ज्यांना सतत परावलंबी जगायला शिकवलेले असते, त्यांना स्वावलंबी म्हणजे काय ते समजू शकत नाही. तो त्यांचाही दोष नसतो. मानसिक किंवा बौद्धीक विकास होताना ज्या गोष्टी ज्ञान म्हणून त्यांच्या मेंदूमध्ये ‘डाऊनलोड’ केलेल्या असतात, त्यांना नव्या गोष्टी समजूही शकत नाहीत. किंबहूना दुसर्या सोफ़्टवेअरचे आदेश समजणे शक्य नसेल, तर त्याचे आकलन होऊन तसे काम करणेही अशक्य असते. सहाजिकच पत्रालंबीत्व म्हणजेच स्वावलंबन असे मनात भिनलेले असेल, तर आत्मनिर्भर म्हणजे काय त्याचे आकलन अशा लोकांना खुळेपणा वाटणे स्वाभाविक आहे. हातात वाडगा घेउन कुठल्याही दारात उभे रहाणे हाच त्यांना रोजगार वाटत असतो. एकदा तेच धोरण वा विचारधारा बनली, मग तेच तत्वज्ञान होऊन जाते. सहाजिकच कुठल्याही समस्या वा उपायांवर वाडगा घेऊन भिक मागणे, हा हक्क मानला जाऊ लागतो. कोरोनानंतर जी परिस्थिती उदभवली आहे, त्यावरचा उपाय म्हणून देशातले वा प्रस्थापिताचे बहुतांश समर्थक प्रत्येक बाबतीत पॅकेजसाठी वाडगा घेऊन रांगेत उभे ठाकले, तर नवल नाही. पण त्यांच्या वाडग्यात कोणीतरी काहीतरी टाकायचे, तर ते आणायचे कुठून व कसे, याचा पर्याय उपाय त्यांना सांगता येत नाही. त्यामुळेच पंतप्रधानांनी जाहिर केलेले २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज रोखीतली रक्कम नसेल, तर त्यांना सगळे पॅकेज देखावा वाटल्यास आश्चर्य मानण्याचे कारण नाही. कारण त्यांनी आजवर हातात वाडगा घेण्यालाच गरीबी दुर करण्याला उपाय मानलेले आहे. त्यांना कष्टातून संपत्ती निर्माण होते वा त्यातून सबलीकरण होऊ शकते, हे कसे कळावे? कारण त्यांना अमर्त्य सेन वा रघुराम राजन किंवा अभिजित बानर्जी ठाऊक असतात, वाचलेले असतात. पण समावेशी विकासाचा जाणकार म्हणून ओळखला जाणारा रॉबर्ट चेंबर्स ठाऊकही नसतो वा नसावा. ठाऊक असता, तर त्यांना मोदींनी पॅकेजमधून काय योजलेले आहे, त्याचा अंदाज आला असता.
रॉबर्ट चेंबर्स हा जगातला एक प्रमुख विकास अर्थशास्त्र जाणकार आहे. त्याने गरीब, वंचित व दुर्लक्षितांना विकास योजनेत मुख्यस्थानी आणून बसवले. विकासाचा विचार करताना व धोरण आखताना अशा दुर्लक्षित वर्गाला मुख्य केंद्र मानले नाही तर संतुलित विकास होऊ शकणार नाही, याचे भान असलेला तो अर्थशास्त्रज्ञ होता. म्हणूनच त्याने गरीबाला भिक घालणे वा उपकार वा दान म्हणून त्याच्या अंगावर काही फ़ेकण्याची कल्पना झुगारली. त्याच गरीब वंचिताला मानवी विकासाच्या मुख्यप्रवाहात सहभागी करून घेण्याची भूमिका हिरीरीने मांडली होती. ती मांडताना विकासाची फ़ळे त्याच गरीबाच्या वाट्याला यावीत, असा विकास करताना त्याला स्वयंभू स्वावलंबी बनवण्याचा विचार मांडलेला होता. आर्थिक शोषणावर आधारलेल्या अर्थकारणाला बाहेर काढून समावेशक विकास व त्यासाठी वंचितालाही त्यातला भागधारक बनवण्याची ही संकल्पना म्हणजेच आत्मनिर्भरता असते. असा सामान्य दुर्लक्षित, कष्टकरी आपल्या श्रमातून नवी संपदा निर्माण करतो आणि आर्थिक व्यवहारातली श्रीमंती एकूण समाजाला संपन्नतेच्या मार्गावर घेऊन जाते. त्याच्या निम्नस्तरीय जीवनातले स्थैर्यच वरच्या वर्गाला श्रीमंतीकडे घेऊन जाणारे यंत्र असते. त्याची मांडणी चेंबर्सच्या विचारातून पुढे आली आणि त्याचा सगळा भर हा पायाभूत सुविधांच्या उभारणीवर होता. ग्रामिण पायाभूत सुविधा व त्यातही प्रत्येक गाव शहरांना जोडणारे सुसज्ज रस्ते हा त्याचाच आग्रह होता. पण इथे अर्थशास्त्री म्हणून मिरवणार्या किंवा विश्लेषक म्हणून नाचणार्यांनी कधी चेंबर्सच्या गरीबी हटावचा अभ्यास तरी केला होता काय? भारतातल्या गरीबीलाही हटवण्यात त्याच्याच विचारांनी मोठा हातभार लावलेला आहे. पण वाडगा संस्कृतीलाच अर्थकारण समजून बसलेल्यांना चेंबर्स ठाऊकच नव्हता किंवा बोलायचेच नसेल. मग त्याच दिशेने पुढले पाऊल टाकणार्या मोदींचा आत्मनिर्भर पॅकेज कळण्याची
शक्यता किती असेल?
तब्बल बारा वर्षापुर्वी या संदर्भात इकॉनॉमिक्स टाईम्सचे संपादक स्वामीनाथन अय्यर यांचा एक खास लेख प्रसिद्ध झाला होता. तेव्हा सत्तेत असलेल्या सोनियाप्रणित युपीए सरकारने सरकारी तिजोरी खुली करून ज्या खिरापत वाटण्याच्या अनेक योजना सुरू केल्या, त्यात अन्न सुरक्षा वा मनरेगा नावाने लाखो कोटी रुपयांची उधळण सुरू झालेली होती. गरीबी हटवण्याच्या गर्जना चालल्या होत्या. पण त्यातून किती गरीबी दुर होते? तत्पुर्वी वाजपेयी सरकारने ज्या पायाभूत योजनांवर पैसा खर्च करण्याचा सपाटा लावला होता. त्यातून किती गरीबी दुर होऊ शकते, त्याची तुलनात्मक आकडेवारी अय्यर यांनी त्या लेखात मांडलेली होती. स्वातंत्र्योत्तर काळात देशामध्ये अशी गरीबाला मदत देण्यावर अफ़ाट रक्कम खर्च करण्यात आली. पण त्यातून किती गरीब त्या गरीबीच्या रेषेतून वर आले? उलट गरीबीऐवजी पायाभूत सुविधांवर झालेल्या खर्चातून किती गरीब सावरले, त्याची तुलना त्यात आढळते. या संपुर्ण कालावधीमध्ये अशा गरीब कल्याणाच्या योजनेत प्रत्येक दहा लाख रुपये खर्चले, तर त्याचा किती गरीबांना लाभ मिळू शकला आहे? प्रत्येक दहा लाख खर्च रुपये शिक्षणाचे अनुदान म्हणून खर्च केल्यावर १०९ लोक गरीबीतून मुक्त होऊ शकले. तर तितकीच रक्कम जलसंधारणावर खर्च केल्याने ६७ लोकांना गरीबीतून मुक्ती मिळू शकली. प्रत्येक दहा लाख रुपयांचा खर्च कर्जमाफ़ीत केल्यावर ४२ जण, वीजदरात सवलत दिल्याने २७ जण आणि खताच्या अनुदानातून फ़क्त २४ जण गरीबीच्या बाहेर पडू शकले. याच्या उलट परिस्थिती
पायाभूत सुविधांनी गरीबांना दिलेल्या लाभाची आहे. प्रत्येक दहा लाख रुपयांचा खर्च रस्ते बांधणीवर झाला, तेव्हा तब्बल ३२५ लोक गरीबीच्या रेषेखालून वर आले. तर संशोधन विकासावर तितकीच रक्कम खर्च झाल्यामुळे ३२३ लोक गरीबीमुक्त व्हायला हातभार लागला. ह्या तुलनेला समजून घेतले पाहिजे. तर आत्मनिर्भर पॅकेजचे आकलन होऊ शकेल.
वर जी उदाहरणे दिलेली आहेत, त्यात दोन प्रकारच्या खर्चाची तुलना आहे. एक खर्च हा थेट सामान्य माणसाला मिळू शकणारा पैसा आहे, किंवा त्याच्या नावावर सरकारी तिजोरीतून काढला जाणारा पैसा आहे. त्याच्या उलट दुसर्या गटातला खर्च हा गरीबांच्या नावाने सरकारी तिजोरीतून खर्च झालेला पैसा नाही. ज्याला सरसकट विकासखर्च म्हणता येईल अशा सर्वांगिण विकासाच्या योजनेवर दहा लाख खर्च झाले, तर अधिक लोक गरीबीमुक्त झाले आहेत. त्याच्या उलट जी रक्कम गरीबाच्या नावाने खर्च झालीच नाही, तिने अधिक लोक गरीबीतून मुक्त झालेले आहेत. मग दिर्घकाळ गरीबांच्या नावाने चाललेली खिरापत कशासाठी चालली वा उधळली गेली? आजही तशाच पद्धतीने मोदी सरकारने गरीबांच्या नावाने तिजोरी खुली करण्याचा आग्रह कशासाठी आहे? राहूल गांधींचे पिताजी राजीव गांधी ३५ वर्षापुर्वी म्हणाले होते, शंभर रुपये गरीबांसाठी पाठवले किंवा खर्च केले; तर त्याच्यापर्यंत केवळ १२-१५ रुपये पोहोचतात. त्यातली ८५ टक्के रक्कम मधल्यामध्ये हडपली जाते. आजही तेच चालते. म्हणूनच फ़क्त खताच्या अनुदानाला लगाम लावण्याची पावले मोदी सरकारने उचलली आणि युरीयाची टंचाई संपली. त्याही खर्चातली ६० हजार कोटींची बचत झाली. पायाभूत सुविधांवर किंवा संशोधन विकासावर खर्च केल्यामुळे गरीबी संपते म्हणजे काय? त्यालाच साध्या भाषेत आत्मनिर्भरता म्हणतात. पण वाडगा घेऊन फ़िरण्यालाच गरीबांचे कल्याण ठरवून बसलेल्यांना आत्मनिर्भर शब्दाचे आकलन म्हणूनच होऊ शकणार नाही. कोरोनातून अर्थव्यवस्था बाहेर काढताना मोदी सरकारने आणलेले पॅकेज, ही नुसती उधळपट्टी वा खिरापत नसून विकास, पायाभूत सुविधा यातून गरीबांना सुसह्य जीवनाकडे घेऊन जाण्याची योजना आहेच. पण त्यातून त्यांना रोजगाराची हमी व उत्पन्नाची कायम हमी देणारीही आहे. मनाने परावलंबी व विचारांसाठीही वाडगा घेऊन पाश्चात्य देशात भिक मागणार्यांच्या आवाक्यात येणारी ती गोष्ट नाही.
भाऊ,भारत गस असा देश आहे जिथे प्रचंड बेकारी आहे पण काम करायला लोकच भेटत नाहींत,
ReplyDeleteकाँग्रेस ने लोकांना लुळ केलं,
लोकांना खिरापतीची एवढी सवय झाली की आता लोकांना कामच करू वाटत नाही,
जेवढी शेतमालाची भाववाढ झालीं त्याचा कितीतरी अधिक पटीने मजुरीचे दर वाढले, तरी शेतमजूर मिळत नाहीत,
Correct 👍🙏🌹☑️✍️
ReplyDeleteभाऊ, अत्यंत परखड लिहीता आपण. अहो भाऊ, हे स्वतः चोर यांनी सत्तेवर असताना पँकेज दिली आणि स्वतःची आणि स्वतःच्या पित्त्यांची घरे भरली व ज्यांच्यासाठी पँकेज दिली ते आहे तेथेच राहिले, नाहीतर युपीएने दोन वेळा कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबल्या नाहीत? पण कर्जमाफीमुळे या बड्या धेंड्याची कोट्यवधी रुपयांची कर्जे माफ होऊन सहकारी बँका तरल्या. फडणवीस सरकारची जलशिवार योजना अशीच शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेकडे नेण्याची सुरवात करणारी होती पण ठाकरे सरकारने बंद केली किंवा त्यांना करायला लावली, कारण शेतकरी आत्मनिर्भर झाला तर वारंवार कर्जमाफीचा वाडगा त्याच्या हाती देऊन यांचे खिसे कसे भरणार?
ReplyDeleteभाऊ
ReplyDeleteलेख नेहमीप्रमाणे छान आहे.पण हे आत्मनिर्भरतेचे धोरण राबवणारी नोकरशाही ही अकार्यक्षम संवेदनाहीन वेळखाऊ व भ्रष्ट आहे.आपल्या अधिकाराच्या तोर्यात वागणारी आहे
मोदीनी मांडलेल्या योजनानां यश मिळावे अशी इच्छा आहे.पण आत्मनिर्भर बनणे खडतर आहे.
झकास भाऊ..👍👍
ReplyDeletePerfect Bhau. These steps by PM and his team will change the future of everyone. Sabka Sathh sabka viswas.
ReplyDeleteयावर एक व्हिडिओ बनवा भाऊ....
ReplyDeleteभाऊ... हे पॅकेज सर्वसामान्य लोकांपर्यंत कसे पोहचेल याविषयी एक व्हिडिओ बनवा.
ReplyDeleteबालबुद्धी आणि बालहट्ट... नशीब आपले पंतप्रधान राहूल गांधी नाहीत.
ReplyDeleteभाऊ, या सर्वांना फक्त देखावा करून देश लुटायचाय. गरिबाला गरीबच ठेवायचेय. त्यांचे अस्तित्वच त्यावर अवलंबून आहे. म्हणूनच बँकिंग क्षेत्रात आम्ही पाश्चात्य अर्थव्यवस्थेवर आधारित मानक आणले. त्यासाठी यांना ररारा सारखे विद्वान त्यासाठीच लागतात. आणि नोबेल कसे मिळवले जाते (मिळत नाही) त्यामागची सिस्टिम काय हे सर्वश्रुत आहे.
ReplyDeleteस्वामीनाथन च्या लेखा ची लिंक असेल तर प्लिज शेअर करू शकता का
ReplyDeleteभाऊ नेहमीप्रमाणे लेख उत्तम.. आपण जो प्रतीपक्ष नावाचा युट्युब चॅनेल आहे त्यावरील आपले विश्लेषण उत्तम असते ...एक विषय सुचवावा असं वाटतंय.. श्री उद्धव ठाकरे हे स्वतः अतिशय सोज्वळ पणाचा भाव तोंडावर आणून बोलत असतात आणि त्याच वेळेला त्यांचाच सामना वृत्तपत्र भाजप विरुद्ध गरळ ओकत असते.. आणि हे दररोज असते.. हे राजकारण नाही का त्या काळात.. त्यामुळे यात शिवसेनेचा कोणता फायदा होतोय हे मला समजत नाही ..उलटपक्षी लोकांना एक प्रकारचा इरिटेशन यायला लागले आह..त्यातून शिवसेनेचा कोणताही मतदार वाढणार नाहीये.. एखाद्याला कमीच होऊ शकतो त्यामुळे जमल्यास ह्या विषयावर व्हिडिओ बनवावा प्रतिपक्षावर ही नम्र विनंती यावरील आपले विश्लेषण ऐकण्यास उत्सुक आहोत धन्यवाद
ReplyDeleteकाम करी दाम;दान करी नादान असे बाबा आमटे म्हणाले होते त्याची आठवण झाली लेख वाचताना.ज्यांची दखल घेण्याची गरज नाही अशा पंडीतब्रुवांवर टीका करण्यात अर्थ नाही .त्याना सरळ किंवा उपरोधाने कसेही संगितले तरी कळणार नाही तेव्हा त्याना अनुल्लेखाने मारा एवढेच नम्रपणे सुचवतो .लेख उत्तम .गांधीवादाचे भाष्यकार विनोबा तसे मोदीवादाचे आपण आहात .
ReplyDeleteKhangress family kingdom empire government la fakta garib, katora hatat ghetlela Bharat havay
ReplyDeleteभाऊ तुम्ही हिंदी मध्ये बॉग लिहू शकता का? तुम्ही google translate वापरून तुमच्या मराठी लेखांचे हिंदी मध्ये रुपांतर करू शकता का ?
ReplyDeleteResp Bhau..
ReplyDeletePerfectly written article in understanding development economics and alleviation of poverty.
Your article definitely helps to understand how to create Nation's wealth.
Yours article need to be published in front line marathi newspapers and journals.
Regards
Vinod Shetti
Mast bhau
ReplyDeleteअगदी बरोबर आहे!हे रॉबर्ट चेंबर्स अर्थशास्त्रच्या 'नोबल' लॉबीमध्ये जाण्याचे उद्दिष्ट न ठेवता खरोखरच अभ्यासपूर्ण मत नोंदवतात.पण आपल्या कडील सं-पादक बाहेरचे खाऊन.. सॉरी.. वाचून .. मोठ्या शहाणपणाचे धडे गाजावाजा करत स्वत्ःच्या नावावर आपल्यात .. मधेमधे सुभाषिते टाकल्याप्रमाणे केन्स पासून बॅनर्जी काय म्हणतात ते सांगत स्वतःच्या गाढ विद्वत्तेचे प्रदर्शन मांडायला विसरत नाहीत.अनेकजण भारतीय सरकारच्या तुलनेत श्रीमंत पाश्चिमात्य व अमेरिकन सरकारं सार्वजनिक आरोग्यावर किती जास्त खर्च करतात हे सांगताना तेथील आरोग्य सेवा काय लायकीची आहे याबद्दल मौन बाळगतात...जी आहे उघडी पडली आहे त्यावर टेस्ट खूप जास्त प्रमाणात असल्याचे सांगून डेथ रेट कडे सोईस्करपणे दुर्लक्ष करतात!आता आपल्या कडीलही यात प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे तेंव्हा हेच कावळे मोदी कसे चुकले सगळा कसा फज्जा उडाला हे आसुरी आनंद घेत गदारोळ उठवण्यासाठी टपलेले आहेत.त्यांना भारतीय लोकशाहीतील लोकसंख्या,गेल्या ७० वर्षाच्या अनुदान रूपी भ्रष्टाचाराचा, आणि सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या असंख्य कारणांचा विचार मनात आणणं म्हणजेच आपण करत असलेल्या सरकार विरोधाच्या अजेंड्यावर कुर्हाड मारून घेण्यासारखे आहे हे माहीत असल्याने त्या प्रॉब्लेमची कारणमीमांसा करणे टाळण्याचा पळपुटेपणा करण्याची लाज वाटत नाही.
ReplyDeleteअसो.
भाऊ तोरसेकर तुम्हाला एक विनंती आहे..
फक्त ब्लॉग पुरते मर्यादित न राहता उत्साही व तुमच्या हाताखाली निर्भीड व संतुलित पत्रकारीता शिकण्याची इच्छा असलेल्या तरूण.. मध्यमवयीन लोकांना हाताशी धरून इ पेपर तुम्ही आणि स्वाती ताईंनी सुरू केल्यास नवी पिढी निर्माण होण्यास मदत होईल.आचार्य अत्र्यांची परंपरा चालू ठेवण्याचे मोठे योगदान होईल.हे काम शिव धनुष्य उचलण्यासारखे आहे पण तुम्हा दोघांच्या मार्गदर्शनाखाली शिकायला मिळाण्यासाठी खूप तरूण पुढे येतील अशी खात्री आहे.🙏
भाऊ , नमस्कार !
ReplyDeleteप्रतीपाक्ष चॅनल वर कमेंट करता येत नसल्याने इथे करत आहे - क्षमा असावी पण रहाविले नाही.
आज स्वाती ताईंचा "जिनपिंग आपल्याच चक्रव्यूहात" हा व्हिडिओ पाहिला - अतिशय उत्तम. स्वाती ताईंचा ज्ञान खूपच प्रगल्भ आणि व्हिडिओ पण अतिशय उत्तम झाला आहे.
आंतररष्ट्रीय राजकारण आणि संबंध ह्यावरील त्यांचे अधिकाधिक विचार ऐकायला आवडेल.
http://swatidurbin.blogspot.com/
Deleteआपण स्वाती ताईंना इथे प्रतिक्रिया देऊ शकता
भाऊसाहेब, माझ्यामते जमाती लोकांएवढाच मजदूर पलायन हे गुन्हेगारी कॄतय आहे. असेच चाललयास कोणतेही लोकशाही सरकार किंवा जनता सुरक्षित नाही.
ReplyDelete_ डाॅ सुहास काटदरे
भाऊ नमस्कार आत्ता तुमचा प्रतिपक्ष वरती उद्धवराव आकडे बोलतात व्हिडिओ बघितला थोडा स्पष्टपणे बोलतो पण फीडबॅक जरूर घ्यावा मुद्दे पटले नाहीत.. पहिल्यांदा तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हीच मार्क यांचे उदाहरण दिले होते स्टॅटिस्टिक डेटा वरती आणि आता तुम्ही तो स्टॅटिस्टिकल डेटा धरून उद्धवराव यांचे समर्थन करत आहे.. मुद्दा क्रमांक 2 जर तुम्ही फक्त भारताचे नंबर बघितलेत तर महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे आणि त्यानंतर पुढची पाच राज्यांची टोटल केली जेवढे नंबर होता तेवढे महाराष्ट्रातील आहे त्यामुळे जरी भारताने चांगला केला असेल तर त्या सगळ्याचा चांगले केलेल्या मध्ये सगळ्यात वाईट जर कोणी केला असेल तर ते उद्धव ठाकरे यांनी केलेला हा त्यातला आशय आहे अर्थ निघतो आहे त्यामुळे हा व्हिडिओ या वेळेत मांडलेली मते मला पटली नाहीत
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteअर्थशास्र्त्याला लाजवेल असं विवरण
ReplyDelete