तुम्ही गळ टाकून बसा. मासा तिथपर्यंत आला पाहिजे आणि त्याला गळाला लागलेले आमिष खायची अनावर इच्छा व्हायला हवी. नाहीतर त्या गळाचा काहीही उपयोग नसतो. तशीच स्थिती शिकारीसाठी लावलेल्या सापळ्याचीही असते. तुम्ही सापळा मस्त लावलेला असतो. त्यात सावजाला छान आमंत्रण दिलेले असते. पण सावज त्याच्या मोहात पडून त्या सापळ्यात आले नाहीतर सापळा निरूपयोगी असतो. पण काही सावजे इतकी उतावळी असतात, की सापळा लावून पुर्ण होण्याआधीपासूनच त्याच्या दिशेने झेपावू लागतात. त्या दिशेने धावत सुटलेली असतात. किंबहूना त्यांना तो सापळा आपल्यासाठी सन्मानाचे काही स्थान वा पद वाटत असते. शिवसेनेची स्थिती आजकाल काहीशी तशीच झालेली आहे. अन्यथा आणखी आठवडाभराने राज ठाकरे यांनी योजलेला महामेळावा किंवा अधिवेशन यशस्वी करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी इतकी मेहनत मशागत कशाला चालविली असती? सध्या राऊत जे काही बोलत बडबडत आहेत, त्यातून कट्टर व नाराज शिवसैनिकांना वा सेनेच्या समर्थक मतदाराला राज ठाकरे यांच्या दिशेने पिटाळण्यासाठी पोषक वातावरणच निर्माण केले जाताना दिसते आहे. शिवसेनेने सत्ता व मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी काही राजकीय तडजोडी केल्या आहेत आणि सगळेच पक्ष कमीअधिक प्रमाणात अशा कसरती करीत असतात. पण असे पक्ष कधीही आपल्या मुळ संकल्पना वा भूमिकांना तिलांजली देऊन तडजोडीसाठी वाकत नसतात. तसे केल्यास त्यांच्या शक्तीचा क्षय होत जात असतो आणि त्यावर अन्य कुठला तरी पक्ष संघटनेचा विस्तार होणे अपरिहार्य असते. मनसे या पक्षाने गेल्या पाच वर्षात तेच केले आणि त्यांची शक्ती क्षीण होऊन गेली. परिणामी शिवसेनेला सशक्त होण्याला पोषक स्थिती निर्माण झाली. आता उलट्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे.
शरद पवार यांच्या प्रेमात पडून राज ठाकरे यांनी नुकसान सोसलेले आहे आणि आता उद्धव ठाकरे त्यांचे अनुकरण करीत आहेत. पण त्याचवेळी आपली चुक सुधारून राज ठाकरे पुन्हा आपल्या पाळामुळांकडे वळायला निघालेले आहेत. मनसे हा मुळातच शिवसेनेतून फ़ुटून निघालेला पक्ष होता आणि बाजूला होतानाही राज ठाकरे यांनी शिवसेनेच्याच मुळ भूमिकेचा वारंवार उल्लेख केलेला होता. त्यांना त्यामुळे नाराज शिवसैनिक व मतदारांचा प्रतिसादही मिळालेला होता. पण तेवढ्या यशाने फ़ुशारलेले राज ठाकरे भरकटत गेले आणि त्यांना पुर्णपणे दिशाहीन करण्याचे उत्तम मार्गदर्शन शरद पवारांनी केले. अखेरीस आपण कोण व आपली भूमिका काय; त्याचेही स्मरण राजना उरले नाही. मग पवारांनी मनसेकडे पाठ फ़िरवून शिवसेना नावाचा नवा तगडा मासा आपल्या गळाला लावलेला आहे. आता कुठे राज ठाकरे यांना जाग आलेली असून, त्यांनी आपला वारसा शोधून पुन्हा त्या दिशेने वाटचाल करायचे ठरवलेले आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेला मुहूर्तच सूचक आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनी म्हणजे २३ जानेवारीला राज आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल करणार आहेत आणि वेगळ्या भूमिकेचीही घोषणा करणार आहेत. एक गोष्ट निश्चीत असते. बाजारात मुळचा ओरिजिनल माल उपलब्ध असताना कोणी त्याची नक्कल वा डुप्लिकेट पत्करायला सहसा राजी होत नाही. पण मुळच्या वस्तुची गुणवत्ता वा दर्जा घसरू लागला, मग लोक जवळीक सांगणार्या पर्यायाकडे वळत असतात. शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळवल्यापासून आपल्या मुळच्या भूमिका व वारशाला फ़ाटा देण्याचा सपाटा लावला आहे. सहाजिकच त्यासाठीच सेनेकडे आकर्षित झालेला वर्ग बिथरलेला आहे. त्याला त्या वारसाच्या खाणाखुणा दिसतील अशा बाजूला त्याने वळणे स्वाभाविक आहे. मनसे त्याच दिशेने वळण घेण्याच्या तयारीत आहे आणि शिवसेनेची शक्ती खेचणे, हाच त्यांचा मनसुबा आहे. पण नुसता मनसुबा करणे वेगळे आणि त्या सापळ्यात सावज येणे वेगळे असते.
जेव्हा एकाच क्षेत्रात नवा प्रतिस्पर्धी निर्माण होत असतो, तेव्हा मार्केटींगच्या तंत्रानुसार आधीच प्रस्थापित असलेल्या मुळच्या खेळाडूचे वर्चस्व कमी करण्यासाठी त्याच्या वाट्याला आलेला बाजारातला हिस्सा कमी करण्याला महत्व असते. त्याच्या गोटातल्या कोणीतरी तिथे दगाफ़टका करण्यावर नवोदिताचे यश अवलंबून असते. प्रस्थापिताकडे जी गर्दी आहे, ती जितकी नाराज व अस्वस्थ होईल, तितकी ती पर्याय शोधू लागते आणि परिणामी नव्या स्पर्धकाला मार्केटचा हिस्सा मिळू लागत असतो. मनसेला शिवसेनेच्याच पाठीराख्यांना जिंकायचे असेल, तर तिथला अनुयायी व पाठीराखा नाराज होण्याला प्राधान्य असते. शिवसेनेविषयी त्यांच्याच समर्थकात अस्वस्थता साशंकता येणे खुप महत्वाचे आहे. ते काम सेनेच्या प्रस्थापित विचार, मूल्ये व भूमिकांपासून शिवसेनेने फ़ारकत घेण्य़ातून होत असते. गेल्या महिन्याभरात हे काम झपाट्याने संजय राऊत यांनी हाती घेतले आहे. सावरकर असो वा शिवरायांचे वंशज असोत, त्यावरून जे वादळ उठवण्यात आले आणि वाद पेटवण्यात आलेत, त्यात शिवसेनेला आपली खास आक्रमक भूमिका घेणे अशक्य होऊन गेले आहे. सत्ता टिकवायची तर भूमिकेला मुरड घालण्याला पर्याय नाही. पण त्यातून आपोआपच राज ठाकरे यांना तीच भूमिका अतिशय आक्रमक पद्धतीने पेश करण्यासाठी मैदान मोकळे करून देण्यात आलेले आहे. सावरकरांविषयी राहुल गांधीनी अनुदार उद्गार काढले आणि त्यांना माघार घ्यायला भाग पाडणे शिवसेनेला साधले नाही. उलट तशी भूमिका घेणार्या योगेश सोमण यांना शिवसेनेची सत्ता असताना विद्यापीठातून सक्तीच्या रजेवर धाडण्याची शिक्षा मात्र झालेली आहे. म्हणजे मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी सेना आपल्या भूमिकेलाच तिलांजली देत असल्याची स्थिती निर्माण झाली वा केली गेली आहे. आपोआप ती मनसेसाठी पोषक स्थिती झालेली आहे. मनसे त्यावर तुटून पडली, तर सेनेतले अस्वस्थ समर्थक काय करतील?
हे कमी होते म्हणून की काय राऊत यांनी शिवरायांच्या वारसांकडे ते खरेच वंशज असल्याचे पुरावे मागण्यापर्यंत मजल मारली आहे. त्या आगीत तेल ओतण्यासाठी शरद पवारांनी शिवराय व समर्थ रामदास हा मुद्दा उकरून काढला आहे. सर्वसाधारण परिस्थितीत एव्हाना शिवसेना या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात मराठी अस्मिता म्हणूनच रस्त्यावर आली असती. पण पक्षप्रमुख त्याविषयी मूग गिळून गप्प आहेत आणि सामना त्या नाकर्तेपणालाच पुरूषार्थ ठरवून शिवरायांच्या वारसांनाच आव्हान देत आहेत. यापेक्षा मनसेला आणखी काय हवे असेल? जसजशी २३ जानेवारी जवळ येत आहे, तसतशी राज ठाकरे यांना जुनीच भूमिका नव्याने आक्रमकपणे मांडायला पोषक परिस्थिती जुळवून आणली जात आहे. मशागत सामना व राऊत करीत आहेत आणि मनसेचे शेत सुपिक व्हायला हातभार लागतो आहे. हे अर्थात संगनमताने होत आहे, की बेछूटपणातून होत आहे, ते चाणक्यच जाणोत. कारण मधल्या महिनाभरात ज्या घटना वेगाने घडत आहेत, त्या मनसेला नवी संजिवनी देण्यासाठी मोठ्या उपकारक ठरणार्या आहेत, यात शंका नाही. याचे मुख्य कारण लक्षात घेतले पाहिजे. आजही इतके होऊन जितक्या प्रभावी पद्धतीने त्यावर भाष्य व्हायला पाहिजे; तितके कोणी करू शकलेला नाही. कारण तितकी मुलूखमैदान तोफ़ अन्य कुठल्या राजकीय गोटात नाही. ती फ़क्त मनसेकडे आहे आणि २३ जानेवारीला ती धडाकेबाज पद्धतीने धडाडू लागली, तर काय धमाका होईल, त्याची नुसती कल्पना करावी. परिणाम नंतर दिसतील. पण धमाका केवढा असेल? ‘लावारे तो व्हिडीओ’ या मोहिमेतून राजनी किती धमाल उडवून दिली होती? आठवडाभरानंतर मनसेच्या अधिवेशनात व पुढल्या काळात हे सगळे विषय दारुगोळ्यासारखे राज ठाकरे यांच्या कोठारात असतील ना? राऊत त्याच शस्त्रागारात नवनवी अस्त्रे भरून देण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत.
राज ठाकरे धमाल उडवणार हे नक्की.
ReplyDeleteBarobar
Deleteभाऊ, हा राऊत डोक्यावर पडला आहे का? मुलवयाधीचे ऑपरेशन फेल झाले वाटतय.
ReplyDeleteसंजय राऊत यांनी गेले काही दिवस अक्षरशः वात आणला आहे. या माणसावर उद्धव ठाकरे यांचे काही नियंत्रण आहे की नाही? येता जाता भाजपवर दुगाण्या झाडत असतो. आणि भाजपवाले ही उगाच निष्कारण वादात उडी घेतात. स्वतःहून शिवसेनेला गाळात घालतोय तर घालू देना. खरंच हे सर्व बघून माननीय शिवसेनाप्रमुखांच्या स्वर्गस्थ
ReplyDeleteआत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाही करवत नाही.
भाऊ नेहमीप्रमाणे सुंदर लेख. तुम्हाला खरेच वाटते का कि
ReplyDeleteशिवसेनेची सोनिया सेना झाल्यावर जी पोकळी निर्माण झाली
आहे ती राज भरून काढतील? मराठी हिंदू अस्मितेचे जेव्हढे
म्हणून नुकसान करता येईल तेव्हढे बाळासाहेबानंतर त्यांच्याच वारसांनी केलं असं असताना राज अबाउट टर्न मारून पुन्हा मराठी हिंदू अस्मितेला मानाचं स्थान मिळवून देतील हे मला स्वप्नच वाटतं आहे. मनसे ला प्राथमिक अवस्थेत यश मिळाले तेव्हा त्या यशाच्या पायरीवर उभं राहून
मनसे मध्ये कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे, पक्षाचा डोलारा उभा करणे, पक्षाकडे चलन वलन निर्माण करणे, पक्षाला राज्यात कानाकोपऱ्यात नेणे, तिथं पक्षाची भूमिका लोकांना पटवून देणे, त्याचवेळी लोकल राजकारणात एक्टीव्हली प्रिप्लॅन विविध सत्तास्थाने ताब्यात घेणे हे सगळे
न करता राज ह्यांनी पवारांच्या सदऱ्याला धरून मोदी एके मोदी करत लाव रे तो व्ही डी ओ ही मुमेंट उभी केली, बरे मोदी एके मोदी करत लाव रे तो व्ही डी ओ ही मुमेंट उभी
करताना लाव रे तो व्ही डी ओ म्हटल्यावर लावलेल्या व्ही डी ओ वरच्या क्लिप पाहून मत पवारांना आणि राहुल ला
मागितले. लाव रे तो व्ही डी ओ म्हटल्यावर लावलेल्या व्ही डी ओ वरच्या क्लिप पाहून मत मनसे ला मागितलं असत तर
समजण्यासारखं होतं. लाव रे तो व्ही डी ओ म्हटल्यावर लावलेल्या व्ही डी ओ वरच्या क्लिप पाहून मत पवारांना आणि राहुल ला द्या पण मोदींना नका देऊ हा गजब प्रकार
राज ह्यांनीच उभा केला. बदल्यात राजना काय मिळाले? कण्हत्या राजाने राज ना सकाळी लवकर उठ अश्या कानपिचक्या दिल्या. अल्पसंख्याकांची बाजू घेणे म्हणजे इस्लाममधील दोषांविषयी मौन बाळगणे असा सोयीस्कर अर्थ काढणारी शिवसेना आता सोनिया सेना होउन सावरकरांना दुर्लक्षित उपेक्षित ठेवून आता संघ म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मण हे वर्गशत्रू अशीही समीकरणे मांडण्याच्या मार्गावर
आहे. मोदीद्वेष हा एकमेव अजेंडा तर सोनिया सेनेने वापरलाच आहे पण मोदीद्वेष हा एकमेव अजेंडा राबवताना मोदींबरोबर निवडणूकपूर्व आघाडी करून मोदी च्या लोकप्रियतेचा फायदा घेउन मोदीजीचा फोटो बेनर वर लावून
शिवसेनेने 50+ सीट्स निवडून आणल्या व नंतर वाटमारी
करून पवारांची करंगळी धरून उरली सुरली घालवली. भाऊ
मला वाटते भाजपा ने मराठी हिंदू अस्मितेस हवा देउन संघाच्या मदतीने आपल्याच कॅडर मधील लोकांमधील चेहऱ्यास पुढं आणावे. असं केल्यास मराठी हिंदू अस्मितेस नवीन पर्याय मिळेल. शिवसेनेने व मनसे ह्यांनी अत्यंत दीर्घकाळ मराठी हिंदू अस्मितेस वापरून स्वतःला पवारांच्या
दावणीस बांधून घेतले व चारी मुंड्या चीत झालेल्या पवारांना मोठे केले. राहता राहिला प्रश्न राऊतांच्या राजकारणाचा. शिवसेनेने मोदीद्वेष हा एकमेव अजेंडा राबवताना मोदींबरोबर निवडणूकपूर्व आघाडी करून मोदी च्या लोकप्रियतेचा फायदा घेउन मोदीजीचा फोटो बेनर वर लावून 50+ सीट्स निवडून आणताना पवारांशी गटजोड केली असे राऊत सांगत फिरतात. आता शिवसेनेच्या लोकांना सत्ता मिळाल्यावर पवारांच्या साहाय्याने राऊतच मनसे ला पोषक वाटेवर नेत असण्याची शक्यता आहेच. आपल्या लेखाचा कल राज च्या
बाजून नकळत झुकला आहे. केवळ स्वस्त श्रम असून राज्यातील वाटमारीच्या पवारी पुरस्कृत राजकारणाच्या स्पर्धेत टिकता येत नाही. त्यासाठी मराठी हिंदू अस्मितेची
उत्पादकतासुद्धा वाढवावी लागते. मराठी हिंदू अस्मितेची
उत्पादकता वाढवायची असेल तर राजकारणामध्ये शिवसेनेची सोनियासेना झाल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी स्पर्धा खुली करावी लागते. दूरदृष्टीत आपण कमी पडलो किंबहुना विपरीतच वागलो याची कबुली आता भाजपा चे नेतृत्व देईल अशी
आशा करणे हेच हातात आहे. प्रमाण-अप्रमाण असे काही मानणे म्हणजेच उच्चनीच भेदभाव करणे असते! म्हणून कशालाच प्रमाण मानू नये अशी धारणा शिवसेना + राऊत+ पवार + काँग्रेसनी पसरवली. किंबहुना राजकारणात चूक-बरोबर ही कोटी वापरणे म्हणजे त्या त्या संदर्भातल्या सत्ताधाऱ्यांची तळी उचलणे असते असेही (पवार-सदृश) ते मानू लागले. आता तर खरे/खोटे हा भेद संपला असून पोस्ट-ट्रथ युग आले आहे. भा ज पा ने स्वतःच ही लढाई लढायला
हवी. आपले ते कार्टे व दुसऱ्याचा तो बाब्या छाप, उफराटी वृती स्वीकारून मोदीजींना वापरून सत्तेत येउन बसणार्यांना
जनता स्थान दाखवेल वैगैरे बडबड करणे वेगळे अन मोदीजींना वापरून सत्तेत येउन बसणार्यांना त्यांची जागा
प्रो एक्टीव्हली फाईट करून दाखवणे वेगळे. मोदीजींना वापरून सत्तेत येउन बसणार्यांना त्यांची जागा
प्रो एक्टीव्हली फाईट करून दाखवण्यासाठी मनसे पुन्हा उभे राहिल असे विचार भा ज पा ला आणखीन एका पराभवाकडे
घेउन जाईल
उत्तम विवेचन
Delete100% correct
Deleteभाऊ,रावताच्या भावाला मंत्रीपद नाकारल्याने तो पिसाळलाय.
ReplyDeleteराज ठाकरे यांना मदत करण्यासाठी संजयाने करीमलाला इंदिरा भेटीचा उल्लेख करत माघारही घेतली.या सगळ्या गदारोळात उद्धवजी मुख्यमंत्री पदाची नवलाई अनुभवत,घड्याळाची महती सांगत फिरत आहेत. एकूणच
चुलतराज जोशात येणार...
नुकतेच देवेंद्र फडणीसांची राज ठाकरे सोबत बंद दारामागे चर्चा झाली होती.काही नवी समीकरणे जुळत आहे असे वाटते.
ReplyDeletefadnavis pan tyanna hul detil karan shivsenecha matadar shivsenepasun dur jhalelach ahe pan te thalak ani spasht karanyache kam raj thakare karnar, shivay shivsenechya narajanchi naraji vadhavnyache, tyanchi mathi bhadkavnyache kam pan raj thakare karnar. pan mala vatate ki naraj shivsainik raj thakarenkade nahi tar bhajap kade jail karan raj thakare nivadnukit karishma dakhavu shakat nahit. ani 40 jan jari futle tari tyanna tatkal sattet janyachi ani mantripad milnyachi soy bhajapkade ahe. fadnavis raj thakareshi yuti karnar nahit. tyancha fayda uthavtil.
Deleteश्री भाऊ मला अजुनही राज ठाकरे विश्वसनीय वाटत नाहीत, अजूनपर्यंत तरी त्याना विश्वसु माणस गोळा करता आलेली नाहीत
ReplyDeleteभन्नाट एकदम
ReplyDeleteराज ठाकरे ठाकरे बोलूकाका आहेत. त्या फर्डे व आक्रमक बोलण्यावर विश्वास ठेवून लोकांनी त्यांना संधी दिली पण पुढे हातून विधायक कार्यही नाही की सहकाऱ्यांना योग्य तो मान देण्याची वृत्ती नाही त्यामुळे एकटे पडल्याने पोटापाण्यासाठी सुपारी घेऊन छू करतील त्याच्यावर भुंकण्याचे काम सुरू केले. फर्डे वक्तृत्व एवढा एकच गूण सेनेची 'रयत' दिशाहीन विखरून टाकण्याचे काम करेल अशी शंका येते.
ReplyDeleteमा. राज ठाकरे नेते कमी,अभिनेते जास्त असा त्यांचा एकूण वावर असतो हे अजून कोणाच्याच कसे लक्षात येत नाही ? एक प्रकारचा नाटकीपणा- आपण दिसतो कसे याचे सतत भान आणि इतरांवर आपला प्रभाव पडतोय की नाही याची सतत चाललेली पडताळणी ही त्याची प्रमुख लक्षणे -त्यांच्यात जाणवतो.आपण इतरांपेक्षा वेगळे,जास्त समज असलेले आहोत याची समोरच्याना जाणीव करून द्यायचा त्यांचा हेतू नसेलही पण तो असावा असे वाटावे इतपत शिष्टपणा जाणवतो त्यामुळे त्यांच्याबाबत आपुलकी , विश्वास निर्माण होत नाही.हुकुमशाही त्याना जमेल ,रुचेल.सत्ता मिळेपर्यंत आणि मिळवण्यासाठी ते इतरांशी जुळवून घेतील असा त्यांचा खाक्या भासतो.प्रतिमासंवर्धन हे हल्ली फार मोठे शास्त्र बनले आहे तरी हे कोणाच्या कसे ध्यानात येत नाही याचे नवल वाटते .
ReplyDeleteभाऊ म्हणता त्याप्रमाणे सरा ची सध्याची भूमिका सेना फोडणे असे दिसते. एका बाजूला कारीमलालाचे इंदिरा गांधीं बरोबर असलेले / नसलेले संबंध सांगून उठा ना 10 जनपथ कडे सरकविणे, सावरकारबद्दल बोलून कार्यकर्ते राज कडे सरकविणे असे उद्योग सुरू आहेत. सिल्वर ओक वर जेव्हापासून उठा जायला लागलेत, सरांचा पत्ता कट झाला व स्वतःचा भाऊ मंत्री नाही झाला तेव्हा पासून हे उद्योग सुरू आहेत.
ReplyDeleteराज ठाकरे विश्वसनीय नाही त्यांस स्वकर्तुत्व अजिबात नाही आणि विश्वासाहर्ता शून्य आहे फक्त करमणूक करू शकतात ते . टोल च्या संदर्भात त्यांनी स्वतःची सगळी विश्वासाहर्ता गमावली १४ ला मोदींच्या बाजूने आणि १९ला विरोध आता परत मोदींकडे ?
ReplyDelete