Monday, October 12, 2015

सुधींद्र कुलकर्णी कोणासाठी ‘शहीद’ झाले?



तोंडाला काळे फ़ासले म्हणून आज मिरवणारे सुधींद्र कुलकर्णी कोण आहेत? मागल्या वर्षी पाकिस्तानात सईद हाफ़ीजला जाऊन वेदप्रकश वैदिक भेटल्याने जो गदारोळ उठला होता, त्यातले एक भागिदार अशी या कुलकर्णींची ओळख आहे. अर्थात तितकीच त्यांची ओळख नाही. तसे त्यांचे अनेक चेहरे आहेत. वेळोवेळी त्यांनी नवा मुखवटा लावून केलेली कामगिरी खरे तर पाकिस्तानने त्यांचा सन्मान करावी अशीच आहे. ‘निशाने पाकिस्तान’ द्यावा इतकी गौरवास्पद कामगिरी करणार्‍यांमध्ये सुधींद्र कुलकर्णी यांचा समावेश होऊ शकतो. कसुरीला त्यांनी इथे आमंत्रित करून सन्मान करावा हे स्वाभाविकच आहे. कारण वेळोवेळी आय एस आयच्या पैशावर ज्या मुठभर भारतीयांना पाकिस्तान मौजमजा करायला आमंत्रण देत असते, ती जबाबदारी तिकडून कसुरीच उचलत असतात. इथे कुठल्या तरी संस्थेचे नाव पुढे करून कुलकर्णी यांनी ती कामगिरी पार पाडली. मात्र आपल्या चेहर्‍यावर माखलेले काळे पुसून टाकण्यापेक्षा हा माणूस तसाच कशाला मिरवत होता, असा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर त्याचेही उत्तर शोधणे भाग आहे. एका बाजूला त्यांना इथल्या भोंगळ उदारमतवाद्यांची सहानुभूती हवी होतीच. पण दुसरीकडे त्यातून फ़ार मोठा हेतू साध्य करायचा असणार. आपण पाकिस्तानसाठी मायदेशी किती बदनाम होऊन हाल सोसतोय, याचे प्रदर्शन अधिक किंमती असते, हे विसरता कामा नये. कसुरी यांच्यासोबत तसाच काळे माखलेला फ़ोटो व चित्रण पाकिस्तानात सर्वदूर दाखवले जाणार आणि मग शिवसेनेला दहशतवादी ठरवण्यासाठी एक पुरावा पाकिस्तानला मिळतो ना? अर्थात अशा हुल्लडबाजीला दहशतवाद म्हणत नाहीत. पण ज्यांना पराचा कावळा करायचा असतो, त्यांच्या हाती कोलित देण्याचे काम तर पार पाडले गेले ना? कुलकर्णी म्हणून तर त्या काळतोंडाने मिरवत राहिले.

पण तोही विषय सध्या बाजूला ठेवू. मुळात कम्युनिस्ट संस्कारात वाढलेला हा पुरोगामी माणूस पंचवीस वर्षापुर्वी लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचे वृत्तांकन करायला त्यांच्या सोबत फ़िरत होता. त्या यात्रेचे नियोजन करणारे नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यासाठीचे इच्छुक लालकृष्ण अडवाणी कुठल्या कुठे अडगळीत फ़ेकले गेले आहेत. अनेकांचा असा समज आहे, की मोदींनी आपल्या राजकीय गुरूला संपवून सत्तास्पर्धेत बाजी मारली. पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. मोदी केवळ योगायोगाने पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले. परिस्थितीने मोदींना त्या वळणावर आणून उभे केले. अन्यथा अडवाणी कधीच पंतप्रधान झाले असते. पण त्यांच्या त्या प्रयत्नांना पोटात शिरून सुरूंग लावण्याचे काम सुधींद्र कुलकर्णी यांनी अतिशय योजनाबद्ध रितीने पार पाडले. मात्र आपण कसे व कोणामुळे बुडालो, त्याचा थांगपत्ता अडवाणींनी अजून लागलेला नाही. वाजपेयी यांच्यानंतर मागल्या दहा वर्षात अडवाणीच भाजपाचे सर्वोच्च नेता होते आणि त्यांचे राजकीय सल्लागार व भाषणे लिहून देणारे गृहस्थ होते सुधींद्र कुलकर्णी! २००८ साली अणूउर्जा विषयावर डाव्यांनी युपीए सरकारचा पाठींबा काढून घेतल्यावर अधिकचा पाठींबा मिळवण्यासाठी तिघा भाजपा खासदारांना कोट्यवधी रुपये लाच देण्याचे प्रकरण गाजले होते, आठवते? त्याचे पोरकट स्टिंग घडवून आणणारे हेच कुलकर्णी होते. पण त्याहीपेक्षा त्यांनी पार पाडलेली मोठी कामगिरी म्हणजे संघ आणि अडवाणी यांच्यात बेबनाव निर्माण करणे. मुशर्रफ़च्या कारकिर्दीत अडवाणींना लाहोरच्या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले आणि तिथे जाऊन जिनाच्या कबरीवर तो नेता कसा सेक्युलर होता, असे ज्ञान अडवाणींनी पाजळले होते. त्याचा सुत्रधार कुलकर्णीच होता. तिथून मग मायदेशी परतलेल्या अडवाणींना संघाची नाराजी पत्करावी लागली. आज त्यांची काय अवस्था आहे?

अडवाणी संघाच्या मर्जीतून उतरले आणि त्यांना संसदेतील विरोधी नेतापदही सोडावे लागले होते. तसे बघितले तर आग्रा येथे आलेल्या मुशर्रफ़ यांच्या जाहिरनाम्यात मोडता घालणारा अडवाणी हाच लोहपुरूष होता. पण सुधींद्र कुलकर्णींनी त्याला सेक्युलर भट्टीत टाकून असा वितळून टाकला, की ती मेणाची बाहुलीच होऊन गेली. तिथून मग पंतप्रधान व्हायचे अडवाणींचे स्वप्न कायमचे धुळीस मिळाले. मग मोदींचा उदय झाल्यावर अडवाणी अधिकच भरकटत गेले. त्यामागचा सुत्रधार कोण होता? त्याचे वेगळे नाव इथे सांगण्याची गरज आहे काय? त्या काळातील सौम्य भाषेत अडवाणींनी लिहीलेले ब्लॉग वा केलेली वक्तव्ये आणि त्याच विषयावर कुलकर्णी यांची टोकाची विधाने लेख तपासून बघितली; तर अडवाणींना धुळीस कसे सहजगत्या मिळवले गेले, त्याची खतरजमा करून घेता येईल. संघ व भाजपा यांच्या मनातून अडवाणी कसे संपून जातील, तसेच त्या अनुभवी नेत्याला वागायला भाग पाडणे सोपे काम नव्हते. पण निकटवर्ति बनलेल्या सुधींद्र कुलकर्णींनी अडवाणींना बघता बघता नामशेष करून टाकले. मात्र चमत्कारीक गोष्ट बघा, आजही अडवाणींना ते उमजलेले नाही. कालपरवाही शिवसेनेने कुलकर्णींबाबत विरोध सौम्य करावा, असा प्रयास अडवाणीच करीत होते. मुशर्रफ़ यांच्या आग्रा भेटीत काहीही निष्पन्न होऊ शकले नाही, त्याचे कारण अडवाणी होते आणि असा माणूस उद्या पंतप्रधान झाला तर भारतापुढे गुडघे टेकायची वेळ येईल, असे मुशर्रफ़ व त्यांचे परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांना वाटले तर नवल नव्हते. मग त्यांचे वा पाक हेरखात्याचे पहिले लक्ष्य अडवाणींना संपवायचे असेच असणार ना? योगायोग बघा, त्याच कसुरींच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी कुलकर्णी शिवसेनेकडून ‘शहीद’ झाले आहेत. तेच कसुरी कुलकर्णी-बरखा अशा पत्रकारांना पाकमच्ये मेजवान्याही देतात.



१९८४ सालात जमिनदोस्त झालेल्या भाजपाला पाच वर्षात देशातला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून उभा करणारा उत्तम संघटक अडवाणी! हिंदूत्व आणि रामजन्मभूमी या विषयावर देशभर आक्रमक पवित्रा घेऊन सत्तेत पालट घडून येऊ शकतो, असा प्रयोग यशस्वी करून दाखवणारा आक्रमक नेता अडवाणी! अटलजींच्या समजूतदार राजकारणाचा गैरफ़ायदा घेणार्‍या मुशर्रफ़ला रोखण्याची हिंमत करणारा गृहमंत्री अडवाणी! इतक्या भरभक्कम माणसाला त्याच्याच पोटात व गोटात शिरून जमिनदोस्त करण्याच्या बदल्यात तोंडाला काळे फ़ासले जाण्याची किंमत किती क्षुल्लक असू शकेल? अडवाणींच्या सोबत भाजपालाही निकामी करून टाकण्याची कामगिरी किरकोळ नसते. तिथेच विषय संपणारा नव्हता. आधी भाजपाचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता मोदींमुळे निर्माण झाल्यावर त्यात मोडता घालण्यापर्यंत अडवाणींना मोहर्‍याप्रमाणे वापर झाला आणि आजही होतो आहे. अडवाणींनी पक्षातील सर्व पदांचे राजिनामे दिल्यावर याच कुलकर्णीनी नवा वेगळा पक्ष काढण्याचा अडवाणींना जाहिर सल्ला दिला होता. तो भाजपाला विखंडीत करण्याचा डाव नव्हता काय? सुदैवाने तितकी हिंमत अडवाणींना झाली नाही. दोन वर्षापुर्वीचे कुलकर्णी यांचे लेख मुलाखती तपासून बघा. मोदींवर किती व कशा तोफ़ा डागल्यात, त्याचे शेकडो पुरावे सापडतील. असे सगळे धागेदोरे शोधून काढले, तर तोंडाला फ़ासलेले काळे कुलकर्णी कशासाठी मिरवत होते, त्याचा अंदाज येऊ शकेल. त्यांना सहानुभूती मिळवण्यापेक्षा ‘शहीद’ झाल्याचे प्रदर्शन मांडायचे होते. आपण कसुरी, पाकिस्तान यांची आघाडी भारतातून लढवत आहोत, हेच जगाला दाखवायचे होते. त्यात त्यांना शिवसेनेने मोठे सहकार्य केले. हे सगळे धागे ज्यांना माहित नाहीत वा समजून घेण्याची गरज वाटत नाहीत, त्यांची कींव करावी तितकी थोडीच आहे. आपल्या समजुती व पुर्वग्रहानुसारच जग बघणार्‍यांना उगवलेला सुर्य वा अमावास्येचा अंधारही कोणी दाखवू शकत नाही. त्यांना कुलकर्णींचे काळे माखलेले तोंड दाखवून उपयोग काय?

9 comments:

  1. हा लेख रहस्यमय कादंबरी इतका खिळवून ठेवणारा आहे. तथ्याच्या खूप जवळ वाटतो. भाऊ, कमिशनर मारिया सगळा वेळ त्या मुलीच्या खुनात का घालवतात ह्या विषयी तुम्ही त्या वेळी लिहिले होते. तेव्हा असे वाटले होते कि बरीच गाडलेली म्हडी वर येतील पण असे काही न होता मारियाच तुमच्या वाचकांना खूप अनुत्तरीत प्रश्न सोडून पडद्यावरून गायब झाले, केले गेले. ह्या बाबतीत असे काही होण्याची शक्यता किती असावी हे तुम्हीच जाणता.
    तुम्ही ह्या माणसाला इतका नागडा केला तरी हा परत एका बलीदानीत वीरा सारखा उद्या उजळ तोंडानी वावरायला लागेल हि शक्यता जास्त वाटते.

    ReplyDelete
  2. भाऊ; एकदम बरोबर.
    पण या सर्व प्रकरणात भाजपा सरकारची चूक नाही का ? मुळात हा कसूरी भारतात आला कसा ; त्याला परराष्ट्र खात्याने visa दिला म्हणून. महाराष्ट्रतल्या भाजपा सरकारने ह्या खाजगी कार्यक्रमाला का संरक्षण पुरवले ? देवेन्द्र फडणवीस यांच्या कडे च गृहमंत्री पद आहे ना ? केंद्रीय आणि राज्यीय भाजपा नेत्यांना कुलकर्णीची वस्तुस्तिथी; पार्श्वभूमी माहीत नसेल असे कसे होईल ? म्हणजे भाजपा ने आपल्याच पायावर कु-हाड मारून घेतली आहे. स्वतःचेच हसे करून घेतले आहे. कुलकर्णीचा डाव भाजपाईना समजलाच नाही बहुतेक. भाजपाचे सरकार एका पाकिस्तानी राजकारण्याच्या खाजगी कार्यक्रमाला संरक्षण देते हा संदेश गेला आहे; आज च्या प्रमुख वर्तमानपत्रातील मथळे वाचून.
    असो; लवकर भाजपा नेत्यांना शहाणपण येवो; नाहीतर फार उशीर झाला असेल.

    ReplyDelete
  3. K T Kulkarni, काळ तोंड्या कुळकर्णी हा

    ReplyDelete
  4. या शिवसेने मुळेच या कुलकर्णी याला फुकटची प्रसिध्दि मिळालेली आहे , भाऊ तुम्ही म्हणता त्या प्रमाने जर भाजपाला बदनाम व नामोहरण करण्याचे काम या कुलकर्णी याने केले आसेल तर शिवसेनेशी संधान बांधुन या माणसाने महारास्ट्रातील भाजपा सरकार डळमळीत करण्याचे कामही केलेले आसु शकते नव्हे तेच खरे वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. Agree with you. Kasuri & his book got undue publicity. I don't think anybody except some over educated publicity hungry people will read the book. India is a big country where everyday thousands of books may be getting inaugurated. This also would have been an event out of such thousands but of Shiv Sena.

      Delete
  5. भाऊ, मुळात ह्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईमध्ये का करावेसे वाटले आणि त्यासाठी देशाची अस्मिता जपायच्या गोष्टी करणाऱ्या भाजपने परवानगी कशी दिली हे प्रश्न अनुत्तरित आहेत. यावर काही प्रकाश टाकू शकाल का ? कसूरी वगैरे लोकांपेक्षा गुलाम अलींची लोकप्रियता निश्चितच जास्त असेल. तरीही सरकारने गुलाम अलींच्या कार्यक्रमासाठी मवाळ धोरण स्वीकारले व कसूरी प्रकरण प्रतिष्ठेचे केले. यामागील हेतू देखील कळत नाही.

    ReplyDelete
  6. Ha blog mala facebook var share karata yeil ka

    ReplyDelete
  7. Sudhendra Kulkarni ha manoos eke kaalcha Communist aahe. He lok tynchya pakshala atishay nishthavaan astaat. Hy mansa pasun BLP va Sangh hyanni atishay sawadh asayla ahave.

    ReplyDelete
  8. He tar Afazalkhanachech Vail.
    Ramchandra Kulkarni

    ReplyDelete