Saturday, May 18, 2019

मीडिया झुकती है

Image result for modi kedarnath

आज सकाळी म्हणजे सतराव्या लोकसभेच्या सातव्या अंतिम फ़ेरीच्या मतदानाला अवघे २० तास बाकी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट केदारनाथला पोहोचले होते. सकाळी जाग आल्यानंतर टिव्ही चालू केला, तर पहिल्याच वाहिनीवर त्यांचे दर्शन झाले. विनाविलंब एक एक वाहिनी बदलत गेलो आणि सर्वत्र फ़क्त केदारनाथ म्हणून वाहिन्या मोदींचे दर्शन घडवित होत्या. तिथला परिसर वा तपशीलापेक्षा मोदींच्या ताफ़्याभोवतीच सगळा मीडिया घुटमळत होता. त्यामुळे टिव्ही बंद केला. तासाभराने पुन्हा टिव्ही चालू केला, तरीही बहुतांश वाहिन्यांवर नमो प्रक्षेपणच चाललेले होते. हा प्रकार बघितल्यावर एकूण माध्यमांच्या अविष्कार स्वातंत्र्याची कींव करावीशी वाटली. मला एकदम सात वर्षापुर्वीची गुजरात विधानसभा निवडणूक आठवली. तेव्हाही मोदी महिनाभर सद्भावना यात्रा म्हणून राज्यभर फ़िरत होते आणि अशाच एका मिरवणूकीत बसमधून मुख्यमंत्री मोदी जनतेला अभिवादन करीत असताना, त्यांच्या पायाशी बसून तेव्हाचा स्टार पत्रकार राजदीप सरदेसाई त्यांची मुलाखत घ्यायला धडपडत होता. त्यांने विचारलेल्या प्रश्नांना मोदी उत्तर देतच होते असेही नाही. जो प्रश्न पसंत नसायचा, त्याला बगल देऊन मोदी जनतेला अभिवादन करण्यात गर्क व्हायचे आणि अखेरीस कंटाळून राजदीपला नवा प्रश्न विचारावा लागत होता. तेव्हा राजदीप एका मोठ्या नेटवर्कचा संपादक होता आणि त्याची लायकी आपल्या पायाशीही बसायची नाही, इतके त्याच्याच कॅमेराला वापरून मोदींनी जगाला दाखवून दिलेले होते. सात वर्षानंतर एकूणच भारतीय मीडियाची त्यापेक्षा वाईट दुर्दशा होऊन गेली आहे. ज्या माणसाला संपवण्यासाठी ल्युटीयन्स दिल्लीपासून गल्लीबोळातले संपादक विचारवंत अखंड १७ वर्षे राबले, त्यांना या एका माणसाने झुकवले आहे. याला दुनिया झुकती है म्हणायचे, की मीडिया झुकती है म्हणायचे?

२००७ पासून मोदींनी माध्यमे व पत्रकारांवर बहिष्कार घालून आता बारा वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मोदी मुलाखत देत नाहीत, पत्रकार परिषद घेत नाहीत. पत्रकारांना सामोरे जाण्याची त्यांच्यात हिंमत नाही, अशी टिका अशा सर्वकाळात होत राहिली. पंतप्रधान म्हणून त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, किंवा पत्रकारांच्या प्रश्नाला मोदी घाबरतात, याचाही खुप गवगवा झालेला आहे. मग तेच पत्रकार त्याच मोदीला प्रक्षेपित करायला इतके उतावळे कशाला असतात? त्याचे उत्तर मात्र कोणी देत नाही. किंबहूना असा प्रश्न माध्यमांना वा पत्रकारांना कोणी विचारत नाही. आताही लोकसभा निवडणूकीत अखेरच्या फ़ेरीतला प्रचार संपलेला असताना मोदी केदारनाथला गेले आणि अर्धा दिवस त्यांनाच विविध वाहिन्या कशाला दाखवित होत्या? जो माणूस इतका भित्रा आहे किंवा माध्यमांना भीक घालत नाही, त्याच्या मागे असे एकाहून एक दिग्गज पत्रकार वा माध्यमे कशाला भिकार्‍यासारखी पळत असतात? कधीतरी माध्यमातल्या दिग्गजांनी किंवा अभ्यासक म्हणून मिरवणार्‍यांनी याही प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे. मोदींची तुलना प्रियंकांनी अभिनेत्याशी केली. पण खुद्द प्रियंकांचे काम तरी वेगळे काय आहे? त्यांनाही बघायला येण्यापलिकडे गर्दी कशाला जमते? मोदींना बघायला वा ऐकायला गर्दी लोटते म्हणून ते अभिनेता असतील, तर प्रियंकांचे कर्तृत्व कितीसे वेगळे आहे? मुद्दा इतकाच, की मोदींवर टिकेचे आसूड ओढण्याची एकही संधी न सोडणार्‍यांना त्यांचेच प्रक्षेपण कशाला करावे लागते? त्याच ‘उद्धट उद्दाम, नेत्यासमोर मीडिया इतका कशाला लाचार झालेला आहे? त्याच्याकडे पाठ फ़िरावून वाहिन्या किंवा माध्यमे आपला कारभार का चालवू शकत नाहीत? रोज उठून मोदींचे दौरे भाषणे कशाला दाखवावी लागतात? तसे नाहीतर मोदींना शिव्यागाळी तर दाखवाव्याच लागतात ना? मोदीशिवाय टिव्ही किंवा माध्यमे चालू शकत नाहीत काय?

कुठल्याही संपर्क व्यवहारात लोकांना आवडेल तेच द्यावे लागते आणि ज्याला प्रतिसाद मिळेल, तेच प्रदर्शित करावे लागत असते. ही त्या व्यापारात गुंतलेल्यांची लाचारी असते. मोदी ही त्यांची अशीच लाचारी झाली आहे. किंबहूना मोदींनी या मंडळींना तसे लाचार करून टाकलेले आहे. कोणाला आठवत असेल, तर मागल्या लोकसभेच्या निवडणूकीत जिंकण्यापुर्वी मोदींनी अवघा मीडिया लाचार अगतिक करून टाकला होता. त्यांनी आधी एएनआय नामक वृत्तसंस्थेला प्रदीर्घ मुलाखत दिली आणि ती सर्व वाहिन्यांना उपलब्ध होती. सहाजिकच ज्यांनी तात्काळ दाखवली, त्यांना प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद बघून बाकीच्याही वाहिन्यांनी फ़टाफ़ट प्रक्षेपित करून टाकली. काहींनी अनेकदा दाखवली. मग तो प्रतिसाद बघून मोदी म्हणजे हे टीआरपी असल्याचे सिद्ध झाले आणि वाहिन्यांच्या मार्केटींग विभागाने संपादक विभागाला कान धरून मोदींच्या मुलाखती मिळवण्यासाठी कामाला जुंपले. पण कोणाला मुलाखत द्यावी किंवा नाही, याची सक्ती करता येणार नव्हती. परिणामी मोदी मुलाखत देतील यासाठी कुठलीही लाचारी करायला वाहिन्या सज्ज झाल्या. एका एका वाहिनीच्या आपण निवडलेल्या दुय्यम पत्रकाराशी मोदी बातचित करीत गेले. केवळ त्या एका खेळीतून त्यांनी प्रत्येक वाहिनीच्या स्टार संपादक पत्रकाराला नामशेष करून टाकले. त्यातून मोदींनी मीडियाला एक धडा शिकवला, तो असा की मुलाखतकार स्टार नसतो, तर मुलाखत देणार्‍याला बघायला ऐकायला लोक उत्सुक असतात. तिथेच एक गोष्ट साफ़ झाली. मोदी मुलाखत द्यायला वा पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरत नाहीत, तर आपली अवहेलना वा भेंबेरी उडवायला उतावळे झालेल्यांशी त्यांना सहकार्य करायचे नव्हते. पण या लढाईत त्यांनी धुर्तपणे पत्रकारांना त्यांच्याच सापळ्यात अलगद अडकावले. तिथून मग ही लाचारी अधिकाधिक बळावत गेली.

मोदी या व्यक्तीविषयीचे गुढ किंवा औत्सुक्य मुळातच त्यांच्यावर झालेल्या खोट्यानाट्या व अतिरेकी आरोप टिकेतून आलेले आहे. गुजरात सारख्या मध्यम आकाराच्या राज्याचा मुख्यमंत्री देशव्यापी जनतेच्या औत्सुक्याचा विषय बनवणे मोदींना शक्य नव्हते. पण भाजपा व संघाला कोंडीत पकडण्यासाठी दिल्लीत बसलेल्या व त्यांच्याच देशभर पसरलेल्या बगलबच्च्यांनी दंगलीचे निमीत्त करून मोदी नावाचा बागुलबुवा उभा केला. अन्यथा आजही ओडिशाच्या नविन पटनाईक यांच्याइतकेच नरेंद्र मोदीही भारतीयांना अपरिचीत राहिले असते. त्या माणसाला बघायची वा ऐकण्याची उत्सुकता अन्य राज्यातल्या कोणालाही जाणवली नसती. पण एकदा अशी उत्सुकता निर्माण झाली, मग त्याला टाळून माध्यमांना पुढे सरकता येत नाही. त्यातही संबंधित व्यक्ती चतूर असेल तर धुर्तपणे अशा उत्सुकतेचा आपल्या मतलबासाठी वापर करून घेत असते. मोदी तितके धुर्त होते आणि त्यांनी पुढल्या काळात आपल्या विरोधातले पत्रकार व राजकीय पंडितांना आपल्याच प्रसिद्धीसाठी झकास वापर करून घेतला. या लोकसभेचा प्रचार संपत असताना राहुल गांधींनी अतिशय बालीश विधान केले आणि ते अजूनही माध्यमांना उमजलेले नाही, ते म्हणजे ‘मोदी नावाची कल्पना आपण उध्वस्त’ केल्याचा राहुलचा दावा. त्यात किंचीतही तथ्य असते, तर दुसर्‍या दिवशी केदारनाथला पोहोचलेल्या मोदींची अथक प्रसिद्धी वाहिन्यांना करावी लागली नसती. मोदींवर शिव्याशाप वा टिकेचा भडीमार करून त्यांना संपवता येत नाही. उलट त्यातूनच मोदी अधिक मोठे होतात किंवा झाले; एवढेही राहुलना आजतागायत समजलेले नाही. अन्यथा त्यांनीही मागल्या सहा महिन्यात मोदींची प्रतिमा अधिक आकर्षक व लोभस बनवण्यास हातभार लावला नसता. किंवा केदारनाथापेक्षा मोदीच ‘दर्शनीय’ कशाला झाले असते? मीडिया झु्कती है, झुकानेवाला चाहिये, हे राहुल गांधींना बहूधा २०२४ साली उमजेल. माध्यमांना बहुधा कधीच समजणार नाही.

24 comments:

  1. मार्मिक आणि चपखल विश्लेषण ! भाऊ अगदी आमच्या मनातील भाव आपण सुयोग्य शब्दात मांडलेले पाहून आम्ही थक्क झालो ! आपण सर्व नशीबवान आहोत कि खूप चांगला देशासाठी तळमळीने काम करणारा नेता आपल्यासह आहे आणि भारत समर्थ आणि शक्तिशाली होताना आपल्याला बघायला मिळत आहे ! भाऊ चांगले विश्लेषण वाचायला मिळाले ,धन्यवाद !

    ReplyDelete
  2. खरय भाउ.केवळ टिवीच नव्हे तर तिथुन हाकलुन दिलेले पत्रकारही यु ट्युब वा इतरत्र मोदींना शिव्या घालुनच views मिळवतात.इतके मोदी अपरीहार्य झालेत.उद्या बद्रीनाथ दर्शन आहेच.तो एक प्रचारच आहे मोदींना तो फुकटात करुन मिळेल.आज पासुनच बातमी चालुय.

    ReplyDelete
  3. श्री भाऊ १०० % खर लिहिलंय खरी मजा २३ नंतर सुरू होईल

    ReplyDelete
  4. काल तर त्यांनी मिडीयाची अशीत फिरकी घेतली,मोदींची मौन पत्रकार परीषद खुपच गाजली.उत्तरे दिली ्सती तर एवढी नसती गाजली.कारण प्रश्न तेच ठरावीक आणि त्यांची उत्तरे पण तशीच

    ReplyDelete
  5. यथार्थ विश्लेषण!👍

    ReplyDelete
  6. मीडियावाले जर खरे शहाणे असतील तर प्रेक्शकांना मोदींचा ओव्हरडोस द्यायचा आणि मोदींची लोकप्रियता घटवायची असा डाव असू शकतो.

    ReplyDelete
  7. True.while watching tv in the morning I was wondering the same if you hate the man so much then why give so much attention. Modi is master of strategy and electoral management. Despite the official timelines for campaigning is over. He smartly used the very media who attacked for various issues to carry forward the strong campaign message.

    ReplyDelete
  8. अप्रतिम विश्लेषण! भाऊंनु तुम्ही पण एखाद यूट्यूब चॅनेल चालू करावं त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचू शकेल.

    ReplyDelete
    Replies
    1. youtube=भाऊचा धक्का

      Delete
    2. भाऊचा धक्का या नावाने यूट्यूबवर शोधा.

      Delete
  9. Strongest and powerful MODI JI is one and only requirement and need of hour for our country

    ReplyDelete
  10. अगदी खरं.👌👌👍🙏🙏

    ReplyDelete
  11. सुंदर विश्लेषण ... चपखल उदाहरणं ...

    ReplyDelete
  12. Excellent. Can I get it copied with your permission ?

    ReplyDelete
  13. लेखातील सर्व प्रतिपादन कोणालाही मान्य होण्यासारखे आहे .फक्त ,इतिहासाच्या पाऊलखुणा पहिल्या तर वर्तमानपत्रे किंवा दूरदर्शन वाहिन्या यांच्यावर सत्ताधारी दबाव आणू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घेणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  14. प्रमोद गानूMay 19, 2019 at 12:15 AM

    खूप खरे आहे.

    ReplyDelete
  15. विरोधकांच्या मुद्द्याला आपल्यासाठी सकारात्मक आणि विरोधकांना निरस्त्र कसे करायचे हे मोदीजींसारखे कोणालाही जमणार नाही तितकेच त्याचे सटीक विष्लेशण भाऊं शिवाय कोणालाही जमणार नाही...
    भाऊ, अप्रतिम...

    ReplyDelete
  16. I still have doubt on Modi's credibility or achievements as PM.. but this man is very shrewd,bold, smart, cunning and very confident. He works on his own strategies and that is the secret of his success. He listens to the consultants and information sources but the decisions are of his own. he is very hard working, very strongly determined and on political front he does a lot of homework. He cleverly diverted attention from his failures. I at least get a satisfaction that some outsider is not running this country by remote control. No doubt he will be a PM again but now he needs to sincerely focus on solving issues in agriculture and farming sector, rejuvenation of water resources, agro-processing industries and generation of employment. A nation can not be strong just by weapons and strong defense forces. Each of the citizen needs to be empowered.

    ReplyDelete
    Replies
    1. इंग्रजी मध्ये लिहिण्याचा उद्देश काय आहे तुमचा.
      आम्हाला पण इंग्रजी जमते पण शहाणपणा दाखवण्यासाठी बोलत नाही जिथे गरज आहे तिथेच बोलतो.अभिमान आहे मराठीचा जसा जर्मन जपेनिस स्पॅनिश लोकांना आहे त्यांच्या भाषेचा.

      Delete