Wednesday, June 12, 2019

भाऊभक्तांविषयी थोडेसे

Image result for rafale cartoon

नाही म्हणता या सोशल मीडियात माझेही अनेक भक्त जन्माला आलेले आहेत. अर्थात भक्त आणि चहाते यात मी फ़रक करतो. चहाता आपण बोललेले लिहीलेले वाचून कौतुक करतो. पण भक्त आपल्यावर भक्ती करतो. म्हणजे त्याला आपल्यामध्ये काही दिव्यशक्ती असल्याचे भास होतात आणि त्याची आपल्या प्रत्येक शब्दावर श्रद्धा बसते. त्यामुळे घटना आपण म्हटल्यानेच घडली, असेही त्याला वाटू लागते. उदाहरणार्थ गेली पाच वर्षे पुन्हा नरेंद्र मोदींच बहूमताने निवडून येतील, असे राजकीय विश्लेषण मी करीत आलो. ते मोदी समर्थकांना आवडत होते आणि त्यांच्याकडून माझे सातत्याने कौतुक झाले. पण त्यांच्यापैकी काही मूठभर आणि माझ्या अशा विश्लेषणाचे काही कट्टर विरोधक आहेत, त्यांना मी भक्त समजतो. कारण घटना आपल्या क्रमाने घडत असते असे त्यांना अजिबात वाटत नाही. भाऊ तोरसेकरने अमूक म्हटले आणि तसे घडले; अशी त्यांची ठाम श्रद्धा असते. त्यामुळेच अशा भक्तांपैकी मोदीचहाते असतील, त्यांना भाजपा वा मोदींच्या चुकांवर बोट ठेवलेले आवडत नाही. तर काही कडव्या मोदीत्रस्तांना केवळ भाऊ लिहीतो, म्हणूनच मोदी जिंकतात असे वाटत असते. म्हणून अधूनमधून तरी मोदींच्या विरोधातले चार शब्द माझ्याकडून ऐकायची घाई झालेली असते. त्यांनाच मी भाऊभक्त संबोधतो. कारण असे काहीही मी विरोधात लिहील्याने मोदी पराभूत होणार नसतात आणि माझ्या लिहीण्याने वा बोलण्याने त्यांना विजय मिळण्याची बिलकुल शक्यता नसते. अशा राजकीय वाटचालीत विविध पक्ष वा नेते आपल्या परीने जे काही कृत्य करीत असतात, त्यांचे परिणाम काय होतील, याचा अंदाज मी व्यक्त करीत असतो. किंवा त्यातले लाभ वा तोटे मी निर्देशित करीत असतो. त्यातून त्यांनी धडा घेतला, तर त्यांचे लाभ वाढू शकतात वा तोटे कमी होऊ शकतात. घटनाक्रमाला कलाटणीही देणे मला नव्हेतर त्यांनाच शक्य असते. पण भक्तांना हे कोणी सांगावे?

जसे यातले अनेकजण माझे भक्त असतात, तसेच त्यांचेही काही खास देवदूतही असतात. अशा देवदुतांचा शब्द त्यांना प्रमाण वाटत असतो. भक्त कुठलाही असो, त्याला आपली बुद्धी वापरायची नसते. किंवा आपली बुद्धी वा मेंदू वापरण्याची भिती सतावत असते. कारण प्रत्येक व्यक्तीला जो मेंदू दिलेला आहे, त्यात आपापली विचार विश्लेषण करण्याची क्षमता पुर्णपणे असते. सवाल समोरच्या घटना व वस्तुस्थिती बघून विचारपुर्वक आपले निष्कर्ष काढण्यापुरता मर्यादित असतो. पण भक्तांना स्वत:च्या मेंदूला शीण द्यायचा नसतो आणि त्यांना शालेय गाईडप्रमाणे तयार उत्तरे हवी असतात. त्यातल्या उत्तरांचा रट्टा मारून अनेक विद्यार्थी जसे परिक्षेला सामोरे जातात, तशी या भक्तांची अवस्था असते. म्हणूनच शेखर गुप्ता, किंवा राजदीप अशा नावाजलेल्या पत्रकार विश्लेषकांनी मोदींवर आळ घेतला, की असे भक्तगण खुश होतात. त्याची पुनरावृत्ती सुरू करतात. अशा सोशल मीडियातील हजारो भक्तांची आता वाचा बसलेली आहे. कारण निवडणूक निकालांनी त्यांनाच तोंडघशी पाडलेले आहे. आता शेखर गुप्ता म्हणतात, मोदी सरकारच्या कामाचे सामान्य गरीबांना मिळालेले लाभ आमच्या डोळ्यांना दिसत होते. पण आम्हाला बघायचेच नव्हते. मुद्दा गुप्तांचा नाहीच. त्यांच्या भक्तांचा आहे. त्यांच्यावर विसंबून व आपले डोळे झाकून ज्यांनी मागल्या वर्षभरात मोदी सरकारच्या विरोधात खोटेनाटे अपप्रचार केले, त्या दिव्यस्पंदना, स्वराभास्कर अशा लोकांचे काय? त्यांच्या ट्वीट वा पोस्ट मिटक्या मारीत पुढे सरकवणार्‍यांचे काय? ते अकारण मुर्ख ठरले ना? बाकीच्यांचे सोडून द्या. कॉग्रेस अध्यक्ष राहूल गांधींचे काय? त्यांनी जे बिनबुडाचे आरोप राफ़ायल प्रकरणात केले आणि त्यांचे गुणगान अरूण शौरी, यशवंत सिन्हांनी केले. त्यावर राहुल विसंबून राहिले आणि कॉग्रेसला त्याची ऐन लोकसभा निवडणूकीत मोठी किंमत मोजावी लागली त्याचे काय?

या लोकसभा निकालाचा सर्वात मोठा धडा कुठला असेल, तर तो भक्तीमार्गाचा आहे. उठसूट कोणावरही मोदीभक्त म्हणून चिखलफ़ेक करणार्‍या शहाण्यांना पुरोगामी भगतांनी मुर्ख बनवले, तो मोठा धडा आहे. कारण अशा लोकांनी राहुलसहीत तमाम मोदीत्रस्तांना आपापला मेंदू वापरण्यास प्रतिबंध घातला होता. भक्तीला जुंपले होते. आपले डोके वा मेंदू बुद्धी वापरण्यापासून वंचित ठेवले होते. अन्यथा अशा मोदी विरोधकांनीही शहा-मोदी ज्या कोट्यवधी लाभार्थींकडे लक्ष वेधत होते, तिकडे वळून बघितले असते. अनेक कॉग्रेस नेते कार्यकर्त्यांनी राहुलना हटकून बिनबुडाच्या आरोपापासून बाजूला केले असते. मोफ़तची गॅसजोडणी, वीजपुरवठा, शौचालये किंवा शून्य जमेची बॅन्क खाती, यांचा मतदारावर पडलेला प्रभाव त्यांनाही बघता आला असता. त्याच्या विरोधात बोलून लिहून मतदाराला डिवचण्याचे पाप अशा मोदीत्रस्तांकडून झाले नसते. उदाहरणार्थ प्रदीप गुप्ता नावाचा चाचणीकर्ता आहे आणि त्याने १९ मे रोजी दिलेला एक्झीटपोल शंभर टक्के खरा ठरला. पण त्याच्यावरच भाजपाच्या चमचेगिरीचा आरोप तीन दिवस होत राहिला. नंतर त्याची एक मुलाखत न्युज एक्स नावाच्या वाहिनीवर शीला भट्ट यांनी घेतली आणि त्यांच्यातला संवाद त्याची साक्ष आहे. शीलाने त्याला नोटाबंदीमुळे लोक नाराज असल्याचे प्रतिबिंब मतदानात कशाला पडले नाही, असा प्रश्न केला. तर तो उत्तरला ६७ टक्के मतदार त्या नोटाबंदीवर खुश होता. काळापैशाच्या जोरावर मुजोरी करणार्‍यांना त्या निर्णयाने जमिनीवर आणल्याने सामान्य लोक सुखावले होते. बदलण्या इतक्या नोटा त्यांच्यापाशी नव्हत्या आणि त्यांची कुठलीही पळापळ झाली नाही. पण काळ्यापैशावर मौज करणार्‍यांची तारांबळ बघताना, अशा करोडो लोकांना सूडबुद्धीचे सुख अनुभवता आले. हे सत्य किती मोदीत्रस्त बघू शकले? नोटाबंदीविरुद्ध झालेल्या टिकेचा मतदारावर काय परिणाम झाला?

६७ टक्के लोक त्यावर खुश होते, म्हणूनच त्या विषयावर विरुद्ध बोलणारे त्या प्रचंड लोकसंख्येला आपलेही शत्रू वाटले. तेही लोकांसाठी काळापैसावाले होऊन गेले. असा मतदार पर्यायाने मोदींकडे ढकलला गेला, असे प्रदीप गुप्ता सांगत होता. ते स्विकारणेही शीला भट्टला अशक्य झाले होते. याला भक्ती म्हणतात. ल्युटियन्स दिल्लीतल्या मुठभर बुद्धीमंतांनी पसरवलेली अफ़वा म्हणजे ब्रह्मवाक्य समजून बसलेल्यांना; सत्य बघण्याची वा तपासण्याची इच्छाही उरत नाही. त्याला भक्ती म्हणता येईल. तिथून ही फ़सगत सुरू होते. अशाच अनेकांना असे वाटते, की भाऊने लिहीले म्हणून मोदी वा भाजपा जिंकतो. त्यानेच मोदींच्या विरोधात लिहीले बोलले तर मग मोदी पराभूत होऊ शकतात. हा अशा अंधश्रद्धेचा दुसरा भाग असतो. सगळा मीडिया मोदींच्या पराभवाचे चाचणी घेऊन आकडे सांगत असतानाही मोदींचा पराभव होऊ शकला नाही. तसाच भाऊच्या भाकितामुळेही मोदींचा विजय होत नसतो. मोदींचे काम, भाजपाची लढण्याची सज्जता, शहांनी उभारलेली मतदान केंद्रापर्यंतची संघटना आणि त्याला तुल्यबळ उत्तर देण्याबाबतीत विरोधकांची निष्क्रीयता; यांचे सार काढूनच मोदी विजयाचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. नुसती भविष्यवाणी म्हणजे वरदान असू शकत नाही. किंबहूना त्यातली भाजपाची जमेची बाजू व विरोधकांची दुबळी बाजू मी नेमकी मांडत होतो. त्याचा तौलनिक अभ्यास करून वा निदान ते समजून घेतले असते, तरी मोदीत्रस्तांना भाजपाला चोख उत्तर देता आले असते. राहुल गांधींना मुर्खपणा करण्यापासून रोखता आले असते. पण तेही भक्तीत विलीन झाल्यावर मोदींचा विजय सुरळीत व सोपा झालेला होता. माणसे आपली बुद्धी वापरायला भितात किंवा टाळतात, तेव्हा त्यांना खेळवणे सोपे जाते. राहुल गांधी म्हणूनच मोदींच्या हातचे खेळणे झाले आणि त्यांच्या माध्यमातून तमाम विरोधकांना झुलवणे सहजशक्य झाले.

शत्रूशी लढताना त्याच्या दुबळ्या बाजूवर हल्ला केला जातो. चढाई केली जाते. इथे उलटा किस्सा दिसेल. सोशल मीडिया किंवा मुख्य माध्यमातूनही भाजपा व मोदींच्या सशक्त बाजूवर जोरदार हल्ले चालले होते. शौचालय किंवा गॅसजोडणी अशा जमेच्या बाजू मोदी सांगत होते, तर अमित शहा लाभार्थींचा कित्येक कोटींचा आकडा सांगत होते. तो आकडा खोटा ठरवण्यासाठी बुद्धी खर्ची घातली जात होती. त्याची उलटी बाजू अशी, की अविष्कार स्वातंत्र्य, संविधान किंवा लोकशाही अशा जनतेच्या जीवनात काडीमात्र जिव्हाळ्याच्या नसलेल्या गोष्टींवर असे बुद्धीमंत व त्यांचे भक्त जोर देत राहिले. त्यातून खर्‍याखुर्‍या मतदाराला त्यांनी लाथाडण्यातच धन्यता मानली आणि त्यांची पाठ शेखर गुप्ता किंवा तत्सम लोक थोपटत राहिले. त्यामुळे मोदी-शहांचे काम सोपे झाले होते. आताही निकालाचा खरा अर्थ समजून घेण्यापेक्षा इव्हीएम किंवा अन्य गोष्टींवर झोड उठवून खर्‍या प्रश्नांना बगल दिली गेली आहे. ज्यांना आपल्या चुका शोधता वा समजून घेता येत नाहीत, त्यांना भक्त म्हणतात. काहीतरी किमया व्हावी किंवा जादू चालावी; अशी अपेक्षा करून आशाळभूत प्रतिक्षा करणार्‍या निष्क्रीय लोकांना अपयशाखेरीज अन्य काही मिळू शकत नाही. तरीही ज्यांना जाग येत नाहीत वा डोळे उघडत नाहीत, ते खरेखुरे अंधश्रद्ध व अंधभक्त असतात. ते नशिबाला दोष लावतात किंवा दैवी हस्तक्षेपाची प्रतिक्षा करतात. हल्ली अशा भगतगणांना पुरोगामी समजले जाते. हे असेच चालत राहिले. तर २०२४ सुद्धा मोदी-शहा वा भाजपासाठी आव्हान असू शकणार नाही. अर्थात यापेक्षा वेगळाच काही पर्याय भाजपासाठी राजकारणात उभा रहाणार नाही, असेही नाही. पण एक गोष्ट निश्चीत. प्रचलीत राजकारणातील पुरोगामी, सेक्युलर किवा बुद्धीमंत म्हणून जे कोणी समोर आहेत, त्यांच्यापेक्षा वेगळा नवा पर्याय यावा लागेल. अंधभक्तीच्या मार्गाने व्यवहारी राजकारण चालत नसते.

16 comments:

  1. भाऊ तुम्हाला नाही वाटत मोदी भक्त, हे भक्त ते भक्त या मध्ये तुम्ही जास्त वेळ घालवत आहे

    ReplyDelete
  2. खरय भाउ प्रदिप गुप्ताला ३ दिवस पुरोगाम्याननी इतक छळल मोदींना ३०० दाखवले म्हनुन तो निकालादिवशी चॅनलवर न बोलता नुसताच रडत होता.एका मोठ्या कंपनीच्या CEOची ही अवस्था केली असेल तर बाकीच्यांचे काय

    ReplyDelete
  3. Last 2 sentences - very correct... ✔️

    ReplyDelete
  4. लोकसत्तेत तर नोटबंदीचे अपयश ही ओळ रोजच यायची.पण आपले सटायर भारी आहे.

    ReplyDelete
  5. भाऊ, अत्यंत सुंदर विवेचन. आम्ही तळागाळातील लोक मोदी आणि भाजप यांचे काम बघत होतो, अनेक योजनांचे लाभार्थी बघत होतो पण फेसबूकवरचे विरोधक "या योजना फसल्या आहेत असे अनेकांनी सिद्ध केले आहे हे आळवत बसले". पण सामान्य लोकांना या योजनांचे फायदे मिळतच होते. नवीन रस्ते, असलेले रस्ते जरुरीप्रमाणे रुंदीकरण ही कामे प्रत्यक्ष दिसतात पण हे पुरोगामी ते ही नाकारत होते. लोकांनी लाथ मारली तरीही सुधारणा नाही आता ए्वीएम् च्या उलट्या करत बसले आहेत. हे जर असेच चालू राहिले तर २०२४ पण ३५० पार

    ReplyDelete
  6. आता नवा पर्याय पुढे यायचा असेल तर तो २०२९ उजाडावा लागेल. ५ वर्षात एव्हढे मोठे आव्हान उभे राहणे मुश्किल आहे. आता मोदी आणखीन सावध आहेत. पहिल्या दिवसापासून त्यांची भाषा सबका विश्वास ची आहे.. ते आता त्यांची विश्वासार्हता आणखीन वाढवण्याचाच प्रयत्न करतील..

    ReplyDelete
  7. भाऊ .............नेहमीप्रमाणे झकास !! तुमचा पुण्यातील कार्यक्रम ( मोदींसमोरील आव्हाने ) फारच छान झाला. तुमची एखाद्या घटनेकडे बघायची दृष्टी आणि तुम्ही दिलेली उदाहरणे तर एकदम मस्त होती. श्रोत्यांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरेही फारच उत्तम....!! शेवटी आपले ' अनुभवाचे बोल ' ..............ज्यांच्यासमोर लुटीयन्स वाल्यांचा ' पुस्तकी ' अभ्यास पूर्णपणे फिका पडतो.

    ReplyDelete
  8. एक गोष्ट खरी, गरीब सामान्य लोकांना नोटबंदी मुळे सुड घेतल्याचा आनंद मिळाला. नोटबंदी नंतर मी दिल्लीत होतो. एकदा टॅक्सीने जात असताना, टॅक्सी ड्रायव्हर कडुन हीच प्रतिक्रिया मी ऐकली होती. त्याशिवाय आणखीन एक आनंद त्याला मिळाला होता. त्याच्या मालकाने, त्याला मागील उरलेला पगार व पुढील दोन महीन्याचा आगाऊ पगार देऊन टाकला होता. त्याचे तर असे म्हणणे होते, दरवर्षी नोटबंदी झाली पाहिजे.

    ReplyDelete
  9. अगदी बरोबर. हा लेख मूलभूत स्वरूपाचा आहे. धन्यवाद. गुड डे

    ReplyDelete
  10. श्री भाऊ हा ही लेख छान, ज्याला SWOT anylysis म्हणतात ते तुम्ही करून दाखवलत, म्हणून आम्ही तुमच्या प्रेमात अखंड बुडालो आहोत

    ReplyDelete
  11. भाऊसाहेब, तुमच्या मते भाजपाला सशक्त पर्याय देण्याची पूर्वतयारी विरोधी पक्षांनी कशी करावी ?? की नवीनच पक्ष स्थापन व्हायला पाहिजे??

    ReplyDelete
  12. भाऊ,
    कसं काय इतकं वास्तववादी राहता येत बुवा?? तुमच्या निम्मे वाचक एखाद्याला मिळाले तर १० पूर्वज स्वर्गात गेल्यासारखं वाटेल त्याला. तुम्ही मात्र यापैकी काहीही अंगाला न लावून घेता परत जागता पहारा देत राहता...

    ReplyDelete
  13. So called intellectuals and secular have misguided to our society, all they want to improve only one religion as they find all mistake in only one religion. They don't dare to speak about other religions.

    ReplyDelete
  14. भाऊ विश्लेषण नेहमी प्रमाणे अचुकच..फक्त एक दुरुस्ती करतो.प्रदीप गुप्ता नसून तो प्रदीप भंडारी आहे.जन की बात तो चालवतो.Rभारत या अर्णब गोस्वामी च्या वृत्त वाहिनी वर त्याने एक्झिट पोल केला होता त्याने..जयहिंद!!

    ReplyDelete
    Replies
    1. Video प्रदीप गुप्ता राजदीप सरदेसाई आणि राहुल कँवल समोर रडताना
      https://youtu.be/CXbdXITyp6E

      Delete