Thursday, April 11, 2019

गावात लगीन, कुत्र्याक बोवाळ



आता त्याला पाच वर्षे उलटून गेलेली आहेत. २०१३-१४ च्या कालावधीत देशातले अनेक तथाकथित बुद्धीमंत आणि कलावंत वगैरे आजच्यापेक्षाही मोठ्या आवाजामध्ये देश खड्ड्यात जाणार म्हणून चिंताक्रांत झालेले होते. नोबेल विजेते डॉ. अमर्त्य सेन यांच्यापासून गिरीश कर्नाडपर्यंत अनेकजण तर मोदी निवडून आल्यानंतर भारत सोडून अन्य देशात पलायन कराव लागेल, असेही त्या काळात घसा कोरडा करून सांगत होते. अर्थात त्याचा मतदारावर तीळमात्रही परिणाम झाला नाही आणि प्रचंड बहूमताने मोदींना मतदाराने पंतप्रधानपदी आणुन बसवले. त्याचा कुठल्याही सामान्य बुद्धीच्या माणसाला लागणारा अर्थ सोपासरळ आहे. मोदी भारतीयांना आवडलेले नेते असावेत हा एक अर्थ आहे. तसे नसेल तर हे तथाकथित बुद्धीमंत वा कलावंत आपल्या देशातून निघून जावेत, अशा तीव्र इच्छेनेच लोकांनी मोदींना भरभरून मते दिलेली असावीत. मोदींना एकहाती व बहूमताने सत्ता मिळाल्यावर ही मंडळी देश सोडून दुर कुठे निघून गेलेली असावीत, असाच अनेकांचा समज झालेला होता. पण पाच वर्षे उलटून पुन्हा लोकसभेच्या निवडणूका लागल्या आणि यांचा गदारोळ सुरू झाला. त्यावेळी आधी व्यासंगी संपादक कुमार केतकरांच्या व्यापक कटाचे स्मरण झाले. कारण काही महिन्यांपुर्वीच केतकरांनी २०१९ सालची सार्वत्रिक निवडणूक होणारच नसल्याची हमी दिलेली होती. पण नियती वा जगरहाटी केतकरांच्या सल्ल्याने चालत नसल्याने आणि अजूनही देशात निवडणूक आयोग समर्थ असल्याने, निवडणूका घोषित झाल्या. मग हे जुनेच बेडुक बिळातून बाहेर पडले आणि त्यांनी नव्याने डराव डराव सुरू केले. त्यापैकी काहींनी मोदींना मते देऊ नये, असे आवाहन लोकांना केलेले आहे. ते आवहन मतदारासाठी वा मोदी विरोधातले असल्याच्या समजुतीने अनेक भाजपावाले मोदी समर्थक संतप्त झाले तर नवल नाही. मला मात्र खुप जुन्या काळात ऐकलेली एक मालवणी म्हण आठवली.

अशा प्रकारची पत्रके किंवा पोरकटपणा उतावळेपणा सुरू झाला, मग आमची मालवणी आजी म्हणायची ‘गावात लगीन आणि कुत्र्याल बोवाळ’. त्याचा अर्थ मजेशीर आहे. कुठल्याही गाववस्तीमध्ये भटक्या अनाथ कुत्र्यांचा जमावडा असतो. तो कुठेही तळ ठोकून असतो आणि रस्ता चौकातून येणार्‍या जाणार्‍यांवर अकारण भुंकणे त्यांचा विशेषाधिकार असतो. लोक त्यांच्याकडे फ़ारसे बघत नाहीत की त्यांची दादही घेत नाहीत. एखादा खुपच वैतागला तर कुठेतरी पडलेला दगड उचलून त्या भुंकणार्‍यांच्या दिशेने भिरकावतो. किंवा जवळच असला तर त्या कुत्र्याच्या कंबरड्यात लाथ हाणत असतो. यापेक्षा त्यांची दखल कोणी गावात घेत नाही. पण अशी कुत्रेमंडळी त्यावरही खुश असतात. कारण दगड वा लाथ मारणार्‍याने निदान त्यांची दखल घेतलेली असते. पण हा सगळा प्रकार नेहमीच्या जीवनातला असतो. एखाद्या दिवशी गावामध्ये वा वस्तीमध्ये काही मोठा समारंभ वा उत्सव वगैरे असेल, तर या भटक्या कुत्र्यांना कोणी दगडही मारत नाही. खुपच जवळपास फ़िरकले तर हाकलून लावले जाते. पण त्या सगळ्या घडामोडीत आपले स्थान शोधायला ही बेवारस कुत्री कमालीची तळमळत असतात. मग ती अकारण कोणाच्या अंगावर धावून जाणे किंवा भूंकण्याचा खेळ करतात. तरीही कामाच्या व्यापात गुंतलेले लोक गावकरी अशा प्राण्यांकडे दुर्लक्ष करतात. कुठेतरी लाऊडस्पिकर कोकाटत असतो, तर सनई-चौघडे ढोलताशे वाजतात. नवरामुलगा किंव वधू देवदर्शनाला जाते आणि त्यांच्याही सोबत ताशेवाले वाजवत असतात. अशावेळी त्या चौकात वा जवळपास फ़िरणार्‍या कुत्र्यांची तारांबळ उडालेली असते. कुठे जावे, धावावे किंवा कुणावर भुंकावे; त्याचाही त्या बिचार्‍यांना थांगपत्ता नसतो. मग विचित्र आवाज काढत हे कुत्रे लक्ष वेधुन घेण्यासाठी काहीही खुळेपणा करतात. इकडेतिकडे धावतील भुंकतील पळापळ अशी करतील, की त्यांनाच लगीनघाई असल्याचे भासावे. त्याला बोवाळणे म्हणतात.

आगांतूक भटक्या कुत्र्यांना ज्या समारंभात कुठलेही स्थान वा आमंत्रणही नसते; तिथे घुसून वा घावत जाऊन वेडाचार करणे म्हणजे बोवाळणे होय. कुत्र्यांची नेमकी तशी अवस्था गावातल्या समारंभाच्या दरम्यान असते. अलिकडल्या पुरोगामी राजकारणात नगण्य वा निकामी होऊन गेलेल्या अनेकांना तशी स्थिती आलेली आहे. मग ते वेगवेगळे मुखवटे लावून किंवा पत्रके घोषणा देऊन आपल्या दिशेने लक्ष वेधुन घेण्याची जी केविलवाणी धडपड करतात. तेव्हा ते आजीचे शब्द आठवतात. कालपरवा स्वत:ला कला्वंत म्हणवून घेणार्‍या सहाशे मंडळींनी बोवाळण्याचा उद्योग साजरा केला. लोकांनी मोदींना किंवा भाजपाला मते देऊ नयेत, किंवा पुन्हा सत्तेत आणू नये असे आवाहन करणारे पत्रक त्यांनी काढलेले आहे. मुळात त्या यादीतली अनेक नावे बघितली तर प्रथमच कळते, की तेही कलावंत आहेत. अन्यथा त्यांना कशासाठी कलावत म्हणायचे, असा प्रश्नच पडेल. कुठल्याही सरकारी योजनेतील लाभ उठवण्य़ासाठी जशी बोगस लाभार्थींची यादी बनवली जाते, तशाच ह्या सह्या आणि त्यातले आवाहन आहे. यापैकी कोणालाही मैदानात उतरून मोदी वा भाजपाला मत देऊ नका, असे सांगण्याचा लोकशाहीत पुर्ण अधिकार आहे. पण कशासाठी त्या पक्षाला वा नेत्याला मत देऊ नये, त्याचाही खुलासा करता आला पाहिजे. तुम्हाला तुमचे मत देण्याचा अधिकार आहे, तसाच सामान्य मतदाराला आपले मोदीविषयक वा भाजपाविषयी मत बनवून मत देण्याचा अधिकार आहे. त्यात हे दिडशहाणे पत्रक काढून हस्तक्षेप करीत नाहीत काय? ज्या मतदाराने अमूक नेता वा पक्षाला आपले मत देऊ नये असे तुम्हाला वाटते, त्याचा तुम्ही समाधानकारक खुलासा व कारणही दिले पाहिजे. पण ह्या लोकांच्या एकूण गमजा बघितल्या तर त्यांना कला अथवा कुठल्याही विचारसरणीशी कर्तव्य नसून, मोदी वा संघाच्या द्वेषापोटीच त्यांचा हा बोवाळ चाललेला आहे. त्यात सुद्धा नवे काहीच नाही.

अमूकतमूकाला मत देऊ नका, असे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा दुसर्‍या कुणाला व कशाला मत द्यावे, त्याचाही सल्ला देता आला पाहिजे. राहुल गांधी वा ममता बानर्जी सुद्धा भाजपा मोदींना मत देऊ नका, असे ठामपणे सांगतात. त्याची कारणेही देतात. मोदी व भाजपावालेही आपल्याला कशाला मते द्यावी किंवा अन्य कोणाला मते देऊ नयेत, त्याची कारणे देत आतात. या तथाकथित कलावंतांना तसे करायचे असेल, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य वा अन्य कुठल्या स्वातंत्र्याचा संकोच असले भुतावळे उभे करून चालणार नाही. सज्जड पुरावे द्यायला ह्वेत. कालपरवाच कोर्टाने एका चित्रपटाच्या प्रदर्शनात ममता बानर्जींच्या सरकारने गळचेपी केल्याचा आक्षेप मान्य करून ममता सरकारला २० लाख रुपयाचा दंड ठोठावलेला आहे. मग तिथे या जमावातला कोणी भुंकायला कसा गेला नाही? गेला नसेल, तर त्याचे अविष्कार स्वातंत्र्य आणि सार्वजनिक शब्दकोषातला व राज्यघटनेतला त्याचा अर्थ यात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. अशी मंडळी किती सह्या जमवून कुठे भुंकतात, त्याला काडीमात्र अर्थ उरत नाही. त्यापैकी एकाने तरी ममताच्या चित्रपटबंदी विरोधात आवाज उठवला होता काय? नसेल तर त्यांना कुठल्याही स्वातंत्र्य वा राज्यघटनेशी कर्तव्य नसून निव्वळ मोदीद्वेषने हे भुंकत सुटले आहेत, हे आपण ओळखले पाहिजे. मग असे लोक केव्हा व कुठे कुठे भुंकतात, ते तपासले मग नेमके समारंभ सणासुदीलाच भुंकत आहेत, हेचा दिसून येईल. त्याचे कारणही तेच आहे, आम्ही घसा कोरडा पडण्यापर्यंत भुंकतो आणि आमची कोणी साधी दखलही घेत नाही, हे खरे दुखणे आहे. आपण हल्ली पुरते संदर्भहीन होऊन गेलोय, याची बोच त्यांना भुंकायला भाग पाडत असते. सहाजिकच निवडणूका वा तत्सम राजकीय सणसमारंभात त्यांचा असा बोवाळ सुरू होत असतो. मग आजी आठवते आणि तिच्या अस्सल मालवणी म्हणीचा आशय उमगतो.

43 comments:

  1. कलाकार म्हणून जे काम करायला पाहीजेल ते न करता भलतेच उद्योग करायला लागलेत हे
    भाऊ तुम्ही याना चांगलीच उपमा दिली आहे

    ReplyDelete
  2. परखड विश्लेषण.

    ReplyDelete
  3. भाऊ तुमचे youtube चे विडिओ फार आवडतात.. कृपया करून राज ठाकरे वर एखादा video केलात तर बरे होईल ..

    ReplyDelete
  4. श्री भाऊ अहो हो तर सुरवात आहे, 23 मे ला त्सुनामी, भूकंप आणि तत्सम काय काय होईल माहीत नाही,आणि मी हे लिहितोय तेव्हा ६० % मतदान ही सुरवात आहे

    ReplyDelete
  5. भाऊ १३० कोटी जनतेला आता आपलं हित अहित बरं समजायला लागलंय, कारण आता माहितीची साधने इतकी प्रचूर उपलब्ध आहेत की कुणी लुंब्या सुंब्या कितीही बोंबा ठोकत असला तरी ती विचारपूर्वक निर्णय घेतात. ही असली ६०० काय किंवा आणखी हजारभर काय, निरुपयोगी झालीयत. किंमत शून्य गणिका जश्या रस्त्यावर येऊन चाळे करतात तशातला हा प्रकार. कोंबडं झाकलं म्हणून दिवस उगवायचा थांबत नाही आणि खोटं कितीही रेटलं तरी खरं कांहीं बदलत नाही.

    ReplyDelete
  6. कुत्र्यांचा अपमान..

    ReplyDelete
  7. अदखलपात्र जमाव ....

    ReplyDelete
  8. Sayabanu तुम्ही एकदम बरोब्बर बोललास, मालवणी आ साय, म्हणून गाळी येतत तोंडावर. झालास असा ब्लॉग

    ReplyDelete
  9. एक ही झस
    झटका!!!

    ReplyDelete
  10. भाऊ लोकसत्ता कार गिरीश कुबेर असाच रोजच्या रोज मोदी सरकारला शिव्या घालणाऱ्या अग्रलेखांचा रतीब घालत असतात, मध्ये काही लोकांनी फेसबुकवर कुबेराना झोडपले होते पण आता त्यांची स्थिती आपण वर उल्लेख केला तशी भटक्या कुत्र्यांसारखी झाली आहे कोणी त्यांची दखल अजिबात घेत नाही

    ReplyDelete
  11. Ek.no..changlich chaprak dilit bhau..

    ReplyDelete
  12. एकदा झक्कास

    ReplyDelete
  13. भाऊ , एकदम बरोब्बर विश्लेषण

    ReplyDelete
  14. फार सुंदर विवेचन आणि अचूक निष्कर्ष !
    ज्याची विचारशक्ती कुठल्या ही पक्षाशी गहाण पडलेली नाही , त्याला हे परखड विवेचन पटेल किंवा त्याचा व्यत्यास म्हणून असे ही म्हणता येईल की , हे विवेचन आपल्याला पटत नाही , याचा अर्थ आपली विचारशक्ती कुठल्या तरी पक्षाशी गहाण पडली आहे का , हे तपासणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  15. एक मस्त अन अप्रतिम लेख भाऊ, असल्या बोवाळी कुत्र्यांची बोळवण करण्याची वेळ आली आहे.

    ReplyDelete
  16. bhau ajun kiti marnar ya bhatkya kutryana

    ReplyDelete
  17. एकदम झकास. कानफाटात हाणलीत.

    ReplyDelete
  18. भाऊ हे अतिशय चुकीचं आहे...


    तुम्ही हे असं भटक्या कुत्र्यांचा अपमान नाही करू शकतं...

    ReplyDelete
  19. भाऊअतीशय सडेतोड पणे या विचारवंतांची व बुद्धिमंतांची आपण हजेरी घेतली आहे.हे जे ६०० कलावंत(?) ज्यांनी मोदींना मत न देण्याचे आवाहन केले आहे ते बहुतेक विस्मृतित व अडगळीत गेले आहेत.विचार स्वातंत्र्याचा ऊदो ऊदो करणारे हे कलावंत चित्रपटा मध्ये अन्याया विरुद्ध लढणार्या नायकाची भुमिका करतात तेव्हा केवळ पैशा साठी करतात व प्रत्यक्ष जीवनात त्याच्या विरुद्ध वर्तन असते.२०१४ च्या निवडणुका होत असताना असेच अनेक अडगळीत गेलेले विचारवंत ,बुद्धिवदी ज्या मध्ये अमर्त्य सेन पण होते या सर्वांनी मोदींना अमेरीकेने विसा देऊ नये आसे अमेरीकेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले.अर्थात या पत्राला केराची टोपली दाखवली व मोदींना अमेरीकेने अत्यंत सन्मानाने आमंत्रित केले.स्वतः मोदींनी या सर्वांना अनुल्लेखाने मारले व त्यांची जागा दाखवली.आत्ता पण तेच होणार आहे.मला या लोकांची फक्त किव येते.सामान्य जनता यांच्या पेक्षा कितीतरी चाणाक्ष आहे हे यांना कळेल तो सुदिन.या लोकांंना गावातील भटक्या कुत्र्यांची उपमा दिलीत हा म्हणजे कुत्र्यांचा अपमान आहे.भटकी कुत्री पण त्यांना खायला घालणार्यांवर भुंकत नाहीत.आपण असाच लेख मायावती,ममता व राहुल यांच्यावर अशी विनंति आहे.

    ReplyDelete
  20. पप्पू व पाखंडी सेक्युलर लोकांच्या सत्तालोलुपतेमुळे एकदाचे इस्लामी राज्य आले की मगच या येड्यांना अविष्कार स्वातंत्र्याचा अर्थ उमगेल. येड्या डोक्याचे लोक ... कुराणात सरळ सरळ ... येन केन प्रकारेन .... जग इस्लामी करण्याचा आदेश आहे ..... दार उल अमान, दार उल हरब , दार उल इस्लाम असे तीन टप्पे आहेत. वर गजवा ए हिंद चालू आहे. नशीब या कलावंतांचे की देशात हिंदुत्ववादी आहेत ... म्हणूनच यांचे अविष्कार स्वातंत्र्य अजून जिवंत आहे. नाहीतर डोक्यावर टोपी घालून तापलेल्या रस्त्याचे चुंबन घेत बसावे लागले असते यांना.

    ReplyDelete
  21. Very nice... khup ch chhan lekh....

    ReplyDelete
  22. Ha ,kutryacha apman ahe .......

    ReplyDelete
  23. Bhau agadi chan zodapalat yana.
    tya raj la kahi tari shikava to pisalalay.

    ReplyDelete
  24. या ६०० आश्रित,लाचार तथाकथित कलाकारांना मोदींना मतदान का करायचं नाही विचारल तरी त्यांच उत्तर ठरलेलं असेल,आणि या फक्त ६०० च नाही तर उरलेल्या इतर मोदी विरोधकांच या प्रश्नावर एकच मजेशीर उत्तर ठरलेलं आहे,"मोदी अन् संघामुळे देशाची घटना तसेच देशातील लोकशाही धोक्यात आहे."
    तुम्ही सावध भुमिका घेऊन ज्या राज ठाकरे बद्दल बोलायच लिहायचं टाळतायं,ते सुध्दा मोदींनी जनतेचा केसाने गळा‌ कापला वगैरे म्हणताहेत पण म्हणजे नेमकं काय केल ते सांगत नाहीएत.

    ReplyDelete
  25. महेश लोणेApril 13, 2019 at 10:28 AM

    या "बुद्धिमंतां" ना आपण चांगलीच उपमा दिली आहेे.

    ReplyDelete
  26. बोवाळले

    चपखल् !

    ReplyDelete
  27. Bhai I was supposed Maharashtra time is neutral paper. But it is not true .that day before tomorrow PM has got Russian award that news was on inside corner but raffel jugment is one from side.Also Sunil chawke LEKH is always against BJP

    ReplyDelete
  28. भाऊंनी तर या भटक्या सिक्युलर कुत्रयांच्या पेकाटातच लाथ मारली :D

    ReplyDelete
  29. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे अशी बोंब केव्हाही आणि कुठेही ठोकता येते, देशाच्या पंतप्रधानांना अत्यंत अर्वाच्य भाषेत संबोधता येते तरीही हे उपटसुम्ब म्हणतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, गंमत आहे.

    ReplyDelete
  30. << मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा पादचारी पुल कोसळला तरी त्याचा दोष थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी वा मुख्यमंत्री एवेंद्र फ़डणवीस यांच्यापर्यंत पोहोचत असतो. जणू तेच नित्यनेमाने त्या पुलाची पहाणी करून रोजच्या रोज त्याची देखभाल करणारे कर्मचारी असतात. >>
    -------- प. बंगाल मधे पुल कोसळल्यावर मोदी यांचे वक्तव्य. १:४९ नंतर अगदीच म्हत्वाचा संदेश आहे.
    https://scroll.in/video/806344/watch-narendra-modi-say-the-kolkata-flyov...

    << अन्यथा अशा कुठल्याही बाबतीतले दोष त्यांच्या माथी कशाला मारले गेले असते? >>
    -------- त्यांनी आधी तेच काम केले आहे. २६-११ च्या मुंबई हल्यानंतर चा त्यांचा संदेश बघा. हल्लेखोरांवर सम संपुर्णा नियंत्रणही मिळवलेले नव्हते, हल्ला सुरुच होता आणि यांच्या भाषणात पंतप्रधानांना दोष... मग अगदी त्याच न्यायाने उरी, पठाणकोट, पुलवामा येथे अतिरेकी हल्ला झाल्या नंतर मोदी यांना दिल्या जात असेल तर ते योग्यच आहे.
    तुम्ही जसे पेराल तसेच उगवणार.
    मोदींचे २६-११ हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशीचे भाषण गुगला...

    << दिल्लीनजिक दादरी येथे उत्तरप्रदेश पोलिसांची हुकूमत असताना व त्या राज्यात समाजवादी पक्षाचे अखिलेश सरकार सत्तेत असतानाही, अखलाख नावाच्या मुस्लिमाला जमावाने ठार मारले, तर गुन्हेगार पंतप्रधान मोदी असतो.>>
    ------ १, २ तुरळक घटना आणि एक ट्रेंड या मधे फरक आहे.
    अगदीच ताज्या घटनेत, उ. प्र. मधे तर जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला, पोलीस अधिकार्‍याचा खुन केला... राज्यात सत्ता भाजपाची, केंद्रात सत्ता भाजपाची.
    काश्मीरी भारतीयांना लखनौमधे मस्त चोपले... राज्यात सत्ता भाजपाची, केंद्रात सत्ता भाजपाची.
    २५-३० च्या जमावाने गुडगाव ( हरियाणा) मधे मुस्लिम घरात शिरुन त्यांना मारहाण केली... राज्यात सत्ता भाजपाची, केंद्रात सत्ता भाजपाची.

    हिंसाचार कुठेही झाला पहिली जवा जबाबदारी राज्याची असते, पण त्या मधे एक ट्रेंड दिसत असेल तर केंद्र हस्तक्षेप करतोच.

    २००२ गुजरात दंगलीच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांना "राजधर्मका पालन करे" अशी समज दिली होती.
    https://www.youtube.com/watch?v=xDzugJ1WiNo

    त्यावेळी मोदी सरकार बरखास्त होणार होते... पण लालकृष्ण आडवाणी यांनी मोदी यांना संजिवनी दिली... आणि वाचवले.... आज लालकृष्ण आडवाणी यांना त्या निर्णयाचा सर्वात जास्त पष्चाताप होत असेल.

    << त्यात स्थानिक पोलिस वा ठाणेदार वगैरे कोणी दोषी नसतो. थोडक्यात कुठेही काही विपरीत घडले, तर त्यातला आरोपी मोदी असतात. अगदी पुलवामा येथे लष्करी ताफ़्यावर हल्ला झाला, तर छप्पन इंची छाती म्हणून मोदींना जाब विचारला जातो. >>
    ------- अरे २०१४ च्या आधी सर्व दोष पंत्प्रधान मनमोहन सिंग यांना देणारे मोदीच होते ना ?
    आता नियम बदलला का ?

    <>
    ------- काल अगदी अशाच प्रकारचा दोष देणारे मोदी / भाजपा होते... आता ते सरकारात गेले म्हणजे तर्क शास्त्र बदलले का ?

    पण हीच मोजपट्टी लावायची झाल्यास तिथे काही चांगले वा स्पृहणिय झाले, तर त्याचेही श्रेय मोदींनाच द्यायला नको का? तिथे तात्काळ स्पेशल केस म्हणून तर्कशास्त्र पलटी मारत असते.

    << हवाई दलाने पाकिस्तानात बालाकोटला जाऊन मोठा प्रतिहल्ला केल्यास त्याचे श्रेय मात्र सरकार वा मोदींना असू शकत नाही., तिथे हवाई दल वा सेनादलाची पाठ थोपटायची असते. हा भेदभाव किंवा पंक्तीप्रपंच आता नित्याचा झाला आहे आणि डोळसपणे त्याकडे बघणारी सामान्य जनताही त्यातला भेदभाव समजू लागलेली आहे. त्यामुळेच कालपरवा अवकाशात उपग्रहाचा वेध घेणार्‍या क्षेपणास्त्राच्या विकासाचे श्रेय मोदींचे आहे, हेही जनता जाणते आणि त्याची ग्वाही देण्यासाठी डीआरडीओ या संस्थेचे माजी प्रमुखही समोर आलेले आहेत. >>
    ------ बालकोट ला हल्ला केला आणि ३००च काय ३००० अतिरेकी मारले असे मी समजतो...
    त्या बाजूला काही तर हालचाली झाल्या असत्या ? जखमींना दवाखन्यात नेण्यासाठी, मृतांना बाहेर काढण्यासाठी?
    १००० - १००० किलो चे अनेक स्फोटके टाकल्यावर काहीच नुकसान झाले नाही?
    याला पण 'सरकारचा' जुमला समजायचा का?
    ३०० मोबाईल "बंद" झाले हे जसे शोधता आले तसे स्फोट घडवणार्‍याच्या हालचाली, ३०० किलो स्फोटके कशी/ कुठून आली हे का नाही अगोदर शोधले?

    ReplyDelete