राफ़ायल लढावू विमान खरेदीच्या विषयावर इतके रणकंदन माजलेले असतानाही सातत्याने इतर विषयावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, याच बाबतीत मौनव्रत धारण करून कशाला बसलेले आहेत? सगळे विरोधक तोच प्रश्न विचारीत आहेत आणि माध्यमातूनही तोच भडीमार चालू आहे. पण त्याला मोदी अजिबात बधलेले नाहीत. सहाजिकच विरोधकांना अधिकच जोर चढला आहे आणि अधिकाधिक तावातावाने राफ़ायलचा विषय रंगवला जात आहे. यातून मग आरोप खरे असल्याने वा बोलायला काहीच नसल्याने मोदी चिडीचूप बसल्याचा निष्कर्ष काढला जाणे स्वाभाविक आहे. त्यातून मग पुढली पायरी म्हणजे राफ़ायलची खरेदी मोदी सरकारला पराभवाच्या कडेलोटावर घेऊन जाणार, इथपर्यंत मजल गेली तर नवल नाही. एका माणसाला आपल्यावर हे संकट कोसळले असताना गप्प बसणे परवडू शकते का? नसेल तर मोदी गप्प कशाला? त्याचे उत्तर अजेंडा असे आहे. राफ़ायल खरेदीत कुठलाही घोळ नाही की भ्रष्टाचार नाही आणि त्यामुळे आपल्या सरकारला वा लोकप्रियतेला धोका नाही, याची मोदींना पुरेपुर खात्री आहे. तशीच खात्री त्यांना आज नव्हे मागल्या अनेक वर्षापासून आहे. म्हणून २००२ पासून त्यांनी कधीही अशा गदारोळाला वा आरोपबाजीला उत्तर देण्याचे कटाक्षाने टाळलेले आहे. त्याचे कारण असे, की अजेंडा कोणी ठरवायचा? आपला अजेंडा मतदारासमोर मांडायचा, की विरोधकांनी सादर केलेल्या अजेंडालाच प्रतिसाद देऊन निवडणूकीसाठी विरोधकांचा अजेंडा मान्य करायचा, असा प्रश्न आहे. त्यातून मोदींना निवड करायची होती आणि त्यांनी कायम आपला अजेंडा रेटण्याची भूमिका घेतलेली आहे. हा आजवरच्या सोळा वर्षाचा म्हणजे गुजरात दंगलीनंतरचा अनुभव किंवा इतिहास आहे. त्यातील यशामुळे मोदी खुप काही शिकले आहेत आणि त्यातल्या अपयशाने विरोधकांना काहीही शिकता आलेले नाही. हे राफ़ायलचे वास्तव आहे.
सध्या जो धुरळा राहुल गांधींनी उडवला आहे, तो त्यांचा अजेंडा आहे आणि हळुहळू विरोधी पक्षही त्यात ओढले जाऊ लागले आहेत. तो अजेंडा स्विकारला, मग मोदी विरोधी राजकारणाचे राहुल नेता होऊन जातात. बाकीच्या विरोधकांना तोंडाने त्यांचे नेतृत्व मान्य करायची गरज उरत नाही. आपोआप राहुल विरोधी पक्षाचे नेतेच होऊन जातात. सध्या अनेक चाचण्या आल्या आहेत आणि येतही आहेत. त्यात सगळे राजकारण मोदी व इतर, असेच घुमते आहे. मग त्यात मोदींना पर्याय कोण असे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपोआप राहुल असे येते. दोघांच्या लोकप्रियतेमध्ये वा पाठींब्यामध्ये मोठी तफ़ावत आहे. ४८ विरुद्ध २२ अशी तफ़ावत असली, तरी दुसर्या क्रमांकावर राहुल आहेत. तिथेच बाकीच्या विरोधकांची गोची होऊन गेलेली आहे. त्यांनी कितीही राहुलचे नेतृत्व झिडकारले वा नाकारले, तरी देशाच्या कानाकोपर्यात कॉग्रेस पक्षाचे थोडेतरी अस्तित्व आहे. बाकीच्या कुठल्याही विरोधी पक्षाला एकदोन राज्यापलिकडे स्थान नाही. सहाजिकच स्थानिक मतचाचणीत प्रादेशिक नेता पुढे असतो आणि राष्ट्रीय प्रश्न आला, मग मोदी नको असलेला मतदार राहुलकडे बोट दाखवतो. त्याची गोळाबेरीज २२ टक्केपर्यंत येत असते. कारण राहुलने देशभर गोंधळ घातलेला आहे. त्याला प्रतिसाद म्हणून मते मिळणार नाहीत. पण जनमानसात देशव्यापी विरोधातला नेता कोण, तर राहुल ओळखीचा चेहरा असतो. मोदींनाही तेच हवे आहे. प्रत्येक राज्यातला स्थानिक प्रादेशिक नेता बलवान असला, तरी विरोधी नेता मात्र मोदींच्या तुलनेत दुबळा असायला हवा आहे. त्यासाठी मग राहुलचा अजेंडा एकप्रकारे भाजपाने स्विकारलेला आहे. पण मोदींनी नाकारलेला आहे. ही गुंतागुंत समजून घेतली, तर मोदींचे राफ़ायलविषयीचे मौन समजून घेता येईल. राहुलच्या प्रश्नांना उत्तरेही देण्याची गरज नाही. पण भाजपा नेते प्रवक्ते खुलासे करीत असतात. मोदी गप्प बसतात. यातून काय साधले जाते?
देशासमोरच राष्ट्रीय प्रश्न कुठला? किंवा कोणते प्रश्न आहेत? तर जे राहुलनी मांडलेत, तेच आहेत. निदान भाजपाला असेच चित्र उभे करायचे आहे. जितका भाजपावाले राहुलचा धिक्कार करतील व टिंगलटवाळी करतील, तितकी राहुलची राष्ट्रीय प्रतिमा उभी रहायला हातभार लागतो. तशी प्रतिमा उभी रहाण्याने भाजपाला थेट फ़ायदा नाही. पण राष्ट्रीय पर्याय शोधू बघणार्या मतदाराला स्थानिक प्रादेशिक नेता व राहुल यातून निवड करण्यासाठी गोंधळात पाडले जाते. एका चाचणीत तेलंगणामध्ये स्थानिक लोकप्रियता चंद्रशेखर राव यांची आहे. ती भाजपा वा मोदींपेक्षा अधिक आहे. पण लोकसभेसाठी प्रश्न विचारला मग मोदी व राहुल असे उत्तर येते. हा फ़रक महत्वाचा असतो. तोच मग विविध राज्यातल्या लोकसभेच्या मतदानावर प्रभाव पाडणार असतो. कारण मागल्या व येत्या लोकसभा निवडणूकीत तोच महत्वाचा फ़रक आहे. तेव्हा मोदी भाजपाला जिंकून देतील किंवा नाही, अशा तिढा होता आणि आता मोदी जिंकतील की नाही, असा विरोधकांना पेच आहे. त्यात जिंकायचे असेल तर आपला अजेंडा इतरांच्या गळी मारणे व त्यांना अजेंडा नाकारणे ही रणनिती असते. गुजरात दंगलीनंतर काही वर्षातच मोदींनी हा अजेंडा आत्मसात केलेला आहे. मौलवीची टोपी नाकारण्याचा अजेंडा कितीही पुढे रेटला गेला, तरी मोदींनी तो कधी स्विकारला नाही की त्याला उत्तर दिले नाही. करण थापर वा अनेक पत्रकारांनी मोदी कॅमेरा सोडून पळाल्याच्या बोंबा ठोकल्या, त्याला मोदींनी कधी प्रतिसाद दिला नाही. हिंदूत्वाची प्रयोगशाळा म्हणून गुजरातवर झोड उठवली गेली, मोदींनी चकार शब्दाने त्याचा प्रतिवाद केला नाही. उलट तितक्याच चिकाटीने सभातून वा सोशल माध्यमातून त्यांनी आपला अजेंडा लोकांच्याच नव्हेतर विरोधकांच्याही गळी मारलेला आहे. मग आता राफ़ायलच्या सापळ्यात त्यांनी अडकावेच कशाला?
विरोधकांची एकच चुक आहे. त्यांना सौरभ गांगुली व महेंद्रसिंग धोनी यातला फ़रक ओळखता आलेला नाही. गांगुली तात्काळ प्रतिक्रीया देणारा तर धोनी मनामध्ये चाललेल्या उलघालीचा लवलेशही न दाखवणारा होता. कितीही चिथावण्या मिळाल्या म्हणून प्रतिसाद न देणारा तो धोनी आणि सोळा वर्षात कुठल्याही भयंकर आरोप वा बदनामीला दुर्लक्षित करणारे मोदी; यातले साम्य कोणाला ओळखता आले आहे काय? मोदी हा भारतीय राजकारणातला नवा प्रकार आहे. मनमोहन सिंग, वाजपेयी, अडवाणी, पवार वा देवेगौडा नरसिंहराव यांच्याशी तुलना करून त्याला हाताळता येणार नाही. या माणसाने राजकारणात आल्यापासून राजकीय वातावरणच बदलून टाकले आहे. निकष व नियम बदलले आहेत. त्याला नव्या पद्धतीने हाताळावे लागेल. त्याच्या चाली ओळखून प्रतिकार करावा लागेल. त्याने २०१४ मध्ये कॉग्रेसच्या हातून अजेंडा हिरावून घेतला होता आणि आजही आपलाच अजेंडा इतरांवर लादणे सुरू आहे. पुढल्या निवडणूकीचा अजेंडा मोठमोठ्या जाहिरसभा मेळावे किंवा सोशल माध्यमातील संपर्कातून मांडायला सुरूवातही झाली आहे. पुढल्या तीनचार महिन्यात त्यालाच सामोरे जाण्याची नामुष्की विरोधकांवर येणार आहे. अखेरच्या हातघाईसाठी त्यांनी मागे काही राखून ठेवले नाही, तर धुमश्चक्री होईल तेव्हा कुणाचा खुर्दा उडणार आहे? नोटाबंदी, कुठल्या डायरीतील मोदींचे नाव, जीएसटी. अगदी संसदेतला भूकंप, अशा सर्व धक्क्यांना तोंड देऊन या नेत्याने साडेचार वर्षे सुरळीत घालवली आहेत. त्याला असले फ़ुसके बार उडवून बाद करता येत बसते. आज राफ़ायलच्या खरेदीत अंबानींचे नाव घुसवलेले आहे. गेल्या लोकसभेत असाच हलकल्लोळ अदानींच्या नावाचा करून हाती काय लागले होते? मैदानी फ़ौज कुशलतेने हातळणारा पक्षाध्यक्ष आणि लोकप्रियतेच्या शिखरावर साडेचार वर्षानंतरही असलेला पंतप्रधान; हे मिश्रण असल्या दिवाळीच्या फ़टाक्यांनी उडवून देता येणार नाही. किंबहूना राहुल विरोधकांच्या माथी मारण्याचा मोदींचा डाव मात्र त्यातून कमालीचा यशस्वी होताना दिसतो आहे.
भाऊ, तुमचं विश्लेषण वाचलं की सगळ्या शंकांचे समाधान होते.
ReplyDeleteमोदीजी इतर बाबतीत नाही बोलले तरी जनता त्यांना पाठिंबाच देणार पण त्यांनी इंधन दराबाबत बोलले पाहिजे असे मला वाटते.
ReplyDeleteSahi
ReplyDeleteभाउ खरय काही पुरोगामी इतके चेकाळलेतकी बीरूकसारीक पक्षांनी पन राहुलचिया पाठी उभ रहावअसा आग्रह करतायत आता राहपलचा शपथविधीच बाकी राहीलाय अस वाटतय
ReplyDelete1 no.
ReplyDeleteपण या संदर्भांत 2 प्रश्न निर्माण होतात असं मेडियापार्टचे पत्रकार एंटॉन रॉगेट यांनी म्हटलं आहे.
ReplyDelete1. राफेलच्या विक्रीसाठी भारतात आलेले तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओलांद यांच्या दौऱ्याच्या दिवशी म्हणजे 25 जानेवारी 2016ला अनिल अंबानी यांनी चित्रपटात गुंतवणुकीची घोषणा का केली?
2. दुसरा मुद्दा म्हणजे ज्या चित्रपटात भारताचा काही संबंध नाही, जो चित्रपट भारतात कधी दाखवला जाणार नाही त्यात रिलायन्स एंटरटेनमेंटला रस का होता?
Out of the box thinking aahe he... Absolutely thrilling thought process aahe aapla.... Liked it...!!!!! 👍
ReplyDeleteएकदम सही विश्र्लेशण भाऊ,
ReplyDeleteसोशल मिडीयाचा वापर हे तर मोदी-ब्रांड बिजेपीचे खास हत्यार. राहुल गांधी हे असमंजस, अपरिपक्व व्यक्तिमत्व असल्याचा गवगवा करून त्यावर लेबल चिकटवण्या मागेही सोशल मिडीयाची अहम् भुमिका राहिली आहे (अर्थात याला अंतिमत: राहूलच जबाबदार आहेत). असा कच्चा भिडू प्रमूख विरोधक म्हणून आपणच निवडायचा आणि अंतिम सामन्यात मग त्याचा यथोचित समाचार घ्यायचा, अशी ही रणनिती. मोदी-शहा जोडी आणि त्यांच्या शतरंजी चाली ताडणारे भाऊ यांना हात जोडून नमस्कार.
भाऊ bjp चा परंपरा गत मतदार हा मध्यम वर्ग आहे. राफेल बद्दल मोदी नाही बोलले तरी हरकत नाही पण पेट्रोल किमती साठी काही तरी करायला हवे. होतय काय पेट्रोल 90 च्या जवळ आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून नसल्या सारखी त्यामुळे दुचाकी शिवाय पर्याय नाही. लवकर देव त्यांना सुबुद्धी देवो हीच प्रार्थना.
ReplyDeleteबऱ्याच देशांमध्ये पेट्रोल-डिझेल चे खूप कमी रेट शक्य असूनही या साठीच ठेवले जात नाहीत.
ReplyDeleteआंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी जास्त होत असतात....सातत्याने स्वस्त इंधनाची चटक लागली तर वाढलेल्या दरांसाठी मग लोक आरडाओरडा करतात.
भारताच्या बाबतीत म्हणायचे झाले तर पेट्रोल चा दर खूपच जास्त आहे.डिझेलचे ही तसेच.
मला वाटते की सरकारलाही या असंतोषाची कल्पना असावी....पण किमती कमी करण्यासाठी ते आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि एका ठराविक वेळेपर्यंत वाट बघून मग ठरवून दर कमी केले जातील.
एक थ्रेश्लोल्ड लेव्हल ठरवलेली असावी.
निवडणुकांच्या साधारणतः ५-६ महिने आधी दर निश्चितपणे कमी केले जातील.जनतेची स्मरणशक्ती कमी असते हा हिशोब धरून आत्ता वाढलेल्या दरांबद्दलची जी आंदोलने होत आहेत....विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत आहेत....विरोधकांच्या हातातील हा हुकूमी एक्काच निष्प्रभ करण्यासाठी धक्कातंत्राचा वापर करण्यात मोदी निष्णात आहेत.
एका फटक्यात भाव कमी केले की विरोधकांच्या या मुद्दांमधील हवा काढून घ्यायची......नवे मुद्दे मिळून ते तापवायला विरोधकांना वेळच द्यायचा नाही असा विचार असावा.
मा.भाऊ तुमचा फोन नंबर सांगा
ReplyDeleteतुमचे लेख मी नियमित वाचतो.
तुमचे लेखन सत्य शोधून काढते.
मा.भाऊ एक विनंती आहे आपण आता पर्यंतचया लेखांंचे एकत्र संग्रहीत पुस्तक परकाशीत करावे.
भाऊ राफेलविषयीची शंका दूर झाली.
ReplyDeleteभाऊ साहेब तुम्ही खूप दीर्घायुषी व्हा आम्हाला तुमचया सारख्या निर्भीड आणि स्पष्ठ सत्यता दाखवणाऱ्या थोर विचार वंताची खूप गरज आहे.
ReplyDeleteराहुल गांधी हे कॉंग्रेसचे खासदार असून त्यानी हे आरोप सभा किंवा पत्रकार परिषद याच्यामध्ये केलेले आहेत .मोदि हे भारताचे पंतप्रधान असून ते संसदेला व पर्यायाने जनतेला बांधील आहेत .कॉंग्रेस जेंव्हा हा विषय संसदेत काढेल तेंव्हा मोदि त्यांना उत्तर देतील उत्तर ऐकून कॉंग्रेसला हा विषय आपण का काढला असे होण्याची शक्यता जास्त आहे .
ReplyDeleteतोपर्यत राहुल गांधीची पप्पुगीरी एन्जॉय करा .
माझ्या माहिती प्रमाणे उच्चार ‘रफाल” असा आहे.”राफायल” नावाचा एक प्रसिद्ध चित्रकार होता. तज्ञ मंडळींनी मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteApratim vishlelshan. Dhanyawad Bhau.
ReplyDeleteअति सुंदर विश्लेषण?
ReplyDeleteअचूक विश्लेषण
ReplyDelete
ReplyDeleteभाऊ, तुमचं विश्लेषण वाचलं की सगळ्या शंकांचे समाधान होते.
सध्या लोकांचा मोदींवर विश्वास आहे म्हणून त्यांनी उत्तर दिले नाही तरी चालू शकले आहे. पण राजकारणात काहीच शाश्वत नाही. उद्या जर हे चित्र बदलले तर मात्र त्यांना उत्तर द्यावं लागेल. पण मोदींची राजकीय कारकीर्द पाहता हे होणे खूप अवघड आहे.
ReplyDeleteAmbani-Adani Modijee ko dubayenge. Lekin lagtaa hain, mauni babaa ke man ki baat, man me hi rahegi. Aur Bhau jaise achche patrakar beech mein maare jayenge.
ReplyDeleteछान विश्लेषण ,पण भारतीय नागरिक विचारी नाही
ReplyDelete
ReplyDeleteचौकीदार चोर बतलाया,
गला फाड़ कर चिल्लाए,
चोर चोर कहते कहते तुम
तीन प्रदेश जीत लाये,
मूरख जनता बहकावे मैं
साथ तुम्हारे चल बैठी,
कुछ जनता नोटा के चक्कर मे खुद को ही छल बैठी,
60 साल का लुटा कृषक
बस 4 साल में टूट गया,
गुस्सा सारे नेताओ का
भाजप्पा पर फूट गया,
तुम रफेल और बस रफेल
पर भाषण देकर सिद्ध हुए,
घायल तन पर चोंच मारते,
अवसरवादी गिद्ध हुए,
तुक्का लगकर जीत गए
हो भली तुम्हारी राम करे,
बकरे की माँ कब तक खैर मनाकर के आराम करे,
धीरे धीरे रहो देखते
परतें सब खुल जाएगी,
एक साल के अंदर ही
सबकी आंखे सब खुल जायेंगी,
रिहा जमानत पर जो राहुल,
हरिश्चन्द्र का पौत्र हुआ,
दादा शुद्ध पारसी जिनका
बामन उनका गोत्र हुआ,
छद्म विरासत वाले,
सच्चाई कमज़ोर बताते हो,
लूट पचाकर पले हुए
मोदी को चोर बताते हो,
न्यायालय उच्चतम तुम्हारे
सारे भांडे फोड़ गया,
और तुम्हारी ठगी कथाओं में
इक पन्ना जोड़ गया,
पांच साल में इक रफेल का घोटाला ही पकड़ सके,
और इसी का मुद्दा लेकर
मोदी पर तुम अकड़ सके,
न्यायालय ने दूध दूध,
पानी का पानी कर डाला,
सौदा शुद्ध रफेल हुआ
शुचिता का सानी कर डाला,
अब राहुल चुल्लू भर पानी
ले लो उसमें डूब मरो,
इक त्यागी को चोर बताया,
शर्म बची हो शर्म करो,
बकते जाओ,मोदी को शिकवा नही बकैतों से,
भारत माँ का सच्चा सेवक
डरता नही डकैतों से,
मैं लेखन की सच्चाई का
छोटा सा परवाना हूँ,
भाजप्पा का भक्त नही हूँ,
मोदी का दीवाना है,
ईमानों पर तंज कसोगे,
कमर तुम्हारी तोड़ेगी,
मोदी को बदनाम करोगे,
कलम न तुमको छोड़ेगी,
जिनकी रक्त धमनियों में ही रक्त मिला है गोरों का,
वंश लुटेरों का है,
उनका पूरा कुनबा चोरों का,
----- *कवि गौरव चौहान* (मोदी पर विश्वास करने वाला हर व्यक्ति इस कविता का करोङो लोगों तक पहुचाने का काम करे,बिना काट छाट)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नुकतेच सुप्रिम कोर्टाने या प्रकरणात क्लिनचिट दिलीच आहे
ReplyDeleteतरि पण.