Saturday, October 20, 2018

आपण, मरतो फ़क्त खरेखुरे

elphinstone railway mishap के लिए चित्र परिणाम

आपल्याकडे महाराष्ट्रात बुधवारीच दसरा साजरा होऊन गेलेला होता आणि उत्तरेत तो गुरूवारी साजरा झाला. त्या निमीत्ताने अनेक जागी रामलिला संपवून रावणाचेही दहन थाटामाटात पार पडले. त्यापैकीच एक सोहळा शीखांची पवित्र भूमी मानल्या जाणात्‍या अमृतसर शहरात होता. रेल्वे मार्गाजवळच्या एका मैदानातला भव्य सोहळा बघायला प्रचंड गर्दी लोटली होती आणि वाढलेली गर्दी मैदानात पुरली नाही, म्हणून बाजूच्या लोहमार्गावरही शिरली. काळोख पडत होता आणि त्याच मुहूर्तावर रावणाचे दहन केले जाते, नेमका तोच वेळ जालंधर अमृतसर रेल्वेगाडी येण्याचा होता. ती आलीही. पण गडगडाट करून पेटलेल्या फ़टाक्यांच्या रावणाचा आवाज इतका मोठा होता, की धडाडत येणार्‍या रेल्वेगाडीचा आवाजही जमलेलय गर्दीला ओळखता आला नाही. मग त्या भरधाव गाडीखाली चिरडून सत्तर माणसे हकनाक मारली गेली आणि कित्येकजण कायमचे जायबंदी होऊन गेले. आता त्याचे दु:ख व आरोप प्रत्यारोप जोरात चालू आहेत. माध्यमांना वाहिन्यांना चघळायला एक ज्वलंत विषय मिळाला, तर राजकारण्य़ांना पोळी शेकून घेण्यासाठी आग मिळाली. त्या भीषण प्रसंगाचे साक्षीदार झालेल्यांना मीठमसाला लावून अनुभव सांगण्याची लॉटरी लागली आणि कॅमेराने सज्ज असलेल्या मोबाईलवाल्यांना एक भयंकर प्रसंग टिपण्याची अपुर्व संधी मिळून गेली. हकनाक मरणार्‍यांनी त्याची किंमत मोजली. आता राजकारण आठवडाभर रंगून जाईल आणि मग पुढल्या अशाच मरण सोहळ्याच्या प्रतिक्षेत आपण सर्वकाही विसरून जाऊ. कारण ही आता आपली जीवनशैली झालेली आहे. म्हणून तर गेल्या चोविस तासात कोणाला गेल्या वर्षीच्या दसर्‍याला रेल्वेच्याच आवारात अशीच विनाकारण माणसे मारली गेल्याचे आठवलेही नाही. अमृतासरसाठी आक्रोश करणार्‍या कोणालाही एल्फ़िस्टनच्या मृतात्म्यांचे स्मरणही झाले नाही.

अमृतसरची घटना दसर्‍याच्या दुसर्‍या दिवसाची आहे आणि एलफ़िन्स्टनची घटना दसर्‍याच्या आदल्या दिवसा़ची होती. पश्चीम व मध्य रेल्वे जोडणार्‍या पादचारी पुलावर ती घटना घडलेली होती. उद्याच्या सणासाठी खरेदी करायला निघालेल्यांच्या गर्दीत अकस्मात पावसाने हजेरी लावली आणि सगळी तारांबळ उडालेली होती. परेल व प्रभादेवी अशा दोन मुंबई भागांना जोडणारा हा पादचारी पुल अपुरा आणि भयंकर वर्दळीचा. तिथे आकस्मिक पावसाने घोटाळा केला. पुलावर असलेले लोक पावसाने थांबावे अशा प्रतिक्षेत रेंगाळलेले होते आणि सतत येणार्‍या लोकल प्रवाश्यांच्या गर्दीला बाहेर पडायची घाई. त्यात ढकलाढलली सुरू होऊन चेंगराचेंगरीनेच काही लोकांचा बळी घेतला होता. अरुंद पुल हे कारण दिले गेले वा चर्चिले गेले. पण तेवढेच कारण होते काय? आता वर्षभरात तिथे नवा पुल उभा राहिला आहे. तो पुल बांधण्याची मागणी जुनी होती आणि कारकुनी दफ़्तरदिरंगाईने काम होऊ शकलेले नव्हते. पण त्यासाठी प्रशासन वा रेल्वेला आरोपी करून मेलेले जीव जीवंत होत नाहीत ना? मग खरेखुरे कारण तपासले पाहिजे. मान्य केले पाहिजे. अरुंद पुल हे एक कारण होते. पण त्यामुळे चेंगराचेंगरी झाली नव्हती. तिथे रोजच तितकी वर्दळ असूनही असा मोठा अपघात झाला नव्हता. त्या दिवशी अपघात झाला, कारण अरुंद पुलाचा वापर करणार्‍यांची जीवघेणी बेफ़िकीरी होती. आपण कोसळत्या पावसात भिजू म्हणून जिन्याच्या अखेरीस तळाला असलेले लोक रस्त्यावर जायला राजी नव्हते आणि स्थानकातून येणारा लोंढा वाढत गेला. छत्रीशिवाय बाहेर पडल्यावर भिजायची तयारी असायला हवी. रेल्वेने उभारलेला पुल अरूंद असेल, पण तो पावसापासून दिलेला निवारा नक्कीच नव्हता. पण त्याचा निवारा म्हणून वापर करणार्‍यांनी अपघात घडवून आणला होता. ही आपली बेशिस्त बेपर्वाई घातपात घडवून आणत असते.

कालपरवाची गोष्ट आहे. दसर्‍याच्या दिवशी रात्री १० च्य सुमारास अकस्मात पाऊस कोसळू लागला. तेव्हा मी एका गाडीतून विक्रोळीहून मुंबईकडे महामार्गाने येत होतो. तिथे एका जागी कमालीची वाहतुक कोंडी झालेली होती अर्धा किलोमिटरपर्यंत गाड्या खोळंबल्या होत्या. हळुहळू सरकत पुढे आल्यावर रस्ता पुर्ण मोकळा होता. पण तिथे जो एक पादचारी पुल होता, त्याखाली आपल्या मोटरसायकल लावून दोन हजाराहून अधिक लोक पावसाचा आडोसा शोधताना रस्ता रोखून उभे होते. पाऊस थांबायची प्रतिक्षा करीत होते. त्यामुळे सहापदरी असलेला तो रस्ता मध्यम व मोठ्या गाड्यांसाठी केवळ एकपदरी होऊन गेला होता. पाच लेन बाईकवाल्यांनी रोखून धरलेल्या होत्या. समजा अशावेळी कुठला भरधाव डंपर वा ट्रेलत्र ट्रक तिथे आला असता आणि ड्रायव्हरला नियंत्रण राखता आले नसते, तर किती लोकांचा बळी त्याने घेतला असता? मग त्याच्यावर खापर फ़ोडले गेले असते, किंवा वाहतुक पोलिस झोपा काढत असल्याची खरमरीत टिका करणारे अग्रलेख खरडले गेले असते. पण भिजण्याच्या भयापोटी गाडीखाली येण्याचा धोका आमंत्रित करणार्‍या बेजबाबदार बाईकवाल्यांना कोणी दोष दिला नसता. व्यवस्था सरकार कायदा सगळे गुन्हेगार असतात. पण जे बेशिस्त करतात वा नियमांना धाब्यावर बसवतात, ते आपल्या देशात निरपराध असतात. ह्या सिद्धांताने आपल्याला मरणाच्या अशा सापळ्यात आणून सोडले आहे. कुठलाही नियम मोडणे वा धाब्यावर बसवणे, सुविधेचा गैरफ़ायदा उठवणे; ही आपल्या समाजात प्रतिष्ठेची खूण बनलेली आहे. आपण त्याचे बळी आहोत आणि त्यामुळेच आनंदाचे सणही मृत्यूचे सोहळे बनवण्याचे कौशल्य आपण आत्मसात केलेले आहे. एलफ़िन्स्टन स्थानकापासून अमृतसरपर्यंत आपण सगळे भारतीय एकसारखे एकजिनसी आहोत. जीवाची बाजी लावून आपण बेशिस्तीचा जुगार खेळणारे बाजीगर होऊन गेलो आहोत.

अमृतसरला लोहमार्गाच्या नजिक मैदानात दसरा साजरा होत असेल, तर तिथे रेल्वे वाहतुकीत व्यत्यय आणला जाऊन शकतो. तिथे रंगाळणार्‍या बघ्यांच्या जीवावर बेतू शकते, हे आयोजकांना कळत नव्हते काय? अनवधानाने तिथे रेल्वे खाली बेसावध प्रेक्षक मारले जाऊ नये, याची काळजी कोणी घ्यायची असते? रेल्वेला व तिथल्या नियमांना धाब्यावर बसवण्यात आयोजकातील राजकारण्यांची महत्ता वाढत असते ना? ही खरी समस्या आहे. विविध उपकरणे सुविधा आणायच्या, पण त्या वापरण्यातले धोके व सज्जता यांना विचारातही घ्यायचे नसेल, तर अपघाताला निमंत्रणच असते ना? शंभर किलोमीटर वेगाने पळणारी लोहमार्गावरील गाडी स्वयंचलीत सिग्नलच्या इशार्‍यावर चालत असते आणि ड्रायव्हर मोटरमनला समोरचे दृष्य दिसण्यापुर्वीच तिथून गाडी निघूनही गेलेली असते. मग त्याचा मार्ग खुला वा मोकळा राखण्याला पर्याय नसतो. त्यात आपली बेशिस्त किंवा प्रतिष्ठा शोधणारे मरणाचे स्वागतच करायला पुढे आलेले नसतात काय? अमृतसरची घटना तशीच मरणसोहळा होऊन गेलेली आहे. अशा बेशिस्त व नियम मोडण्याने देशात लाखो मृत्यूचे सापळे आपणच उभे करून ठेवलेले आहेत, ते मरणाच्या वाटेने घेऊन जातात, हे आपल्याला पक्के ठाऊक आहे. पण ते मान्य करायला आपण राजी नसलो, म्हणून यमराज वा मृत्यूचे दुत थांबत नसतात. त्यांना वाहिन्यांवरील चर्चेतून रोखता येणार नसते. ते आपले काम चोख बजावत असतात. आपण आपली चुक ओळखून सुधारणे आपल्या हाती आहे. पण कोणाला पर्वा आहे? असती तर आपल्याला एल्फ़िन्स्टनचा अपघात तरी आठवला असता ना? ती एक वर्ष जुनी घटना आहे, आठवड्याभरानंतर आपल्याला अमृतसरही आठवणार नाही. कारण आता आपण बेशिस्तच नव्हेतर बेशरमही होऊन गेलेले आहोत. खोटे रडतो, खोटे दुखवटे पाळतो आणि जगतोही खोटेच. फ़क्त मरतो खरेखुरे.

24 comments:

  1. खोटे रडतो, खोटे दुखवटे पाळतो आणि जगतोही खोटेच. फ़क्त मरतो खरेखुरे.
    Perfect Bhau...

    ReplyDelete
  2. खरच डोळे उघडणारा लेख

    ReplyDelete
  3. श्री भाऊ हा आमच्या संपूर्ण समाजाचा दोष आहे सार्वजनिक शिस्त ही तर आपल्या गावीही नसते, आपण फक्त परदेशाचे गोडवे गायचे,

    ReplyDelete
  4. खरच डोळे उघडणारा लेख

    ReplyDelete
  5. बिलकुल सडेतोड विश्लेषण केले आहे, भाऊ।

    ReplyDelete
  6. भाऊ
    खरच आपली पन जबाबदारी आहे.

    ReplyDelete
  7. कदाचित त्या बिचाऱ्या मोटरमन किंवा गँगमान ची नोकरी जाईल, पण त्यांना काय माहिती की रुळावर 100-200 माणसे उभी आहेत, आयोजक मात्र सुटतील

    ReplyDelete
  8. धार्मिक प्रथांचा भेसळयूक्त भोंगळ बेशिस्त अतिरेक.आणी प्रत्येक गोष्टीचा राजकारणानुषंगाने फायदा तोटा बघण्याचा दृष्टिकोन,नंतर प्रांजलपणे नैतिक जबाबदारी न घेता दैवाचा प्रकोप-इति सिध्दु-म्हणुन संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हे नित्याचच !

    ReplyDelete
  9. अशा प्रकारच्या सोहळा आयोजकां आणि त्यात भाग घेणा-या मेंढरांचे डोळे उघडावेत हीच अपेक्षा !! रमेश तळगांवकर

    ReplyDelete
  10. चुकीच्या मार्गाने झालेला विकास,लोकसंख्यावाढ ,सार्वजनिक जीवनात बेशिस्त ती स्वच्छता असो वा अन्य काही हे पण कारणीभूत आहे ,मुंबईची काय अमृतसर काय सर्व शहरांची कपॅसिटी केव्हाच संपलीय . १३५ कोटी लोकांना भारत सोसतोय .भारतात सर्व काही साधनसंपत्ती आहे लोक जर कमी असले तर ती पुरेल अगदी २०% असलेलं पेट्रोल पण .आता सर्व गोष्टी हाताबाहेर गेल्यात .निसर्ग मग याची reaction दाखवतो ,प्रत्येक वेळी वेगळ्या रूपात

    ReplyDelete
  11. या कालच्या प्रकरणात 100% लोकांची चूक आहे. आणि बऱ्याच बातमीपत्रांनी दाहनाच्या आवाजांनी घाबरून पळापळ झाली वगैरे बातम्या दिल्या आहेत. बरेच व्हिडिओ आले आहेत जिथे लोक आधीपासून तिथेच थांबून बघत होते हे स्पष्ट दिसतंय. रेल्वे प्रशासन जबाबदार असूच शकत नाही यासाठी. रेल्वे रुळावर उभे राहू नये, रेल्वे येणार आहे हे जर सांगायची गरज असेल लोकांना, तर आपण खरोखरी खूप अपयशी ठरलो आहे देश म्हणून आणि समाज म्हणून.

    ReplyDelete
  12. मरणाइतकं स्वस्त ह्या देशात काहीही नाही. आणि त्या मरणाचं दुकान मांडण्याइतकं सोपं ह्या देशाव्यतिरिक्त जगात कुठेही नसेल.

    ReplyDelete
  13. भाऊ एकदम बरोबर


    ReplyDelete
  14. पुण्यात लोक असेच BRT च्या लेन मधून २ व्हीलर दामटतात

    आणि काही अपघात झाला तर बस आहेच की जाळ पोळ करायला

    ReplyDelete
  15. Perfect analysis of Indian psyche.

    ReplyDelete
  16. गर्वसे कहो हम भारतीय है।

    आम्ही भारतीय आहोत
    बेदरकारपणे वाहने आम्हीच चालवतो,
    आणि अपघात वाढले म्हणून सरकारला जाब विचारतो

    आम्ही भारतीय आहोत
    बेशीस्त पार्किंग आम्हीच करतो,
    लहान मुलांना विना परवाना गाड्या आम्हीच देतो,
    आणि RTO झोपलेय काय हा प्रश्न आम्हीच विचारतो

    आम्ही भारतीय आहोत
    प्रत्येक गोष्टीत स्वतःच्या फायद्याचे आम्हीच बघतो,
    आणि सामाजिक संवेदनशीलता हरवलेय
    असे समाजाला सांगतो

    ReplyDelete
  17. आपल्या सगळ्याच समस्या वाहिन्यांचा टी आर पी आणि पक्षीय राजकारण ह्यासाठी उपयुक्त विषय ठरत गेल्या मुळे सत्याशी समस्येने कधीच फारकत घेतली आहे.
    मोहन गद्रे

    ReplyDelete
  18. डोळे मिटून घेतले आहेत . कोण कोणाचे डोळे उघडणार.डोक असेल तर समाज विचार करणार.सारी सारी मेंढरं झाली आहेत.विचार, वैचारिक बैठक हे आता दंतकथा आहेत.सुसंस्कारीत समाजमन लयाला चालले आहे.याची खंत आत्ता च्या पिढी ला नाही.

    ReplyDelete
  19. सरकारने मृृृतांना ५लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. करदात्यांच्या पैशांचा योग्य विनियोग आहे कां ?

    ReplyDelete
  20. 'आम्हाला शिस्त लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये. तसा कोणी प्रयत्न केल्यास आम्ही त्यांनाच उखडून टाकू.'

    ReplyDelete
  21. Khare aahe. Pula Khali pawasacha adosa mhanun akhi lane adwanare, mahabaleshwar la janyaaadhi shriram wadapaw sathi high way chi 1 lane khanare kewal daiw balwattar mhanun apghatatun wachale aahet. Aapala desh sushikshit jaroor hoat asel. Parantu susanskrutpanachi Chad kuthe aahe. Ti kuthalya shalet shikwaun thodich yenaar aahe?

    Civic sense shunya aahe. Ekhadi durghatna ghadun gelyawar karavya lagnarya fire fighting la aplya kade tya shaharacha spirit - Mumbai spirit mhanun paperwaale jahiraat kartaat.

    Jagatil sarwaat mothi lokshahi mhnje asanskrut mansancha beshist kalap houn basla aahe.

    ReplyDelete