(अकादमी पुरस्कार परत करणार्या सारा जोसेफ़ यांचा हा अवतार कोणी सांगायचा?)
सध्या सगळीकडे आपल्या पुरोगामी सभ्यतेचे प्रदर्शन मांडण्याची स्पर्धा चालली आहे. आपापले पुरस्कार परत करून आपण किती सभ्य आहोत, त्याची उदघोषणा करण्याच्या या शर्यतीत मग मागे राहिलो, तर आपल्यावरही असभ्यतेचा शिक्क मारला जाईल, असे भय त्यातून लपत नाही. काही दिवसांपुर्वी प्रा. शेषराव मोरे यांनी ‘पुरोगामी दहशतवाद’ अशा शब्दाचा वापर कशाला उद्देशून केला होता, त्याची ही प्रचिती आहे. पुरस्कार कसला, कशासाठी मिळाला वा घेतला, त्याचेही भान नसल्यासारखी ही मोहिम राबवली जाते आहे. त्यातून मग आपण सभ्य किंवा अभिजन वर्गातले आहोत हे दाखवण्याची ही पळापळ आहे. हे कोण लोक आहेत? दिवंगत विचारवंत प्रा. मे, पुं, रेगे यांनी त्याची नेमकी व्याख्या केलेली आहे.
‘समाजात जेव्हा एखादा वरीष्ठवर्ग, अभिजनवर्ग असतो, तेव्हा त्याचे सदस्य एकमेकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळताना आढळतात. याची उलट बाजू अशी की, या वर्तुळाच्या बाहेरच्या व्यक्तीशी, कनिष्ठ व्यक्तीशी वागताना ते जाणूनबुजून असभ्य रितीने वागतात. सामाजिक समतेच्या दिशेने वाटचाल करताना, या कृत्रीम सभ्यतेवर आणि कृत्रीम असभ्यतेवर आघात करावेच लागतात. अधिकाधिक व्यक्तींना सभ्यतेच्या परिघात आणावे लागते आणि कृत्रीम सभ्यपणा अधिक सुटसुटीत करावा लागतो. या प्रक्रियेत एकेकाळी असभ्य मानल्या गेलेल्या वागण्याच्या रिती सभ्य म्हणून स्विकारल्या जातात. पण याचा अर्थ असा नव्हे की, सभ्यतेचा दंडकच झुगारून देण्यात आलेला असतो. समाजातील व्यक्ती एकमेकांची कदर करीत सामंजस्याने, सुसंवादाने एकत्र रहायची असली तर समाजात सभ्यतेचे दंडक असावेच लागतील. समाजात असे दंडक आहेत याचा अर्थच असा की, समाजातील बहुसंख्य माणसे बहुसंख्य प्रसंगी ते दंडक पाळतात. शिवाय त्याचा अर्थ असा की, जबाबदारीने वागणारा माणूस हे दंडक सर्व प्रसंगी पाळण्याचा सतत प्रयत्न करीत असतो.’
दोन दशकांपुर्वी शिवसेनाप्रमुखांच्या एका मुलाखतीचा संदर्भ घेऊन रेगे यांनी प्रदिर्घ लेख लिहीला होता. त्याचे शीर्षक होते, ‘ठाकरे अशी भाषा का बोलतात?’ विनाविलंब अनेक अभिजन त्याचा धागा धरून ठाकरे यांच्यावर तुटून पडलेले होते. पण त्या तमाम सभ्य अभिजन साहित्यिक कलावंतापैकी कितीजणांनी त्याच लेखातला उपरोक्त परिच्छेद काळजीपुर्वक वाचला होता? सभ्य व असभ्य यांची व्याख्या रेगे करतात तशीच सभ्यता कोण निर्माण करतो, त्याचाही तपशील इथे देतात. त्यात रेगेसरांनी कुठेही असभ्य वा सामान्य माणसे सभ्य लोकांशी असभ्य वागतात, असे म्हटलेले नाही. उलट तसा भेदभाव फ़क्त अभिजन व सभ्य लोकच करतात, याचीच ग्वाही दिली आहे. ‘अभिजनवर्गातले सदस्य एकमेकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळतात’, म्हणजे आपला तो बाब्या म्हणून त्याचे अपराध लपवतात, झाकतात असे रेगेसरांना म्हणायचे नाही काय? म्हणजे असे, की सध्या सुप्रिम कोर्टाने तीस्ता सेटलवाड यांना जामीन नाकारला, तर त्यावर कोणी पुरोगामी साहित्यिक, विचारवंत वा संपादक पत्रकार चकार शब्द बोलणार नाही. तिला जाब विचारणार नाही. कारण तीस्ता अभिजनवर्गातली आहे ना? पण जेव्हा कधी हीच तीस्ता मोदी वा अमित शहावर बेछूट खोटेनाटेही आरोप करीत होती, तेव्हा तिचा शब्द ब्रह्मवाक्य समजून मोदींना फ़ासावर चढवायलाही हेच अभिजन एका पायावर सज्ज असायचे. आज त्याच तीस्ताच्या गुन्ह्याची लक्तरे कोर्टात धुतली जात असताना, कशी आळीमिळी गुपचिळी आहे? उलट तिकडे कोणाचे लक्ष जाऊ नये, म्हणून पुरस्कार परतीचा नवाच धुरळा उडवण्याची स्पर्धा चालू आहे. यालाच आपल्या सदस्याशी अतिरेकी सभ्यतेने वागणे म्हणतात. त्याची दुसरी बाजूही रेगेसर कथन करतात. आपल्या अभिजन ‘वर्तुळाच्या बाहेरच्या व्यक्तीशी, कनिष्ठ व्यक्तीशी वागताना ते (अभिजन) जाणूनबुजून असभ्य रितीने वागतात.’
सध्या कुठलेही निमीत्त धरून अकादमी पुरस्कार परत करण्याच्या नाटकाची प्रेरणा यातून आपल्याला उलगडू शकेल. आजवर अशा अनेक घटना आधीच्या सत्ताधीशांच्या कारकिर्दीत घडल्या. तेव्हा यातला कोणी साहित्यिक वा विचारवंत, कलावंत विचलीत कशाला झालेला नव्हता? त्याचे उत्तर गुन्हेगार आपल्याच वर्तुळातले व परिघातले असल्याने (अतिरेकी सभ्यता म्हणून) त्याकडे काणाडोळा केला. पण तशीच काही किरकोळ घटना घडली, मग दुसर्या टोकाची प्रतिक्रिया उमटलेली आहे. कारण नरेंद्र मोदी, भाजपा, शिवसेना हे अभिजनांच्या वर्तुळातले नाहीत ना? त्यांच्या पुरोगामी वर्तुळातले नाहीत ना? मग त्यांच्याशी ‘जाणूनबुजून अतिरेकी असभ्य’ वागणे भागच नाही काय? हाच अभिजन वा सभ्य असण्याचा निकष आहे. अगदी लहानसहान गोष्टीत अभिजन पुरोगामी म्हणवणार्यांची हीच वर्तनशैली दिसून येईल. मात्र अशा अभिजनांचे समाजाने कधीच मानले नाही किंवा त्यांचे संस्कार कधीच स्विकारलेले नाहीत. ज्याला हे अभिजन आज सुसंकृतपणा म्हणतात, त्याचे जनकत्वही त्यांचे नसते, याची रेगेसर ग्वाही देतात. ज्याला सभ्यता म्हणतात, तिची निर्मिती असभ्य लोकच करतात असाही रेगेसरांचा दावा आहे. ‘अधिकाधिक व्यक्तींना सभ्यतेच्या परिघात आणावे लागते आणि कृत्रीम सभ्यपणा अधिक सुटसुटीत करावा लागतो. या प्रक्रियेत एकेकाळी असभ्य मानल्या गेलेल्या वागण्याच्या रिती सभ्य म्हणून स्विकारल्या जातात.’ यात कुठे सभ्य अभिजनांनी कौतुक केलेल्या वा निर्माण केलेल्या गोष्टी सभ्य म्हणून सामान्य कनिष्ठ समाजाने स्विकारल्याचा दावा नाही. पण त्याच सामान्य माणसांच्या चालिरीती अभिजनांनी स्विकारल्या व त्यांनाच सभ्यता म्हणून मान्यता दिल्याचा दावा आहे. म्हणजेच अभिजनांचे कर्तृत्व काय? अगोदर ज्याला असभ्य म्हणून नाक मुरडायचे त्यालाच नंतर सभ्य म्हणुन स्विकारायचे.
काय भंपकपणा असतो बघा. म्हणजे जो खरा चांगला व भविष्यकाळात सभ्य म्हणून स्विकारल्या जाणार्या कृती आज करत असतो, त्यालाच हिणवायचे, त्याचीच निंदा करायची. त्यातून संस्कृती व समाज रसातळाला जाणार म्हणून गळा काढायचा. त्यासाठी पुरस्कार परत करायचे. आणि त्यासाठी कवडीचीही किंमत मिळत नाही, तेव्हा मग गुपचुप त्याच नाकारलेल्या ‘असभ्य’ गोष्टी सभ्य म्हणून मान्यता देऊन करू लागायचे. ही लबाडी करणार्याला रेगेसर अभिजन म्हणतात. याचाच व्यवहारी अर्थ असा की आयत्या बिळावर नागोबा! आपण काही करायचे नाही, वांझोट्या कर्तबगारीच्या गमजा करायच्या आणि फ़ळ येऊ लागले, की आपलाच शिक्का त्यावर मारून संस्कृतीच्या नव्या गमजा सुरू करायच्या. त्यात काहीही नवे नाही. आज शाहू फ़ुले आंबेडकरांच्या नावाची जपमाळ ओढणार्यांच्या तात्कालीन पुर्वजांनी नेमके हेच केलेले होते. तेव्हाचा अभिजन, सुसंस्कृत वा बुद्धीमंत वर्ग जोतिराव फ़ुले यांच्या पाठीशी उभा राहिला होता काय? जोतीरावांवर काय काय आरोप झाले? त्यांना तात्कालीन बुद्धीमंत समजल्या जाणार्या वर्गाने डोक्यावर घेतले नव्हते, तर त्यांचीच सातत्याने हेटाळणी केली होती. तेव्हाचे असभ्य फ़ुले जणू आमच्याच पुर्वज वडीलधार्यांनी घडवले, असा आजच्या बुद्धीमंतांचा आव नाही काय? हीच जगरहाटी आहे. त्यात समकालीन बुद्धीमंत ज्याची हेटाळणी वा निंदा करतात, ते लोक समाजाला पुढे घेऊन जाणारे नसतात. पण भाषा मात्र पुरोगामी असल्याची करतात. पण अशा तात्कालीन पुरोगाम्यांनी ज्यांच्यावर प्रतिगामी म्हणून चिखलफ़ेक केलेली असते, तेच भविष्यातले पुरोगामी असतात. कारण त्यांच्या गोष्टीच ‘सुटसुटीत’ म्हणून स्विकारल्या जातात. मग नव्या पिढीतले अभिजन त्यावर नागोबासारखे येऊन हुकूमत गाजवू लागतात. आजच्या साहित्य अकादमीच्या पुरस्कार परतीचा खेळ त्यापेक्षा नवा नाही.
(ज्यांना रेगेसरांचा मूळ लेख वाचायचा असेल, त्यांनी पुढील दुव्यावर जावे)
http://jagatapahara.blogspot.in/2014/12/blog-post_50.html

साहित्यिक लोकांनी आपले सरकारी पुरस्कार परत केले रकमेसह आता आम्ही वाट बघतो की ते आपली सरकारी कोट्यातील घरे कधी परत करणार...
ReplyDeleteModiji n che sahakari Sharma, Aadityanath, Sakshi Maharaj, Prachi pudhe fule,Shahu, Aambedkaranchya panktit basanar tar! Jai ho!
ReplyDeleteआज काल तीन लोकांचे नाव घेऊन लोक आपल्याला महान समजू लागतात पण या नावाशी प्रामाणिक राहणारे फार कमी आहेत उगीचच फुले आंबेडकरांचे नाव घ्यायचे नंतर जेल मध्ये तुकडे तोडायचे,
ReplyDelete