Monday, June 1, 2020

हर बिमारीपर अक्सीर इलाज! कुबेर मल्हम

राहुल गांधींचा जो काही खुळेपणा वा निर्बुद्धता असेल, ती त्यांची उपजत गुणवत्ता आहे. त्यांना ती आत्मसात करावी लागलेली नाही. म्हणूनच अनेकदा त्यांच्याकडून काही चुकीची विधाने झाली, तरी ती गैरलागू वाटत नाहीत. पण लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी निर्बुद्धता आत्मसात केलेली वा कमावलेली असल्याने त्यांची दखल घ्यावी लागते. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘पाणउतारा करावा इतकेही कुबेर महत्वाचे नाहीत. पण वाचकासमोर सुबुद्धतेतील निर्बुद्धता अधिरेखित करण्यासाठी’ कुबेरांची दखल घ्यावी लागते. त्यांनी गिधाडगौरव नावाचे जे आख्यान लावलेले आहे, त्यातली निर्बुद्धता प्रत्यक्ष मुर्खपणाशीही ‘सामना’ करू शकणारी नाही. अन्यथा आपण चाकरीचा पट्टा गळ्यात अडकवलेला असताना दुसर्‍यावर त्याच कारणास्तव भुंकू नये; इतके तरी भान राखले जाऊ शकते ना? कुबेरांना त्याचेही भान उरलेले नाही. तुषार मेहता हे भारत सरकारचे वकील वा सॉलिसीटर जनरल आहेत आणि ज्याअर्थी ते सरकारची बाजू मांडण्यासाठीच न्यायालयात उभे रहातात, तेव्हा त्यांना कुबेरांच्या महान अकलेचे दाखले देण्याची मुभा नसते. हे रस्त्यावरल्या शेंबड्या पोरालाही कळू शकते. पण कुबेरांना कळू शकणार नाही. कारण त्यांनी आपले नाक कधी गळू नये तितकी काळजी घेतलेली असावी. मग त्यांना सामान्य सत्य कसे कळावे? आपल्या प्रकाशन संस्थेचा मालक किती आर्थिक भानगडी करतो वा कोणत्या अफ़रातफ़री करतो, त्याचे पाढे कुबेरांनी कधी वाचलेत काय? असतील तर जरूर सांगावेत. मग इतरांचा चाकरी करणारे म्हणून हिणवायला अजिबात फ़रकत नाही. आपली बुद्धी सरकारी चाकरीत रुजू करताना आपण स्वयंपुर्ण बुद्धीचे प्रवक्ते असल्याचा डंका मेहतांनी पिटलेला नाही. कुबेर मात्र कंबरड्यात लाथ बसूनही मालकाचे चरणतीर्थ घेत चाकरीत टिकून राहिलेले आहेत.

याआधी रोहटगी किंवा अनेक सरकारी वकीलांनी आपले पटले नाहीतर आपल्या पदाचा राजिनामा दिलेला आहे. तितकी हिंमत ते दाखवू शकतात, कारण स्वयंभूपणे आपला वकीली व्यवसाय करण्याची क्षमता त्यांच्या बुद्धीत आहे. पण कुबेरांना मालकाने हाकलून लावले, तर खायचे काय याची भ्रांत पडणार आहे. म्हणूनच हे ‘असंतांचे संत’ मालकाने मान मुरगळली वा लेखणीवरून झाडू फ़िरवली; तरी मीठाला जागून चाकरी करीत असतात. मेहता वा तत्सम लोकांच्या पंगतीत जाऊन बसण्याची पात्रता त्यांना मिळवता आलेली नाही. मीठाला जागताना मालकाच्या इशार्‍यावर ठराविक लोकांवर भुंकण्याची ड्युटी करावी लागते. बदल्यात आपल्याही काही शत्रूंवर भुंकण्याचे स्वातंत्र्य मिळते; त्यावर समाधानी असलेल्यांची कहाणी म्हणजे कुबेरांची श्रीमंती आहे. अन्यथा त्यांना तुषार मेहतांचा सुप्रिम कोर्टातला युक्तीवाद इतका कशाला झोंबला असता? मेहतांनी कुबेरांच्या दुखण्यावर नेमके बोट ठेवलेले आहे. जणू अशा दिवट्यांनी स्थलांतरीत मजूरांच्या समस्या मांडल्या म्हणून केंद्र सरकार जागे झाले असला जावई शोध कुबेरांनी लावला आहे. अवघ्या तीन तासात लॉकडाऊन केल्याने लोक असतील तिथे अडकून पडले, असाही शोध आहे. पण अन्यथा जणू स्थलांतरीताचा प्रश्नच उदभवला नसता, असा आईनस्टाईनलाही मान खाली घालायला लावणारा वैज्ञानिक शोध कुबेरांनी लावला आहे. जितक्या संख्येने स्थलांतरीत मजूरांचे पलायन झाले, तितक्या मजूरांना आधी मुदत देऊन नंतर लॉकडाऊन जाहिर करायला हवा होता; असा राहुलशोध त्यांनी लावला आहे. समजा त्यात तथ्य असते तर काय झाले असते? कधी लॉकडाऊन लावता आला असता? किती दिवसांची मुदत दिल्यावर ही तारांबळ उडाली नसती? त्याचाही तपशील ह्या कुबेर मजकुरांनी द्यायला हवा ना?

किमान चार हजाराहून अधिक रेलगाड्या सोडल्या गेल्या आणि हजारो बसेस व ट्रक अशा मार्गाने दोनतीन कोटी लोक परप्रांत सोडुन आपापल्या राज्यात पोहोचले आहेत. त्यांना सुरळीत जायला द्यायचे तरी किमान आठदहा दिवस लॉकडाऊन घोषित करता आला नसता. म्हणजेच एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यासाठी थांबायला हवे होते; असाच कुबेरांचा सुर दिसतो. इतके दिवस थांबल्यानंतर अमेरिका किंवा कुबेरांच्या लाडक्या मायभूमी इटाली इत्यादी पाश्चात्य देशांचे काय झाले, ते जगासमोर आहे. त्यांना भले जन्मगावी जाण्यासाठी भारतीय मजूरांसारखी पळापळ करावी लागली नसेल. पण किडामुंगीसारखे मुडदे पडले आणि त्यांना खांदा द्यायला वा अंत्यविधीलाही माणसे मिळू शकलेली नाहीत. त्याला कुबेरनिती वा कुबेर पॉलिसी म्हणता येईल. माणसे मेली तरी बेहत्तर. त्यांना खांदा द्यायला कोणी नसला तरी चालेल. पण लॉकडाऊन होण्यापुर्वी आपल्या घरी पोहोचण्याची संधी द्यायला हवी. कोरोना काय कुबेरांनी अग्रलेख लिहीण्यापर्यंत ताटकळत थांबत असतो? त्याला कोणाला ग्रासण्याची घाई झालेली नाही. कोरोनासुद्धा कुबेरभक्त आहे. कोणालाही बाधा देण्यापुर्वी कोरोना कुबेरांचा अग्रलेख वाचतो आणि मगच आपल्या कामाला लागत असतो. मोदींनी परस्पर लॉकडाऊन घोषित करण्याची घाई करण्यापेक्षा एक वटहुकूम काढून कुबेरांना स्थानबद्ध करायला हवे होते? कुबेरांच्या अग्रलेखापासून कोरोनाला वंचित ठेवायचे धोरण स्विकारायला हवे होते? मग कोरोना त्रिशंकूसारखा अधांतरी लटकत राहिला असता आणि आरामात देशातले कोट्यवधी स्थलांतरीत मजूर मिळेल त्या वहानाने आपापल्या गावी वा राज्यात सुखरूप जाऊन पोहोचले असते. कदाचित कोरोना अन्य देशातील आपली कामगिरी करायलाही निघून गेला असता आणि इथे भारतात त्याला एकही बळी घेता आला नसता.

काल तर लोकसत्तेच्या एका कर्मचार्‍याकडून कुजबुज ऐकायला मिळाली. विवेक गोयंका यांना आजकालच्या एका जाहिरातीचा अनुभव घ्यावा लागला. कुठल्याशा मसाल्याची जाहिरात आहे. त्यात श्राद्ध चालले आहे आणि तिथे मांडलेल्या खाद्यपदार्थाचा वास घमघमलेला असतो. फ़ोटोतला मेलेला बाप हात जोडून बसलेल्या मुलाच्या कानशीलात आवाज काढतो. आपण जीवंत असताना आपल्याला असले चमचमीत पदार्थ कशाला खाऊ घातले नाही, असा जाब मृत बाप विचारतो. विवेक गोयंकाच्या कानशीलात म्हणे तिथे भिंतीवर असलेल्या छायाचित्रातल्या डॉ. अब्दुल कलामांनी सणसणित चपराक ठोकली. गाल चोळत विवेकने विचारले, की आपले काय चुकले? तर कलाम उत्तरले, माझ्या हयातीत लोकसत्तेत कुबेरला संपादक कशाला केलेले नव्हते? मला उगाच रॉकेटचा शोध घेत बसावे लागले नसते. छानपैकी विणावादन शिकण्यात व वाजवण्यात रमलो असतो. इथे स्वर्गात आल्यावरही मला अल्बर्ट, पाश्चर वा न्युटन यांच्याकडून चार शब्द ऐकावे लागले नसते. त्यांनाही वाटते. आयुष्य नसत्या फ़डतूस संशोधनात वाया घालवले. कुबेर तेव्हाच अग्रलेख लिहीत असते, तर वीजेचा शोध वा अन्य सर्व संशोधन परस्पर होऊन गेले असते. विज्ञान वगैरे विषय शाळेत शिकवावे लागले नसते. प्रयोगशाळा वा संशोधनावर इतका प्रचंड पैसा खर्चावा लागला नसता. त्यातून करोडो लोकांना राहुल गांधी थेट खात्यात पैसे जमा करू शकले असते. हा गुन्हा विवेक गोयंकाचाच नाही काय? त्याने कुबेरांना संपादक करण्याला विलंब लावला नसता, तर जगाला इतके हाल सोसावे लागले नसते आणि कोरोनाही जगभर बोकाळला नसता. नकारात्मकतेतील सकारात्मकता शोधण्याची किमया अन्य कुठल्या अव्वल शास्त्रज्ञाला आजवर साधली नाही, ते कुबेर एका अग्रलेखातून करू शकले, ह्या चमत्काराने जगभरच्या दिवंगत संशोधकांना आपल्या आयुष्यभराच्या विक्रमांचीही आता लाज वाटू लागली आहे.

आजचा नुसता अग्रलेखच कुबेरांनी दणक्यात लिहीलेला नाही. त्यांनी विज्ञानावरही अक्कल पाजळलेली आहे. ती बघून ट्रम्प यांना नासावर अधिक खर्च करू नये असे वाटले, तर बहुधा तिथल्या संशोधक वैज्ञानिकांवर बेकारीची पाळी येण्याची शक्यता जागतिक विज्ञान परिषदेनेही व्यक्त केल्याची बातमी आहे. खरेच मेक इन इंडिया वगैरे खेळत बसण्यापेक्षा मोदींनी कुबेरांच्या हाती कारभार सोपवला पाहिजे. अवघ्या जगाची अर्थव्यवस्था क्षणार्धात गर्तेतून बाहेर काढून सुपरसॉनिक वेगाने उंचावर घेऊन जाण्याची क्षमता कुबेरांच्या लेखणीत आहे. त्याला हवे तेवढे पाश्चात्य साहित्य व लेखन पुरवण्याचे काम भारत सरकारने करावे. बाकी कार्य सिद्धीस न्यायला कुबेर समर्थ आहेत. आणखी एक सांगायला हवे. हे लॉकडाऊन किंवा चाचण्या इस्पितळे उभारण्याचीही काही गरज नव्हती. उगाच पैशाची नासाडी झाली. त्यापेक्षा भारत सरकारने प्रत्येक भारतीयाला लोकसत्तेचा अग्रलेख मास्कप्रमाणे आपल्या तोंडावर लावून फ़िरायची सक्ती केली असती, तरी कोरोना झुरळासारखा पळून गेला असता. डॉक्टरांची संख्या कमी पडली नसती की तात्पुरती बेडव्यवस्था खडी करावी लागली नसती. लोकसत्तेच्या रद्दीचा मास्क बनवायचा आणि तोंडावर लावायचा. कोरोना गायब! भारतात अशा गुणी प्रतिभावान लोकांची कदरच होत नाही. तुषार मेहता यांच्यासारख्या प्रतिभाहीन लोकांना प्रतिष्ठा व पदे मिळतात. बिचार्‍या कुबेरांना लोकसत्तेत खितपत पडावे लागते. त्यामुळे करोडो लोकांना कोरोनाशी सामना करावा लागतो. लॉकडाऊनचा कोंडमारा सहन करावा लागतो. आपण सारे भारतीय कमालीचे दळभद्री आहोत. अर्थकारणापासून विज्ञानापर्यत सगळ्या समस्यांवरचा अक्सीर इलाज उपलब्ध असताना आपण मोदी, राहुल वा अमर्त्य सेन किंवा सोनिया गांधी असली फ़डतूस भांडणे करीत बसलो आहोत. अजून चिनच्या शी जिनपिंगचे लक्ष कुबेरांकडे कसे गेले नाही, याचेच आश्चर्य वाटते.

46 comments:

  1. भाऊ, त्या गिरिष कुबेराला फारच फोडला. तसे संज्या ला पण फोडून काढा

    ReplyDelete
  2. Waa, waa khub chaan, 💯%✔️, aamchya manatle vichar wachun khup aanand hoto. Very true analysis of that person.

    ReplyDelete
  3. भाऊ सणसणीत हाणला त्या कुबेराला मजा आली हा सुमार बुध्दी केतकरांचाच वारसदार आहे

    ReplyDelete
  4. भाऊ, मस्त. मजा आला.
    दुनियेतील एकूण एक गोष्टींबद्दल फक्त आणि फक्त आपलाल्याच सर्व ज्ञान आहे, आणि बाकी सगळे फडतूस आहेत, असा दर्प असलेला एक अत्यंत फडतूस पत्रकार म्हणजे गिरीश कुबेर. त्यांनी व्यक्त केलेली मते, विचार म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाची वाणी असे ते समजतात. वस्तुतः ते राहुल गांधी एवढेच हुशार असावेत असा मला संशय आहे.

    ReplyDelete
  5. मूर्खपना किती सुंदर शब्दात माडतात कुबेर .

    ReplyDelete
  6. Bhau, sundar
    apalya pratipaksh channel war hyawar video banawa...
    Dhanyawaad

    ReplyDelete
  7. अस्सल मालवणी!!!

    ReplyDelete
  8. भाऊ
    चांगलीच तासलीय तुम्ही कुबेरांची.आता बास.या असल्या लोकांची भादरण्यासाठीसुद्धा भाऊ आपण आपली बुद्दी व वेळ वाया घालवू नये असं वाटते.तुमच्यासारख्या ज्येष्ठ विचारी परीपक्व चिकिच्छक पत्रकारांसाठी चांगले विषय भरपूर आहेत. प्रतिपक्षमधूनही चांगले विषय मांडून तुम्ही आम्हा सर्वांचे प्रबोधन करत आहात.तेव्हा या अशा पत्रकाराना दुर्लक्षित करणे त्यांचे पेपर व चॅनल न वाचणे पाहणे हे खरे ऊत्तर अाहे व ते आमच्या हातात आहे.राग मानू नये स्पष्ट लिहल्याबद्दल.

    ReplyDelete
  9. अहाहाहाहाहाहा ...भाऊ हातात कुंचा घेऊन एखादी गृहिणी घरातील त्रासदायक झुरळांना मरेस्तोवर झोडपते तसेच तुम्ही केले की हो! आपण तर एकदम खुश आहोत.

    ReplyDelete
  10. We have stop purchasing Loksatta long back.If such idiot comes on TV dissuasion we are changing channel and keeping our mind balance.How such personae has been tolerated by Mr.Goanka.It seems that he is also like this person only.Better to ignore such idiot.

    ReplyDelete
  11. Bin panyane
    Itki marmik tolebaji...
    Marmik nantar pahilyandach ase vachayla milale

    ReplyDelete
  12. Kuber tasa lekh abhyas purna lihitat ani sarkar var teeka ji kartat ti pan tashi tashi kadhi kadhi valid aste ...pan problem ha ahe yana yana fakt Modi government che ch problem distay baki deshat ani Maharashtra madhe je challe ahe te saglech yana batobar batate.Teeka karaycha tar saglyach chukana chuk mhntle pahije pan Kuberan kadun te hotana disat nai. Pratyek velela USA ani UK chi example deun tikade kas hota te sangaycha prayatn asto

    ReplyDelete
    Replies
    1. Mr Kuber has critisized Dr. Manmohansing govt also. ' 'Marekari Doktar' was written by Mr. Kuber critisizing Dr. Manmohansing govt in September 2013. So it is Express's policy. Keep our own concious clear while reading any body, including Mr. Torsekar as well. At below first two comments are my two letters written to loksatta, which Loksatta did not publish. So read every one but use our own brain.
      Narendra Thatte.

      Delete
  13. भाऊ एक नंबर जास्त लिहिणे पोस्टचा अपमान होईल

    ReplyDelete
  14. भाऊ, या दरिद्री कुबेराची अगणित अज्ञानसंपदा चव्हाट्यावर (म्हणजे चारचौघात हो) मांडलीत यासाठी धन्यवाद. मला खात्री आहे जोपर्यंत घर चालवायला पैसे मिळतायत तोवर त्याच्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. कारण त्याच्या लागी इतर जग मिथ्या आहे..... एक विवेक (म्हणजे गोएंकांचा हो) सोडला तर.

    ReplyDelete
  15. वा भाऊ फारच छान. वक्रोकत्ती अलंकाराचा फारच छान उपयोग केला आहे. पण आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे 'शाहण्याला शब्दाचा मार'. या म्हणी प्रमाणे कुबेरांना आपल्या लेखातील विचार कळतील व वळतील का एक गहन प्रश्नच आहे

    ReplyDelete
  16. भाऊ आपण कमालं आहात🙏🙏

    ReplyDelete
  17. भाऊ, आपला आदर राखून एक सुचवू का? असल्या फालतू पत्रकारांच्या तितक्याच फालतू अग्रलेखासाठी आपली लेखणी झिजवू नका. हे हग्रलेख कोण वाचतो का? फक्त मोदीविरोधीच, तरीही त्यांना देखील माहिती आहे की कुबेर नावाचा विचारदरिद्री माणूस काय लायकीचा आहे, त्यामुळे ते ही त्याला तितकीच किंमत देतात.

    ReplyDelete
  18. Perfect Analysis of a pet of Goenka

    ReplyDelete
  19. भाऊ……. अप्रतिम लेख….!! तुमचे शाब्दिक प्रहार या कुबेराला घायाळ करतील अशी अपेक्षा. शेठजी समोर स्वतःची ' जीभ ' आणि ' शेपटी ' तालबद्ध हलविणारा हा कुबेर…………. ' उचल जीभ लाव टाळ्याला ' याची दररोज अनुभूती देत असतो. मोदीग्रस्त असल्यामुळे या कुबेराला जळी / स्थळी / काष्ठी / पाषाणी मोदीच मोदी दिसत असतात. आता होणारा पाऊस आणि वादळांनाही ही व्यक्ती ' मोदींना ' जबाबदार धरत नसेल तर मिळविली. पाऊस जास्त झाला तरी ' मोदी ' च दोषी आणि ' कमी ' झाला तरी परत ' मोदी ' च दोषी. या कुबेराला ' नोटबंदीचा ' फार मोठा फटका बसला असावा. दिल्लीतील ल्युटेन्स / खान मार्केट टोळीत सामील झाल्यामुळे सुरुवातीला काही काळ फुकट मिळणारी दारू , परदेश प्रवास , आलिशान हॉटेलांमधील वास्तव्य सर्व २०१४ मे नंतर बंद झाल्यामुळे हा कुबेर ' पिसाळला ' असावा.
    हा वाङ्मय चौर्य ' तज्ज्ञ ' लोकसत्ता लाईव्ह मध्ये ' व्हिडीओ ' बनवून त्याने कसे स्वतः कडे कसे वाङ्मय चोरीचे ‘श्रेय ‘ घेतले नाही म्हणून निर्लज्जपणे सांगतो. वर हा कुबेर म्हणतो की त्याने फक्त टिम्ब जोडली. टिंब जोडताना मूळ लेखकाला ‘श्रेय ‘ का नाही दिलं ?? ' वारुणी ' ( मद्य ) ची आवड याने आपल्या एका लेखात सांगितली होती. वारुणी पिऊन वाऱ्यासारखे कुबेर विश्व संचार करत असावेत. मग त्यांना जागतिक विषय मुठीत आल्याचे भासते की काय न कळे.

    ReplyDelete
  20. गिरीश कुबेर इतके महत्त्वाचे नाहीत की एक अख्खा लेख आपण त्यांच्यावर लिहावा.सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रात रोज सर्वाधिक वाचकपसंतीचे अग्रलेख लिहिण्याचा विक्रम त्याना करत राहू द्या .

    ReplyDelete
  21. हल्ली बहुसंख्य लोक पेपर वाचत नाहीत. त्यात वाचण्यासारखे काहीच नसते. आपापल्या राजकीय पक्षांचे मुखपत्र आहेत मराठी पेपर.

    ReplyDelete
  22. Bhau.. Hi link check kara. Swati Torsekar madam sathi youtube thumbnail me banavale aahe.

    https://drive.google.com/file/d/1Ue6yznfd-tLDrf9R72cFsuyB2qd9mu1M/view?usp=sharing

    ReplyDelete
  23. ऊत्क्रुष्ट व्यंगोक्ती.

    ReplyDelete
  24. भाऊ लोकसत्ता कशाचा लोकथट्टा आहे.बाकी आपलं लिखाण नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे.

    ReplyDelete
  25. मस्त, भाऊ!

    चोरी लांडी लबाडी दरोडेखोरी देशद्रोह इत्यादी केले नाही तर फक्त भीकच मागू शकतील इतकीच लायकी असणारी लोकं पत्रकारितेत आल्यावर असे होते. तसेच भारतात झाले आहे. आणि हेच निर्लज्ज 'reputable publication' म्हणजे काय या विषयी जीभ उचलून टाळ्याला लावतात. मुंबईच्या तथाकथित प्रतिष्ठित जनतेत पत्रकार संपादक म्हणून मिरवतात. स्वतःची कुजलेली रोगट कातडी वाचवत आयुष्य घालवतात. आणि नैतिकतेचे गुण आळवतात. जोपर्यंत महामूर्ख कोटीतील लोकं वर्तमानपत्र वाचत राहतील तोपर्यंत अश्याही किड्यांना मरण नाही. अत्यंत अस्वच्छ आणि अपवित्र परिसंस्था जोपर्यंत अस्तित्वात असतील तोपर्यंत त्यावर उपजीविका साधणारे जंतू तग धरून राहतील. तोपर्यंत यांना मरण नाही.

    - पुष्कराज पोफळीकर


    ReplyDelete
  26. राज्यसभेकडे जाणाऱ्या कुमारमार्गाचे कुबेरमार्ग करण्याचे प्रयत्न चालू आहेत भाऊ!

    ReplyDelete
  27. "Sau sunar ki, ek lohar ki".. एक मारा सॉलिड मारा.. जबरदस्त भाऊ.. यांना अशी उत्तर द्यायलाच हवी

    ReplyDelete
  28. माझे २१ मे २०२० चे लोकसत्ताने न छापलेले पत्र

    श्री गिरिश कुबेर यांस,

    केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्याच्या करोनामुळे आलेल्या महामारीच्या काळात डॉ हर्षवर्धन यांची ही नियुक्ती भारतासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. परंतु हे खेदाने नमूद करावे लागत आहे की ’लोकसत्ता’ने ह्याची कुठल्याच पानावर साधी नोंदही घेतलेली नाही. ह्या उलट ’कोविडोस्कोप’ वा ’बॊईज लॊकर रूम - एक धडा’ ह्या स्वत:च्याच टिमकीला जास्त जागा दिलेली आहे. इतर वर्तमानपत्रात ही बातमी पहिल्या पानावर छापलेली आहे. हे असे पहिल्यांदाच घडत आहे असे नाही. असे अनेक वेळा घडलेले आहे. डॉ मनमोहनसिंग सरकारच्या काळातही, एकदा इस्रोने उपग्रह अवकाश्यात सोडला होता, तेंव्हा त्याची दखलही घेतलेली नव्हती. परंतु तीन दिवसांनी त्या उपग्रहाचा संपर्क तुटला ही बातमी मात्र पहिल्या पानावर छापली होती. यातून भारताच्या प्रगतीप्रती असलेली आपल्या मनातील आसुयाच दिसून येत आहे.

    जेंव्हा केरळ राज्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला त्यानंतर दि. ५ फेब्रुवारी २०२० च्या ’मेड इन चायना’ ह्या अग्रलेखात करोनाचा कहर भारतात, त्यातूनही बिहार उत्तरप्रदेश सारख्या ’बिमारू’ राज्यात पसरला तर काय गहजब घडेल, अशी भिती आपणच व्यक्त केलेली होती. ’ह्या विषाणूचा पसरण्याचा वेग पाहून विज्ञान/ वैद्यकीय जगदेखील सर्द झालेले आहे’ हे आपल्याच त्या अग्रलेखातील वाक्य आहे. अत्यंत आधुनिक आणि पुरेश्या वैद्यकीय सुविधा असून सुद्धा अमेरिका आणि पाश्चात्य देशात सुद्धा एक लाख करोना बाधितांचा आकडा २४-२५ दिवसात गाठला गेला. आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असून सुद्धा भारतात एक लाखाचा करोना बाधितांचा आकडा यावयास ६४ दिवस लागले. हे निश्चितच कौतुकस्पद आहे. ’भारतात चाचण्यांची संख्या पुरेशी नाही, अपुऱ्या चाचण्या केल्या म्हणून खरा आकडा बाहेर आला नाही’ असे बोलून/ लिहून भारताचे हे यश झाकोळण्याचा प्रयत्न आपल्या सारख्या असंख्य ’जाग्रुत पत्रकारांकडून’ केला जात आहेच. परंतु जर करोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असती तर रुग्णालयात लोंढे लोटले असते आणि स्मशानात प्रेतांच्या रांगा लागल्या असत्या. आणि अश्या गोष्टी आपल्या सारख्या जाग्रुत पत्रकाराने नक्कीच उजेडात आणल्या असत्या. पण असे काहीही घडले नाही याचाच अर्थ भारताने कोव्हिड-१९ विरोधी योग्य पावले उचललेली आहेत. परंतु भारताबद्दल फक्त पाश्चिमात्य देशांतल्या विद्वानाच्या टिप्पण्णीवर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या सारख्या पत्रकारांना हे समजणार नाही. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने याची योग्य दखल घेवून डॉ हर्षवर्धन यांची कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी एक वर्षासाठी नियुक्ती करून भारताच्या कोव्हीड-१९ विरोधी लढ्याला मानवंदना दिलेली आहे. आणि ह्या प्रस्तावाला १९४ देशांनी पाठिंबा दिलेला आहे.

    सध्या ’कोविडोस्कोप’ हे सदर लिहून आपण देशोदेशींच्या काही विद्वानांचा दाखला देत ’टाळेबंदी’ हा मार्ग कसा चुकीचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहात. जर आपणास टाळेबंदी चुकीची आहे असे वाटत असेल तर आडून आडून का सुचवीत आहात. सरळ तसे एका ’आदर्श निर्भीड पत्रकारासारखे’ ठामपणे लिहा. करोनाचा प्रकोप संपल्यावर जग आपली दखल निश्चितपणे घेईलच. का आपल्याच मतावर आपणास शंका आहे?

    आपला

    नरेन्द्र थत्ते

    ReplyDelete
  29. ’आता जे सत्तेवर आहेत त्यांना याची जाणीव करून द्यायला हवी की मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या कालखंडातील निष्क्रियता चव्हाटय़ावर मांडून माध्यमांनी तत्कालीन राज्यकर्त्यांविषयी नकारात्मकता निर्माण केली नसती तर विद्यमानांना सत्तासंधी मिळती ना. ’ - इती श्री गिरिश कुबेर (गिधाडगौरव अग्रलेख १ जून २०२०) . कुबेरांच्या मते माध्यमांनी स.पु.आ. विरूद्ध लिहिले म्हणून मोदी २०१४ साली निवडून आले. हे खरे मानले तर २०१४ पूर्वी हीच माध्यमे, यात लोकसत्तासुद्धा आहे, मोदींच्या विरोधी सतत १२ वर्षे लिहून सुद्धा मोदी गजराथ चे मुख्यमंत्री म्हणून पूर्ण बहुमताने कसे काय निवडून येत होते? तसेच २०१४ ते २०१९ या दरम्यान लोकसत्ताने सतत मोदींच्या विरोधातच लिहिलेले आहे. एव्हडेच नव्हे तर मोदी सतत चुकतच आहेत, पर्यटन करीत आहेत, मोदींना अर्थकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण, वगैरे काहीच कळत नाही असे श्री कुबेर स्वत: अग्रलेखातून, इतर लेखातून सतत लिहिते होते. तरी मोदी २०१९ साली जास्त मते आणि जागा मिळवून कसे निवडून आले? भारतीय मतदार, सामान्य माणूस महामुर्ख आहे या (गैर)समजातून श्री कुबेर कधी बाहेर येणार. जर श्री कुबेरांना आडाणी माणूस किंवा महामुर्ख माणूस पहाण्याची एव्हडीच उत्सुकता असेल तर त्यांनी आपल्या समोर आरसा धरावा.

    नरेन्द्र थत्ते

    ReplyDelete
  30. या दोघा जणांच नामकरण कुगिरिश कुकेतकर असे केले तर?

    ReplyDelete
  31. आपला आक्षेप योग्यच आहे.या पत्राला लोकसत्तेत प्रशिद्धी मिळणं शक्यच नाही;ते काय परखड पत्रकार भाऊ तोरसेकर आहेत का विरोधी मताची कदर करायला?

    ReplyDelete
  32. भाऊ, बाजारात तोंडली चा भाव दोन रुपये वाढला तर यांचा पेपर ते पहिल्या पानावर छापतो. जनतेनं पण स्वत: सुज्ञ व्हावं.

    ReplyDelete
  33. Loksatta ani Maharashtra Times he paper lahan mulana saglyat jast upyogi ahet...
    Kashyala te samajlech asel. Baki kuber and Ketkar he manorugna ahet.. Yana ek mahina shetar rojdar mhanun kamala thevave mhanje ha desh kay ahe ani economy kay he kalel.

    ReplyDelete
  34. भाऊ या माणसाला काय म्हणावं तेच कळत नाही . कोणी ही त्याला किंमत देत नाही तरी आपली यांची टिमकी चालूच असते .दुर्लक्ष करणे हे सर्वात मोठा उपाय आहे .

    ReplyDelete
  35. लोकसत्ता वर कडकडीत बहिष्कार घालून लायकी दाखवून दिली पाहिजे. एबीपी माझा आणि प्रसन्न ला कसा धडा शिकवला, तसा.
    भाऊसाहेब आपण अधिकारवाणीने या बुद्धीभेद्यांवर प्रहार केलेच पाहिजेत. धन्यवाद.

    ReplyDelete
  36. आमच्या तारूण्यात प्रियेसीची वाट बघताना झाला नाही
    एवढा त्रास तुमच्या लेखाची वाट बघण्यात होतो
    असं नका करू काका (बारामतीतले नव्हे हं)

    ReplyDelete
  37. कुबेर च नाही तर सप्तर्षी केतकर यांना मेकॉले नावाच्या भूताने झपाटले आहे त्याला ते बिचारे काय करतील

    ReplyDelete
  38. भाऊ, सोसेल एवढंच मारीत जा हो!… 😛😛

    ReplyDelete
  39. सर, मी तुमचा लिखाणाचा खूप मोठा चाहता आहे. नेहमीच तुमचा ब्लॉग वाचतो. सर कमालीचे निरीक्षण आणि सडेतोड लेखन. तुमच्या संदर्भांसह केलेल्या स्पष्टीकरणाला तोड नाही. कधी तुम्हाला भेटायला मिळाले तर खूप आनंद होईल.

    ReplyDelete
  40. Nahi Bhau arthik vishleshnat Girish kuber bahutek wela barobar astat lockdown ani tyacha economical effects war sarwat yogya waktwya girish kuberanich kele hote, ani bahu notbandi weli hi shewat paryant girish kuber tyachya gostiwar tham rahile hote

    ReplyDelete