* भीमा कोरेगावच्या पुर्वी एक दिवस पुण्यात शनवारवाड्यासमोर एल्गार परिषद भरली होती आणि त्यात तथाकथित २५० सामाजिक संघटनांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला.
* वर्षारंभी भीमा कोरेगाव येथील स्मारकाच्या अभिवादनाला लोक जमले असताना हिंसाचार उफ़ाळला आणि त्यात फ़टांगळे नावाच्या तरूणाची हत्या झाली. दुकाने, गाड्या जाळल्या गेल्या. सगळीकडे तात्काळ हिंदूत्ववादी लोकांवर आरोपसत्र सुरू झाले.
* कोणा महिलेने पिंपरी चिंचवड भागात संभाजी भिडेगुरूजी व मिलींद एकबोटे यांच्यावर आरोप करणारी तक्रार नोंदवली. तपास सुरू झाला आणि एकबोटेंना अटक झाली तर भिडेगुरूंजींना मुख्यमंत्र्यांनीच विधानसभेत क्लीन चीट दिली.
* हिंसाचाराच्या काळात आपण भीमा कोरेगाव परिसरातही नसल्याचा खुलासा करताना भिडेगुरूजींनी त्यावेळी सातारा जिल्ह्यात एका कार्यक्रमात असल्याचे सांगितले. आज राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंतराव पाटिल यांच्या दिवंगत मातोश्रींच्या श्राद्ध सोहळ्यात त्यावेळी उपस्थित असल्याचा भिडेगुरूजींचा दावा पवारांचे सहकारी जयंतरावही खोडून काढू शकलेले नाहीत.
* नंतर एल्गार परिषदेत जातीय सलोख्याला धक्का लावणारे व चिथावण्या देणारे साहित्य, पुस्तिका वाटल्या गेल्या आणि चिथावणीखोर भाषणे झाल्याची तक्रार विश्रामबाग वाडा पोलिस ठाण्यात अक्षय बिक्कड व तुषार दामगुडे या दोघा तरूणांनी नोंदवली.
* भीमा कोरेगावचे राजकीय भांडवल करून प्रकाश आंबेडकर व अन्य काहीजणांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यातूनही बराच हिंसाचार उफ़ाळला. अनेक शहरातील जनजीवन विस्कळित झाले. काही दिवस प्रकाश आंबेडकर व त्यांचे सहकारी संभजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करीत राहिले. पुढे त्यांचा उत्साह संपला. आता सर्वजण विषयच विसरून गेलेले होते.
* मध्यंतरी एकबोटे यांना अटकपुर्व जामिन नाकारला गेला व अटकही झाली. पुढे काही झाले नाही आणि कोर्टाला त्यांनाही जामिनावर मुक्त करावे लागले. यापैकी कोणी भीमा कोरेगाव हिंसाचारात हिंदूत्ववादी वा धारकरी यांच्या कुठला सहभागाचा पुरावा देऊ शकले नाही. आरोप करायचे आणि पुरावे सरकार पोलिसांनी शोधून काढायसाठी आंदोलन करायचे, हाच खाक्या राहिला. मात्र दामगुडे व बिक्कड यांच्या रितसर तक्रारीची चौकशी व तपास होत राहिला.
* जुन महिन्यात प्रथमच भीमा कोरेगावच्या हिंसाचारासाठी व त्यामागे कारस्थान असल्याचे धागेदोरे मिळाल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी काही नक्षलवादी व माओवादी लोकांची धरपकड केली. त्यांच्या घरावर किंवा इतरत्र घातलेल्या धाडीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजीव गांधी यांच्याप्रमाणे घातपाती हत्या करण्याच्या कारस्थानाचे तपशील मिळाले. जुन महिन्यात या लोकांना अटक झाली होती. तिथून सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा, वरवरा राव इत्यादी नावे पुढे आली.
* योगायोग काही कमी नाहीत.. याच दरम्यान एल्गार परिषदेत सहभागी उमर खलीद याची सहयोगी शेहला रशीद हिचा एक ट्वीट वादग्रस्त होता. संघ व नितीन गडकरी मिळून नरेंद्र मोदींची हत्या करणार आणि त्याचे खापर मुस्लिम व कम्युनिस्ट गटांवर फ़ोडणार, असा तो ट्वीट होता. गडकरींनी त्यावर खटला भरण्याचा इशारा दिल्यावर शेहलाने तो ट्वीट विनाविलंब मागे घेतला. पुढे जाऊन संघवाल्यांना उपहासही कळत नाही अशी टिप्पणीही केलेली होती.
* गंमतीची गोष्ट अशी, की वकील गडलिंग आणि अन्य काही लोकांच्या पत्रापत्रीत पंतप्रधानाच्या हत्येचा डाव मांडला जातो आणि जवळपास त्याच दरम्यान शेहला तशाच अर्थाचा ट्वीट करते? नंतर उपहास म्हणून शेपूट घालते? एकाला हा विनोद वाटतो आणि दुसर्यांना तसेच पोलिसांना सापडलेले पत्र, म्हणजे सुडबुद्धीचे कारस्थानी खोटे पुरावे वाटतात? ७ जुनला हे पत्र मिळाल्याचे पोलिस म्हणतात आणि ९ जुनला शेहला त्याच अर्थाचा ट्वीट करते?
* त्या काही नक्षली व समर्थकांना ताब्यात घेऊन पोलिस तपास पुढे नेतात आणि ३१ ऑगस्टला महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांची सेवानिवृत्तीची मुदत वाढवली जाते. जनहितार्थ त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. योगायोग म्हणजे त्याच दरम्यान देशाच्या पाच राज्यात महाराष्ट्र पोलिस अनेक संशयित नक्षलींच्या घरी धाडी घालून त्यांना ताब्यात घेतात. त्यावरून गदारोळ सुरू होतो.
* मुदतवाढ मिळालेले डी. डी. पडसलगीकर हे महाराष्ट्र केडरचे सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असून दिर्घकाळ ते केंद्रीय सेवेत राहिलेले आहेत, प्रामुख्याने गुप्तचर खात्यात त्यांनी प्रदिर्घ सेवा दिलेली आहे. तिथून थेट मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून आले व काही काळापुर्वी महासंचालकपदी बसले. त्यांच्या निवृत्तीच्या मुहूर्तावरच नक्षली सुत्रधारांची सार्वत्रिक धरपकड होते आणि ‘जनहितार्थ’ पडसलगीकरांना आणखी तीन महिने राज्याच्या पोलिस सेवेत कायम राखले जाते.
* दिर्घकाळ गुप्तचर खात्याची सेवा आणि मोक्याच्या क्षणी त्यांना मिळालेली ‘जनहितार्थ’ मुदतवाढ, यांचा आजच्या घडामोडीत काही परस्पर संबंध असू शकतो का?
* ह्या धरपकडीमध्ये जी कागदपत्रे हाती लागलेली आहेत, त्यात परदेशातून हत्यारे आयात करण्याचा व वितरणाचाही विषय आलेला आहे आणि वैभव राऊतला नालासोपार्यात पकडल्यापासून एकाच पिस्तुलाचा विषय चघळला गेलेला आहे. त्याला इतके खुन पाडण्यासाठी कुठून व कोणी पिस्तुल पुरवले, त्याविषयी मात्र रहस्य कायम राखण्यात आलेले आहे. एक आठवडा सनातनच्या धरपकडीसाठी गाजवला गेला अणि पुढल्या़च आठवड्यात त्याच महाराष्ट्र पोलिसांनी नक्षली सुत्रधारांच्या मुसक्या बांधल्याने गदारोळ सुरू झाला.
* शेहला रशीद गंमत म्हणून पंतप्रधानांच्या हत्येचे ट्वीट करते. पोलिसांना तशा तयारीची कागदपत्रे नक्षल सुत्रधारांच्या संगणकात सापडतात. जनहितार्थ गुप्तचर खात्याचा दांडगा अनुभव असलेल्या अधिकार्याला मुदतवाढ दिली जाते. हे सगळे योगायोग आहेत? की येऊ घातलेल्या मल्टीस्टारर चित्रपटाचा फ़क्त ट्रेलर आहे? हे अनेक महत्वाचे मुद्दे कुठल्या उथळ खळखळाटाच्या चर्चेत वाहिन्यांवर दिसले नाहीत, ऐकायला मिळाले नाहीत. म्हणूनच हे एका मोठ्या भयंकर गुढ रहस्यमय कोड्याचे विखुरलेले तुकडे वाटतात. कधीतरी ते तुकडे क्रमवारीने सुसंगत मांडायचा प्रयत्न करूया ना?
नक्कीच
ReplyDeleteभाउ एकबोटे भिडे यांना काही पुरावे नसताना अटककरा म्हनुन मोर्चे काढनारे काल नक्षलींनच्या विरुद्ध पुरावे असताना क्लिनचीट देउन मोकळे झाले नक्षलींना वाचवनार लाॅबी तर फार मोठी दिसतेय एका दिवसात चहुबाजुनी संरक्षन सुरु झालय कोनताचमंच नाही की यांनी सोडलाय पटापट बाहेर येतायत लक्ष ठेवल पाहिजे
ReplyDeleteह्या केसेस खुप गपंतागुंतीच्या आहेत की काही कळेना४हत्या सतातनची पकडली माणसेनंतर वेगळीच माणसे भीमाकोरेगाव एल्गार परीषद नक्षली कनेक्शन परवा पकड नक्षली त्याचे समर्थन करनारे पक्ष ,लोक सर्वामधे काही संबध आहे अस वाटतय महाराष्टातील घटनानी देश कनफ्युज आहे पोलीस गुप्तचर यंतरनाना जर शोधुन काढता आल तर तो खुप मोठा शाॅक असेल
ReplyDeleteYes bhau a big mystery every one knows but no one conclude hope it will unveil one day.and its seems like its tip of ice lot yet to come n shock us
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteहो .... मोठा चित्रपट नाही पण " महाभारत " सारखी मोठी मालिकाच पुढे येणार असेल.
ReplyDeleteह्याची योग्य जुळवाजुळव फक्त तुम्हीच करू शकता.
तुमच्या अभ्यास पुर्ण लिखाणास सलाम.
फक्त भाऊ मोदी परत निवडून आले पाहिजेत नाहीतर या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरेल पुढचं सरकार आल्यावर...मग देशाचं विचार करायला ना मोदी असतील ना डोवल. त्यात काँग्रेस चं सरकार आलं तर त्यांनी देशाच्या सुरक्षेविषयी आधी काय घोळ घातले आहेत हे तुम्हीच लिहिलं होतं आधीच्या लेखांमध्ये.
ReplyDeleteसध्या पेट्रोल च्या वाढत्या किमती, नोटबंदी अश्या गोष्टींमुळे मोदीविरोधी लाट येऊ शकते. पण अश्या गोष्टी २०१४ च्या निवडणुकी मध्ये सुद्धा होत्या. तरीही मोदी निवडून आले.
there is one thing common in these scenarios which is Nordic funding and also active measures of Rus and China.
ReplyDeleteyat pn kahitari dav asu shakto naxalincha june madhe yanche kahi bhau bandhu pakdle astana pn gharat 1000ro purawe miltat mhnj kai(police chya bhashet).
ReplyDeleteनक्कीच
ReplyDeleteI hv faith in mr padsalgikar. He is capable of going to the root of all this mess.
ReplyDeleteअतिशय सुंदर विश्लेषण. देशाला पोखरण्यासाठी कोणत्या स्तराला जाऊन काय काय देशविघातक कारवाया केल्या जात आहेत, आणि यांच्या या उद्योगांचे समर्थक वकील आणि नकली मानवाधिकार कार्यकर्त्यांची बाहेर आलेली पिलावळ हे फलित. पोलिस व सरकारचे अभिनंदन.
ReplyDeleteअसे देशद्रोही उद्योग फक्त भारतातच होऊ शकतात. हे चित्र बदलायलाच हवं.
ReplyDeletesacred games
ReplyDelete