व्हय व्हय महाराष्ट्र माझा, बुडवा महाराष्ट्र माझा
खर्चा महाराष्ट्र माझा, तुडवा महाराष्ट्र माझा
भिती न आम्हा तुझी मुळीही गडगडत्या माध्यमा
मंत्रीपदाच्या सुलतानीला नाही कुणाची तमा
बारामतीचा टग्या गर्जतो अजाणता राजा
भूखंडातून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
ठेवा खर्चा कृष्णखोर्याचा पैसा लवासावरी
जलसंपदा झाली आपदा म्हणे सुनील तटकरी
भीमथडीला पडली कोरड, बिसलेरी पाणी पाजा
बांधबंधारे रडती म्हणती महाराष्ट्र माझा
काळ्या मातीतूनी कोरली बंधार्याची लेणी
पाण्य़ाचा तर पत्ता नाही परी तुंबली देणी
पृथ्वीला तो पुरून उरला
राजीच्या नाम्यातही शिरला
काकावरती तो गुरगुरला, तो गुरगुरला
एकच वादा म्हणतो दादा महाराष्ट्र माझा
No comments:
Post a Comment