Friday, November 14, 2014

उघडे पडलेले झाकावे कशाला?



बुधवारी विधानसभेत ज्याप्रकारे भाजपाने आपले बहूमत सिद्ध केल्याचा दावा मांडला आहे, तो त्यांच्या घसरगुंडीची सुरूवात म्हणायला हरकत नाही. कारण शिवसेनेला सोबत घेऊन त्यांना भक्कम सरकार स्थापनेची संधी मतदाराने दिलेली होती. ज्या जागावाटपातून पंचवीस वर्षे जुनी युती भंगली, त्यामागे जागांचा वाद नव्हताच, असे आम्ही वारंवार सांगत होतो आणि त्याचीच ग्वाही बुधवारी भाजपाने आपल्या कृतीतून दिली. निवडणूकपुर्व युती तोडायची हा भाजपाचा हेतू उघड होता. त्यासाठी त्यांना शरद पवार यांची साथ मिळालेली होती. कारण मागल्या साडेतीन वर्षात सत्तेत बसून राष्ट्रवादी व बाहेर विरोधात बसून भाजपा, यांनीच संगनमताने महाराष्ट्राचा कारभार चालविला होता. प्रत्येक घोटाळ्याचा विषय निघाला, तेव्हा त्यात राष्ट्रवादीच्या सोबतच भाजपाचा कोणी ना कोणी गुंतला असल्याचे प्रत्येकवेळी समोर आलेले होते. त्यामुळेच या दोन्ही पक्षांना आपापली पापे लपवण्यासाठी एकमेकांची साथ देण्याखेरीज गत्यंतर नव्हते. सहाजिकच नाटकातल्या भूमिका पार पाडल्यासारखे दोन्हीकडले नेते एकमेकांशी लढायची जबाबदारी पार पाडत होते. यावेळी सत्तापालटाची संधी आली, तेव्हा म्हणूनच दोघांना त्यात शिवसेनेला खड्यासारखे दूर करायचे होते. त्यासाठीच मग पवारांनी भाजपाला घाऊक उमेदवार पुरवले आणि बदल्यात भाजपाने युती मोडण्याची अट पुर्ण केली. समजा सेनेने १२० किंवा शंभर इतक्या कमी जागा स्विकारल्या असत्या, तरीही युती तुटायचे थांबले नसते. कारण तोच तर पवार-भाजपा यांच्यातला समझोता होता. जेव्हा त्याप्रमाणे पावले पडली, तेव्हा आघाडीतून बाहेर पडून पवारांनी चौरंगी लढतीमध्ये भाजपाला बहूमताच्या जवळ आणून ठेवण्याचे आमिष दाखवले. पण ते पुर्ण होणार नाही, याचीही व्यवस्थित काळजी घेतली. कारण पुर्ण बहूमत मिळाल्यास त्यांची भाजपाला गरज उरली नसती.

मात्र धुर्त पवार किंवा भाजपातल्या चतुर चाणक्यांपेक्षा भारतातला सामान्य मतदार अधिक चाणाक्ष आहे. म्हणुनच त्याने भाजपा व सेनेसह राष्ट्रवादीला इतक्याच जागा दिल्या, की स्थीर सरकार हवे असेल, तर सेना भाजपाला सोबत येणे भाग पडावे. तसे होणार नसेल, तर भाजपा व राष्ट्रवादी यांच्यातली मिलीभगत चव्हाट्यावर यावी. बुधवारी त्याचेच प्रदर्शन अवघ्या जगाला घडले. सुदैवाने आपल्या पक्षात मंत्रीपदासाठी उतावळे झालेल्या आमदारांना वेसण घालून उद्धव ठाकरे यांनी विरोधात बसायचा ठाम निर्णय घेतल्याने मतदाराचे ते इप्सित तडीस गेले. कारण विधानसभेच्या व्यासपीठावर भाजपाला राष्ट्रवादीचा उघड पाठींबा घेण्य़ाची नामुष्की त्यामुळेच आली. जर उतावळ्या सत्तालोलूपांना उद्धव बळी पडले असते, तर सेनेचा पाठींबा दाखवून भाजपाचा राष्ट्रवादीशी दिर्घकाळ चालू असलेला व्याभिचार झाकला गेला असता. सुदैवाने तसे झाले नाही आणि सध्या सत्तेवर असलेले फ़डणवीस सरकार हे राष्ट्रवादीच्या कृपेने तगलेले ‘पवारावलंबी’ सरकार असल्याचे जगाला उघड्या डोळ्यांनी बघायची संधी मिळाली. ही अर्थातच सामान्य मतदाराचीच इच्छा होती. तसे नसते तर त्याने भाजपाला पुर्ण बहूमत देऊन टाकले असते. पण तसे झाले नाही, होऊ शकले नाही. शिवाय भाजपाला आपल्याच भागीतला राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार संपवायचा नव्हता. तो संपवायचा नसेल, तर सत्तेची सुत्रे शिवसेनेकडे जाऊ नयेत आणि सत्तेत सेनेचा वरचष्मा असता कामा नये, याची आधी तरतुद करणे भाग होते. त्यासाठीच मग युती मोडण्याने या नाट्याला सुरूवात झाली होती. त्यासाठी जागावाटपाचा तिढा निर्माण करण्यात आला. मात्र त्यासाठी केलेले वा दाखवलेले सर्व युक्तीवाद मतदाराने फ़ेटाळले आणि भाजपाने सेनेशीच सत्तेत युती करण्याची परिस्थिती निर्माण करून ठेवली. त्याचा मुखभंग करीत शेवटी भाजपाला आपल्या व्याभिचाराशी संगत करावी लागली आहे.

सेनेशी सोबत करून आणि अगदी अधिक मंत्रीपदे सेनेला देऊनही भाजपाला सरकार बनवण्यात कुठली अडचण होती? पवारांच्या बाह्य पाठींब्यापेक्षा सेनेच्या सोबतचे सरकार अधिक स्थीर व भक्कम होऊ शकले असते. पण तसे झाल्यास बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणांना हात घालावा लागला असता. त्यमध्ये मग पवारांच्या अडवणूकीचा धोका नव्हता. मग ते काम कशाला करत नाही, असे सवाल विचारले गेले असते. तेच टाळायचे होते, म्हणजेच मुद्दाम सरकार लंगडे ठेवून आपल्याला ठोस कारवाई करता येत नाही, अशी सबब निर्माण करायची होती. म्हणुनच सेनेची सोबत भाजपाला नकोच होती. म्हणून जागावाटप असो किंवा सत्तेमध्ये सेनेला सहभागी करून घेण्याचा विषय असो, भाजपाने नुसत्या ‘सकारात्मक’ चर्चेचे गुर्‍हाळ लावून ठेवले होते. पण सेनेला कुठल्याही परिस्थितीत सोबत घ्यायची वेळच येऊ नये, अशी रणनिती राबवली होती. कारण मुळातच भ्रष्टाचार विरोधातही भाजपाची लढाईच खोटी व दिखावू होती. उलट यात राष्ट्रवादी इतकीच भाजपाची भागिदारी आहे. मात्र ते पाप झाकण्यासाठी त्यांना आपण राष्ट्रवादीच्या सोबत नाही किंवा त्यांच्या पाठींब्यावर अवलंबून नाही, हे सुद्धा दाखवायचे आहे. त्याच नाटकाची तारेवरची कसरत करताना भाजपाची आता तारांबळ उडाली आहे. म्हणून मग पुन्हा विश्वासमतानंतर सेनेशी चर्चेचे गाजर दाखवण्यात आलेले होते. सेनेच्याच पाठींब्याने बहूमत सिद्ध केल्याचे नाटक रंगवायचा अखेरचा अंक मात्र फ़सला. कारण शेवटच्या क्षणी उद्धव यांनी ठामपणे विरोधात बसायचा निर्णय जाहिर केला आणि भाजपाला पवार यांच्याच टेकूचे प्रदर्शन मांडायची नामुष्की ओढवली. त्यातून पळवाट काढण्यासाठी मग आवाजी मतदानाचे हंगामी नाटक रंगवण्यात आले. मात्र ती कसरत करताना भाजपाची अब्रु पार धुळीस मिळाली आहे. कारण आता त्यांचे ‘पवाराधीन’ असणे लपून राहिलेले नाही.

मांजर डोळे मिटून दूध पिते म्हण्तात, तशी भाजपाची फ़सगत होऊन गेली आहे. त्यांची राष्ट्रवादीशी असलेली सलगी व भागीदारी दिवसेदिवस उघड होत चालली असून जितकी ते पाप झाकायची कसरत चालू आहे, तितकी अब्रु अधिकच उघडी पडते आहे. बुधवारी बहूमताच्य वेळी मतदान घेतले गेले असते, तर सेनेसह कॉग्रेसने विरोधात मते दिली असतीच. पण राष्ट्रवादी आमदारांनी सभात्याग केला किंवा बाजूने मतदान केले, तरी फ़डणवीसांचा बोलविता धनी चव्हाट्यावरच आला असता. पण आवाजी मतदानामुळे तसे आज कोणी खुलेआम म्हणू शकत नाही. पण दिसायचे ते आणि उमजायचे ते सामान्य माणसाला उमगले आहे. त्यामुळे आता भाजपाने उगाच अधिक लपवाचपवी करायचे कारण उरलेले नाही. त्यांनी राष्ट्रवादीला सोबत घ्यावे आणि पाच वर्षे सत्ता टिकवायची असेल तर चक्क अजितदादांना उपमुख्यमंत्री केले तरी बिघडणार नाही. कारण आता कितीही नाकारले तरी भाजपाचे साटेलोटे कोणाशी आहे, ते लपून राहिलेले नाही. त्यांना युती वा शिवसेनेची सोबत कोणामुळे नको होती, त्याचेही रहस्य आता गुढ राहिलेले नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध भाजपाची लढाई किती लुटूपूटूची होती, तेही हळुहळू लोकांच्या अनुभवास येणारच आहे. तेव्हा अकारण मुख्यमंत्री वा मंत्री झालेल्यांनी आपल्या जीवाची घालमेल करून घेण्याचे कारण नाही. खुलेआम राष्ट्रवादीला सोबत घ्यावे. निदान घेतली आहेत ती सत्तापदे मनसोक्त यथेच्छ उपभोगावी. मग सरकार काही महिने टिकेल किंवा चांगले पाच वर्षे टिकेल. जो काही काळ मिळेल, त्यात मौजमजा करून घ्यावी. कारण बुधवारी जे काही घडले, जनतेने बघितले, त्यानंतर भाजपाने विश्वासमत भले संपादन केले असेल, पण जनमानसातील विश्वास गमावला आहे. पुढल्या वेळी खुद्द पवारांसह त्यांचा राष्ट्रवादी पक्ष भाजपात सामावून घेतला, तरी भाजपाला सत्तेत सोडा, विरोधी पक्षातही लोक बसवणार नाहीत हे नक्की.

9 comments:

  1. NCP chya files open karavyat...
    swatahach swatahacha sarkar paadava ...
    MNS will bounce back and BJP+MNS+ apaksh asa navin sarakar yeil ...

    ReplyDelete
  2. Manya....भाजपाला सत्तेत सोडा, विरोधी पक्षातही लोक बसवणार नाहीत हे नक्की.

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    तुम्ही पहिल्या परिच्छेदात वर्णिलेली नीती अंमलात येण्यासाठी केवळ गोपीनाथ मुंड्यांचा अडथळा होता. म्हणूनच त्यांचं अकस्मात झालेलं निधन अत्यंत संशयास्पद वाटू लागलंय. बहुधा पंपादेवींना मंत्रीपद देऊन गप्प बसवण्यात आलंय. इतरांच्या तुलनेत त्यांचं कर्तृत्व काहीच नाही. त्या कुठल्या आधारावर मंत्री म्हणून निवडण्यात आल्या हे जाहीर केलेलं नाही.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. he khar aahe ki jnaatela ata kalale aahe ani Mundena marayech kam pan yannich kel aahe

    ReplyDelete
  5. १२ चा उपयोंग करून २० ला गादिवर बसवणाऱ्यांनी जनतेच्या विश्वासाचे ३-१३ केले। शेवटी काय आमच्या शिवसेनेच्या कमलाबाईवर १२-मती(भानामती) करून तिला साहेबानी ठेवलि।कमलाबाईचा चांगल्या डरकल्या फडना(रा) २० नंबरी वाघ आता गळ्यात घड्यळीचा पट्टा घालून दादांच्या घोटाळ्याची इमiनीने राखन करणार आणि शिवसेनेवरच भूँकनार हे मात्र नक्की … … … … साहेब लई भारी माणूस… … … लई डेंजर… … … …… हवा इटलीची असो वा चहावाल्याची… … … ……साहेबांच्या चहा-नास्ताची सोय होउनच जाते।

    ReplyDelete
  6. Khup chhan bhau..paha na gopinath munde gele ani rajkaran kay zale...he sagle tharwun ahe bhau....mi sahamat ahe bhau

    ReplyDelete
  7. होय भाजपची उलटी गणती सुरु झालीयं.

    ReplyDelete
  8. भाऊ, तुम्ही काही गोष्टीबाबत तुमचे मत, अभिप्राय, माहिती,इ जागता पहाराच्या सर्व वाचकांना जरुर सांगावे ही विनंती.
    १ शिवसेना काही मंत्रीपदे कमी घेऊन तडजोड करू शकली असती.शिवसेना सत्तेतील ठराविक वाट्यासाठी अडून बसली आहे असे म्हणता येईल का? २ राष्ट्र्वादीच्या भ्रष्टाचाराची शिवसेनेला एवढी चीड आहे तर त्यांनी भाजपच्या मागणीप्रमाणे बिनशर्त पाठिंबा देऊन कठोर व जलद कारवाईची मागणी क्रायला हवी होती.त्यानंतर जर भाजपने काही केले नसते तर ते जनतेसमोर आले असते. ३ काही वर्षांपूर्वी जेव्हा पवार साहेबांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत होते तेव्हा शिवसेनेने मराठी माणूस म्हणून त्यांना पाठिंबा जाहीर केल्याचे आठवते. तेंव्हा पवार भ्रष्टाचारी नव्हते का? ४. प्रतिभाताई पाटील यांनादेखील शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी मराठी माणूस म्हणून पाठिंबा दिला. प्रतिभाताई पाटील यांची हिंदुत्त्वाबद्दल काय भूमिका आहे? ५ अनंतराव गीते यांनी आजूनही राजीनामा दिला नाही. ते म्हणजे शिवसेना सत्तेला चिकटून बसले आहेत असे म्हणता येईल का?
    ६ भाजपने शिवसेनेचा पाठिंबा घेतला नाही. त्यांनी लोकांच्या भावनेचा अनादर केला. तसेच शिवसेनेने भाजप सरकारला पाठिंबा दिला नाही.शिवसेनेनेदेखील लोकभावनेचा अनादर केला असे म्हणता येईल का?
    ७ पुन्हा युती का झाली नाही याबद्दल भाजप व शिवसेना दोघेही जाहिरपणे काहीच का बोलत नाहीत?
    ८ भरतकुमार राऊत यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळच्या घडामोडी हे दोघांचे फिक्सिंग होते असे म्ह्टले.त्यात तथ्य किती?
    ९ विधानसभेचे अध्यक्षपद मिळावे यासाठी शिवसेनेने दोनही कॉंग्रेसशी संपर्क केला यातून काय दिसून येते?
    १० विश्वासमताच्यावेळी केव्हा मतदानची मागणी करायची असते याबाबतचा नियम शिवसेनेच्या एकाही आमदारला माहिती नाही का?
    ११ भाजप सरकारवर अविश्वास ठराव आणण्याची घोषणा शिवसेनेने अजून का केली नाही? सुधीर गाडे

    ReplyDelete