पत्रकारिता आणि राजकारण हे दोन भिन्न प्रांत आहेत. पत्रकारिता करताना जे समाजाला हितावह व उपकारक आहे, ते बेधडक लिहिण्याची व बोलण्याची मोकळीक असते. कारण त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नसतात. तुमची मते लोकांना आवडणारी नसली तरी फ़रक पडत नाही. त्यामुळे नावडते बोलायची मुभा असते. फ़ार तर ठराविक वाचक तुमच्यावर बहिष्कार घालू शकतो. पण राजकारणात सत्य कितीही हितावह वा उपकारक असले तरी ते राजरोस बोलण्याची मुभा नसते. त्यासाठी खुप आडवळणे घेऊन सत्यकथन करावे लागत असते. विशेषत: जे बहुतांश लोकांना नावडते सत्य असते, ते बोलण्याची सोयच नसते. म्हणूनच त्याला ‘पोलिटीकली करेक्ट’ अशी एक शब्दावली वापरली जात असते. ते सत्य किंवा योग्य नसते, पण बहुतांश लोकांच्या पचनी पडणारे असल्याने तसे बोलणे भाग असते. किंवा मग राजकारणात वावरणार्यांना तसे विषय टाळावे लागत असतात. हल्ली आपण माध्यमातून अनेकजण तसे बोलताना लिहीताना ऐकत वाचत असतो. पण जे राजकारणात मुरलेले असतात, ते अशाही परिस्थितीत नावडते सत्य बोलण्याची हिंमत करू शकतात. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना असे धडे कोणी दिलेले नाहीत काय? अन्यथा त्यांनी लॉकडाऊन वा कोरोनाच्या कालखंडात लोकांचा रोष ओढवून घेणारे विधान वा वक्तव्य कशाला केले असते? देशाची अर्थव्यवस्था व एकूण कारभाराची डागडुजी करण्यासाठी देशाच्या विविध मंदिरात वा धर्मसंस्थांपाशी असलेले अब्जावधी रुपये किंमतीचे सोने सरकारने ताब्यात घ्यावे. किमान व्याजावर सक्तीने घ्यावे, अशी मुक्ताफ़ळे त्यांनी का उधळली असती? असे काही बोलताना त्यांनी निदान आपले नाव तरी लक्षात घ्यायला हवे होते आणि त्या नावाचा इतिहास आठवायला हवा होता? की आयडीया ऑफ़ इंडियात वावरताना पृथ्वीराज नावातला इतिहासही विसरला गेला आहे?
२०१४ साली कॉग्रेसचा दारूण पराभव करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले व प्रथमच भाजपाला लोकसभेत स्पष्ट एकपक्षीय बहूमत मिळालेले होते. तेव्हा बहुधा विश्व हिंदू परिषदेने नेते अशोक सिंघल यांनी केलेले एक विधान आठवते. ते म्हणाले होते, बारा-तेराशे वर्षानंतर दिल्लीच्या सत्तेवर हिंदू राजा स्थानापन्न झाला आहे. त्यातून सिंघल काय सांगत वा सुचवू पहात होते? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बहुतांश पंतप्रधान निदान नावावरून तरी हिंदूच असल्याची नोंद आहे. मग पहिला हिंदू राजा वा राष्ट्रप्रमुख अशी मोदींची कहाणी सिंघल कशाला सांगतात? तर तितक्या शतकांत दिल्लीच्या सिंहासनावर विविध सत्ताधीश आरुढ झाले असले तरी ते स्वत:ला हिंदू राजा मानत नव्हते किंवा भिन्न धर्माचे राज्यकर्ते होते. स्वातंत्र्योत्तर काळातले पंतप्रधान व्यक्तीगत धर्माने हिंदू असले तरी ते हिंदू राजा म्हणून मिरवत नव्हते आणि नरेंद्र मोदी आपण हिंदू असल्याचे जगाला अभिमानाने सांगतात. परंतु इतकाच त्याचा संदर्भ होता काय? बिलकुल नाही. जे कोणी हिंदूत्ववादी असतात व आहेत, त्यांच्या भूमिकेनुसार महंमद घोरीने दिल्लीची सत्ता काबीज केल्यापासून खंडप्राय भारतावर परक्यांचे राज्य राहिलेले आहे. तेव्हा पराभूत झालेला वा मारला गेलेला पृथ्वीराज चौहान हा शेवटचा हिंदू राजा होता. त्यामुळेच अभिमानाने आपल्या हिंदूत्वाचा डंका पिटणारा नरेंद्र मोदी हा एकविसाव्या शतकातला हिंदू राज्यकर्ता अवतरला आहे, अशीच धारणा हिंदू धर्माभिमानी लोकांच्या मनातली आहे. त्याचे कारण एकच आहे. आपलीच जन्मभूमी व मातृभूमी असून नेहमी आपल्याच धर्माला अन्याय सहन करावा लागतो, अशी बहुतांश लोकांची धारणा आहे. त्याला चुचकारतच हिंदूत्वाचे राजकारण पुढे आले आहे आणि त्याला अलिकडल्या काळात बहुसंख्य मतदाराकडून प्रतिसाद मिळत असतो. सहाजिकच त्या धारणेला दुखावण्यातून निदान मते गमावली जात असतात, हे नावाने पृथ्वीराज चव्हाण असलेल्या नेत्याला वेगळे समजावण्याची गरज आहे काय?
कुठल्याही भूमीशी निगडित समाजाच्या आठवणी दिर्घकालीन असतात आणि पिढीजात जपलेल्या जोपासलेल्या असतात. तशीच ही एक अंतर्मनात जपली गेलेली धारणा आहे आणि तिला लाथाडून कोणाला निदान लोकमतावर सत्ता संपादन करणे अशक्य आहे. किंबहूना भाजपा वा नरेंद्र मोदी तीच धारणा चुचकारत इथपर्यंत पोहोचले आहेत. मग अशा काळात त्याच लोकभावनेला दुखावणे म्हणजे लोकमताला सतत लाथाडत रहाणे असते. त्या पद्धतीने पुन्हा कोणीही नेता वा पक्ष सत्तेपर्यंत पोहोचणे अशक्य आहे. हा संदर्भ घेतला, मग पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य कसे राजकीय दृष्टीने त्यांच्याच पक्षाला हानिकारक आहे, ते लक्षात येऊ शकेल. आपल्या या सुपुत्राचे पृथ्वीराज नाव त्यांच्या जन्मदात्यांनी ठेवण्यामागेही वेगळा इतिहास नाही. एक पराक्रमी राजा म्हणूनच जन्मदाते अशी नावे आपल्या संततीला ठेवत असतात. चव्हांणांना त्याचा अंदाजही नाही काय? असेल तर त्यांना आणखी एक इतिहास अशाच मंदिरांच्या संपत्तीचा ठाऊक असायला हरकत नाही. भारतीय इतिहासामध्ये महंमद घोरी जसा सामुहिक मानसिकतेत दबा धरून बसलेला असतो, तसाच गझनीचा महंमदही ठाण मांडून बसला आहे. अन्यथा भारताचा सतत द्वेष करणार्या पाकिस्तानने आपल्या क्षेपणास्त्राचे नाव ‘घोरी मिसाईल’ असे कशाला ठेवले असते? त्याची पुर्वकहाणी तीच आहे. तशीच मंदिरातले सोनेनाणे हा विषय नुसता आर्थिक नाही, त्याच्याशी गझनी महंमदाचा इतिहास जोडलेला आहे. म्हणूनच अशा विषयाला हात घालताना अर्थकारण निरूपयोगी असते आणि इतिहास व त्याच्याशी जोडलेल्या भावना अधिक मोलाच्या असतात. गुजरातमध्ये असलेले सोमनाथाचे मंदिर याच गझनीच्या महंमदाने सतरा वेळा लुटले असा इतिहास आहे. त्याने प्रत्येक स्वारीत हे मंदिर लुटले व तिथली देवतेची मुर्ती फ़ोडून उध्वस्त केली. ही गोष्ट दंतकथा नाही. तेव्हा मंदिरातील सोन्याचा विषय काढताना त्याचे जनमानसावर होणारे परिणाम विचारात घ्यावे लागतात. निदान लोकशाहीच्या राजकारणात त्याला प्राधान्य असते.
स्वातंत्र्योत्तर काळात सातत्याने पुढल्या पिढ्यांना सेक्युलर बनवण्यासाठी ह्या इतिहासात फ़ेरफ़ार आणि हेराफ़ेरी करण्यात आलेली आहे. इतिहासाच्या नोंदी व वस्तुस्थितीही सेक्युलर करण्याला पर्याय उरत नाही. गझनीच्या महंमदाने सोमनाथाचे मंदिर लुटले, त्यावर हल्ला केला व मुर्ती फ़ोडल्याचे नाकारता येणार नव्हते. सहाजिकच त्यातल्या धार्मिक वेदना व रोष कमी करण्यासाठी त्याने धर्माचा विरोध म्हणून सोमनाथाची मुर्ती फ़ोडली नाही असा प्रचारी इतिहास मांडला जाऊ लागला. म्हणजे मंदिरावरचा हल्ला वा मुर्ति फ़ोडल्याचा इतिहास वा नोंदी सेक्युलर इतिहासात कायम आहेत. पण त्यातला धार्मिक उद्देश वा हेतू लपवण्यासाठी कसरत करण्यात आलेली आहे. ती कसरत काय आहे? महंमदाने हिंदूंच्या धर्मभावनांना पायदळी तुडवण्यासाठी सोमनाथाची मुर्ति सतरा वेळा फ़ोडली हे सत्य लपवताना ती मुर्ती सोन्यारुप्याची असल्याने लूट म्हणून फ़ोडल्याचा दावा करण्यात आला. पर्यायाने मंदिरातील संपत्ती लुटण्याचा त्याचा उद्देश होता आणि त्याच्या आक्रमण वा स्वारीमागे कुठलाही धार्मिक हेतू नसल्याचे सांगितले गेले. आज तेही सत्य मानले तर स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षांनी पृथ्वीराज नामे कॉग्रेस नेता कसली ‘मोहिम’ हाती घ्यायचे बोलतो आहे? मंदिरातले सोने सरकारने सक्ती करून घेणे व गझनीच्या महंमदाने सोमनाथाची मुर्ति सोन्यासाठी फ़ोडण्यात नेमका काय फ़रक आहे? आपले हे वक्तव्य सामान्य भारतीय हिंदूच्या मनात गझनीच्या आठवणी जागृत करील, इतकेही या माजी मुख्यमंत्र्याला समजू शकत नाही काय? आधीच कॉग्रेस पक्षाची प्रतिमा हिंदूंचा शत्रू अशी झालेली आहे. संपुर्ण उत्तर भारतात कॉग्रेस पक्षाची निवडणूकीत धुळधाण उडालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर कॉग्रेसच्या पृथ्वीराजाने मंदिरातील सोने सक्तीने ताब्यात घेण्याविषयी बोलणे, म्हणजे बुडत्याचा पाय खोलात घेऊन जाणेच नाही काय?
राहुल गांधी यांनी गेल्या दोन लोकसभा निवडणूकीत पक्षाची व घराण्याची आजवरची सर्व पुण्याई मातीत घातली आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी दोन वर्षापुर्वी त्यांना अनेक मंदिरांच्या पायर्या झिजवाव्या लागल्या आहेत. त्यात त्याच सोमनाथ मंदिराचाही समावेश आहे. तरीही अजून कॉग्रेस पक्ष मतांच्या बाबतीत गेलेला तोल सावरू शकलेला नाही. पण इतके होऊनही जो काही थोडा मतदार कॉग्रेसपाशी शिल्लक उरला आहे, त्यातला बहुतांश हिंदूच मतदार आहे आणि त्यालाही पक्षापासून पळवून लावण्याची सुपारी पृथ्वीराज चव्हाणांनी घेतलेली आहे काय? कारण मंदिरातले सोने वा दागदागिने फ़क्त सराफ़ा बाजारातील मूल्यवान धातू नसतात. घरातले सोने वा हिरेमोती विकावू असतात. मंदिरातले भक्तांनी देवाला अर्पण केलेले सोने दागिने अमूल्य असतात. त्याच्याकडे बाजारू दृष्टीने बघणारा माणूस भक्त श्रद्धाळूंच्या भावना तुडवित असतो. अकारण त्या लाखो करोडो लोकांच्या रोषाला पात्र होत असतो. इतकेही या कॉग्रेस नेत्याला समजू शकत नाही काय? इथे तर नुसती मंदिरातील संपत्ती म्हणजे भक्तांचा ठेवा नाही, तर इतिहासाची सुप्त जखम आहे. ती नव्या पिढीच्या विस्मरणात गेलेली असेल तर पृथ्वीराज त्या जखमेवरची यातून खपलीच काढत असतात ना? कारण चव्हाणांच्या असल्या बोचर्या विधानांनी लोकांच्या मनातचा प्रक्षोभ होतो. त्यांच्याकडून दिल्लीच्या त्या पृथ्वीराजाचा अपमानास्पद अंत आणि गझनीच्या सोमनाथ लुटमारीला उजाळा दिला जाणे स्वाभाविक आहे. हे एकविसाव्या शतकातील पृथ्वीराज चव्हाणांना कळत नसेल तर ते लोकशाहीत राजकारण करायला अपात्र आहेत. कारण त्यांनी अशा एका वक्तव्यातून काही लाख वा कोटी हिंदूंची मते पक्षाच्या खात्यातून गमावली आहेत. त्याची नेमकी काय गरज होती, त्याचाही उलगडा होत नाही. त्यांचा पक्ष सत्तेत नाही आणि देशाच्या अर्थकारणासाठी कसा व कुठून पैसा उभारावा, ही त्यांची पक्षीय विवंचनाही असू शकत नाही. मग अशी वक्तव्ये कशासाठी? फ़क्त हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी? बहुसंख्य हिंदूंना विचलीत करण्यासाठी?
Aadhi hya sarv Rajkarani lokani aaplya gharatil sone sarkarla vyajane dyave. Nantar hya sarv political partiesni electoral bond madhun je 6,108 koti jama kele aahet te sarkarla dyavet.
ReplyDeleteMandirat bhaktani aaplya ichhene je paise; sone dile aahe tyachyavar sarkarcha kadimatra hakka nahi.
He sarv Maharashtramadhye aani Mumbaimadhil ji Corona paristhiti aavarnyat apayash aale aahe tithun lokanche laksh divert karnyasathi chalu aahe.
Very good Sir 🙏👍🙂🌹☑️✍️🙏 these secular, people are more dengerous then that Gajani and Ghori, 💯☑️🙏👍😠🌹✍️✔️
ReplyDeleteअगदी बरोबर.
DeleteNamskar sir, m Advocate Anesh paralkar.. Bomby Highcourt..mahim..varun..sampurna itihas ulgdlatal tumhi..itihastun jo shikat nahi..itihas aani ishvar tyala kadhicj kshama karanar nahi..
DeleteCongress leaders are creating problems for them self.Congress is always fur getting that they are not ruling party.Mrs.Sonia Gandhi has written letter to PM asking to do so and so things as if like Mr.Manmohan Singh PM is going to take action.Congress attitude is they are born for ruling and what’s wear they will say it final.
ReplyDeleteह्या तथाकथित सेल्युलर पक्षाचे पुढारी इतर धर्माच्या श्रद्धास्थानां कडून सोने आणि इतर संपत्ती ताब्यात घ्यावी असे का म्हणत नाहीत? आणि म्हणूनच हिंदू समाज हा हळूहळू भाजप पक्षा कडे झुकत आहे. मवाळ आणि सर्वसमावेशक हिंदू समाजाला कट्टरपणा कडे अशा ढोंगी पक्षांनीच वळवले आहे.
ReplyDeleteहिन्दु मवाळ आहेत असे वाटत असेल तर heroic hindu resistance to muslim invasion वाचाच. मी बरं कि माझं भलं ह्या वृत्तीनेच आपला घात केलाय . म्हणुन आज गरज आहे ती हिंदुनी एकत्र यायची . कारण कॉग्रेस , एन् सी पी हे एका विशिष्ट धर्माच्या लोकांच तुष्टीकरण करणारे आहेत हे आपल्याला स्वातंत्र्यपुर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात बघायला मिळतंय . हिंदु एकत्र राहिलेत तरच आपला निभाव लागण शक्य आहे . जय हिंद
Deleteबुडत्याचा पाय खोलात..
ReplyDeleteभाऊ, मला वाटतंय हिंदू देवळांच्या मालकी विषयी जे संसदेत private बिल श्री सत्यपाल सिंह यांनी ठेवले त्याला विरोध म्हणुन वरील भूमिका असावी.
ReplyDeleteभाऊ तुम्ही जो पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील जो तुम्ही फरक सांगितला आहे तो खरंच एकदम बरोबर आहे पण सध्या पत्रकार हे राजकारणी असल्यासारखे बोलत आहेत आणि राजकारणी पत्रकार असल्या सारखे...
ReplyDeleteतुम्ही म्हणालात त्या प्रमाणे जरी पत्रकाराला समाजाला हितावह आणि अपायकारक बोलता आणि लिहिता येते तर मग पत्रकार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला किंवा हल्ला झाला तर मग आम्हाला संरक्षण मिळाले पाहिजे असे का म्हणतात?? ( हल्ल्याचा निषेधच आहे) पण मग 'पत्रकार' म्हणून पत्रकार viktim card का दाखवतात???पत्रकार म्हणून कर तुम्हाला समाजाला अपायकारक लिहायचे असेल तर मग परिणाम चुकीचे झाले की मग viktim कार्ड का?? पत्रकार म्हणून समाजाची दिशाभूल ना करणे हे तुमचे काम असायला हवे ना...
राजकारणी लोक तर सध्या समाजाच्या एका वर्गा बद्दल काही पण बोलल्याने काहीच फरक पडत नाही असे वागत आहेत.. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा हेच केले.. हिंदू देवस्थानांनी corona विरुद्धच्या लढाई मध्ये मदत केली आहे.. त्यांच्या कडून बळजबरीने सोने घ्या ह्या म्हणायला अर्थ नाही...
अशोक सिंघल ह्यांच्या म्हणायचा एक अर्थ असा पण असू शकतो की जसे पृथ्वीराज मोहम्मद घोरी कडून पराभूत झाल्यानंतर भारतावर परकीय राज्य आले त्या प्रमाणे जर ह्या पुढे मोदी पराभूत झाले तर हिंदूंचे राज्य धोक्यात येउ शकते..
खूप सुंदर लेख लिहिला भाऊ.. माहिती मध्ये वाढ झाली.. धन्यवाद👍👍👍
भाऊ,
ReplyDeleteकाँग्रेस कडे असलेल्या हिंदू मतदारावर याचा काही फरक पडणार नाही असं मला वाटतं कारण मुळातच तो हिंदू ढुंगणात शेपूट घालून स्वाभिमान गहाण टाकून बसलेला आहे
आपल्या पूर्वजांचा दैदिप्यमान इतिहास विसरलेल्या हिंदूंकडून काय मतपरिवर्तनाची अपेक्षा ठेवणार. काय वाटत आपल्याला याबद्दल??
कॉंग्रेस व डावे यांची मूलभूत धारणा आहे की, मुस्लिम व हिंदू इतरांना ,दडपले तरी फायदा होतो.व मुस्लिम व हिंदू इतरांना आवडेल अशी कृत्ये केली, तरी मते, सत्यता मिळतात.त्यांच्यावर परिणाम होणार नाही योग्य लेख. धन्यवाद
ReplyDeleteभरकटलेला लेख.
ReplyDeleteअहो भाऊ 20024 आणि 2030 ची बेगमी आत्तापासूनच करतायत, काँग्रेस हे कधीच विसरली आहे की जय देशाची प्रजा ही बहुसंख्य हिंदू आहे, अल्पसंख्याक चे लांगुलचालन करून ही परिस्थिती आणली आहे अजून काय लिहणार सर्व सामान्य लोकांना कळत
ReplyDeleteपृथ्वीराज चव्हाण यांनी खुलासा केला आहे कि ते फक्त हिंदू नव्हे तर सर्व धर्माच्या देवस्थान बाबत बोलत होते शिवाय यापूर्वी वाजपेयी सरकारने व मोदी सरकारने 1999 व 2014 मध्ये या पद्धतीने सोने घेतलेले आहे
ReplyDeleteत्याला सारवासारव वा पश्चात बुद्धी म्हणतात
Deleteहो ते बरोबर आहे पण इथे एक गोष्ट सत्य आहे की फक्त हिंदू जे आहेत तेच फक्त आपल्या देवाला सोन्या चांदीचे दागिने दान करतात दुसर्या धर्मा मध्ये ह्या प्रथा नाहीत त्यामुळे आपसूकच त्यांच्या ह्या विधानाचा लोकांनी भाऊ सांगतात तसा अर्थ काढला तसे पण हिंदू धर्मात सोन्याला आर्थिक पेक्षा धार्मिक महत्त्व खूप आहे म्हणुन पृथ्वी राज ह्यानी बोलताना थोडे विचार पूर्वक बोलले पाहिजे होते
Deleteह्याबाबत संबित पात्रा ह्यांनी एक उत्तम उदाहरण दिले आहे. ते म्हणतात,
Deleteआम्ही जर ' पचास सालका नासमझ बच्चा' म्हणालो तर काँग्रेस वाले ते विधान राहुल गांधींना लावून आमच्यावर खटले का भरतात? आम्ही तर कोणाचं नावं घेतलेलं नाही.
अशी वक्तव्ये कशासाठी असा प्रश्न आपण या लेखाच्या शेवटी विचारला आहे. फ़क्त हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी ? की बहुसंख्य हिंदूंना विचलीत करण्यासाठी ?........अजून एक गोष्ट असू शकते ..ती म्हणजे खांग्रेस मधील पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे असंतुष्ट / अतृप्त लोक खांग्रेसला पुरेपूर खड्यात घालण्यास उद्युक्त झाले असावेत असे मानण्यास जागा आहे. तुमच्याच जुन्या लेखातील एक उदाहरण अत्यंत लक्षात राहण्याजोगे आहे... ते म्हणजे गळ्यात हार घालून वधस्तंभाकडे पळत निघालेल्या बोकडांना कोण अडवणार ?
ReplyDelete<< यापूर्वी वाजपेयी सरकारने व मोदी सरकारने 1999 व 2014 मध्ये या पद्धतीने सोने घेतलेले आहे>> कधी घेतले त्याचा कृपया तपशील पुराव्यासह द्यावा.
ReplyDeleteप्रथम हिंदू मंदिरं सरकारच्या जोखडातून मुक्त करण्यात यावी,भारतीय संविधानातील हिंदूंवरील अन्यायकारक कलमे बदलण्यात यावीत,समान नागरी कायदा लागू करावा.
ReplyDelete.कॉंग्रेस ला जास्त महत्त्व देऊ नये, आपण आपले काम करत राहिले पाहिजे. नाहीतर जनता पक्षाच्या राज्य शासनानंतर परत कॉंग्रेस निवडून आली तसे होईल. हे माझे मत आहे..
पोलिसांना मारहाण केल्याबद्दल लिहायला हवे.
ReplyDeleteपोलिसांवर कोणाचाही हल्ला झाल्यास त्यांना गोळीबार करण्याचा अधिकार देण्यात यावा आणि अशा घटनांची चौकशी सेवानिवृत्त पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती ne करावी.
Please write and create awareness
भाऊ, अत्यंत परखड. जेवढा हे कॉंग्रेसी निवडणुकीत मार खाताहेत तेवढे ते कट्टर हिंदू विरोधी होत आहेत. याचे कारण सध्या मुस्लिम आणि थोड्या प्रमाणात दलित हे मोदी विरोधात आहेत असे सरळसरळ दिसतेय, त्यांना आपल्याजवळ कायमचे ओढायचे असेल तर हिंदू विरोधी बोलणे अत्यंत आवश्यक आहे, हे यांच्या डोक्यात बसलेले आहे. त्यातून मग लोकमताच्या विरुद्ध सत्ता स्थापन करताना आम्ही मुस्लिमांमुळे सत्तेवर आलो अशी भंपक विधाने येतात.
ReplyDeleteBhau,I want you to make a video on Pratipaksha on 'How Fadnavis-Ajit Pawar Government would have tackled Corona'. And also on why Ajit Pawar is not being given suitable responsibilities of Deputy CM but the side jobs. I want to contact with you.
ReplyDeleteRegards
खरं तर आत्ता या वेळी पृृृृृृथ्वीराज चव्हाणांना या विषयावर बोलून स्वतःची छी थू करून घ्यायचे काहीच कारण नव्हते कारण सध्या सत्ता त्यांच्या पक्षाच्या हाती नाही.त्यामुळे कोलमडलेली देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय करता येईल हे त्यांच्या पक्षाला कोणीहि न विचारता त्यांनी सांगण्याची अजिबात गरज नव्हती. ते स्वतःला अर्थतज्ञ समजत असतील तर गोष्ट वेगळी. या गोष्टी शिवाय मोदींनी २० लाख कोटींचे मदत पॅकेज जाहीरही करून टाकले.
ReplyDeleteमोदींना सद्य परिस्थितीत लोकक्षोभ ओढवून घ्यायचा नाहीये. ते योग्य ते उपाय करण्यात नक्कीच लायक आहेत.
एकूण पृृृृृृथ्वीराज चव्हाणांनी स्वतःचे व पक्षाचे हासू करून घेतले व मोदींची लोकप्रियता वाढवायला हातभारच लावला.शिवाय काँग्रेस पक्षाचे पितळ उघड पाडले असे वाटते.
Pruthviraj chavan yaani paapu va pinkyla guru kela aahe ka?
ReplyDeletePrithviraj Chauhan yanni suchavlela salla agdich kahi chukicha nahi. Sadhyachya ya kathin kalaat jevha mothe mothe udyogpati ani samanya nokarvarg suddha sadhal hastey daan karat ahet, mug mandiraan kade aslele sone ka karzachya rupaat vaparta yeu nayet.. Desha sathich ha paisa vaparla janar. Jevha sarkari tijorit paisa yeil tevha ya mandiranche sone ani tey suddha vyaja sakat parat kele janar
ReplyDeleteभाऊ छान समाचार घेतलाय . पृथ्वीराजांसारखे सो कॉल्ड मुस्लिम धार्जिणे नेते जोपर्यंत आहेत तोपर्यंत हिंदु उपेक्षितच राहतील . म्हणुन आता गरज आहे ती हिन्दुंनी अशा मानसिकतेच्या लोकांविरुद्ध एकत्र येण्याची . जय हिंद
ReplyDelete