Thursday, April 19, 2018

शरीयते पुरोगामीचा ‘न्याय’

loya cartoon के लिए इमेज परिणाम

मक्का मशीद स्फ़ोटाचा विषय असो की लोया चौकशीच्या मागणीची याचिका असो, जेव्हा आपल्या मागणीला अग्राह्य वा गैरलागू ठरवले जाते तेव्हा सगळेच्या सगळे पुरोगामी एक सूरात लोकशाही, संविधान वा न्याय धोक्यात आल्याची बोंब ठोकू लागतात. जर हे सर्व निर्णय कायद्याच्या निकषावर आणि न्यायालयात झालेले असतील, तर त्यात या शहाण्यांना धोका कुठला दिसतो? तर न्याय वा निवाड्यात धोका नसून कायदा व संविधानच त्यांना मंजूर नसते. जी मानसिकता विरोधात गेलेला न्याय नाकारण्यात मुस्लिम धर्मांध दाखवतात, तीच तशीच्या तशी पुरोगाम्यात आढळून येते. तिला शरीयती मानसिकता म्हणतात. असीमानंदांची निर्दोष सुटका वा लोया प्रकरणातील निवाड्याने त्याची साक्ष दिली आहे. त्यामुळे अवघी जमाते पुरोगामी ही शरीयते पुरोगामी होऊन गेली आहे.

मक्का मशिदीच्या आरोपातून स्वामी असीमानंद यांची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे अनेकजण चकीत झाले आहेत आणि अशा चकीत प्रतिक्रीयांनी त्यांच्यापेक्षा अधिक लोक थक्क झाले आहेत. नेहमी न्यायासाठी आक्रोश करणार्‍यांना न्यायदान झाल्यावर तो अन्याय कशाला वाटतो? हे अर्थातच सामान्य माणसाच्या विवेकबुद्धीला चकीत करणारे कोडे आहे. आताही असे दिसेल, की उन्नाव किंवा कठुआच्या घटनांनंतर जे लोक रस्त्यावर किंवा कॅमेरासमोर वुई वॉन्ट जस्टीस असे फ़लक घेऊन उभे असतात, तेच कालच्या हैद्राबादच्या कोर्टाने दिलेल्या निकालानंतर रडकुंडीला आलेले आहेत. त्यांना वाटते तिथे न्याय झालेला नाही. मग न्याय कशाला म्हणायचे? जर न्यायालयाने साक्षीपुरावे तपासून न्याय दिलेला मान्य नसेल, तर न्याय कशाला म्हणतात? आजवर नुसत्या आरोपांचा शिमगा चाललेला होता. त्याची छाननी कोर्टाने करून न्यायनिवाडा केला, तो मात्र न्याय नाही. याचा अर्थ इतकाच, की आम्ही जे काही आरोप करू तोच पुरावा असतो, तीच साक्ष असते आणि कोर्टाने त्यावर निमूट शिकामोर्तब करायचे असते. त्याला हे लोक न्याय म्हणतात. थोडक्यात आरोप करून संशय घेऊन जो शिमगा चालतो, तोच न्याय असतो आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्यापलिकडे कोर्टाला अन्य कुठले अधिकार नाहीत. न्यायाधीश म्हणून बसलेल्याने आपली बुद्धी वा विवेक वापरून निवाडा दिला, तर त्याला अन्याय म्हणायचे. असे का होत असते आणि असे कोण करत असतात? त्यात न्यायासाठी अखंड टाहो फ़ोडणारे मुस्लिम धर्मांध नेते व पुरोगामी यांचाच भरणा दिसून येईल. त्यांना देशाचे संविधान व कायदा मान्य नाही काय? नक्कीच आहे. पण जे संविधान व कायदे शरीयतच्या चौकटीत बसतात, तितकेच त्यांना मान्य आहेत. ती मर्यादा ओलांडली, मग त्यांना कोर्टाचा न्यायही अमान्य असतो. कारण त्यांचा कायदा पुरोगामी शरीयत असते.

म्हणून असीमानंद सुटल्यावर त्यांनी एकत्रित टाहो फ़ोडलेला आहे. मुस्लिम धर्मांध नेत्यांचा प्रत्येक दावा भारतीय कायद्यानुसार नसतो, तर शरीयत या इस्लामी कायदा व नियमांचा आधार घेऊन केलेला दावा असतो. जोपर्यंत भारतीय संविधान व कायदे त्याच्याशी जुळणारे असतात, तोपर्यंत त्यांची महत्ता असते. जेव्हा हे कायदे त्याचे बंधन झुगारतात, तिथे मग संविधान मागे पडते आणि शरीयतीचा आग्रह सुरू होत असतो. आपली चुक इतकीच असते, की आपण त्याचा हा टाहो किंवा मागण्यांचे संदर्भ भारतीय कायदे वा संविधानात शोधू लागतो. त्याऐवजी आपण त्याचे धागेदोरे शरीयत या इस्लामी धार्मिक कायद्यात शोधले, तर त्यांची मागणी कशी रास्त आहे, याची प्रचिती येऊ शकते. शरीयत हा इस्लामी कायदा असून त्यात बिगर मुस्लिमांना कुठलेही नागरी अधिकार नसतात. त्यांना इस्लामी राज्यात दुय्यम म्हणूनच जगता येत असते. तुम्हाला बिगर मुस्लिम असूनही जगायला दिले, हीच मुळात कायद्याने केलेली कृपा असते. नागरी अधिकार नसले व तुम्ही दुय्यम नागरिक असलात, मग तुम्हाला न्याय मागण्याचा अधिकार शिल्लक उरत नाही. समान अधिकाराचा दावाही करता येत नाही. सहाजिकच तुमच्या पुरावे साक्षीला काडीमात्र अर्थ नसतो, किंमत नसते. इथे असीमानंद वा अन्य कोणी बिगरमुस्लिम आरोपी आहेत आणि त्यांना समान अधिकाराने न्याय मागता येत असेल, तर शरीयतचा भंग होतो ना? मग त्याला न्याय कसे म्हणता येईल? शरीयतनुसार बिगर मुस्लिमाची साक्ष मुळातच ग्राह्य धरायची नसते. आजकाल पुरोगामी न्यायशास्त्रही त्याच बाजूने बोलत असते. त्यात मुस्लिमांचा आग्रह न्याय्य असतो आणि बाकी इतरांचा कुठलाही दावा बेकायदा असतो. पुरोगामी राज्यात हिंदूत्व मानणार्‍याला स्थान नसेल, तर न्याय मागायचा अधिकार कुठून असायचा? तो न्याय देणार्‍या न्यायालयाचे निवाडे कसे मानता येतील?

आता गंमत बघा. हैद्राबदच्या न्यायालयाचा निवाडा आला आहे आणि त्यात तमाम आरोप खोटे पडले म्हणून असीमानंदाना मुक्त करण्यात आले तर न्याय झाला नाही असा दावा आहे. समजा कुठलेही पुरावे नसताना त्यांना दोषी ठरवले असते, तर न्याय झाला असता काय? अलबत! पुरोगामी शरीयतनुसार तोच न्याय झाला असता. कारण यातला आरोपी पुरोगामी वा मुस्लिम नसतो. समजा आरोपी पुरोगामी वा मुस्लिम असेल, तर तो निर्दोष सुटण्यात न्याय झालेला असतो. २ जी खटल्यात सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले, तर त्याचा उदो उदो झालाच ना? कारण त्यातले आरोपी ए. राजा किंवा कनिमोरी हे पुरोगामी पक्षाचे नेते होते. मग पुरावे असूनही त्यांची निर्दोष मुक्तता हा न्याय असतो आणि त्यामुळे पुरोगामी नाचू लागतात. लालूंना दोषी ठरवले व शिक्षाही फ़र्मावण्यात आली. किती पुरोगाम्यांनी त्या न्यायाचा डंका पिटला? सगळे पुरोगामी सुतकात गेले ना? कारण लालू पुरोगामी असतात. कुठल्याही पुरावा साक्षीशिवाय कर्नल पुरोहितांना नऊ वर्षे तुरूंगात डांबले तरी तो न्याय असतो आणि त्यांना जामिन मिळाला तरी अन्याय असतो. ह्याला पुरोगामी शरीयत म्हणतात. त्यात पुरोगामी नसलेल्यांना कुठलेही अधिकार नसतात, की न्याय वगैरे मागण्याची मुभा नसते. तशी भाषा बोलणेही गुन्हा असतो. एकदा हे तर्कशास्त्र समजून घेतले, मग अशा लोकांचा आक्रोश लक्षात येऊ शकतो. देशात प्रतिदिन शेकडो महिलांचे लैंगिक शोषण चाललेले आहे. वर्षानुवर्षे चालले आहे. पण देशात मोदी सरकार आल्यानंतर कुठल्याही मुली महिलांचे शोषण झाल्यावर त्याला ‘बेटी बचाव’ धोरण कारणीभूत झालेले असते. असे हे तर्कशास्त्र आहे. आपण त्यांच्या विवेकबुद्धी वा भारतीय संविधानामध्ये त्यांच्या वर्तनाचे संदर्भ शोधू लागतो, ही आपली चुक असते. त्यासाठी पुरोगामी वा मुस्लिम धर्मांध नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाही.

गेल्या दोन दशकात हळुहळू पुरोगामी तत्वज्ञान व शरीयत यांच्यात सरमिसळ होऊन गेलेली आहे. मुस्लिमांनी आपल्या शरीयतमध्ये कुठलेही कलम वा तरतुदी बाद होऊ दिलेल्या नाहीत. पण त्यांच्या न्यायासाठी लढता लढता पुरोगामी मात्र शरीयतवादी होऊन गेलेले आहेत. त्यामुळे कठुआ वा उन्नावच्या घटनांसाठी न्याय मागणारे तिहेरी तलाकच्या बाबतीत मात्र मुस्लिम महिलांच्या अन्याय अत्याचाराचे जोरदार समर्थन करताना दिसतील. अगदी भारतीय संविधान वा भारतीय न्यायप्रक्रीया कुराण वा शरीयतमध्ये हस्तक्षेप करू शकत नसल्याचा निर्वाळा पुरोगामी देतील. अल्लाचे कायदे संविधानापेक्षा श्रेष्ठ असल्याचा दावा शरद पवार यांनीच केला नव्हता काय? आज संविधान बचाव म्हणून मेळावे भरवणार्‍या पवार किंवा तत्सम पुरोगाम्यांचे संविधान, शरीयतची कसोटी आली मग दुय्यम होऊन जाते. तेव्हा संविधानाचा बळी द्यायला पवारही मोठ्या उत्साहात हातात सुरा घेऊन पुढे सरसावतात ना? कारण संविधानापेक्षा कुराण वा शरीयत श्रेष्ठ असते आणि हे आता पुरोगाम्यांनी मान्य केले आहे. एकदा तितके मान्य केले, मग त्यानुसारच पुरोगामी न्यायनिवाडे व्हायला हवेत ना? मग त्यात असीमानंद कसे काय निर्दोष ठरू शकतात? ते मुस्लिम नसतात वा मुस्लिम धर्मांधांनी त्यांच्याकडे संशयाने बोट दाखवलेले असल्यावर त्यांना कोर्ट कशाच्या आधारे निर्दोष ठरवू शकते? असा न्यायनिवाडा अग्राह्य होत नाही काय? पुरोगामी राज्यात त्यांच्या व्याख्येतील पुरोगाम्यांनी कोणाचे गळे कापले तरी ते पुण्यकर्म असते आणि पुरोगामी नसलेल्यांनी न्याय मागणे हाच गुन्हा असतो ना? मग असीमानंद, साध्वी प्रज्ञा किंवा कर्नल पुरोहित निर्दोष ठरवण्याचा न्यायालयाला अधिकार कोणी दिला? त्यावरून काहूर माजले तर नवल कुठले? किंबहूना हिंदूत्ववादी वा हिंदूंना न्याय मिळणे, हाच पुरोगाम्यांवरचा घोर अन्याय नाही काय?

9 comments:

  1. Bhau khray tumach. kathua praknala khup padar ahet pan ithlya jamate purogami ne fakta mandiracha ullekh kela .choudhari sarkhya bhuratyani tar ata pratek veli mandirat jatana check kara ki khli koni nahi na .intake nirllaja tare todlet.he tar katter Islamic lok pan mhanat nahit.shariyat yancha kayda zalay.

    ReplyDelete
    Replies
    1. मराठीत टाईप करा ओ.इंग्रजी कळत न्हाय .

      Delete
    2. Shik na mag,fuktya..

      Delete
  2. हो ना,आता माया कोडनानी यांनाही निर्दोषत्व मिळाले, भाकड पुरोगाम्यांना बरनॉल कमी पडेल. परंतु हरकत नाही फेक्युलर पुरोगाम्यांनो 2019 साठी मी खूप स्टॉक करून ठेवलाय लागेल तेव्हा मला सांगा, मी देईन.

    ReplyDelete
  3. काँग्रेसच्या नेत्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे आत्ता त्यांची वर्तणूक पहिली असता महाभारतातल्या सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा जमीन मिळणार नाही या दुर्योधनाच्या गोष्टीची आठवण येते,काँग्रेसचे वर्तन असेच राहिले तर 2019 मध्ये हा पक्ष औषधाला तरी शिल्लक राहील का अशी शंका येते

    ReplyDelete
  4. Bhau पुरोगामी लोक अजून किती खाली पडणार माहीत नाही। आणि मुळात हिंदू बहुसंख्य राहिले नाही तर हे पुरोगामी उरतील का?भीष्म सहानी यांची फाळणी वरची कादंबरी वाचा। मग कळेल एकदा शरियत लागू झाली की काय उरते। आजचा पाकिस्तान याचे जिवंत उदाहरण आहे। बाकी विनाश जवळ आला असेल तर कोण वाचवणार

    ReplyDelete
  5. हिंदूंना अजून जास्त दुय्यम वागणूक मिळावी म्हणजे खरा हिंदुत्ववादी नेता भारताला मिळेल. मोदी सेक्युलर आहेत.

    ReplyDelete
  6. Kharay bhau ya tathakthit purogamyani purogami ya shabdacha arthach badllay. Aajkal purogami ya shabdacha aarth pratigami houn baslay.Bhiti vatte o ya purogami shabdachi. Ani Sharad pawar ya(a-janta rajach)tar sodun dya. Te rajkarnat bayko ani mulivar pan satta lavtil

    ReplyDelete
  7. आज पर्यंत काँग्रेसला त्यांच्या अस्तित्वाचे असे आव्हान कधीच मिळाले नव्हते 1977,1989 आणि 1996 मध्ये जनता परिवाराच्या भांडखोर नेत्यांनी त्यांचे काम सोपे केले होते. NDA च्या 1999 ते 2004 या काळात वाजपेयी अडवाणी आणि महाजन यांना काँग्रेसच्या कुटील कारवायांचे पूर्ण आकलन झाले नव्हते. मात्र आता जी मोदी आणि शहा यांची जोडी काँग्रेसला पुरती ओळखून आहे.सतत 14 काँग्रेसच्या छळातून तावून सुलाखून निघालेले मोदी हे अतिशय धूर्त आणि मुरब्बी राजकारणी आहेत. Supreme कोर्टासमोर 10 तास सुनावणी झालेले ते भारतातले एकमेव मुख्यमंत्री आहेत.त्यामुळे केवळ घराणेशाहीचा वारसा असलेले राहुल गांधी काही परकीय संस्था भाड्याने घेऊन मोदींना टक्कर देऊ शकतील ही वाटते तितकी सोपी गोष्ट काँग्रेससाठी नाही . त्या अर्थाने आज कॉंग्रेससमोर असित्वाचे संकट आहे.

    ReplyDelete