ल्या आठवडाभरात भारतीय वृत्तवाहिन्या फ़ारशा बघितल्या नाहीत. तात्पुरत्या ब्रेकिंग न्युज बघायच्या आणि परदेशी वाहिन्या बघायच्या; असा परिपाठ झाला आहे. कारण कुठल्याही भारतीय वृत्त माध्यमात नोटाबंदी आणि बॅन्केच्या बाहेरच्या मोठमोठ्या रांगा, यापलिकडे कुठली बातमी ऐकायला बघायला मिळत नाही. देशाला भेडसावणारा हाच विषय असल्याने त्याच्याच भोवती बातमीपत्र फ़िरणार यात शंका नाही. पण नुसत्याच रांगा लागलेल्या नाहीत. त्यामुळे लोकांचे भयंकर हाल होत आहेत, ही बाब नवी राहिलेली नाही. केवळ सरकारवर विरोधक टिका करत आहेत आणि सरकारही आपल्या परीने काही दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे, इथे बातमी संपत नाही. अशा कठीण काळात शेकड्यांनी भारतीय सामान्य माणसे, आपल्या परीने ग्रासलेल्यांना दिलासा देण्यासाठी पुढे आलेली आहेत. नोटाबंदीचा त्रास होतोच आहे. त्यावर उपाय सरकारने योजावेत, ही अपेक्षाही चुकीची नाही. पण सरकारने मदतीला देईपर्यंत आपापल्या पातळीवरही काही गोष्टी होऊ शकतात आणि लोक तेही करत आहेत. अशा प्रयत्नांना कितीशी प्रसिद्धी मिळते आहे? त्यामुळेच बातम्यांमध्ये तोचतोचपणा आलेला आहे. त्यापेक्षा मग वेगाने बदलणार्या बातम्या किंवा घडामोडींसाठी, मी सध्या अमेरिकन सीएनएन या वाहिनीवर लक्ष ठेवले आहे. योगायोग असा, की भारतीय पंतप्रधानांनी पाचशे हजाराच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केली, तेव्हा अमेरिकेत भावी अश्यक्ष निवडण्यासाठी मतदान चालू होते. त्याचे निकाल दुसर्या दिवशी आले आणि धक्कादायक लागले. पण तेव्हाच भारतामध्ये नोटांच्या रद्दीमुळे आकाश कोसळलेले होते. त्यामुळे मग अमेरिकन राजकारणावरचे भारतीय माध्यमांचे लक्ष उडालेले आहे. पण तिथेही मोठी उलथापालथ होत आहे. त्याचे अमेरिकेतील वार्तांकनही मोठे मनोरंजक होत चालले आहे.
पहिली गोष्ट म्हणजे इथल्याप्रमाणेच जगभर हल्ली राजकीय सामाजिक चळवळी आणि पत्रकारिता यांची मोठीच सरमिसळ होऊन गेली आहे. त्यामुळे त्यांच्यात परस्पर हितसंबंध तयार होऊन गेलेले आहेत. आपण लोकसभा निवडणूकीच्या निमीत्ताने त्याचा अनुभव भारतात घेतला होता आणि आता त्याचीच पुनरावृत्ती अमेरिकेत झालेली आहे. तिथल्या माध्यमांनी एकसुरात डोनाल्ड ट्रंप या रिपब्लिकन उमेदवाराला पराभूत करण्याचा नामजप सुरू केला होता आणि अखेरीस तोच निवडून आला आहे. मग केवळ राजकारणातच नव्हेतर एकूणच प्रस्थापित वर्गात धरणीकंप होऊन गेला आहे. ट्रंप यांच्या निवडीने उलथापालथ होऊन गेली आहे. पण अजूनही आपले कुठे चुकले आणि घडते काय आहे, त्याचा आवाका अमेरिकन माध्यमांना येऊ शकलेला नाही. त्यामुळे स्वत:ला बुद्धीमान व धुर्त समजणारे तथाकथित पत्रकार जाणकार आदी अभ्यासक; किती हास्यास्पद शाब्दिक कसरती करू शकतात, त्याचे नमूने अमेरिकन वाहिन्यांवर बघायला मिळत आहेत. ट्रंप हा मुळातच राजकारणाच्या बाहेरचा माणूस आहे. त्यात पुन्हा तो राजधानीतील प्रस्थापित वर्तुळातला नाही. त्यामुऴेच नको असलेला ट्रंप निवडून आल्यावर तो राजकारण कुठल्या दिशेने घेऊन जाईल, त्याचा साधा अंदाजही बांधणे अमेरिकन बुद्धीवादी वर्गाला जमेनासे झाले आहे. त्यामुळे ट्रंप यांच्या हालचाली व बैठका आणि त्यानुसार तिथल्या माध्यमात बांधले जाणारे आडाखे, हा अतिशय मनोरंजनाचा विषय होऊन गेला आहे. आपल्याकडेही मोदींनी नवे सरकार बनवताना जशी शेकडो लोकांशी बातचित केली आणि त्यातून कोण मंत्री होणार, त्याचा सुगावा अखेरपर्यंत कुणा पत्रकाराला लागू शकला नाही. तशीच काहीशी अवस्था आज अमेरिकन माध्यमांची झालेली आहे. त्यामुळेच त्यांची भाकिते व त्यात सतत होणारे बदल, ऐकण्यात मोठी मजा येते.
असे कशामुळे झाले आहे तेही समजून घेतले पाहिजे. आपल्याकडे सरकारी कामकाजात कारभारात मध्यस्थाला स्थान नाही, तसा दंडक अमेरिकेत नाही. तिथे अनेक कंपन्या व व्यवसायांचे हितसंबंध जपणारे गट व संस्था, उजळमाथ्याने राजधानी वॉशिंग्टनमध्ये वावरत असतात. त्यांना एडव्होकसी ग्रुप समजले जाते. त्यांच्याच अनेक हस्तकांना जगभर स्वयंसेवी म्हणूनही ओळखले जाते. आपल्याकडे ती कामगिरी अभ्यासक, विचारवंत वा पत्रकारितेचा मुखवटा लावलेले अनेकजण चेहरा लपवून करत असतात. २००९ च्या निकालानंतर नीरा राडीया यांच्या कंपनीसाठी बरखा दत्त, प्रभू चावला किंवा वीर संघवी तेच करीत असल्याचे उघडकीस आलेले होते. तसा प्रकार अमेरिकेत उजळमाथ्याने चालतो. पण ट्रंप यांनी त्याला पायबंद घालण्याचा पवित्रा घेतलेला आहे. पण अजून त्यांच्या हाती देशाची सुत्रे यायची आहेत. त्यांनी आताच आपल्या भोवती असे जे मध्यस्थ वावरत असतील, त्यांना दूर ठेवलेले आहे. त्यामुळे आगामी सरकारमध्ये दोन महिन्यांनी कोणाचा समावेश होऊ शकतो, याविषयी माध्यमांना पत्रकारांना किंचीतही सुगावा लागणे, अशक्य होऊन बसले आहे. पण आपल्याकडेच पक्की बातमी असते आणि सर्वात आधी आपणच बातमी देतो; असे दावे करण्याची हौस तिथेही आहेच. म्हणून मग अफ़वा उठवणे चालू आहे. चार दिवसांपुर्वी ट्रंप यांनी विविध महत्वपुर्ण व्यक्तींच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यांना आपल्या सरकारमध्ये चार हजारावर नव्या नेमणूका करायच्या आहेत. त्यात सनदी अधिकार्यांपासून अनुभवी, व्यावसायिक, अभ्यासक, राजकीय नेते इत्यादींचा समवेश होतो. पण त्यात पत्रकार इत्यादींची लुडबुड होऊ नये, म्हणून त्यांनी न्युयॉर्कमधील आपल्या गगनचुंबी इमारतीमध्ये बसून हे काम सुरू केले आहे. तिथे कुणा आगंतुकाला घुसता येत नसल्याने गडबड झाली आहे.
पत्रकारांची वा लुडबुड्यांची अशी कोंडी केल्याने, कुणालाही आगामी ट्रंप सरकारचा मुखडा कसा असेल, त्याचा अंदाज करणेही अशक्य झाले आहे. चार दिवसांपुर्वी रुडी ज्युलियानी ह्या न्युयॉर्कच्या माजी महापौराला परराष्ट्रमंत्री करणार अशी बातमी होती आणि बुधवारी त्यांच्या जागी कॅरोलिना राज्याच्या गव्हर्नर निकी हेली नावाच्या भारतीय वंशाच्या महिलेची वर्णी लावण्यात आली. शुक्रवार उजाडण्यापुर्वी हेली यांचे नाव मागे पडले आणि मागल्या निवडणूकीत अध्यक्षीय उमेदवार म्हणून पराभूत झालेले कट्टर ट्रंप विरोधक, मीट रॉमनी यांना नवे परराष्ट्रमंत्री करण्यात सीएनएन वाहिनीने पुढाकार घेतलेला आहे. नुसती ही नावे जाहिर करून ही वाहिनी थांबली नाही. तीन वेगवेगळी नावे सांगताना ते परराष्ट्रखाते कसे संभाळतील आणि ट्रंपशी त्यांचे कितपत जुळणार; याचीही शंका काढण्यात येत होत्या. सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक होणार, अशा मजेशीर कहाण्या सुनावल्या जात आहेत आणि त्यावर परदेशी जाणकारांच्याही प्रतिक्रीया घेतल्या जात आहेत. पण इतके उपदव्याप करण्यापेक्षा थोडी सवड काढून या शहाण्यांना डोनाल्ड ट्रंप नावाचा माणूस समजून घेण्याची आवश्यकता कशाला वाटत नाही? याचे नवल वाटते. कारण आजवरचे नेते आणि त्यांचे राजकारण, यावर आधारलेली मोजपट्टी पुर्णपणे राजकारणात उपरा असलेल्या ट्रंपना लागू होत नाही. हे प्रकरणच नवे आणि आकलनाच्या पलिकडचे आहे. ट्रंप यांनी नुसते सत्तांतर घडवलेले नाही, तर अमेरिकन राजकारणात स्थित्यंतर घडलेले आहे. त्याचा आवाका आल्याशिवाय ट्रंप यांचे मोजमाप निघू शकत नाही, तर त्यांच्या राजकारणाचे कपडे शिवण्यात काय हशील आहे? आपल्या अनुभवात बसणारा हा माणुस नसल्याने, त्याच्यावर भाकिते करण्याचे सोडून तिथल्या व जगभरच्या पत्रकारांनी, आधी ट्रंप नावाच्या माणसाला ओळखण्याचे थोडे कष्ट घेतले पाहिजेत.
भाऊ जसे आपल्याकडे आहे तसेच तिकडे आहे लोकसभेत मोदीजीना २३० च्यावर जागा नदेणारे तसेच खांग्रेस डावे व इतर २ ने का होइना बहुमत मिळवतील असे म्हणणारी मिडीया सत्तांतरा नंतर विरोधीपक्षांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे तसेच बोगस ngo सुद्धा या कळपात आहे कारण नं २ तनखे बंद झाले तसेच मेलेल्या किंवा मारलेल्या लोकांच्या नावाने झालेले व्यवहार उघडे होत आहेत गरीब अथवा दंगलग्रस्त लोकांच्या नावावर खाल्लेले बाहेर येत आहेत हे बघुनच अमेरिकन मिडीया व राजकारणी सुद्धा घाबरले असणार म्हणून हा दंगा आहे भारतात मात्र मोदींच्या चांगल्या कामाला भाजपातील व मित्र पक्षातील नव्याने प्रवेशकरुन निवडून आलेले लॅंड माफिया वाळू तस्कर गुंड संस्था हडपणारे बुडवणारे कारखाने हडपणारे बुडवणारे जनतेत पोहोचवण्या ऐवजी सुरुंग लावतायत
ReplyDeletebahukaka panjab hariyana(karnatak tamilnadu)pani prasnavar kahi tari margdarshan kara khup mota prasn aahe
ReplyDeleteट्रंपचा आकार केवढा , ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. अभ्यासोनी प्रकटावे ही समर्थ उक्ती अमेरिकन मिडीयाला कुणीतरी सांगितलं पाहिजे.
ReplyDeleteभाऊ.....अर्नब गोस्वामीच्या ' टाईम्स नाऊ ' वाहिनीमधून झालेल्या गच्छन्तीचे खरे कारण काय ?....अजून गूढच आहे. वाहिनीवरील शेवटच्या निरोपाच्या भाषणात तो म्हणाला की ...' The game has just begun '.....
ReplyDelete