Tuesday, February 26, 2019

यह तो सिर्फ़ झांकी है

balakot air strike के लिए इमेज परिणाम

मंगळवारी पहाटे पाकिस्तानी भूमीत जाऊन भारतीय हवाई दलाने जो हल्ला केला, त्यातून सूर्य मावळला तरी पाकिस्तान सावरू शकला नव्हता. म्हणूनच उजाडताना ज्या पाकिस्तानी सेनादल प्रवक्त्याने भारतीय हवाई दलाच्या विमानांनी घुसखोरी केल्याचा पहिली बोंब ठोकली; त्यांना संध्याकाळी तोंड लपवायला जागा उरलेली नव्हती. कारण जैश महंमद संघटनेच्या सगळ्या जिहादी प्रशिक्षितांना आणून कत्तलखान्यात ठेवावे, तसे बिचारे जागच्या जागी घाऊक मारले गेले आहेत. बहावलपूर येथे जैशचे प्रशिक्षण शिबीर असल्याची भारतीय माध्यमात मोठी चर्चा दहा दिवस चालली होती. त्यामुळे पाकिस्तानने भारताकडून तिथेच पुन्हा मोठा सर्जिकल स्ट्राईक होईल, अशी अपेक्षा बाळगली होती. त्यातून ह्या प्रशिक्षितांना वाचवण्यासाठी व्याप्त काश्मिरातून उचलून पाकिस्तानच्या सुरक्षित भूमीत बालाकोटला एकत्र आणले गेले होते. पाकव्याप्त काश्मिरात भारत हल्ला करील, पण हा सभ्य देश वा त्याची व्यावसायिक सेना पाकिस्तानी भूमीत घुसखोरी करणार नाही, याची पाक सेनापतींना पक्की खात्री होती. भारतीय पुरोगामी वा कॉग्रेस नेतॄत्वाला भले भारतीय फ़ौज गुंड वाटत असेल. पण पाकिस्तानी सेनेचा भारतीय फ़ौजेच्या सभ्यतेवर किती गाढ विश्वास आहे, त्याचीच यातून प्रचिती येते. त्यामुळेच त्यांनी भारतीय कमांडोकडून येऊ घातलेल्या हल्ल्यासाठी बहावलपूरच्या छावण्या मोकळ्या केल्या आणि विविध शिबीरात पसरलेले सर्व प्रशिक्षीत घातपाती जिहादी एकत्र सुरक्षित बालाकोट अड्ड्यावर आणून ठेवले. त्यांना तिथे सुरक्षेची किती खात्री का वाटत असावी? एका कुणा अधिकार्‍याने ट्वीटही केलेले होते, ‘निश्चींत झोपा, कारण पाकिस्तानी हवाई दल जागे आहे.’ बिचारे झोपेतच जन्नतमध्ये रवाना झाले. कारण त्यांना एकत्रित मारण्याची सुविधा पाकिस्तानी सेनेने व रणनितीकारांनीच भारतीय हवाई दलाला उपलब्ध करून दिलेली होती.

मागल्या आठवड्यात सोशल मीडियात या विषयावर भारताची प्रतिक्रीया काय असेल, त्यासंबंधी मी एक पोस्ट टाकलेली होती. त्यात स्पष्टपणे आता सर्जिकल स्ट्राईक होणार नाही आणि तो पाकव्याप्त काश्मिरातही होणार नाही, असे ठामपणे म्हटलेले होते. माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराला जी रणनिती व सेनेचे डावपेच कळू शकतात, तितकीही बुद्धी पाकिस्तानी सेनापतींपाशी उरलेली नाही काय? देशाची सुरक्षा वा संरक्षण लढाईचे काम अतिरेक्यांवर सोपवून विविध सरकारी खात्यातले पसे खाण्यात रममाण झालेल्या पाक लष्करी अधिकार्‍यांना आता आपल्या सैनिकी शिक्षणाचेही विस्मरण झालेले असावे. म्हणूनच भारताकडून हल्ला कुठे होऊ शकतो, त्याचा अंदाज बांधता आला नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन भारत जिथे हल्ला करण्याची शक्यता आहे, तिथेच सर्व़च्या सर्व जिहादींना गोळा करण्याची अक्कल यांना कुठे मिळाली, तेच समजत नाही. त्याची एकमेव शक्यता म्हणजे त्यांचा भारतीय सभ्यता व सुसंस्कृतपणावरचा अतिरेकी विश्वास असू शकतो. किंवा सेना व जिहादी यांच्यापेक्षा आता पाकिस्तानी सेना बहुधा भारतातल्या त्यांच्या हस्तकांवर अधिक विसंबून असावी. जे इथे बसून व भारताचे मीठ खाऊन पाकिस्तानचा बागुलबुवा सतत माजवत असतात. युद्धाला विरोध करून नेहमी वाटाघाटींचा आग्रह धरत असतात. त्यांच्यावर विसंबून रहाण्याची सवय पाकिस्तानी सेनेला महागात पडलेली आहे. अशा भुरट्यांना वचकणारे पुरोगामी आता सत्तेत नाहीत आणि अशा पुरोगाम्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भिक घालत नाहीत, हेही पाक राज्यकर्ते व सेनापतींच्या लक्षात का आलेले नाही? अन्यथा ते इतके गाफ़ील राहिले नसते आणि भारतीय हवाई हल्ल्यात इतके जिहादी आयते एका जागी आणुन भारतीय हल्ल्याच्या तोंडी देण्याचा मुर्खपणा त्यांच्याकडून झालाच नसता. एकूण काय, जो पुरोगाम्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.

अर्थात मलाही काही स्वप्न पडलेले नव्हते. व्याप्त काश्मिर सोडून पाकिस्तानी भूमीत भारतीय सुरक्षा दल हल्ले करील, असे मला कोणी भविष्य सांगितलेले नव्हते. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप व इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची विधाने मला खटकली होती. इस्त्रायलने पॅलेस्टाईनमध्ये आराफ़त यांच्या कंपाऊंडवर हवाई हल्ले केले आणि त्यांनाही मेणबत्ती पेटवून रात्र काढावी लागली. तेव्हा नेमक्या याच शब्दात अध्यक्ष बुश म्हणाले होते, इस्त्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. आता ट्रंपनी भारताविषयी तेच शब्द उच्चारले होते. नंतर दोन दिवसापुर्वी त्यांनी भारताकडून काही मोठी कारवाई अपेक्षित असल्त्याचेही म्हटलेले होते. दुसरे नेतान्याहू. त्यांनी पहिल्याच दिवशी हल्ल्याचा निषेध करताना भारताला हवी ती मदत देण्याची घोषणा करून टाकलेली होती. त्यानंतर भारताचे नरेंद्र मोदी म्हणाले, पाकिस्तानला याची म्हणजे पुलवामाच्या हल्ल्याची मोठी किंमत मोजावी लागेल. ही मोठी किंमत वसुल करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ भारतापाशी असले, तरी तंत्र व डावपेचाची मदत अमेरिका व इस्त्रायल करायला सज्ज असतील, तर किरकोळ सर्जिकल स्ट्राईक कशाला करायचा ना? इतका सोपा तर्क मी केला होता. त्यामुळेच गेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या पुढले पाऊल यावेळी टाकले जाण्याची अपेक्षा मला वाटली होती. पण ती सगळीच पुर्ण झाली असे मानता येणार नाही. उलट मला असे वाटते, की ही फ़क्त सुरूवात आहे. आपली क्षमता किती आहे त्याची नुसती झलक दाखवण्यासाठी हा हवाई हल्ला झालेला आहे. भारताला अजून राफ़ायलची भेदक लढावू विमाने मिळालेली नसली, तरी हाती असलेली विमानेही पाकिस्तानला नामशेष करायला पुरेशी असल्याचे हे प्रात्यक्षिक होते. किंबहूना ३५ वर्षे जुन्या मिराजने ही कामगिरी केली असेल, तर राफ़ायलची अत्याधुनिक विमाने भारताच्या हाती लौकर मिळू नयेत, म्हणून चाललेला आटापिटा कशासाठी आहे, त्याचाही अंदाज येऊ शकतो.

भारत तेरे टुकडे होंगे, अशा घोषणा देणारे आणि त्यांचा राजकीय कायदेशीर बचाव मांडणारेच राफ़ायलच्या विरोधात सहा महिने कशासाठी आटापिटा करीत असतील? दोन्ही बाजूचे लोक सारखे कशाला असतात? त्यातून भारतीय हवाई दल वा सुरक्षा दलावर आरोप कशाला करतात? ह्या सर्वांना या हल्ल्याने शह दिला आहे. परंतु विषय सुरू झाला तरी संपलेला नाही. अजून काही मोठी घटना घडण्याची दाट शक्यता आहे. या हल्ल्याने अझहर समर्थक चीनच्याही तोंडचे पाणी पळालेले आहे व त्याने पाकिस्तानचे समर्थन करण्यापेक्षा आपसात बसून मिटवा; असा सल्ला दिलेला आहे. कारण भारत इतकी मुसंडी मारणार असेल, तर अजहर मसूदची पाठराखण भारताला सीपेक वा ग्वादार चीन प्रकल्पावरही हल्ले करायला भाग पाडू शकते, अशी चीनला भिती वाटलेली आहे. ते हल्ले पाकिस्तानी भूमीतले असतील व मालमत्तेचे नुकसान दिसायला पाकिस्तानचे असेल. पण व्यवहारात चीनची गुंतवणूक बुडीत जाण्याचा धोका त्यात सामावला आहे. भारतीय हवाई हल्ले करणारी विमाने पाक हद्दीत पंधरावीस मैल आत घुसून हजार किलोचा बॉम्ब टाकू शकतात आणि पाक सेना त्यांना रोखू शकत नाही. त्या भारतीय हवाई दलाची वक्रदृष्टी सिपेककडे वळली तर? बालाकोटच्या हल्ल्याने पाकिस्तान काय शिकला याला महत्व नाही, इतकी चीनची तारांबळा महत्वाची आहे. हल्ल्यानंतरची चीनची प्रतिक्रीयाही बोलकी आहे, आपण सहानुभूतीदार आहोत. युद्ध झाल्यास पाकिस्तान वाचवायला हत्यार उचलणार नाही, असाच यातून चीनने दिलेला संदेश आहे. तो पाकिस्तानला समजेल असे अजिबात नाही. तो आणखी एका हल्ल्याने समजावणे भाग आहे आणि ते फ़क्त भारतीय सेना, कमांडो व हवाई दलच शिकवू शकेल. म्हणूना बालाकोट येथे घडले ती सिर्फ़ झाकी आहे म्हणायचे. खरा तमाशा अजून बाकीच आहे. चीन त्यानेच चिंताक्रांत झालेला असावा.

31 comments:

  1. एक नंबर भाऊ. तुम्ही उडत्या पाखराची......................
    जबरदस्त.

    ReplyDelete
  2. भाऊ नेहमी प्रमाणे अप्रतिम

    ReplyDelete
  3. उत्तम, एक अतिशय studied आणि logical जुळवणूक करून लिहिलेला लेख ।
    पण एक प्रश्न पडतो । ते ' बिचारे ' का ? 🤔😂

    असं ही वाटतंय की या हल्ल्याने जितका आपला प्रश्न सुटतोय तितकाच पाकिस्तान चा ही सुटतोय । असं तर नाही की सगळ्या देशांनी (including Pakistani elites) मिळून भारताला मोकळा हात दिला आहे ?? Indian aeroplanes coming back not only unscathed but also unchallenged is a bit difficult to digest...
    My thoughts.... 😄

    ReplyDelete
    Replies
    1. Ha angle khup interesting ahe.
      कदाचित ही भारत आणि पाकिस्तान ह्यांनी एकत्र मिळून केलेली खेळी सुद्धा असू शकते. पाहुण्यांच्या काठीने डोईजड ठरलेला साप मारणे हा सुद्धा उद्देश असू शकतो

      Delete
  4. अभी पुरी फिल्म बाकी है ।

    ReplyDelete
  5. भाऊ तुमचे विश्लेषण अत्यन्त समर्पक व मुद्देसूद आहे, तुम्ही म्हणता तसे अजूनही काही निर्णय आपले पंतप्रधानांच्या मनात असणार आहेत हे नक्की .

    ReplyDelete
  6. भाऊ,साष्टांग नमस्कार.फक्त एकच खटकले,तुम्ही काय सामान्य पत्रकार वगैरे नाही आहात.

    ReplyDelete
  7. ग्रुप कॅप्टन काय म्हणतात....
    नक्की कोणत्या बाजुला बसणार???
    😝😝😝

    ReplyDelete
  8. Bhau bang on. As usual you hit the nail on the head.

    ReplyDelete
  9. Bhau tumhala rajkiy vishleshak mhananyapeksha bhavishyavetta mhanave ka?

    ReplyDelete
  10. Correct analysis of today's incident

    ReplyDelete
  11. आजच्या भारताच्या कामगिरीवर आपल्या लेखाची वाटच बघत होतो व आला पण. धन्यवाद! खंबीर व कणखर नेतृत्व देशाला मिळाल्यावर काय फरक पडतो ते पाकिस्तानला आज कळले असेल. पाकिस्तानने भारताचे सर्व ईशारे व सुचना नेहमी प्रमाणे धाब्यावर बसवल्या व गाफिल राहिला.अत्यंत सुनियोजीतपणे योजना आखुन अतीरेक्चेयांचे अड्डे अचुक पणे ऊद्ध्वस्त केले व त्यात 300 च्या वर अतीरेक्यांना ठार मारले . अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.पाकिस्तान युद्ध करु शकत नाही व त्याची कुठलीच तयारी नाही हे दिसुन आले. या कृतीतुन चिनला पण योग्य तो ईशारा मिळाला आहे.या कृति मुळे विरोधी पक्षांची खास करुन काँग्रेस पक्षाची तोंडं बंद झाली आहेत .सर्व नेत्यांनी सैन्याचे व जवानांचे अभिनंदन केले पण पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करण्याचा मोठेपणा कुठल्याही नेत्याने दाखवला नाही,जर या मोहीमेत अपेक्षित यश नसत मिळाल वा हानी झाली असती तर सारे विरोधक मोदींवर तुटून पडले असते. सारे मोदी विरोधक निवडणुकीत मोदी बाजी मारणार या विचाराने आता हतबल हीतील.

    ReplyDelete
  12. भाऊ मला तर वाटलं होत की थोडा संयम ठेवून थेट वेगळा बलुचिस्तान करून चीन पाकिस्तान च एकाच वेळी कंबरडं मोडतील.
    Salute to Indian air force as well as all known and unknown forces.

    ReplyDelete
  13. Bhau,atyanta samarpak Ani apratim lekh! Pratyaksha bhetun boluch yaat!- Vidyadhar G Rayrikar Pune

    ReplyDelete
  14. भाऊ राजच्या वक्तव्याचा समाचार घेतला पाहिजे हा माणूस केजरीवाल सारखं बोलतो आहे.

    ReplyDelete
  15. एकदम सही वर्णन

    ReplyDelete
  16. मोदी सगळ्या गोष्टींच श्रेय घेतात. जरा काँग्रेस ला ही श्रेय दिले पाहिजे, काश्मीर प्रश्न निर्माण केल्याबद्दल .

    ReplyDelete
  17. Being a son of India & Ex Service Man I support Indian Army always, just problem was Political will. Now the Indians have decided right thing , repeat 2014

    ReplyDelete
  18. बलुचिस्तान कार्ड अभी बाकी है

    ReplyDelete
  19. भारतीय सैनिकांना सलाम...
    भाऊ....
    आज मुंबई मधील कार्यक्रमात आपली प्रत्यक्ष भेट झाली. आपल्याला भेटता यावं, आपल्या पाया पडावं ही खुप जुनी इच्छा आज पुरी झाली. गुरु देखील अचानक भेटला, खुप बरं वाटलं.
    आपल्या अभ्यासू पत्रकारितेचा अभिमान वाटतो. एक सलाम आपल्यालापण...

    ReplyDelete
  20. जो पुरोगाम्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला... एकदम जोरदार

    ReplyDelete
  21. भाऊराव,

    सीपेक मार्ग कधीच निर्धोक नव्हता. चीनला हे पक्कं ठाऊक आहे. त्याची अपेक्षा इतकीच की भारताने बाकी पाकिस्तानात काहीही करावं फक्त सीपेकला हात लावू नये.

    या पार्श्वभूमीवर मोदी चीनकडेच बलुचिस्तान वेगळा करायचा आग्रह धरू शकतात. पाहुण्याच्या चपलेने विंचू मारायची मोदींची लक्षणं दिसताहेत.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  22. भाऊ भारतात जैश ए पुरोगाम्यांना घाम फुटला आहे, आजच्या लोकसत्ताचा अग्रलेख वाचला की हे लोक इम्रान खानचा चर्चेचा प्रस्ताव स्वीकारावा म्हणून प्रचंड उतावीळ झाले आहेत, राजदीप सरदेसाई, शेखर गुप्ता सागरिका घोष वाजपेयी यांच्या स्तुतीचे पुल उभारत आहेत, आपण म्हणता तसे मोदींनी भारतातील या पाक मित्रांचे अन्न पाणी अक्षरशः बंद केले आहे एका अर्थाने मसऊदच्या तळावर झालेला एअर strike हा या पुरोगाम्यांच्या घरावर झाला आहे

    ReplyDelete
  23. कालच्या विरोधी पक्षांच्या बैठकीत बसलेल्या महाराष्ट्राच्या तथाकथित खणत्या राजाचा चेहेरा बघून वाटले त्यांच्या मनात एकाच विचार असावा की आता यापुढे ' माढ्यात ' लोकसभेला उभा राहू की नको. सगळ्या उपस्थित लोकांच्या चेहेऱ्यावर येणारी लोकसभा निवडणूकच दिसत होती आणि त्यात वाट्याला येणार ' पराभव ' जैशे महंमदच्या तालावर बिनचूक हल्ला झाला आणि विरोधी पक्षांनी अभिनंदन केले फक्त हवाईदलाचे. काही गडबड झाली असती तर लगेच ' ५६ '' ' छातीचा उल्लेख करायला हे कचरले नसते.

    ReplyDelete
  24. Apratim vishleshan. Bhau MNS var hi liha, tyanche kay hotey te

    ReplyDelete
  25. अमित बडवेMarch 2, 2019 at 5:27 AM

    पाकिस्तान चे तुकडे कधी पडतील आपला काश्मीर आपल्याला कधी मिळेल ह्या बद्दल काय वाटते?

    ReplyDelete
  26. भारत माता कि जय हे असे सतत म्हणण्याची संधी मोदीच देऊ शकतात

    ReplyDelete