आधीच्या चुकीतून शिकतो त्याला शहाणा म्हणतात. पण आधीची चुक जो मान्यच करीत नाही, त्याला त्यातून सुधारणे शक्य नसते आणि तो आधीची चुक झाकताना आणखी नवनव्या चुका करीत जातो. अनेकदा तुमच्या अशा चुकांचा दुसर्यांना लाभ होत असतो. दुर्दैवाने भारतातल्या आजच्या विरोधी पक्षांची व त्यांचे पोरकटपणाने समर्थन करणार्यांची तशीच दुर्दशा झालेली आहे. ते नुसते शहाणे नाहीत, तर अतिशहाणे आहेत. म्हणून मुळात आपण चुकतच नाही, याचा आत्मविश्वास त्यांना अशा रसातळाला घेऊन चालला आहे. २००२ पासून नरेंद्र मोदी हा राजकीय नेता अशा मुर्खपणाचा लाभ उठवित इतका मोठा राष्ट्रीय नेता बनून बसला आहे. अर्धशतकाचे राजकारण करून अडवाणी व वाजपेयी अशा दिग्गज भाजपा नेत्यांना जी लोकप्रियता वा यश संपादन करता आले नाही, त्यापेक्षा प्रचंड यश आज मोदींच्या खात्यात जमा दिसते. त्याचे श्रेय त्यांच्या कर्तृत्वापेक्षा विरोधकांच्या मुर्खपणाचा परिणाम आहे. २००२ सालात प्रथमच निवडणूक वा सत्तेच्या राजकारणात आलेल्या नरेंद्र मोदींपाशी तशी कुठलीही राजकीय पुर्वपुण्याई नव्हती. पण त्यांच्या मुख्यमंत्री होण्यानंतर अवघ्या काही महिन्यात गुजरातमध्ये दंगल झाली आणि तेव्हापासून तथाकथित सेक्युलर माध्यमे, विचारवंत, संस्था व राजकीय पक्षांनी मोदींना लक्ष्य केले. परिणामी नकळत त्या माणसाला सहानुभूती मिळत गेलेली आहे. आजही त्यातून त्याची सुटका झाली नाही. कदाचित मोदींना देशाचा अद्वितिय नेता बनवूनच थांबायचे, असा त्यांच्या विरोधकांचा संकल्प आहे किंवा काय, अशी कधीकधी शंका येते. अन्यथा पाच वर्षांच्या कारकिर्दीनंतरही मोदी इतके लोकप्रिय राहू शकले नसते, की विरोधक इतके अगतिक गोंधळून जाऊ शकले नसते. पुढल्यास ठेच मागचा शहाणा असे आपण मराठीत म्हणतो. पण मागचा अतिशहाणा असला तर काय होते, त्याचा हा जीताजागता पुरावा आहे.
२००२ च्या दंगलीनंतर चहूबाजूने मोदींना वेढण्यात आले, तेव्हा त्यांनी आपल्यावरच्या टिकेला भलतेच वळण दिले. जितकी टिका वा शिव्याशाप विरोधक देत राहिले ते मोदींच्या पथ्यावर पडत गेलेले होते. वास्तविक ती दंगल हिंदू मुस्लिमांच्या मनातल्या वैरभावनेचा परिणाम होता. त्याला मोदी आळा घालू शकले नसतील. पण म्हणून त्यांनीच दंगल घडवली वा पेटवली; असा आरोप निव्वळ मुर्खपणा होता. पण विरोधक मोदींना संपवण्यासाठी त्याचा डावपेच म्हणून वापर करीत गेले आणि क्रमाक्रमाने मोदींनी त्यालाच आपले हत्यार बनवून टाकले. सामान्य लोकांनाही ठाऊक होते, की दंगल मोदींनी आवरली नसेल, तरी पेटवली नक्की नव्हती. ती दंगल हिंदूंच्या मनात साचलेल्या रागाचा अविष्कार होता. सहाजिकच जितक्या मोदींना शिव्या पडत होत्या, तितक्या शिव्या प्रत्यक्षात हिंदू बहुसंख्यांकांना अधिक प्रक्षुब्ध करून मोदींकडे ढकलत होत्या. त्यातूनच मग मोदीनिष्ठ नावाची एक मतदार जमात तयार होत गेली. आपल्यावरच्या कुठल्याही टिकेला मोदींनी चतुराईने गुजरातच्या अस्मितेवरचा हल्ला, असे वळण दिले आणि जितका शिव्याशापांचा भर वाढत गेला, तितके मोदी गुजरातच्या अस्मितेचे पक्के प्रतिक बनत गेले. अधिकाधिक गुजराती जनता मोदींकडे ओढली गेली आणि मोदींनीही ‘गर्वी गुजरात’ अशी घोषणा देऊन ‘मेरे पाच करोड गुजराती बंधू’ अशी भाषा सातत्याने वापरली. त्यातून त्यांना सलग निवडणूका जिकणे शक्य झाले. शिव्याशाप देण्यात व विनबुडाचे आरोप करण्याचा खुळेपणा दोनचार वर्षात थांबला असता, तर मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पोहोचूही शकले नसते. पण कधीच न चुकणार्यांना शहाणपणा कोणी शिकवायचा? नेमकी तीच चुक आता पुन्हा होत असून, मोदी म्हणजे गुजरात याच चालीवर भारताची लढवय्या सुरक्षा दले म्हणजे मोदी; असे चित्र विरोधकांनी बालाकोटनंतर निर्माण करण्याचा चंग बांधलेला आहे.
हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथे हल्ला केला आणि जैश महंमद या जिहादी संघटनेच्या छावण्या उध्वस्त केल्याची घोषणा अधिकृतपणे करण्यात आलेली आहे. तिच्याविषयी शंका घेणे म्हणजे प्रत्येक्षात हवाई दल व लष्कराच्या क्षमतेवर, शौर्यावर शंका घेणे आहे. ते कोणाला आवडू शकते? इमरानचे कौतुक करून सुनील गावस्कर वा सचिन तेंडूलकरची निंदा कुठल्या भारतीयाला आवडू शकते? नेमकी तशीच इथे स्थिती आहे. बालाकोटच्या हल्ल्यावर शंका घेतली गेली व पुरावे मागितले गेल्यावर मोदींची भाषा ‘गर्वी गुजरात अस्मिते’ची आठवण करून देणारी आहे. या शंका़चा मारा सुरू झाल्यावर मोदींनी आपल्या जाहिर भाषणातून नेमके विरोधकांना कोंडीत पकडले आहे. मोदीला शिव्या द्या, पण सेनादलाची अवहेलना नको, सैनिकांच्या शौर्यावर चिखलफ़ेक नको; असा साळसूद पवित्रा घेतलेला आहे. आपल्याला विचारल्या जाणार्या प्रश्नांना थेट सेनादलाविषयीची शंका व आरोप ठरवून, मोदींनी दिलेली कलाटणी विरोधकांना जमिनदोस्त करण्यास पुरेशी ठरणारी आहे. असल्या शंका घेऊन व आरोप करून पाकिस्तानची प्रशस्ती विरोधकांनी मिळवली आहे. पण पाकिस्तान ज्याचे कौतुक करतो, त्याच्याविषयी भारतीयांना कमालीचा संताप येतो, ह्या वस्तुस्थितीचे काय? जो कोणी पाकिस्तानविषयी आत्मियता दाखवील वा त्याना झुकते माप देईल; त्याच्या विरोधात भारतीय बहुसंख्य लोक जातात. ही तर वस्तुस्थिती आहे ना? मग ताज्या घडामोडी बघितल्या तर बालाकोटचे पुरावे मागून वा त्यासाठी युक्तीवाद करून विरोधकांनी गुजरातच्या दंगलीनंतरची पुनरावृत्ती चालवलेली नाही काय? याक्षणी बालाकोटविषयी प्रश्न विचारणे वा आक्षेप घेणे, म्हणजे भारतीय सेनादलाला खोटे पाडून मोदींच्या हाती कोलित देणे आहे. इतकेही ज्यांच्या मेंदूत शिरत नाही, त्यांना कोण वाचवू शकतो?
लोकमत किंवा मतपेटीत जाऊन पडणारे मत, ही शेवटी लोकभावना असते आणि तो बुद्धीवाद नसतो. लोकांना भावणारे व आवडणारे काहीतरी हवे असते आणि त्यावर लोकमत आकार घेत असते. बालाकोटचा हवाई हल्ला ही सामान्य भारतीयांचे दिर्घकालीन स्वप्न होते आणि आहे. सतत घातपात व जिहादी हिंसा करणार्या पाकला काहीतरी धडा शिकवला पाहिजे; ही प्रत्येक भारतीयाची दिर्घकालीन सुप्त इच्छा होती आणि बालाकोटच्या हल्ल्याने ती पुर्ण झालेली आहे. त्यामुळे सुखावलेल्या भारतीयांसमोर तोच हल्ला खोटा वा निरूपयोगी असल्याची भाषा बोलणे, म्हणजे त्याच सामान्य भारतीयाच्या तोंडातला तो सुखाचा घास हिसकावून घेण्याचे पाप आहे. ते पाप करणार्याला कुठला संवेदनशील भारतीय माफ़ करू शकतो? तो भारतीय मोदीभक्त वा पंतप्रधानाचा चहाताही असण्याची गरज नाही. पण भक्त नसलेला सामान्य भारतीयही आज विरोधकांच्या असल्या शंकानी दुखावला आहे. मोदींना मत देण्यापेक्षा अशा दिवाळखोरांना धडा शिकवण्याची त्याची इच्छा अधिक प्रबळ होण्याला पर्याय नाही. मग तो मतदानाला जाईल, तेव्हा त्याच्या मनात मोदींना मत देण्याची इच्छा नसेल. मग बालाकोटवर शंका घेणारे व पाकिस्तानला पोषक बोलणार्यांना धडा शिकवायची इच्छा कशी पुर्ण होईल? त्यांनी अशा विरोधकांना धडा शिकवायचा तर कोणाला मत द्यावे लागे? हे सगळे विरोधक मिळून मोदींना हरवायला निघाले असतील, तर त्यांना हरवण्यासाठी आसूसलेल्या भारतीय मतदाराला मोदी आवडत नसले तरी त्याच मोदी व भाजपाला मत देण्याखेरीज पर्याय उरतो काय? तशी वेळ मतदारावर मोदींनी आणलेली नाही, तर मोदी विरोधकांनी आणलेली आहे ना? मग त्यांना शहाणे म्हणायचे की अतिशहाणे म्हणायचे? लोकशाही लोकभावनेवर चालते आणि तीच लोकभावना दुखावण्यातून लोकशाहीत निवडणूका जिकता येत नाहीत. हे अशा अतिशहाण्यांना कधी कळायचे?
इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे का मोठे झाले....
ReplyDeleteका लोकनेते झाले...हा अभ्यास ज्यांनी केला नाही, त्यांना मोदी का मोठे होत आहेत, हे कळणारच नाही.
भारतात लहान लहान पोरं मॅच सुरू करण्यापूर्वी टॉस करायला नाणं उडवतात तेंव्हा सुद्धा भारत का पाकिस्तान असा प्रश्न विचारतात.
ReplyDeleteकारण नाण्याच्या एका बाजूला सत्यमेव जयते च्या शिक्क्याखाली भारत लिहिलेलं असतं, म्हणून आपसूक 1 रुपया लिहिलेली बाजू त्याच्यावर कुठंही पाकिस्तानचा उल्लेख नसताना फक्त भारत लिहिलेल्या बाजूची विरुद्ध बाजू या पात्रतेवर पाकिस्तान म्हणवली जाते.
या मागची मानसिकता ज्याला कळली तो अशी चूक करणार नाही
अती शहाणा त्याचा बैल रीकामा हे तंतोतंत मोदी
ReplyDeleteविरोधक प्रत्यक्षात आणत आहेत.बालाकोट मधिल हवाई हल्ल्यात किती अतीरेकी मारले गेले या संख्ये वरुन गदारोळ ऊडवणे व कारवाईच्या यशस्वीपणा बद्दल शंका ऊपस्थित करणे हे केवळ मोदींना श्रेय मिळू नये या साठी चालले आहे.याचा विपरीत परीणाम होऊन लोक अजुनच मोदी समर्थनार्थ एकवटत आहेत व मोदींना हवे तसच घडत आहे. आता राफाएलचे महत्वाचे कागद पत्र चोरीला गेले त्यावरून मोदींना धारेवर धरत आहेत व राहुल गांधी तर मोदींना कोर्टात खेचायची भाषा करत आहेत.सत्तेवर येण्यासाठी या विरोधकांचे ऊद्योग बघुन या नेत्यांची किळस वाटते.आपण केलेले विश्लेषण अतीशय वास्तविक आहे.
Todays's article liked by heart. Common things should be follow in Politics.
ReplyDeleteहीच तर मोदींजींची सगळ्यात मोठी कमाई आहे भाऊ..!
ReplyDeleteमाझ्यासारखे सामान्य मतदार.!
आणि मोदींजींनी राज्यस्तरीय राजकारणांतून बाहेर पडून देशव्यापी देशकार्यामध्ये जे जनमानसात स्थान मिळवलेले आहे त्याला तोड नाही.!
अतिशय सडेतोड आणि सुंदर लेख..!
तसे आपले सगळेच लेख तसेच असतात म्हणा.!
सत्ता जहर होती है.. हा सल्ला फारच गंभीरपणे घेतला गेलाय असं वाटतंय.
ReplyDeleteतुमचा विचार पटतो, पण एक गोष्ट मला वाटते ती अशी मोदी एक मुरब्बी नेता आहेच त्याच्या पुढे हे सगळेच कसे पाणी कम chai निघालेत ह्याचाच अर्थ मोदी चा अभ्यास खूप दांडगा आहे हे खरे
ReplyDelete१००% सहमत.. ✌
DeleteBhau, I read your articles daily. I never miss one. Only after reading your articles, I get the feeling that Modi will get a second term. If you read mainstream media news, you will get a feeling that Modi is going to loose badly. That's how badly mainstream media paints Modi & NDA Govt.
ReplyDeleteपण भाऊ,थोडेसे खटकते.लेख जरी मोदी विरोधकांच्या बाजूने पक्षपातीपणे लिहला असला तरी मोदी - शहा जोडगोळीने संधीचे सोने केले आहे. प्रचंड राबले आहेत. डॉक्टर - गुरूजी - भाऊ देवरसाच्या प्रयत्नांना प्रत्यक्ष आकार दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही राज्यकर्त्यांचे कर्तव्य असते की प्रथम जनतेचे प्रचलित दहशती हल्ल्यापासून रक्षण करणे. मोदी - शहा जोडीने , दोवल यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच काश्मीर सीमेकडचा प्रांत सोडला तर बाकी सगळा प्रदेश दहशती हल्ल्यापासून दूर ठेवला. अथिकाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल उत्तरदायित्व ठेवले.
ReplyDeleteएकदम बरोबर
Deleteभाऊ नमस्कार,
ReplyDeleteकाल आपले नासिक येथील अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषयावरचे छान झाले. काल ठरवले होते कि आपल्याशी संवाद साधूया, परंतु माझ्याप्रमाणेच इतरही ह्याच प्रतीक्षेत असावेत कि काय म्हणून समारोप होताच आपल्या भोवती आपल्या चाहत्यांचा गराडा पडला व मी माघारी फिरलो ! असो पुन्हा कधीतरी !
निर्भीड.कॉम
nirbhid.com
ही पाकिस्तानविरोधी लाट मतदानापर्यंत टिकेल?
ReplyDeleteविरोधक ठेवतातच आहे टिकवून!😀😆
ReplyDeleteभाऊ 1999 मध्ये वाजपेयींच्या लाहोर बस यात्रे नंतर त्यावेळचे पाकचे सेनाप्रमुख मुशर्रफ यांनी कारगिल मध्ये घुसखोर पाठवले तेव्हां उंच अशा कारगिल पहाडावर भारतीय सेनेला पोहोचणे अवघड होईल आणि वाजपेयी यांची बदनामी होऊन निवडणुकीत त्यांचा पराभव होईल असा पाकचा अंदाज होता मात्र त्यावेळेस अनपेक्षित रीतीने कारगिल वर हवाई हल्ले करण्यात आले आणि पाकचे आक्रमण मोडून काढण्यात आले त्यानंतर वाजपेयींच्या nda ला 300 च्या आसपास जागा मिळाल्या मात्र कंदाहार आणि संसदेवरील हल्ल्यानंतर ब्रिजेश मिश्र या वाजपेयींच्या सल्लागाराने त्यांना चुकीचे सल्ले दिले आणि पाकला धडा शिकवण्या ऐवजी परत मैत्री आणि क्रिकेट सुरू झाले आणि त्याचा फटका 2004 मध्ये बसला संसदेवरील हल्ल्यानंतर त्या वेळच्या सेनाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पाकला धडा शिकवला असता तर कदाचीत सोनिया गांधींचे पाकप्रेमी सरकार देशाच्या बोकांडी बसलेत नसते
ReplyDeleteचूकीची माहिती, कारगिल वेळी हवाई दलाची ईच्छा व ताकद असून ही त्यांना त्यांचा प्रयोग करु दिला नव्हता.
DeleteIAF ने ताकत वापरली पण LOC CROSS न करता बॉम्ब फेक केली आहे
Delete