Wednesday, November 18, 2015

पाकप्रेमी हुतात्मे, फ़ोर्डप्रेमी महात्मे



पाकिस्तानात जाऊन मणिशंकर अय्यर यांनी भारताच्या पंतप्रधानाला हटवायची मागणी करावी, याचा अनेकांना राग आलेला आहे. पण त्यात नवे असे काय आहे? मणिशंकर अय्यर हे कॉग्रेसचे नेता आहेत आणि हेच मागल्या काही वर्षात कॉग्रेसचे धोरण राहिलेले आहे. सत्तेच्या पुढे त्यांना देश वा भारतीयत्वाचा अभिमान वगैरे काहीही राहिलेले नाही. तसे नसते तर त्यांची सत्ता असताना परदेशात मोदींना प्रवेश मिळू नये असे प्रयास त्यांनी थांबवले नसते का? गुजरातचा दोनदा निवडून आलेला मुख्यमंत्री आणि कुठल्याही कोर्टाने गुन्हेगार न ठरवलेल्या व्यक्तीला अमेरिकेने प्रवेश देवू नये, असे आवाहन इथल्या अनेक खासदारांनी संयुक्त पत्र लिहून केलेले होते. त्यांच्या बाबतीत तेव्हा युपीए सरकारने वा त्याचे नेतृत्व करणार्‍या कॉग्रेस पक्षाने कोणती कारवाई केलेली होती? आता ज्या वक्तव्यासाठी अय्यर यांना दोष दिला जात आहे, ते वक्तव्य दोन आठवड्यापुर्वीचे आहे. ज्या प्रकाशनाच्या निमीत्ताने मुंबईत सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळे फ़सले होते, त्याच पुस्तकाचे पुन्हा पाकिस्तानात प्रकाशन करण्याचा एक समारंभ आयोजित केला होता. तिथे माजी लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ़ यांच्यासह अय्यर यांनाही आमंत्रण देण्यात आलेले होते. तिथे बोलताना अय्यर यांनी ही मुक्ताफ़ळे उधळली होती. मोदींना हटवल्याशिवाय भारत-पाक बोलणी होऊ शकत नाहीत, ह्या त्यांच्या विधानाशी मुशर्रफ़ही सहमत झाले नाहीत. तिथेच व त्याच कार्यक्रमात मुशर्रफ़ यांनी तशी असहमती व्यक्त केली होती. याचा अर्थ मुशर्रफ़ मोदीप्रेमी वा भारतप्रेमी अजिबात नाहीत. तर मोदींना हटवायला २०१९ साल उजाडेल आणि तोपर्यंत पाकिस्तानला शांत बसून चालणार नाही, असे मुशर्रफ़ना सुचवायचे होते. त्यांना अय्यर यांचे विधान नावडलेले नव्हते, तर त्यातला कालावधी नावडला होता.

अर्थात अय्यर वा तत्सम लोकांनी हेच तर बोलावे आणि भारतीयांच्या मनात गोंधळ माजवावा, म्हणून पाकिस्तानी विविध सरकारी संस्था त्यांची बडदास्त ठेवत असतात. भारतीय राष्ट्रवादाला हतोत्साहीत करण्याचे काम त्यांनी पार पाडायचे असते. किमान भारतीयांना विचलीत करण्याचेच काम त्यांच्यावर सोपवलेले असते. तेच अशा विधानातून अय्यर करीत असतात. तेच कशाला, अनेक नावाजलेले पत्रकार बुद्धीमंत आपल्याला असे पाकधार्जिणे बोलताना दिसतील. त्याच्या बदल्यात त्यांना परदेशी दौरे वा मौजमजा करण्यासाठी अनेक कार्यक्रम पार्ट्या योजल्या जात असतात. सेमिनार वा परिसंवाद असे सोज्वळ नाव त्याला दिलेले असते. मागल्या वर्षी वेदप्रकाश वैदिक नावाचे एक पात्र अशाच निमीत्ताने पाकिस्तानात गेले आणि थेट सईद हाफ़ीजला भेटल्याचा गदारोळ आपल्याला आठवत असेल. भारतात पाकिस्तानी कलावंत, खेळाडू वा साहित्यिक राजकारण्यांना बोलवायचे किंवा इथल्या काहींना तिथे नेवून ऐषारामाचे चोचले पुरवायचे, हा उद्योग करणार्‍या काही संस्था असतात. पाकच्या माजी हेरसंस्था प्रमुखांची एक संस्था तशी असून त्यातला एक संचालक अय्यर आहेत. ज्याचा सगळा खर्च पाकिस्तान उचलते, अशा संस्थेत अय्यर संचालक असतात आणि त्याच संस्थेने योजलेल्या परिसंवादासाठी बरखा दत्त, दिलीप पाडगावकर, सिद्धार्थ वर्दराजन, सलमान खुर्शीद, सुधींद्र कुलकर्णी आमंत्रित असतात. याला योगायोग म्हणता येईल का? नेमके हेच लोक भारतविरोधी पाकिस्तानवादी मुक्ताफ़ळे उधळतात, याला तरी योगयोग म्हणता येईल का? तर त्यामागचा हेतू व कारण आपण समजून घेतले पाहिजे. शत्रूराष्ट्राला असे घरभेदी हवे असतात. ज्यांचे काम आपल्या मायदेशाशी गद्दारी करून सतत देशबांधवांना हतोत्साहित करायचे असते. तीच कामगिरी पार पडायची असते. अय्यर यांनी तेच केलेले नाही काय?

इथल्या कुठल्याही टिव्ही चर्चेत तुम्हाला असे अनेक चेहरे दिसतील, जे सतत शत्रूराष्ट्रांची दोस्ती हवी आणि युद्ध वा शत्रूत्व नको, असा आग्रह धरताना दिसतील. मग अशा लोकांना ते शत्रूदेश पाहुणे म्हणून आमंत्रित करून पाहुणचार देताना दिसतील. पण तिथे जाऊन त्या शत्रूदेशाला मैत्री वा संवादाचा सल्ला यातला कोणी कधी देणार नाही. उलट हे लोक मायदेशी सरकारच्या पवित्र्यावर हल्ला करताना दिसतील. काश्मिर असो किंवा मुंबई हल्ला असो, यापैकी एकाने तरी पाकिस्तानात जाऊन तिथले राजकारणी वा धोरणकर्ते यांना जाब विचारल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे काय? उलट इथे पाकिस्तानने काही घातपाती कृत्ये केली, मग आक्रस्ताळेपणा नको हा शहाणपणा हेच लोक शिवसेना वा संघाला शिकवताना दिसतील. त्याचसाठी तर पाकिस्तानने त्यांना पोसलेले असते. मात्र प्रचलित कायदे त्यांचा कुठला गुन्हा सिद्ध करू शकत नसतात, ही कायद्याच्या राज्याची अडचण असते. त्यांच्यावर तुम्ही देशद्रोह, राजद्रोह असले आरोप करू शकत नाही. कारण त्यांची वक्तव्ये अथवा कारवाया कायद्याच्या व्याख्येत गुन्हा ठरवता येत नसतो. पण तेच लोक दुसरी महत्वाची कामगिरीही पार पाडताना दिसतील. मोदी वा तत्सम कोणी काही बोलले, मग त्यांच्या शब्दाचा विपर्यास करून जगभर देशाची प्रतिमा मलिन करण्याचे कर्तव्य हीच मंडळी मोठ्या इमाने इतबारे पार पाडत असतात. व्ही के सिंग वा त्याच्याही आधी मोदींनी आपल्या मुलाखतीत कुत्र्याच्या पिल्लाच्या मरणाचा उल्लेख केला, त्यावरून काहुर माजवणारे कोण होते? नेमकी अशाच मंडळींची नावे तुम्हाला आठवतात की नाही? तर त्यामागची रणनिती ओळखली पाहिजे. मायदेशी राहुन गद्दारी करण्यासाठीच त्यांची अघोषित नेमणूक झालेली असते. म्हणून त्यातला एक कोणी बोलतो आणि बाकीचे त्यावरून गदारोळ उठवून गाजावाजा करण्याची कामगिरी पार पाडतात.



असे काही घडते तेव्हा चवताळून आपण त्यांचा निषेध करावा आणि शिव्याशाप द्यावेत, अशीच त्यांची अपेक्षा असते. कारण त्यातून त्यांची पाकिस्ताननिष्ठा प्रदर्शित होते किंवा त्यांच्या निष्ठा खर्‍या मालकाकडे सिद्ध होत असतात. म्हणून अशा शिव्याशाप देत बसण्यापेक्षा अशा लोकांचे धागेदोरे शोधणे व त्यांचे परपस्परांत गुंतलेले हितसंबंध जनतेसमोर आणणे अगत्याचे आहे. योगायोग बघा, हे लोक पाकिस्ताननिष्ठ भासतात तर त्यांच्याशी सहकार्य करणारे बहुतांश लोक फ़ोर्ड फ़ौडेशन वा तत्सम परदेशी निधीतून ‘देशसेवा’ किंवा समाजसेवा’ करताना दिसतात. यामागचे रहस्य उलगडण्याची गरज आहे. मध्यंतरी पुरस्कार वापसीचे पेव फ़ुटले होते, त्यामागची खरी प्रेरणा आपल्याला हुडकून काढणे अगत्याचे आहे. गेल्या एप्रिल महिन्यात फ़ोर्ड वा तत्सम परदेशी संस्थांकडून इथल्या अशा देशसेवी समाजसेवींना मिळणार्‍या बेहिशोबी पैशाला मोदी सरकारने चाप लावला आणि अकस्मात देशात असंहिष्णूता घोंगावू लागल्याचा साक्षात्कार मोठमोठ्या जाणत्यांना झाला. एप्रिलमध्ये फ़ोर्ड फ़ौडेशनचे नाक मोदी सरकारने दाबले आणि जुलै ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडून येणारा पैसा बंद केला. पैशाची चणचण या तमाम लोकांना ऑगस्टअखेर जाणवू लागली आणि बघता बघता देश असंहिष्णूतेच्या गर्तेत लोटला गेला. पुरस्कार वापसीतले बहुतांश महनीय लोक फ़ोर्ड फ़ौंडेशनच्या निधीचे लाभार्थी असावेत, याला योगायोग म्हणता येत नाही. तिथे अय्यर जसे पाकिस्तानी संस्थेचे लाभार्थी, तसे इथे पुरस्कार वापसीचे म्होरके फ़ोर्डच्या परदेशी निधीचे लाभार्थी असावेत, यातले धागेदोरे समजून घेणे व सामान्य जनतेपुढे उलगडणे अगत्याचे आहे. त्यातला बोचणारा काटा म्हणूनच मोदी आहे. कारण त्यांच्याच सरकारने अशा पैशाला चाप लावून यांच्या ऐषारामाला वेसण घातली आहे. मग पाकप्रेमी अय्यर हुतात्मे वा फ़ोर्डप्रेमी महात्मे चवताळून शिव्याशाप देवू लागले, तर नवल कुठले?

18 comments:

  1. खणखणीत सर्वेक्षण म्हणायला हवे.

    ReplyDelete
  2. Could we please gift Mani Shankar Aiyar to Pakistan with our compliments?

    ReplyDelete
    Replies
    1. Yes please go ahead, and also give sudhindra kulkarni free with him.

      Delete
  3. अशांना जनतेनी त्यांची जागा दाखवून दिली पाहीजे. की भविष्यात असे दुःसाहस दुसरा कुणी करणार नाही

    ReplyDelete
  4. अय्यर निर्लज्ज आहे.सत्ते साठी काहीही करु शकतो .मुशर्रफला आपले अण्वस्त्र कुठे ठेवली आहेत ,हे सुध्दा सांगायला चुकणार नाही .

    ReplyDelete
  5. मणीशंकर अय्यरांचा बोवता धनी कोण हे तपासायला हवे. सोबतच अय्यरलिलांवर काँग्रेस नेतृत्व मूग गिळून गप्प असते, अय्यरांच्या माध्यमांतून काँग्रेस कोणाला संदेश देऊ पाहत आहे ?

    ReplyDelete
  6. भाऊ वाईट फक्त एका गोष्टीचे वाटते की कधी काळी ही मंडळी राज्यकर्ते होते. भारताच्या पारंपरिक शत्रुकडे जाऊन आत्ताच्या सरकारची निंदा करतात. यांच्याकडे स्वतःचे असे नेतृत्व दुर्दैवाने शिल्लक राहीले नाही म्हणुन शत्रुची मदत मागतात. छत्रपती संभाजी महाराजांना अश्याच लोकांनी कपटाने मारले. बहुदा त्यांचेच हे वारस असावेत.

    ReplyDelete
  7. Asha lokanche swagatch ahi hech lok khare desh bhakt krantiveer ahit.aaplyakade krantikarakana fashi denyachi padhat ahi

    ReplyDelete
  8. पण गूगलवर सुधीन्द्र कुलकर्णी भाजपचे सल्लागार वगैरे असल्याचं दिसतं आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना संरक्षण वगैरे पण दिल होतं की काय...ज़रा confusion दूर कराल का प्लीज

    ReplyDelete
    Replies
    1. Sudhindra कुलकर्णी हे भाजप चे सल्लागार नव्हते .. वाजपेयी सरकार असताना स्वतःला secular दाखवण्यासाठी असे लोक अडवाणींनी जवळ केले .. आणी यांच्या उचापती मूर्खपणा चा फटका बसल्याने वाजपेयींना सत्ता गमवावी लागली

      Delete
  9. Check Manishankar's financial transactions.

    ReplyDelete
  10. Do you have any proof that many award wapasis were getting money from Ford foundation? It would be much easier if we have this data to reveal the truth!

    ReplyDelete
  11. ज्याप्रमाणे डॉन सरकारी लोकांना मासिक वेतन देतो अगदी त्याचप्रमाणे या लोकांना सुद्धा मासिक वेतन मिळत असणार. आणि विशेष कामगिरी केल्यावर बक्षिसी वेगळी........ this is very serious view.

    ReplyDelete
  12. @Bhau as topic is related to Fraudulent Ford there is article (especially flow chart) written by former RAW officer RSN Singh in which it clearly shows relation btwn CIA-FORD-Arwind Kejriwal plz do read it (which u may or may not be aware of) and plzz do reply to this post so i will get d confirmation that u got d link cause i have one "VVVVIP' web link ( & I MEAN IT !!) which will tell us what really going on in d world & why & who is behind it & what is likely to happen (by person BETTER than Edward Snowden).

    ReplyDelete
  13. http://canarytrap.in/2014/03/11/kejriwal-indias-biggest-scam/

    ReplyDelete
  14. Bhau rajasthan madhe jamalelya jihadi var pan ek lekh liha

    ReplyDelete
  15. भाऊ एकदम सडेतोड भाष्य.

    ReplyDelete