हेनरिख हायने नावाचा जर्मन कवि विचारवंत म्हणतो, ज्यांना सत्य गवसले असल्याचा भ्रम झालेला असतो, असे लोक मग तेच ‘सत्य’ सिद्ध करण्यासाठी बेधडक खोटेही बोलू लागतात. नरेंद्र मोदी यांना साडेपाच वर्षापुर्वी भाजपाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यापासून अशा ‘सत्यवादी’ साक्षात्कारी लोकांची संख्या आपल्या देशात क्रमाक्रमाने वाढत गेलेली आहे. त्यांचा खोटेपणा वारंवार उघडकीस आला आहे आणि त्यामुळे जपून खोटे बोलावे, इतकेही भान त्यांना उरलेले नाही. वास्तविक एकदोनदा खोटे पकडले गेल्यावर सामान्य गुन्हेगारही सावध होत असतो. पण सत्य सापडलेले बुद्धीमंत किंवा शहाणे लोक कधीच अनुभवातून शहाणे होत नाहीत. त्यामुळे मागल्या सहा वर्षात अशा लोकांची संख्या सातत्याने वाढत गेलेली आहे. खरेतर अशा लोकांचा किंवा या आजाराचा उदभव २००२ सालात प्रथम झाला. गुजरातमध्ये गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस या रेलगाडीच्या डब्याला आग लावून ५९ कारसेवक रामभक्त प्रवाशांना जीवंत जाळले गेले, त्यातून जी प्रक्षुब्ध प्रतिक्रीया उमटली, त्यातून दंगल उसळली होती. त्यात नवे काहीच नव्हते. त्यापुर्वी चार दशके गुजरातमध्ये एकही वर्ष बिनादंगलीचे गेलेले नव्हते. पण गोध्रानंतरची दंगल मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुद्दाम घडवून आणली व मुस्लिमांची जाणिवपुर्वक कत्तल केली; अशी एक ‘सत्यवादी’ अफ़वा पसरवण्यात आली. तिथून हा सत्यवादी आजार देशाच्या कानाकोपर्यात व तथाकथित बुद्धीजिवी वर्गात पसरत गेला. त्याला अजून आटोक्यात आणणे कोणाला शक्य झालेले नाही. मागल्या लोकसभा मतदान काळात तो देशभर फ़ैलावला आणि नियंत्रणात आला होता. आता पुन्हा तो उफ़ाळून आलेला आहे. आता त्याने आपले बुद्धीवादी रुप त्यागून कलात्मक अवतार धारण केलेला दिसतो. अन्यथा काही शेकाडा सह्यजीरावांनी लोकशाही ‘संविधान बचाव’ असले मुखवटे पांघरून पत्रके कशाला काढली असती?
मध्यंतरी मराठी भाषेतले एक दिग्गज पत्रकार व राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी २०१९ सालच्या लोकसभा निवडणूका होणारच नाहीत. कारण पंतप्रधान मोदींना पराभवाची भिती असून ते निवडणूका रद्द करून आणिबाणी घोषित करतील; अशी भिती व्यक्त केलेली होती. आता ती निवडणूक सुरू झाली असून त्यातली पहिली मतदानाची फ़ेरीही पुर्ण झालेली आहे. त्यामुळे सत्यवादी केतकरांनी निदान आपण खोटे बोललो किंवा भ्रामक अफ़वा पसरवल्याची दिलगिरी तरी व्यक्त करायला हवी होती. पण तसे काही घडल्याचे कोणाच्या ऐकीवात नाही. यातून आपल्याला अशा ‘सत्यवादी’ मानसिक आजाराची कल्पना येऊ शकते. त्याची लक्षणेही समजू शकतात. केतकर असोत की राहुल गांधींसह विविध क्षेत्रातले बुद्धीमंत कलावंत म्हणून मिरवणारे लोक असोत, त्यांना कायम सत्याच्या भयगंडाने पछाडलेले आहे. त्यामुळे त्यांना सतत कसले तरी भ्रम होत असतात आणि त्यालाच सत्य मानून मग अशा भ्रमांचा डंका पिटला जात असतो. सहाशे सह्याजीराव त्याच व्याधीने ग्रस्त झालेले असून त्यांचा भ्रम कोणता आहे, तेही आपण समजून घेतले पाहिजे. भ्रमिष्टाशी आपण कधी युक्तीवाद करू शकत नसतो. कारण त्याला सत्य दाखवता येत नसते, किंवा तोही बिचारा ते सत्य बघू शकत नसतो. सत्य कितीही जाडजुड भिंगातून दाखवले तरी त्याला मनातलेच दिसत असते आणि बघायचे असते. त्याची अवस्था मयसभेतल्या दुर्योधन वा तत्सम लोकांसारखी झालेली असते, त्याला फ़रशी हौदासारखी दिसते आणि हौद फ़रशी म्हणून बघायची अजब सिद्धी प्राप्त झालेली असते. त्यामुळे अशा लोकांना नसलेले दिसते आणि असलेले दिसतही नाही. अन्यथा त्यांना बंगाल या राज्यामध्ये मुख्यमंत्री ममता बानर्जी व त्यांच्या गुंडपुंडांच्या तृणमुल पक्षाने चालवलेली अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी बघता आली असती. तिच्या विरोधात गळा काढता आला असता. पण चकार शब्द या सह्याजीरावांनी काढलेला नाही. पण तेच सर्व एकजुट होऊन मोदींनी न लादलेल्या अघोषित गळचेपीच्या विरोधात आक्रोश करत सुटलेले आहेत.
अनिक दत्ता नावाच्या एका यशस्वी चित्रपट दिग्दर्शकाचा ‘भविष्योतेरे भुत’ नावाचा बंगाली चित्रपट दोन महिन्यापुर्वी बंगालमध्ये प्रदर्शित झाला. १५ फ़ेब्रुवारी रोजी विविध पटगृहात त्याचे प्रदर्शन सुरू झाले आणि एकदोन दिवसातच स्थानिक पातळीवर पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांनी आपापल्या भागातील थिएटर मालकांना स्पष्ट इशारा दिला, की तात्काळ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबले पाहिजे. कुठलीही तक्रार करायला जागा नव्हती. कोर्टाचे वा अन्य कुठलेही कायदेशीर आदेश नव्हते. पण स्थानिक पोलिस आणि सत्तधारी तृणमूल कॉग्रेसचे गुंड आदेश देत होते आणि त्यांची अवज्ञा करण्याची आज निदान बंगालमध्ये कुणाची बिशाद नाही. सहाजिकच सर्व पटगृहातून दोनतीन दिवसातच हा चित्रपट गायब झाला. एकदोन बातम्या कुठेतरी झळकल्या. पण कुठल्याही राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर त्याची चर्चा झाली नाही वा कुठल्या अविष्कार स्वातंत्र्यवीराला अनिक दत्ताच्या अधिकारासाठी आवाज उठवण्याची हिंमत झाली नाही. आणखी एक गंमत लक्षात घेतली पाहिजे. त्याच दरम्यान ममता बानर्जी यांनी कोलकात्यत ब्रिगेड परेड ग्राऊंड या भव्य मैदानावर त्याच कालखंडात एक सर्वपक्षीय जाहिर सभा घेतली. त्यात देशभरच्या मोदीविरोधी नेत्यांना आमंत्रित केलेले होते. या सर्वांनी देशात अघोषित आणिबाणी कशी चालू आहे आणि नरेंद्र मोदी हिटलरलाही लाजवणारी हुकूमशाही कशी करीत आहेत, त्याचा पाढा वाचला होता. परंतु कोणालाही त्याच कोलकात्यात एका चित्रपट व कलाकृतीची कशी बेकायदा गळचेपी झालेली आहे, त्याचा पत्ता नव्हता आणि असेल तर त्याविषयी बोलायची हिंमत झाली नाही. कलावंतांना तर बंगाल, ममता वा कुठला भविष्योतेर भूत नावाचा सिनेमाही ठाऊक नव्हता. त्यामुळे त्यांनी त्या गळचेपीबद्दल मागले दोन महिने यथास्थित मौन धारण केले. कदाचित त्यापैकी बहुतांश कलावंतांना बंगाल भारतात असल्याचेही ठाऊक नसावे.
किती बेशरमपणा आहे बघा. ज्या दिवशी हे सहाशे कलावंतांचे मोदींना पराभूत करण्याचे आवाहन प्रसिद्ध झाले; त्याच्या दुसर्याच दिवशी हा मामला सुप्रिम कोर्टात निकाली झाला. म्हणजे कलावंतांच्या पत्रकाचा नव्हे! ‘भविष्योतेर भूत’ चित्रपटाच्या अघोषित बंदीचा मामला सुप्रिम कोर्टात आला. त्या निर्माता दिग्दर्शकांना न्याय मागायला थेट सुप्रिम कोर्टात यावे लागले. कारण देशातले ममताग्रस्त पुरोगामी कलावंत विचारवंत खुन पाडला गेला तरी मौन धारण करतील; याची आनिक दत्ताला खात्री होती. म्हणून त्याने सह्या गोळा करण्यापेक्षा थेट कोर्टातच धाव घेतली होती. त्याच्या सुनावणीत दोन महिने गेले आणि गुरूवारी ११ एप्रिल रोजी त्याचा कोर्टाने निकाल दिला. त्यात ‘वाढत्या असहिष्णुतेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात’ असा शेराही मारलेला आहे. पण देशात याचा अर्थ बंगालमध्ये असा आहे आणि तो पुरोगामी ममतांच्या बाबतीतला आहे. पण तरीही कोणा स्वातंत्र्यसेनानी कलावंताने अजून ममतांचा निषेध केलेला नाही वा त्यांच्या पक्षाला मते देऊ नका, असा आवाज उठवलेला नाही. आहे ना चमत्कार? ज्या बाबतीत व ज्या सरकारच्या कारकिर्दीत साक्षात गळचेपीच्र पुरावे समोर आले व कोर्टाने ज्या सरकार व पक्षाला स्वातंत्र्याचा गुन्हेगार मानले; त्याच्याविषयी या सह्याजीरावांनी चकार शब्द उच्चारलेला नाही. पण ज्या मोदी सरकारच्या विरोधात आजवर कुठला गळचेपीचा पुरावा कोणाला समोर आणता आलेला नाही, त्याच्या विरोधात आक्रोश चाललेला आहे. याला म्हणतात बुद्धीमंत, कलावंत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा. मजेची गोष्ट म्हणजे आनिक दत्ता याला न्याय देऊनच सुप्रिम कोर्ट थांबलेले नाही. त्याने ममता सरकारला या गळचेपीच्या गुन्ह्यासाठी २० लाख रुपये दंडही ठोठावला आहे. पण आपले महान कलावंत व बुद्धीमंत तोंडात गुळणी घेऊन बसले आहेत. मोदी-मोदी असला रवंथ मात्र जोरात चालू आहे. मग यांना कलावंत म्हणायचे की गोठ्यातली गुरे म्हणायचे?
ढोंगीपणाचा कळस झाला! भाऊ, तुमचा हा एवढा लेख वाचूनच माझ्या अंगाचा तिळपापड होतोय. पण हे तथाकथित बुद्धिवंत, पुरोगामी...@#^%*$ कसे काय थंड राहू शकतात?
ReplyDeleteमला वाटतंय, वर्षानुवर्षे काँग्रेसने थुंकलेलं चाटण्यात ह्यांची हयात गेलेली असल्यामुळे स्वत्व, स्वाभिमान, सत्य ह्या सगळ्या शब्दांचा आणि भावनांचा अर्थच ह्यांना कळेनासा झालाय.
चांगलंच तासलं की ह्या भिकारचोट नटांना
ReplyDeleteभाऊ, गोठ्यातल्या गुरांपेक्षा चांगली उपमा आपण परवाच दिली आहे.
ReplyDeleteसुपर भाउ.शेवटचे वाक्य एकदम झकास
ReplyDeleteअसे सत्य राज ठाकरे यांना सापडले आहे का ? हरिसाल वरून ते सरकारचे सालटे काढत आहेत सरकारचा खोटेपणा उघडकीस आणत आहेत त्याच काय ते सत्यवादी नाहीत का ? त्यांनी दिलेल्या पुराव्याचे खंडन कसे करायचे? त्यावर एक लेख लिहून आमचे समाधान करावे ही माफक अपेक्षा
ReplyDeleteBhau at it's best.
ReplyDeleteBhau at it's best.
ReplyDeleteगोठ्यातली गुरे बरी ! निदान ती गोठ्यातल्या गोठ्यात आरडाओरडा करतील. पण हे तद्दन विचारवंत गाढवाच्या कळपा पेक्षा वेगळे नाहीत. पहिल्या गाढवाने गाढवपणाचा मार्ग स्वीकारला की बाकीचे बिनडोक त्याच्या मागे खेंकाळत जाणार ! या सहाशे तद्दन विचारवंतांच्या विरोधी मत व्यक्त करणारे नउशे आहेत , याची त्यांना फिकीर नाही. डोकं गहाण ठेवल्यावर दुसरे काय होणार ?
ReplyDeleteKay haramkhor lok aahet, je aaplyala kalate hehi ya lokanna kase kalat nahi. Tikde raj thakre sudhha kay karatahet??? Hadda aahe ho
ReplyDeleteया चित्रपटासंदर्भात मीडिया मध्ये अजिबात उल्लेख वा चर्चा झालेली नाही.
ReplyDelete