आज मध्य्ररात्री लॉकडाऊनला महिना पुर्ण होईल. गेल्या म्हणजे मार्च महिन्याच्या २४ तारखेला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच मध्यरात्रीपासून २१ दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे देशभरात खळबळ माजली होती आणि ते स्वाभाविकच होते. लोकांना बंद वा हरताळाची सवय असली तरी तो काही तास वा मर्यादित भागापुरता विषय असतो. इथे सलग २१ दिवस म्हणजे तीन आठवडे घरातच बसायचे आणि घराबाहेर पडायलाही प्रतिबंध होता. त्यामुळे १३० कोटी लोकांना सक्तीने घरात बसवणे अशक्य गोष्ट होती आणि त्यासाठी सक्ती तर शक्य कोटीतली गोष्ट होती. पण ती झाली नेहमीच्या जीवनातील वस्तुस्थिती. कोरोनाने जगावर जे संकट ओढवले आहे, त्याचे जगावर होणारे परिणाम बघणार्या कुठल्या अडाणी माणसालाही अशा स्थितीत स्वत:ला बंदिस्त करून घेण्यातली सुरक्षा सहज कळते. ती माणसाची किंवा कुठल्याही सजीवाची उपजत जाणिव असते. पण ज्यांच्या त्याच जाणिवा बोथटलेल्या असतात, तेवढ्याच मुठभरांना त्याची जाणिव होऊ शकत नसते आणि असे लोकच नसत्या शंका काढत असतात. म्हणूनच पंतप्रधान आपल्याला कसले आवाहन करीत आहेत आणि त्यात सक्ती नसून कर्तव्याची अपेक्षा आहे, याचे भान बहुतांश भारतीयांना होते. आता महिना उलटून गेल्यावर जगाकडून मोदींची पाठ थोपटली जाते आहे, त्याचा खरा मानकरी असाच सामान्य भारतीय नागरिक आहे. कारण नुसती सक्ती, कायदा वा प्रशासनाच्या बळावर हा लॉकडाऊन यशस्वी होऊ शकला नसता. मोदींनी त्याला जन आंदोलन बनवले आणि त्यात सामान्य माणसाला सहभागी करून घेतले. त्यामुळे हे यश मिळाले आहे. पण ज्यांना ते अशक्य वाटले वा अनाठाय़ी वाटले त्यांचे काय? त्यांचा तर भारतीय जनतेने पुरता भ्रमनिरास करून टाकला ना? त्यांना यातही मोदींच्या अपयशाची अपेक्षा होती. पण भारतीयांनी ती पुर्ण केली नाही.
हीच तर खरी राजकीय गंमत आहे. जे लोक आपल्या व्यक्तीगत जगण्याचे, सुरक्षेचेही भान विसरून राजकारणात आकंठ बुडालेले आहेत, त्यांना मोदींचे अपयश म्हणजे आपलेही मरण असल्याचीही साधी गोष्ट लक्षात येऊ शकत नाही. म्हणूनच त्यांना अशाही संकटकाळात कोरोना विरोधातल्या लढाईत सरकार सोबत रहाण्यापेक्षा त्यातल्या उणिवा काढून वा त्यालाही अपशकून करण्यातच धन्यता वाटत असते. म्हणूनच लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी तक्रारी सुरू झाल्या आणि त्याही खर्या अडकलेल्या मजूर वा गरजूंच्या नव्हत्या. तर आपल्या वातानुकुलीत दालने वा केबिनमध्ये बसून जगाचे चिंतन करणार्या शहाण्यांच्या तक्रारी होत्या. रोजगार नाही, रहायला घर नाही, सोशल डिस्टंस पाळायला रहाती जागा सुसज्ज नाही; असल्या शेकडो तक्रारी करणारे झाडून आलिशान घरात रहाणारेच असावेत, हे म्हणूनच नवलाचे नव्हते. त्यांच्या मते महिन्याभरात कोरोनापेक्षाही उपासमारीने काहॊ लाख तरी लोक मरतील अशी अपेक्षा होती. रोजंदारीवर जगणारे, झोपडीत जीवन कंठणारे, गरीब लोक हा अशा दिवाणखान्यात चिंतन करणार्यांचा आवडता शब्द आहे. पण प्रत्यक्षात झोपडी काय असते वा उपाशी पोटी झोपणे म्हणजे काय, त्याचाही थांगपत्ता त्यांना कधीच लागलेला नाही. त्यांना आकडे ठाऊक असतात. ते कागदावरचे आकडे म्हणजेच त्यांचे जग असते आणि खरेखुरे जग बघितले तरी भूत भूत म्हणून पळण्याइतकी त्यांची घाबरगुंडी उडत असते. आज भारतीयांच्या वागण्याने तेच भूत त्यांना घाबरवून सोडते आहे. त्याच भारतीयांनी ह्या अतिशहाण्यांचा पुरता भ्रमनिरास करून टाकला आहे. कारण त्यांच्या लाडक्या अमेरिकेत हजारोने लोक किडामुंगीसारखे मरण पावले आहेत आणि अर्धपोटी जगणारे भारतातले गरीब अजून शाबूत सुरक्षित आहेत. किंबहूना आणखी दोनतीन आठवडे लॉकडाऊन वाढवला तरी ते गरीबही त्यात सहकार्य द्यायला राजी आहेत. मात्र जगबुडीची भविष्यवाणी करणार्यांचे तोंडे पुरती आंबट झालेली आहेत. सी व्होटरच्या चाचणीने त्याचा कौल दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटना असो किंवा जगभरचे पुढारलेले देश असोत, त्यांच्याकडून भारताच्या अपाट लोकसंख्या व गरीब लोकांनी पाळून दाखवलेला लॉकडाऊन कौतुकाच विषय झाला आहे. अपुर्या आरोग्य व्यवस्था व सुविधा देखील कोरोनाला रोखू शकतात आणि केवळ लॉकडाऊनमुळे रोखता येते, हा प्रयोग भारताने यशस्वी करून दाखवला आहे. अवघे जग आरोग्य सुविधा वाढवित होते आणि आपली साधने नव्या औषधाच्या संशोधनाला खर्च करत होते. तेव्हा भारताने फ़क्त लॉकडाऊन व गरजूंना कोठारे उघडी करून जगवण्याचा उपाय योजत कोरोना रोखून दाखवला आहे. तब्बल एक महिना उलटून गेल्यावरही भारताचा रुग्णांचा आकडा पचवीस हजाराच्या आत रोखलेला आहे आणि मृतांचा आकडा अजून हजारपर्यंत जाऊ शकलेला नाही. मग महिनाभरात नुसत्या उपासमारीने लाखो लोक मरण्याच्या भाकिताचे काय झाले? अशाच एका विद्वानाने इथून अमेरिकेतील लॉस एन्जलीसच्या दैनिकात तसे भाकित केले होते आणि त्याला दुजोरा देणारे इथलेही काही माध्यमवीर होतेच. अशा अडकून पडलेल्यांना धीर देण्यासाठी मोदींनी टाळ्या थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. एके दिवशी घरातले दिवे मालवून पणत्या दिवे लावण्याने उभारी आणण्याचा प्रयास केला, त्याची टिंगल करण्यात असे शहाणे गर्क होते. टाळ्या वाजवून कोरोना पळाला का? असे सवाल कोण विचारत होते आठवते? घरातले दिवे मालवले तर वीज उत्पादन केंद्राचा बोजवारा उडेल म्हणून भिती कोण घालत होते, विसरलात? मित्रांनो आपण कोरोनाला सहज हरवू शकतो. त्याच्यापेक्षाही घातक असे हे नैराश्याचे विषाणू असतात. या महिन्याभरात त्यांनाच आपण पळवून लावले किंवा पराभूत केले आहे. ती मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. कोट्यवधी सामान्य लोकांच्या सामुहिक इच्छेतले ते बळ आहे. आज महिना उलटला असताना आपण म्हणून इतकी मजल मारू शकलो आहोत.
महिन्यापुर्वी मी तितक्याच आत्मविश्वासाने म्हणून लिहीले होते, ‘मुश्किल है के हदसे हट जाये’. ते निव्वळ सिनेमा गी्त नव्हते. भारतीयांच्या मनातली ती सुप्त इच्छा होती आणि त्यावर माझा कुठल्याही सुविधा वा इस्पितळापेक्षा अधिक विश्वास आहे. माझाच कशाला देशाच्या पंतप्रधानाचाही विश्वास आहे. म्हणूनच आपण पहिल्या टप्प्यामध्ये निराशेचे विषाणू मारून टाकले आहेत. जे हिंमत खच्ची करतात तेही विषाणूच असतात. कोरोनाचे भाईबंद तेच असतात. कोरोना तरी काय वेगळे करतो? तो रोगप्रतिकारक शक्ती व झुंजण्याची शक्ती खच्ची करतो. नैराश्याचे विषाणू आपण खोटे पाडले, तर कोरोनाची काय बिशाद आहे? नुकत्याच एका मतचाचणीत ९३ टक्के नागरिकांनी मोदी व लॉकडाऊनला पाठींबा दिला. एक महिना उलटून गेल्यावरही आणखी लढायची त्रास सोसूनही झुंजायची ही इच्छाशक्ती बघितली मग दत्ताजी शिंदे आठवतो मित्रांनो. मृत्यूच्या अखेरच्या क्षणात जायबंदी होऊन पडलेल्या दत्ताजीला शत्रूचा सेनापती खिजवायला विचारतो अब क्या करोगे? तो मराठा लढवय्या उरलासुरला प्राण जिभेवर आणून उच्चारतो, बचेंगे तो और भी लडेंगे. बाकीच्या भारताची गोष्ट बाजूला ठेवा. आपण मराठे व मराठी अस्मितेचे उपजत वारस आहोत. त्या दत्ताजी शिंदेचे आपण वंशज आहोत, त्याच्यापुढे कोरोनाचा टिकाव कसा लागेल? अजून आपण तर सुखरूप आहोत आणि कोट्यवधीच्या संख्येने सुखरूप आहोत. लढणे तर आपल्या रक्तात आहे आणि जगण्यातच आहे. चिंता लढण्याच्या इच्छेची नाही तर नैराश्याच्या गोष्टी सांगून आपले मनोधैर्य खच्ची करणार्यांची वाटते. नियतीनेच त्यांना खोटे पाडले आहे. त्यांच्या तोंडाला काळे फ़ासले आहे. पाश्चात्यांच्या पैशावर बुद्धी विकून बसलेल्यांच्या कसल्याही विकृत भविष्यवाणीला खोटे पाडण्याच्या आपल्या सामान्य नागरिकांच्या हिंमतीला दाद देण्याचा आज दिवस आहे. लॉकडाऊन यशस्वी करणार्या प्रत्येक भारतीयाला मनापासून सलाम.
💯✔️👍🙏 Right Sir 💯✔️👍🙏🌹
ReplyDeleteहोय भाऊ हे सतत तोंडावर पडतात ; तो NDTV वाला रविश म्हणाला होता कोणत्या भारतीयानी आता रामायणाची मागणी केलीय ? भारताला आता रामायणापेक्षा भाकरीची गरज आहे.....पण जनतेने रामायण मालिकेला असा प्रतिसाद दिलाय कि हा सपशेल तोंडावर पडला...पण बेशर्म डावे हिंदुच्या प्रत्येक गोष्टी ला विरोध करणारच...
ReplyDeleteNDTV chi pan garaj nahi. Ya pudhe janta DD news Baghel. Ha ravish Kumar and gang he kutre ahet.
DeleteNDTV is rapidly being irrelevant. We should boycott is in a very strict manner.
Deleteआमचा मोदींवर विस्वास आहे आणि त्यांच्या देशभक्ती वर पण. तेवधीच खात्री काँग्रेस आणि कुमिनिस्त हे देशद्रोही आहेत या वर आहे. सुंदर लेख भाऊ.
ReplyDeleteSalute to People of India (POI), GOI, and to you Bhau. Very well written.
ReplyDeleteनिखळ सत्य
ReplyDeleteआमच्या मनातलं लिहिलंय
तुमच्या लेखणीला त्रिवार वंदन
विरोध करणारे असतील अनेक पण तूमची पाठ
राखण करणारी प्रजा अमाप आहे
्
नेहमीप्रमाणेच on dot.
ReplyDeleteKharokhar modijinche kautuk karave yevdhe those ahe .130 cr bhartiyana gharat basavne hi sopi gosht navti.Bil gatesv pan modijinche kautuk karatat tyanchya asamanya kartutvala mamacha mujra.ani daha varsha modiji pm rahilech Ani honarch tyabaddal Shanka nahi.(je modijinchya kamachi tingle kartat tyanchya chuka kadhtat) ashya lokanchya tondala kale phasle jail.ani nahi zale election ter coronamule zalele nuksan bharun nighel.ani modiji pm rahatil .Bola Juana modincha abhiman ahe Bharat Mata ki Jai.
ReplyDeleteश्री भाऊ मनाला उभारी देणारा लेख, ही वेळच अशी आहे आपण सगळ्यांनी लढ्यायच आहे मनःपूर्वक धन्यवाद
ReplyDeleteसामान्य भारतीयांच्या ह्या विजिगिषु वृत्तीला आणि तुमच्या सच्च्या पत्रकारितेला मानाचा मुजरा!
ReplyDeleteलढाई अजून संपली नाही, 1 महिना लॉक डाउन आहे म्हटल्यावर रुग्ण संख्या 10 हजार च्या आतच असायला हवी होती, 25 हजार म्हणजे अपेक्षेपेक्षा 3 पट जास्त झाले रुग्ण. इथून पुढे अधिक काळजी घ्यायला हवी
ReplyDeleteमाझी एक आयडिया अशी आहे की शहर आणि गाव पातळीवर मागच्या निवडणुकीत जे पहिल्या 3 क्रमांकावर मते घेऊन होते त्या 3 लोकांना त्या प्रत्येक वॉर्ड मधील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांच्या मदतीने होम डिलिव्हरी ची सोय करावी, अन्यथा त्यांना इथून पुढील कोणत्याही निवडणुकीत उभे राहायला परवानगी देऊ नये. ह्या लोकांना आमदार आणि खासदार यांच्याकडे रिपोर्ट करायला सांगावे. आमदार खासदार आणि प्रशासन यांनी त्यांना मदत करावी. जे जिल्हे राज्य लवकर कोरोना मुक्त होतील त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस द्यावे.
ReplyDeleteभाऊ, अतिशय उत्तम विचार. lockdown जनतेने पाळला पण प्रशासनाने नाही, याचे उत्तम उदाहरण मुंबई, पुणे. छोट्या शहरात, गावात, तालुका ठिकाणी lockdown प्राण पणाने पाळला गेला. पण मुंबई, पुणे, ठाणे, पालघर,वसई, विरार, बोईसर, तारापूर, इत्यादी ठिकाणी पैसे देऊन खूप कंपन्या चालू आहेत, या तील 2% कंपन्या जीवन आवश्यक product बनवतात पण बाकीच्या कंपन्या वेगवेळ्या मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी,इत्यादी लोकांना लाच देऊन चालू आहेत. आणि याच एरियातून corona infection जोरात आहे. आकडे लपवले जातायत. 3 तारखे पर्यंत आकडे खुप खाली दाखवून, लोकांना त्यांच्या नशिबावर सोडून, महसूल गोळा करण्यासाठी आणि कंपनी मालकांचा profit चालण्यासाठी सर्व चालू होणार आहे. सामान्य जनतेनी आपली काळजी आपणच घ्यावी. प्रशासन आपल्या बरोबर असणार नाही. सरकार आणि सरकारी यंत्रणा, महसूल आणि स्वतःचा गल्ला यातच मश्गुल असणार आहे.
ReplyDeleteदत्ताजी शिंदे रणामाजी विद्ध
ReplyDeleteतरी युद्ध खेळावया साठी सिद्ध
अब्दाली म्हणता करिशी का युद्ध
बचेंगे तो और भी लढेंगे म्हणाला
मराठा म्हणावे अशा वाघराला
- गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी
एक धारकरी
Jai Hind Jai Maharashtra
Deleteभाऊ,
ReplyDeleteमनापासून धन्यवाद! प्रत्येक भारतीयाच्या मनातील भावना व्यक्त केलीत. मा.मोदीजींवर पूर्ण विश्वास आहे.
इकॉनॉमी आणि मानवता,
ReplyDelete#लॉकडाउन#
अमेरिकेने इकॉनॉमी ला महत्व दिले,
भारताने मानवतेला।।
इकॉनॉमी आणि मानवता,
ReplyDelete#लॉकडाउन#
अमेरिकेने इकॉनॉमी ला महत्व दिले,
भारताने मानवतेला।।
भाऊ, खूप छान लेख..!
ReplyDeleteअकबर बिरबलाच्या एका गोष्टीमध्ये एकजण रात्रभर थंडीमध्ये कुडकुडत एका तलावात उभा राहतो, जगतो. तेव्हा त्याला जगण्याची उमेद, ऊर्जा देणारी गोष्ट तलावाजवळील एक मशाल असते.
तो माणूस म्हणजे आपली 130 कोटी भारतीय जनता आणि ती मशाल, ऊर्जा म्हणजे मोदीजी आणि त्यांच्यासारखे सकारात्मक बोलणारे लोक.
भाऊ, बहुसंख्य म्हणजे ९०% सामान्य भारतीयांच्या मनातले बोललात. उरलेले १०% तेच नैराश्यवादी, मोदींच्या आणि भारतीय जनतेच्या बाबातीत कायम तोंडावर आपटणारे.
ReplyDeleteArticle is full of Hope . Thank you !
ReplyDeleteभाऊ उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीच्या निमित्ताने होत असलेल्या वादाचे घटनात्मक पेचप्रसंगाबद्दल लिहा.
ReplyDelete१)करोना हे चीनचे हिटलरची आक्रमण आहे. मोदींनी लौकर व मोठे निर्णय घेतले नसते, तर आतापर्यंत भयानक झाले असते. २)हे जागतिक आक्रमण व त्यांचे परिणाम यावर आपण कृपया लिहावे ही विनंती
ReplyDelete