Thursday, July 19, 2018

सभात्यागाची पळवाट

विश्वास प्रस्तावावर मतदान होईल का? 

Image result for rahul sonia cartoon

आज गुरूवारी रात्री एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात सहभागी झालो होतो. तिथे संताप अनावर झाला. कारण विषय होता अविश्वास प्रस्तावाचा आणि नेहमीप्रमाणे विविध पक्षाच्या प्रवक्ते लोकांची झोंबाझोंबी सुरू झाली. अशाच चर्चा करायच्या असतील, तर त्यापासून आपण दुर रहाण्याचा निर्णय मी तीन वर्षापुर्वी घेतला होता आणि कटाक्षाने पा्ळलाही होता. पण अनेकांच्या आग्रहाखातर अधूनमधून त्यात सहभागी व्हायला होकार दिला. विषय कुठलाही असो, त्यात पक्षीय आरोप प्रत्यारोपांनाच वेळ द्यायचा असेल, तर पक्षविरहीत लोकांना त्यात बोलवायचे कारण नसते. कारण त्या पक्षीय झोंबाझोंबीत उरलेल्यांचा वेळ वाया जात असतो, आजही तसेच झाले. प्रस्ताव बाजूला राहिला आणि निवडणूकांच्या प्रचाराची भाषणे सुरू झाली. म्हणून अर्धातास कंटाळल्यावर संधी मिळाली, तेव्हा प्रसन्ना जोशीला म्हटले, यापुढे कृपया मला आमंत्रण देऊ नका. जोवर प्रत्येक भारतीयांच्या खात्यात मोदी सरकार पंधरा लाख रुपये जमा करीत नाही व दोन कोटी नोक‍र्‍या रोजगार निर्माण करत नाही; तोपर्यंत मला आमंत्रित करू नये. कारण तेच आरोप आणि तेच प्रत्यारोप सक्तीने ऐकण्याचा संयम माझ्यापाशी उरलेला नाही. विषय अविश्वास प्रस्तावाचा होता आणि शुक्रवारी काय घडू शकेल, त्यावर बोलायचे बाजूला राहून गेले. जे सांगायचे होते, ते मग इथे तातडीने व्यक्त करायची इच्छा झाली. म्हणून अवेळी संगणक काढून लिहीत आहे, उद्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईल आणि तो मंजूर होईल काय? या प्रश्नाचे उत्तर साफ़ आणि स्पष्ट आहे. प्रस्ताव मांडून त्यावर चर्चा जरूर होईल. पण मतदान अजिबात होणार नाही. आपापले बोलून झाल्यावर विरोधी पक्ष व कॉग्रेस मोदींचे भाषण ऐकूनही घेणार नाही. त्यात काहीतरी खुसपट काढून विरोधक सभात्याग करतील. कारण मतदानाला भाजपा सज्ज असला तरी त्यात आपली बेअब्रू विरोधकांना नको आहे.

सत्ताधारी पक्षाकडे बहूमत स्पष्ट असताना आणि त्याने झटपट प्रस्ताव मान्य केलेला असताना, विरोधी पक्ष मोदींच्या सापळ्यात फ़सलेले आहेत. यातले मतदान झालेच तर त्यात विरोधकातली दुफ़ळी व बेबनाव चव्हाट्यावर येण्याची खात्री देता येते. त्यामुळेच बहूमताची संख्या जमवण्याचा कॉग्रेसचाही प्रयत्न असू शकत नाही. आकडेच बोलके आहेत. प्रस्ताव सत्ताधारी पक्ष टाळायचा प्रयत्न करणार, ही अपेक्षा होती. म्हणून कॉग्रेस मोठा पक्ष असूनही तेलगू देसमला पुढे करण्यात आले. पण सोनियांनी आमच्यापाशीही संख्याबळ असल्याची भाषा वापरण्याची चुक केली आणि डाव उलटला. कारण मतदान झालेच तर सरकार पडण्याची बिलकुल शक्यता नसून, उलट विरोधी पक्षातली दुही चव्हाट्यावर येण्याचा मोठा धोका आहे. जे आकडे अशा मतदानातून समोर येतील, ते महागठबंधनाची लक्तरे करणारे ठरतील. त्यामुळेच आता अब्रू झाकण्यालाच रणनिती बनवावे लागणार आहे. त्यातली पळवाट म्हणजे सभात्याग इतकीच असू शकते. सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन मोदींना हरवू शकतात, या भ्रमाला सुखरूप ठेवायचे असेल, तर लोकसभेत मतदानाचा प्रसंगच येऊ देता कामा नये. ही गोष्ट साफ़ आहे. किंबहूना माझे हेच आकलन मला चर्चेतून मांडायचे होते. पण कॉग्रेस व भाजपा शिवसेना यांच्यातली झोंबाझोंबी सुरू झाली आणि अविश्वास प्रस्ताव एबीपीच्या चर्चेत बारगळून गेला. पण त्यात ज्यांनी कोणी ऐकले असेल त्यांना माझी बाजू सांगून टाकणे अगत्याचे वाटले, म्हणून हा ब्लॉग उशिरा उठून लिहीला आहे. यात अण्णा द्रमुक, बीजेडी व तेलांगणा समिती यांनी अंग बाजूला घेतले आहे. त्यामुळे विरोधकांची तारांबळ उडालेली आहे. त्यांना चर्चा हवी, पण मतदान नको आहे. कारण विरोधी एकजुटीची अब्रु चव्हाट्यावर आणायची भिती आहे. मग सभात्याग हाच उत्तम मार्ग शिल्लक उरतो. उद्या मोदी प्रस्तावावरील चर्चेला उत्तर द्यायला उभे रहातील, तेव्हा यापेक्षा वेगळे काही होणार नाही.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला अन्य विरोधक मान्यता देत नाहीत. तर या प्रस्तावाच्या निमीत्ताने कॉग्रेसकडे विरोधकातला अधिक वेळ आहे. मोदींच्या विरोधातले प्रमुख भाषण राहुल करतील व त्यातून मोदी विरुद्ध राहुल असा सामना पेश केला जाईल. त्यातून विरोधकांच्या माथी आपल्या पुत्राला मारण्याचा डाव सोनियांनी खेळला आहे. त्यात त्या किती यशस्वी होतात, ते प्रस्तावाचा निकाल लागल्यावरच कळेल. त्यांना विरोधी एकजुट व अविश्वास प्रस्तावाच्या भवितव्याशी कुठलेही कर्तव्य नसून, आपल्या पुत्राचा विरोधी एकजुटीचा नेता म्हणून अभिषेक करून घेण्याची संधी साधून घ्यायची आहे, ती साधली जाईपर्यंत मोदी बोलायला उभे रहाणार नाहीत. कारण प्रस्तावावरील एकूण चर्चेला उत्तर देण्याचा अधिकार पंतप्रधानांचा आहे. तेव्हा त्यात खुसपट काढून सभात्यागाचा उपचार पार पाडला जाईल. त्यामुळे राहुलचे सादरीकरण साधले जाईल आणि मतदानाची नामुष्कीही येणार नाही. त्यामुळे शुक्रवारी संसदेत काय होऊ शकेल आणि कुठला पक्ष काय पवित्रा घेईल, ते चर्चेतून सादर व्हायला प्राधान्य हवे होते. दुर्दैवाने आजची चर्चाही दोन पक्षांच्या आरोप प्रत्यारोपातच नासाडी झाली. उद्या त्याचे प्रत्तंतर येऊ शकेल. प्रत्यक्ष प्रस्ताव संसदेमध्ये सादर झाला व नंतर पंतप्रधान उत्तर द्यायला उभे राहिल्यावर काय होते, त्याचा दाखला मिळणारच आहे. तेव्हा कॉग्रेसने खरोखरच सभात्याग केला, तर वाहिन्यांवरील चर्चा कशा थिल्लर असतात, त्याचाही दाखला मिळून जाईल. हे नंतर बोलण्यापेक्षा मी आजच लिहून टाकले आहे. ते चुकले तर माफ़ी मागायलाही मला लाज वाटणार नाही. कारण गुरूवारी रात्रीच्या चर्चेत मी संयोजक प्रसन्ना जोशीवर चिडलेला होतो. त्याचीही माफ़ी मागायला मला कमीपणा वाटणार नाही. पण वाहिन्यांनी आपल्या चर्चेचा सूर व स्वरूप बदलले नाही, तर त्यांची टीआरपी अशीच घसरत जाणार आहे. उद्याच्या घटनाक्रमाने मला चुकीचा ठरवला तरी हरकत नाही. मी सत्य स्विकारायला मागेपुढे करीत नाही.

38 comments:

  1. भाऊ तुम्ही जी शक्यता वर्तवली आहे. तेच होणार याची मला खात्री आहे.

    ReplyDelete
  2. प्रसन्ना चे आणि तुमचे कसे काय जमते ? तो तर परका पुरोगामी आहे.

    ReplyDelete
  3. योग्य केलं भाऊ.. या चर्चा अशाच होत राहणार..

    ReplyDelete
  4. Gr8 Bhau. Gr8 dedication.

    ReplyDelete
  5. भाऊ निखिल वागळे बद्दल खूप दिवस झाले काही बोलला नाही वागळे कुठे गायब झाले काही कळलं नाही IBN LOKMAT मधील राजदिप सरदेसाई आणी निखिल वागळे कुठे गायब झाले काही कळलं नाही

    ReplyDelete
  6. Khar ahe bhau bhau tech tech bhangar bolun kantala antat he Lok. Visheshtaha Congress Ani virodhi Lok... Jantela 15 lakh nako kiwa don koti rojgar nirman kele tari tarun Lok tyat kiti interested ahet ha prashna ahe Karan pratyek yuvk aaj vyaysay karu pahatoy job nahi
    Virodhak purnpane vedgalpane bolt ahet.
    Ani rahili channel charcha tar ti itki karkassh zali ahe aajkal ki nako wate

    ReplyDelete
  7. Modi's answer will be very costly for opposition.

    ReplyDelete
  8. एक माहिती हवी होती, भाजपकडे एकूण साडेतीन तास आहेत. मोदी शेवटी बोलतील पण इतर भाजप नेते आधी बोलू शकतील काय?

    ReplyDelete
  9. I was for your view on ongoing situation

    ReplyDelete
  10. असेच होईल भाऊ...
    मोदी उत्तर द्यायला लागले की यांचे खूप वाभाडे काढतील...
    त्यामुळे दगड मरून मोहोळ उठवायचे आणि पळून जाण्याचा खेळ हे खेळतील यात शंका नाही.….

    ReplyDelete
  11. विरोधकांच्या वर्तनुकिवरूण असे वाटते की त्यांना देशाच्या भवितव्याची कोणत्याही प्रकारची काळजी नाही. प्रतेकाला स्वतः चा स्वार्थ साधायचा आहे.भाऊ देशाचं भविष्य काय?

    ReplyDelete
  12. चेनेल वरील चर्चा म्हणजे फ़क्त दिखावा असतो .त्यात गाम्भिर्य काहिच नसते .
    भाऊ आपले परिस्थितीचे आकलन उत्तम व निरंक सुद्धा .

    ReplyDelete
  13. You are absolutely right
    Mainstream media is becoming poisonous fay by day, not allowing the truth to come before the public.

    ReplyDelete
  14. Great bhavu
    I know you will be right!

    ReplyDelete
  15. सडेतोड... आणि हीच रणनीती काँग्रेसने सातत्याने ठेवलेली आहे. गंभीर चर्चेपासून पाल काढणे, अनर्गल आरोप करणे, एवढेच काम त्यांच्यापाशी उरले आहे

    ReplyDelete
  16. भाऊ, आपण जो अंदाज वर्तवला आहे तसाच अंदाज मी ही केलेला आहे. विरोधकांनी अत्यंत चुकीच्या वेळी व चुकीच्या पध्दतीने ह्या अविश्वास प्रस्तावाची मागणी केलेली वाटते. विरोधकांना मांडायचे मुद्दे त्यांनी अनेकदा मांडून झालेले आहेत. त्यानंतर अनेक निवडणूकाही झालेल्या आहेत व जनतेने उलट मोदीजींना भरपूर मते देवून पसंतीही दिलेली आहे. विरोधकांकडे त्या व्यतिरिक्त नवीन मुद्दाच नाही. मात्र उत्तराचे वेळी मोदीजी त्यावर खरपूस समाचार घेतील व ती ऐकण्याची संधी विरोधकांनी आणल्या बद्दल मात्र त्यांचे आभार मानावेत तेव्हढे थोडेच असतील!
    मात्र आपण भाकीत केल्या प्रमाणे विरोधक ते ऐकायच्या मनस्थितीत असतील ह्याची सुतराम शक्यता नाही व मतदानाचे वेळी सभात्याग करतील हे स्पष्टच दिसते. अश्यावेळी नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषणाचे वेळी गदारोळ करून ते भाषण तरी ऐकू देतील की नाही त्याचीच मला शंका वाटते. अर्थात मोदींची तेव्हाही मागिल वेळे सारखे रेटून आपले भाषण पूर्ण करतीलच पण त ऐकू न आलेच तर कोणी त्यांचे संपूर्ण भाषण लिखीत स्वरूपात वाचावयास तरी उपलब्ध करून देतील का ?

    ReplyDelete
  17. काय चालले आहे हे कळणे जर कठीण जात आहे. मुलाला पुढे आणण्यासाठी हा हट्ट असल्यास त्याची किंमत जनतेनी का मोजायची ? सर्व देशाचा वेळ खर्च होणार. बाहेर काय येणार तर सभात्याग ! पूर्वी लहान मुलांना भातुकली नावाचा खेळ द्यायचे व ती मुले निवांत एका बाजूला जाऊन खेळायची. त्यामुळे मोठी माणसांना त्याचे काम करायला वेळ मिळायचा. असे काही बाही करून त्या भातुकलीच्या खेळात या मुलाला सर्व भूमिका देऊ या. अगदी पं प्रा, रा प्रति, अध्यक्ष, जबाबदार नागरिक वगैरे. बाकीचे लोक देशहिताचे काम तरी करतील.

    ReplyDelete
  18. Bhau appreciate your analysis n humblenes

    ReplyDelete
  19. bhau,
    to karyakram sampalyavar mi TV var tumhala pahile. tumache mat aikayala milale nahi mhanun sakali-sakali blog vachat aahe...

    ReplyDelete
  20. आदरणीय भाऊ - मीडिया वरील या चर्चा एकदम निम्न स्तरावर असतात. आपला अमूल्य वेळ यासाठी देऊ नये. मनस्तापच होणार. आपला ब्लॉग अधिक उजवा व बोधप्रद असतो.
    प्रा नाखरे

    ReplyDelete
  21. अभ्यासपुर्ण!

    काल तुम्ही येणार म्हणून ABP Maza लावला. पण ABP Maza ला अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात रस नाही.

    ReplyDelete
  22. भाऊ तुम्ही काहीही बोला आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत

    ReplyDelete
  23. Bhau chukto touch manus asto baki sale furogami astaat....chuklat tr kahi harkat nahi karan tumche vishleshan tarkik vatatey...

    ReplyDelete
  24. धन्यवाद भाऊ..शिवसेनेने बहिष्कार टाकला आहे यावर काही सांगा ना.

    ReplyDelete
  25. श्री भाऊ मला वाटत तुमच्या एवढं राजकीय आकलन फारचं थोड्या लोकांना असेल आणि असलं तरी लिहायची हिम्मत हवी

    ReplyDelete
  26. भाऊ आपण या चॅनेल वर जात जाऊ नका आपला वेळ वाया जातो.

    ReplyDelete
  27. As expected opposion planned for walk out ... Tech hot ahe je bhau tumhi apeksha keli

    ReplyDelete
  28. Yes bhau, i was watching that discussion. Yor request to prasanna was correct. I strongly suggest u not to accept the request of any channel. I am thr regular reader of your articles from marmik days.i had read your newspapers pratinidhi,janshakti.i missed you after 2002 as i was tranferred out of maharashtra.after returning back to mumbai in 2015 i came to know that u are blogger. It was a great opportunity for me to read your articles again.
    It will be your great contribution to marathi journalism rather than accepting requests from people like prasanna.these shallow fellows make much noise only.

    ReplyDelete
  29. भाऊ, परफेक्ट भविष्यवाणी! अर्थात याला अभ्यास लागतो! झी २४ तास त्यांच्या ट्विटरवर टाकतंय ‘कॉंग्रेसचा आणखी एक मास्टरस्ट्रोक, मोदींच्या भाषणाअगोदरच करणार सभात्याग’ म्हणजे जे तुम्ही कालंच इथं लिहीलं त्याला हे मुर्ख मास्टरस्ट्रोक म्हणुन गुणगाण करतायेत! मिडीया किती फालतु झालीये याचं हे मुर्तीमंत ऊदाहरण!

    ReplyDelete
  30. मित्रो अब वसंतसेना बदल कर राहुलसेना बन गयी है !
    #जै महाराष्ट्र

    ReplyDelete
  31. Logically, what you said should have happened.. But alas, opposition is not so thoughtful. Isn't it?

    ReplyDelete
  32. भाऊ, ह्या उतावळ्या(घोड) नवर्याने तुमचा अंदाज चुकवला.जर सभात्याग केला असता तर झाकली मूठ राहिली असती. ती एकदाची उघडली आणि मुठीत दगड निघाला. सर्वत्र ह्या बालिशपणाचे हसे झाले
    सर्वात मजा म्हणजे आता शिवसेनेचे काय ? त्यांच्या वाचून 325 हा आकडा गाठला गेला आहे.

    ReplyDelete
  33. भाऊ मला वाटते मोदीसुद्धा तुमचे ब्लॉग वाचत असावेत, कारण मतदानाच्या अगोदर मोदींनी केलेल्या भाषणात काँग्रेसच्या कुकर्माचे जे पाढे वाचले त्यातील मुद्दे तुमच्या पूर्वीच्या ब्लॉगशी साधर्म्य आणणारे होते.

    ReplyDelete
  34. भाऊ, आपलं मत शंभर टक्के बरोबर आहे. पण काँग्रेस आत्मघात करायला निघालेली आहे. काल सभात्याग केला असता तर बेअब्रू वाचली असती. पण मतविभाजनाची मागणी करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाली. आता ही फुटलेली मत कुणाची याच्यावरून डोकेफोड करावी लागेल. त्याशिवाय दुसऱ्या तिसऱ्या आघाडीची बिघाडी झालेली आहे.

    ReplyDelete
  35. Adarniya bhau
    Tumache sarv lekh mi vachto ani tyamule mazya rajkiya knowlege madhe bhar padte tumvhe nishkarsh ani vivechan agdi achuk ase aste. Fakt avishawas prastavavaril tumcha nishkarsh chukicha tharla. Aso kadhi hote ase. Pan tumhi je blog madhe mafi baddal lihilet tyapramane ekhada blog lihava jene karun tumchybaddal jevdha adar ahe tyapeksha duppat hoil.
    Tumhala kami lekhne ha uddesh nahi ahe. Plz apan ya goshti var pramanik vichar karav hi vinanti.

    ReplyDelete