Saturday, January 11, 2020

समर्था घरीचे श्वान! अर्थात जे एन यु

Image result for JNU violence

भारतात २००० साली म्हणजे विसाव्या शतकाच्या अखेरीस उपग्रह वाहिन्यांचे युग सुरू झाले. तेव्हा आरंभी स्टारन्युज ही वाहिनी सुरू झाली होती आणि तिच्या बातम्यांचे किंवा प्रक्षेपित होणार्‍या कार्यक्रमांचे कंत्राट एनडीटिव्ही नामक कंपनीला देण्यात आलेले होते. पुढे त्याच कंपनीने आपले स्वतंत्र वाहिन्यांचे नेटवर्क उभे केले आणि इतर वाहिन्या सुरू झालेल्या होत्या. अशा इतर वाहिन्यांमध्येही आपोआप अनुभवी म्हणून त्याच वाहिन्यांचे काही वार्ताहर पत्रकार सहभागी झाले. हा इतिहास अगत्याने एवढ्यासाठी सांगायचा, की आजच्या माध्यमांवर जो वृत्तवाहिन्यांचा प्रभाव आहे, त्याचा वारसा एनडीटिव्हीकडे जातो. त्यांनी आरंभापासून ज्यांना अभ्यासक प्राध्यापक किंवा जाणते म्हणून विश्लेषणासाठी आमंत्रित करून देशासमोर मांडले; त्यात बहुतांश नेहरू विद्यापीठातील वरीष्ठांचा भरणा होता. शिवाय अशा वाहिन्यांमध्ये भरती होणारी बहुतांश पिलावळ, ही त्याच विद्यापीठातून आलेली होती. त्यामध्ये प्राधान्याने सनदी अधिकारी वा दिल्लीतल्या बड्या नेते अधिकार्‍यांच्याच मुलामुलींचाच समावेश होता. आपण दिल्लीचे मान्यवर म्हणून पर्यायाने देशाचे भले वा भविष्य आपण ठरवतो; अशा मानसिकतेचे संस्कार झालेली ही मंडळी आहेत. त्यामुळे़च त्यांनी कायम बातम्यांचा गदारोळ वा राजकीय उहापोह दिल्ली भोवताली मर्यादित ठेवला. परिणामी माध्यमांवर या दोनतीन दशकात नेहरू विद्यापीठ वा तिथल्या घडामोडींसह व्यक्तींचाच प्रभाव राहिलेला आहे. देशात शेकडो लहानमोठी विद्यापीठे व शिक्षण संस्था असून, त्यात काही कोटी विद्यार्थी उच्चशिक्षण घेत असतात. पण त्यांच्या अपेक्षा इच्छा वा भावभावनांचे प्रतिबिंब कधीही बातम्या किंवा माध्यमात पडलेले दिसणार नाही. विद्यार्थी म्हणजे नेहरू विद्यापीठात असतात आणि विद्यार्थी प्रतिक्रीया म्हणजे तिथून आलेला आवाज; असेच चित्र कायम उभारण्याची धडपड राहिलेली आहे. हे नेहरू विद्यापीठ काय आहे आणि त्याचा इतिहास किंवा पुराणकथा भाकडकथा काय आहे? ते म्हणूनच जाणून घेतले पाहिजे.

नेहरू विद्यापीठ वगळता डझनभर तरी केंद्रीय विद्यापीठे आहेत आणि त्याखेरीज जगभर मान्यता असलेली अनेक विद्यापीठे भारतात आहेत. त्यातून बाहेर पडलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी जगभर भारतीयत्वाचा ठसा उमटवण्याचे फ़ार मोठे काम केलेले आहे. पण माध्यमात किंवा बुद्धीजिवी वर्गाच्या चर्चेत त्याचा उल्लेख क्वचितच आपल्या कानी येईल. उलट ज्या विद्यापीठाने जगात भारताची छाप उमटवण्यासारखे काही केलेले नाही, अशा संस्थांमध्ये नेहरू विद्यापीठाची गणना होते. पण हे वास्तव झाकण्यासाठी माध्यमातून कायम नेहरू विद्यापीठ गाजवत ठेवले जात असते. त्याचा इतिहास काय आहे आणि हा अल्लादिनच्या दिव्यातला राक्षस कोणी कसा निर्माण केला, त्याची कथा जाणून घेणे महत्वाचे ठरावे. मगच तिथे उठसुट उचापती वा नसत्या उठाठेवी कशामुळे होतात, त्याचा उलगडा होऊ शकेल. कम्युनिस्ट विचारांचा राजकीय अड्डा अशी या विद्यापीठाची आज सार्वत्रिक ओळख आहे. पण मुळात त्यासाठीच तर या संस्थेची निर्मिती झाली. त्यामागे दोन हेतू होते. एका बाजूला तात्कालीन पंतप्रधान इंदिराजींना पक्षांतर्गत राजकारणात आपली प्रतिमा गरीबांचा कैवारी म्हणून उभी करायची होती आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या डाव्या विचारवंतांचा पाठींबा हवा होता. त्यासाठी कम्युनिस्ट संस्कार करणारी नर्सरी म्हणून या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. १९६६ सालात इंदिराजींच्या कारकिर्दीत असे एक जागतिक किर्तीचे विद्यापीठ असावे, हा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आणि त्याचा सर्व खर्च उचलताना देशाच्या कानाकोपर्‍यातून तिथे हुशार मुलांना आणून प्रतिभावंत बनवण्याचा बोजा सरकारने उचलावा, असे ठरलेले होते. तेव्हा इंदिराजींच्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेले प्रा. सय्यद नुरूल हसन हे मुळातले कट्टर कम्युनिस्ट होते. त्यांनी या विद्यापीठाला मार्क्सवादी बाळकडू देण्याचा आरंभापासून प्रयत्न केला आणि त्यावर पोसलेल्या पिंडाची फ़ळे आज आपण बघत आहोत.

मुळात देशातील प्रतिभेची हेळसांड होऊ नये आणि कुठल्याही कानाकोपर्‍यात गरीब घरातलीही हुशार मुले उत्तम शिक्षणाने देशाला उपयुक्त ठरणारे नेतृत्व द्यायला पुढे यावीत, अशी त्यामागची कल्पना होती. थोडक्यात उदयोन्मुख भारतातील प्रतिभेची मशागत करण्यासाठीची गुंतवणुक; अशी त्यातली कल्पना होती. पण हसन यांनी कम्युनिस्ट अड्डा असेच त्याचे स्वरूप होण्यासाठी असा काही शैक्षणिक ढाचा तयार केला, की आरंभापासून नेहरू विद्यापीठ हे डाव्या विचारसरणीची बालवाडी होऊन गेली. त्यातही मतभेद पक्षभेद होते. पण ते भेद उजवे-डावे असे अजिबात नव्हते. ते सोवियतवादी व माओवादी असे होते. त्यांच्यातही हाणामार्‍या होत राहिल्या. शिक्षण वा ज्ञानार्जन दुय्यम आणि भविष्यातील डाव्या विचारांचे नेतृत्व विकसित करण्याला तिथे प्राधान्य राहिले. हुशार विद्यार्थ्यांना तरूणांना तिथे आणुन सरकारी खर्चाने मार्क्सवादाचे बाळकडू पाजायचे आणि दुसरीकडे त्यातूनच देशाचे भावी सनदी अधिकारी तयार करून डाव्या विचारांचे अधिकारी व नोकरशाही उभी करायची. पर्यायाने शासन व्यवस्थाच डाव्या विचारांची होईल आणि शासकीय मार्गानेच कम्युनिस्ट सत्ता प्रस्थापित होईल; असा डाव नुरूल हसन यांनी खेळला होता. पण तो वास्तवात तितका यशस्वी होऊ शकला नाही. कारण फ़ुकटात मेजवान्या झाडल्यासारखे शिक्षण वा चर्चांचे गुर्‍हाळ चालवणार्‍या त्या विद्यापीठात्, येणार्‍या विद्यार्थ्यांची प्रतिभा जोपासली जाण्यापेक्षा तिथे डाव्या चळवळीला लागणारा कच्चा माल वा सुटे भाग बनवण्यापलिकडे काहीही अधिक होऊ शकले नाही. म्हणून तिथल्या माजी विद्यार्थ्यांच्या यादीवर नजर टाकली, तरी उपदव्यापी उचापतखोर अधिक व प्रतिभावान विद्यार्थ्यांची नावे दुर्मिळ दिसतील. असे म्हटले, की नोबेल विजेते अभिजित बानर्जी वा अर्थमंत्री निर्मला सीताराम अशा नावांना पुढे केले जाईल. पण स्वपक्षाची धुळधाण करणार्‍या सीताराम येच्युरी वा प्रकाश करात यांची नाव लपवली जातील.

थोडक्यात सांगायचे, तर डाव्यांना आपल्या पंखाखाली घेण्यासाठी इंदिराजींनी १९६९ नंतरच्या काळात मार्क्सवादी विचारांच्या पोपटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली ही पोल्ट्रीच होती. आज तिथल्या आंदोलने वा चर्चांचे स्वरूप बघितले तरी बोलके पोपट आढळून येतील. पण कर्तबगारांचा दुष्काळ अनुभवास येईल. आज जे कोणी नेहरू विद्यापीठाची महत्ता वा तिथल्या विद्यार्थ्यांच्या धिंगाण्याचे गुणगान करीत असतात, त्यांनाही हा इतिहास ऐकूनही ठाऊक नसेल. खुद्द इंदिराजींच्या सुनबाई व कॉग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनियांना आपल्या सासूचा वारसाही ठाऊक नाही. अन्यथा त्यांनी नेहरू विद्यापीठातील हिंसाचारानंतर स्वत:च भारत सरकारकडे हे विद्यापीठ काही काळ बंद करायची मागणी केली असती. कारण सासुबाईंच्या कारकिर्दीत असे प्रसंग घडले, तेव्हा त्यांनी पंतप्रधान म्हणून नेहरू विद्यापीठाला टाळे ठोकले होते. तितकेच नाही, तर तिथे कायदा व व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सेनेच्या तुकड्याही पाठवल्या होत्या. दुर्दैव असे, की त्यांचीच सुनबाई आज तशाच धिंगाण्याला विद्यार्थ्यांचे लोकशाही अधिकार, म्हणून टिमकी वाजवित आहेत. १९८१ सालात अशी स्थिती आलेली होती, की इंदिराजींना त्यांनीच सुरू केलेल्या त्या विद्यापीठाला शिस्त लावण्यासाठी व लोकशाहीतही शिस्त महत्वाची असते, असा धडा शिकवण्यासाठी विद्यापीठच बंद करावे लागलेले होते. तब्बल दिड महिना म्हणजे ४५ दिवस विद्यापीठाला टाळे ठोकण्यात आले होते. तथाकथित विद्यार्थ्यांची ‘आझादी’ झिंग उतरल्यावरच टाळे खोलण्यात आले. तिथे विद्यार्थी वर्गाच्या लोकशाही अधिकाराची वा व्याप्ती कुठपर्यंत होती, त्याचा तपशील तात्कालीन ‘इंडिया टुडे’ पाक्षिकाने दिला होता. एका विद्यार्थ्याने कुलगुरूंना शिवीगाळ केली आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांच्या मुलीवर बलात्कार करू म्हणून धमकावले होते. अशा जाहिर धमक्या देण्यापर्यंत लोकशाही अधिकार पोहोचलेले होते.

इंदिराजींना म्हणूनच अशी बेशिस्त वा अराजकाला वठणीवर आणण्यासाठी खंबीर पावले उचलावी लागलेली होती. ती देशातली सहनशील सत्ता होती आणि आज मोदी सरकार त्याच विद्यार्थ्यांना प्रत्येक कायद्याचे काटेकोर पालन करून शक्य तितका धिंगाणा करूनही हात लावताना कचरते आहे, त्याला फ़ॅसिझम वा हुकूमशाही असे नाव देण्यात आलेले आहे. एका विद्यार्थ्याला झेलम होस्टेलमधून गंगा होस्टेलमध्ये पाठवण्यात आले, म्हणून दंगा झाला आणि विद्यापीठाचे कामकाज ठप्प होण्यापर्यंत मजल गेली. ह्या बाबी नेहरू विद्यापीठातल्या नेहमीचा आहेत. किंबहूना त्यालाच खरीखुरी लोकशाही म्हणून गुणगान चाललेले असते. त्यासाठी दिल्लीसारख्या राजधानी असलेल्या शहरातील मोक्याच्या ठिकाणची शंभर एकर जागा सरकारने बहाल केलेली आहे आणि त्याच दिल्लीत लाखो लोक गेली कित्येक वर्षे झोपडीत नरकवास भोगत असतात. काबाडकष्ट करून पोट भरतात, त्यांना तिथेच आपला निवारा कायदेशीर करून मिळावा म्हणून सत्तापरिवर्तनाने नरेंद्र मोदींना सत्तेवर आणावे लागले आहे. हा मार्क्सवाद आहे. त्याच गरीब उपाशी लोकांच्या कल्याणाचे चिंतन करण्यासाठी चर्चा विचारविनिमय व उहापोह प्रतिभावान विद्यार्थ्यांनी करण्यावर सरकार प्रतिवर्षी दरडोई तीनचार लाख रुपये खर्च करते. त्यांचे चिंतन म्हणजे काय असते? तर अफ़जल गुरूच्या फ़ाशीला विरोध, त्याच्या पुण्यतिथीसाठी आक्रोश आणि कधीही दंगाधोपा वा हिंसाचार. त्याला आजकाल विचारविनियम वा सत्याग्रह असे नाव देण्यात आलेले आहे. त्या लोकशाही हक्काचा बोजा सामान्य भारतीयाला उचलावा लागत असतो. जो सामान्य भारतीय आपल्याच मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून रडतमरत सरकारी तिजोरीत करभरणा करीत असतो. ज्या तिजोरीच्या लूटमारीतून नेहरू विद्यापीठाचे हे वळू दंगेखोर पोसले जातात व मस्तवाल झालेले आहेत.

त्यामुळे तिथे कोणी कोणाला मारले वा कशाला मारले यावरून गोंधळ करण्याचे काही कारण नाही. तो देशव्यापी चिंतेचा विषय बनवण्याचेही काही कारण नाही. बौद्धिक चर्चा विचारविनिमयाचे व्यासपीठ म्हणून जनता खर्च करते; त्याचा आता गुंडपुंड लोकांनी अड्डा करून टाकला आहे. गुंड हा विचारांचा नसतो. त्याने कुठल्याही विचारांचा बुरखा पांघरला वा मुखवटा लावला, म्हणून तो करीत असलेले कृत्य वैचारिक व्यवहार नसतो. वैचारिक व्यवहारात घोषणाबाजी आली कुठून? तुमचा मुद्दा आम्ही खोडून काढावा किंवा आमचा मुद्दा तुम्ही युक्तीवादाने पुसून टाकावा, याला वैचारिक व्यवहार म्हणतात. पण अशा कुठल्याही वैचारिक देवाणघेवाणीतच अडथळे आणणे, किंवा दुसर्‍या भूमिका विचारांची गळचेपी करण्याला गुंडगिरी म्हणतात. कालपरवाच कुणा आशिष देशमुख नावाच्या कॉग्रेस नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कसली मागणी केली आहे? महाराष्ट्रातील विद्यापीठामध्ये फ़डणवीस काळात कुलगुरूपदी संघ विचारांचे लोक नेमले असतील, तर त्यांची हाकालपट्टी करा. नेमका असाच आरोप नेहरू विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूंवर होत असतो. ते संघ विचाराचे आहेत हा आक्षेप आहे. मुद्दा विचार कुठला हा नसून व्यक्ती गुणवान व प्रतिभासंपन्न आहे किंवा नाही, असा असतो. अमूकतमूकावर असे शिक्के मारून आघाड्या उघडल्या जातात, ती निव्वळ झुंडशाही असते. तो आपल्या कळपातला नाही किंवा जात वंशातला नाही, म्हणून त्याला हटवणे मारून टाकण्याला वैचारिक वा नागरी सभ्य व्यवहार म्हणत नाहीत. मार्क्सवादी लोकांचे नेहरू विद्यापीठातील वर्चस्व अलिकडल्या काळात कमी होऊ लागले, तेव्हापासून हा हिंसाचार वाढत गेला आहे. अभाविप वा अन्य विद्यार्थी संघटनांना प्रतिनिधीत्व मिळू लागले, किंवा त्यांच्या विचारांचेच केंद्रात सरकार आलेले आहे, म्हणून तिथे धुडगुस घातला जात आहे.

जे लोक वैचारिक देवाणघेवाणीचे गुणगान करतात, तेच संघ विचारांचा सामना करण्यापेक्षा त्याचीच मुस्कटदाबी करण्यात पुढे असतील, तर त्यांच्या कुठल्याही कृतीलाच झुंडशाही वा फ़ॅसीझम म्हटले पाहिजे. दुसरा विचार वा भूमिकाच संपवायची भूमिका सर्वसमावेशक नसते, तर हुकूमशाही असते. तशीच कृती सातत्याने करणारेच मोदींच्या नावाने कायम गळा काढत असतात. अन्य विद्यार्थ्यांना फ़ी भरण्यापासून रोखणे वा अन्य भूमिकेच्या प्राध्यापक वक्त्यांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणणे; असले प्रकार जिथे सातत्याने चालतात, त्याला वैचारिक लढाई म्हणता येत नाही. सत्याग्रह वा आंदोलन म्हणता येत नाही. या विद्यापीठाने बाजारात नोक‍र्‍या मिळत नसलेली बांडगुळे वा नापिकी बीज तयार केले आहे. त्यांना आयुष्यात अन्यत्र कुठे रोजीरोटी मिळू शकत नाही, म्हणून ते विद्यापीठात ठाण मांडून बसलेले आहेत. तिशी चाळीशी ओलांडली तरी विद्यार्थी म्हणून ते आवारातच जीवन कंठणारे भणंग होऊन गेलेले आहेत. त्यांचा समाजाला, कुटुंबाला वा पक्षालाही उपयोग राहिलेला नाही. मानवी जीवनात कुठल्याही बाबतीत हवी असलेली कुशलता त्यांच्यापाशी नाही. म्हणून त्यांना कुठला धंदा जमणार नाही वा नोकरीही मिळू शकत नाही. त्यातून आपल्या निरूपयोगीतेचे वैफ़ल्य व्यक्त करण्याला आता आंदोलन असे नाव दिले जाते. जगभर ज्याला हिंसा वा दंगल मानले जाते, त्याला चळवळ असे नाव देऊन भूईला भार झालेले हे नाकर्ते लोक; म्हणजेच आजचे नेहरू विद्यापीठ आहे. अर्थात ही तिथल्या विद्यार्थांची सरसकट व्याख्या नाही. जे अराजक माजवतात किंवा दंगल करतात, अशा नाकर्त्यांची व्याख्या आहे. पण त्यांचाच आवाज ऐकू येतो आणि शांतपणे अभ्यास करणारे तिथलेच बहुसंख्य विद्यार्थी बदनाम होऊन गेले आहेत. थोडक्यात हे विद्यापीठ म्हणजे महान शिक्षण संस्था वगैरे काही नसून, तो मार्क्सवादी गुंडांच्या हिंसाचाराचा अड्डा झालेला आहे. पण राजकीय बुद्धीवादी आश्रयामुळे हे विद्यार्थी म्हणजे समर्था घरीचे श्वान झाले आहेत. अशा माजोरी श्वानांच्या दंगामस्तीला राजकीय संघर्ष मानणेही गैरलागू आहे.

32 comments:

  1. एकदम योग्य, सडेतोड, व चपखल विष्लेषण आहे.
    ह्याचाच हिंदी व इंग्रजी मधे अनुवाद पोस्ट करता आला तर बघा, म्हणजे आम्हाला तो जास्त ठीकाणी पाठवता येईल.

    ReplyDelete
  2. Very bad analysis. Jnu consist of more than 8400 students. In that 200 are leftist active workers and 100 of ABvp but 8000 are studying and getting job. Why rightist not thinking about those 8000

    ReplyDelete
    Replies
    1. ढवळ्या शेजारी पवला बांधला, वाण नाही पण गुण लागला अशी एक म्हण आहे. तुम्हाला माहीत नाही किंवा अर्थ माहीत नाही अथवा भाजपा वर खूप राग आहे... असो.

      Delete
    2. ८४०० पैकी किती जण JNU च्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मतदान करतात? जर प्रमाण भरपूर असेल, जे आहेच, तर मग सातत्याने हे यडपट डोक्याचे निरुद्योगी वामपंथीच मोठ्या फरकाने का निवडून येतात? जर येत असतील तर त्या निरुद्योगी वामपंथी विद्यार्थी नेत्यांच्या सर्व गुंडगिरीचे फसिजमचे ते समर्थनच करतात असा अर्थ होत नाही का? जनेयूमधे चांगले विद्यार्थी आहेतच. फक्त त्याचे प्रमाण जेवढे दाखवले जाते किंवा त्या विद्यापिठावर जेवढा खर्च केला जातो त्या प्रमाणात अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण क्षुल्लक म्हणता येईल एवढेच आहे.

      Delete
    3. ते ८००० बाकीच्या ४०० जणांचा तमाशा का सहन करत आहेत मग?

      Delete
  3. Excellent hundred percent agreed i do think same.these JNU students are useless for survival outside and for survival they are making all dramas. Ani he bandgul samanya jsntechya tax var jagrat.

    ReplyDelete
  4. सर्व वाचकांना एक नम्र विनंती .. भाऊंच्या या लेखाचा सर्व मर्यादा ओलांडून प्रचार करावा . भाऊंनी लिहिलेल्या सर्व लेखांपेक्षा अधिक वाचक संख्या या लेखाला लाभली पाहिजे . स्वतः समाजवादी चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता राहिल्यानंतर लिहिला गेलेला हा लेख आहे त्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे . डाव्यांचे अड्डे असतात कसे हे सर्व महामूर्ख भारतीयांना किंवा हिंदुना कळलेच पाहिजे

    ReplyDelete
  5. नेहेरु विद्द्यापीठाचा बुरखा फाडून त्यांचे खरं स्वरुप आपण दाखवले. धन्यवाद

    ReplyDelete
  6. खूप छान आणि मुद्देसूद....हल्ली मी सकाळी नुसता समोर शोभेसाठी "मटा" ठेवते आणि वाचते मात्र फेसबूकवर तुमच्यासारख्यानी लिहिलेले लेख...आता प्रिंट मीडिया सुद्धा प्रसार माध्यमांसारखाच झालाय

    ReplyDelete
  7. तुम्ही म्हटलंय की 30-40 वर्षांचे झाले तरी ही लोकं विद्यापीठातच असतात कुठेही नोकऱ्या लागत नाहीत म्हणून...पण असं कसं? तिथे शिक्षणासाठी वयोमर्यादा सुद्धा नाहीये का? म्हणजे परत परत नापास होऊन एव्हढं वय होतं की वेगवेगळे कोर्स ही लोकं शिकत राहातात फूकट सगळं मिळतं म्हणून? कृपया तेथील शिक्षण व्यवस्थेवर पण भाष्य करा...

    ReplyDelete
  8. BHAUSAHEB CHAAN VISHLESHAN.YA LIBRALCHYA DELHITIL AADDYVISHYEE NI VISHVALLI KASHI FOFAWTEY YA BADDALCHE UTTAM MAHITI.
    ABHAEI AAHE.

    ReplyDelete
  9. भाऊ, पण मोदी विरोधी लोकांचे ते आशास्थान आहे हे तिथे बारीक सारीक काही घडल्यावर उर बडवत धावणाऱ्या लोकांवरुन लक्षात येते. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ते खरेच आहे आपल्याकडे लोकशाही जास्त झालीय पण मला वाटतेय की आपण भारतीय लोकशाहीच्या लायक नाही स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक आपल्याला कळत नाही, हक्का बरोबर कर्तव्य असतात हे आपल्याला माहितीच नाही, आपल्याला बसता उठता फटकेच हवेत.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर,मनातलं बोललात

      Delete
  10. हा एक लेख आणि आजच ( १२ जानेवारी) लोकसत्ता ला प्रसिद्ध झालेला प्रा. मिलिंद आवाड यांचा अग्रलेख यामध्ये एकाच विद्यापीठाबद्दल अगदी टोकाची मते मांडली आहेत...

    ReplyDelete
    Replies
    1. लोकसत्ता आहे तो...इतके पुरे नाही काय?

      Delete
  11. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख।

    ReplyDelete
  12. अप्रतिम विश्लेषण.यांची खरी लायकी जगाला दाखविल्या बद्दल आभार. हे दुकान (नेहरू विद्यापीठ)आता कायमचेच बंद व्हायला पाहिजे. यापेक्षा नवीन IIT सुरु करा. जनतेला नेहरू विद्यापीठाचा काडीमात्र हि फायदा नाही.

    ReplyDelete
  13. IT is one of the best articles I have read about it. This simple blog is so powerful that it is convinced me of the power of digital revolution. We only talk about it but you are doing it. No one's voice is suppressed etc. in today's digital world. But how many of us use this freedom of expression like you? Felt very good to read the accurate analysis of this situation. Thanks a lot. - Dr. Abhijeet Safai

    ReplyDelete
  14. भाऊसाहेब छान लेख आहे

    ReplyDelete
  15. नितांत सुंदर लेख. भाऊ आदराने साष्टांग नमस्कार

    ReplyDelete
  16. श्री भाऊ हे फार उत्तम लिहिलं आहे बर झालं JNU म्हणजे नक्की काय आहे हे सगळ्या जगाला कळू दे मग आपोआप अजून बऱ्याच गोष्टी उजेडात येतील आणि हे जेवढं मोठया प्रमाणात होईल तेवढं बर कारण JNU चे वाभाडे आणि लक्तरे निघाली च पाहिजेत

    ReplyDelete
  17. भाऊ तोरसेकर, तुम्ही जेएनयू बद्दल वरच्या योग्य माहितीमध्ये बरोबर सांगितले होते, हे विद्यापीठ काही दिवस बंद ठेवले पाहिजे. विद्यार्थ्याने दुसर्‍या विद्यापीठात पाठवावे.

    करदात्यांच्या पैशाचा गैरवापर केला जातो आणि बेकायदेशीर क्रियाकलापांना समर्थन दिले जाते

    ReplyDelete
  18. यात काय हशील आहे यात तेच कळत नाहीये लोकांना सतत नुसता गदारोळ चालू आहे. हे जे एन यू बंद का करत नाहीत कायमचे... मुळच नष्ट करणे आवश्यक आहे

    ReplyDelete
  19. सरकारने असल्या फालतू गोष्टीवर विचार करण्यापेक्षा, ते विद्यापीठ कायमस्वरूपी बंद करून टाकले पाहिजे. ... बोंबलतील बोंबलतील आणि दमून गप्प बसतील . काही अर्थ नाही विचार करण्याला.

    ReplyDelete
  20. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  21. आज जशी कोची मध्ये बेकायदेशीर बहुमाळी ईमारत स्फोटके लाऊन ऊडवली तसे जनेवि ऊडवले पाहिजे फार लाड चालले आहेत.

    ReplyDelete
  22. जेएनयु बाबत विस्तृत माहिती मिळाली धन्यवाद

    ReplyDelete
  23. Good analysis. Thanks

    ReplyDelete
  24. आताच वृत्तपत्रे वाचणारे इतिहास न जाणणारे माझ्यासारखे सामान्य लोक या प्रकरणाकडे कसे पाहतात त्याबाबतचे टिपण चुकीचे असेल पण नोंदवावेसे वाटते .आता वाचा:
    डावे आणि उजवे यात सरस नीरस , कोण बरोबर कोण  चूक ठरवणे अवघड आहे. जलाने विद्यापीठात ( प्रख्यात हिंदी साहित्यकार अज्ञेय जे एन यू चा निर्देश नेहमी  असाच करत असत ) जे चालले आहे त्यात कोणाचा किती दोष आहे त्याची गणना ' देवो न जानाति कुतो मनुष्य : ' या प्रकारातच करावी लागेल .पूर्वीच्या सरकारच्या कृपाप्रसादामुळे वर्षानुवर्षे डाव्या विचारसरणीच्या बुद्धिमान ,प्रतिष्ठाप्राप्त विद्वानांचे आणि त्याच विचारानी भारावलेल्या विद्यार्थ्यांचे राखीव कुरण दीर्घ काळ सत्तेपासून दूर राहिलेल्या आणि ऐतिहासिक बहुमत मिळवून केंद्रात सत्तेवर आलेल्या उजव्या भाजपला सलत राहणे साहजिकच आहे. त्या सत्तांतरानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांना या विद्यापीठावर आपला ध्वज फडकवण्याची घाई होणे हेही समजणे कठीण नाही. डाव्यांचा इतक्या वर्षांच्या वहिवाटीने प्रस्थापित झालेला मालकीहक्क आणि उजव्यांना जनादेशाने तो आता आपल्याला मिळायलाच हवा असे वाटणे यातून हा संघर्ष पेटला आहे. आता विद्यापीठात राजकारण येता कामा नये, हिंसाचाराला थारा मिळू नये हे आदर्श बोलायला ठीक आहेत पण प्रत्यक्षात हे शक्य आहे का ? मतदानाचा हक्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना राजकारणी लोकांनी आपापल्या पक्षाकडे ओढण्याचे प्रयत्न करू नयेत ही अपेक्षा सुद्धा अवास्तव नाही काय ?हिंसाचाराला डावे बिचकत नाहीत कारण  साम्यवादात अराजक आणि क्रांती परिवर्तनासाठी आवश्यक मानलेली आहे बरं अशा लोकांशी संघर्ष म्हटल्यावर उजव्यांनाही अहिंसेचा जप काही काळापुरता थांबवावा लागणारच .त्यातून तरुणाईचे सळसळतं रक्त आणि शिवशिवणारे हात त्यांना ताबडतोब थांबवणे शक्य नाही.

    ReplyDelete
  25. दररोज संध्याकाळी वॉक ला आमच्या विद्यापीठात जातो. आमच्या विद्यापीठात काही निदर्शने नसली तरी एक बाब नक्की. विद्यार्थी गरीब असोत वा श्रीमंत, शिक्षणासाठी त्यांचे काही देणेघेणे नसते. गरीब विद्यार्थांचे पालक सुद्धा पदरमोड करून पाठवत असतील, पण सर्वच विद्यार्थी मौज मजेत आढळतात. मोबाईल व मित्र मैत्रिणी हेच त्यांचे आयुष्य आहे. देशाभिमान वगैरे सर्व पुरोगामी भम्पक पणां आहे.

    ReplyDelete