Sunday, December 15, 2019

हेडमास्तरांचे (राहुलच्या आईला) पत्र

संबंधित इमेज

नागरिकत्व सुधारणा कायदा विधेयक संसदेत अलिकडेच संमत झाले. आधी ते लोकसभेत चर्चेला आलेले होते आणि तिथे संमत होण्याची भाजपा सरकारला चिंता नव्हती. कारण त्या पक्षाचे लोकसभेत पुर्ण बहूमत आहे. म्हणूनच मग मित्रपक्षांनी सोबत केली नाही, तरी विधेयक संमत करण्याची चिंता करण्याचे कारण नव्हते. परंतु राज्यसभेतही विधेयक संमत करून घ्यावे लागते, अन्यथा त्याला कायद्याचे स्वरूप येऊ शकत नाही. मागल्या खेपेस ते असेच बारगळले होते. कारण विरोधकांनी राज्यसभेत भाजपाची कोंडी केलेली होती. मात्र यावेळी तशी वेळ येऊ नये, याची भाजपाने काळजी घेतली होती. अगदी मित्रपक्षांनी टांग मारली तरी पर्वा करायची गरज नाही, इतकी अमित शहांनी सज्जता केलेली होती. म्हणूनच आजकाल एनडीएतून बाजूला झालेल्या शिवसेनेच्या मदतीची गरज नव्हती. तरीही सेनेने लोकसभेत पाठींबा दिला आणि त्यावरून कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी डोळे वटारताच अभिमानाला गुंडाळून सेनेने राज्यसभेत सभात्याग केला. मात्र यावेळी बोलताना सेनेचे नेते संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत गृहमंत्री अमित शहा व भाजपाला चार खडे बोल ऐकवले होते. तुम्ही हिंदूत्वाच्या ज्या शाळेत शिकत आहात, तिथले आपण हेडमास्तर आहोत असे उद्गार त्यांनी काढले होते. मात्र त्यानंतर ‘आदरणिय’ राहुल गांधी यांनी जी मुक्ताफ़ळे उधळली, त्यामुळे या हेडमास्तरांची मोठीच तारांबळ उडाली आहे. राहुल गांधी हे कोणी भाजपाचे नेते नाहीत, तर हेडमास्तर शिकले ते बीएड कॉलेज चालवणार्‍या नेत्याचे बिगडे पुत्र आहेत. सहाजिकच गृहमंत्र्यांना डोळे वटारून दाखवणार्‍या हेडमास्तरांना राहुलबद्दल तक्रारही करायची सोय नाही. म्हणून त्यांनी राहुलच्या आईला पत्र लिहीले आहे. ते वाचून कधीकाळी महाराष्ट्राच्या शाळांमध्ये झळकलेले एक पोस्टर आठवले. ‘लिंकनचे हेडमास्तरांना पत्र!’

मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळवून देण्याचे संपुर्ण श्रेय ज्या हेडमास्तरांना आहे, त्यांना आता हळुजळू त्याची किंमत लक्षात येऊ लागली आहे. पण ती किंमत मोजताना व असह्य होत असताना स्थिती मात्र विचीत्र होऊन गेली आहे. ‘सांगता येत नाही आणि सहन होत नाही’ अशा जाहिराती दिसतात, त्यापेक्षा ही अवस्था वेगळी नाही. म्हणूनच देशाच्या गृहमंत्र्यांना डोळे वटारून दाखवणारे हेडमास्तर ट्वीटरवरून राहुलच्या आईला पत्र लिहून म्हणतात, आम्ही तुमच्या दैवतांना सन्मानित करतोय, तर निदान आमच्या दैवतांना अपमानित करू नका. अर्थात असल्या भाषा व शब्द सोनियांना किती समजतात, ते देवच जाणे. पण हेडमास्तर मात्र शब्द उच्चारताच ‘समझनेवाले समझ गये’ म्हणून आपली पाठ थोपटूनही घेत आहेत. राहुल गांधी वा सोनियाजी म्हणजे कोणी अमित शहा व देवेंद्र फ़डणवीस नाहीत, हे अजून हेडमास्तरांच्या लक्षातही आलेले नाही. भाजपाने युती मोडल्यानंतरही सत्तेत सहभागी होऊन रोजच्या रोज फ़डणवीस व शहांना डोळे वटारून दाखवणार्‍यांना आज नुसते डोळे वर करून बोलायची हिंमत उरलेली नाही. कधी अफ़जलखान वा कधी औरंगझेब असल्या उपाध्या पैशाला पासरी वाटुन टाकणार्‍या हेडमास्तरांना; आज आपले हेडमास्तर बाळासाहेब नसून पवारसाहेब असल्याचे प्रथमच लक्षात येत असावे. अन्यथा त्यांच्यावर अशी नामुष्की कशाला आली असती? बाळासाहेब अवमानाला अवमानानेच उत्तर देत होते. त्यांच्या शाळेत शिकलेला कोणी गयावया करीत आमचा व आमच्या दैवताचा  सन्मान राखा; अशा विनंत्या करीत नसतो, हा धडा पवारसाहेबांच्या बीएड कॉलेजात हेडमास्तरांना शिकवलेला नसेल तर दुसरे काय व्हायचे?

विषय सुरू कुठून झाला? राहुल गांधींनी मेक इन इंडियाची हेटाळणी करताना ‘रेप इन इंडिया’ अशा शब्दांचा बेछूट वापर केला. त्याच्यावरून वादळ उठण्याला पर्यायच नव्हता. कोणताही विवेकी माणूस अशा शब्दांचा विरोध करील व निषेध करील. पण जे आश्रित असतात त्यांना अशा विवेकाची चैन परवडत नसते. त्यामुळे त्यांना आपल्या यजमानांच्या कुपुत्राने लाथा मारल्या, तरी सन्मान म्हणून गुणगान करावेच लागते. त्यामुळे राहुल गांधींना त्यांची चुक त्यांचा कोणी मित्रपक्ष दाखवू शकणार नव्हता. पण जे त्यांच्या मित्रपक्षातले नाहीत, त्यांना आवाज उठवण्यात अडचण नव्हती. त्यामुळेच अशा आवाजाचा गदारोळ सुरू झाला आणि उनाड पोराने आणखी शिवीगाळ करून गुंता वाढवावा, तसे राहुलनी आणखी मुक्ताफ़ळे उधळली. महिला संघटनांनी राहुलकडे माफ़ी मागण्याचा आग्रह धरल्यावर राहुलनी आपले नाव ‘सावरकर’ नसल्याचे सांगून शिवसेनेसह सावरकरवादी लोकांच्या भावनांना लाथ मारली. कारण पुरोगाम्यांच्या मते सावरकर माफ़ीवीर असतात. त्यांनी शिक्षा माफ़ व्हावी म्हणून ब्रिटीश सरकारची माफ़ी मागितली, हा आवडता पुरोगामी सिद्धांत आहे. राहुलनी त्याचाच आधार घेऊन माफ़ी मागायला आपले नाव ‘राहुल सावरकर’ नसल्याची मल्लीनाथी केली. पण त्या अर्थाने राहुल गांघी कुठे वेगळे आहेत. काही महिन्यापुर्वीच त्यांनी सपशेल लोटांगण घालत सुप्रिम कोर्टाची निर्विवाद माफ़ी मागितली आहे. कितीही शाद्बिक कसरत करूनही कोर्टाने निखळ शब्दात माफ़ी मागायला भाग पाडल्यावर. राहुलच्या वकीलांनाही सुप्रिम कोर्टात मान खाली घालायची वेळ आलेली होती. त्यामुळे राहुलनी माफ़ी मागणे यात नाविन्य कुठलेच नाही. सावरकरांना तरी शिक्षा होऊन ते तुरुंगात गेलेले होते. राहुल तर नुसत्या शिक्षेच्या कल्पनेनेच भयभित होऊन कोर्टाचीच माफ़ी मागून मोकळे झाले होते. चौकीदार चोर है, ही डरकाळी आठवते ना? त्याच शब्दांसाठी राहुलनी माफ़ी कोर्टाची मागितली होती.

अर्थात शिवसेनेच्या हेडमास्तरांना इतका अलिकडला इतिहास ठाऊक नसावा. त्यामुळे व्रात्य राहुलचा कान-नाक पकडण्यापेक्षा त्यांनी राहुलच्या पालक म्हणून आईला पत्र लिहिण्याचा मार्ग पत्करलेला दिसतो. हेडमास्तर आधी पत्र लिहून मोकळे झालेत आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही आपली नाराजी प्रकट करणार आहेत. स्वाभिमान शब्दाची नवी व्याख्याच लिहीण्याचे काम बहुधा शिवसेनेने हाती घेतलेले असावे. कारण सन्मानाच्या यादीतून आता मातोश्री हा शब्द गायब झाला आहे. जनपथ, सिल्व्हरओक असे शब्द तिथे घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे सोनियांना सावरकरांचाही सन्मान राखण्यासाठी गयावया करण्यातला नवा सन्मान आपल्याला बघायला मिळणार आहे. अर्थात मुख्यमंत्रीपद वा सत्ता मोलाची असते. तिच्या तुलनेत सावरकर वा स्वाभिमान वा अभिमान वगैरे फ़ारशा महत्वाच्या बाबी असू शकत नाहीत. त्यामुळे शिवसेनेने आता हळुहळू अशा ‘सन्मानाची’ सवयच अंगी बाणवून घ्यावी. राहुलनी लाथा माराव्यात आणि आपण नाराजीचे सुर आळवणार्‍या विनंत्या कराव्यात, हा सत्ता टिकवण्याचा सोपा सरळ मार्ग आहे. कारण हे गांधी आहेत, हे नेहरू आहेत. ते मोदी वा शहा नाहीत. किंवा औरंगझेब वा अफ़जलखान नाहीत. ते पुण्यश्लोक स्वातंत्र्यसम्राट आहेत. त्यांनी मारलेल्या लाथाही वरदानच असते. थोडेफ़ार धडे हेडमास्तरांनी पवारांकडूनही शिकून घ्यावेत. परदेशी नागरीक म्हणून कॉग्रेस सोडल्यानंतर फ़क्त चार महिन्यात पवारांनी त्याच सोनियांशी जुळवून घेतले ना? सोनियांनीही ‘सन्मानाने’ पवारांना आश्रय दिला ना? मग त्यांच्याच बीएड कॉलेजात शिकून हेडमास्तर झालेल्यांनी सावरकरांच्या सन्मानाची अपेक्षा कशाला बाळगावी? त्यापेक्षा सत्ता मिळवण्याचे व त्यासाठी अपमानित व्हायचे नवनवे धडे लौकरात लौकर आत्मसात करून घ्यावेत. लिंकनसारखे पत्र पालकांना वा हेडमास्तरांना पत्र लिहून कोणाला मुख्यमंत्रीपद मिळत नसते.

22 comments:

  1. उत्तम विश्लेषण

    ReplyDelete
  2. भाऊ ग्रेटच. कुणातरी दोघांनाही सुनावणे महत्वाचे होतेच. त्यात तुमच्या भाषेत म्हणजे बेस्ट झाले.

    ReplyDelete
  3. Do we need such jokers like Raga? why cant loyal congress leaders condem his remarks? Why SC or EC don't issue ultimatum this this stupid fellow. why can't media publish a foot note saying they do not support his statments?

    ReplyDelete
    Replies
    1. Court files su moto case from news papers. ( hyd encounter ) then why court did not in such lewd comments by RG

      Delete
  4. अचूक विश्लेषण भाऊ

    ReplyDelete
  5. Whatsapp वर viral झालेली post

    वयाच्या १४ वर्षी काव्य लिहू शकत नाही,
    कारण __ हा सावरकर नाही..
    उफाळलेल्या समुद्रात उडी मारू शकत नाही,
    कारण __ हा सावरकर नाही..
    घरादाराची राखरांगोळी करू शकत नाही,
    कारण __ हा सावरकर नाही..
    दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा ऐकूही शकत नाही,
    कारण __ हा सावरकर नाही..
    स्वातंत्र्यानंतर सुद्धा देशद्रोही हा ठपका कल्पना करवत नाही,
    कारण __ हा सावरकर नाही..
    वंचित समाजाचा मंदिर प्रवेश घडवू शकत नाही,
    कारण __ हा सावरकर नाही..
    परकीय भूमीवर केवळ मौजमजा व न सांगता येण्यासारखी काम करू शकतो,
    कारण __ हा सावरकर नाही..
    मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लाखो तरुणांची प्रेरणा होऊ शकत नाही,
    कारण __ हा सावरकर नाही..
    अंदमान कारागृहातील भिंतीवर लिहिलेले महाकाव्य पुसूनसुद्धा परत लिहू शकत नाही,
    कारण __ हा सावरकर नाही..
    आज बोललेले उद्या आठवत नाही,
    कारण __ हा सावरकर नाही..
    लिहिण्यासारखे भरपूर आहे पण तुझी लायकी नाही,
    कारण __ हा सावरकर नाही..

    ReplyDelete
  6. Ajun ek : Hindu Hriday Samrat pan aata gayab zalay ani Vandaniya aalay

    ReplyDelete
  7. Whatsapp वर आलेली पोस्ट
    (उदय कर्वे, डोंबिवली) तुझे नाव ' ते ' नाही म्हणतोस
    तर ते तसे नसणारच
    कारण
    इथे दरेकालाच माहिती आहे की
    बागुरडे जटायूचे नाव लावत नाहीत
    लांडगे सिंहाचे कुळ सांगत नाहीत
    आणि
    आचरटांच्या बरळण्याला
    वीरगर्जना म्हणत नाहीत

    हवेत सोडलेली कबुतरे
    आणि
    अंदमानात फिरवलेले कोलू

    कोटांवर खोचलेले गुलाब
    आणि
    तळहातावर घेतलेली शीरे

    मडमांच्या ओठांचा लालीमा
    आणि
    क्रांतिवीरांच्या रक्ताची लाली

    यांचे कुळ जर नेहमीच वेगळे होते
    तर
    तुझेही कुळ सावरकर कसे असेल?

    पोराटोरांनी पण माफ केलेला तू
    कसली काय माफी मागणार ?

    वाचाळवीर अभ्यासहीन,तू काय
    स्वातंत्र्यवीरांचे नाव लावणार ?

    (उदय कर्वे, डोंबिवली)

    ReplyDelete
  8. हेड मास्तरांचे सिएबी वरील भाषण म्हणजे कोडगेपणाने केलेल्या मग्रुरीचा नमुना होता. घरगुती भांडणात जसे हातवारे केले जातात तसच काहीसं ते करीत होते.

    ReplyDelete
  9. भाऊ बाळासाहेब ठाकरे यांनी विलेपार्ले विधानसभा पोट निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली आणि त्या नंतर झालेली सेना भाजप युती 1990 च्या विधानसभा निवडणुकीत 92 जागा घेत प्रबळ विरोधी पक्ष बनली तो पर्यंत महाराष्ट्रात प्रबळ विरोधी पक्षाचे अस्तित्व नव्हते, हीच युती 1995 मध्ये सत्ताधारी बनली हा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेचा चमत्कार होता, आज शिवसेनेने एका संपादकांच्या नादी लागून आपली स्वाभिमानाची आणि हिंदुत्वाची कवच कुंडले उतरवून ठेवली आहेत आता याचे परिणाम काय होतील हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही,शिवसेनेची अवस्था चंद्राबाबू नायडू यांच्या पेक्षा वेगळी होणार नाही हे नक्की

    ReplyDelete
  10. सत्तातुराणां न निती न स्वाभिमान: आगे आगे देखो शिवसेनेचे पतन कसे होते ते.

    ReplyDelete
  11. भाऊ एक गोम लक्षात येते आहे की, ठाकरेनी कोणतही मंत्रिपद घेतले नाही कारण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ येउन नाचंकी होऊ नये...

    ReplyDelete
  12. भाऊ तुमच्या लेखणीला तोड़च नाही

    ReplyDelete
  13. १)उध्दव ठाकरे हे सत्तावादी आहेत. तत्ववादी नाहीत,हे आता पुन्हा पुन्हा सिद्ध होईल २)दुसऱ्या शिवसेना नेत्यांना मुख्यमंत्री न करता,ते स्वत: मुख्यमंत्री झाले ३) फडणवीस यांचे फोनही घेतले नाहीत,व हे स्वत: सांगितले ४)शरद पवारांकडे मात्र गेले५) यापुढे त्यांची व शिवसेनेची अधोगती होणार आहे. छान लेख.आवडला

    ReplyDelete
  14. Excellent article. Very interesting to read. I really love to read such a nice article. Thanks! keep rocking.
    Black Satta King

    ReplyDelete
  15. khuch chan lihil aahe bhau

    ReplyDelete
  16. Great and to the point. But SS is so blind and Lachar toddy that they will accept any insult from Gandhi's ,even if it is for Bslasaheb .Thakre will find excuse to defend Congress even in that case. What a shame..We can now visualise Mirza Raje Jaisingh in front of Aurangzeb.

    ReplyDelete
  17. बरे झाले तुम्ही लिहिले. स्वार्थी लोकांनी सत्तेच्या मोहापायी स्वाभिमान विकून टाकला आहे... दुर्दैव मराठी माणसाचे!

    ReplyDelete