गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणशी येथून आपल्या लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांची तिथे एक सभा झाली. त्यात मोदी यांनी देशाला उद्देशून वा एकूण मतदाराला समोर ठेवूनच भाषण केले. अर्थात आपले भाषण फ़क्त सभेतील उपस्थितांपुरते नाही, हे मोदींना ठाऊक असते आणि म्हणून ते त्यातला काही भाग स्थानिकांसाठी बोलतात, तर बहुतांश भाषण देशातील जनतेला उद्देशूनच बोलतात. पण त्याचा अभ्यास वा विश्लेषण करणार्यांनी त्यातले सर्व मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. विरोधकांनी तर त्यातले सर्व संकेतही शोधून काढणे अगत्याचे असते. कारण विरोधी राजकारणात सत्ताधार्याला घेरण्याची संधी अशाच संकेत, शब्द वा कृतीमध्ये दडलेली असते. आजघडीला देशात मोदींचे अनेक विरोधक आहेत, विरोधी पक्ष आहेत. पण त्या दरम्यान त्यांची प्रमुख प्रतिस्पर्धी राहुलची भगिनी व कॉग्रेस पक्षाची सरचिटणिस प्रियंका गांधी होती. ती वाराणशीत फ़िरत होती आणि मोदींवर मिळेल तशी टिका करत होती. त्यातला एक मुद्दा लक्षणिय होता. कारण प्रियंका म्हणजे राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत बोलणारी कुणी सक्षणा सलगर नव्हे. तर देशाचे अर्धशतकाहून अधिक राजकारण ज्या छपराखाली घडले, तिथेच प्रियंकाची जडणघडण झालेली आहे. त्यातल्या दोन पंतप्रधानांच्या अंगाखांद्यावर प्रियंका बागडलेली आहे. तेव्हा पंतप्रधानाचे व्याप किती असतात आणि तो आपल्याच घरात अंगणात किती दिवस तास राहू शकतो, याचीही तिला कल्पना नसेल तर त्यांच्या अंगाखांद्यावर खेळून उपयोग तरी काय? प्रियंका वाराणशीच्या पंतप्रधान म्हणून उभा असलेल्या उमेदवाराला आव्हान देण्याची भाषा बोलत असेल; तर त्या पदाचे व्याप व व्यस्तता प्रियंकाला अजून उमजलेली नाही. असती, तर तिने मो्दी वाराणशीच्या कुठल्या गावात कधी फ़िरकले, असा बालीश सवाल केला नसता. तिलाच उद्देशून मोदी काय बोलले, तेही तिला समजू शकले असते.
मोदींना जगभरचे देश भटकायला वेळ आहे. पण मागल्या पाच वर्षात ते वाराणशी मतदारसंघातल्या कुठल्या कुठल्या गावांना भेटी देऊ शकले? असा सवाल प्रियंकांनी दोनतीन गावात प्रचाराला गेल्या असताना केला. त्याची दखल मोदींनी अर्ज भरल्यानंतरच्या सभेतही घेतली. ते उपस्थितांना म्हणाले, तुम्ही कमनशिबी आहात. अर्ज भरून तुमचा उमेदवार पळून जाणार आहे. बाकीच्या जागचे मतदार नशिबवान आहेत. तिथे अर्ज भरल्यावरही उमेदवार त्याच भागात असेल. मला तितकी चैन करण्याची सोय नाही. अर्ज दाखल केला की मला इतर भागात प्रचाराला जायचे आहे आणि इथली लढाई तुमची तुम्हाला लढवायची आहे. यातला आशय उपस्थितांना आणि वाहिनीवर ते भाषण ऐकणार्या कोट्यवधी लोकांना समजू शकला. कारण त्यांच्यापाशी सामान्यबुद्धी शाश्वत आहे. गांधी घराण्यात जन्मलेली असल्याने प्रियंका किंवा राहुल यांना इतक्या साध्या गोष्टी समजू शकत नाहीत. मोदी किती गावात गेले, असा प्रश्न विचारणार्या प्रियंकांनी आपल्या भावाला पंधरा वर्षात किती गावात फ़िरकलास, असा प्रश्न कधी विचारला होता काय? राहुललाच कशाला? आई सोनिया, वडील राजीव, त्यांची आई वा प्रियंकाची आजी इंदिरा गांधी. यांनी मतदारसंघात अर्ज दाखल करून विजय संपादन केल्यावर तिथल्या किती गावांची पाययपीट केलेली होती? त्यापैकी सोनिया राहुल तर पंतप्रधानही झाले नाहीत. मग त्यांनी मतदारसंघातील किती गावे हिंडून फ़िरून बघितलेली आहेत? पंतप्रधान होणार्याला जग फ़िरावे लागते, हेही ज्यांना इतक्या वर्षात आसपास घडताना बघून शिकता आले नाही, त्यांना राजकारण कोण शिकवणार आणि कसे समजावणार? ही गांधी खानदानाची व कॉग्रेस पक्षाची दुर्दशा आहे. पंतप्रधान आपला मतदार जपण्यासाठी वाराणशीच्या खेड्यापाड्यात फ़िरत राहिले असते, तर कालपरवा अझहर मसूदला दहशतवादी ठरवण्याची कामगिरी प्रियंकावर सोपवायची होती का?
पंतप्रधान एका मतदारसंघातून निवडून येणारा असला, तरी संपुर्ण देशासाठी तो प्रतिनिधी म्हणून काम करत असतो आणि त्याला आपल्या स्थानिक मतदारापेक्षाही जग संभाळायचे असते. जगात आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करताना देशाचे हित जपताना, स्थानिक मतदारांशी हितगुज करून काम होत नाही. जगातल्या दिडशे देशांचे जे कोणी प्रमुख असतील, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. त्यांना आपल्या देशात आमंत्रित करावे लागते, किंवा त्यांच्या देशात जाऊन दोस्तीचा हात पुढे करावा लागतो. हेच काम प्रियंकाचे आजी, पणजोबा आणि पिताजीही करीत होते. त्यासाठी कोवळ्या वयात अंगठा चोखणार्या प्रियंकासह आपल्या अर्धांगिनीला घेऊन पिताश्री राजीव गांधीही परदेश दौरे करीत होते. अख्खा वेळ अमेठीतल्या गावोगाव फ़िरून त्यांनी जगाशी संबंध जोडलेले नव्हते. पण बहुधा प्रियंका अजून अंगठा चोखण्याच्या वयामधून बाहेर पडलेल्या नसाव्यात. म्हणून त्या वाराणशीच्या कुठल्या कुठल्या गावात मोदी फ़िरले असा प्रश्न करतात. तसेच फ़िरत बसले असते तर चिनला अझहर मसूदवर बंदी घालण्याच्या प्रकरणात शेपूट घालावी लागली नसती, की जगात भारताची आज वाढलेली प्रतिष्ठा होती तिथेच धुळ खात पडून राहिली असती. ज्या मुलीला उत्तरप्रदेशात २०२२ नंतर कॉग्रेसची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी राजकारणात आणलेले आहे, तिची राजकीय समज यातून उघड होते. ज्या खानदानात फ़क्त पंतप्रधानच जन्म घेतात, अशी पुरोगाम्यांसह कॉग्रेसजनांची अंधश्रद्धा आहे; त्यांचे डोळे उघडण्यासाठी प्रियंका असे काही बरळत असेल, तर तिचे स्वागतच केले पाहिजे. कारण असे लोक १९८० च्याच जमान्यात अडकून पडले आहेत. त्यांना जग एकविसाव्या शतकात आल्याचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. कधीकाळी ज्या महाशक्तींच्या दारात भारत वाडगा घेऊन उभा रहात असे, तेच देश आज भारताच्या भूमिकेसाठी राबू लागले आहेत.
अझहर मसूदचा प्रस्ताव चीनने रोखून धरला, तेव्हा तो प्रस्ताव भारताच्या हिताचा असला तरी आणला होता फ़्रान्सने आणि ब्रिटन अमेरिकेने त्याचा पाठपुरावा चालविला होता. तरीही चिनने त्यात टांग अडवली, तर पुढाकार घेऊन दबाव निर्माण केला तो अमेरिकेने. इतके हे मोठे देश भारताच्या बाजूने लढायला सिद्ध झालेत, त्याचे मुख्य कारण मोदींचे परदेश दौरे आहेत. त्यांनी जगभराचे दौरे केले ते आपल्या मुलाबाळांना जग दाखवण्यासाठी बिलकुल नाही. प्रियंकाला कोवळ्या वयात जग बघायला मिळाले, त्याचा खर्च सामान्य भारतीयाने उचलला. कुटुंब घेऊन परदेशी जाणारे तिचे पिताश्री आणि फ़क्त अधिकार्यांना घेऊन जगाचे दौरे करणारे नरेंद्र मोदी, यातला फ़रक प्रियंकाला कसा उमजावा? ज्या खानदानाने सत्तर वर्षात कणभर घाम गाळल्याशिवाय जनतेच्या पैशावरच चैन मजा केली, त्यांना कुठल्याही स्वार्थाशिवाय देशाची सेवा करणारा पंतप्रधान खुळा नालायक वाटला तर कुठले नवल ना? ही वस्तुस्थिती आहे. म्हणून या मुर्ख मुलीला असले प्रश्न पडतात आणि ते जाहिरपणे बोलायचीही हिंमत होते. कारण बालपणी अशा मुलांचे डायपर बदलण्यातच ज्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली; त्यांना कॉग्रेसी राज्यात मानाची स्थाने मिळालेली आहेत ना? २००४ साली प्रियंका अमेठी रायबरेलीच्या प्रचारासाठी फ़िरत असताना, तिचा खाण्याचा डबा घेऊन सोबत करणारे सुशीलकुमार शिंदे उगाच देशाचे गृहमंत्री होऊ शकले? त्यांची गुणवत्ता किंवा पात्रता काय होती? प्रियंकाच्या व्यक्तीगत सेवेत डबा संभाळणे. अशा लोकांना प्रियंका करिष्माटीक वाटली तर नवल नाही. तिच्यात करिष्मा शोधणार्या बुद्धीमंत पत्रकारांना मोदींचे गुण दिसू शकत नाहीत, हीच तर मोदींच्या गुणवत्ता व पात्रतेची प्रमाणपत्रे आहेत. म्हणून तर अशा दिवाळखोरांनी दिलेल्या शिव्याशापांना मोदी शिरसावंद्य मानतात. प्रियंका गांधी आगे बढो, तुझ्या वाटचालीतच कॉग्रेसचा र्हास सामावलेला आहे.
भाउ हे तर काहीच नाही आज प्रियंकाने वेगळेच तारे तोडलेत.म्हने आम्ही उमेदवार भाजपला पाडायला उभे केलेत ते भाजपची मते खातील.कहरच आहे कितीही पडणारा उमेदवार असला तरी मी जिंकन्यासाठी लढतोय असे म्हनन्याची साधी रीत आहे कारण तसच असत पण प्रियंकाला हे सुधा कळुनये तेही महासचिव असताना?तिला विचारल होत तुझे उमेदवार गठबंधनाची मते खातील त्यावर हे उत्तर होत.सरळ म्हनायच आम्ही कुणाला पाडायला नाही तर जिंकायला लढतोय.उमेदवाराचे धैर्य किती खचले असेल? टिवीवर तर दिवसभर दाखवत होते.
ReplyDelete" गांधी घराण्यात जन्मलेला प्रत्येक जण पंतप्रधान होण्यासाठीच जन्मलेला आहे " ही पक्की समजूत जो पर्यंत काॅंग्रेस पक्ष सोडत नाही , तो पर्यंत त्यांची अधोगती कोणीच रोखू शकणार नाही.
ReplyDeleteया सविस्तर ब्लाॅग मध्ये तुम्ही व्यक्त केलेल्या मताशी असहमती फक्त अविचारी काॅंग्रेसवालेच करू शकतील. " काॅंग्रेस " आणि " विचारी" हे दोन विरूध्द अर्थी शब्द आहेत....
सणसणीत चपराक दिली भाऊ.निर्भीड लेख तुम्हाला शतशा प्रणाम. सत्य परिस्थिती आधारीत लेख
ReplyDeleteKadak
ReplyDeleteEtake khari mahiti aajparyant kadhich baher aali nahi. Keep it up Bhau
ReplyDeleteअफलातून. असे पन्नास पत्रकार देशात असतील तर मोदींचीही गरज नाही देशाला. दळभद्री जनता अजूनही काँग्रेसला मत देत आहे कारण त्यांना योग्य प्रबोधन करणारे पत्रकार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
ReplyDeleteसणसणीत!!!!
ReplyDeleteअशी कानफटात वाजवलीत की तारे तेवीस मे नंतरही चमकत राहतील.विशेषतः सुशीलकुमार शिंदे यांना पट्टेवाला म्हणून कारकीर्द सुरू केल्याची आणि तीच आपली खरी पात्रता असल्याची जळजळीत जाणीव करून दिलीत.पदे मिळवण्यासाठी10जेपी ची हुजरेगिरी केली म्हणजे झाले, अशा समजुतीतून कानाला धरून(की मेल्या उंदरासारखे शेपटीला)बाहेर काढलेत.धन्यवाद भाऊ!
तथास्तु
ReplyDeleteकुटुंब घेऊन परदेशी जाणारे तिचे पिताश्री .. ज्या खानदानाने सत्तर वर्षात कणभर घाम गाळल्याशिवाय जनतेच्या पैशावरच चैन मजा केली, त्यांना कुठल्याही स्वार्थाशिवाय देशाची सेवा करणारा पंतप्रधान खुळा नालायक वाटला तर कुठले नवल ना? Probably true of Priyanka - Rahul but to say that Panditjee or Indira did that is a bit too much. Modi has a wife he chooses to not even accept; one is expected to take wife or companion (when the whole plane is going anyway!). Mr. Torasekar ~ you could be more objective.
ReplyDeleteकमी बुद्धी हा सुद्धा खानदानी वारसा असतो का भाऊ?:))
ReplyDeleteपंतप्रधानासोबत लहानपणापासून वावरणा-यांचे व्यक्तिमत्व कसे असावे ह्याची ज्यांना जाणीव नाही ते नेतृृृृत्व करत आहेत. गांधी खानदानाची व कॉग्रेस पक्षाची दुर्दशा झालेली आहे. अत्यंत समर्पक लेख. �� ��
ReplyDeleteहा सगळा काँग्रेस च्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे
ReplyDeleteहे लोक असेच होते, आहेत आणि राहणार