Tuesday, June 11, 2019

भुरट्यांचे पुरोगामी बळी

Image result for shekhar gupta yogendra

साधारण १९६०-७० च्या दशकात आपल्या विरोधकांच्या सभेत गोंधळ घालण्यासाठी वापरली जाणारी युक्ती म्हणजे गुपचूप गर्दीत उंदिर सोडुन द्यायचा. मग तिथे बसून सभा ऐकणार्‍या गर्दीत एकच गोंधळ उडायचा आणि किंकाळ्या, गोंगाट व धावपळ माजायची. नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर तथाकथित विरोधकांच्या गोटाचॊ मोदी-शहा जोडीने अशीच तारांबळ उडवून दिलेली आहे, झाले काय व कसे, तेच कोणाच्या मेंदूत शिरताना दिसत नाही. कालपर्यंत मोदी भाजपाला बहूमतापासून व पर्यायाने सत्तेपासून वंचित ठेवण्याच्या गमजा करणार्‍यांना आपण नेमके कुठे फ़सलो; त्याचा अंदाजही बांधणे आज अशक्य झाले आहे. मग एकमेकांवर दोषारोप करण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यात फ़क्त प्रत्यक्ष निवडणूका लढलेले कॉग्रेस इत्यादी पुरोगामी पक्षांचाच समावेश नाही, तर तथाकथित राजकीय विश्लेषक, अभ्यासक व विचारवंतांचाही समावेश आहे. किंबहूना जो कोणी स्वत:ला पुरोगामी म्हणवतो, अशा प्रत्येकाची तारांबळ उडालेली आहे.  हळुहळू आपापल्या परीने असा भामटा आपल्या खोटेपणाची कबुली द्यायला पुढे येतो आहे. उलट ज्यांना तितकीही अब्रु झाकण्याची हिंमत नाही, ते मतदानयंत्र वा बाकी कोणावर तरी आरोप करून आपली अब्रु झाकल्याचा खेळ करीत बसले आहेत. त्यात शेखर गुप्ता या दिग्गजाचा समावेश होतो. पन्नास वर्षे दिल्लीत पत्रकारिता केलेले शेखर गुप्ता, खुलेपणाने मान्य करतात की आपण पत्रकारिता करीत नव्हतो. तर मोदी हटाव मोहिमेचे सुत्रसंचालन करीत असल्याची साक्ष देतात. अशा भुरट्यांचा एक परिसंवाद युट्युबवर उपलब्ध आहे. त्यातले काही कबुली देतात, तर काहीजण आडोसे घेऊन मतदारालाच गुन्हेगार ठरवण्यापर्यंत घसरले आहेत. स्वत:ला विचार करणारे समजताना, यांची बुद्धी किती रसातळाला गेली आहे, त्याचा इतका मोठा पुरावा दुसरा कुठला असू शकत नाही.

याच परिसंवादात बोलताना योगेंद्र यादव नावाचे प्राध्यापक मतदाराला थेट मुर्ख ठरवून त्याची कॉलर पकडण्यापर्यंत मजल मारतात. म्हणजे प्रत्यक्ष कॉलर पकडत नाहीत, तर तशी भाषा वापरतात. कारण त्यांनी म्हणे एक पत्रक काढून गुरूग्राम या औद्योगिक महानगरात मोदींना पराभूत करण्याचे आवाहन केलेले होते. पण प्रत्यक्षात मतदाराने त्यांच्याकडे ढुंकूनही न बघता, भाजपाला मते दिली. म्हणून यादव खवळले आहेत. मजेची गोष्ट म्हणजे दिर्घकाळ प्राध्यापकी व संशोधन करण्यात आयुष्य खर्ची घातलेल्या यादवांना मागल्या पाच वर्षात राजकारणातला नेता होण्याचे वेध लागले. म्हणूनच लोकपाल आंदोलनाचा तमाशा उभा करून राजकारणात आलेल्या केजरीवाल यांच्यासोबत यादव यांनी आम आदमी पक्षाच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. तेव्हा त्यांचा मतदाराच्या मुर्खपणावर पुर्ण विश्वास होता. किंबहूना केजरीवाल यांच्यात त्यांना देशाचे नेतृत्व करण्याचे अपुर्व गुण आढळले होते. पण दोनतीन वर्षातच त्यांचा पुर्ण भ्रमनिरास झाला आणि ढुंगणावर लाथ मारून केजरीवालनी हाकलून लावलेले यादव, आजकाल विविध वाहिन्यांवर आपल्या अकलेची मुक्ताफ़ळे उधळत असतात. पण पाच वर्षापुर्वी त्यांना आम आदमी पक्षाने हरयाणाचा मुख्यमंत्री म्हणून मुक्रर केलेले होते. तेही मोठ्या उत्साहात तिकडे जाऊन उमेदवार झालेले होते. मात्र मतदाराचा हिसका समजल्यावर त्यांना थोडी अक्कल आली. पण तरीही त्यांनी केजरीवालची साथ सोडलेली नव्हती. त्यांना केजरीवाल मोठा प्रेषित वाटला होता. ज्याला इतक्या जवळून केजरीवाल नावाचा भामटा ओळखता येत नसेल, त्याची कींव करावी तितकी थोडी आहे. अशा लोकांना लोकशाही कितपत कळते आणि राजकारणाची कितीशी समज आहे, त्याचेही उत्तर अशा गोष्टीतून लक्षात येऊ शकते. अशा यादवना मोदींना पुन्हा बहूमत देणारा मतदार बेअक्कल वाटतो आणि कॉग्रेस मरावी असेही वाटते.

लोकशाहीत दुसर्‍याच्या मताचा आदर करावा इतकाही संयम नसलेल्या व्यक्तीला विचारवंत कशाला म्हणायचे, त्याचे उत्तर कोणी देऊ शकेल काय? दिल्लीकरांच्या बोकांडी केजरीवाल आणून बसवण्याचे पाप आपल्याकडून घडल्याची प्रामाणिक कबुली देण्याची हिंमत नाही, त्यांच्यापाशी बाकीच्या बाबतीत कितीशी सच्चाई असू शकते? भाजपाने वा अन्य कुठल्या पक्षाने दिर्घकाळ संघटना बांधलेली आहे, त्यासाठी कित्येक वर्षे कार्यकर्ते झटलेले असतात. यादव यांच्यासारखे भुरटे माध्यमात झळकून एका दिवसात विचारवंत म्हणून उगवतात आणि मतदाराला गुन्हेगार ठरवू बघतात,. ती खर्‍या लोकशाहीची गळचेपी असते. कॉग्रेस असो किंवा भाजपा यांच्या तुलनेत केजरीवाल हा दिल्लीतला भामटाच होता. पण त्याला यादव किंवा माध्यमांनी जनतेच्या माथी मारले. अन्यथा दिल्लीची इतकी दुर्दशा झाली नसती. पण हाच राजधानीतूल बुद्धीमंत विचारवंतांचा खेळ असतो. आपण ज्या दगडाला शेंदूर फ़ासू, त्याला देशातील जनतेने देव मानावे, त्याच्या चरणी माथा टेकावा; अशी त्याची अपेक्षा व आग्रह असतो. तो मान्य झाला नाही, मग ते सामान्य जनतेला मुर्ख ठरवण्यापर्यंत उद्धटपणा करू शकतात. त्यातून ते सहजगत्या संविधान व त्याचा निर्माता असलेल्या बाबासाहेबांची अवहेलनाही करीत असतात. कारण ज्या मतदाराची हेटाळणी चालू आहे, त्याला मतदानाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यालाच मुर्ख ठरवणे म्हणजे प्रत्यक्षात बाबासाहेबांच्या प्रौढ मतदान हक्कावरच चिखलफ़ेक करणे आहे. पण हे सर्व चालून जाते. यातून एक गोष्ट लक्षात येते, की संविधान बचाव म्हणून टाहो फ़ोडणारेच व्यवहारात संविधान पायदळी तुडवायला सिद्ध झालेले आहेत. त्यांच्या सोयीचे असेल, तेव्हा संविधान पवित्र असते आणि सर्वोपरी असते. उलट त्यांनाच अडचणीचे ठरू लागले, मग त्यांना संविधानाची पर्वा नसते. एकूण या निवडणूक निकालांनी अशा तमाम भोंदू विचारवंतांचे पुरते वस्त्रहरण केलेले आहे.

त्या परिसंवादात मोदींना पुन्हा बहूमत कशाला मिळाले व त्यांनी पाच वर्षात जनतेला भावलेले कुठले काम केले; त्याची जंत्री शेखर गुप्ता यांनी दिली. मतदारांच्या भेटी घेत असताना लोकांना प्रथमच भारत सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळालेले आपल्याला दिसत होते आणि लोकही सांगत होते. पण आपल्याला मोदींच्या त्या प्रामाणिक कामाचे पुरावे नकोच होते. उलट मोदींना नाकर्ते वा निरूपयोगी ठरवण्यासाठीचे पुरावे आपण शोधत होतो, असे शेखर गुप्ता यांनी प्रामाणिकपणे कबुल तरी केले. मुद्रा योजनेनुसार ५० हजार रुपयांचे कर्ज मिळालेला एक दलित उद्यमी गुप्ता यांना भेटला. दिल्लीला परतल्यावर त्यांनी मुद्रा योजनेची माहिती मिळवली. त्यातले तथ्य त्यांना तेव्हाच कळले. पण निकालापुर्वी ते सत्य बोलायची हिंमत गुप्ता यांना झालेली नव्हती. ही पुरोगामी दहशत आहे. मोदींना गुन्हेगार घोषित केलेले आहे, तर त्याच्या निरपराधी असण्याचा किंवा चांगल्या कामाचा हवाला द्यायला पुढे येणे, हा पुरोगामी गुन्हा असतो. म्हणूनच गुप्ता यांना दिसलेले सत्य बघायची हिंमत झाली नाही, किंवा उमजलेले सत्य सांगण्याचे धाडस झाले नाही. याचा थोडक्यात सारांश इतकाच आहे, की अशा तमाम पुरोगामी पत्रकारांनी आपापली पत्रकारिता गुंडाळून ठेवलेली होती आणि मोदी विरोधात आघाड्या उघडल्या होत्या. लोकांच्या मनात खोटे भरवण्याचा उद्योग चालविला होता. मात्र त्यांच्या दुर्दैवाने पुरोगामी जगातले शहाणे वगळता, सामान्य जनता भुलली नाही आणि व्हायचे तेच झाले. बिचारे पुरोगामी पक्ष अशा अपप्रचाराला बळी पडले. अन्यथा मोदींना इतका मोठा विजय मिळाला नसता आणि हुरळलेल्या पुरोगामी पक्षांचे इतके लज्जास्पद पराभव झाले नसते. महागठबंधनाची अब्रु चव्हाट्यावर आली नसती, किंवा राहुलसह कॉग्रेस पक्षाला इतके हास्यास्पद नामुष्कीला सामोरे जाण्याची वेळ आली नसती. या निवडणूकीत खरा पराभव कोणाचा झाला असेल?

बारकाईने बघितले तर या निवडणूकीने पुरोगामी सेक्युलर म्हणून मिरवणारे पत्रकार, अर्धवट विचारवंत, कलावंत किंवा उच्चभ्रू प्राध्यापक; यांचा दारूण पराभव झालेला आहे. ते राजकारणात नसतात, पण राजकारण्यांवर हुकूमत गाजवित असतात. उठसुट शापवाणी उच्चारण्याचा धाक घालून समाजाला ओलिस ठेवणार्‍या या मुठभराचा मोदींनी फ़ज्जा उडवला आहे. ही मंडळी समाजात असंतोष माजवण्याचा धाक घालून राज्यकर्त्यांना नमवित असतात आणि आपली मनमानी लादत असतात. अशा दरबारी भामट्यांचा खरा पराभव मोदींनी केला आहे. खरे तर अशा भामट्यांना मोदींशी दगाफ़टका करायचा होता. पण त्यांनी उभारलेल्या मायाजालामध्ये पुरोगामी फ़सत गेले. आणि त्यांनाच मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. गठबंधनाचा बागुलबुवा समाजवादी पक्षाला महागात पडला. कॉग्रेसला प्रियंका गांधी यांचा हुकमाचा पत्ता पुढल्या निवडणूणूकीपर्यंत राखुन ठेवता आला असता, तो आताच वाया घालवावा लागला आहे. देवेगौडा, कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू, ममता अशा भुलभुलैयाला फ़सले आणि त्यांचे व्हायचे ते नुकसान होऊन गेले. अशा माध्यमांनी उभ्या केलेल्या मोदींसाठीच्या सापळ्यात अनेक प्रादेशिक पक्ष व पुरोगामी पक्ष अलगद अडकत गेले आणि खुद्द मोदी-शहा भाजपा त्यापासून अलिप्त राहिल्याने त्यांचा लाभ झाला. आज हे लोक आपल्या पापाची कबुली देत असतील. तर त्यांनी मतदारापेक्षाही बिचार्‍या बावळट पुरोगामी पक्षांची जाहिरपणे माफ़ी मागायला हवी. कारण या निर्बुद्ध विचारवंत अभ्यासकांमुळे त्या पुरोगामी पक्षांच्या संघटना व आजवरच्या कामाला मोठा फ़टका बसला आहे आणि तो नजिकच्या काळात भरून येण्यासारखा नाही. अशा लोकांच्या कल्पना व गमजांनी लाखो कार्यकर्त्यांचा मुखभंग केला आहे. त्याची किंमत पैशात मोजता येणारी नाही. यातून पुन्हा उभारी घेऊन उभे रहाण्यासाठी त्या पक्षांना व संघटनांना काही वर्षे खर्ची घालावी लागणार आहेत. कारण अशा भुरट्यांसाठी एक राजकीय प्रयोग झाला, पण त्या त्या पक्ष व कार्यकर्त्यांसाठी अस्तित्वावर घाला पडला आहे.                                                         

25 comments:

  1. खरं बोललात भाऊ योगेंद्र यादव यांचं ऐकून मलाही असंच वाटलं, अजुन किती दिवस हि लोक मतदाराला मूर्ख समजणार आहेत? मतदार जागृत झालाय हे जेवढं लवकर त्यांना कळेल तेवढं या लोकशाहीसाठी चांगलं आहे.

    ReplyDelete
  2. Very very very true sir. How perfect analysis. You are simply great person. I salute you again and again and again Sir.

    ReplyDelete
  3. सुपर भाउ.परखड विश्लेषन.तो परीसंवाद पाहिलाय.यादव चक्क मतदाराची काॅलर धरावा वाटल् म्हनतायत,मराठीतले अतिशहाने पण कमी नाहीत.तेही मतदारावरच घसरतायत.बर झाल तुम्ही चांगलाच समाचार घेतलात.यांनीच फार काहुर माजवल होत.वायर नावाच वेबचे सर्वच लेख चुकीचे ठरलेत अस एका सरवेक्षणात पुराव्यासकट दाखवलय.आता यांच्यावर कोण विश्वास ठेवनार? पण तुम्ही म्हनता तस नुकसान पक्षांच झाल ते हे लोक भरुन काढनार नाहीत.गुप्ताने तर निकाल लागल्यैपासुन साइडच बदललीय.

    ReplyDelete
  4. "कारण या निर्बुद्ध विचारवंत अभ्यासकांमुळे त्या पुरोगामी पक्षांच्या संघटना व आजवरच्या कामाला मोठा फ़टका बसला आहे आणि तो नजिकच्या काळात भरून येण्यासारखा नाही. अशा लोकांच्या कल्पना व गमजांनी लाखो कार्यकर्त्यांचा मुखभंग केला आहे. त्याची किंमत पैशात मोजता येणारी नाही. यातून पुन्हा उभारी घेऊन उभे रहाण्यासाठी त्या पक्षांना व संघटनांना काही वर्षे खर्ची घालावी लागणार आहेत. कारण अशा भुरट्यांसाठी एक राजकीय प्रयोग झाला, पण त्या त्या पक्ष व कार्यकर्त्यांसाठी अस्तित्वावर घाला पडला आहे"

    हे सर्वात महत्वाचे....👍👍

    ReplyDelete
  5. अजाणते राजे पण डोक्या वर पडल्या सारखे वक्तव्य देत आहेत. म्हणे सर्जिकल स्ट्राइक केलिच नाही..पुरोगामी राजांच्या पु निघतोय बाहेर... रक्ता सकट

    ReplyDelete
  6. हे तथाकित विचारवंत आणि विरोधी पक्ष अक्षरशः तोंडावर नुसतेच पडले नाहीत तर रक्तबंबाळ झाले आहेत तरी लोकांनाच शिव्या घालतात जो पर्यंत हे लोक आत्मपरीक्षण करत नाहीत तो पर्यंत असेच चालत राहणार

    ReplyDelete
  7. स्वतःच्या चूका मान्य करायला आणि कालाप्रमाणे बदलायला धैर्य लागते. शेखर गुप्ता यांनी दाखवून दिले आहे की त्यांच्यात असे धैर्य आहे. बाकीचे भाऊ पाध्ये यांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नॉन मॅट्रिक आहेत.

    ReplyDelete
  8. श्री भाऊ ह्या चा सख्खा भाऊ निखिल वागळे मराठीत शोधत फिरतोय मोदींच्या विजयची कारण

    ReplyDelete
  9. भिंतीवर फ्रेम करून ठेवावा असा लेख आहे. भविष्यातील प्रचंड वादळी घटना दडलेल्या आहेत. स्वातंत्र्याचे खरे मानकरी कोण आहेत हे जर पुढच्या चार वर्षात देशाच्या जनतेला मानणे भाग पाडले तरी या सत्ताविजयामध्ये राबणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या श्रमाचे चीज होईल. मुघलांशिवाय इतिहासच जेथे शिकवला जात नाही किंवा मानला जात नाही अशी लोकशाही देशाला भूषणावह नाही. नेसूचे ना सोडता खऱ्या अर्थाने सेक्युलर लोकशाही राबवली तर २० टक्के अल्पसंख्याकांचा विनोद नाहीसा होईल

    ReplyDelete
  10. भाऊ,
    ८ तारखेला पुण्यात झालेल्या तुमच्या कार्यक्रमाला मी पण होतो.तुम्ही मांडलेले विचार व प्रश्नांना दिलेली उत्तरे विचार करायला लावणारी होती.कार्यक्रम होऊन घरी येताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली म्हणजे,गेल्या ५ वर्षांत media नी आधीच गाळात गेलेली आपली विश्वासार्हता पूर्णतः गमावली आहे.
    याचे भान कोणा पत्रकारात दिसते काय?

    ReplyDelete
  11. नेहमीप्रमाणे अफलातून!

    ReplyDelete
  12. आपलं मोबाइल अँप तयार केले तर बरे होईल

    ReplyDelete
  13. Kuni hya video chi link dyal ka?

    ReplyDelete
    Replies
    1. https://www.youtube.com/watch?v=hwnnn1M-T5U

      Delete
    2. YouTube वर shekhar gupta yogendra yadav सर्च करा.

      Delete
  14. ' सबका विश्वास ' घोषणा देत मुस्लिमांवर करदात्यांचे पैसे उधळून स्वतः महान बनण्याचा प्रयत्न मोदींना हिंदू समाजात अप्रिय बनवणार हे नक्की. मोदीयुगाच्या अंताची सुरूवात स्वतः मोदींनीच केली आहे.

    ReplyDelete
  15. https://youtu.be/mL5quXQzLkY संपूर्ण व्हिडिओची लिंक.

    ReplyDelete
  16. भाऊ काका, ८ जूनच्या व्याख्यान चे व्हिडिओ शेअर करा.

    ReplyDelete
  17. भाऊ, अगदी योग्य व चोख विश्लेषण.

    ReplyDelete
  18. परफेक्ट.. एक्दम मस्त लेख.. भाऊ, सगळे हवालदिल आहेत कारण ते फक्त एक निवडणूक हरले नाहीत तर त्यातून सावरायला, बाहेर पडायला आणि पुन्हा शक्तिशाली भाजपला ललकारायला आता १० वर्षे लागतील इतके मोदींनी त्यांना खिळखिळे करून ठेवले आहेत.. त्यातून बहुतांश पक्षांमध्ये तरुण, अभ्यासू, हुशार आणि तडफदार तरुण नेत्यांची फळीच नाही.. ती सध्या तरी फक्त भाजपमधेच आहे.. म्हणजे आता लोकांसमोर सध्या असा एकाच पक्ष आहे जो पुढली १० वर्षे देशाला नेतृत्व देऊ शकतो... वाईट अवस्था झाली आहे बाकी सर्वांची.
    बाकी केजरीवालांसाठी आजवर वापरलेले उत्तम विशेषण - "भामटा".. लै भारी.. तो भामटाच आहे..

    ReplyDelete
  19. @ Ninad:
    Part 1:
    https://www.youtube.com/watch?v=mL5quXQzLkY


    Part 2:
    https://www.youtube.com/watch?v=jRkI6CDQvwc

    ReplyDelete
  20. Ninad Saheb Nice Helpfull Job.Thanks

    ReplyDelete