Thursday, April 25, 2019

यक चतुर नार, बडी होशियार

Image result for padosan sunil dutt mehamood

१९७० च्या दशकातला एक गाजलेला सिनेमा आठवला. ‘यक चतुर नार’ हे गाणे त्यात खुप गाजले होते, तोच तो! त्यात मेहमूदने एक मद्रासी गायन नृत्य मास्टरचे पात्र छान रंगवलेले होते आणि सुनील दत्तने गावंढळ पहेलवान रंगवला होता. दोघेही सायराबानू या सुंदरीच्या प्रेमात पडलेले असतात आणि एकमेकांवर सतत कुरघोडी करण्याच्या नादात असतात. अशाच एका प्रसंगात एका बगिच्यामध्ये सुनील दत्त या मद्राशाला गाठतो आणि कुस्तीचे दोन हात करण्याचे आव्हान देतो. त्याच्या अंगावर चाल करून जाऊ लागतो. तेव्हा आपल्या दाक्षिणात्य हिंदीत बोलताना मेहमूद त्याला धमकावतो. ‘भोला, तूम आगे मत आना. भोला, तूम आगे मत आना.’ पण सुनील दत्त पुढे जातच रहातो तेव्हा मेहमूद त्याला ताकीद देतो, ती मोठी मजेशीर होती. ‘भोला तुम आगे आयगा? तुम आगे आयगा? तो हम पिछे चला जायगा.’ आजही त्या चित्रपटातला तो प्रसंग आठवला मग हसू येते. आज हे लिहीताना वाराणशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो आहे आणि त्याच्याच बातम्या सगळ्या वाहिन्यांवर झळकत आहेत. त्यातच सकाळपासून वाराणशीत मोदींना कॉग्रेसतर्फ़े आव्हान कोण देणार, अशीही एक वेगळी चर्चा चालू होती. कारण काही दिवसांपुर्वीच कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भगिनी प्रियंका वाड्रा यांनी तिथे जाऊन मोदींना आव्हान देण्याची भाषा केलेली होती. मात्र त्याला कॉग्रेस पक्ष दुजोरा देत नव्हता, की तिथून अन्य को्णा कॉग्रेस उमेदवाराच्या नावाची घोषणाही केली जात नव्हती. त्यामुळे माध्यमात हा खुसखुशीत विषय झाला व रहस्य बनलेले होते. पण आज दुपारीच कॉग्रेसने तिथूनच मागल्या वेळी तिसर्‍या क्रमांकावर पराभूत झालेल्या अजय राय यांना उमेदवारी दिल्याची घोषणा करून टाकली आणि ‘पडोसन’ चित्रपटातला हा प्रसंग आठवला. हे रहस्य झालेच आहे तर निदान आणखी दोन दिवसही कॉग्रेस त्याचा सस्पेन्स टिकवायचीही हिंमत हरवून बसली आहे काय?

याची सुरूवात कुठून झाली? अमेठीत भावाच्या व रायबरेलीत आईच्या प्रचाराला फ़िरताना प्रथमच खुलेआम राजकारणात आलेल्या प्रियंका फ़ुशारल्या होत्या. कोणीतरी त्यांना विचारले, पक्षाच्या सरचिटणीस झालात तर रायबरेलीतून निवडणूक लढवणार काय? तर या कन्येने उर्मटपणे उलट प्रश्न केला, वाराणशीतून लढू काय? तिथून मग या चर्चेता सुरूवात झाली. माध्यमे व पत्रकारांना तिखटमीठ लावण्याची हौस असतेच. त्यामुळे मोदी विरुद्ध प्रियंका, अशी लढत दाखवण्याने वावड्या उडवण्याला ऊत आला. प्रत्यक्षात त्यात दम नव्हता. कारण आज कॉग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी अपेशी ठरलेले आहेत आणि त्या पक्षाला नव्याने उभारी घेण्यासाठी कोणीतरी खमक्या आक्रमक नेत्याची गरज आहे. राजकारण अत्यंत गंभीर पेशा असून संयमी वक्तव्य करणाराच नेता यशस्वी होत असतो. त्यात राहुलपेक्षा प्रियंका संयमी आहे. म्हणून तिच्याविषयी अनेक कॉग्रेसवाले व त्यांचे समर्थक आशावादी आहेत. सहाजिकच हा पत्ता कॉग्रेसने जपून वापरावा, अशीच त्यांची अपेक्षा आहे. तो आताच वाराणशी येथे वापरला तर पराभवाने सुरूवात उलटण्याचे भय होते. पण गंमत म्हणून प्रियंकाने उच्चारलेले शब्द तिच्यासह पक्षालाही गळफ़ास बनून गेले. त्यामुळे नंतरच्या काळात तोच प्रश्न प्रियंका जातील तिथे तिथे विचारला जाऊ लागला. पण भाजपाच्या गोटात खळबळ माजवण्यासाठी त्यावर पडदा पाडण्याचे कॉग्रेसनेही टाळले. त्यामुळे चर्चा वाढत गेली. मग प्रियंकाचा पती रॉबर्ट वाड्रालाही प्रश्न विचारला असता त्याने ती सज्ज असल्याची ग्वाही दिली. वायनाडला पत्रकारांशी बोलताना प्रियंकानेही आपण सज्ज असलो तरी पक्षाध्यक्षाने निर्णय घ्यावा असेही सुचवले. त्यामुळे मोदी विरुद्ध प्रियंका, या चर्चेला जोर चढला. तो अजूनही चालू राहिला असता. पण खुद्द कॉग्रेसनेच प्रियंकाचा फ़ुगा फ़ोडून टाकला आणि तोही चुकीच्या मुहूर्तावर. गुरूवारी तशी घोषणा करायची काय गरज होती?

मोदींचा गुरूवारी वाराणशीत रोडशो होता आणि शुक्रवारी ते तिथे उमेदवारी अर्ज भरणार होते. तर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ह्या रहस्यावरचा पडदा कायम राखण्याने काही बिघडणार नव्हते. निदान भाजपाच्या गोटात तरी मळमळ चालू राहिली असती. वाराणशीत ‘हरहर मोदी’ दुमदुमत असताना गळ्यात अडकलेला का्ट्यासारखी प्रियंकाची उमेदवारी होती. पण मोदी वाराणशीत रोडशोसाठी पोहोचण्यापुर्वीच प्रियंकाची माघार घोषित करणे, हा निव्वळ राजकीय मुर्खपणाच होता. कॉग्रेसने आजकाल त्यात खास कौशल्य प्राप्त केले आहे. रोडशोपुर्वीच प्रियंका तिथे लढत नसल्याची घोषणा म्हणजे मोदींच्या शक्तीप्रदर्शनाला बळ देणेच नाही काय? म्हणजे आधी काही दिवस आपण येतोय, आपण लढतोय, अशी हुलकावणी प्रियंकानेच द्यायची आणि प्रत्यक्ष मोदी वाराणशीत अर्ज भरायला येताना तिथून काढता पाय घेतल्याची घोषणा करायची. ही कुठली व कसली रणनिती असू शकते? हुलकावणी दिली आहेच, तर निदान त्यातील उत्सुकता शिगेला पोहोचण्यापर्यंत तरी संयम हवा ना? पडोसनच्या मेहमूदने जशी आवाज चढवूनच माघार घेण्याची गर्जना करावी, त्यातलाच हा प्रकार नाही काय? म्हणजे लढण्यापुर्वीच प्रियंकाने पळ काढला, असा प्रचार करण्यासाठी जणू भाजपाच्या हाती कोलित देण्याचा पराक्रम कॉग्रेसने केलेला नाही काय? आधीच राहुल वायनाडला जाताना अमेठीतून पळाल्याचा प्रचार चालू आहे. त्यातच आता वाराणशीतून लढाईपुर्वीच प्रियंकानेही पळ काढल्याच्या घोषणा करायला कॉग्रेसने खाद्य पुरवले आहे. तेही ऐन भाजपावाले रोडशोच्या तयारीत व जोशात असताना? एक दिवस कळ कशी निघत नाही? आपला उमेदवार कॉग्रेस शनिवारीही जाहिर करू शकली असती आणि प्रियंका येणार किंवा नाही, अशा धाकधुकीत भाजपाला आणखी दोन दिवस ठेवण्यात काय अडचण होती? हा सगळा प्रकारच पोरकट होत चालला आहे.

राहुलपेक्षा प्रियंका चतूर व चाणाक्ष असल्याचा अनेकांचा समज आहे आणि तोंडावर संयम असल्याने निदान तसे वाटतही होते. पण वाराणशीत लढण्याची भाषा अकारण करून प्रियंकांनीही आपण राहुलची सख्खी बहिण असल्याचा दाखलाच दिलेला आहे. जर लढायचे नव्हते किंवा हुलकावणीच द्यायची होती, तर निदान परिणाम साधला जाईल इतकी तरी काळजी घेतली पाहिजे ना? मला वाराणशीत लढायला आवडेल. मी वाराणशीत लाढायला सज्ज आहे. असली भाषा करणार्‍यांना कोणा पक्षाध्यक्षाने तिकीट देण्याची गरज नसते. प्रियंकाने उभे रहायचा हट्ट केला तर राहुल तिला अडवू शकले नसते. तात्काळ तिथल्या व भोवतालचा पक्ष कार्यकर्ताच तिच्या भोवती एकवटला असता. पण आता मोक्याच्या क्षणी माघारीचे पाऊल उचलून प्रियंका व कॉग्रेस पक्षाने अवघ्या पुर्वांचल म्हणजे पुर्व उत्तरप्रदेश व बिहारच्या काही भागामध्ये आपण मोदींना घाबरलो असल्याचा संदेश मात्र पोहोचवला आहे. रोडशोचा भव्यदिव्य कार्यक्रम असताना तिथून प्रियंकाची अघोषित माघार जाहिर करण्याने, मोदींचे काम  फ़क्त सोपे केलेले नाही. तर ज्या पुर्व उत्तरप्रदेशाची जबाबदारी तिच्यावर सोपवलेली आहे, तिथेच कॉग्रेस पक्षाने प्रियंकाला तोंडघशी पाडलेले आहे. कारण मोदींचा वाराणशीतला रोडशो पुर्वांचलातील ३५-४० मतदारसंघांना प्रभावित करण्यासाठी होता आणि तिथे त्यांनी पाऊल टाकण्यापुर्वी़च कॉग्रेसच्या नव्या लढवय्या प्रियंकानी पळ काढल्याचे चित्र यातून तयार झालेले आहे. थोडक्यात आव लढायचा, आक्रमकतेचा आणायचा आणि प्रत्यक्षात माघार घ्यायची; असा जो मेहमूदने ‘पडोसन’मध्ये विनोद केला होता; त्याचीच पुनरावृत्ती राहुल व प्रियंकाने गुरूवारी वाराणशीत करून टाकली. योगायोगाने वाराणशीला भोलेनाथाची नगरी म्हणतात आणि प्रियंकानेही ‘भोला’ पुढे येताना बघूनच पळ काढलेला आहे. त्यातून निकालानंतर व भविष्यात कॉग्रेसच भवितव्य काय असेल, त्याचा अंदाज येऊ शकतो.  योगायोग असा, की त्याच चित्रपटातलीक गाणे इथे चपखल वाटते.

एक चतूर नार, बडी होशियार
अपनेही जाल मे फ़सत जात
हम हसत जात अरे हा हा हा.........

11 comments:

  1. भाऊ पडोसन मधिल गाणे अगदी चपखल पणे या
    ठिकाणी बसते.पण या नारीला चतुर तरी कसे म्हणता येईल ?या बाबतीत हे दोघे सख्खे बहीण भाऊ शोभुन दिसतात. प्रियांकाने मोक्याच्या क्षणी कच खाऊन माघार घेतली व मोदीं विरुद्ध लढत एकदम एकतर्फी व चुरस नसलेली झाली आहे. सगळी मजाच निघुन गेली.मागच्या निवडणुकीत निदान थोडे वलय व टक्कर देऊ शकतील असे केजरीवाल तरी होते. काँग्रेस पक्षाने मागच्या वेळचे अजय राय यांना मोदींच्या विरोधात ऊभे केले आहे यातच काँग्रेस ने हार मानली हे जाणवते.आज वाराणसी येथे मोदींचा रोड शो आहे व त्याचा परीणाम उरलेल्या निवडणुकीत होईल व त्याचा पुरेपुर फायदा भाजपला मिळेल हे आता स्पष्ट आहे.

    ReplyDelete
  2. BHau
    Be on ground. She is nowhere in comparison to Modi & kids are aware of it too. It all Paid leftist media Propaganda & common man is too wise than these people as you use to say.

    What the hell she has done for varanasi / for any place in this country? Do you think people are so dumb that they will believe it as media showing her as a challenge to Modi, People will buy that non sense?

    This article of yours in contradicting with the correct analysis you have about conman mans understanding about politics & politicians.

    I dont understand why are you giving so much footage to her? Are you caught by the Leftist media propaganda?

    Do you mean to say that people in Varanasi who has seen the development in last 5 yrs. will ignore that just because Priyanka whose nose matches with her grandma's nose is contesting against Modi?

    Dont expect such childish thing from you. any ways. God knows what made you to think like this & write this article?

    ReplyDelete
  3. भाऊ, लेख वाचायला मजा आली, पराभूतांची मानसिकता तुम्ही अचूक उलगडून दाखवलीत!

    ReplyDelete
  4. असही प्रियका गांधीना मोदी विरोधात लढण्यात जड गेले आसते असे आजचा रोड शो बघून वाटते.पहिल्याच निवडणूकीमध्ये हार ही चुक हि प्रियका गांधीना व कांग्रेसला महागात पडली असती.

    ReplyDelete
  5. " विनाशकाले विपरित बुध्दी "
    दुसरं काय म्हणायचं ?

    ReplyDelete
  6. हाहाहा....
    अगदी समर्पक आणि चपखल उदाहरण आहे.

    ReplyDelete
  7. उत्तम लेख
    श्री. मोदींना प्रश्न विचारणारी मीडिया मात्र राहुल गांधींना मात्र प्रश्न विचारत नाही. ₹72000 च्या न्याय योजनेला लोकांचा काय प्रतिसाद आहे? कारण इतक्या वर्षांचा कॉंग्रेसचा कारभार पाहता कोणी विश्वास ठेवेल असे वाटत नाही. तसेच प्रियांका वाद्रा यांचे काम काय? फक्त नाक आज्जी सारखे म्हणून लोक त्यांना मत देतील काय?
    अमेठी मध्ये राहुल गांधींनी केलेल्या विकास कामांचा फोटो पाठव असे मी एका काँग्रेस च्या माणसाला विचारले तर तो अजून फोटो पाठवतोय. फक्त मीडियाला हाती धरून निवडणूक जिंकता येईल काय?

    ReplyDelete
  8. Binance transaction timeout|Binance Support Number
    Want to fix Binance transaction timeout? Are you running out of time while making any transaction? Transaction timeout errors are quite difficult to understand so in order to get the access to solutions; you can take utmost assistance from the professionals by dialing Binance Support Number +1877-209-3306 . The professionals are always at your service and you should contact them to solve out your problems related to transaction timeout errors or other errors in Binance.
    For more info: https://www.cryptophonesupport.com/exchange/binance/

    ReplyDelete