Monday, October 22, 2018

चांगला हिंदू वाईट हिंदू

Image result for tharoor sunanda

कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाच राज्यातील विधानसभा जिंकण्यासाठी प्रत्येक महत्वाच्या अशा स्थानिक मंदिरांना भेटी व देवदर्शनाचा सपाटा लावला आहे. आपला पक्ष हिंदूविरोधी नसून हिंदुहिताची फ़िकीर करणारा आहे, असा आभास त्यांना निर्माण करायचा आहे. कारण चार वर्षापुर्वी त्यांच्या पक्षाचा लोकसभेत जो दारूण पराभव झाला, त्याला हिंदूविरोधी प्रतिमा कारणीभूत झाली, असा निष्कर्ष अंथनी समितीने काढलेला होता. तो समजायला राहुल गांधींना तीनचार वर्षे लागलेली आहेत. कारण त्यांचे शिक्षण तुलनेने खुप कमी झाले आहे. एकूणच जितका उच्चविद्याविभूषित कॉग्रेसनेता तितका मंदबुद्धी, असे आता अनुभवातून सिद्ध झालेले मोजमाप आहे. म्हणूनच जी गोष्ट राहुलना आज कळते, ती सुशिक्षित कॉग्रेसनेत्यांना आणखी तीनचार वर्षांनी उमजते. त्यामुळे राहुल हिंदूंचे तुष्टीकरण कशाला करीत आहेत, त्याचा थांगपत्ता बुद्धीमान कॉग्रेसनेते शशी थरूर यांना २०२४ सालात लागण्याची शक्यता आहे. अन्यथा त्यांनी नको त्या प्रसंगी चांगला हिंदू आणि वाईट हिंदू असल्या पाश्चात्य व्याख्या आताच केल्या नसत्या. एका कुठल्या समारंभात बोलताना त्यांनी सांगितले, की जो अयोध्येत मंदिराची मागणी करीत नाही, तो चांगला हिंदू असतो. मग त्यांच्याच व्याख्येनुसार वाईट हिंदू कोण असू शकतो? तर जो कोणी मंदिराची मागणी करील किंवा तशी मागणी करणार्‍याच्या समर्थनाला कंबर कसून उभा राहिल, तो वाईट हिंदू असणार ना? त्या तर्कशास्त्रानुसार बाबर हाच खरा हिंदू असला पाहिजे किंवा सोमनाथ मंदिर कित्येकदा फ़ोडून लुटून नेणारा महंमद घोरी खरा चांगला हिंदू असला पाहिजे ना? जो कोणी अयोध्येतील मंदिराच्या विरोधात सर्वशक्तीनिशी उभा ठाकतो, तो चांगला हिंदू असणार ना? परिणामी कोर्टमध्ये जाऊन मंदिराच्या विरोधात लढणारा प्रत्येकजण चांगला हिंदू होऊन जातो. विरोधाभास इतकाच, की त्यातला कोणीही हिंदूधर्माची महत्ता मानणारा नाही.

शशी थरूर यांच्या तर्कानुसार चांगला हिंदू शोधायला गेल्यास प्रथम तो हिंदू म्हणून जे काही असेल त्याचा निषेध करणारा, त्याला विरोध करणारा वा हिंदू हे नावही पुसून टाकायला कटीबद्ध असला पाहिजे. थोडक्यात तो हिंदूच नसला पाहिजे, तरच त्याला चांगला हिंदू मानता येईल. उदाहरणार्थ राहुल गांधी कसे निवडणूका आल्या मग आपण शिवभक्त असल्याचे प्रदर्शन मांडतात. ते जनेयुधारी म्हणजे जानवेधारी ब्राम्हण असल्याचे फ़लक झळकवले जातात. पण त्यांनी कधी दिवाळी द्सरा साजरा केल्याचे आपल्याला ऐकायला मिळत नाही. दर नाताळात आजोळी जाऊन आजीच्या सहवासात ते ख्रिसमस साजरा करतात. ही उत्तम हिंदू असल्याची निशाणी असते. उलट आपण वाईट हिंदू असतो. आपण अगत्याने घरोघरी गणपतीची मुर्ती आणुन पुजा करतो. दसरा नवरात्री साजरी करतो. हनुमानजयंती वा रामनवमी साजरी करतो. कुठे मंदिर बांधतो वा अयोध्येत मंदिर व्हावे, अशी अपेक्षा बाळगतो. हिंदू म्हणून जे काही धर्माचे सोपस्कार आहेत, त्याचे पालन करायला जातो. ही सर्व वाईट हिंदू असल्याची लक्षणे असतात. हे नवे तर्कशास्त्र समजून घेतले, मग बुर्‍हान वाणी, मन्नन वाणी, अफ़जल गुरू हे कट्टर देशभक्त कशाला असतात, हे सहज लक्षात येऊ शकते. देशाचे सैनिक काश्मिरात हिंसाचार करतात आणि जैश वा तोयबाचे लढवय्ये देशाचे कसे उत्तम रक्षण करीत असतात, त्याचा बोध होऊ शकतो. पंतप्रधान हाच देशाचा सर्वात मोठा शत्रू का आहे, त्याचा उलगडा होऊ शकतो. मग अमेरिकन राजदूताला राहुल गांधी हिंदू दहशतवादाचा धोका कशाला समजावून सांगत होते, त्याचाही खुलासा होऊ शकतो. एकदा हे थरूरी तर्कशास्त्र समजून घेतले पाहिजे. मग भारताला भारतीयांपासून किती धोका आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो आणि भारतीयांपासून या देशाला वा़चवण्यासाठी रोहिंग्या वा बांगलादेशी लोकांची वाढती संख्या कशी उपयुक्त आहे, तेही समजू शकते.

कालबाह्य जुन्या राष्ट्र वा देश या संकल्पनेतून समजुतीतून आपल्याला बाहेर पडण्याची गरज आहे. त्या समजुती विविध शब्द व व्याख्यांमध्ये दबा धरून बसलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुणालाही बॉम्बस्फ़ोटाने अकारण निरपरधांना मारणारा हा घातपाती असतो, ही आता कालबाह्य व्याख्या झालेली आहे. आपोआपच जीव धोक्यात घालून देशाच्या शत्रूशी दोन हात करणारा संरक्षक असतो, ही व्याख्याही बदलून जाते ना? एखाद्या मुलीवर बळजबरी करणारा हा गुन्हेगार नसतो तर तिच्या शीलरक्षणासाठी झगडणारा अंगरक्षक असतो. त्यासाठीच तो तिच्या देहाचा कब्जा घेत असतो, हे थरूरी तर्कशास्त्र समजून घेण्याची गरज आहे. मग अतीव प्रेमापोटीच पत्नी सुनंदा पुष्करचा असा अनाकलनीय मृत्यू कशाला होऊ शकला, त्याचे रहस्य आपल्याला उलगडू शकते. अजमल कसाब किंवा त्याच्यासोबत आलेली दहा जिहादींची टोळी मुंबईकरांना पोलिस, कायदा व राष्ट्रवादाच़्या जाचातून मुक्त करायला आलेली मुक्तीसेना असल्याचा साक्षात्कार आपल्याला होऊ शकतो. हे चांगला वाईट यातले भेदाभेद सुक्ष्मपणे समजून घेता आले पाहिजेत. मग जगणे सोपे होऊन जाईल. कारण मरण्यालाच जगणे मानावे लागणार ना? नक्षली हिंसाचाराला वैचारिक अधिष्ठान देण्यातला परमार्थ समजू शकेल. अघोषित आणिबाणीचे धागेदोरे सापडू लागतील. पुरस्कार वापसीची गंमत लक्षात येईल. आणिबाणी लादणारी कॉग्रेस स्वातंत्र्यवादी व आणिबाणीत तुरूंगात खितपत पडलेले तात्कालीन भाजपावाले हे कसे फ़ॅसिस्ट; त्यातली गुंतागुंत समजायला मदत होऊ शकेल. प्रत्येक शस्त्रास्त्र खरेदीत लपवाछपवी करणारी कॉग्रेसच धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आणि कुटुंबाला सत्तेचा कुठलाही लाभ उकळू न देणारा नरेंद्र मोदी आकंठ कसा भ्रष्टाचारात बुडालेला आहे, त्याचेही आकलन होऊ शकते. थरूरांचा हा हिंदू सिद्धांत म्हणून अभ्यासण्य़ाची खुप गरज आहे.

वरवरा राव किंवा अन्य नक्षलींना एक दिवसही पोलिस कोठडीत पाठवण्याने मानवी हक्कांची पायमल्ली कशाला होते आणि नऊ वर्षे कुठल्याही पुराव्याशिवाय साध्वी वा कर्मल पुरोहितांना जामिन नाकारून नऊ वर्षे गजाआड सडवणे, कसा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो, ते समजू शकते. मागल्या चार वर्षात देशातले शब्दकोष वा कोषातल्या शब्दांचे अर्थही कसे आमुलाग्र बदलून गेलेले आहेत ना? पाच पिढ्या सत्ता व जनतेच्या पैशावर ऐष करणार्‍या नेहरू खानदानाचा त्याग नजरेत भरणारा आहे. पण पंतप्रधानाचे तमाम कुटुंबिय सामान्य नागरिकासारखे जगण्यातली लूटमार नव्या शब्दकोषामुळेच कळू शकेल. त्यामुळे मोहरम इदीच्या दिवशी विणलेली टोपी परिधान करून नमाजाला इफ़्तार पार्टीला हजेरी लावणारा चांगला हिंदू आपल्या बघता येईल. कुणा फ़ादर बिशपने धर्मसेविकांवर बलात्कार केल्यास त्याला पुण्याई समजण्याची अक्कल आपल्याला येऊ शकते. तरूण तेजपालने सहकारी मुलीचे लैंगिक शोषण केल्यावर त्यातले पुरोगामी पवित्र कार्य आपले डोळे दिपवून टाकायला मदत होईल. अशा अनेक गोष्टी अगदी सोप्या सुटसुटीत होऊन जातील. सवाल शब्दकोष बदलण्याचा आहे. राहुल गांधींपासून शशी थरूर व अनेक पुरोगामी विचारवंत नव्या युगाचे नवे शब्दकोष विश्वकोष तयार करण्यात सध्या गर्क आहेत. थरूर यांनी चांगल्या हिंदूची केलेली व्याख्या त्यातूनच आलेली आहे. देशातल्या हिंदूंना दिलेली प्रकाशनपुर्व सवलत आहे. संघाशी संवाद नाकारणे हा संवाद असतो आणि जिहादींशी बंदुकीने बोलणे हा संवाद असतो, हे त्यामुळे लक्षात येणारे रहस्य होईल. अशा पुरोगामी जगात सूर्याला सुर्य समजणे गुन्हाच नाही काय? अयोध्येत श्रीरामाचे मंदिर मग कोणी सच्चा हिंदू मागणार नाही. तो मक्केत कृष्णाचे मंदिर मागू शकेल वा वाराणशीत होली वॉटर शिंपडायला सांगू शकेल. काय करणार? शब्द त्यांचे अर्थ पुरोगामी होत चालले आहेत ना?

12 comments:

  1. वा भाउ तुम्ही तर सर्व सारच सांगितलेय एकाच लेखात खरय थरुरच्या असल्याहिंदुविरोधीगरळ काढणार्या बरोबर पुरोगामी लेोक,पेपर अगदी पाठीशी उभे राहिल्याच दिसत.

    ReplyDelete
  2. भाउ हे जमाते पुरेगामी किती बु्दिभेद करतात ना सामान्य लोकांचा 70 वर्ष करतच आलेत तुम्ही त्यांचा पर्दाफाश करता चांगल काम करता

    ReplyDelete
  3. या सर्वापासून देशाची सुटका कधी होणार हो भाऊ?

    ReplyDelete
  4. Apratim vishlelshan ahe Bhau. Changla and Vaeet Hindu doghe Congress la changla dhada shikawnar ahet hya niwadnukit

    ReplyDelete
  5. महंमद गझनवी.
    अप्रतिम उपहास.

    ReplyDelete
  6. Shashi Tharoor yanna Hindu virodh mhanje Khare hindutva ase mhanayche asel. Bhau Congress pakshat sadhya litigation vaicharik divalkhori challeli ahe te samjte. Barobara ahe Jasa raja Tashi praja. Avghad ahe Bharat sadhya pappu mule saksham virodhipaksh Sudha rahile nahi.hi eka drushtine changali goshtha ahe.

    ReplyDelete
  7. भाऊ 2013 च्या जून महिन्यात नरेंद्र मोदी यांची भाजपचे निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि ती बैठक संपल्यावर संध्याकाळी गोव्यातील पक्ष कार्यकर्त्यांसमोर नरेंद्र मोदी यांचे भाषण ठेवण्यात आले होते आणि त्या वेळी मोदी यांनी त्या भाषणात कॉंग्रेसमुक्त भारताची संकल्पना मांडली होती. अनेकांना त्या वेळी हा निवडणूक प्रचाराचा भाग वाटला होता पण सतत 13 वर्षे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसने मोदींना असह्य असा मानसिक त्रास दिला होता जगभरात त्यांना व्हिसा नाकारण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाच्या एस आय टी समोर त्यांची दहा तास सुनावणी झाली होती त्यामुळे पंतप्रधान झाल्यावर मोदींनी त्यांच्या कॉंग्रेसमुक्त भारत या संकल्पनेची अमलबजावणी करण्यास सुरुवात केली अमित शहा यांना अध्यक्ष केले गेले आणि एकेका राज्यातून काँगेसला उखडून टाकण्यात आले राहुल गांधी यांनी गुजरात आणि कर्नाटक या निवडणुकांमध्ये ठिक ठिकाणी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा धडाका लावला आणि कॉंग्रेसपासून दूर गेलेल्या हिंदूंना रिझवण्याचा प्रयत्न केला आणि इथेच ते मोदींच्या जाळ्यात अडकले सरसंघचालक श्री मोहनराव भागवत यांनी दसरा कार्यक्रमात राम मंदिरासाठी कायदा करण्याची मागणी केली आणि मीडियात प्रचंड गदारोळ झाला निवडणूक प्रचारात मोदी जेंव्हा उतरतील तेंव्हा राम मंदिराचा विषय प्रचारात येईल आणि काँगेसला एक तर बाजूने किंवा विरोधात अशी भूमिका घ्यायला मोदी भाग पाडतील आणि इथेच हा सापळा लावण्यात आला आहे कारण काँग्रेसने कोणतीही भूमिका घेतली तरी नुकसान काँग्रेसचे होईल कारण राम मंदिराला पाठिंबा दिला तर मुस्लिम काँगेसला मतदान करणार नाहीत आणि मोदींच्या आणि संघाच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यासारखे होईल आणि मंदिराला प्रत्यक्ष विरोध करणे शक्यच नाही कारण तसे केले तर काँग्रेस नामशेष होईल 2013 मध्ये गोव्यातील पणजी येथे नरेंद्र मोदींनी मांडलेली काँग्रेस मुक्त भारताची संकल्पना 2019 मध्ये प्रत्यक्षात येताना दिसते आहे

    ReplyDelete
  8. भाऊ ,आज मी नतमस्तक आहे, एवढं जहाल तुम्ही कधीच बोलला नाहीत. मला तुमचा प्रत्येक शब्द पटतो

    ReplyDelete
  9. अतिशय उत्तम विश्लेषण,पण हे शालजोडीतील अलंकार थरुरांच्या डोक्यावारुनच जाणार. बिचारे थरुर, पत्नीच्या संशयास्पद मृत्युच्या खटल्यापासुन सुटकेच्या विवंचनात पक्षश्रेष्ठींच्या मर्जीत रहाण्यासाठी अशी सवंग वादग्रस्त विधाने करतात.

    ReplyDelete
  10. Bhaunchya lekhani chi dhar maglya kahi divsanpasun vadhte aahe...





    Maharashtra Congress yamule nakkich rakt bambal hoil



    Yogyaveli(nirnayak kshani) kelela praharch Vijay milvun deto...


    Kharicha ka hoina
    Deshachya ubharnit tumcha vata nakki aahe bhau

    ReplyDelete
  11. गेल्या काही दशकांचा आपल्या समाजाचा विचार करता असे स्पष्ट दीसुन येते कि राहूल गांधी ज्या काॕग्रेसच्या सोच मुळे इतके उत्साही आक्रमक का आहेत.साधी गोष्ट घ्या इथे समाजाने आपल्यातील लबाडीला बेशिस्तीला अस्वच्छतेला आळसाला भ्रष्टाचाराला जातीयतेला प्रांतीकतेला अशा अनेक समाजाला मागास ठेवणार्या अवगुणांना अभय देणारी राजकीय व्यवस्था निर्माण केली आणि काही दशके जपली.आज तुम्ही लोकांना संडासात जायला सांगताय ,तुम्ही एका वर्षात ८०%कर दाते वाढवले जि एस टी मुळे नागरीक दुकानदार उत्पादक या सर्वाना कर चोरी करणे अवघड केले एक्साइज व्हॕट जकात या खात्यांची खाबुगिरी संपुष्टात आणली अनेक कालबाह्य कायदे काढुन टाकले दोन नं ची अर्थ व्यवस्था ज्यांचे व्यवसायांची मक्तेदारी टिकविण्यासाठी उपयुक्त होती तिला नोट बंदी ने मोठा हादरा दिला अशा अनेक समाजाला प्रगत करणारे उपाय मोदी करीत असतांना काॕग्रेस रुपी समाजातिल दुर्गुणांना पोसणारी व्यवस्था बरी वाटणारा फार मोठा समाजातील वर्ग आहे तो भाजपा मध्ये पण मोठ्या प्रमाणात आहे आणि राहूल त्याना रोज साद घालत आहे.येणार्या निवडणूकित पुढील पिढी ला स्थलांतरीत व्हावे लागु नये वाटत असणार्या सर्वान साठी ही लढाई जिवन मरणाची झाली तरच पुन्हा मोदी येण्याची शक्यता आहे.अन्यथा राहूल म्हणतात त्या समाजातील दुर्गुणांना साथ देणार्या काॕग्रेस च्या सोच ला ताकद मिळेल.

    ReplyDelete