आजकाल कॉग्रेसचे बुद्धीमान नेते जयराम रमेश कुठे बातम्यात दिसत नाहीत. मागल्या लोकसभेपुर्वी ते खुप क्रियाशील होते. पण जसजशी २०१४ ची निवडणूक जवळ येत गेली तसतसे रमेश माध्यमातून जणू अंतर्धान पावले. त्याच्या आधी ते अगत्याने माध्यमात येऊन कॉग्रेसची बाजू समर्थपणे मांडायचे. सुरजेवाला किंवा चिदंबरम यांच्यासारखा बुद्धीमान खुळेपणा रमेश यांच्यापाशी नव्हता. म्हणून असेल त्यांना पाच वर्षापुर्वीच्या लोकसभा निकालांची चाहुल आधीच लागलेली होती. पण त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे राहुल गांधी कॉग्रेसला कुठे घेऊन चाललेत त्याचाही नेमके अंदाज रमेश यांनी तेव्हाही व्यक्त केला होता. सगळे कॉग्रेसवाले २०१४ ची लोकसभा निवडणूक लढायच्या न्विवंचनेत आहेत आणि राहुल मात्र २०१९ च्या तयारीला लागलेले आहेत, असे २०१३ मध्ये रमेश यांनी म्हटलेले होते. त्यांचे शब्द राहुल गांधींनी अक्षरश: खरे करून दाखवले आणि कॉग्रेसला त्या निवडणूकीत ४४ इतके खाली आणून दाखवले. त्यानंतर रमेश सहसा मतप्रदर्शन करीनासे झाले. दिडदोन वर्षापुर्वी त्यांनी पुन्हा एकदा आपले मन मोकळे केले आणि २०१९ ला सामोरे जाताना कॉग्रेस अध्यक्ष झालेले राहुल गांधी पक्षाला कुठल्या गर्तेत घेऊन जात आहेत किंवा किती बेभान आहेत, त्याची कथा रमेश यांनीच सांगितली होती. साम्राज्य संपलेले आहे आणि वारस मात्र आजही शहजादा म्हणून गुरगुरत असतात, असेच रमेश म्हणाले होते. मुद्दा राहुल यांच्या नेतृत्व क्षमतेचाही नाही किंवा बुद्धीचाही नाही. तर नसलेली गुणवत्ता वा बुद्धी वापरण्यातल्या अतिरेकाचा आहे. दिवसेदिवस कॉग्रेसजनांना आपल्याच पक्षाध्यक्षांच्या बेताल बोलण्याचे समर्थन करणेही अशक्य होत चालले आहे. अन्यथा टॉम वडक्कन यांच्यासारख्या ज्येष्ठ कॉग्रेस प्रवक्त्याला कॉग्रेसचा त्याग करून भाजपात दाखल होण्याची वेळ कशाला आली असती?
मागल्या वर्षभरात राहुल गांधी इतके बेभान होऊन बेताल विधाने करीत सुटले आहेत, की कॉग्रेसला वाचवण्यासाठी कोणीतरी त्यांच्या तोंडात बोळा खुपसण्याची गरज आहे. आपल्या प्रत्येक विधान वक्तव्यातून राहुल पक्षाला मिळू शकणारी मते कमी करण्यासाठी अखंड प्रयत्नशील असतात. मोदी विरोध करताना अन्य विरोधी पक्षांना एकर करणे वा त्यांच्याशी हातमिळवणी करने वेगळे आणि देशाच्या शत्रूंशी संगनमत करणे वेगळे असते. हे रस्त्यावरच्या सामान्य बुद्धीच्या माणसालाही कळते. पण राहुल गांधींना याची गंधवार्ताही नाही. म्हणूनच त्यांनी मोदींना विरोध करताना थेट भारतीय सेनादल, हवाईदल यांच्याही विरोधात आघाड्या उघडल्या आणि नागरिकात त्याची तीव्र प्रतिक्रीया उमटली. राफ़ायल विमान खरेदीच्या बाबतीत पंतप्रधानांवर शंका संशय घेणे हा राजकीय विरोध असू शकतो. पण भारताच्या वतीने जे सैनिक आत्मसमर्पण करीत असतात, त्यांच्या एखाद्या कर्तृत्व पराक्रमावर शंका घेणे म्हणजे शत्रू देशालाच मदत करणे असते. म्हणूनच भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जिहादी अड्डे उध्वस्त केले त्यावर शंका घेण्याला जागा नव्हती. कारण त्या हल्ल्याची पहिली तक्रार पाकिस्ताननेच केलेली होती. भारताने त्याला तब्बल आठ तासानंतर दुजोरा दिला. असे असताना खरोखरच हल्ला झाला काय? किती जिहादी मारले गेले? असल्या शंका काढण्याचा दिवाळखोरपणा राहुल गांधींनी केला व पक्षातल्या इतर नेत्यांनीही त्याचीच री ओढली. त्यातून लोकांमधेय तीव्र प्रतिक्रीया उमटली तेव्हा मग सारवासारव करण्याची वेळ आली. पण शतायुषी पक्षाच्या अध्यक्ष असलेल्या नेत्याला इतकेही भान नसावे काय? कालपरवा राष्ट्रसंघात चीनने अझहर मसूदला पाठीशी घातल्यावर राहुलनी अशीच मुक्ताफ़ळे उधळली. मोदींची परराष्ट्र निती म्हणून ज्याची हेटाळणी राहुल करीत होते, ती प्रत्यक्षात आपल्याच पणजोबाची निती व जन्माला घातलेली समस्या आहे, याचेही भान राहुलना नसावे?
राजकारणात किंवा युक्तीवादाच्या प्रांतामध्ये आपल्यालाच अडचणीत आणणारे वा गोत्यात घालणारे विषय शिताफ़ीने टाळायचे असतात. म्हणूनच काश्मिर वा चीनच्या बाबतीत विषय निघाला मग कॉग्रेस नेत्यांनी आजपर्यंत विषय टाळण्याचाच शहाणपणा केला होता. कारण मुळातच काश्मिरमध्ये पाकिस्तानी सेना घुसल्या तो विषय तेव्हाच लष्करी कारवाईने सुटण्यासारखा असताना तात्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी अकारण तो वाद राष्ट्रसंघात नेवून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला. त्यावर अजून राष्ट्रसंघ काहीही करू शकलेला नाही. ते पाप नेहरुंचेच होते. पुढे राष्ट्रसंघात भारताला सुरक्षा परिषदेमध्ये कायम सदस्य म्हणून स्विकारण्याचा प्रस्ताव आला तेव्हाही चीन मोठा देश असल्याने त्याला तो अधिकार द्यावा म्हणून नेहरूंनीच तैवानला पुढे केले. पर्यायाने पुढे तो अधिकार आजच्या कम्युनिस्ट चीनकडे आला. पण तेव्हा नेहरू माओला मिठ्या मारून हिंदी चिनी भाई भाई असली गाणी गात होते. चीनने १९६२ सालात घुसखोरी करून तिबेट व भारताचा हिमालयातील प्रदेश गिळंकृत केला तेव्हा नेहरूंना जाग आली. थोडक्यात आज पाकिस्तान चीन जी डोकेदुखी झालेली आहे, त्या आजाराला आमंत्रण देणार्या माणसाचे नाव जवाहरलाल नेहरू असेच आहे. राहुलना तोच आपला पणजोबा असल्याचे तरी भान आहे काय? तेव्हापासूनची जी स्वप्नाळू परराष्ट्रनिती आहे. त्यात मोदी सत्तेत येईपर्यंत मोठा बदल झाला नाही. हळुहळू मोदी चित्र बदलत आहेत. तेव्हा अशा विषयावर कॉग्रेस व राहुलनी मौन धारण करण्यात शहाणपणा असतो. पण शेफ़ारलेल्या पोराला कोणी समजावून सांगायचे? त्याला मुक्ताफ़ळे उधळणे म्हणजेच शहाणपणा वाटतो ना? अशा बालीशपणाचे समर्थन किमान बुद्धी असलेल्या लोकांनी कितीकाळ करायचे? म्हणून जयराम रमेश कधीच बाजूला झाले आणि गुरूवारी टॉम वडक्कन यांनी भाजपात दाखल होण्याचा निर्णय घेतला.
पुलवामाच्या हल्ल्यानंतर कॉग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका देशविरोधी असल्याची जाणीव झाल्याने़च आपण वेगळे होण्याचा निर्णय घेतला असे वडक्कन यांनी भाजपात प्रवेश करताना म्हटलेले आहे. इतके दिवस त्यांना हे समजत नव्हते काय? नक्कीच समजत होते. पण आज उद्या कारटे सुधारेल आणि शहाण्यासारखे काही बोलेल अशी अपेक्षा घरातल्यांना असतेच ना? त्याच आशेवर अनेक कॉग्रेसनेते पक्षात अजून टिकून आहेत. काही चमत्कार होऊन कॉग्रेसचा टिकाव लागेल अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळेच मग ताळतंत्र सोडून व कुठल्याही थराला जाऊन अनेक नेतेही राहुलच्या खुळेपणाचा बचाव मांडत असतात. युक्तीवादही करीत असतात. ज्यांना हळुहळू ते अशक्य वाटेल तसतसे पक्षातून बाहेर पडत जातील. पण राहुलना त्यामुळे काहीही फ़रक पडणार नाही. आजकाल राहुल गांधींना पक्षातल्य्ता बुद्धीमान प्रवक्त्यांचीही गरज उरलेली नाही. पराकोटीच्या मोदीद्वेषाची कावीळ झालेले समाजातील लेखकम कलावंत हळुहळू आपली वस्त्रे उतरून राहुलचे प्रवक्ते व भक्त म्हणून समोर येऊ लागले आहेत. मग राहुलनी वडक्कन यांची पत्रास कशाला ठेवायची? अनेक संपादक, पत्रकार, विश्लेषक ज्या हिरीरीने राहुलच्या बेअक्कलपणाचे समर्थन चर्चामध्ये येऊन करतात, ते ऐकल्यावर वडककन यांच्या निर्णयाचा अर्थ लक्षात येऊ शकतो. भाजपावाले व अनेकजण नरेंद्र मोदींना पक्षाचा स्टार प्रचारक म्हणतात. व्याहारात बघितले तर राहुल गांधी सहासात वर्षात भाजपाचे खरेखुरे स्टार प्रचारक झालेले आहेत. कारण भाजपाकडे ओढा नसलेल्या मातदाराला व लोकांना तिकडे ढकलण्याचे मह्त्वपुर्ण कार्य मोदी शहांपेक्षा राहुल हिरीरीने करीत असतात. म्हणून तर जयराम रमेश यांनी तोंडात बोळा कोंबून घेतला आहे आणि वडक्कन यांच्यासारख्यांना पक्षाला रामराम ठोकून भाजपात दाखल व्हायची वेळ आलेली आहे. कारण स्पष्ट आहे. मोदींना ३०० हून अधिक जागा जिंक्य़्न देणे हे राहुलचे उद्दीष्ट आहे.
अतिशय अचून, वास्तववादी,परखड,डोळ्यात अंजन घालणारा हा लेख आहे,धन्यवाद भाऊ
ReplyDeleteIn 2014 the electorate insulted the Congress... Appears that the party has either failed or is refusing to read that insult... Instead of becoming humble and opening its ears to the electorate, the party continues to be arrogant and assumes entitlement...
ReplyDeleteजर एखादी व्यक्ती अपमान केल्यावरही ऐकायला तयार नसेल, तर मग अशा व्यक्तीला ऐकावयास लावायचे असेल तर काय करायला हवे ?
It is entirely possible that the Indian electorate will do exactly that in 2019....
My feeling....
👌👌👌👍👍👍
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच अप्रतिम विश्लेषण.आ.भाऊ पण एक शका अशि की आताचा हा कॉंग्रेस पक्ष इंदिराजीनी स्थापन केला असेल तर तो शतकभरापुर्विचा पक्ष कसा काय ठरतो?
ReplyDeleteअगदी बरोबर.
Deleteसुपर भाउ
ReplyDeleteभाऊ,तुमचे लेख मला मुखपुस्तकावर दिसत नाहीत.मी काय करावे?
ReplyDeleteत्यांना फेसबुकवर follow करा. जर सगळेच दिसायला पाहिजे असेल तर follow मध्ये see first option select करा.
Deleteअगदी खरं आहे
ReplyDeleteफारच सुंदर विश्लेषण !
ReplyDeleteखरंय भाऊ,
ReplyDeleteतुम्ही म्हणत आहात ते पटत असूनही वस्तुस्थिती तशी आहे असा वाटत नाही. रालोआ ३००+ जागा जिंकेल असे वातावरण सद्ध्या तरी नाही. असो, २३ मे सांगेलच
भाऊ राज ठाकरे यांच्या सद्ध्याच्या चाललेल्या हालचालींवर विश्लेषण करा की...
ReplyDeletewhat is base for allegation of permanent UNSC membership
ReplyDeletehttps://www.thehindu.com/news/national/jawaharlal-nehru-on-permanent-unsc-membership-no-question-of-a-seat-being-offered-and-india-declining-it/article26536197.ece
Shashi thakur says so
DeleteSo it must be true.
Barobar bhau
ReplyDeleteमला वाटते की अनेक काँग्रेसजनांचा राहुल गांधीवरचा विश्वास कमी झाला आहे. कारण इतर कोणीही नरेंद्र मोदींचा उल्लेख चौकिदार असा करत नाही. याचा अर्थ त्यांच्या पक्षावरच्या निष्ठा कमी झाल्या आहेत असे मला वाटत नाही.
ReplyDeleteराजकारणाइतके नसले तरी शुद्धलेखन देखील महत्वाचे आहे .मोदी ऐवजी मोदि चालेल का ? तसेच उद्दिष्ट हा शब्द असाच हवा .तुमचे युट्यूबवरील सर्व विडिओज मी पाहतो आणि इतराना सुद्धा पहायला सांगत असतो .
ReplyDeleteसत्ता हाती असताना गुप्तपणे देशहिताचा घात करणे शक्य असते. सत्ता नसताना गप्प बसणे अवघड जाते आहे. यात मोदींचा फायदा आहे.
ReplyDeleteमस्त लेखन सर वास्तव आहे
ReplyDeleteपण राहुल समर्थकांना पचणार नाही
अप्रतिम लिखाण.
ReplyDelete