Tuesday, March 19, 2019

धडा कोणी शिकवावा?

rahul kanhaiya के लिए इमेज परिणाम

राहुल गांधींपासून केजरीवालपर्यंत सगळे भारतीय सैन्याला वा सुरक्षा दलाच्या कृतीवरह शंका घेतात आणि पाकिस्तानला मदत करतात. त्याचा अनेकांना संताप येतो आणि मग सरकार त्यांना धडा का शिकवत नाही, असाही प्रश्न विचारला जातो. सरकारला हे शक्य असते, तर टुकडे टुकडे टोळी इतकी मोकाट हिंडूफ़िरू शलली नसती. हे सरकारला शक्य नसते कारण सरकारला प्रत्येक गोष्ट कायद्याच्या मर्यादेत राहून करावी लागत असते. कोणालाही देशद्रोही ठरवून तुरूंगात डांबता येत नाही किंवा गोळ्या घालून मारता येत नाही. निदान आज तरी तशी सुविधा मोदी सरकारला उपलब्ध नाही. जवाहरलाल नेहरू वा इंदिराजींच्या जमान्यात तशी सुविधा होती आणि त्यांनी अतिशय मुक्तपणे त्याचा वापर केला. हे भले त्यांच्या पणतू-नातवाला ठाऊक नसेल. पण त्याच पुर्वजांचे गोडवे गाणार्‍यांना पक्के ठाऊक आहे. इंदिराजींची १९७० च्या दशकात नक्षलवाद कसा मोडीत काढला, किंवा नेहरूंनी काश्मिरात आझादी असा शब्द बोलणार्‍या शेख अब्दुल्लांना किती वर्षे तुरूंगात सडवलेले होते, ते वयोवृद्ध पत्रकार नागरिकांना ठाऊक आहे. कारण त्यांच्या गळ्यात मानवाधिकाराचे लोढणे बांधलेले नव्हते आणि राज्यसभेची बेडी त्यांच्या पायात नव्हती. जे नरेंद्र मोदींच्या मार्गातले मोठे अडथळे आहेत. पण म्हणून देशाला इजा करू शकणार्‍या अशा लोकांना धडा शिकवणे अशक्य अजिबात नाही. तो धडा सरकार मात्र शिकवू शकत नाही. तर ज्यांना अशा देशविरोधी वक्तव्ये किंवा कृतीचा राग येतो, त्यांना हा धडा शिकवणे सहजशक्य आहे. तो धडा मतदानातून शिकवता येत असतो. ऐन निवडणूकांच्या मोसमात जे देशाला घातक कृती वा वक्तव्ये करीत आहेत, त्यांना मतदानातून नामशेष व नामोहरम करणे सामान्य मतदाराच्या हाती आहे. कारण ही सगळी मंडळी अखेर मतांची लाचार असतात. त्यांना मतातूनच धडा शिकवता येत असतो.

पाच वर्षापुर्वी नरेंद्र मोदींनी भाजपाला वा एनडीएला सत्ता मिळवून दिली, असा दावा केला जातो. त्यात अजिबात तथ्य नाही. मोदींना सत्ता सामान्य मतदाराने मिळवून दिलेली होती. ज्याप्रकारे मनमोहन व सोनियांनी देशाचे दिवाळे वाजवले होते. त्यामुळे विचलीत झालेल्या मतदारानेच देशात राजकीय क्रांती घडवली आणि सत्तांतराचा प्रयोग यशस्वी केला होता. तेव्हा त्याला हिंदूत्वाचा विजय मानले गेले. त्याचा अर्थ स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणवणार्‍यांना तरी कितीसा उमगला होता? लोकांनी अयोध्येत मंदिर उभारले जावे म्हणून मते मोदींना दिली नव्हती. तर उठसूट हिंदूंना गुन्हेगार दहशतवादी म्हणवणार्‍यांना करोडो हिंदूंनी धडा शिकवला होता. त्यांच्या हिंदूविरोधी भूमिकेला असे नाकारले, की राहुल गांधींना इटालीतली आजी विसरून देशाच्या कानाकोपर्‍यातील देवळांच्या पायर्‍या झिजवणे भाग पडलेले होते. कॉग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण करणारा अहवाल अन्थोनी समितीने सादर केला. त्यात आपण हिंदूंचे शत्रू ठरल्याने पराभूत झालो. अल्पवंख्यांकाचा पक्ष अशी कॉग्रेसची प्रतिमाच आपल्याला बुडवून गेली, असा निष्कर्ष त्या समितीने काढला होता. ते सगळ्या जगाला दिसत होते आणि त्यावर कोणी कुठली कारवाई केलेली नव्हती. सत्ता कॉग्रेसच्या हाती होती आणि हिंदूंना कुठेही दाद मिळणार नाही, असे वाटत होते. तेव्हा मोदी कोणाच्या मदतीला आलेले नव्हते. तर कोट्यवधी मतदारानेच आपल्या बळावर त्या प्रश्नाचे उत्तर मतातून दिलेले होते. त्यातून राहुल गांधी धडा शिकले आणि रातोरात जानवेधारी हिंदू होऊन गेले. त्याचा अर्थच जे आज कोणी पाकिस्तान धार्जिणे बोलत आहेत, किंवा पाकला लाभदायक ठरेल अशी कृती करीत आहेत, त्यांना कायदा वा सरकार धडा शिकवू शकत नाही. तो धडा मतदार शिकवू शकतो. जो कोणी पाकप्रेमाने उचंबळला आहे, त्याला राजकारणात नामोहरम करणे हाच त्यावरचा उत्तम उपाय किंवा धडा असू शकतो.

२०१४ ही निवडणूक हिंदूविरोधी बोलणार्‍यांना धडा शिकवण्यासाठीची होती, तशी २०१९ ची निवडणूक देशविरोधी बोलणार्‍यांना धडा शिकवण्यासाठीची असेल. इतके जरी लक्षात घेतले, तरी मग या दिवाळखोरांना धडा कोण शिकवणार, असा प्रश्न मनात येणार नाही. कारण त्याचे उत्तर आपण म्हणजे सामान्य नागरिक आहोत. आपल्याच हाती जी मताची शक्ती आहे किंवा अस्त्र आहे, त्याचा उपयोग अशा लोकांच्या विरोधात करण्यापासून आपल्याला कोणी रोखलेले नाही. शिवाय हे सगळेच राजकीय पक्ष सत्तेचे व पर्यायाने मतांचे लाचार असल्याने त्यांना मतांची भाषा कळते. उठसुट मुस्लिम अल्पसंख्यांकाची मते कुठे जातील त्याची चर्चा चालते. कारण मुस्लिमांची मते एकगठ्ठा पडतात, हा अनुभव आहे. त्यामुळेच मुस्लिमांच्या धर्मभावना किंवा अन्य कुठल्याही श्रद्धांना धक्का लागू नये, याची प्रत्येक राजकारणी काळजी घेत असतो. त्याच्या उलट हिंदूंना कोणीही कशाही लाथा घालाव्यात किंवा शिव्याशाप द्यावेत; असा प्रघात आहे. २०१४ नंतर तो काहीसा कमी झाला आहे. त्यामुळेच मग हिंदूंच्या ऐवजी देशाला वा राष्ट्रप्रेमाला शिव्याशाप सुरू झाले आहेत. पाच वर्षापुर्वी जितक्या आवेशात हिंदूंना वा हिंदू धर्माला दोषी ठरवले जात होते, तितके आता होत नाही, कारण दुखावलेला हिंदू मतांनी मारतो, हे लक्षात आलेले आहे. मात्र राष्ट्रप्रेमाला लाथा घातल्या म्हणून काही बिघडणार नाही, असा समज रुढ झाला आहे, यावेळी त्याला धडा शिकवावा लागणार आहे. बारकाईने बघितले तर एक गोष्ट लक्षात येईल. आजकाल संघ, सैन्य, सरकारी संस्था किंवा राष्ट्रवाद यावर हल्ले होतात. कारण हिंदूंना बोलण्याचे धैर्य अशा टोळ्यांनी गमावले आहे. प्रत्यक्षात त्यांचे लक्ष्य हिंदूच आहे. कारण आता राष्ट्र म्हणजेच हिंदूत्व हे सत्य अशा विरोधकांनीही स्विकारलेले आहे.,मग हिंदूंना खच्ची करायचे तर राष्ट्रप्रेम वा राष्ट्रभावनेला खिळखिळी करण्याची मोहिम हाती घेण्यात आलेली आहे.

जिहादी दहशतवादी वा पाकिस्तानविषयी आपुलकी आणि भारतीय सेनादलाचा द्वेष त्यातून आलेला आहे. त्यांना कायद्याच्या चौकटीतून बगल देण्याची सोय असल्याने अशा गुन्हेगारांना कायदा रोखू शकत नाही, की सरकार कारवाई करू शकत नाही. कायद्याच्या मर्यादा संभाळून ही हरामखोरी चाललेली असते. असे गुन्हे कोर्टात सिद्ध करणे अशक्य असल्याने गद्दारी उजळमाथ्याने चाललेली असते. त्यासाठी कायदे, राज्यघटना यांचाच आधार घेतला जात असतो. म्हणूनच सरकारचे हातही बांधलेले असतात. मात्र मतदार वा जनता यांची शक्ती कायद्याच्या जंजाळात गुंतलेली नसते. तिला अशा लोकांना चोख उत्तर देता येते. तुम्ही भारतीय सेनेवर शंका घेता? तुम्ही पाकिस्तानधार्जिणे वागता? तुम्ही दहशतवादी जिहादला पाठीशी घालता? मग तुम्हाला मत नाही, असा बडगा मतदाराने उचलला तर त्याला कोणी कायदा आक्षेप घेऊ शकत नाही. गरीबी, शेतकरी समस्या किंवा बेरोजगारी वगैरे प्रश्नांना पुढे करून मते मागायची आणि मते मिळाल्यावर मात्र देशद्रोही कारवायांची पाठराखण करायची; असा हा फ़सवेगिरीचा धंदा झालेला आहे. त्याला मतदार रोखू शकतो. मागल्या काही वर्षात किंवा महिन्यात ज्यांनी देशप्रेमाची टवाळी केली वा पाकिस्तानला पुरक वक्तव्ये भूमिका घेतल्या; त्यांना मत नाकारूनही भागणार नाही. तर असे लोक आपापल्या मतदारसंघात किंवा प्रभावक्षेत्रात पराभूत होतील, याची मतदाराने व्यवस्था केली तरी यांना चांगला धडा शिकवला जाऊ शकतो. जसे मागल्या मतदानानंतर हिंदूंना दुखावणे संपुष्टात आले, तसेच मग २०१९ नंतर राष्ट्रवाद राष्ट्रपेमाची हेटाळणी संपुष्टात येऊ शकते. ते काम कायद्याने होण्याची अपेक्षा गैरलागू आहे. आपापल्या भागात जागी देशविरोधी बकवास करणार्‍यांना संपवण्याचा चंग मतदाराने बांधावा. धडा शिकणारे शिकतील. पण शिकवणारे आपण पुढाकार घेणार आहोत काय?

26 comments:

  1. Replies
    1. याना धडा शिकवाला तर evm वर दोष देतील

      Delete
  2. होय.भाऊ,प्रत्येक सच्च्या हिंदूने आपल्या राष्ट्रप्रेमाची परीक्षा द्यायची वेळ आली आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व हे समजावून द्यायची वेळ हीच आहे. आपल्या धर्माच्या श्रद्धा विचलित करून पाहिल्या. आता आपल्या देशभक्तीची खिल्ली उडवत आहेत. त्यांना योग्य धडा शिकवा.

    ReplyDelete
  3. Ekdam Khare ahe bhau. Pratekane swatachya patlivar Kam karne avashak ahe

    ReplyDelete
  4. Bhau tumche lekh apratim astat. Te vachtana mala Sobatkar Beherenchi athvan yete.

    ReplyDelete
  5. सहा महीन्यां पूर्वी कांग्रेस एकदम दिवाळखोरीत निघाली होती. कांग्रेस कडे पैसा नसल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. आज कांग्रेस कडे बघता हा दुष्काळ अचानक संपला असेच वाटते आहे. कशी झाली असेल ही किमया??
    मध्यंतरी एका पत्रकाराने सोनिया गांधींना हा प्रश्ण विचारला होता तेंव्हा we will manage असे त्या हसत हसत म्हणाल्या होत्या. या मागचे रहस्य काय असेल?
    राहूल गांधीचा दुबई दौरा किंवा मानस यात्रे दरम्यान चिनी मंत्र्याची भेट ही या पाठीशी असतिल का?
    पाकिस्तान स्वताःच कफल्लक आहे असे गृहीत धरले तर शक्यतो हा चिनी पैसा असेल का?
    माझ्या मते हा फार महत्वाचा प्रश्ण आहे कारण पैसा पुरवणारे वसुली पण निश्र्चीतच करणारे असतात.

    ReplyDelete
    Replies
    1. How about money which she had gobbled in last 10 years?

      Delete
    2. चिनी धोका ओळखला का भारताने?

      Delete
  6. भ भाउ हाच विचार करत होते की,निकालानंतर परत एक अॅथंनी समीती नेमली जाइल व त्याचा ्हवाल असेल की देशविरोधी प्रतिमा निर्माण झाल्याने पराभव.खरच तस व्हाव.

    ReplyDelete
  7. "बारकाईने बघितले तर एक गोष्ट लक्षात येईल. आजकाल संघ, सैन्य, सरकारी संस्था किंवा राष्ट्रवाद यावर हल्ले होतात. कारण हिंदूंना बोलण्याचे धैर्य अशा टोळ्यांनी गमावले आहे. प्रत्यक्षात त्यांचे लक्ष्य हिंदूच आहे. कारण आता राष्ट्र म्हणजेच हिंदूत्व हे सत्य अशा विरोधकांनीही स्विकारलेले आहे.,मग हिंदूंना खच्ची करायचे तर राष्ट्रप्रेम वा राष्ट्रभावनेला खिळखिळी करण्याची मोहिम हाती घेण्यात आलेली आहे."
    --- खूप तार्किक आणि सूक्ष्म निरीक्षण भाऊ.
    हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व . ह्या दोन्ही संकल्पना परस्परसापेक्ष आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. Yes. Agree. सूक्ष्म निरीक्षण no doubt...

      Delete
  8. हिंदू म्हणजे तरी कोण? ज्याला इथल्या संस्कृतीचा विचारांचा गर्व आहे तो हिंदू. ज्याला भारतीय असण्याचा अभिमान आहे तो हिंदू. जो सद्गुणी आहे, ज्याने संतांची शिकवण वागण्या बोलण्यात उतरवली आहे तो हिंदू. जो सर्वाना आपले म्हणतो, ज्याला सत्ता गाजवायची आणि जो कोणाचाही गुलाम होऊ इच्छित नाही तो हिंदू. ज्याने फक्त मानवता ना मानता भूतदया मानली, जो स्वतःपेक्षा देशाला, समाजाला प्राधान्य देतो तो हिंदू. ज्याला निरीश्वरवादीशी वैर करायचे नाही, ज्याला सर्वामध्ये एकच देव आहे असे वाटते तो हिंदू. तो हिंदू आम्ही आहोत, आणि त्याचे राष्ट्र आहे. माझ्या राष्ट्राला शिवी ही मला लागते.

    ReplyDelete
  9. Too good bhau. Ur all recent posts r really worth reading for the content as well ur analysis of same in ur spl style, really hats off to u. Thanx n awaiting for more.

    ReplyDelete
  10. Exactly,Bhaukaka.this is a perfect way to counter anti nationalists.

    ReplyDelete
  11. श्री भाऊ मनःपूर्वक आभार, आमच्या मनातलं लिहलायत

    ReplyDelete
  12. भाऊ, मनसेचे राजकारण ह्यापुढे कसे चालेल आणि मनसेला राष्ट्रवादीला सपोर्ट दिल्याने ह्यातून काय फायदा होईल का नाही...तुमचे भूमिका ऐकायला आवडेल..
    धन्यवाद!

    ReplyDelete
  13. नेहमीप्रमाणे अभ्यासु व अप्रतिम लेख,जर या विरोधकांचा कायमचा निकाल लावायचा असेल तर सर्वांनी आवर्जुन मतदान केले पाहिजे व आपले नाव मतदार यादीत आहे कि नाही याची आताच खात्री करुन घ्यावी.मतदानाला गेल्यावर नाव नाही हे कळणे टाळावे.दुसरे म्हणजे जोडून सुट्या आल्या कारणाने बाहेरगावी फिरायला जायचा मोह टाळावा.आपल्या व आपलौया पुढील पिढीसाठी हे केलेच पाहिजे.भाऊ आपण यावर लेख अवश्य लिहावा.

    ReplyDelete
  14. " ...ज्याप्रकारे मनमोहन व सोनियांनी देशाचे दिवाळे वाजवले होते. त्यामुळे विचलीत झालेल्या मतदारानेच देशात राजकीय क्रांती घडवली आणि सत्तांतराचा प्रयोग यशस्वी केला होता." It is said that opposition never wins ,it is the rulingparty that loses the elections ..

    ReplyDelete
  15. भाऊ आपल्या अगोदरच्या लिखाणात २०१४ चा विजय हा हिंदुत्वाचा नसल्याचा स्पष्ट उल्लेख आहे . मग आता विचार बदलले कसे ?

    ReplyDelete
  16. असहमत, bjp व नरेंद्र मोदीजींच्या हाती सत्ता दिल्यानंतरही धडा मात्र सर्वसामान्य मतदारांनी पुन्हा bjp ला मतदान करून शिकवावा हे bjp ची मत वाढवणार आहे. सर्व सत्ता हाताशी असणाऱ्या सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? 10 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही समस्या तिथल्या तिथे असतील तर त्याला bjp सरकारही तेवढच जबाबदार आहे.

    ReplyDelete
  17. भाऊ तुमची भविष्य वाणी खरीच ठरली,
    गुजरात निवडणूकच्या वेळी तुम्ही हार्दिकचे पुरेपूर वस्रहरण केले होते

    ReplyDelete