोळा केल्या असत्या. कोर्टात जाण्याच्या कटकटी केल्या नसत्या. अनील अंबानीला तुरूंगात टाकण्याची ताकीद देण्याची वेळही सुप्रिम कोर्टावर आली नसती. पण हा बुद्दू साधा खिशात हात घालून मोदींनी खिशात काय घातले तेही बघू शकला नाही. अनील बुद्दू असला म्हणून कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी बुद्दू नाहीत. त्यांचे अनीलकडे नसले तरी मोदींकडे बारीक लक्ष होते. म्हणूनच त्यांनी ‘मोदींची जादू’ व त्यातली हातचलाखी चालू असताना बारकाईने पाळत ठेवलेली होती. त्यामुळेच जगाला ती जादू दिसली नाही, तरी राहुल बघू शकले. मोदींनी अनील अंबानीच्या खिशात ३० हजार कोटी रुपये कोंबल्याचा आरोप राहुलनी करून टाकला. पण या सर्व गोष्टीत घडामोडीत अनीलपेक्षाही मुकेशसारख्या व्यवहारी माणसाच्या मुर्खपणाचे आश्चर्य वाटते ना?
बाकी सगळे जग मुर्ख असेल. अनील बुद्दू असेल. पत्रकार वा राजकारण्यांना अक्कल नसेल. एकट्या राहुलना अक्कल नक्की आहे. म्हणून त्यांनी ही लबाडी चतुराईने पकडली. पण मुकेश अंबानी इतके मोठे उद्योग साम्राज्य चालवतात, ते सुद्धा मुर्ख कसे निघाले? राहूलने जे ३० हजार कोटी रुपये अनीलच्या खिशात कोंबले जात असताना बघितलेले होते, ते मुकेशलाही का बघता आलेले नाहीत? हे मोठे व्यापारी रहस्य आहे. डिजिटल वा पेट्रोलियम गॅस अशा कुठल्याही उद्योगात हवेतले बदल सिग्नल पकडल्यासारखे उमजणारे मुकेश अंबानी, भावाच्या खिशात अलगद आलेली ३० हजार कोटीची रोख रक्कम कशी बघू शकले नाहीत? अनील दारात वा्डगा घेऊन पाचशे कोटी रुपये मागण्यासाठी उभा होता, तेव्हा निदान मुकेशने त्याचे खिसापाकिट तपासून बघायला नको काय? खिशात हजारो कोटींची मोदींनी दिलेली कॅश लपवून ठेवत आपल्यासमोर वाडगा घेऊन आलेल्या अनीलचा कान, मुकेशने का पकडला नाही? सहाआठ महिने राहुल रोज ज्याचा बोभाटा करीत आहेत, त्या ३० हजार कोटींचा हिशोब तरी मुकेशने धाकट्याकडे मागायला नको काय? ते संपले असतील तर त्याचा हिशोब दाखव. मगच ५०० कोटीची भीक घालीन असे मुकेश नक्कीच म्हणू शकला असता. पण देशातला हा सर्वात मोठा व श्रीमंत उद्योगपतीही कमालीचा बुद्दू निघाला. भावाच्या गयावया किंवा कोर्टाच्या ताकिदीसमोर भुलला आणि अकारण त्याने अनीलच्या वाडग्यात ५०० कोटींची रक्कम टाकली. धीरुभाईंचे हे दोन सुपुत्र आज त्यामुळे देशातले सर्वात बुद्दू उद्योगपती ठरले आहेत. मोदींसारखे पंतप्रधान त्यांच्या खिशात गुपचुप हजारो कोटी रुपयांची कॅश कोंबतात आणि हे मुर्ख आपला खिसाही चाचपून बघत नाहीत. एकमेकांच्या दारात वाडगा घेऊन भीक मागायला उभे रहातात. भारतातील व्यापार उद्योगाची ही केवढी शोकांतिका आहे ना? यातून बाहेर पडायचे असेल, तर राहुल गांधी एकाचवेळी राष्ट्रपती, पंतप्रधान व संसद व्हायला हवेत. अन्यथा या देशाला कुठले भवितव्य नाही, याची आज खात्री पटली.
आजवर फ़्रान्सच्या आजीमाजी अध्यक्षांना मोदींनी अनीलच्या खिशात कोंबलेले हजारो कोटी रुपये बघता आले नाहीत. सुप्रिम कोर्टाला ते पकडता आले नाहीत. मोदींना तर आपण असे कोणाच्या खिशात कोंदलेले हजारो कोटी रुपये आठवतही नाहीत, की संरक्षणमंत्र्यांना त्याची गंधवार्ता नाही. इथवर ठिक होते. पण ज्याच्या खिशात इतकी मोठी रक्कम कोंबली, त्यालाही त्याचा थांगपत्ता नाही आणि त्याचा भाऊही बेसावधपणे त्याची विचारणा केल्याशिवाय आणखी ५०० कोटी रुपये देतो? राहुल गांधी किती संवेदनशील आहेत, त्याचा यापेक्षा मोठा कुठला पुरावा असू शकतो? त्यांच्या हाती देशातली सगळी निरंकुश सत्ता सोपवली; तर किती स्वस्तात सरकार चालवले जाऊ शकेल ना? कुठले तपासकाम, चाचपणी, गोपनीय माहिती मिळवण्यासाठी सीबीआय, ईडी वा अन्य गुप्तचर खात्याचीही गरज उरणार नाही. हवेत नसलेले सिग्नल सुद्धा राहुल गांधी सहज पकडू शकतात. देणारा व घेणार्यालाही जी देवाणघेवाण झाल्याचा थांग लागत नाही, त्या चोर्या राहूल पकडु शकत असतील, तर देशाला आणखी काय हवे? देशाला चौकीदाराची गरज नाही, की पोलिस सेनादलाचीही आवश्यकता रहात नाही. फ़क्त राहुल असले मग झाले. संसद वा अन्य लोकशाही संस्थांची देखील गरज उरणार नाही. त्याच्याहीपेक्षा कुठल्या बॅन्का व रिझर्व्ह बॅन्ज अर्थसंस्थांचीही गरज उरत नाही. राहुल गांधींच्या हाती नुसता माईक द्यायचा आणि देशाचा अवघा कारभार कसा सुटसुटीत चालेल ना? त्यांच्यासमोर अनील वा मुकेशच काय, कुठले टाटा वा बिर्ला बजाजही कामाचे रहाणार नाहीत. इतक्या सहजपणे राहुलजी दु:खी शेतकर्यांच्या खिशात लाखो रुपये कोंबतील, की लाभार्थीलाही काय झाले ते कळणार नाही. जसे अनील अंबानीला अजून उमगलेले नाही. किंबहूना आपण शेतकरी गरीबांचे असे अफ़ाट कल्याण करून बसलो; त्याच्या पत्ता खुद्द राहुलनाही लागणार नाही. तीच तर राहुलची जादू असेल ना?
न्युझिलँड़ घटनेवरील तुमच्या लेखाच्या प्रतिक्षेत आहे.
ReplyDeleteनेहमीप्रमाणे हा पण लेख मस्तच!
ReplyDeleteहा हा हा..भाऊसाहेब, एकदम मस्त
ReplyDelete😂😂😂😂
ReplyDeleteएकदम मस्त लेख.राहुल उर्फ पपुची चांगलीच फिरकी घेतली.
Deleteअस्सल अभ्यासपूर्ण उत्तर पप्पू ला
Deleteअप्रतिम
ReplyDeleteभाऊ, कालच मी तुमचा दादरचा सेशन attend kela. Must वाटलं. वरील लेख अप्रतीम
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteमस्त जमला आहे लेख...
ReplyDeleteजे न देखे दिनेश ( सूर्य )
ReplyDeleteते देखे गणेश ( भाऊ )
या राहुल गांधीला निवडणुकीनंतर जाहीरपणे अथवा लोकसभेत सर्वांसमोर कानशिलात फटकावयाला हवे. त्याचा बाष्कळपणा भरपूर बघितला.पण आता नाही. डोळा मारला तरी त्याला तिथेच फटकावयाला हवे. या व्यक्तीच्या मूर्खपणाच्या कथा वाचून त्याला मनो रुग्णालयातच पाठवायला हवा. या राहुलच्या मागे हातात फाईल घेऊन फिरणाऱ्या सुरजेवाला , मोतीलाल वोरा , ज्योतिरादित्य शिंदे याना बघितले की खांग्रेसच्या राजकारणातील ' चाटुकारितेची ' कशी सीमाच नाही हेही कळते.
ReplyDeleteSir, just wait for few days the same Rahul would come up with another theory that Anil Ambani astutely transferred (don't ask how) 30, 000 crore rupees into Mukesh Ambani's account. Out of this the latter has paid 500 crore. The remaining would be paid by in small installments to Anil. See how clever these three are... ������
ReplyDeleteभाऊ वस्तुस्थिती सांगितलीत
ReplyDeleteहे कुणाच्या लक्षातच आल नाही.काश मोदी हे उत्तर सभेतुन लोकांना देउ शकले असते.
ReplyDelete👌👌
ReplyDeleteनेहमी प्रमाणे सखोल अभ्यास आणि आमच्या ज्ञानात भर
ReplyDeleteएक विनंती आणि आग्रह थोडं राज ठाकरेंच्या राजकीय वाटचाली बद्दल लिहा प्लिज
प्रभु प्रणाम!
ReplyDeleteकानशिलात हानायचा घाऊक मक्ता आपल्याकडेच.
वाजवा मस्त.
वाहवा ! भाऊ मस्त !!
ReplyDeleteलोकसत्तेने म्हणूनच अनिल अंबानींनी पैसे भरले अशी बातमी लिहिली......मुकेश ने पैसे दिले हे गाळले !
वा ,भाऊ ,मस्त !!
ReplyDeleteम्हणूनच लोकसत्तेने अनिल अंबानींनी पैसे भरल्याचे लिहिले...
मुकेश ने पैसे दिल्याचे लिहिलेच नाही
मला लोकसत्ता वाचून कंटाळा आला म्हणून मी तो बंद केला गेल्या महिन्यापासून
Deleteसुंदर, कुणीतरी हे नेऊन राहुल च्या तोंडावर मारावे
ReplyDeleteReality fool ambani brothers.
ReplyDeleteThey should keep rahul as advisor for there business .
भाऊ, या बावळट राहुल ला त्याच्या पक्षातील लोक कसे सहन करीत असतील? का त्यांच्या रक्तातच गुलामगिरी भिनली आहे?
ReplyDeleteत्याला कुठे तोंड दाखवायला जागा राहू द्या ना भाऊ...
ReplyDeleteMi pan hach vichar karat hoto
ReplyDeleteVery strange kuthlyahi news channel ne yachi dakhal ghetli nahi
सर मुद्देसूद लेखन जबरदस्त ज्ञान
ReplyDeleteविनंती आहे की राज ठाकरे यांच्या सध्याच्या राजकीय धोरणा बद्दल लिहावे
आपण नकळत अपरिपक्व चिरतरूण नेतृत्वाला जास्त महत्व देतोय असं वाटते. असो, विडंबन अत्यंत योग्य मांडले.
ReplyDeleteBhau you made a mistake Rahul also does not know exactly how mush money Modiji has given Anil Ambani. In on of his speeches he once said it was 30000 crores then 40000 crores and then 45000 crores. This tells me that if clever Rahul does not know how much cash Modiji has given away how can Anil know.
ReplyDeleteमोदींजींनी खिश्यात तीस हजार कोटी कोंबलेले असतांना अनील अंबानी फक्त ५०० कोटीसाठी भावाकडे गयावया करतो हे बघीतले की नोटाबंदीच्या काळात रिकामा खिसा उलटवून दाखवणार्या राहूलची नक्कीच आठवण येते ! बिच्चारे दोघे !
ReplyDeleteसुंदर ब्लॉग ! पण अनिल राहुलवर प्रतिक्रिया का देत नाही ?
ReplyDelete👌👌👌🙏
ReplyDeleteRafale dealing not yet completed, it is on going process.
ReplyDeleteDear Readers Bhaunche you tube var think bank and Bhaucha Dhakka he don chanel var video uplabdha aahet.
ReplyDeleteमाहितीसाठी धन्यवाद...
DeleteTyavr kahi sankuchit vruttiche lok atantya ghanredya comment karat aahe
DeleteMast thoklat!
ReplyDeleteMast thoklat!
ReplyDeleteइथे बरेच जण बरेच दिवस झाले राज ठाकरे बद्दलच्या लेखविषयी वाट पाहत आहे. पण मला असं वाटतंय कि भाऊ काका निवडणूक झाल्यावरच त्यावर लेख लिहतील.
ReplyDeleteHo Bhau rahulchya hatat fakt maik dyaycha te batatyache sonech kartil
ReplyDeleteभाऊसाहेब.
ReplyDeleteआपण व आपले लिखाण खरोखरीच छान वाटत.
धन्यलाद
अप्रतीम लेख.
ReplyDeleteअप्रतिम भाऊ...!!!👌
ReplyDeleteभाऊ, या विषयावर जेटली लोकसभेत बोलत असताना या राहुलचे हावभाव व चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहताच लक्षात येते सगळे. मुख्य विरोधी पक्षाचा अध्यक्ष कसा नसावा याचा वस्तुपाठ आहे हा मनुष्य.
ReplyDeleteमस्त लेख .👌👌
ReplyDeleteमुख्य विषय असा की राफेल विमानाच्या नेमक्या किमती काय, कितीनं वाढल्या, आणि कां वाढल्या. ही माहिती गुप्तता कायद्यानुसार लोकांसमोर ठेवता येत नाही असं सरकार म्हणालं. ही माहिती जाहीर झाली तर भारताच्या सुरक्षिततेला धोका आहे असं सरकारचं म्हणणं आहे.
ReplyDeleteजनतेला, विरोधी पक्षांना भारत सरकारनं राफेल खरेदी करायला हवं आहे, त्या खरेदीला कोणाचाही विरोध नाही. त्या विमानात शस्त्रास्त्रं ठेवायची आणि टाकायची काय सोय आहे हे जाणून घ्यायलाही सामान्य माणसाला रस नाही. त्याला रस येवढ्याच गोष्टीत आहे की खरेदी कशी झाली.