Saturday, June 20, 2020

भित्यापाठी ब्रह्मराक्षस

twitter suspends amul official account over exit the dragon post ...

नकारात्मकता कधीच हिंमत देत नसते आणि लढण्यासाठी शस्त्रास्त्रे लागत नाहीत तर हिंमत आवश्यक असते. ज्यांना हिंमत म्हणजे काय तेच ठाऊक नसते, त्यांना कुठली लढाई लढता येत नाही, किंवा जिंकताही येणार नसते. त्यामुळे चिनी मालाच्या बहिष्काराच्या गोष्टी लडाखच्या झटापटीनंतर सुरू झाल्या आणि अशा दिवाभितांना घाम फ़ुटलेला आहे. चिनी मालावर बहिष्कार म्हणजे तात्काळ जगाची अर्थव्यवस्थाच कोसळून पडली, म्हणून त्यांनी ऊर बडवायला सुरूवात केली तर म्हणूनच नवल नाही. त्यांचे शब्द व अक्कल खरी असती, तर उद्याचा सूर्य सुद्धा चिनी इच्छेनुसारच उगवला असता आणि शी जिनपिंग यांना विचारल्याखेरीज मावळलाही नसता. अशा विचारांनी ग्रासलेल्यांना चिनी मालावर बहीष्कार म्हणजे काय, त्याचाच बोध झालेला नाही. पण ज्यांना त्याचे जबरदस्त चटके बसू शकतात, त्यांना ह्या आवाहनाची भीषण क्षमता त्यापुर्वीच उमजलेली आहे. म्हणून त्यांनी नुसता सुगावा लागताच बोंबा ठोकायला सुरूवात केलेली आहे. लडाखची घटना कालपरवाची आहे. पण तिथे चिनी सैनिकांनी आगावू पवित्रा घेतल्यापासून भारतात काही उत्साही लोकांनी चिनी मालावर बहिष्कार घालण्याची भाषा सुरू केली. त्याचे तात्काळ प्रतिसाद चिनी सरकारच्या मुखपत्रातून उमटले होते. कारण होते, एक सामान्य मजेशीर व्यंगचित्र. जगात आपल्या गुणवत्तेने ब्रान्ड बनलेल्या अमूल या दुग्धपदार्थ उत्पादक भारतीय कंपनीने नेहमीप्रमाणे एक जाहिरात केली आणि ग्लोबल टाईम्स या चिनी मुखपत्राला मिरच्या झोंबल्या होत्या. चिनी सरकारने दडपण आणून ती जाहिरात वा व्यंगचित्र झाकण्याचा आटापिटा केला. ज्याला इथले महान अर्थशास्त्री जगातली आर्थिक महाशक्ती म्हणून गौरवतात, ती अर्थसत्ता एका व्यंगचित्राने भयभीत होते? एका जाहिरातीतले मजेशीर व्यंगचित्र बघून बाहूबली घाबरतो?

जगात कोणीही इतका मोठा नसतो किंवा शक्तीशाली नसतो, की त्याला आव्हान देणेच अशक्य असते. जोपर्यंत इतर सगळे घाबरून गप्प असतात, तेव्हाच कोणीतरी बाहुबली उदयास येत असतो आणि त्याचे आयुष्य कुठूनतरी आव्हान मिळण्यापुरतेच मर्यादित असते. शंभर अपराध भरण्यापर्यंत शिशूपालाचे होते, तितकेच. जेव्हा अपराधांची संख्या पुर्ण होते, किंवा अन्य कोणी आव्हान देण्यासाठी उभा ठाकतो, तेव्हा बाहूबलीचे आयुष्य संपण्याची वेळ येते. चिनची कहाणीही वेगळी नाही. त्याच्याशी तुल्यबळ लोकसंख्या असलेल्या भारताला फ़क्त बाजारपेठ समजण्याची त्याने घोडचुक केली आहे. त्यापेक्षाही भारतात कधीच कोणी खंबीर नेता उदयास येणार नाही, असाही खुळा समज करून घेतल्याचा हा परिणाम आहे. इथे देशासाठी आत्मसमर्पण करायला उतावळ्यांची संख्या कधीच कमी नव्हती आणि त्याची चुणूक सोमवारी मोजक्या भारतीय जवानांनी दाखवलेली आहे. त्यापैकी कोणी अर्थशास्त्री नव्हता. त्यामुळेच जेव्हा भारतीय सैनिक सीमेवर हुतात्मा व्हायला पुढे झेपावतो, तेव्हा सामान्य भारतीय माणूसही आपले योगदान म्हणून कुठलाही त्याग करायला सज्ज असतो. फ़क्त त्याला आपले नेतॄत्व करणार्‍यावर तितकी श्रद्धा असावी लागते. जेव्हा तसा नेता किंवा सेनापती नसतो, तेव्हा तोच भारत सुप्तावस्थेत निद्रीस्त असतो. त्याला डिवचू नये किंवा जागवू नये. लडाख प्रकरणात चिनने तीच चुक केली आहे. त्याला जवाहरलाल नेहरू व नरेंद्र मोदी यांच्यातला फ़रक ओळखता आलेला नाही. अन्यथा त्याने इतकी आत्मघातकी चुक नक्कीच केली नसती. आता ती चुक केलेलीच असेल तर त्याची किंमतही मोजावी लागणार आहे आणि ती किंमत केवळ सैनिकी युद्धातली नसेल तर आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातीलही असेल. कारण चिनी मालाला आज भारताइतका अन्य कोणी मोठा ग्राहक उरलेला नाही. कोरोनामुळे जगभरची बाजारपेठ ओस पडली आहे आणि भारतात गरीबी असली तरी ग्राहक संख्या मोठी आहे.

साधारण ४५ टक्के चिनी मालाची विक्री भारतात होते आणि म्हणूनच ग्लोबल टाईम्स या चिनी मुखपत्राने चिनी मालाशिवाय भारताला जगता येणार नाही, अशी दर्पोक्ती केली होती. पण तो चिनी माल भारतीय ग्राहकापर्यंत पोहोचवणार्‍या दुकानदार व्यापारी संस्थेनेच परस्पर उत्तर दिले आहे. कोट्यवधी दुकानदारांची संघटना असलेल्या या संस्थेने यापुढे चिनी मालाची आयात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि बदल्यात पर्यायी मालाचे भारतातच उत्पादन होण्याला प्रोत्साहन देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी आपल्या दुकानात येणार्‍या ग्राहक सामान्य नागरिकाला स्वदेशी माल व त्यातील राष्ट्रवाद शिकवण्याची जबाबदारी त्याच संस्थेने उचलली आहे. त्याचा अर्थ पुस्तकी अर्थपंडितांना समजू शकत नाही. कारण त्यांना जीवंत माणसे ठाऊकच नसतात. त्यांना वर्तमानपत्र वा पुस्तकातले आकडे म्हणजेच माणसे व लोकसंख्या वाटते. त्या लोकसंख्येतल्या भावना व भावविश्व त्यांचे निर्णय ठरवित असते. त्यासाठी कुठल्या अर्थशास्त्राचे दाखले नागरिक शोधत नाही किंवा मागत नाही. जनभावनाच चीन विरोधात प्रक्षुब्ध झालेली असेल, तर तिला कुठलेही अर्थशास्त्र बदलू शकत नाही की रोखू शकत नाही. हजारो मैल चालत आपल्या गावी पोहोचताना गाडी बस वा अन्य वहानासाठी लाचार नसलेला कोट्यवधी समाज त्याची साक्ष देत असतो. पण ते बघण्यासाठी व समजून घेण्यासाठी डोळे उघडे असायला हवेत आणि मेंदूही जागृत असायला हवा. त्या कोट्यवधी प्रवासी स्थलांतरीत मजुरांनी बिनतक्रार कष्ट घेतले आणि त्यांचे आकडे मोजत बसलेल्यांनीच अश्रू ढाळले होते. त्या अश्रू ढाळणार्‍यांना  भारत कधी समजलेला नाही, तर त्याच भारतातल्या नागरिकांच्या चीनविषयक भावना वा प्रक्षोभ कसा कळावा? त्यांना बहिष्काराची क्षमता कशाला उमजावी? त्यांनी अर्थशास्त्राचे निरर्थक अश्रू ढाळत बसावे. सामान्य कोट्यवधी भारतीय चिनला धडा शिकवायला सज्ज होत आहेत. त्याचे चटकेही चिनला बसू लागले आहेत.

आवडत्या पंतप्रधानाने साधे आवाहन केले आणि दोन कोटी कुटुंबानी आपले सुखवस्तु जीवन मान्य करून गॅसची सबसिडी सोडली. त्यातून आणखी सहासात कोटी गरीब कुटुंबियांना घरगुती गॅस सिलींडर जोडणी मिळू शकली. हा विश्वास त्या भारतीय लोकसंख्येवर आणि तिच्यातल्या सदिच्छेवर आधीच्या कुणा नेत्याने कशाला दाखवला नव्हता? नोटाबंदीच्या जाचक कालखंडातून कोट्यवधी जनता गेलीच ना? तिने कुठली किती तक्रार केली? तेव्हाही हे दिवाळखोर अर्थकारण बुडाले म्हणून रडतच होते ना? म्हणून देश थांबला नाही की संपलेला नाही. रडणार्‍यांनी टाहो फ़ोडला म्हणून देश मागे पडला नाही आणि चिनसुद्धा अशा समाजाला देशाला ग्राहक म्हणून वेठीस धरू शकत नाही. उलट आपल्या ग्राहकशक्तीच्या बळावर कोट्यवधी भारतीय चिनी सत्तेला, अर्थकारणाला व सेनेलाही ओलिस ठेवू शकतात. किंबहूना त्याचीच चाहूल लागल्याने चिनी राज्यकर्ते सैरभैर झालेले आहेत. अर्थकारणाला भारत जुमानत नाही म्हणून चिनी ड्रॅगनने सैनिकी फ़णा उगारला आहे. पण सामान्य भारतीयातला कालियामर्दन जागा झाला तर तो कितीही फ़णांच्या ड्रॅगनच्या माथ्यावर थयथया नाचू शकतो, हे सत्य आहे. चिनी मालावरच्या बहिष्कारातून चिनी अर्थव्यवस्था उलथून पडणार नाही. पण डळमळीत होऊ शकते आणि जेव्हा अर्थकारणाचाच तोल जातो, तेव्हा प्रशासन व सैनिकी बळाचाही तोल जाण्याला पर्याय नसतो. अर्थकारण सैन्यासाठी रसद असते, या देशात अर्धपोटी राहून जय जवान जय किसान घोषणा यशस्वी करणारी पिढी झालेली आहे. घरातले दागदागिने सैन्याच्या खर्चाला दान करणार्‍या रणरागिणी इथल्याच आहेत. त्याचे ज्ञान व भान असलेला माणूस पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करतो आहे. चिनी मालाचा बहिष्कार त्याचा एक पैलू आहे. त्याचे भयंकर प्रतिबिंब चिनी नेते बघू शकतात. म्हणून तर अमुल बेबीच्या एका व्यंगचित्राने त्यांना घाम फ़ुटतो. जेव्हा हा बहिष्कार उलगडत जाईल तेव्हा चिनी राज्यकर्त्यांपासून भारतीय अर्थशास्त्र्यांची किती गाळण उडाली असेल, त्याची नुसती कल्पना करावी.

29 comments:

  1. भाऊ हेच विचार डावे,काँग्रेसी,मोदीजी द्वेष करणारे कधी करणार.मस्तच ब्लाॅग. जयहिंद

    ReplyDelete
  2. बरोबर आहे भावू 🙏🙏👍🌹

    ReplyDelete
  3. सत्य आहे, सध्या चिनी मालावर बहिष्कार टाकण्याने काहीही फरक पडणार नाही अश्या पोस्ट फिरत आहेत.
    आपण अत्यंत समर्पक मांडणी केल्याने मुद्दे पटतात.
    बहिष्कार अस्त्र खूप प्रभावी आहे, याचे प्रत्यंतर येणाऱ्या काळात येईलच.

    ReplyDelete
  4. खूप सुंदर विश्लेषण भाऊ....वाचताना लेख संपूच नये असं वाटत होतं.....

    ReplyDelete
  5. Feeings of All Bharatiya expressed in fitting nicely

    ReplyDelete
  6. भाऊ, अगदी सत्य लिहिलेत. भारतीय समाज हा तसा शांत, नको तितका सहिष्णू आणि सोशिक त्यामुळे सहनशिलतेचा कडेलोट व्हायला वेळ लागतो पण एकदा का सहनशीलता संपली की मग 20 च्या बदल्यात इतके मारले जातात की आकडा किती सांगायचा याच्यासाठी चीनला राष्ट्राध्यक्षांची परवानगी लागते. (म्हणजे जो आकडा येईल तो खोटा असेल हे नक्कीच)

    पण ज्यांची जनसामान्यांपासूनची नाळ तुटलेयं ते अशी मुर्खासारखी विधाने करणारच, कारण त्यांना ही मोदींना कोंडीत पकडण्याची संधी वाटतेय. पप्पू गांधी आणि त्याची मातोश्री पण त्यातलेच. काल सर्व पक्षीय बैठकीत मोदी सरकारची परराष्ट्रनिती कशी चुकली ही बैठक आधीच घ्यायला हवी होती(म्हणजे कधी?) असं शिरा ताणून बोलल्या, पण हे चीनने जे घडवलंय ते पार नेहरुपासून स्वतःच्याच पक्षाचे फलीत आहे, हे त्यांना त्यांच्या पक्षातील कोणी सांगितले नाही किंवा ते समजण्याची त्यांची कुवत नाही. टिका करणे तुमचा हक्क आहे पण या प्रसंगात आम्ही सर्व एक आहोत हे सांगायला विसरल्या का तर मोदी द्वेष. बाकीच्या सर्वांनी आम्ही या प्रश्नात सरकारसोबत आहोत हे निःसंधिग्धपणे सांगून टाकले. हेच मोदींना देशवासियांना दाखवायचे होते बहुतेक की संपूर्ण देश चीनच्या विरोधात एकवटत असताना हे कॉंग्रेसचे भडभुंजे काय करतात?

    ReplyDelete
  7. Nicely explained but INC and others continue to keep shouting.

    ReplyDelete
  8. भाऊ
    लेख नेहमीप्रमाणे छानच.विरोध करण्याच्या नादात राष्ट्रविरोध होतोय हे काॅन्ग्रेस लक्षात घेत नाहीये पण त्यामुळे त्यांचा उरला सुरला जनाधार संपून जाईल.लोकाना देशाविरुद्ध संकट असताना विरोध आवडत नाही हे त्यांच्या ज्येष्ठ नेत्यानी समजाउन सांगायला हवे.

    ReplyDelete
  9. अत्यंत सुंदर लेख.
    चीन आणि काँग्रेस दोघांचेही एकदमच क्रियाकर्म उरकून टाकायला हवे.

    ReplyDelete
  10. विचार पटलेत भाऊ. तसंही, भारतीय समाज, अंतर्गत कितीही भांडत राहिला तरीही, देशावर संकट येताच सगळं विसरून एक होऊन उभा राहतो हे अनेकदा दिसलंय. स्वातंत्र्यपूर्व भारताच्या इतिहासात एक न होण्याची उदाहरणे विखुरलेली दिसतात आणि त्याचे परिणामही. बर्‍याच जणांना हा इतिहास वाचवत नाही, त्रास देतो; त्याचं कारणही एक न होण्यामागची चीडच असते. जर तेव्हा एक झालो असतो तर बर्‍याच गोष्टी टाळता आल्या असता हीच भावना, हाच सल मनांत असते.
    आपला इतिहास आपल्याला माहित हवा आणि त्यातून आपण काय शिकतो ते अत्यंत महत्त्वाचे असते. आज हेच पुन्हा अधोरेखित होतंय. सरकार स्वत: आयात केवळ युद्ध परिस्थितीत ऑफिशियली रोखू शकतं. पण नागरीक बहिष्कार टाकत असतील तर तो त्यांचा स्वतःचा निर्णय असेल.

    खरंतर आज आपण या प्रसंगाला संधी समजून पुढे गेलं पाहिजे.
    - भारतीय उत्पादनांना बाजार उपलब्ध आहे.
    - रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची गरज आहे.
    - सरकारनं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न मांडलंय.
    - नागरीक चिनी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी तयार आहेत.
    हीच वेळ योग्य आहे उलथापालथ करण्याची.

    काल परेश रावल यांनी मांडलेली "मेड इन चायना" असे लेबल लावण्याची सूचना आवडली. त्यालाच थोडं विस्तृत करून सर्व उत्पादनांवर "मॅन्युफॅक्चर्ड इन " असं केलं तर या चीन विरोधी मोहिमेला खूप बळ मिळेल.

    ReplyDelete
  11. One day or other it has to start yes it is today we are together to teach lesson to Chinese.When our Chhatrapati Shivaji Maharaja started movement’s again MUGHALS he has not got 100% support .Even Mahatama Gandhi has not got 100% support.Once the movements will be in pick all political parties has to support.

    ReplyDelete
  12. Nehamipramane ch khup chaan article ✍️🙏🌹👍✅💯☑️

    ReplyDelete
  13. अंगावरती शहारे आले.अप्रतिम लेख आहे.

    ReplyDelete
  14. छान लिहिले आहे. इंग्रजांची सत्ता असताना टिळक, गांधी इ. नी स्वदेशी आणली. आता तर जगच चिनविरोधी आहे. हे प्रयत्न जनसंघटनांनी सातत्याने केले पाहिजे.दुकानांत स्वदेशी कप्पा वेगळा असावा. धन्यवाद. शेअरिंग

    ReplyDelete
  15. Bhau please go through this link
    https://timesofindia.indiatimes.com/blogs/toi-edit-page/understand-chinas-india-strategy-nibbling-territory-isnt-the-point-of-it-it-is-to-condition-indias-mind-and-tie-its-hands/

    ReplyDelete
  16. कोणत्याही देशाच्या वस्तूवर बहिष्कार घालण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यापेक्षा जास्त चांगल्या आणि स्वस्त वस्तू बनवल्या तर त्यावर आपोआपच बहिष्कार पडेल. चीनचा मुख्य भर आहे तो वस्तू स्वस्त देण्यावर.यासाठी ते कामगाराकडून पूर्ण क्षमतेने काम करवून घेतात. आणि तेथील कामगार देखील वेळ वाया न घालवता काम करतात. भारतातील कामगाराणी तसे केले व उत्तम दर्जाचा माल व वस्तु बनवल्यातर आपल्याला चीन वर अवलंबून राहावे लागणार नाही.

    ReplyDelete
  17. श्री भाऊ तुमचं कौतुक करावे तेवढं कमीच तुम्ही आमच्या मनातलं जसेच्या तसे उतरवलं आहेत

    ReplyDelete
  18. परखड ,समोयोचीत लिखाण,बिग सल्यूट भाऊ.

    ReplyDelete
  19. चिनी मालावर बहिष्कार टाकणे हे सर्वोत्तम शस्त्र आहे. फक्त भारतीय उत्पादकांनी त्यांची उत्पादने योग्य किंमतीत विकावी, जेणेकरून चिनी उत्पादनाचे आकर्षण कमी होण्यास सहाय्यभूत ठरेल.

    ReplyDelete
    Replies
    1. ही अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे?..आपल्या देशात चीन प्रमाणे कामगार वेठबिगार नाहीत.उलटपक्षी जरा कारखाना बरा चालू लागला की लगेच आसपासचे डोमकावळे अवास्तव मागण्या करून स्वतःचे उखळ पांढरे करून घ्यायला टपलेलेच असतात!/ः
      चीनी माल आता उत्तम फिनिशिंगचा मिळत असला तरी त्याचा टिकाऊपणा जात्याच कमी असतो.पण इतरांच्या पेक्षा सर्वसंमत पण मसरत असल्यानेच घेऊन 2/3वर्षात फेकून देण्याची सवय आपल्यात रुजवली गेली आहे जी इलेक्ट्रॉनिक कचरा ही निर्माण करते असे मला वाटते.

      Delete
    2. ही अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे?..आपल्या देशात चीन प्रमाणे कामगार वेठबिगार नाहीत.उलटपक्षी जरा कारखाना बरा चालू लागला की लगेच आसपासचे डोमकावळे अवास्तव मागण्या करून स्वतःचे उखळ पांढरे करून घ्यायला टपलेलेच असतात!/ः
      चीनी माल आता उत्तम फिनिशिंगचा मिळत असला तरी त्याचा टिकाऊपणा जात्याच कमी असतो.पण इतरांच्या पेक्षा सर्वसंमत पण मसरत असल्यानेच घेऊन 2/3वर्षात फेकून देण्याची सवय आपल्यात रुजवली गेली आहे जी इलेक्ट्रॉनिक कचरा ही निर्माण करते असे मला वाटते.

      Delete
  20. Please do the video on Nehru China in Hindi. Many people do not know it.

    ReplyDelete
  21. भाऊ चीनच्या सद्य विषयावरील यूट्यूब प्रतिपक्ष मधील व्हिडीओ ऐकला.त्यात उल्लेख केलेले महावीर त्यागी कॉंग्रेसचेच होते.. जनसंघाचे नाहीत.
    तसेच अरेबियन नाईटस् मधील राजाची आवडती राणी व्यभिचारी असल्याचा त्याला पुरावाच त्याला मिळतो म्हणून संतापाने तो रोज नवे लग्न करून तिला मारून टाकण्याचे सुरू करतो.प्रधानाची अतिशय हुशार कन्या विविध उत्कंठावर्धक कथा हजार दिवस सांगते व त्याला प्रभावित करून त्याचा राण्यांना ठार मारण्याचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडते... तात्पर्य...पप्पूची तिच्या खेटरापाशी बसायचीही लायकी नाही!😂

    ReplyDelete
  22. Aatach vachat hoto:
    In 1962 congi leader Shri Manishankar Aiyar was studying in Britain Even at that time he was supporting the army of China. He collected 3 lakh pounds for China army by rranging donation camp.
    Afterwards he was made a senior cabinet minister on Congress govt Is it true?

    ReplyDelete
  23. सुंदर व सत्यदर्शक लेख. विरोध करणारे हे काहीच करु शकत नसल्याने, त्यांच्या दुकानदारी बंद होईल या भितीत ते आहेत.

    ReplyDelete
  24. कुबेर आज पुन्हा Xगलाय

    ReplyDelete
  25. BEFORE ITS TOO LATE


    This is one of the reason why Indians should boycott China before it's too late......


    A Rahul Jangam Film
    https://youtu.be/g_djYUZWkZw

    ReplyDelete