Post-script: Last week, at the Delhi Gymkhana litfest, I suggested that the right to free speech must include the right to offend so long as it doesn’t incite violence. A former army officer angrily got up and shouted, “You are an anti-national who should be lynched right here!” When even the genteel environs of the Gymkhana club echo to such strains, we should all be very worried.
बाहुलीसारखी दिसणारी आणि कुठल्याही दु:खद प्रसंगातही बाहुलीसारखीच हसून बातम्या देणारी एक पत्रकार तुम्हाला आठवते का? सीएनएन आयबीएन या वाहिनीवर ती दिसायची. मग तिथून उचलबांगडी झाल्यावर टाईम्समध्ये तिची वर्णी लागली. निर्बुद्ध चेहरा कसा असू शकतो, त्याचा हा नमूना! नवराच संपादक असल्यावर वाहिनीवर वहिनीचे लाड पुरवले गेल्यास नवल नाही. तर काही काळापुर्वी विदुषी सागरिका घोष हिने एक अक्कल पाजळलेली होती. ‘उजव्यांनी आपल्या विचारांचे बुद्धीमंत निर्माण केले नाहीत’. ही एक मजा असते. याला इंग्रजीमध्ये कॅच-२२ म्हणतात. म्हणजे प्रश्न असा असतो, की कुठूनही वादाला गेलात तरी तुम्हीच फ़सणार. हा विषय सोपा सुटसुटीत करण्यासाठी पुरोगामी भाषेचा आपण वापर करू. पुरोगामी शब्दावली म्हणजे अर्थातच मनुवादी म्हणून शिवी हासडून सुरूवात करणे. त्यात ब्राह्मणांचा उद्धार करणे. तर अशा ब्राह्मणांच्या कृत्यांबद्दल अन्य जातीपातीमध्ये जो राग संताप तयार झाला होता, ती भाषा नेमकी कॅच -२२ अशी होती. सर्वांना या समाजात स्वातंत्र्य होते आणि कुणालाही कसलीही आडकाठी नव्हती. अगदी बुद्धीच्या प्रांतातही कुणाला काही रोकथाम नव्हती. मात्र शिक्षण घायचे किंवा विद्याभ्यास करायचा तर तुम्ही ब्राह्मण असणे आवश्यक होते. अन्यथा तुम्हाला आश्रमशाळांमध्ये प्रवेश मिळत नसे. हा प्रवेश मिळायचा तर तुम्ही ब्राह्मण असायला हवे आणि अन्य जातीत जन्मला म्हणून तुम्हाला प्रवेश नसायचा. पण कुठल्याही ब्राह्मणाला प्रवेश खुला होता. तुम्ही ब्राह्मण नसणे हा व्यवस्थेचा दोष नव्हता. तुमचे दैव त्याला कारणीभूत होते. ही व्यवस्था मनुवादाने उभी केली म्हणून मग पुरोगामी असाल तर अशा भेदभावाला शिव्याशाप देणे, ही अगत्याची गोष्ट आहे. आपोआप तुम्ही पुरोगामी होऊन जाता. मग तुम्हाला पुरोगामी जगात बुद्धीमान म्हणून मान्यता मिळते. कितीही मुर्खासारखे बोललात वा बरळलात, तरी तुम्ही बुद्धीमान होता. थोडक्यात बुद्धी व बुद्धीमंत असण्याचा काडीमात्र संबंध नाही. पुरोगामी नावाच्या जातीत टोळीत जमातीत तुमचा समावेश असला पाहिजे.
आता सागरिका घोषचे विधान तपासून बघा. उजव्यांनी बुद्धीमंत निर्माण केले नाहीत. त्याच निकषावर दलितांनी ब्राह्मण जन्माला घातले नाहीत, असे म्हणता येईल ना? आईबाप दलित असतील, तर मुल ब्राह्मण कुळातले कसे जन्माला येईल? तद्वत, उजव्या भूमिका वा विचारांचा माणूस असेल, तर त्याला बुद्धीमान म्हणून डावे मान्यता देणारच नाहीत. आणि पुढे जाऊन म्हणायचे, उजव्यांनी बुद्धीमंत निर्माण केलेले नाहीत. तद्दन जुन्या काळातील ब्राह्मणी युक्तीवाद किंवा भाषा नाही काय? याला आजकाल पुरोगामीत्व म्हणून ओळखले जाते. ब्राह्मणी कावा म्हणून जे काही आहे, त्याचे अनेक नमूने आजकालच्या पुरोगामीत्वात ठासून भरलेले दिसतील. कुठल्याही कायदा, नियम वा शब्दाचे व्यवहारातील अर्थ काहीही असोत, तेव्हाचा ब्राह्मण पुरोहित आपापल्या सोयीनुसार त्याचा वापर करीत असे. सोयीचे नसेल, तिथे अर्थाचा भलताच अर्थ लावला जाई. मनुविरोधकांनी हीच तर मोठी तक्रार आहे. म्हणून त्या दुटप्पीपणाला शिव्याशाप दिले जातात. आता आजच्या पुरोगामीत्वाचे नमूने बघा. कालपरवा नेहरू विद्यापीठात ज्या घोषणा झाल्या, त्या देशद्रोही की देशप्रेमी हा विषय बाजूला ठेवा. त्यामागची भूमिका तपासून बघा. अफ़जल गुरूला अनेक न्यायालयीन प्रक्रियेनंतर फ़ाशीची शिक्षा झालेली आहे. प्रदिर्घकाळ त्यासाठी युक्तीवाद झालेले आहेत. त्यानंतर विद्यापीठातील घोषणाकर्त्यांचा दावा काय आहे? अफ़जलची न्यायालयीन हत्या झाली. ज्युडीशियल किलींग! म्हणजेच त्यांनी न्यायालयाच्या प्रक्रियेवर आरोप केलेला आहे. भारतातील न्यायालये व न्यायव्यवस्थाही खुनी असल्याचा त्यांचा आरोप आहे. असायला हरकत नाही. कारण प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे आणि अविष्कार स्वातंत्र्य आहे. पण जे काही बोलतोय, तो मुर्खपणा नाही आणि शहाणपणा आहे ना? विचार हा शहाणा असतो, इतके तरी मान्य कराल ना? मग आपल्या विचारांच्या बाजूने ठामपणे उभे रहायला हवे ना? तिथेही सोयीनुसार या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायचे उद्योग आहेतच.
विद्यापीठातल्या घोषणांसाठी पोलिसांनी ज्यांना दोषी मानले आहे आणि गुन्हा दाखल केला आहे. ते पोलिस पक्षपाती असल्याचा आरोप आहेच. पण तितकीच न्यायव्यवस्थाही सदोष वा पक्षपाती असल्याचाही आरोप आहे ना? मग ही मंडळी न्यायालयाकडे दाद कशाला मागत आहेत? आपल्याला अटकपुर्व जामिन मिळावा म्हणून याचिका कोणाकडे करीत आहेत? ज्या तिन्ही पातळीवरच्या न्यायालयांनी अफ़जल गुरूला साक्षीपुरावे तपासून दोषी मानले आणि फ़ाशी फ़र्मावली, त्याच न्यायालयात कशाला धावपळ चालू आहे? ज्या न्यायावर आपला विश्वास नाही, त्याचेच संरक्षण कशाला मागितले जाते आहे? न्यायालयीन हत्येच्या विरोधात घोषणा द्यायच्या आणि पुन्हा तिथेच जऊन न्यायाची मागणी करायची? कमाल आहे ना? किती चमत्कारीक युक्तीवाद आहे ना? तुमच्यावर आमचा विश्वास नाही आणि म्हणूनच तुम्हीच आमचा न्यायनिवाडा करा, हा युक्तीवाद म्हणजे पुरोगामी बुद्धीवाद आहे. ज्याने बलात्कार केला म्हणून आक्रोश करायचा, त्याच्याकडेच पुन्हा संरक्षणाची मागणी करण्यासारखी गोष्ट नाही काय? याला पुरोगामी विचार म्हणतात. गंगा गये गंगादास आणि जमना गये तो जमनादास, अशी कोलांट्या उड्या मारण्याची कला म्हणजे डावा बुद्धीवाद होऊन बसला आहे. त्याचे विविध मनोरंजक प्रयोग सध्या दिल्ली व अनेक जागी जोरात सुरू आहेत. अनेक बुद्धीमंतांना आपण काय बोलत आहोत, ते स्वत:लाही उमजलेले नाही. किंबहूना ज्यांना कशातलेच काही कळत नाही, त्याला डावा बुद्धीमंत म्हणून आज ओळखले जाते, म्हटल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. सहाजिकच देशद्रोह म्हणजे देशप्रेम किंवा पाकिस्तानवादी घोषणा म्हणजे अविष्कार स्वातंत्र्य, असले युक्तीवाद होत असतात. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, ह्या उक्तीपेक्षा आता पुरोगामी बुद्धीवादाला अधिक अर्थ राहिलेला नाही. म्हणून मग सागरिका सारखी निर्बुद्ध महिला उजव्या गोटाने कधी बुद्धीमंत निर्माण केले नाहीत, असे दावे करू शकते. किंवा डाव्यांच्या बौद्धिक बाजूची मांडणी करायला शोभा डे हिच्यासारखी नटवी मैदानात आणावी लागते आहे.
एकूण नेहरूवाद किंवा पुरोगामीत्व कुठल्या गाळात जाऊन रुतले आहे, त्याचा यातून अंदाज येऊ शकतो. पुर्वजांच्या पुण्याई किंवा कर्तृत्वावर वर्तमानात जगावे, तसे आजकाल पुरोगामी व डावे विसाव्या शतकातल्या गंज चढलेल्या तलवारी परजून लढाई करायला सरसावले आहेत. एकविसाव्या शतकातील बदललेले विश्व त्यांच्या खिजगणतीत नाही. आजच्या जमान्यातली जनता, तिचे प्रश्न समस्या किंवा आजच्या पिढीच्या आशाआकांक्षा, यांच्याशी डाव्यांचा संपर्क किती तुटला आहे त्याची ही साक्ष आहे. मग जुन्या काळातले पुरोहित वा पुजारी जसे आपापली देवस्थाने मालकी हक्काने बळकावून जनतेवर आपले वर्चस्व गाजवू बघतात, तशी केविलवाणी अवस्था डाव्यांच्या नशिबी आलेली आहे. चळवळी, आंदोलने व जनतेतले स्थान रसातळाला गेले असल्याने, माध्यमे, वैचारीक संस्थांच्या माध्यमातून टिकून रहाण्याची धडपड चालू आहे. सरकारी तनख्यावर राजेशाही मिरवणारे संस्थानिक असावेत, तशी ती केविलवाणी अवस्था आहे. जनतेची मान्यता नसलेले धर्म, पांडित्य मोठेपणा फ़ारकाळ टिकत नाही. माध्यमांची समाज मनावरची पकड कधीच संपून गेली आहे. यांची खुलेआम सोशल माध्यमातून राजरोस खिल्ली उडवली जात आहे. तरीही आपल्या बुद्धीमत्तेचा टेंभा मिरवण्याची हौस फ़िटलेली नाही. मग कधी न्यायालयाचा किंवा कधी कायदे नियमांचा आडोसा घेऊन अब्रु झाकण्याची कसरत चालू आहे. घरातल्या म्हातार्यांनी नातवंडे वा पतवंडे यांच्याशी हुज्जत करावी आणि आपलीच खिल्ली उडवून घ्यावी, तशी स्थिती त्यांच्या वाट्याला येत चालली आहे. जन्माने ब्राह्मण असूनही ब्राह्मणांना शिव्याशाप मोजून आपले समाजावर वर्चस्व टिकवण्यातला दुटप्पीपणा आता कितीही लक्तरे पांघरली म्हणून उपयोगाचा राहिलेला नाही. कारण सामान्य जनता पुरोगामी शेंडीच्या या सेक्युलर भटजींना दारातही उभे करीनाशी झाली आहे. त्यांनी कितीही शाप दिल्याने बिघडत नाही. गाईच्या शापानेही कावळा मरत नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे.
छान भाऊ हे सेक्युलर भटजी आधे आहेत या कटिंगना व कटिंग पाठिराखे यांची सदन सफाई झालीच पाहिजे
ReplyDeleteBHAU
ReplyDeleteYA SAGALYALA KAHI SHEVAT AAHE KI NAHI?
KI, ROJACHE JIVAN SODUN HECH KARAYACHE?
अभिनेता संजय दत्त मार्च 1993 के मुंबइ तिल सिरी इल बॉम्ब स्पोटातल त्या शिक्षेतून 42 महिन्यांची शिक्षा भोगून (60 महीन्यांची खरी शिक्षा होती ति पण कित्येक वेळा पै रोल वर बाहेर राहून 42 महिने भरले ] भाजपचे देशभक्त CM व होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी सोडले आहे. (अंध/छद्म) राष्ट्रवादी उन्मादाच्यां वाता वर नात आपण ह्यास कसे बघता .संजय दत्त ने कालाशनिकौफ़ सारखे खतरनाक हत्यार ख़री दले आणि बाळगले हे काय आहे देशभक्क आता चिडीचुप प आहेत कारण होम मिनीस्टर देवेद्र पंत आहेत हेच जर आर आर असते तर ह यांची प्रतिक्रीया काय असती
ReplyDeleteकारण राष्ट्रवादी काँग्रेसची एक दुटप्पी प्रतिमा जनमानसात तयार झाली आहे.
Deleteइशरतला शहीद समजणारे आव्हाडांसारखे नेतेही राष्ट्रवादीत आहेत.
अल्पसंख्यांक मतांच्या राजकारणासाठी हे लोक मड्याच्या टाळूवरचं लोणी खायाला मागेपुढे बघत नाहीत.
संजय दत्त बद्दल बोलत असाल तर त्याच्याविषयी लोकांचं फारसं चांगलं मत आता नाहीये.
त्याने मोठा गुन्हा केला आहे,त्याचा राग आहेच,पण उघडपणे देशविरोधी घोषणाबाजी आणि तीही दिल्लीसारख्या महत्वाच्या ठिकाणी यामुळे सामान्य लोकं अधिक संतापतात,इतकेच.
प्रश्न त्याला लवकर सोडण्याच्या असेल तर एकूणच कैद्याचं वर्तन कसं राहतं यानुसार जर चांगलं वर्तन असेल तर शिक्षा कमी करतात.
आर आर असते तर म्हणाले असते >> ..........' बडे बडे शहरो में छोटे छोटे हादसे होते रहते हैं !!
Deleteमस्त भाऊ
ReplyDeleteचैतन्यजी,R.R. पाटलाच्याच होममिनिस्ट्रीने संजूबाबावर कच्चा खटला भरून कमीतकमी शिक्षेची तरतूद करून ठेवली होती.सुनील दत्तसाहेबांनी या कामासाठी मुंबईत असलेला आपला बंगला विकला होता.जुन्या सरकारच्या काळातील न्यायिक चुका हे सरकार करू गेले तर राजकीय सूड म्हणत टीका करायला तुम्हीच पुढे सरसावाल.भुजबळ नाही का अटकेला सामोरे जायची वेळ आल्यावर ओ.बी.सी.असल्याचे सांगतात.
ReplyDeleteभाऊ आणखी एक विकले गेलेला मिडीया ( सुपारी बाझ एडिटर इन चिफ त्याना नेमणारे देशी विदेशी मालक )आणि सत्ता लंपट देश विकणारे घराणे शाही राजकिय पक्ष यांच्यी अभद्र युती एका बाजुला व गाफील स्वतःत करमणूकीत कुटुंबात मश्गुल स्वार्थी ( निसपृरूह/ नेता रहित हताश) समाज दुसर्या बाजूला. शिवाजी जन्माला यावा पण दुसर्याच घरात. अशा विचित्र अवस्थेत देश सापडला आहे. शतकानुशतके असेच चालू आहे. आपण कधी शुध्दीवर येणार हाच प्रश्न आहे. आपल्या सारख्या मुळेच हे बाहेर येत आहे. निखिल वागळे आरणव गोस्वामी राजदीप सरदेसाई राहुल कवल व त्याचे साथीदार पुरोगामी सेक्युलर बुद्धीमंत परकाश बाल, कुमार केतकर, सप्तर्षी यानी आपली दिशाभूल करण्याचे काम केले आहे.
ReplyDeleteयातील निखिल वागळे कुमार केतकर. . यांना आपले चॅनेल जोरात चाललेल्या चा भास होत होता पण लोक चिडुन चॅनेल पहात होते हे त्यांना समजले नाही. ... व बाहेर फेकले गेले. ..
यातील अनेक प्रोग्राम था मी रेकाॅरड ठेवला आहे है आजचा सवाल यातील पोल मुळे प्रेक्षक किती विरुद्ध आहेत हे समजत होते..
परंतु हि सोय CNN IBN, Times Now ला नसल्याने ते पढत मुर्ख तसाच धिंगाणा घालत आहेत. .
बिहार च्या यशामुळे त्यांना सपुरण चढले आहे..
याची नोंद घेणे आवश्यक आहे असे माझ्या सारख्या सामान्य माणसाला वाटते आहे...
परंतु भाऊ तुमचे लेख हे डोळ्यात अंजन घालणारे आहेत. ..
पण या मिडीयाने व आपल्या खुपशया नागरिकांनी डोळे बंद करून घेतले आहेत ....
आपण आशावादी रहाणे आवश्यक आहे. .
मी रोज मुंबई त लोकल ने प्रवास करताना लोकांना मजेत Game खेळताना वा सिनेमा बघताना पाहातो..
देश financial व सोशल धार्मिक विषमतेने disequilibrium मुळे खायीचया/ दरीच्या काठावर उभा आहे याचे विस्मरण झाले आहे व देशाला मरणा कडे नेत आहे का हे काळच सांगेल. ...
धन्यवाद भाऊ. .
Amool Shetye
भाऊ .........मस्त लेख !! प्रत्येक लेख उत्कृष्ठ असतो आपला ...!! मी व माझ्या अनेक मित्रांनी दूरदर्शन वरील वेगवेगळ्या वाहिन्यानवरील बातम्या व भोंगळ ' चर्चा ' बघणे बंद केले आहे. आपला ' ब्लोग ' मात्र आवडीने वाचतो...नियमितपणे !
ReplyDeleteअतिशय नेमक्या भाषेत कथित पुरोगाम्यांचे वाभाडे काढले आहेत. अभिनंदन व आभार.
ReplyDeleteमस्त भाऊ , तुम्ही लिहित राहा ! २० लाख वाचक झाल्याबद्दल धन्यवाद!!
ReplyDeleteलय भारी भाऊ ! तुम्ही लीहीत राहा आम्ही वाचत राहू !!
ReplyDeleteवाभाडे काढत राहा!!
२० लाख वाचक झाल्याबद्दल धन्यवाद !!