Friday, December 27, 2019

हिंसा, दंगलीमागचे सुत्रधार

Image result for CAA riots

गेल्या मे महिन्याच्या आरंभी म्हणजे महाराष्ट्रातील लोकसभेच्या चौथ्या फ़ेरीचे मतदान संपून गेल्यावरची गोष्ट आहे. एका मान्यवर मराठी संगीतकाराच्या घरी काही मित्र परिचितांशी राजकीय गप्पा मारण्याचा घरगुती कार्यक्रम योजलेला होता. त्यात झी २४ तासचे संपादक विजय कुवळेकरही उपस्थित होते. त्यावेळी मतदानाच्या अखेरच्या दोन फ़ेर्‍या बाकी होत्या आणि अर्थातच नरेंद्र मोदींना पुन्हा बहूमत मिळणार, की भाजपाचे गाडे बहूमताच्या दाराशी येऊन अडकणार; अशी उत्सुकता तिथल्या उपस्थितांनाही होती. कारण माध्यमातून विरोधकांच्या देशव्यापी गठबंधनाचे खुप गुणगान झालेले होते, चाललेही होते. सहाजिकच मुद्दा लोकसभेच्या निकालांभोवती घोटाळलेला होता. माझा आंदाज सहासात महिने आधीच व्यक्त करून झाला होता व त्यावर पुस्तकही मी लिहीले होते. त्यामुळे त्याविषयी अधिक खुलासेवार गप्पा व्हाव्यात, अशीच योजना होती. पण मी त्याच्याही पुढे जाऊन एक आशंका त्या गप्पात व्यक्त केली होती. मोदींना बहूमत मिळेल, पण विरोधक तो निकाल कितपत पचवू शकतील? निकाल मोदी वा भाजपाच्या बाजूने लागले आणि ३०० जागांचा पल्ला त्यांनी ओलांडला, तर राजकीय चित्र  काय असेल्? त्याविषयी मी मतप्रदर्शन केले होते आणि ते उपस्थितांपैकी अनेकांना चकीत करणारे ठरलेले होते. अर्थात ती शक्यता कोणालाही ऐकायलाही आवडणारी नव्हती. कारण गेल्या दोनतीन वर्षात इव्हीएममध्ये आयोगाकडून गडबड केली जात असल्याचाही खुप गदारोळ उडवून देण्यात आलेला होत्या आणि म्हणूनच माझी आशंका थक्क करणारी होती. ती शक्यता निकाल भाजपाच्या बाजूने गेल्यास देशभर दंगली पेटवल्या जातील अशी होती.

जगभर आजकाल उदारमतवादी म्हणवून घेणार्‍या तथाकथित बुद्धीवादी व संयमी राजकारणाचे नाव घेणार्‍यांची जबरदस्त पिछेहाट चालू आहे. त्यातून ही मंडळी कमालीची असहिष्णू झालेली आहेत. मध्यंतरीच्या पन्नास वर्षात त्यांनी लोकशाही व उदारमतवादाच्या नावाखाली इतकी सत्ता व हुकूमत उपभोगलेली आहे, की आजकाल त्यांना आपला पराभव किंवा पिछेहाट समजेनाशी झाली आहे. त्यामुळे आपले चुकले काय वा कुठे चुकते आहे, त्याचा अभ्यास करून सुधारणा करण्यापेक्षा जुन्याच कालबाह्य कल्पना व व्यवहारशून्य अट्टाहासाच्या ही मंडळी आहारी गेली आहेत. त्याच्या परिणामी त्यांनी मिळेल त्या विघ्नसंतोषी भूमिका घेऊन अराजकवादाचा आश्रय घेतला आहे. त्यामुळे अतिरेकी, जिहादी, हिंसाचारी वा घातपाती यांच्याशी संगनमत करायलाही हे सहिष्णू लोक मागेपुढे बघत नाहीत. भारतातल्या अतिरेकी धर्मांध मुस्लिम व नक्षली हिंसाचारी यांच्याही इथल्या उदारमतवादी मंडळींची गट्टी जमलेली दिसेल. इथेच नव्हेतर जगभरच्या उदारमतवादी व जिहादी अतिरेक्यांचे स्थानिक राजकारणातले सख्य नजरेत भरणारे आहे. त्यामुळे काहीही आपल्या इच्छेपेक्षा वेगळे घडत असेल किंवा घडणार असेल, तर त्याला लोकशाहीबाह्य ठरवून गळा काढणे, ही नित्याची बाब झाली आहे. म्हणूनच काश्मिरात रोजच्या रोज मुडदे पडत असताना त्यांना चिंता नव्हती. पण ३७० कलम रद्द झाल्यापासून तिथल्या हिंसाचाराला लगाम लागल्यामुळे भारतातलेच नव्हेतर जगभरचे उदारमतवादी कमालीचे अस्वस्थ आहेत. हिंसा घातपात आता अशा लोकांना सुरळीत परिस्थिती वाटू लागली असून, शांततामय नागरी जीवन त्यांना मुस्कटदाबी वा स्वातंत्र्याचा संकोच वाटू लागला आहे. त्याची प्रतिक्रीया जगभर बघायला मिळत असेल तर भारताचा अपवाद कसा करता येईल?

२०१९ मध्ये मोदींना पुन्हा बहूमत मिळाले, तर अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर उमटली, तशी इथेही प्रतिक्रीया उमटणार, असा माझा अंदाज होता. तिथे उदारमतवादी गटाचा नेता असलेल्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला आणि अध्यक्षीय शर्यत ट्रम्प जिंकले; तेव्हा अमेरिकाभर हिंसाचार माजला होता. आजवरच्या निकष व नियमानुसारच ट्रम्प यांचा विजय झाला तरी त्याविषयी शंका घेतल्या गेल्या. तर आपल्याकडे निवडणूक आयोग व इव्हीएमवर शंका घेण्याचा सपाटा चालू होता. तक्रारींचा पाऊस पाडला जात होता. ट्रम्प यांच्या शपथविधीला राजधानी वॉशिंग्टन डीसी वा कॅपिटल हील येथेही जाळपोळ हिंसाचार माजवण्यात आला होता आणि हे सर्वकाही सहिष्णू वा शांततेचा झेंडा खांद्यावर घेऊन मैदानात आलेल्यांकडून चालले होते. त्याचेच प्रतिबिंब भारतातल्या लोकसभा निकालानंतरच्या परिस्थितीत पडावे, ही माझी अपेक्षा होती. पण ती फ़ोल ठरली. बहूधा त्या निकालांनी इथले विरोधक व उदारमतवादी पुरते हादरून गेले होते आणि त्यांच्या अपेक्षा मोदींना अधिक जागांनी विजयश्री मिळण्याच्या बिलकुल नव्हत्या. त्या धक्क्यातून सावरण्याचेही बळ नसल्याने तेव्हाची दंगली वा हिंसा माजवण्याची योजना सज्ज असूनही अंमलात आणता आलेली नव्हती. पण अराजक व अस्थिरता माजवणे ही योजना सज्ज होती. पुढे दोनतीन महिने तरी विरोधक व त्याच घोड्यावर स्वार झालेले इथले उदारमतवादी सहिष्णू लोक गर्भगळित अवस्थेत होते. म्हणून ३७० कलम वा तिहेरी तलाकनंतरही अराजक माजवण्याची योजना अंमलात येऊ शकली नाही. त्याचे प्रमुख कारण चिथावण्या देणारे खुप असले, तरी आग भडकण्यासाठी आवश्यक असते ते ज्वालाग्राही साहित्य व सामाग्री!

एनआरसी व सीएए ह्या विषयांनी ती सामग्री उदारमतवादी लोकांना पुरवली आणि म्हणून मे २०१९ निकालानंतर अराजक माजवण्याची योजना तात्काळ अंमलात येऊ शकली. शेजारी तीन देशातून परागंदा होऊन आलेल्यांना भारतात आश्रय व नागरीकत्व देण्याचा कायदा मुस्लिमांना वगळणारा असल्याने तिथे दिशाभूल करून आगडोंब उसळण्याची आयती संधी मिळाली. धर्माचे नाव आले मग मुस्लिम जीवाची पर्वा न करता हिंसक होऊ शकतात. हा आजवरचा जागतिक अनुभव आहे. त्यामुळे या नव्या कायद्यात इस्लामी देशातून आलेल्या परागंदा लोकांना आश्रय देताना मुस्लिमांना वगळले गेले; हा धार्मिक अन्याय असल्याची अफ़वा आगलावी ठरली. ती अफ़वा एवढ्यासाठीच म्हणायचे, की त्यातून भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व धोक्यात असल्याचे गैरसमज पसरवण्यात आले. वास्तविक तो कायदा कुठल्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेण्याचा नसून कुणाला तरी नागरिकत्व देण्याचा आहे. पण त्याचा अर्थ भारतातल्या १८ कोटी मुस्लिमांचे नागरिकत्व धोक्यात, असा सांगून ही ज्वालाग्राही सामग्री संपादन करण्यात आली. त्यात रस्त्यावर उतरणारे बहुतांश मुस्लिम व हिंसाचार माजलेल्या जागाही मुस्लिम वस्त्या आहेत. हा योगायोग नाही. ही आग लावणारे मुस्लिम नेते वा संघटना नसून बिगरमुस्लिम पण उदारमतवादी नेते व संघटना दिसतील. ते आग लावायला काड्या घेऊन निकालापासून सज्ज होते. पण ज्वालाग्राही सामग्री असलेला मुस्लिम घटक होता. तो पेट घेण्याची संधी मिळताच आगी लावल्या गेल्या आणि त्यात होरपळला आहे, तो नेमका मुस्लिम वर्ग आहे. मुस्लिमांचे धार्मिक नेतेही या हिंसेचे कारण नसल्याचे आवाहन करीत असताना, आगी कशाला लागल्या? कोणी त्या जाणिवपुर्वक लावल्या, त्याचे उत्तर या उदारमतवादी पार्श्वभूमीत दडलेले आहे.

योगायोग असा, की याच लोकांनी २००२ सालातल्या गुजरात दंगलीमध्ये तेल ओतण्याचे पद्धतशीर काम केले होते. गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस रेलगाडी पेटवून देण्यात आली. त्यातले मृतदेह टिव्हीच्या पडद्यावर ठळकपणे थेट प्रक्षेपित करणारे भाजपा नेते नव्हते, तर तथाकथित उदारमतवादी पत्रकार संपादक होते. हिंदूंना आपला प्रक्षोभ व्यक्त करण्याची दोनतीन दिवस मोकळिक द्या, असे मुख्यमंत्री मोदींनी वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांना बैठक घेऊन आदेश दिल्याची अफ़वा संजीव भट नावाच्या अधिकार्‍याने पसरवली. कॉग्रेससहीत पत्रकार स्वयंसेवी संस्था यांनी त्या अफ़वेची ठिणगी करून गुजरातभर दंगलींचे थैमान होईल, अशी सज्जता केलेली होती. त्या दंगलीत दोनतीनशे हिंदू मारले गेले. पण त्यावर पडदा टाकून मुस्लिमांचे सार्वत्रिक हत्याकांड असे गुजरातच्या हिंसाचाराचे वर्णन सातत्याने अनेक वर्षे चालू राहिले. मोदींना मुस्लिमांचा कर्दनकाळ म्हणून रंगवण्यात उदारमतवाद्यांनी हिरीरीने भाग घेतला. आजही त्याचेच पडसाद अधूनमधून उमटत असतात. त्यापेक्षा नागरिकत्व कायद्यातून सुरू झालेला खोटेपणा वेगळा वा नवा नाही. या निमीत्ताने ज्या दंगली पेटवण्यात आल्या व हिंसा माजवण्यात आली, ती गोध्रानंतरच्या गुजरातची पुनरावृत्ती असेल, तर त्याचे परिणाम तरी वेगळे कशाला असतील? गुजरातचे राजकीय भांडवल करू गेलेल्यांना त्या राज्यातून मतदाराने कायमचे हद्दपार करून टाकलेले आहे. त्याची पुनरावृत्ती म्हणजे ताज्या दंगली. या हिंसाचाराचे पर्यवसान देशभरातून उदारमतवाद किंवा त्याच कुबड्या घेतलेला सेक्युलॅरीझम कायमचा दुबळा होऊन जाण्यापेक्षा काहीही वेगळे नसेल. गोध्राने देशाला मोदी दिला असेल, तर नागरिकत्व कायदा अमित शहांना राष्ट्रीय नेता बनवून जाणार; ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

25 comments:

  1. भाऊ,पुणे येथील आपल्या "मोदींसमोरील आव्हाने" या विषयावरील व्याख्यानानंतरच्या प्रश्नोत्तरावेळी मी प्रश्न विचारला होता कि "मोदींच्या या यशस्वी वाटचालीमुळे व्यथित झालेले पुरोगामी 'कोणत्या थराला' जाऊन पोहोचतील ?"
    माझ्या या प्रश्नाचा रोख त्यांच्या हिंसक अराजक माजवणाऱ्या प्रवृत्तीकडेच होता. कळत नकळतपणे तुमचे शब्द मनाला स्पर्शून जातात भाऊ....!!
    "अप्रतिम भाऊ..."

    ReplyDelete
  2. भाऊ, लेखाच्या शेवटच्या काही ओळी खऱ्या होवोत हीच इच्छा. छान लेख.

    ReplyDelete
  3. काँग्रेसच्या "मुसलमानांना का वगळत?" या प्रश्नावरून काँग्रेसने एका प्रकारे सावरकरांची "हिंदू" व्याख्या खरी ठरवलेली आहे. तसे असल्यास काँग्रेसच्या या प्रश्नाचा स्वीकार करून, त्यांना नागरिकत्व देताना काँग्रेसला अखंड भारतला समर्थन आहे का? असा मुद्दा उठवता आला असता का? त्याचा राजकीय परिणाम काय झाला असता? भाजपाने हा मुद्दा का उठवला नाही?

    ReplyDelete
  4. शेवटची वाक्य खूप assuring आहेत 🙏

    ReplyDelete
  5. खरयं भाऊ ...ती आरुंधती राय म्हणते , जन गणना वाले अधिकारी आले तर त्यांना आपले नाव रंगा बिल्ला सांगा व पता 7 rcr सांगा...त्यांची हि भुमिका संविधान विरोधी नाही का? ...म्हणे हे बुद्धीजिवी...

    ReplyDelete
  6. भाऊ,
    गेली काही वर्षे असे काहीतरी अत्यंत हिंसक घडवले जाईल याची अपेक्षाच होती. पहिल्या 5 वर्षात इतके काही झाले नाही याचे मोठे आश्चर्यच वाटले होते. आणि तुम्ही म्हणता तसेच याचे परिणाम होतील असेही वाटते. तथाकथित उदारमतवादाचे, सहिष्णुतेचे प्रच्छन्न विकृत विद्रूप स्वरुप जनते समोर अधिक स्पष्ट स्वरूपात येईल असे वाटते.

    - पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  7. भाऊ,
    आणखी एक गोष्ट. सद्ध्या जगभरात हेच घडताना दिसते आहे. उदारमतवादाचे, सहिष्णुतेचे गलिच्छ स्वरूप जगभरातील जनते समोर येत चालले आहे आणि त्या विरोधात जनमत निर्माण होते आहे.

    ReplyDelete
  8. सटीक विश्लेषण
    सध्या हा जो काही गोंधळ देशभर उडवला आहे त्या मागे सोनिया गांधींचे घराबाहेर पडण्याचे आव्हान हेच कारण असावे. कदाचित तो एक सिग्नल होता असे वाटते.
    परंतु या उद्योगाचे पर्यवसान काँग्रेस च्या अपेक्षेविरुद्ध होऊन शांत व संयमी जनता सुद्धा मोदींच्या मागे उभी होण्यात होईल यात शंका नाही.

    ReplyDelete
  9. भाऊ, तुम्ही म्हणता तसे झाले तर देशाचे हितंच साधले जाईल .

    ReplyDelete
  10. भाऊ ज्यावेळी पहिल्या वेळी मोदी पंतप्रधान झाले. त्यावेळी सुध्दा यांच्या लोकांनी देशात व विदेशात .देशांचे नाव असाष्हुण म्हणून खराब केले आहे.

    ReplyDelete
  11. जे पहिली मोदी पंतप्रधान झाले. हे तेच लोक आहेत.

    ReplyDelete
  12. "गोध्राने देशाला मोदी दिला असेल, तर नागरिकत्व कायदा अमित शहांना राष्ट्रीय नेता बनवून जाणार; ही काळ्या दगडावरची रेघ आहे"...
    एकदम बरोबर भाऊ...पण लक्षात कोण घेतो?
    ह्या बाबतीत देखील ते "उदारमतवादी" आहेत...

    ReplyDelete
  13. भाऊ तुम्ही जे लिहिता त्यातील शब्द न शब्द मनाला भिडतो.
    तुम्ही लेखात एकदम बरोबर म्हणता कि उदारमतवादी म्हणवून घेणार्‍या तथाकथित बुद्धीवादी व संयमी राजकारणाचे नाव घेणार्‍यांची जबरदस्त पिछेहाट चालू आहे.
    खरे पाहता बुद्धीवादी व संयमी राजकारणाचे नाव घेणार्‍यांची जबरदस्त पिछेहाट का झाली? वेल मला असं वाटतं कि बुद्धीवादी व संयमी राजकारणाचे नाव घेणार्‍यां बांडगुळांनी
    सेक्युलरीझम चे जे व्हर्जन पेश केलं त्यात कुठेही सेक्युलॅरिझम नावालासुद्धा नव्हता. होताच तर स्युडोसेक्युलॅरिझम होता. बुद्धीवादी व संयमी राजकारणाचे नाव घेणार्‍यां बांडगुळांनी त्यांची स्युडोसेक्युलॅरिझम ही गाठोडेवजा (एक्लेक्टिक) संकल्पना बनवली आहे. जेव्हा आपण सेक्युलर आहोत असं मानतो असे म्हणतो, तेव्हा या गाठोडय़ातील काय मानतो आणि काय नाकारतो, हे स्पष्ट करण्याची जबाबदारी आपल्यावर असते. अशी स्पष्टता न केल्यास ‘सेक्युलर राहणे ’ हे संदिग्ध/ संमिश्र तत्त्व आपल्याला सतत चकवे देत राहते. बुद्धीवादी व संयमी राजकारणाचे नाव घेणार्‍यां बांडगुळांच्या बाबतीत हेच झाले. असं म्हटले जाते कि सत्तेला वैधतेची जोड असली तरी तिचा गाभा बल हाच असतो. मोदींना वैध रित्या बहुमत मिळाले मग वैधतेवर प्रश्नचिन्ह लावण्याकरता बुद्धीवादी भुरट्यानी इव्हीएम वर थुंकी टाकली ( त्यात कण्हता राजा शरद पवार सुद्धा होते) गोध्रा दंगली बद्दल सिंक्रोनाईझ कट रचून पद्धतशीर रीतीने मोदींना जबाबदार धरणे, ह्यामुळे बुद्धीवादी स्युडोसेक्युलर भुरट्याना वाटले कि मोदी संपतील. मोदी संपले नाहीत मोदी सामर्थ्यवान होउन वैध रित्या पंतप्रधान झाले. मोदी सामर्थ्यवान होउन वैध रित्या पंतप्रधान झाले ह्याचे स्युडोसेक्युलर, पुरोगामी, लेफ्टिस्ट आणि पवारांच्या पीद्याना वैषम्य वाटू लागले. वैषम्य वाटले की ‘विषमता’ दिसू लागते. यातून वैषम्यांचे सांत्वन करायचे हे जणू कर्तव्य होऊन बसते. मग वैषम्यांचे सांत्वन करायचे तर दंगली भडकवूया असा मार्ग अंगिकारला गेला. जमातवादी द्वेषभावनेला जास्तीत जास्त इंधन पुरवले गेले. भाऊ आपल्या देशात
    अगदी गांधी नेहरूंच्या काळापासून सेक्युलॅरिझम चे टोकनिझम केले गेले. अगदी स्वतः गांधींनी सुद्धा
    टोकनिझम व्यक्तिकेंद्री न ठेवता समूहकेंद्री बनवला. गांधी नेहरूंनी थर्डग्रेड राजकारण करत सेक्युलॅरिझम च्या नावाखाली कट्टर धर्मान्धाच्या गोतगटीय समूहांना ‘समाज’ म्हणण्याची आणि अख्ख्या समूहाला बहुमान देण्याची प्रथा पाडली. यातून जातीजमातवाद आणि इतर सर्व प्रकारच्या जमातवादांना अधिमान्यता मिळवून दिली. मोदीजी नाकावर
    टिच्चून पंतप्रधान झाले आणि मोदीजींनी वरच्या उत्पन्न गटांत अंतर्गत विषमता किती वाढते आहे याची चिंता न करता खालच्या उत्पन्न गटांचे दारिद्रय़निवारण आणि सक्षमीकरण पारदर्शी पद्धतीने सुरु केलं ह्याचं ह्याचे स्युडोसेक्युलर, पुरोगामी, लेफ्टिस्ट आणि पवारांच्या पीद्याना वैषम्य वाटणार
    होतच. सत्तेच्या मॅट्रिक्स मध्ये सत्तेच्या पिरॅमिडमध्ये स्युडोसेक्युलर, पुरोगामी, लेफ्टिस्ट आणि पवारांच्या पीद्याना उच्चस्थान मिळाले (!) की ते भारताच्या जनतेस कल्याणकारी असेल, हे सपशेल खोटे ठरले. मग शिवसेनेची
    शरद सेना करण्यापासून ते एनआरसी व सीएए वर मुसलमानांची डोके भडकवण्यापर्यंत मजल गेली. डिस-ऑर्डर किंवा कु-व्यवस्था आणून व्यवस्थेत सत्तेचा सारीपाट खेळला जातो हे आपल्या लेखातून व्यवस्थित समोर येते.
    भयगंड पसरवण्यात स्युडोसेक्युलर लॉबी चे हितसंबंध गुंतलेले असतातच हेच खरे




















    ReplyDelete
  14. Amit Shaha pudhil pantpradhan zale pahije. Salutes to you.

    ReplyDelete
  15. अतिशय योग्य व तार्कीक विवेचण!

    ReplyDelete
  16. भाऊ, तुम्ही परिस्थितीचे यथार्थ वर्णन केलेत. संसदेने चर्चा करून बहुमताने संमत केलेल्या अधिकृत ठरावावर हिंसक आंदोलन करणारे हे संसदीय लोकशाही (Pariamentary Democracy) मान्य करीत नाही. म

    ReplyDelete
  17. भाऊ तुमच्या तोंडात तूप साखर पडो

    ReplyDelete
  18. दंगल भाजप चर्या राज्यांत होते, म्हणजे भाजप विरोधक, कॉंग्रेस, त्याला पाठबळ देत आहे. योग्य विश्लेषण. धन्यवाद

    ReplyDelete
  19. फार छान लेख. ह्यात लिहिलेलं सगळं खरं होवो

    ReplyDelete
  20. आर्थिक परिस्थिती स्थिर नसताना ह्या caa आणि nrc चं तुणतुणे पुढे आणून सरकारने आर्थिक परिस्थिती वरून सगळ्यांचे लक्ष उडवले.... त्याबद्दल त्यांना आधी ऑस्कर दया अशी माझी मागणी आहे

    ReplyDelete
  21. दुःख याचे होते की मुस्लिमांना अजूनही कलत नाही की काही राजकिय पक्ष अजूनही त्यांचा वापर फक्त मतांसाठी करतात... येवढे वर्ष झालेत तरी अजूनही ते मुख्य प्रवाहात येऊ शकले नाही... ही चूक त्यांना कधी कळणार काय माहीत

    ReplyDelete