Friday, May 24, 2019

लहानपण देगा देवा

Image result for modi patnaik

तुका म्हणे बरवे जाण ।
व्हावे लहानाहून लहान
महापूरे झाडे जाती ।
तेथे लव्हाळ वाचती

तशी आपल्या देशात मोठी संतपरंपरा आहे आणि त्यावरच आपला भारतीयांचा पिंड पोसलेला आहे. अर्थात तो पिंड पुरोगामी-प्रतिगामी नाही. किंवा आयडीया ऑफ़ इंडिया असले भजन कायम गाणार्‍यांच्या ‘भंगवाणी’वर जोपासलेला नसल्याने आपल्याला तुकोबांचे शब्द वारंवार आठवतात. त्यांनी जगताना अहंकाराने गर्वाने उन्मत्त होऊ नये असे समजावताना केलेले हे निरूपण आहे. अहंकार माणसाला किती शक्तीशाली असला तरी रसातळाला घेऊन जातो, असे शेकडो वर्षापुर्वी सांगून ठेवलेले आहे. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातल्या अज्ञ अडाणी माणसालाही वृक्ष आणि लव्हाळ्यातली ही गमतीशीर गोष्ट ठाऊक असेल. पण पा़श्चात्य कथापुराणांवरच ज्यांचा बौद्धिक पिंड पोसलेला आहे, त्यांना अशा अभंगाचे शब्द आठवतील. पण त्यातला आशय विषय कधी मेंदूत शिरणार नाही. मग असे लोक विवेचन करणारे असोत, किंवा मोठ्या वर्तमानपत्रात अग्रलेख लिहीणारे असोत. त्यांना वादळात उन्मळून पडलेले वृक्ष दिसू शकतात. पण त्यातच टिकून राहिलेली लव्हाळी बघायलाही सवड मिळत नसते. मग अशा शहाण्यांना एकाहून एक मोठे भव्यदिव्य अहंकाराचे महामेरू राहुल गांधी, ममता बानर्जी, चंद्राबाबू नायडू उन्मळून पडताना दिसले तर नवल अजिबात नाही. पण त्यांना त्याच महापुरात आजकालच्या भाषेत त्सुनामीमध्ये टिकून राहिलेले नविन पटनाईक कशाला दिसू शकतील? कालपरवा सतराव्या लोक्सभेसाठी झालेल्या मतदानाची मोजणी संपली आणि तोपर्यंत गजबजलेल्या अनेक नेते प्रादेशिक पक्षांचे वृक्ष उन्मळून पडल्याचे दु:ख आहे. पण त्याच मोदी नामे चक्रीवादळात टिकून राहिलेल्या बिजू जनता दल वा त्या पक्षाच्या नेत्याचे कौतुक कशाला असेल? असते तर बाकीचे दिग्गज उन्मळून पडत असताना नविनबाबू कशाला नजरेत भरतील? पण कुठल्याही सामान्य बुद्धीच्या भारतीयासाठी पटनाईक यांचे यश डोळे दिपवणारे आहे.

खरे तर मागल्या काही महिन्यात भाजपा व मोदीलाट मिळून अवघा ओडिशा साफ़ करून टाकतील, असे दावे केले जात होते. केवळ भाजपाचे ज्येष्ठ नेते व पक्षाध्यक्ष अमित शहा असे दावे करीत नव्हते. तर राजकीय अभ्यासक व चाचणीकर्तेही ओडिशा भाजपाच्या झोळीत पडणार, अशी ग्वाही देत होते. तसे भाकित एकट्या ओडीशा राज्यापुरते मर्यादित नव्हते. बाजूला बंगालमध्ये किंवा नजिकच्या इशान्य भारतातही भाजपा चमत्कार घडवणार, असे बोलले जात होते. पण तशी सर्वाधिक शक्यता ओडिशा संबंधातली होती. कारण तिथला हा प्रादेशिक पक्ष तसा एकखांबी तंबू आहे. मुख्यमंत्री व बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा नविन पटनाईक हे तसे जनतेत मिसळून जगणारे नाहीत. काहीसे एकलकोंडे व्यक्तीमत्व आहे. त्यांचे अनेक नाराज सहकारीही त्यांना सोडून भाजपात दाखल झाले होते. पण त्यासाठी भाजपावर दोषारोप करून नविनबाबू मोकळे झाले नाहीत, की त्यांनी भाजपाच्या नावाने शिमगाही सुरू केला नाही. ते निमूटपणे आपले कामधाम संभाळत बसले. दरम्यान देशात अनेक राज्यात विविध प्रादेशिक पक्ष व कॉग्रेस मिळून भाजपाला केंद्राच्या सत्तेतून उखडून टाकण्याच्या गमजा करीत होते. पण ओडीशा बाहेरच्या राजकारणात नविनबाबूंनी कधी फ़ार रस घेतला नाही, किंवा विरोधकांच्या बैठकांना उपस्थित राहून भाजपा वा मोदी विरोधात आरोळ्या ठोकल्या नाहीत. भाजपा व अन्य पुरोगामी पक्षांना त्यांनी चार हात दुरच ठेवले. अगदी मागल्या वर्षी पहिला अविश्वास प्रस्ताव चंद्राबाबूंच्या तेलगू देसमने मोदी विरोधात लोकसभेत आणला, तेव्हाही कटाक्षाने नविनबाबूंचा पक्ष त्यापासुन दुर राहिला होता. थोडक्यात आपण कॉग्रेसचे सहकारी वा मोदी विरोधक नसल्याचे चित्र त्यांनी स्पष्टपणे आपल्या मतदाराच्या समोर ठेवलेले होते. पण त्याचवेळी आपण मोदींचे वा भाजपाचेही सवंगडी नसल्याचे कृतीतून दाखवून दिलेले होते. बाकीचे प्रादेशिक पक्ष व नेते आणि नविनबाबूंमधला हा मोठा फ़रक होता.

केजरीवाल, ममता, चंद्राबाबू, राहुल गांधी किंवा अगदी शरद पवार यांच्यापर्यंत कुठल्याही नेत्यांमध्ये आढळून येणारा अहंकार नविनबाबूंमध्ये कधी दिसला नाही. त्यांनी कधी ओडिशाबाहेरच्या राजकारणात महत्वाकांक्षा बाळगली नाही ,किंवा लुडबुडही केली नाही. राष्ट्रहित बघून मोदी सरकारच्या बाजूने किंवा प्रसंगी विरोधातही भूमिका घेतल्या, किंवा पाठींबाही दिलेला होता. त्यांनी आपला मतदार आपला गुलाम असल्याप्रमाणे आपल्या इच्छेनुसार कुठेही वळवता येतो, किंवा आपल्या भूमिकांसाठी तोच मतदार मते देतो; असा अहंकार बाळगला नाही. ओडिशातील मतदाराला पुरोगामी वा प्रतिगामी असे मोजून बाहेरच्या राजकारणात उचापती केल्या नाहीत. त्यासाठी ताळतंत्र सोडून पंतप्रधान वा केंद्र सरकारशी पंगा घेतला नाही. ऐन निवडणूका भरात असताना फ़नी नावाच्या चक्रीवादळाने ओडीशा बंगालला झोडपून काढले, तेव्हाही केंद्राची आवश्यक ती मदत मिळवताना त्यांनी तात्काळ मोदींना प्रतिसाद दिला व मदतकार्यात सहकार्य मिळवल. याचे उलट टोक ममता बानर्जी होत्या. वादळग्रस्तांना मदत देण्याविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी संपर्क साधला असताना, ममतांनी त्यांच्याशी बोलायचेही नाकारले. आपण मोदींना पंतप्रधान मानत नाही. म्हणूनच त्यांच्याशी बोलणार नाही. बंगालला अन्य कोणाची मदत नकोय, इतकी टोकाची भूमिका घेतलेली होती. त्याच्या तुलनेत नविनबाबूंचे वर्तन अतिशय नम्र आणि सभ्य होते. तुकोबा त्यालाच लव्हाळे म्हणतात, अवघे जग त्यालाच लव्हाळी म्हणते. म्हणून ओडीशा त्या चक्रीवादळाच्या तडाख्यातून सुखरूप बाहेर पडू शकला. नेमकी उलटी स्थिती बंगालची होती. आपल्या व्यक्तीगत भांडण व वैरभावनेला चुचकारताना ममतांनी मुख्यमंत्री असूनही बंगालच्या हिताला हरताळ फ़ासला होता. अहंकाराचे यापेक्षा भयंकर जळजळीत उदाहरण कुठले असू शकते?

बहुतेक प्रादेशिक वा अन्य लहान पक्षांचे दिवाळे लोकसभा निवडणूकीत वाजले.  म्हणून त्यांच्या याच अहंकाराकडे बारकाईने बघितले पाहिजे. तो अहंकार समजून घेतला तर त्यांना उन्मळून पडण्याची वेळ कशाला आली, त्याचे उत्तर सापडू शकेल. हा प्रत्येक अहंकारी कर्तृत्वहीन नेता देशातल्या सर्वात यशस्वी व शक्तीमान नेत्याला सतत वाकुल्या दाखवून हिणवत होता. स्वबळावर पक्षाला बहूमत मिळवून देत पंतप्रधान झालेले मोदी आणि पिढीजात सत्ताधारी पक्षाचे दिवाळे वाजवून मोकळे झालेले राहुल गांधी; यांनी एकमेकांच्या विरोधात वापरलेली भाषाही त्याचा पुरावा आहे. मोदींसाठी सर्वप्रकारचे अपशब्द मुक्तपणे वापरले जात होते आणि मोदी मात्र नम्रपणे अशा प्रत्येकाचा समाचार घेत होते. अशा प्रत्येकाच्या उद्धटपणाची किंमत त्यांना निवडणूक निकालातून मोजावी लागलेली आहे. जितके ते मोदी व भाजपाला संपवायला निघालेले होते, तितके त्यात अधिक उन्मळून पडलेले दिसतील. त्याच्या नेमकी उलटी स्थिती नविनबाबूंची आहे. त्यांनी कधी उर्मटपणा केला नाही, की आपल्या अहंकार वा उद्धटपणाचे प्रदर्शन मांडले नाही. मानभावीपणा केला नाही, की दुटप्पॊपणा करून मतदाराची दिशाभूलही केली नाही. पर्यायाने त्यांचा मतदार त्यांच्यामागे ठामपणे इतक्या मोदीलाटेतही उभा राहिला. उलट त्यांच्यापेक्षा दिग्गज म्हणून पुढे सरसावलेले नेते व त्यांचे पक्ष दिवाळखोरीत गेलेले आहेत. चंद्राबाबूंनी केंद्रातील पोलिस यंत्रणा म्हणून सीबीआयला आंध्रात यायला प्रतिबंध केला. ममतांनी तर सीबीआयच्या पथकाला थेट अटक करण्यापर्यंत मजल मारली. केजरीवाल यांनी काहर केला. आपल्याला मोदी चकमकीत ठार मारणार असल्याचा बेछूट आरोप केला. कुठूनही देशातल्या सर्वोच्च सत्ताधीशाचा अधिकार नाकारण्याचा हा उद्दामपणा अहंकारातूनच आलेला होता. तुकोबा म्हणतात त्यातला आशय तिथेच समजून घेतला पाहिजे.

आपल्यापेक्षा शक्तीमान आहे, त्याच्या समोर नतमस्तक व्हायचे काही कारण नाही. पण म्हणून उठसुट त्याला आव्हान देण्याचीही गरज नसते. जोवर असे आव्हान समोर धोका वा संकट म्हणून उभे नसते, तोवर त्याच्याशी दोन हात करण्याचेही कारण नसते. नविनबाबू आणि ममता, केजरीवाल किंवा चंद्राबाबू व राहुल यांच्यासाठी मोदी हे संकट नव्हते. त्याला ललकारून अंगावर यायला भाग पाडण्याची काहीही गरज नव्हती. आणि जेव्हा तेच आव्हान अक्राळविक्राळ रुप धारण करून अंगावर येऊ लागते, तेव्हा तर त्याच्याही उन्मत्तपणे सामना करायला पुढे जाणे म्हणजे विनाशाला आमंत्रण असते. नविनबाबूंना त्याची नेमकी जाण होती. म्हणूनच आपल्याला पेलू शकणार नाही, अशा भाजपा वा मोदी या आव्हानाला त्यांनी कधी धमक्या दिल्या नाहीत, की आमंत्रणही दिले नाही. आपल्या सुरक्षित गडात राहून त्यांनी आपले राज्य संभाळण्याला प्राधान्य दिले. त्याच्या उलट राज्याबाहेर ज्यांना कोणी विचारतही नाही, अशा अनेक प्रादेशिक नेत्यांनी थेट पंतप्रधान हटवण्याच्या गमजा करीन आरंभलेला खेळ, त्यांच्यासाठीच चक्रीवादळ आणणारा होता. ते वादळ खरोखर अंगावर चाल करून आले, तेव्हा मग हीच मंडळी मतदानयंत्र किंवा मतदान पध्दतीवर शंका निर्माण करू लागली. कारण तोपर्यंत आपापल्या राज्यातही त्यांचा मतदार पाया उन्मळून पडलेला होता, निखळला होता. त्यांनी दिल्लीला आव्हान देण्याच्या वल्गना करायची गरज नव्हती. आपापल्या राज्यात मोदीलाट थोपवण्यासाठी तटबंदी केली असती, तरी मोदींना आज मिळाले तितके विविध राज्यातून यश मिळू शकले नसते. कुवत नसताना हत्तीला आव्हान सिंह सुद्धा देऊ शकत नाही. पण इथे लबाड कोल्ह्याची कातडी पांघरून शिकारीची स्वप्ने रंगवली जात होती. वृक्ष म्हणावे इतकीही पाळेमुळे रुजलेली नाहीत, अशा लोकांनी महापुराला आव्हान देऊन आपलाच पालापाचोळा करून घेतला ना?

55 comments:

  1. खतरनाक विश्लेषण भाऊश्री

    ReplyDelete
  2. ase vathe yat kay navin sapdnar bhauna pan tyanchi najarach vegli je sarvana disat nai te bhauna diste :)

    ReplyDelete
  3. आदरणीय भाऊ सर वरील लेख राजू पेंटर ला लागू होत नाही का?

    ReplyDelete
  4. अहो भाऊ आम्ही तुमची वाट बघत होतो, पहिली गोष्ट तुमचं मनःपूर्वक अभिनंदन अगदी तुम्ही लिहिल्या प्रमाणे भा ज प ३०० जागांवर निवडून आलाय,आता पुढेतुम्ही काय लिहिताय ते वाचायची भयंकर उत्सुकता आहे

    ReplyDelete
  5. Hats of you,Bhaukaka.each and every word of your prediction has come true.we were eager to read your blog after this huge victory of Modiji and BJP.Thanks a lot.

    ReplyDelete
  6. Bhau aple shabd chapkhal baslet va samjazadar ko ishara kaafi hai...

    ReplyDelete
  7. दर्शन वसंत कोळी, पनवेल जि. रायगड नवी मुंबईMay 24, 2019 at 8:29 AM

    भाऊ, चातकासारखी वाट पाहत होतो लेखाची.
    तुम्ही खरेच देशातील द्रष्टे साधक पत्रकार आहात. 2014 मोदीच का? व 2019 पुन्हा मोदीच का? याविषयीचे तुमचे आडाखे खरे ठरले.
    चंद्राबाबू नायडूंबद्दल तुम्ही आमची जाण एवढी करुन ठेवली होती की त्या base वर त्यांची आधीची तर सोडा पण निकालापूर्वीची ताजी धावपळ बघून खुदु खुदु हसत होतो आणि भाऊंनी त्याची व जगनची अभ्यासू वस्तूनिष्ठ केलेली भविष्यवाणी स्मरत होतो आणि अगदी तसंच झालं पण! महाराष्ट्रातल्या अजाणत्या राजा शरद पवार वर लिहिण्याचे धारिष्ट्य करावे तर ते तुम्हीच, संपूर्ण वस्त्रहरण करून उदाहरणे, संदर्भ यांचे चौकार षट्कार खेचावे तर आपणच!
    ईतर नमुन्यांवर लिहिले तर प्रतिक्रिया मोठी होईल. मोदींच्या यशात भाऊ तुमच्या प्रबोधनाचा मोठा वाटा आहे. मी थेट कुठल्याही राजकीय पक्ष, संघटनेचा नसतानाही केवळ मोदींसाठी तळमळत होतो. देश लबाड लांडगे, कोल्हे यांच्या तावडीत जाण्यापासून वाचला. आपण खूप आधीपासूनच भारतीय जनतेच्या सूज्ञपणाबद्दल आश्वासित होतात व ते खरंच ठरलं!

    ReplyDelete
    Replies
    1. प्रमोद देवनाथ कोळीMay 24, 2019 at 10:26 PM

      भाऊंच्या लेखाप्रमाणेच आपली प्रतिक्रिया ही तेवढीच खास आहे......खूप छान

      Delete
  8. नमस्कार. मी बारावीचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून गेले महिनाभर आपले लेख रोज वाचत असतो. तुमचे विश्लेषण वाचून माझा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. सुरुवातीला आपला तीनशे जागांचा अंदाज वाचून विश्वास बसला नव्हता; पण निकाल पाहून आपल्याबद्द्लचा आदर आणखीनच वाढला हे मात्र निश्चित! आपल्या प्रत्येक लेखाची मी व माझ्या घरातले सर्व आवर्जून वाट पाहत असतो. धन्यवाद ----आपला चाहता - हृषीकेश भटगावकर

    ReplyDelete
  9. छान विश्लेषण भाऊ...राजकारण हा आततायीपणा करून न करता शांत;संयमी राहून आपली बलस्थाने कोणती आणि कमकुवत बाजू कोणती हे जाणून करायला पाहिजे.
    नाहीतरी बेडकाचा कधीच फूगून बैल होणं शक्य नाही..फुटून जीव जाण्याची शक्यता च जास्त..

    ReplyDelete
  10. भाउ तुमचा अंदाज १००% खरा ठरला भाजप ३००+ अभिनंदन.तुमच्या पत्रकारीतेला सलाम.

    ReplyDelete
  11. अतिशय सुंदर आणि उपयुक्त असा लेख आहे, भाऊ काका.. आज सर्व ठिकाणी जे वाचायला मिळते आहे त्यापेक्षा वेगळं आणि 100% सत्य तुमच्याकडूनच वाचायला भेटेल अशी अपेक्षा होती आणि ती 100% पूर्ण झाली... तुम्ही सर्वोत्तम राजकीय विश्लेषक आहात..तुमच्या लेखाने खुप राजकीय ध्यान मिळाले आहे.. ते असेच मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. ईश्वर तुम्हांला दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना...

    ReplyDelete
  12. भाऊ म्हणजे भाऊच

    ReplyDelete
  13. भाऊ आपण गेल्या ५ वर्षांत विविध लेखांतून व्यक्त केलेले सर्वच्या सर्व अंदाज अत्यंत अचूक बिनचूक व तंतोतंत खरे ठरले. आपल्याला साष्टांग नमस्कार . स्वीकार व्हावा !

    ReplyDelete
  14. Bhau u are great u r analysis 100% right BJP 300+

    ReplyDelete
  15. अगदी योग्य. सिंह ,हत्ती, कोल्हे वाक्य उत्तम. साहित्यीक भाषेतील राजकीय लेख.बेस्ट लक्.गुड डे

    ReplyDelete
  16. मागील 6 महीन्यापासुन तुमचा ब्लाॅग वाचत आहे.
    साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीची खेळी, सपा बसपाचा फोलपणा यावरचे विश्लेषण वाचुन फार छान वाटले

    ReplyDelete
  17. Kiti wastaw vichar karta sir, khupach spashta aani suryaprakashasarkhe swacha likhan , hats off to you. Parantu garvishtha Lok shiknar nahit aaplyakdun.

    ReplyDelete
  18. भाऊ, अगदी यतार्थ मीमांसा ! या बरोबर मला आंध्रच्या जगमोहन याचे नाव जोडावे असे वाटते. केंद्रात लुडबुड करण्यापेक्षा राज्याचे भले, राज्याचे राजकारण करावे असे वाटले या दोघांना. नाहीतर चंद्राबाबू काय किंवा दीदी काय वेडेपणाचे कहर. चंद्राबाबूचा तर ना घर का अशी स्थिती झाली आहे. विपरीत बुद्धी दुसरे काय !

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ साहेब की जय हो!!इतर सर्व पंडित चाचपडत असताना आपण ठाम होता आपले अंदाज १००% खरे ठरले सलाम

      Delete
  19. भाऊ साहेब की जय हो!!इतर सर्व पंडित चाचपडत असताना आपण ठाम होता आपले अंदाज १००% खरे ठरले सलाम

    ReplyDelete
  20. Shikarkhane JaydeepMay 24, 2019 at 10:14 PM

    भाऊ साहेब की जय हो!!इतर सर्व पंडित चाचपडत असताना आपण ठाम होता आपले अंदाज १००% खरे ठरले सलाम

    ReplyDelete
  21. भाऊ, एका गोष्टीचे विश्लेषण करा. चंद्रपूर मधून संसद रत्न हंसराज आहिर, एवढ्या मतांनी कसे पराभूत झाले? तेही Criminal Record असलेल्या माणसापुढे?

    ReplyDelete
    Replies
    1. दारूबंदी ही कितीही चांगली आणि आदर्श वाटली तरी व्यावहारिक पातळीवर स्वीकारली जाईलच असे नाही. लोकांनी चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदीचा निषेध अहिरांना हरवून नोंदवला आहे.

      Delete
  22. भाऊ पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे दोन्ही पवार कुटुंबाचे असून असू एक विजयी आणि एक पराभूत. काय कारण असेल भाऊ.यावर विश्लेषण येऊ.या दोन्ही निकालाचा अर्थच लक्षात येत नाहीय.

    ReplyDelete
  23. नविनबाबूना कोणाची दृष्ट लागू नये आणि शाळेत शिकलेल्या Abu Ben ..कवितेतील ओळीत सांगायचे तर May his tribe increase !लेख अत्यंत संयत आणि प्रभावी!सर्वाना आवडेल असा उतरला आहे .

    ReplyDelete
  24. भाऊसाहेब नमस्कार•••आपले लेख मी २०१२ मध्ये पुण्य नगरीत येत असत त्यावेळी पासुन आजतागायत वाचत असतो. अगदी तेव्हा पासून आपले राजकीय विश्लेषण व अंदाज खरे ठरत आहेत. भाजपाला ३००+ जागा मिळतील हा आपला होरा २०१४ प्रमाणे खरा ठरला आहे. त्याकरिता सर्व प्रथम आपले खुप खुप अभिनंदन! आपली‌‌.. भाऊचा धक्का ही युट्यब च्यानल सुध्दा नियमितपणे बघत असतो. भविष्यात ही आपल्या कडून मार्गदर्शन होत राहिलं अशि अपेक्षा करतो. पुनश्च एकदा आपले अभिनंदन..🌹🙏🙏

    ReplyDelete
  25. भाऊ, तुमचे त्रिवार अभिनंदन. तुमचे अंदाज अगदी तंतोतंत खरे ठरले. राजकारणाची तुमची समज, एकूण आकलन आणि अंदाज यांना साष्टांग नमस्कार. तुमचे लेखन तर अप्रतिमच, कधी हळूच चिमटा काढणारे तर अनेकदा सणसणीत चपराक हाणणारे. थोडा विरोधाभास असा कि खरेतर मोदी-विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालणारे तुम्ही मोदी-प्रेमींच्या पसंतीला उतरलात. विरोधकांनी तुमच्या कडून धडे घेतले असते तर निश्चित त्यांच्या घोडचूका त्यांना टाळ्त्या आल्या असत्या. असो, त्यांचं त्यांच्या जवळ. पण सामान्य लोकांच राजकीय आकलन तुमच्या लेखना मुळे खूपच वरच्या पातळी वर पोहोचलं हे बारीक एकदम खरं. तुमचा ब्लॉग वाचणारा चार मित्रांमध्ये राजकारणावर बोलताना कसला भाव खाऊन जातो हे मी अनुभवावरून सांगतो. ही निवडणूक तुमच्या लेखनाने समृद्ध केली या बद्दल कोणाचे दुमत असणार नाही.

    ReplyDelete
  26. भाउ तुमचा अंदाज खरा ठरला,अभिनंदन भाऊ, आता हे विरोधक मोदीं पेक्षा भाऊ तुमचा धसका घेतील ( भाऊंचा धसका)

    ReplyDelete
  27. भाऊ,

    तुम्ही म्हणताय तसा हा अहंकार नसून भीती आहे. नवीनबाबूंचा कारभार इतर चोरांपेक्शा स्वच्छ असल्याने त्यांना मोदींची भीती वाटत नाही. त्यामुळे ते मोदींशी बरोबरीच्या नात्याने बोलू शकतात. तसंच त्यांनी बिजली, सडक, पानी या क्शेत्रात खूप कामे केली असल्याने त्यांचा जनतेवरही पूर्ण विश्वास आहे.

    ReplyDelete
  28. भाऊ, तुमच्या नजरेला सलाम. एवढी बारीक नजर म्हणजे जे न देखे रवी ते देखे कवी या उक्तीला साजेशी आहे. तुमचे विश्लेषण, त्यावरून वर्तवलेले अंदाज एवढे अचूक कसे असतात ते आज कळाले. मी तुमचा आणि तुमच्या लेखांचा प्रचंड चाहता आहे आणि राहीन...

    ReplyDelete
  29. Great ...bhau tumche Abhinandan. Tumhala Bhartiyanchi Nas kalali aahe BJP 300 + sets jinkel ASE Earle navte. Pan tumcha Aatma Vishwas aani achuk vivechan kharach prashansaniya aahe

    ReplyDelete
  30. भाऊ साहेब,तुम्ही पुर्वीसारखे पुण्यनगरी अथवा तत्सम पेपरात लिहा.म्हणजे खेड्यापाड्यात सहज सामान्य लोकांना वाचता येईल.

    ReplyDelete
  31. भाऊ आपले अंदाज खरे ठरले. अणि ते खरे ठरणार असाच विश्वास पण होता. निकालाच्या आधी काँग्रेस समर्थक तर पारच सुटले होते. समाजमाध्यमात नुसता गोंधळ आणि फुशारक्या चालल्या होत्या. आता सगळं कसं शांत झालाय. नायडूंची नुसत्या उठाठेवी चालल्या होत्या त्याचे हासू येत होते. याचे कारण आपण आधीच केलेले वस्तुनिष्ठ विश्लेषण. देशात यापुढे जातीपाती हा मुद्दा मागे पडून विकास हाच मुद्दा राहील अशी आशा वाटते. नवीन सरकारने पुन्हा एकदा उत्तम कामगिरी करावी आणि देशाची प्रगती व्हावी हीच अपेक्षा

    ReplyDelete
  32. 👍👍👌👌👍👍👌👌👍👍👌👌👍👍👌👌

    ReplyDelete
  33. दिसे जे तुम्हाला, न दिसते नेत्याला
    कोणिसे शहाणे सांगोनी गेले...

    ReplyDelete
  34. भाऊ, अप्रतिम लेख

    ReplyDelete
  35. Dear Bhau,
    Heartiest congratulations to you for accurate predictions about BJP seats in this election.
    Deshpande

    ReplyDelete
  36. '' भाजप / मोदी ३०० च्या वर जागा जिंकतील '' हे आपले विश्लेषणात्मक भाकीत तंतोतंत खरे ठरले त्या बद्दल अभिनंदन !!!
    आपण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातीलही सर्वश्रेष्ठ राजकीय पत्रकार व विचारवंत आहात....

    ReplyDelete
  37. '' भाजप / मोदी ३०० च्या वर जागा जिंकतील '' हे आपले विश्लेषणात्मक भाकीत तंतोतंत खरे ठरले त्या बद्दल अभिनंदन !!!
    आपण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातीलही सर्वश्रेष्ठ राजकीय पत्रकार व विचारवंत आहात....

    ReplyDelete
  38. चहूमुलखी घालमेलीची लढाई झाली.समस्त रियासती चे वजीर रणांगणी पावते झाले.दिल्लीपतींचे वजीर शहा सलामतांनी माणसे पेरली.महाराष्ट्रप्रांतीचे कारभारी खासे शड्डू ठोकून पुतण्या आणि नातवासहीत मैदानी ठाकले.दिलींद्राचा जोर मोठा तैसे बांद्रा मुलखाचे बिनीवाले उधोजीराव तळावरून रसद देत होते.बिनीवाल्यांचा आव वाघाचा पण दस्तुरवेळी गुजरातेच्या दावणीची वेसण दाती धरली.आलम हिंदोस्तांचे कुलमुखत्यारांस बालाकोटचा भैरव पावला.काकासाहेबांची लाज घरच्या सुभ्यानी राखली..याऊपरी नगर प्रांती खासा खलेल करून दुश्मन रियासतीचा सिपाहासालार फडणवीसपंताकडे डेरे दाखल होऊन त्यांचे मूल सुयज विख्यास मन्सबदारी व खिल्लत मिळाली...
    माढ्याचे ठाणे चखोट पण निंबाळकरास पुण्याई पावली.सातारियासी पुन्हा जरीपटका लाभला तैसे पुणे प्रांतास बापट विड्याचा मरातब मंजूर जाहला,याऊपरी बारामती करांस जागोजागी तोशीस लागून निशाण राखली.तळकोकणी राणियास शास्त झाली .दर दरबारी हरामखोरी पावती झाली नाही.रायेगडी महामूर मोहरा उधळून तटकरी तट्टू फुगले.मावळ प्रांती पार्थ मूल लहान म्हणून श्रीरंगोजीने तरवारीस हयगय चेली नाही खास्या लढवय्याचे दामदौलतहू वालिद जायबंदी झाले..
    प्रांते संभाजीनगरसा फितूरीचा गजहब झाला.दानवे नामक हशमाने ऐनवेळी जावयाचा पक्ष धरला.मोगलाची बेगमी झाली .
    शेट्टी माणूस कामाचे पण असंगाशी संग नडीला.प्रांते करवीरास मंडलिकाने माहडिकास बगल देऊन खासे ठाणेच घेतले...
    इतकियावरी नांदेड मुक्कामी अशोकपर्व निजधामास गेले..काकासाहेबांची हिंमत खचली पण मूळचा खटपटी स्वभावास तंत्र राहिला नाही.हल्ली परवरदिगार ठेविल तैसे राहून वैराग्याच्या गोष्टी करताती...
    काही जबाबास लिहले ते समयाने लिहून घेतले
    बहुत काय लिहणे.खावंद थोर आहेत....!!

    ReplyDelete
    Replies
    1. लयभारी राव काय लिहिलंयत

      Delete
    2. Kya baat hai.Sabhasada chi bakhar vachato aahe ase vatale.Excellent...

      Delete
    3. sir bhaun kadun sfurti ghetali ka ?? very good attempt
      काकासाहेबांची हिंमत खचली पण मूळचा खटपटी स्वभावास तंत्र राहिला नाही.हल्ली परवरदिगार ठेविल तैसे राहून वैराग्याच्या गोष्टी करताती... Sumply superb

      Delete
    4. उत्तम
      खूप दिवसांनी प्राकृत वाचनात आले
      धन्यवाद👍👍👌👌

      Delete
    5. सर्वांना मनापासून धन्यवाद! फक्त एक स्पष्ट करू इच्छितो की हा एक चांगला पोस्ट वाचनात आला म्हणून इथे संबंधित विषयावर टाकला. ह्याचा खरा लेखक मी नसून अजून कोणीतरी दुसरा आहे. तो मलाही माहीत नाही. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व. ��

      Delete