Thursday, May 16, 2019

वैचारिक दहशतवाद

Image result for urban naxalite

गेल्या मंगळवारी कोलकाता येथे भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी मोठा रोडशो केला. त्यावर एका कॉलेजनजिक हल्ला झाला. विद्यासागर नावाचे बंगाली सुधारक यांच्या नावाने असलेल्या त्या कॉलेजमधील विद्यार्थी तिथे काळे झेंडे दाखवून शहांच्या स्वागताला उभे होते. मुळातच अशा रोडशोच्या निमीत्ताने विरोधी गट निदर्शने करणार असेल, तर संघर्षाची शक्यता असते. म्हणूनच पोलिसांनी आधीच त्या निदर्शकांचा बंदोबस्त करायला हवा. पण त्याऐवजी आधी दोन तास बंगाल पोलिसांनी भाजपाचे भव्य पोस्टर्स व झेंडे काढण्याचा उद्योग केला. त्याचे थेट प्रक्षेपण अनेक वाहिन्यांनी रोडशो सुरू होण्यापुर्वीच केलेले होते. त्यामुळे एक गोष्ट सहज लक्षात येऊ शकते, की रोडशोच्या दरम्यान हिंसा माजवण्याची पुर्वतयारी झालेली होती आणि त्यासाठी मात्र पोलिसांची ‘पुर्वसंमती’ घेण्यात आलेली होती. त्यामुळेच पुढला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. अमित शहांचा रोडशो उधळला गेला आणि हिंसाचारही माजला. अशी घटना उत्तरप्रदेश, महाराष्ट्र वा हरयाणात घडली असती, तर अनेक बुद्धीमंत संपादक कलावंत लोकशाही धोक्यात आली म्हणून तात्काळ मेणबत्त्या पेटवून चौकात आले असते. पण एकूणच त्या आघाडीवर शांतता होती. मजेची गोष्ट म्हणजे अविष्कार स्वातंत्र्याचे हे सारे लढवय्ये, दोन दिवस आधी एका व्यंगात्मक पोस्टमुळे भाजपाच्या तरूणीला अटक झाल्यावरही मूग गिळून बसलेले होते. पण अन्य प्रसंगी त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात येत असते. अशाच लोकांवर मागल्या काही वर्षात कॉग्रेससहीत पुरोगामी पक्षांनी आपली लढाई सोपवलेली आहे. त्यामुळे कॉग्रेस व अन्य पक्षांची अवस्था पाकिस्तानसारखी होऊन गेलेली आहे. पाकिस्तान थेट भारताशी लढाई करू शकत नाही, म्हणून जिहाद पोसतो.  कॉग्रेसने ही लढाई विचारांचा दहशतवाद माजवू शकणार्‍या तथाकथित बुद्धीमंत, संपादक, प्राध्यापक, साहित्यिक वा अभ्यासकांवर सोपवलेली आहे. थोडक्यात पुरोगामी व कॉग्रेस यांचा पाकिस्तान होऊन गेला आहे.

मागल्या सत्तर वर्षात पाकिस्तान तीनचार लढाया करून भारताकडून सतत पराभूत झाला आहे. पण लढण्याची त्याची खुमखुमी काही संपलेली नाही. पण लढायला शस्त्रे असली तरी हिंमत नाही आणि सैनिकांचा फ़ौजफ़ाटा नाही. म्हणून क्रमाक्रमाने मागल्या तीन दशकात पाकिस्तानने आपली ही भारतविरोधी लढाई जिहादी दहशतवादी गटांकडे सोपवलेली आहे. त्यांना लागणारा किरकोळ पैसा पुरवायचा, सैनिकी प्रशिक्षण द्यायचे आणि धार्मिक भावनांना चुचकारून त्यांना भारतात उचापती करायचे काम द्यायचे. हा पाकचा हातखंडा होऊन गेला आहे. मात्र त्याच जिहादींना चकमकीत मारले वा त्यांना आधार आश्रय देणार्‍यांना पोलिसांनी पकडले; की मानवतावादी गदारोळ करायचा, हा पाकिस्तानी खाक्या झालेला आहे. त्यापेक्षा आजची कॉग्रेस किंवा पुरोगामी चळवळ किंचीत वेगळी राहिलेली आहे काय? पाकिस्तानचे नेते राणा भीमदेवी गर्जना करतात, लढायच्या डरकाळ्या फ़ोडतात. पण भारतीय सेनेने कारवाई सुरू केल्यावर शेपूट घालून पळ काढत असतात. एकाहून एक पाक सेनापती गणवेशात रुबाब मारत असतात आणि इथे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेतेही मोठ्या गमजा करीत असतात. पण लढायची वेळ आली, मग पलायन करतात आणि साहित्यिक लेखक कलावंत यांना पुढे करतात. तिथेच पाकिस्तान व कॉग्रेस दुबळे होऊन गेलेले आहेत. त्यांना लढाई जिंकण्याची महत्वाकांक्षा आहे. पण त्यासाठी लढायची इच्छाच उरलेली नाही. कोणीतरी त्यांच्यासाठी लढावे आणि आयते यश त्यांना आणून द्यावे; अशीच दोघांची दुर्दशा होऊन गेलेली आहे. आताही विरोधी पक्ष म्हणून जगायची परिस्थिती आलेली असताना कॉग्रेसी नेत्यांचा उद्धटपणा नजरेत भरणारा आहे. प्रियंका राहुलपासून बारीकसारीक कॉग्रेस नेत्यांची भाषा विजेत्यासारखी असते. पाकिस्तानी सेनानी वा राज्यकर्त्यांची स्थिती किंचीत वेगळी आहे काय?

दोघांची समस्या जशीच्या तशी समान आहे. ते दिवाळखोरीत गेलेले आहेत आणि त्यांना लढायची इच्छा वा हिंमत उरलेली नाही. सरकार बदलण्याची भाषा राहुल गांधी वा प्रियंका नित्यनेमाने करीत असतात. पण त्यासाठी सत्तेतल्या भाजपाशी दोन हात करायला संघटना हवी. कार्यकर्त्यांचे पाठबळ हवे. त्याचा मागमूस कुठेही दिसणार नाही. सगळे विरोधी पक्ष मिळून मोदी व भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्याच्या गमजा चालू आहेत. पण ज्या विरोधी पक्षांच्या बळावर ही लढाई जिंकायची आहे, त्यांना सोबत घेताना कॉग्रेस किती लवचिकता दाखवू शकली आहे? मोदी सरकारला संसदीय कामात वा प्रशासकीय कारभारात कोंडीत पकडणे; हे विरोधी पक्षाचेच काम असते. पण त्यात राहुल वा अन्य त्यांचे सहकारी, किती यशस्वी होऊ शकले? संसदेच्या मंचावर कामकाज बंद पाडणे किंवा गोंधळ माजवल्याने मोदी सरकारचे काहीही बिघडत नव्हते, की बिघडणार नाही. तिथेच सरकारचे वाभाडे काढण्यातून त्यांची विश्वासार्हता खच्ची करता येत असते आणि त्याच्या परिणामी मतदाराचा विश्वास संपादन करण्याची प्रक्रीया सुरू होत असते. पण तिथे कॉग्रेस कायम तोकडी पडली आणि मग मोदी सरकारला हुकूमशाही वा फ़ॅसिस्ट ठरवण्याचे काम बुद्धीवादी वर्गाकडे सोपवण्यात आले. बुद्धीवादी वर्ग सामान्य माणसाला आदरणिय वाटत असला तरी काहीही पटवून देऊ शकत नसतो. मतदाराला भारावून टाकू शकत नसतो. शहाण्या अभिजन वर्गाच्या समस्या आणि नाराजी, सामान्य लोकांपेक्षा अगदी भिन्न असते. जनतेला आपल्या गरजा भागवू शकेल, अशी लोकशाही व सत्ताधारी हवे असतात. बाकी विचार स्वातंत्र्य किंवा तात्विक लोकशाहीशी मतदाराला फ़ारसे कर्तव्य नसते. म्हणूनच कलाकार किंवा बुद्धीजिवी संतप्त होऊन आवाज उठवतात, त्यावेळी सामान्य जनता त्यांच्यापासून मैलोगणती दुर असते. तिला या वर्गाची नाराजी समजूही शकत नसते. मग तिने सत्ताधारी पक्षाला हटवण्याची अपेक्षा कशी करत येईल?

पाकिस्तानातील सामान्य नागरिक किंवा कोणीही सामान्य मुस्लिम आणि तिथला जिहादी, यांच्या धार्मिक समजुतीमध्ये जमिन अस्मानाचा फ़रक असतो. जिहादींना किंवा त्यांच्या बोलवित्या धन्याला हवा असलेला इस्लाम आणि सामान्य मुस्लिमाच्या जगण्यातला इस्लाम असा भिन्न असतो. म्हणूनच जगभर जिहादचे खुप प्रयोग झाले तरी कुठलाही जिहाद यशस्वी होऊ शकलेला नाही. भारतात तसेच प्रयोग बुद्धीवादी डाव्यांनी क्रांती म्हणून नक्षलवादी उचापतीतून केलेले आहेत. पण त्याला मोठा प्रतिसाद मिळू शकला नाही, की लालक्रांती होऊ शकली नाही. कारण पुस्तकी क्रांती व सामान्य जनतेच्या जीवनातील अपेक्षा यामध्ये मोठा तफ़ावत असते. मग गोंगाट खुप होतो, पण साध्य काहीही होत नाही. पण अशा बुद्धीवादी वर्गाला जेव्हा सत्ताधारी पोसत असतात, तेव्हा त्यांचे प्रस्थापितामध्ये हितसंबंध निर्माण होतात. ती प्रस्थापित व्यवस्था त्यांना सोयीची असल्याने असे बुद्धीजिवी लोक तिचे समर्थन करताना खर्‍याखुर्‍या क्रांती वा स्थित्यंतराचे शत्रू होतात. नेमकी हीच भारतीय बुद्धीवादी वर्गाची शोकांतिका झालेली आहे. असा वर्ग आणि त्याचे हित, सत्ताधारी कॉग्रेस पक्षामध्ये प्रस्थापित होऊन गेलेले आहे आणि त्यालाच नरेंद्र मोदींच्या सत्ताधारी होण्याने हादरा बसलेला आहे. पण त्यांच्यापाशी आपली सत्ता टिकवू शकणरा कोणी लढवय्या उरलेला नाही. त्यामुळे हळुहळू त्या बुद्धीवादी वर्गालाच आपले हितसंबंध जपण्यासाठी मैदानात उतरावे लागलेले आहे. पाच वर्षापुर्वी मोदींनी कॉग्रेसमुक्त भारत अशी गर्जना केलेली होती. ती एका राजकीय पक्षाच्या संबंधातली नव्हती. कॉग्रेस पक्षाला निवडणूकीत पराभूत करण्यापुरती ती घोषणा नव्हती. कॉग्रेसमुक्त म्हणजे कॉग्रेसची जुलूमशाही वा घराणेशाहीलाच लोकशाही ठरवणारी भ्रष्ट व्यवस्था जगवण्यासाठी झुंजणार्‍या प्रवृत्तीपासून देशाची व समाजाची मुक्ती, म्हणजे कॉग्रेसमुक्त असा त्याचा व्यापक अर्थ होता व आहे.

अशा वर्गाचे दुर्दैव असे, की त्यांच्या वतीने सत्ता राबवणारा किंवा टिकवणारा कोणी खमक्या शक्तीमान नेता आज उरलेला नाही. किवा त्यांच्यातून पुढे येण्याची शक्यता राहिलेली नाही. म्हणून अशा आजवर पोसलेल्या बुद्धीजिवी वर्गाला आपले स्वार्थ जपण्यासाठी स्वत:च मैदानात उतरण्याची नामुष्की आलेली आहे. राहुल वा प्रियंका ते काम करण्याच्या स्थितीत नव्हते आणि सोनियांना भारतीय जनमानस कधी समजले नाही. म्हणून मग या वर्गाला समोर यावे लागलेले आहे. आपण बारकाईने हल्ली माध्यमातील लेख चर्चा बघितल्या; तर मोडकळीस आलेल्या कॉग्रेसची डागडूजी करण्याचे काम अशा वर्गाने हाती घेतलेले दिसते. मिळेल त्या जागी व क्षेत्रात असे लोक मोदी विरोधात राजकीय उठाव करू लागलेले दिसतात. कलाक्षेत्रातील काही शेकडा लोकांनी लोकशाही धोक्यात असल्याची बोंब ठोकणे असो, किंवा विविध वाहिन्यांवरच्या चर्चेत कॉग्रेस सहभागी होत नसताना विश्लेषक नावाने प्राध्यापक पत्रकारच भाजपा विरोधातील भूमिका ठामपणे मांडताना दिसतील. याचा अर्थ काय होतो? हे प्राध्यापक, कलावंत वा पत्रकार असतात, की कॉग्रेसचे सदस्य असतात? तर ते दोन्हीही नसतात. ते कॉग्रेस नावाच्या व्यवस्था किंवा प्रस्थापित प्रवृत्तीचे प्रतिनिधी असतात. पक्ष म्हणून ते काम करीत नसतात. जगाला दाखवायला ते अशा भिन्न व्यवसायात असतात. पण व्यवहारात ते कॉग्रेसचे प्रतिनिधीत्व करीत असतात. मग नेहरू वा गांधी खानदानाविषयी कोणी चकार शब्द बोलला, तर उसळी मारून ते अंगावर येतात. किंबहूना कॉग्रेसी वा नेहरू विचारांपेक्षा भिन्न कुठलाही विचार मांडायला ते सर्वस्वी विरोध करताना दिसतील. आपल्यापेक्षा वेगळा विचार वा भूमिका मांडणे, म्हणजेच विचारांची गळचेपी, असला कांगावा करताना दिसतील. हे खरे कॉगेसवाले नसतात. तर कॉग्रेस नावाच्या प्रस्थापित व्यवस्थेने पोसलेले लोक असतात. त्यांचा स्वार्थ कॉग्रेस पक्षाही निगडित नसतो, तर त्या व्यवस्थेशी असतो.

पाकिस्तानी सेनेतले अधिकारी वा तिथले राज्यकर्ते यांना आपल्या देशाची अस्मिता किंवा राष्ट्रवाद याच्याही काडीमात्र कर्तव्य नसते. धर्माशीही कर्तव्य नसते. पण तीच धर्माची अस्मिता त्यांनी प्रतिष्ठेचा विषय बनवलेला दिसेल. कारण त्या अस्मिता किंवा भ्रमाच्या आधारे सामान्य लोकांच्या भावनेशी खेळून आपल्या तुंबड्या भरता येत असतात. आपल्याकडला बहुतांश बुद्धीवादी वर्ग कलाकार म्हणून मिरवणारे गट किंवा समाजसेवी म्हणून संघर्षाच आव आणणारे लोक, यांचे जीवन तपासले तर त्यांचा स्वार्थ नेहरू खानदान वा सेक्युलर व्यवस्थेत कशाला आहे, त्याचे पुरावे मिळू शकतात. विविध अनुदानित योजना गरीबी हटवण्यासाठी सात दशके राबवल्या गेल्या आहेत. त्यावर करोडो रुपये उधळले गेले आहेत. पण देशातली गरिबी ह्टलेली नाही. मात्र त्यात खर्च झालेल्या पैशावर अशा वर्गाने आपली तुंबडी भरून घेतलेली दिसेल. अशा वर्गाला सामान्य जनता म्हणजे गरीब, स्वयंभू व गरीबीमुक्त होण्याची भिती सतावणे स्वाभाविक नाही काय? मोदी सरकार आल्यापासून गरीबी हटवण्याच्या अनेक योजनांचे अनुदान बंद करून थेट गरीबाच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले. तर याना मधल्या मध्ये पैसे जिरवण्याची सोय संपणार ना? युवक कल्याण, दलित
कल्याण अशा योजनांचा पैसा लाखो स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून खर्च होत असतो. अशा संस्था व त्यांचे म्होरके त्यावर चंगळ करीत असतात. तेच नाट्यक्षेत्र वा साहित्यिक क्षेतातल्या अनुदानाचे झालेले दिसेल. या संस्थांतून प्रस्थापित झालेले हितसंबंध मोदी सरकारने गोत्यात आणले आणि सोनियांनी तर अशाच लोकांना सोबत घेऊन सल्लागार मंडळ स्थापन केलेले होते. मग त्यातले बहुतेक लोक मोदींच्या विरोधात एकवटले तर नवल कुठले? त्यांनी मागल्या काही दशकात एकामागून एक जनहिताच्या चळवळी जमिनदोस्त करून टाकल्या आणि सोनियांनी त्यांनाच आपले आश्रित करून टाकले होते. असे सर्व गट मिळून होते, त्याला कॉग्रेस म्हणतात.

जेव्हा राजकीय विचार किंवा संघटना दुबळी होऊन जाते, तेव्हा अशी फ़ौज बाहेर काढली जात असते. आज कॉग्रेसपाशी आपली संघटना उरलेली नाही. नियम कायदे यांच्या बळावर मोदींना रोखणे शक्य उरलेले नाही. तेव्हा मग हे मठाधीश मैदानात आणले गेले आहेत. त्यांच्या शिव्याशापांना घाबरून माघार घेईल, असा नरेंद्र मोदी हा नेता नाही. तो धर्मगुरूंच्या शापवाणीने घाबरत नाही, की वैचारिक दहशतवादाला जुमानत नाही. आम्ही विचारवंत म्हणून आम्ही म्हणू तेच खरे; असा दबाव आणणार्‍यांना हा माणूस जाब विचारतो. तिथे सगळी गडबड होऊन गेलेली आहे, वाजपेयींसारखा प्रतिभावंत त्याच वैचारिक दहशतवादाने गडबडला होता. पण मोदींनी खर्‍या कॉग्रेसला म्हणजे प्रस्थापित अन्याय्य व्यवस्थेला, शोषण तंत्रालाच आव्हान दिलेले आहे. म्हणून मोठी समस्या उभी राहिलेली आहे. कधीकाळी कॉग्रेसचाच घटक असलेले विविध नेते व त्यांनी स्थापन केलेले विविध पक्ष नावाने वेगळे असले तरी मुळातच त्या कॉग्रेसच्या शाखाच होत्या व आहेत. बाकी वैचारिक क्षेत्रातील दिग्गज म्हणजे तर आश्रित बुद्धीमंतांची फ़ुकटखाऊ टोळी आहे. अशा सगळ्यांना ऐन निवडणूकीच्या तोंडावर नवा दहशतवाद म्हणून समोर आणले गेले. पण त्यांना मोदी घाबरून गेले नाहीत, तर सामान्य जनता विचलीत होण्याचा संबंधच कुठे येतो? जसा पाकिस्तान भारतातल्या विधारवंत व अभ्यासकांना दहशतवादाने घाबरवू शकला, तरी नागरिकांना भयभीत करू शकता नाही, तीच इथे मोदी नावाच्या माणसाची गोष्ट आहे. त्याने वैचारिक कलात्मक दहशतवादाला झुगारण्याची हिंमत दाखवलेली आहे. जो पाकिस्तानी हद्दीत सैन्य घुसवून प्रतिहल्ला करण्याचे धाडस करतो, त्याला वैचारिक दहशतीने भयभीत करणारे कितीकाळ टिकू शकतील? कॉग्रेसच्या राजकीय दिग्गजांना ज्याला दीड तपात संपवता आले नाही, ते असली दहशत माजवून कुठली लढाई जिंकणार आहेत?

14 comments:

  1. फेज ६ नंतरची स्थिती

    423 मतदारसंघात एकूण मतदार 70,14,83,962 असून एकूण मतदान 47,59,00,782 झालेले आहे. त्यामुळे 67.84200463% मतदान टक्केवारी येते.

    ReplyDelete
  2. आश्रित बुद्धिमतांची फुकट खाऊ टोळी व्वा भाऊ ह्यासरखा योग्य शब्द नाही

    ReplyDelete
  3. भाऊ, सध्या भारतात बुद्धिमंताचे पेव फुटले आहे, मोदींची प्रत्येक शब्द, क्रुती ते बारकाईने भिंगातून बघत आहेत आणि निरनिराळे अर्थ काढत आहेत मग ते शत्रूला उपयोगी का पडेनात. यांची आत्तापर्यंत सरकारी पैशावर चाललेली दुकाने बंद पडल्याची लक्षणे आहेत ही.

    ReplyDelete
  4. भाऊ,
    मध्यप्रदेशात टक्केवारी खूपच वाढलीय. कोणी म्हणताय की, भाजपाला विधानसभेच्या निवडणुकीत गेलेली पत भरून काढायची. कोणी म्हणतंय की, झाडून सारे मुसलमान गोळा झाल्याने असं होतंय.

    फेज ४ ची वाढलेली टक्केवारी अशी आहे
    Chhindwara 3.10
    Balaghat 9.04
    Mandla 10.83
    Jabalpur 10.90
    Sidhi 12.41
    Shahdol 12.50

    फेज ५ ची वाढलेली टक्केवारी अशी आहे
    Rewa 6.64
    Satna 8.12
    Hoshangabad 8.35
    Damoh 10.49
    Betul 13.03
    Tikamgarh 16.31
    Khajuraho 16.76

    फेज ६ मधे पण मतदान टक्केवारी वाढलेलीच आहे.
    ती आत्तातरी (१६ मे २०१९ १५:४४) खालीलप्रमाणे आहे.

    Morena 11.79
    Bhind 8.91
    Gwalior 6.98
    Guna 9.13
    Sagar 6.81
    Vidisha 5.92
    Bhopal 7.9
    Rajgarh 10.29
    एकूण २१ मतदारसंघ

    तर या वाढलेल्या टक्केवारीचा काय अर्थ असावा?

    याचाच परिणाम राजस्थान व झारखंडमधे मतदान वाढण्यात होताना दिसतो आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Bangalore आणि मुंबई मध्ये मुस्लिम बहुल भागातून मतदान कमी झाल्याचं दिसून येतंय असे वाचनात आले आहे ।
      मानखुर्द मधून फक्त ४७% मतदान झाले आहे, which is lowest in that constituency...
      Could there be a similar patterning across the country?

      Delete
    2. श्यामजी तुमची निरीक्षणे उत्तम आहेत बघुयात 23 तारखेला काय याचा परिणाम असेल ते कळेल बाकी मला वाटतं की लोकांनी उस्फूर्तपणे मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी घसराबाहेर पडलेले असावे.
      आणखी एक गोष्ट म्हणजे लोकांना पूर्ण बहुमताच सरकार हवं असावं असा माझा अंदाज आहे म्हणून लोकांनी विधान सभेची चूक लक्षात घेऊन जास्त मतदान केलं असावं.

      Delete
    3. अमीत शहा यांचे बूथ म्यानेजमेंट..

      Delete
  5. सटीक विश्लेषण भाऊ!
    काँग्रेस सत्तेसाठी काय काय करते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे .या पाच वर्षात केवळ सत्तेसाठी मोर्चे जे घडवून आणले त्यामागे काॅग्रेस होती, फक्त दाखवण्यासाठी हे मोर्चे उत्स्फूर्तपणे आहेत असं मीडियात पसरवले. जातीपातीचे मोर्चे सोडा, एस .टी.( स्टेट ट्रांसपोर्ट ) चा मोर्चा बघा. दिवाळीला महाराष्ट्र सरकारने दरामध्ये सवलतीची योजना प्रसिद्ध केली होती, पण तिची फारशी प्रसिद्धी झाली नाही, शासकीय प्रकाशने सोडून, नेमका त्याच तारखेला सणाच्या दिवशी एस.टी. वर्कर्स चा संप झाला .यात राजकारणातील जातीपातीच्या लाॅबी सक्रिय होत्या आणि जेव्हा सेटलमेंटसाठी, पुर्वीपेक्षा जास्त पगार मिळणार होता, तेव्हा या राजकीय लोकांनी सेटलमेंट करणार्या लोकांवर दबाव आणला आणि सातव्या वेतन आयोगावर अडून बसले.
    आणि जेव्हा हा संप बेकायदेशीर म्हणून सरकारने नुकसान वसुली केली तेव्हा कोणताही विरोधी पक्ष कर्मचार्यांच्या पाठीशी नव्हता. कोर्टाने काही कालावधीत शासनाला उत्तर द्यायला सांगितले, तेव्हाही एसटी कर्मचार्यांकडे कोणताही विरोधीपक्ष फिरकला नाही, संपात पुढाकार घेणारे राजकीय गट सुद्धा नाही. आमच्या घरचे एसटीत आहेत.

    ReplyDelete
  6. हे सर्व हरामखोर ' ल्युटेन्स ' दिल्लीतील कांग्रेसने पोसलेले , हे मोठमोठ्या बंगल्यातून फुक्कट राहणारे , कांग्रेसच्यातर्फे प्रत्येक आठवड्याला फुक्कट दारू , चिकन , मटण रिचवणाऱ्या भंपक लोकांची नशा गेल्या ५ वर्षात हळू हळू उतरू लागली होती. या सर्वाना कांग्रेस परत सत्तेत येईल अशी अपॆक्षा होती. एकदा कांग्रेस सत्तेत आली की मग परत एकदा पुरस्कारांसह बाकी सर्व ओघ सुरु होईल अशी यांची अपेक्षा. नाहीतरी अवार्ड वापसी वाले हे सर्व भामटे एकुलते एक अवार्ड ' वापस ' करून बसल्याने ' वापस ' करावयाला काही शिल्लकच ना उरलेले आहेत. मराठी वर्तमानपत्राचे संपादक पण या ( फुकटच्या ) ' चषकांच्या आणि मदिरेच्या ' सहवासाने फुलून जाणारे असल्याने याना पण गेल्या ५ वर्षात ' नोटबंदीचा ' फारच त्रास झाला. अहो ,,,,,,,,,,,,,चक्क फुकटची इंग्रजी दारू बंद म्हणजे जीव ' कसा नुसा ' होतो हो. या सर्वांच्या घशाला ५ वर्षात जी कोरड पडली आहे त्याने हे सर्व चवताळून उठलेले आहेत.

    ReplyDelete
  7. सुपर भाउ.शेवटच वाक्य तर अगदी परफेक्ट.खरय आता दोन स्ट्राइक करुन मोदी पाकला अजीबात घाबरत नसताील.आणि ही संधी खुद्द पाकनेच त्यांना दिली.इथले वैचारीक दहशतवादी पण अशी संधी मेोदींना देतात त्यांच्या छळानेच नाही का मोदी पंतप्रधान झाले.

    ReplyDelete
  8. 👍👍👌👌💐💐👌👌👍👍👌👌💐💐👌👌👍👍💐💐

    ReplyDelete
  9. True true true, phukat khau vicharwantanchi polkhol Keli, very good. Thanks.

    ReplyDelete
  10. भाऊ

    या पुढे तथाकथीत पुरोगाम्यांचा बौद्धीक दहशतवादी आणी सेक्युलरवाद्याला बौद्धीक आतंकवादी म्हणायला काय हरकत आहे??

    ReplyDelete
  11. गेल्या चार दोन दिवसात नथुराम गोडसे वर जी विधाने झाली राजकारण झाले त्यावर एक लेख वाचायला आवडेल आपला

    ReplyDelete