फ़िदायीन म्हणजे आत्मघातकी योद्धा. जो आपल्या मृत्यूला कवटाळून शत्रूचे नुकसान करून घेण्यात आपले हौतात्म्य शोधतो. मुंबईत दहा वर्षापुर्वी आलेली अजमल कसाब टोळी वा कश्मिरात नित्यनेमाने मारले जाणारे पाकिस्तानी जिहादी, त्या मानसिकतेचे असतात. आपण काही उदात्त महान परमेश्वरी कर्तव्य बजावत असल्याच्या समजुतीने ते आत्मघात करायला पुढे सरसावलेले असतात. अशी कृती करणारे दोन प्रकारचे लोक असतात. त्यातले पहिले उदात्ततेने भारावलेले असतात किंवा दुसरे द्वेष सूडबुद्धीने पेटलेले असतात. सध्या भारतातील पुरोगामी दुसर्या गटातले फ़िदायीन झालेले आहेत. भाजपा वा मोदींशी आमनेसामने लढण्याची हिंमत त्यांच्यामध्ये उरलेली नाही. म्हणून ते घातपाती कामे करू लागले आहेत. अशा घातपातामध्ये आपले-परके असा भेदभाव न करता, असेल ते उध्वस्त करून टाकण्याचा पवित्रा घेतला जात असतो. ती फ़िदायीन प्रवृत्ती आता स्पष्टपणे पुरोगामी राजकारणातून समोर येऊ लागलेली आहे. मागल्या सात दशकात कॉग्रेसने वा पुरोगामी राजकारणाने देशाला विविध लोकशाही संस्था दिल्या व परंपरा दिल्या, असा दावा नेहमी केला जातो. पण आज त्याच परंपरा व संस्थांना सुरूंग लावून उडवण्याच्या घातपाती गोष्टी कोण करतो आहे? संसदेपासून सुप्रिम कोर्टापर्यंत प्रत्येक बाबतीत घातपाती भूमिका कॉग्रेस व इतर पुरोगामी पक्षांनी घेतलेली आहे. अर्थात त्यांनीही आधीची दोन वर्षे मोदी कधीतरी चुका करतील आणि आपल्या जाळ्यात आयते सापडतील, अशीच अपेक्षा केली होती. पण मोदी सरकारला चार वर्षे होत आली आणि अजून एकाही भानगडीत सरकार सापडत नसल्याने ह्या लोकांचा धीर सुटत चालला आहे. त्यामुळे पुन्हा होणार्या निवडणूकांमध्ये जिंकण्याची शक्यता नसेल, तर सगळ्या संस्थाच उध्वस्त करून टाकण्याचा पर्याय या लोकांनी निवडला आहे.
चार वर्षापुर्वी मोदींनी अथक प्रचार करून लोकसभेत बहूमत व देशाची सत्ता संपादन केल्यावर त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचलेली होती. त्यांच्या विरोधात तेव्हा काही बोलणे अशक्य होते. शिवाय अनपेक्षित निकालाने पराभूत झाल्याच्या धक्क्यातून विविध पक्षांना सावरणे भाग होते. तितके सावरल्यानंतर आपल्या चुका शोधल्या असत्या, तर पराभवाच्या छायेतून बाहेर पडणे या पक्षांना शक्य झाले असते. पण चुका मान्य करायची तयारी नसल्याने त्यांना त्याच्याही नंतर एकेका राज्यातून पुन्हा पराभवाचीच चव चाखण्याची पाळी आली. विधानसभांच्या निवडणुकाही भाजपा जिंकत गेला आणि प्रतिदिन मोदींची लोकप्रियता देशात व जगातही वाढत गेल्याने अशा पक्षांना व नेत्यांना कमालीचे नैराश्य आले तर नवल नव्हते. जितके दिवस सरकत गेले, तितकी ही नैराश्याची धारणा प्रभावी होत गेली आणि आता आपण मोदी नामे वादळासमोर टिकू शकत नसल्याचा एक चमत्कारीक आत्मविश्वास या लोकांमध्ये आलेला आहे. मग त्यातून पर्याय म्हणून त्यांनी देश वा सत्ता उध्वस्त करून टाकावी असा उपाय शोधला आहे. ज्या लोकशाही मार्गाने मोदी विजयी होतात तो मार्गच नेस्तनाबुत करण्याची रणनिती आखलेली आहे. त्यामुळे आरंभी मोदींनी मतदाराला भुलभुलैया दाखवून मते मिळवली, असा प्रचार करण्यात आला. तरीही उत्तरप्रदेश वा आसाम या अवघड निवडणूका मोदींनी जिंकल्या. त्यामुळे भुलभुलैयाचा विषय सोडून द्यावा लागला. मग आपले अपयश झाकण्यासाठी मतदान यंत्रात गफ़लत असल्याचे आरोप सुरू झाले. ज्या मार्गाने यापुर्वी प्रत्येक पक्ष लोकसभा वा विधानसभांमध्ये जिंकत आला, त्याच मार्गाने व त्याच यंत्रांनी मोदी जिंकताना दिसल्यावर त्या यंत्रणेवरील जनतेच्या विश्वासाला संपवण्याची खेळी सुरू झाली. तिचाही जनमानसावर प्रभाव पडला नाही. मग काय करायचे?
मग संविधान बचाव किंवा संसदेचे कामकाज ठप्प करण्याची खेळी सुरू झाली. जर आपण निर्माण केलेल्या या लोकशाही संस्थांवर या लोकांचा विश्वास आहे, तर मग त्याच संस्थांचे कामकाज कसे ठप्प केले जाते? निवडणूक आयोग मोदींनी जन्माला घातलेला नाही की संसदेची निर्मिती मोदींच्या अध्यादेशाने झालेली नाही. आजवर कॉग्रेस वा अन्य पुरोगामी सत्तेपर्यंत पोहोचले, त्याच पद्धतीने मोदी सत्तेत आलेले आहेत ना? मग त्याच लोकशाहीला सुरूंग कोण कशाला लावतो आहे? यालाच जिहादी भाषेत फ़िदायीन म्हणतात. तो स्वत:ला उध्वस्त करून आसपासच्या अनेकांना मारून टाकत असतो. आताही २०१९ ची निवडणूक जवळ आली असताना, विरोधकांची झोप उडाली आहे. कितीही एकजुट केली वा आघाड्या केल्या तरी मोदींचा पराभव करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात उरलेला नाही. म्हणून मग लोकशाहीच्या मार्गालाच उध्वस्त करण्याची खेळी सुरू झालेली आहे. भारताचा सिरीया होईल, अशी प्रकाश आंबेडकरांनी दिलेली धमकी यादवी माजवण्याची आहे. आजवर कुठल्याही न्याय अन्यायाच्या बाबतीत सुप्रिम कोर्टाचा शब्द अंतिम मानला गेला असताना, आताच त्यालाही आव्हान कशाला दिले जात आहे? संघाला, भाजपाला व मोदींना घटना व संविधान संपवायचे असल्याचे आरोप नित्यनेमाने चाललेले असतात. पण प्रत्यक्षात त्या़च संविधानाने निर्माण केलेल्या विविध संस्था वा परंपरांना कोणी झुगारण्याचा चंग बांधलेला आहे? विषय सर्वोच्च न्यायालयाचा असताना रस्त्यावर उतरून दंगे माजवणे, जाळपोळ करणे आणि त्याचे कॉग्रेससह पुरोगामी पक्षांकडून चाललेले स्वागत कशाचा पुरावा आहे? भाजपा सरकार संपवता येत नसेल, तर देशच उध्वस्त करण्याची तयारी त्यातून दिसत नाही काय? त्यालाच तर जिहादी भाषेत फ़िदायीन म्हणतात ना? आज देशातले राजकारण लोकसभा निवडणूकीच्या दिशेने पुढे सरकत नसून, फ़िदायीन घातपाती मार्गाने वाटचाल करते आहे.
कुठलेही खास कारण नसताना सुप्रिम कोर्टात अयोध्या विषयाची सुनावणी २०१९ पर्यंत स्थगित करण्याची मागणी असेल. देशाच्या सरन्यायाधीशाच्या विरोधात संसदेत महाअभियोग आणण्याचा प्रयास असेल. कोर्टाकडून आलेल्या निकालाचे खापर सरकारच्या माथी फ़ोडून, देशात याद्वी माजवण्याच्या चिथावण्या असतील. हे सर्व जिहादी खेळ आहेत. त्यात अर्थातच आपलेही नुकसान गृहीत धरलेले आहे आणि असते. आपण नामशेष होऊ, आपणही नष्ट होऊ. पण आपल्यामुळे मोदी वा भाजपाही उध्वस्त होतील, असा आसुरी आनंद शोधला जात आहे. अर्थात पर्यायाने देशातील लोकशाही, कायदा व्यवस्था, सामान्य माणसाच्या जीवनातील सुरक्षा यांनाही नुकसान होईल, हे प्रत्येकाला चांगले ठाऊक आहे. आपल्या अशा वक्तव्ये वा कृत्यांनी देशाच्या शत्रूंना लाभ होतो, हेही अशा पुरोगाम्यांना कळत असते. पण त्याची फ़िकीर कुठे उरलेली आहे? भाजपाला पराभूत करता येत नसेल, तर देश बुडवून भाजपाची सत्ता उध्वस्त करण्यापर्यंत आता ही राजकीय दिवाळखोरी गेलेली आहे. सुदैवाची गोष्ट एकच आहे. कॉग्रेसने मागल्या सात दशकात अन्य कुठली देशाच्या प्रगतीची गोष्ट केलेली नसेल. पण देशातील बहुसंख्य जनतेला अडाणी वा सामान्य बुद्धीच्या पलिकडे जाऊ दिलेले नाही. त्यामुळे ही सामान्य भारतीय जनता सामान्य बुद्धीने विचार करणारी राहिली आहे. म्हणूनच तिला आत्मघाती फ़िदायीन व देशाच्या सुरक्षेसाठी लढणारा सैनिक, यातला फ़रक नेमका ओळखता येतो. ती जनता सैनिकाच्या बाजूने उभी रहाते आणि फ़िदायीन इशरत जहानची पाठराखण करणार्यांना जमिनदोस्त करण्याचे काम नेमके बजावते. तसे नसते तर देशाच्या कानाकोपर्यातून कॉग्रेसला नामशेष करण्याचे कर्तव्य मतदाराने बजावले नसते. मोक्याच्या वेळी मोदी जिंकले नसते, की कॉग्रेसला देशोधडीला लागायची वेळ आली नसती. ज्या जनतेने हजारो वर्षे दिवाळखोर गद्दारांच्या घातपातानंतरही खंडप्राय देश टिकवला आहे, ती जनता असल्या भुरट्या राजकीय फ़िदायीनांसमोर हार मानण्याची बिलकुल शक्यता नाही.
देशात हुकुमशाहीच पाहिजे.
ReplyDeleteसहमत
Delete१०१ %
Deleteपण कल्याणकारी हुकुमशाही म्हणजेच भावी "हिंदुराष्ट्र"
Bhau Namaskaar,
ReplyDeleteHa Tumcha Lekh Mhanaje Hya 'Nav-Feedain' Lokansathi Ek Zanzanit Anjan Aahe Tasech Tyanchyasathi 'Palthya Ghadyavaril Pani'suddha Aahe.
Aajacha Sarvasamanya Matdar Aata Ya ModiVirodhakana Samaju Lagla Aahe, Ya Virodhakanchi He Shevatchi Tadfad Pahun Kashishi Gammathi Vatate.
Tyanche Khare SwarupDarshan Karun Dilyabaddal Aaplyala Dhanyavad.
Perfect Analysis.
ReplyDelete"ज्या जनतेने हजारो वर्षे दिवाळखोर गद्दारांच्या घातपातानंतरही खंडप्राय देश टिकवला आहे, ती जनता असल्या भुरट्या राजकीय फ़िदायीनांसमोर हार मानण्याची बिलकुल शक्यता नाही." जियो भाऊसाहेब ..........अख्खा हिंदुस्थान चितारला तुम्ही एका ओळीत ...लाखो करोडो धन्यवाद ,
ReplyDeleteआता या सर्वांचे आद्यगुरू पवारसाब यांनी पोतडीतुन आणखी एक पुडी काढलीय ती म्हनजे १०० खासदारांनी एकदम राजीनामा देणे काॅंगरेस कडे ४८ खासदार आहेत आणि इतरांना पटवायचे चाललेय हा पन प्लॅन फ्लाॅप होनारेय कारन आंध्रा साठी दुसर्या राज्यातले खासदार का राजीनामा देतील? ते १९ मध्ये जनतेला काय सांगून मते मागतील? खुद्द पवारांचे 4 पैकी २ खासदार एेकनार नाहीत सातारा व कोल्हापुरचे तसे ते कोनतीच गोष्ट एेकत नाहीत पक्षाची.उदयनराजेंच्या वाढदिवशी पवारांची काय अवस्था झालीय ते त्यानाच माहित.
ReplyDeleteभाऊ अत्यंत सही विश्लेष व तात्विक दृष्टीने सही मांडणी.
ReplyDeleteहेच भारतीय जनतेकडुन अपेक्षित आहे आणि भारतीय लोकशाहीच्या ईतिहासात हेच घडलं आहे व घडत राहव असे निश्र्चीत वाटत आहे.
मोदी शहा अत्यंत धोरणी व अस्वस्थ वृत्तीचे नाहीत. अत्यंत विचार पुर्वक हे प्लॅन तयार करुन आमलात आणतात. त्याच बरोबर आपण आपले निकटवर्तीय कधी धोक्यात आणणार नाहीत हि पण काळजी घेतात.
काही टोळकी हे संघी म्हणुन हिणवताना दिसतात. व यातुन मोदी भक्त अशी हेटाळणी करताना दिसतात. परंतु याच लोकांनी कधी 50-55 वर्षे एकहाती राज्य एका कुटुंबाच्या हातात राहिला तेव्हा या पक्षाचे पाठीराखे कधी अंध व लाचार आहेत असे कधी वाटले नाही. की असे पुरस्कृत पुरोगामी अनुदानीत टोळीने लिहले बोलले नाही किंवा असा प्रचार करून या पडद्या आड राज्य करणार्यांना भ्रष्टाचारी, दलालशाही, गर्विष्ठ व सुमार नेतृत्व अशी टिका केली नाही व थोडीफार झाली तरी ती प्रसार माध्यमांनाच पुरस्कृत व विकत घेऊन दाबुन टाकली. तसेच जनतेला पण आधु करुन अशिक्षीत आळशी असंस्कृत व अनुदानित करुन अशा पिढ्यांना आपले अंध अनुयायी बनवुन सत्ता बेसुमार उपभोगली. परंतु देश व नागरिक अशेच गटांगळ्या खात राहिलेत. त्यातच भारतीय नेहमीच मटणाच्या दुकानातील बोकडा प्रमाणे खुशाल चेंडु बनुन रहातो व कधी तरी जेव्हा अन्याय अराजकाचा कडेलोट होतो तेव्हा जागा होतो व पुर्वी एखाद दोन पिढ्यांनी झुंज दिली परत येत रे माझ्या मागल्या प्रमाणे घोडे बेचके सो गया हेच आता पिढी साठी न होता 2-4.5 वर्षांत (सरळ पुर्ण बहुमत असताना सुद्धा पुर्ण 5 वर्षे राज्य करु शकले नाही. त्यातच उन्हाळा सुट्टीत शिक्षित विलासी नागरिक मतदान सोडून मौज करत असताना लोकसभा निवडणूका जणु जाणीवपूर्वक आणुन ठेवल्या. मोदी शहांचा झांझावात मुळे 2014 ला हे यश मिळाले हे देशाचे सुदैवच. परंतु आज प्रमाणे देशात काही प्रमाणात अराजक माजवुन मोदी सरकार कसे निक्कम्मे आहे हेच पुरोगामी, विदेशी व काँग्रेस पुरस्कृत मिडियावाले दाखवत आहेत. व हे सर्व मिडियावाले (एडीटर कामगार) भारतीयच आहेत. अशिक्षीत जनतेचे आपल्या प्रमाणे प्रबोधन करताना हे मिडियावाले कधीच दिसत नाहीत व दिसणार पण नाहीत. हिच कुर्हाडीचा दांडा गोतास काळ मानसिकता भारतीयांची आहे. त्यामुळे भातात सलग दोन निवडणूका कधीही काँग्रेस इतर पक्षाने आघाडीने जिंकल्या नाहीत. व काँग्रेस शिवाय भारताला पर्याय नाही असेच चित्र ऊभे केले.
जर सलग दोन वेळा भाजप सारखा पक्ष लोकसभा जिंकला तर एका बाजुने गेल्या पाच वर्षांत अननुभवा मुळे /परिस्थिती नुसार झालेल्या चुका सुधारुन धोरणाचे सातत्य राखुन या सुजलाम सुफलाम खंडप्राय देशात काही प्रमाणात कायाकायापालट होऊ शकतो.
एकेएस
भाऊ जबरदस्त
ReplyDeleteजरी खते लाईट लोड शेडिंग कमी करुन शेत तळी निर्माण करुन कांदा डाळ या सारख्या जिवना आवश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवून. इम्पोर्ट ची तुरंत योजना तयार ठेवून मोठ्या व्यापरी बारमीत धेंडावर नियंत्रणात ठेवले आहे मग मराठा मोर्चा काढण्या शिवाय काही करु शकले नसले तरी आंबेडकरीना पेटवलेच.
मोदी सरकारने शेती क्षेत्रा कडे जेव्हडे पाहिजे तेव्हडे लक्ष दिले नाही ही वस्तुस्थिती आहे. हे काही प्रमाणात मोदी जवळ जमलेल्या किंवा (काही वेळा वाटते मुद्दामुन जमवलेली गोतावळ व मोदींची एकाधिकारशाही) मंडळी ची ही चुक आहे.
1.शेती क्षेत्रात प्रचंड मागासले पणा आहे पाणी विज गोदामे, 2.कोल्ड स्टोअरेज बाजारपेठ ही सुविधा देऊन अच्छे दिन आणता आले असते व याचे रिझल्ट यायला थोडा ऊशीर लागतो म्म्हणुन सुरुवात लवकर करणे आवश्यक असते.
3. छोट्या सहकारी सोसायटीज शेतकरीवर्गाला कमी व्याज दरात कर्ज देत होत्या त्या व सहकारी कारखाने परत काँग्रेस च्या राजकारणी घराण्या कडुन परत सहकारी तत्वावर आणण्याचा प्रयत्न करणे.
4.तसेच एकदम 100 मेगा सिटी हे पण भारता सारख्या खेड्यातून रहाणार्या खंडप्राय देशाला व पैशांची कमतरता असणार्या देशाला 5 वर्षांत अशक्य आहे हे अननुभवा मुळे अशक्य झाले.
या पेक्षा छोट्या व मध्यम शहरात व मोठ्या खेड्यात जवळ पडीक जमिनीवर नागरि सुविधा देऊन थोड्या निधी मध्ये सुबत्ता आणता येऊ शकते.
5.तसेच शहरात पाणी व पब्लिक ट्रासपोर्ट, नवीन उपनगरे बनवुन त्यात CIDCO दोन दशके पुर्वी करायची त्याप्रमाणे को आॅपरेटीव्ह सोसायट्या ना प्लाॅट द्यायचे तसेच 500 फ्लॅटचे प्रोजेक्ट बनवुन Low income groups ना द्यायचे या सारख्या योजना राबऊन बिल्डर लाॅबीवर किंमती रिझनेबल ठेवायचा दबाव कायम रहायचा. परंतु विलासराव व सुशीलकुमार शिंदे या जोडीने हे थांबवले.
6.तसेच यात काही प्लाट डेली बाजार प्लाॅट तयार करुन रोजगार निर्माण तर होतीलच पण सामान्य नागरिकांची सुविधा पण होइल.
7.माॅल ना ज्या किंमतीत माल कारखाने, व मोठे डिलर देतात त्या किंमतीत किंवा थोड्या जास्त किमतीत माल छोट्या व्यापार्याना देण्याचे आवाहन करुन छोट्या व्यापार्यांना त्यांच्या असोसिएशन गावा गावात आहेत अच्छे दिन आणुन सामान्य माणसाला पण राहत देऊ शकतात.
ह्या सारख्या योजना परत राबऊन अछेदीन परत आणता आले असते. पण ऊच्च वर्गीय सत्तेवर गेले की उच्च वर्गीयांचे टोळकेच बाजूला जमते व बेसीक चा विसर पडतो.
8.प्लॅस्टीक बंदी चा अतिरेक हा पण उच्चशिक्षित व वर्णीयाचे नाकात बोलुन अती सामान्य नागरिकांच्या व्यापारी वर्गाचे रोजचे जिवन जगताना नाकात दम आणण्याचे आतीरेक निर्णय बाटगे ज्याप्रमाणे जास्त कट्टर असतात याचे एक उदाहरण आहे.
8.स्टेशन बस स्टॅन्ड सरकारी कार्यालयात सार्वजनिक ठीकाणी मोठ्या प्रमाणात फॅन (नविन सिएसटी मध्ये लावलेत त्याचे छोटे माॅडेल) लाऊन अती सामान्यना अच्छे पल आणु शकते. असे अनेक निर्णय घेऊ शकते महागाई वर पण मोदी सरकार ने नियंत्रण ठेवले आहे. पण आपण चानल वर कधी चार चागले शब्द ऐकलेत का. लुटीयन मिडिया कधी च हे दाखवणार नाही यामुले भाषण देऊन हे सागावे लागते पण जाती पाती चे राजकारण बिहार राज्य सारखे धोका देऊ शकते अशा परिस्थितित जर मोदीजी 2019 जिकले तर चमत्कारच होईल
परंतु ह्यासाठी भाषणांच्या स्टेज वरुन खाली उतरुन पण काम करणै करुन घेणे आवश्यक आहे.
नाहीतर परत एकदा यावेळी 10 नाही -15 वर्षांसाठी देश भ्रष्टाचारी आराजकात लोटला जाईल.
Aks
भाऊ धन्यवाद ऐसा ही लिखी ये
ReplyDeleteज्या जनतेने हजारो वर्षे दिवाळखोर गद्दारांच्या घातपातानंतरही खंडप्राय देश टिकवला आहे, ती जनता असल्या भुरट्या राजकीय फ़िदायीनांसमोर हार मानण्याची बिलकुल शक्यता नाही. या वाक्यावरून जीव ओवाळून टाकला भाऊ
ReplyDelete