Wednesday, September 23, 2015

स्वातंत्र्य चळवळीत सोनियांचा सिंहाचा वाटा!



सध्या ममतांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संबंधात जी कागदपत्रे खुली केली आहेत, त्यांनी आजवरच्या अनेक समजूतींचा धक्का बसला आहे. खेरीज नेताजीच्या अपघातावर शंका घेऊन नवनवे सिद्धांत मांडणार्‍यांची नेहमी टवाळी जरण्यात धन्यता मानलेल्यांची पुरती कोंडी झाली आहे. सहाजिकच आपले झाकून दुसर्‍याचे वाकून बघण्याच्या नितीनुसार युक्तीवाद पुढे येत आहेत. त्यात मग कारण नसताना सावरकर-संघ यांना ओढले जाते. विषय नेहरू व नेताजी असा असताना स्वातंत्र्य चळवळीत संघाचे योगदान किती व कोणते; असा प्रश्न विचारण्याचे कारणच काय? नेताजींच्या मृत्यू वा अपघाताविषयी नेहरूंच्या जमान्यात धोरण म्हणून ज्या अफ़वा पसरवल्या गेल्या, त्याविषयी बोलणे वा स्पष्टीकरणे देण्यापलिकडे जाण्याची गरज काय? सवाल स्पष्ट आहे, नेताजी यांच्याविषयी नेहरूंनी खोटे सांगण्यात धन्यता का मानली? कारण त्यांना जितके सरदार वल्लभभाई पटेल हे आव्हान होते, तितकेच नेताजीही राजकीय आव्हान होते. तेव्हाच्या कालखंडात नेताजी समोर आले असते, तर नक्कीच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. जसे आणिबाणीनंतर जॉर्ज फ़र्नांडीस यांना लोकांनी डोक्यावर घेतले होते, तशीच नेताजींची लोकप्रियता शिगेला पोहोचली असती. मग नेहरूंना एकमुखी राज्य व स्वातंत्र्य मिळवण्याचे श्रेय पदरी पाडून घेता आले नसते. म्हणूनच संघाचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदान विचारणार्‍यांनी अगोदर अन्य शेकडो लोकांनी जे योगदान दिले, त्यांना कोणते श्रेय मिळाले, त्याचा खुलासा करायला हवा. उदाहरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंत्र्यासाठी काही योगदान होते किंवा नाही? त्यांना स्वातंत्र्योत्तर उर्वरीत अपुर्‍या हयातीमध्ये नेहरू व कॉग्रेसने कसे वागवले? म्हणूनच योगदान विचारण्यापेक्षा नेहरूंना किती अवास्तव श्रेय दिले जाते व कशाला, या प्रश्नाचे उत्तर शोधणे भाग पडते.

सावरकर, आंबेडकर, नेताजी, अशी भरपूर लांबलचक यादी आहे. त्यांच्या अगणित त्याग व प्रयत्नातून भारतीय स्वातंत्र्य साकारले आहे. पण एकूण कॉग्रेसजन अथवा नेहरूवादी बघितल्यास त्यांच्या हिशोबात अगदी सोनिया गांधींचेही स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असावे, अशीच भाषा चालते. यातल्या कोणी कधी सोनिया गांधींचा स्वातंत्र्य चळवळीतला वाटा किती व कधीचा, त्याचा खुलासा कशाला करू नये? ज्या सोनिया गांधी संघाला सवाल करतात, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी असे कोणते योगदान दिले? नेहरूंच्या नातवाशी पुढल्या कालखंडात विवाह करून भारतात येणे, याला स्वातंत्र्य चळवळीतले योगदान म्हणायचे काय? इथे येऊन पंधरा वर्षे पंतप्रधान निवासात वास्तव्य करूनही देशाचे नागरिकत्व घ्यायचे नाकारण्याला, बहुधा नेहरूवादी भाषेत त्याग व योगदान म्हणत असावेत. अन्यथा नेताजी सावरकरांच्या योगदानाचा विषय कशाला निघाला असता? देशाच्या सत्तेची सुत्रे ज्या व्यक्तीच्या हाती होती व जिथे देशातील सर्व गुपिते बोलली जात होती, तिथे एक परदेशी महिला राजरोस दिर्घकाळ वास्तव्य करीत होती. तिचे परदेशी नातलग कधीही येजा करीत होते. त्याला स्वातंत्र्य चळवळीतले योगदान म्हणत असावेत. एकदा माणसाची बुद्धी भरकटली, मग तर्काचा घोडा बेभान दौडू लागतो. म्हणूनच मग इतके दिवस झाकलेले नेहरूंचे खोटे चव्हाट्यावर येताच, किती टोकाचे युक्तीवाद चालू आहेत. नेताजींना युद्धकैदी ठरवण्यापासून वाचवायचे म्हणून त्यांच्या अपघाती मृत्यूची कंडी पिकवली, हा त्यापैकीच एक युक्तीवाद आहे. मग पुढे बोस कुटुंबावर सरकारने पाळत ठेवली तर त्याचे खापर सरदार पटेल, वा लालबहादूर शास्त्री अशा गृहमंत्र्यावर फ़ोडायचे. याला नेहरूवाद म्हणतात, श्रेय असेल तर नेहरूंचे, त्यात दुसरा कोण भागिदार होऊच शकत नाही. मात्र खापर फ़ोडायचे वेळ आली, मग नेहरूंच्या सहकार्‍यांकडे बोट दाखवायचे.

आज कुठल्याही गोष्टी गोपनीय असल्या तर त्या खुल्या होण्याचा आग्रह आहे आणि लपवाछपव नको असेल, तर तेव्हा नेहरूंनी लपवाछपवी करणे घातकच होते. कुठलाही नियम काढा, त्यात नेहरू कुटुंबाला सवलत असते. त्याविषयी प्रश्न विचारला, मग लगेच तुमच्यावर संघाचे भक्त म्हणून आरोप होणार. नेताजी डाव्या विचारांचे होते. पण त्यांच्याविषयी आस्थेने बोललात, तरी तुम्ही लगेच संघवाले ठरता. थोडक्यात आपण अफ़वा पिकवायच्या आणि तुम्ही सत्याची मागणी केली, मग तुमच्यावरच अफ़वाबाज म्हणून आरोप करायचे. अगदी नेताजींना वाचवण्यासाठी तेव्हा खोटे बोलले गेले असले, तरी पुढल्या तीस चाळीस वर्षे त्यावर पडदा कशाला राहिला? बोसांच्या कुटुंबावर पाळत ठेवण्याचा अट्टाहास कशाला? त्याचे उत्तर कोणी देत नाही. २००४ सालात पुन्हा युपीए (कॉग्रेस) सरकार सत्तेत आल्यानंतर पहिली गोष्ट काय केली असेल, तर अंदमानमध्ये जे सावरकरांचे स्मारक होते, त्याचे महात्म्य संपवण्यात आले. त्यात पुढाकार घेणारे मणिशंकर अय्यर काय म्हणाले होते? अंदमानात सावरकर एकटेच काळ्यापाण्याची शिक्षा भोगायला गेलेले नव्हते. शेकड्यांनी स्वातंत्र्य सैनिक तिथे खितपत पडले. मग एकट्या सावरकरांचे महात्म्य कशाला सांगायचे? खरेच आहे! वादासाठी अय्यर नामे नेहरूवाद्याचा हा नियम मान्य करू. मग देशभरच्या तुरूंगात शेकडाच नव्हेतर हजारांनी स्वातंत्र्य सैनिकांनी यातना सोसल्या. संघर्ष केला व त्यांचे संसार उध्वस्त झाले. त्यांच्यापेक्षा नेहरू व त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांचे महात्म्य कशाला वाढवले गेले? त्या बाकीच्यांना न्याय देण्यासाठी मणिशंकर अय्यरनी आधीपासून जी नेहरू स्मारके उभी होती, त्यांच्या फ़ेररचनेचे काम कशाला हाती घेतले नाही? उत्तर सरळ आहे. कोणाच्या त्यागाचा कामाचा तसूभर संबंध नाही, नेहरूंना आव्हान ठरू शकतील अशा कुठल्याही (अगदी कॉग्रेस) नेत्यालाही स्वातंत्र्योत्तर काळात संपवण्याचेच उद्योग झाले आहेत.

सावरकर यांना जी वागणूक मिळाली तीच घटनासमितीत असूनही डॉ. बाबासाहेबांना मिळाली ना? नेहरूंच्या कन्येला भारतरत्न मिळाल्यानंतर बाबासाहेबांना तोच सन्मान मिळायला किती वर्षे लागली? सावरकर दुर्लक्षितच नव्हेतर राजकीय अस्पृष्यच होते. सरदार पटेल यांची तुलनेने किती स्मारके कॉग्रेसच्या दिर्घकालीन सत्ताकाळात होऊ शकली? शास्त्रींच्या वाट्याला काय आले? ह्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत कुठलेच योगदान दिले नव्हते असे समजावे काय? अर्थातच! त्यासाठीच अशा कुठल्याही नेते व्यक्तींची ओळख व नामोनिशाण पुसण्याचाच उद्योग पुढल्या काळात झाला आणि त्यासाठी सरकारी तिजोरीतून अब्जावधी रुपयांची लुट करण्यात आलेली आहे. नेहरूंवरच्या चित्रपट मालिकेसाठी सरकारी तिजोरी खुली होती. सावरकरांचा चित्रपट काढण्यासाठी सुधीर फ़डके यांनी वर्गणीतून पैसा उभा केला. नेताजींवर तर असे काही होऊच शकले नाही. गेल्या सहा सात दशकात नेहरू-गांधी यांना सरकारी तिजोरीतून अफ़ाट पैसा उधळून देशाचे उद्धारक व सातंत्र्ययोद्धे म्हणून पेश करण्याचा आटापिटा झाला. त्याचवेळी अन्य प्रत्येक कर्तबगार नेते झाकण्याचाही अपप्रचार कायम राहिला. इतके होऊनही त्यांच्याविषयी जनमानसातली आस्था तीनचार पिढ्या उलटून गेल्यावर कायम आहे. लोकवर्गणीतून त्यांची स्मारके उभी राहिलीत. मात्र त्याच प्रदिर्घकाळात नेहरु-गांधी यांचे स्मरण जतन करण्यासाठी सरकारी खजिना रिता करावा लागला आहे. विद्यापीठ, स्टेडीयम, रस्ते वा इमारतीच्या निर्जीव स्वरूपात या दोन नेत्यांना टिकवून धरावे लागले आहे. नेताजी, सावरकर वा पटेल यांच्या कर्तृत्वाला तितके दयनीय व्हावे लागलेले नाही. सरकारी आश्रयावर त्यांच्या विचार वा स्मृतीला जगावे तगवावे लागलेले नाही. कारण त्यांचा स्वातंत्र्य चळवळीत किती वाटा होता, हे एका पिढीने दुसर्‍या पिढीला सांगितले आहे. नेहरूवाद्यांना मात्र त्यासाठी जाहिराती कराव्या लागत आहेत. म्हणूनच म्हणावेसे वाटते, स्वातंत्र्य चळवळीत सिंहाचा वाटा बहुधा सोनिया गांधीचाच असावा.

22 comments:

  1. हे मात्र भारी हा भौ..पुरोगाम्यानां कोंडीत पकडायचं तेव्हा आणि केवळ तेव्हाच तुला आंबेडकर आठवतात.

    ReplyDelete
    Replies
    1. कुठल्याही व्यक्ती, संघटना, विचार वा भूमिकेच्या दावणीला ज्यांची बुद्धी बांधलेली आहे; त्यांच्या मानसिक आरोग्याला हा ब्लॉग वाचणे अपायकारक असू शकते.

      Delete
    2. मित्रा भारी उउत्तर दिले आहेस..... ह्या पेक्षा अचूक उत्तरच नाही वरील मूर्खपणाला... धन्यवाद

      Delete
  2. Aamchahi jaagtaa pahara aahe tumchya uttam likhanavar!!

    1. Soniabainchya deshkaryavar aani kongresjan karit aslelyaa lalaghotivar mala shisarich yete. Parantu tyanni nagarikatva kadhi ghyave haa vaiyaktik prashn aahe. Tyanni deshachi gupite phodlee asteel ase vatat naahi. Chaukashi suru karavi (Shah-commission Part 2!)

    2. Savarkar aani Sudhir Phadke yanna Sanghane-dekhil kaay vagnuk dilee he sudnya janantaat. Savarkar Gadhi-hatyemule (kadachit chukine, parantu bahuda naahi!) badnaam zaale, anyathaa tyanchyavar konataahi kala daag naahi.
    2. Nehrunchya malikevarcha raag kalat naahi ~ Shyam Benegal yanni uttamritya tee digdarshit keli, Richard Attenborough ne Gandhi navaachaa uttam chitrapat kadhala. Sarkari anudaan he shevtee sarkarvar avalamboon aste. Years 77-79, 97-2004, 2014+ madhe NDA sarkarlaa he kartaa aale aste. Parantu uttung vyaktimatva aani lokpriy vishay laagto!
    4) Also, majhe aajoba mhanale hote -- Amchi ghare jalali tevha he laathibahaddar kuthe gele hote??
    5) Aso, aapan khoop chaan lihita, evdhech suchavu shakto ki Nehru mhanje kaahi swarthee, potbharu gund nevhata! BTW, Netaji, Patel he pakke congress walech hote (Sangh va Samjwaadi navhe!) yaache bhan asoodya!

    Jai Bharat

    Ravi

    ReplyDelete
    Replies
    1. savarkarana nakali mhanany itaki hyancvhi doki firali ahet tari tumache tyana chatane chalu theva

      Delete
  3. भाऊराव,

    एका वाक्यात सांगायचं झालं तर १९४७ साले गोये इंग्रज जाऊन काळे इंग्रज आले.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. वैधानिक इशारा: कुठल्याही व्यक्ती, संघटना, विचार वा भूमिकेच्या दावणीला ज्यांची बुद्धी बांधलेली आहे; त्यांच्या मानसिक आरोग्याला हा ब्लॉग वाचणे अपायकारक असू शकते.

    ReplyDelete
  5. people get the rulers they deserve!!!!!!! so indians deserve the CONGRESS rule.

    ReplyDelete
  6. < संघाचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदान विचारणार्‍यांनी अगोदर अन्य शेकडो लोकांनी जे योगदान दिले, त्यांना कोणते श्रेय मिळाले, त्याचा खुलासा करायला हवा>

    श्रेयासाठी स्वातंत्र्य संग्राम असतो काय?

    ReplyDelete
    Replies
    1. तूमच्या प्रशांतच उत्तर दडलेले आहे असे नाही का वाटत? पहा जमल तर परत वाचा आपले उत्तर......

      Delete
  7. नेहरू नुसते एकदा जरी अंदमानला फीरायला गेले असते तरी त्यांना
    त्यांचे स्मारक करता आले असते दुदुर्दैव अन्य काय...

    ReplyDelete
  8. Rss has maligned image of nehru and will try to continue for ever but people should not forget his contribution towards building modern self sufficient India

    ReplyDelete
  9. Vijay! It is not a matter of forgetting but a matter of remembering other thousands also.
    Other hand, none other than the Neharu family enjoyed a massive power for long time after independence.
    And again they're crying TYAGA-Sacrifice for the nation.
    What they did is TYAG-sacrifice & other's did is BUSINESS, is it so?
    More practically spicing, Neharu family have gathered a lot more against their sacrifices.
    Now we can't tolerate Rahul for Neharu's sacrifice.

    ReplyDelete
  10. भूषण वैद्यOctober 14, 2015 at 2:50 AM

    फारच छान !! परखड विचार आणि असे विचार बहुतेक येणाऱ्या पिढीसाठी पूरक ठरावे, त्यांना नेहरू पलीकडे पण नेते होते, वीर होते हे कळावे. लिखाण हे उत्तम साधन आहे जे पूरक ठरू शकते.

    धन्यवाद.

    ReplyDelete
  11. कन्यादानालाच योगदान म्हणत असतील तर त्याचा मान सोनियांच्या आईवडीलाकडे जातो!

    ReplyDelete
  12. फारच प्रखर शब्दात सत्य मांडले आहे. आभार व अभिनंदन.

    ReplyDelete
  13. गांधी व नेहरु ही नावं स्वातंत्र्योत्तर काळात सार्वजनिक संडास व मुताऱ्या सोडुन सर्वत्र होती.

    ReplyDelete