Thursday, March 26, 2020

ही मेराथॉन शर्यत आहे

No photo description available.

लॉकडाऊन म्हणजे सगळा देश वा आपापला परिसर निर्मनुष्य करणे होय. याचा अर्थ सार्वजनिक मानल्या जातात अशा जागी एकत्र येण्यापासून लोकांना रोखणे असते. तशा जागा फ़क्त समारंभ वा मनोरंजनाच्याच नसतात, तर जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करण्याच्या किंवा आरोग्यविषयक सेवांच्याही जागा असू शकतात. त्या अकस्मात बंद केल्या, तर लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते. पण दंगल हिंसाचार जाळपोळीच्या प्रसंगी असे तातडीचे उपाय योजले जात असतात. कारण आधी जमावाला विस्कटून टाकणे व त्याच्या मनात दहशत निर्माण करणे असते. ते तेवढ्यापुरते शक्य असते. कारण दंगलीचा वणवा अन्य भागात पसरू नये, म्हणून एका भागापुरता जमाव पांगवला वा रोखला जात असतो. त्यालाही एकप्रकारे लॉकडाऊनच म्हणतात. पण ते पोलिस वा लष्कराला शक्य होते, कारण अंमलाचा प्रदेश मर्यादित असतो. एक गाव वस्ती तालुका किंवा शहराचा एखादा भाग, त्यामध्ये समाविष्ट केलेला असतो. त्याच्यापलिकडे सर्वत्र जनजीवन सुरळीत चालू असते. त्या कर्फ़्यु वा लॉकडाऊनमुळे कोंडली जाणारी लोकसंख्या मर्यादित वा किरकोळ असते. म्हणून तर पुर्व दिल्लीत उसळलेली दंगल कर्फ़्यु लागू केल्यावर अवघ्या ३६ तासात आटोक्यात आलेली होती. पण तेव्हाच संपुर्ण दिल्लीतच कर्फ़्यु लागू केली असती तर काय झाले असते? आपला दोष नसताना वा परिस्थिती आटोक्यात असताना बंदिस्त कशाला करता; असा सवाल प्रत्येकाच्या मनात येत असतो आणि मग लोक कर्फ़्युला आव्हान देऊ लागतात. तशी स्थिती निर्माण झाली मग अपुर्‍या पोलिस संख्याबळाने कर्फ़्यु अंमलात आणणे अशक्य होऊन जाते. यामागची योजना लोकसंख्या व यंत्रणा यांचे समिकरण मांडून आखलेली असते. किमान लोकसंख्या आव्हान द्यायला पुढे येईल, अशा रितीने कर्फ़्यु लावणे अगत्याचे असते. लॉकडाऊन करण्याला विलंब झाला असले शहाणपण शिकवणार्‍यांना त्याचे अजिबात भान नाही. ज्यांना आपल्या घरात वा कुटुंबातले गुंते सोडवतानाही नाकी दम येतो, त्यांचे हे शहाणपण आहे.

उदाहरणार्थ आपण धावण्याची शर्यत विचारात घ्यावी. ती शर्यत विविध अंतराची असते आणि त्याचा हिशोब मांडूनच त्यात धावपटू सहभागी होत असतात. शंभर वा चाऱशे मिटर्सची स्पर्धा धावणारा जशी सुरूवात करतो, तशी मॅराथॉन शर्यतीत भाग घेणारा सुरूवात करीत नाही. कारण त्याला ४२ किलोमिटर्स धावायचे असते आणि तितके अंतर तोडण्यापर्यंत आपल्या अंगातली उर्जा, शक्ती व हिंमत टिकवून धावावे लागत असते. त्यामुळेच त्यात सहभागी होणारे खरे धावपटू हळुहळू धावायला सुरूवात करतात आणि आपली उर्जा जपून वापरत धावतात. पण त्यात शेकड्यांनी सहभागी होणारे हौशी धावपटू पहिल्या क्षणापासून वेगवान धावताना दमून बाजूला होत जातात. कारण ते आरंभशूर असतात. त्यांना या खेळातले तंत्रही ठाऊक नसते. ते व्यावसायिक खेळाडू नसतात. हा मोठा फ़रक असतो आणि म्हणूनच शर्यतीच्या परिणामातही त्याचेच प्रतिबिंब पडलेले असते. ह्या धावण्याच्या व मॅराथॉन शर्यतीमध्ये जो फ़रक आहे, तितकाच फ़रक नेहमीच्या दंगल हिंसाचारात लावली जाणारी कर्फ़्यु व लॉकडाऊन यातला फ़रक आहे. हौशी धावपटू असोत किंवा आजकाल सरकारला सल्ले देणारे सार्वजनिक शहाणे असोत. त्यांची बुद्धी अशा बाबतीत सारखीच म्हणायला हवी. निदान हौशी धावपटू खर्‍या स्पर्धकाला कसे धावावे, ते शहाणपण शिकवित नाहीत किंवा सल्ले तरी देत नाहीत. ते बंधन जगाला शहाणे करण्याची जबाबदारी डोक्यावर असल्याच्या समजूतीत जगणार्‍या बुद्धीमंताना नसते. त्यामुळे ते डॉक्टरपासून धावपटूलाही सल्ले देण्यासाठी पुढे सरसावत असतात. अन्यथा त्यांनी लॉकडाऊन आठवडाभर आधीच लावायला हवा होता, असली शेरेबाजी कशाला केली असती? मॅराथॉन धावपटू आपली उर्जा कशाला राखून ठेवत असतो? आपल्या अंगामध्ये असलेली शक्ती व हिंमत तो जपून कशाला वापरत असतो? आज कोरोनाच्या निमीत्ताने सरकार योजत असलेले उपायही तशाच गतीने पुढे सरकत आहेत.

जेव्हा अशा रोगराईचा महामारीचा फ़ैलाव सुरू होतो, तेव्हा त्यातल्या बाधीतांना आधी उर्वरीत लोकसंख्येपासून वेगळे काढावे लागते. त्यांचा संसर्ग इतरांना होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. दुसरीकडे अशा बाधितांविषयी जनमानसात चुकीचे समज होऊ नयेत, याचीही सावधानता बाळगावी लागते. अन्यथा सामान्य माणसाचे रुपांतर पशूमध्ये व्हायला वेळ लागत नाही. मृत्यूचे भय माणसाला पाशवी मानसिकतेमध्ये घेऊन जाते. समोरचा आपल्या जीवावर उठला आहे किंवा त्याच्यामुळे आपल्याला मरावे लागेल; अशा भितीने मनाचा कब्जा घेतला मग अगोदर समोरच्याला मारून टाकण्याची इच्छा प्रबळ होत जाते. अनेक गावात लोक आता बाहेरून येणार्‍यांना प्रवेशबंदी करू लागले आहेत. रुग्णांची सेवा, उपचार वा नेआण करणार्‍यांनाही रोगबाधीत समजून त्यांचेच आप्त परिचीत टाळू लागले आहेत. आपल्या परिसरात वा वसाहतीमध्ये अशा डॉक्टर्स व अन्य सेवेतील कर्मचार्‍यांना बहिष्कृत करण्याचा अतिरेक होण्यापर्यंत मजल गेली आहे. त्याला पाशवी जाणिवा म्हणतात. तिथे नातीगोतीही दुय्यम होऊन जातात. मग नात्याच्या परिचयाच्या पलिकडल्या लोकांविषयी काय प्रतिक्रीया असू शकते? म्हणून एका बाजूला अशा बाधितांना वेगळे करणे आणि त्यांच्या सेवा उपचारांना संभाळताना त्यांच्या बाबतीत जनमानसात विपरित भावना उदभवू नये, याचीही काळजी घ्यावी लागत असते. त्याचे भान राखले नाही तर उपजत उदभवू शकणार्‍या त्या पाशवी भावनेला चिथावणी दिल्यासारखे परिणाम दिसू शकतात. त्यासाठी आधी परिस्थितीचे गांभिर्य लोकांना समजावणे आणि अधिकाधिक लोकसंख्येला रोगप्रतिबंधक प्रयत्नात सहभागी करून घेण्याला प्राधान्य द्यावे लागते. ते तात्काळ लॉकडाऊन करून शक्य नसते. इतर देशांमध्ये तात्काळ सेनादल वा लष्कराला आणून काम त्यांच्याकडे सोपवल्याचे भीषण परिणाम आपण बघू शकतो आहोत. पण इथे तसे अजून झालेले नाही. सरकारने प्रसंग ओळखून अधिकाधिक लोकसंख्या स्वेच्छेने व समंजसपणे या प्रतिबंधक कारवाईत सहकार्य देण्याची स्थिती निर्माण होण्याला प्राधान्य दिलेले आहे.

हळुहळू पण योग्य पद्धतीने धावपटू मॅराथॉन धावतो, तसेच भारत सरकारने उपाय योजलेले आहेत. कोट्यवधी लोक सैरभैर होणार नाहीत, ह्याची काळजी घेतली गेली आणि जनता कर्फ़्युच्या निमीत्ताने तशी मानसिकता आधी तयार केली. त्यानंतर दोन दिवस लोकांना ते गांभिर्य पचवायला देण्यात आले. त्यानंतरच पंतप्रधानांनी मंगळवारी संपुर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्याचा फ़ायदा असा होता, की निदान अर्धी लोकसंख्या मनाने महिनाभर बंदिस्त रहावे लागणार ह्या सज्जतेत आलेली होती. जनता कर्फ़्युच्या निमीत्ताने किमान ९० टक्के लोकसंख्या स्वेच्छेने त्यात सहभागी झाली आणि जे कोणी १५-२० टक्के लोक बंदिस्त व्हायला राजी नव्हते, त्यांना जागोजागी पोलिस आवरू शकले होते. पण त्यातूनही पोलिसांचा प्रसाद अनुभवलेल्यांना अक्कल आली आणि संपुर्ण लॉकडाऊन अंमलात येण्याच्या कालखंडात बंदोबस्त करावा लागणारी लोकसंख्या फ़ारतर दोनतीन टक्क्यांवर आलेली आहे. तितके काम नागरी शासन यंत्रणेच्या आवाक्यात असल्याच अंदाज सरकारलाही आलेला आहे. १३० कोटी लोकांवर नुसता बडगा उगारायचा किंवा बंदुका रोखायच्या तरी किमान सहासात कोटी सैनिकी प्रशिक्षीत संख्याबळ आवश्यक आहे आणि तितकी आपल्या देशाची क्षमता नाही की सज्जता नाही. सामान्य पोलिसांपासून लष्करी दलांपर्यंत एकत्र केल्यासही एक कोटीपेक्षा अधिक संख्या नसेल. त्यांनी प्रत्येकी शंभर दिडशे लोकांना आवरणे शक्य नाही. त्यामुळेच शक्य तितक्या लोकसंख्येला मानसिक पातळीवर सरकारशी व लॉकडाऊनशी सहकार्याला प्रवृत्त करणे अगत्याचे होते. उलट तितक्या लोकसंख्येवर थेट लॉकडाऊन लादणे म्हणजे गावगल्लीपासून महानगरापर्यंत सरळ दंगल हिंसाचाराला आमंत्रण देणेच ठरले असते. कोरोनाच्या बंदोबस्तामध्ये म्हणूनच ही हळुहळू उलगडणारी उपाययोजना सर्वाधिक निर्णायक ठरलेली आहे. जनतेला आवरण्यापेक्षा तिलाच त्यात सहभागी करून घेण्याचा हा प्रयोग, त्याच कारणास्तव जगभर प्रशंसेला पात्र ठरला आहे.

आणखी एक बाब इथे नमूद केली पाहिजे, किंवा सार्वजनिक चर्चेपासून अलिप्त राहिली आहे. भारत हा एकच देश या कोरोना लढाईत असा उतरला आहे, की त्याने अजून तरी भारतीय सशस्त्र दलांना मैदानात आणलेले नाही. ती यंत्रणा राष्ट्रीय उपाययोजनेपासून दुर ठेवण्यात आलेली आहे. जगभरच्या बातम्या बघितल्या तर बहुतांश पुढारलेले देश व राष्ट्रांनी अल्पावधीतच लॉकडाऊनसाठी थेट लष्कराच्या हाती नागरी व्यवस्था सोपवल्या आहेत. पण इथे भारतात दंगल वा नक्षलींचा बंदोबस्त करायलाही लष्कराला पाचारण करण्याची परंपरा असताना, कोरोना विरोधी लढाईत भारतील सेनादलाचे सर्व विभाग अलिप्त ठेवलेले आहेत. त्यांनाही तात्काळ कशाला कामाला जुंपलेले नाही? अजून कोणा दिडशहाण्याने असा प्रश्न कसा विचारला नाही, याचेही नवल वाटते. काश्मिरात प्रश्न राजकीय आणि नाकर्ते नागरी प्रशासन असल्याने तिथेही लाखो सैनिकांना तैनात करून कारभार चालवावा लागला होता. मग आज देशभर कर्फ़्यु वा लॉकडाऊन होत असताना सेनादलाला पाचारण करण्यात दिरंगाई झालेली आहे का? बिलकुल नाही. ती राखीव सज्जता आहे. जिथे नागरी प्रशासनावरचा ताण वाढत जाईल, तेव्हा आवश्यक तिथे तिथे मदतीला जाणारी राखीव फ़ौज म्हणून त्यांना सज्ज रहायचे आदेश आधीच जारी केलेले आहेत. पण तुर्त सेनादले आपापल्ता छावणीतच आहेत. त्यामागेही परिपुर्ण योजना आहेच. जसा हळुहळू धावताना स्पर्धक अधिकाधिक अंतर तोडण्याचा प्रयत्न करीत आपली उर्जा राखून ठेवतो, त्यापेक्षा ही रणनिती वेगळी नाही. लॉकडाऊन अंमलात आणताना नंतरच्या काळात अधिक गंभीर परिस्थिती होणार आहे आणि आधीच अथक काम करणार्‍या नागरी सेवेतील पोलिस डॉक्टर वगैरे लोक थकून जाणार आहेत. तेव्हा त्यांची जागा घेऊन विना व्यत्यय व्यवस्था कार्यरत राखण्याची जबाबदारी लष्कराला पार पाडावी लागणार आहे. त्यांना आधीपासून थकवून टाकले, तर प्रत्यक्ष गरज भासेल तेव्हा अधिकचे संख्याबळ आणायचे कुठून? त्यासाठीची ती तरतुद आहे. त्याविषयी नंतर चर्चा करू.

24 comments:

  1. अगदी अभ्यासपूर्वक मांडणी.

    ReplyDelete
  2. भाउ विषय सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत मान्डलाय.मुम्बई पुणे नागपूरसारख्या मोठ्या शहरातील दैनन्दिन जीवनातील समस्या सोडवण्यावर भर द्यावा लागेल तर सर्व सहकार्य करतील.व सर्व काही सुरळीत होइल असे सध्याचे चित्र आहे

    ReplyDelete
  3. खरोखरच छान लेख...
    संज्या राऊत ला पण पाठवा..
    बघुया काही सुधारला तर.

    ReplyDelete
  4. भाऊ अशाच आश्वासक व अभ्यासपूर्ण लेखाची वाट पाहत होतो.आपण म्हटल्या प्रमाणे १३० कोटी लोकसंख्या असलेल्या व अवाढव्य पसरलेल्या आपल्या देशात असा मोठा निर्णय फार विचारपूर्वक व काळजी पूर्वक घ्यावा लागतो.पंतप्रधानांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला व त्याचे योग्य परीणाम हळूहळू दिसायला लागतील.पंतप्रधान मोदींनी ही समस्या केवळ भारताची नाही तर जागतिक आहे हे जाणून सार्क सदस्यांच्या प्रमुखांशी त्वरीत बोलणी केली त्याच प्रमाणे आता संध्याकाळी G-20 प्रमुखांशी या समस्येवर बोलणी सुरु आहेत. आज संपूर्ण जग मोदींकडे व भारताकडे आशेने बघत आहे.केवळ भारतानेच परदेशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणले.इतर देशांनी तर आपल्या नागरिकांना वार्यावर सोडले.काल भाजपचे अध्यक्ष श्री.नड्डा यांनी एक कोटी स्वयंसेवकांना गोरगरीबांना शिधा व जेवण पुरवण्यासाठी तयार रहाण्याचे आदेश दिले. आपण 'जनता कर्फ्यु नंतर पुढे काय 'या लेखात म्हटल्या प्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तयार झाला आहे. आजच्या घडीला विरोधी पक्ष ज्यांनी CAA व NRCच्या विरोधात लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले ते आता लोकांना रस्त्यावर येऊ नका घरातच रहा असे आवाहन करायला सोयिस्कर पणे विसरले.विरोधि पक्षांची देशाप्रती काहीच जबाबदारी नाही का?आपल्या कडुन सध्याच्या लाॕक डाउन परिस्थितीवर विरोधी पक्षांच्या भुमिकेवर विचार अपेक्षित आहेत.

    ReplyDelete
  5. भाऊ अशाच आश्वासक व अभ्यासपूर्ण लेखाची वाट पाहत होतो.आपण म्हटल्या प्रमाणे १३० कोटी लोकसंख्या असलेल्या व अवाढव्य पसरलेल्या आपल्या देशात असा मोठा निर्णय फार विचारपूर्वक व काळजी पूर्वक घ्यावा लागतो.पंतप्रधानांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला व त्याचे योग्य परीणाम हळूहळू दिसायला लागतील.पंतप्रधान मोदींनी ही समस्या केवळ भारताची नाही तर जागतिक आहे हे जाणून सार्क सदस्यांच्या प्रमुखांशी त्वरीत बोलणी केली त्याच प्रमाणे आता संध्याकाळी G-20 प्रमुखांशी या समस्येवर बोलणी सुरु आहेत. आज संपूर्ण जग मोदींकडे व भारताकडे आशेने बघत आहे.केवळ भारतानेच परदेशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणले.इतर देशांनी तर आपल्या नागरिकांना वार्यावर सोडले.काल भाजपचे अध्यक्ष श्री.नड्डा यांनी एक कोटी स्वयंसेवकांना गोरगरीबांना शिधा व जेवण पुरवण्यासाठी तयार रहाण्याचे आदेश दिले. आपण 'जनता कर्फ्यु नंतर पुढे काय 'या लेखात म्हटल्या प्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तयार झाला आहे. आजच्या घडीला विरोधी पक्ष ज्यांनी CAA व NRCच्या विरोधात लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले ते आता लोकांना रस्त्यावर येऊ नका घरातच रहा असे आवाहन करायला सोयिस्कर पणे विसरले.विरोधि पक्षांची देशाप्रती काहीच जबाबदारी नाही का?आपल्या कडुन सध्याच्या लाॕक डाउन परिस्थितीवर विरोधी पक्षांच्या भुमिकेवर विचार अपेक्षित आहेत. नमस्कार.

    ReplyDelete
  6. भाऊ अगदी योग्य विश्लेषण

    कालच The Wire चा YouTube वरील दातखाऊ (Teeth Eater) करण थापर आणि JNU अर्थतज्ञ् प्राध्यापिका जयती घोष यांची मुलाखत बघितली. यात मोदी सरकारने २१ दिवसांची जी टाळेबंदी (Lock Down) जाहीर केली आहे त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे.
    कोणतीही व्यक्ती सदासर्वकाळ सर्वांना आनंदी ठेऊ शकत नाही. कोणताही निर्णय घेतांना किंवा राबवितांना काहीतरी उणिवा राहतातच. कोणतीही योजना हि कधीही शत प्रतिशत परिपूर्ण असू शकत नाही. भारतीय शासन किंवा इतर कोणतीही शासन व्यवस्था ही उपलब्ध पर्यायांमधून जास्तीत जास्त लाभदायक आणि कमीत कमी हानिकारक पर्याय निवडत असते. आणि जसे जसे त्यातील उणीव किंवा कमतरता उघड होतात त्याप्रमाणे तात्पुरते उपाय योजले जातात. याचा अर्थ असा नसतो की शासन व्यवस्थेने त्यांना दुर्लक्षित केले आहे, आता जे युद्धापातळीवर करायचे उपाय असतात त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते.
    जर सरकारने टाळेबंदी (Lock Down) जाहीर केले नसते तर याच मंडळींने दुसऱ्या कोणालातरी चर्चेला बोलावून, सरकार कोरोना बाबतीत असंवेदनशील आहे म्हणून सरकारला दोषी धरले असते.

    ज्यांना कोणाला आधी कांजण्या झालेल्या असतात त्यांचा मज्जासंस्थेत varicella-zoster हा विषाणू सुप्तावस्थेत राहतो आणि पुढे कधीतरी जेव्हा Nervous Breakdown होतो तेंव्हा नागीण रुपात परत अवतीर्ण होतो. त्याप्रमाणे ज्यांना ढोंगी पुरोगामीत्वाची आधीच बाधा झालेली आहे, त्यांची २०१४ नंतर हळूहळू Nervous Breakdown कडे वाटचाल सुरु होती आणि २०१९ नंतर त्याने वेग पकडल्यामुळे ढोंगी पुरोगामित्वाचा विषाणू आता जोराने उफाळून आला आहे आणि त्यांची असह्य जळजळ होऊ लागली आहे.

    ReplyDelete
  7. भाऊ ...........फारच छान विश्लेषण !! ही बाजू माझ्यासारख्या सामान्य माणसाला पटकन लक्षात येत नाही. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन ...!! शेवटी तुमचा इतक्या वर्षांचा पत्रकारितेतील अनुभव डोकावतो. असे उलगडत जाणारे विश्लेषण कोठेही वाचावयास मिळत नाही. ....धन्यवाद !!

    ReplyDelete
  8. Very nice Bhau. You are helping our PM in making people understand the greatness of our nation's team under leadership of Modiji in fighting against the CORONA.

    ReplyDelete
  9. मेराथॉन शर्यत हे शिर्षक अगदी योग्य आहे. आज संपूर्ण देशाचा लॉकडाऊन आणि तो इतर देशांपेक्षा लवकर म्हणजे, साथीच्या अगदी सुरवातीलाच करणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. युरोपीय देशांनी उशीर केला तर अमेरिकेने अती उशीर होवून अजून देखील त्या दिशेने काहीही पाऊल उचललेले नाही. लॉकडाऊन झाला म्हणजे आपण रोगावर विजय मिळवला असे बिलकुल नही. खरे तर लॉकडाऊन हा उपाय प्रसार थांबवण्या साठी नव्हे तर साथीच्या प्रसाराचा वेग कमी करण्यासाठी असतो. त्याने एकंदरीत साथीमुळे होणारी जीवहानी कमी होते, साथीच्या उच्चांकाची उंची कमी राहते आणि परीणामी परिस्थिती आटोक्यात राहुन वैद्यकीय/शासकीय यंत्रणेच्या हाताबाहेर जात नाही. लॉकडाऊनच्या 3 आठवड्यानंतर हा रोग राहणार नाही असे बिलकुल नाही. पण हा रोग हळूहळू आटोक्यात येवुन बाकीच्या (Influenza H1N1) रोगां प्रमाणे नेहमीसाठी दरवर्षी हिवाळ्यात हजेरी लावत राहील. जनतेला एकामेकांमध्ये सामाजिक अंतर आणि हातांची स्वच्छता यासारख्या चांगल्या सवयी नेहमीसाठीच अंगवळणी पाडाव्या लागतील. भारताची सनातन विचारसरणी आजच्या आर्थिक फायद्यापेक्षा जनतेच्या जिवाची जास्त काळजी करते हेच यातुन दिसते. या उलट पश्चिमी सभ्यता आजच्या आर्थिक फायद्याला जास्त महत्व देते आणि त्यासाठी जास्त जीवहानी झाली तरीही चालेल अश्या विचारसारणीचा अवलंब करतांना दिसते.

    ReplyDelete
  10. भाऊ अगदी मनातले बोललात मोदींना गांधी नक्की कळला आहे हाच मंत्र गांधी वापराचे ज्यांनी प्रशासनात काम केले आहे तेच समजु शकतात

    ReplyDelete
  11. मला वाटत सेनादलाला मैदानात आणण्याची गरजच पडणार नाही. कारण तो पर्यंत नागरिक सरावलेले तरी राहतील किंवा थकलेले तरी राहतील.
    सैन्यदला कडून वेगळ काम करुन घ्यायचय् मोदींना.

    ReplyDelete
  12. भाऊ सध्या सगळीकडे कोरोना हा चीनने जगाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी मुद्दाम पसरवला आहे असे मेसेज फिरत आहे, त्याबद्दल आपल्याला काय वाटते.

    ReplyDelete
  13. भाऊ अतिशय छान विश्लेषण केले आहे. आपण कोरोनाव्हायरसच्या प्रसारामागे चीनचे काही आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे का यावर अनेक लेख सोशल मीडियावर येत आहेत... तरी आपणही यावर प्रकाश टाकावा, ही विनंती...

    ReplyDelete
  14. संयम हा कधीही चांगलाच असतो.

    ReplyDelete
  15. श्रीकांतApril 10, 2020 at 4:49 AM

    छान लेख!!!

    ReplyDelete