Tuesday, February 12, 2013

‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’

काल अफ़जल गुरू याला तिहार तुरुंगात फ़ाशी दिल्यावर वाहिन्यांवर चर्चा चालू होत्या. त्यात जे अनेकजणांची काश्मीरी मुस्लिम कसे भारताशी निष्ठावान आहेत ते सांगायची सेक्युलर स्पर्धा सुरू होती आणि अफ़जल सारखे लोक अपवाद आहेत असे दाताच्या कण्य़ा करून सांगायची केविलवाणी धडपड सुरू होती. हल्ली असा बेशरमपणा ऐकायची लोकांना सवय झाली आहे, म्हणूनच त्याचे फ़ारसे काही वाटले नाही. पण त्यातच सहभागी झालेला जुना मित्र, सहकारी हुसेन दलवाई याची ती धडपड किळसवाणी वाटली. कारण त्याला आपण धडधडीत खोटे बोलतोय याचीही लाज नव्हती. बाकी असल्या गोष्टी इतरांना सांगण्यापुर्वी हुसेन किंवा तत्सम जुन्या समाजवादी सेक्युलर युक्रांदियांनी (आपण अब्रूदार आहोत असे त्यांना अजून वाटत असेल तर) दिवंगत हमीद दलवाई याचा अनुभव जरा डोळसपणे वाचावा म्हणून हमीदच्या पुस्तकातला हा उतारा. जेव्हा काश्मीरात पाकिस्तानविषयी नुसती आपुलकी दाखवली तरी गजाआड जायची वेळ यायची व हुरीयत वगैरे भानगडी नव्हत्या, तेव्हा एक सामान्य काश्मीरी मुस्लिम युवकाचे हे वक्तव्य ही लढाई कशी धर्माची आहे, त्याची साक्ष देतोय, आणि ही साक्ष कुणा संघवाल्या हिंदुत्ववाद्याने नव्हे हमीद दलवाईंनी मांडली आहे. कदाचित आता लाजलज्जा सोडलेले सेक्युलर हमीदलाही भगवा आतंकवादी म्हणतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
===========================

भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये.मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’
मी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते.
‘आप कल कहॉ गये थे?’ मग त्याने विचारले.
मी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे.
‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले.
हाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत?’
‘लढाई चाललेली पाहिली.’
‘कुणाची जीत होत आहे?’
‘हिंदूस्तानी फ़ौजेची.’
कसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला.
मग तो बोलू लागला - अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते! पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे? यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले.
मी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते? येथे काय दु;ख आहे? कशाची कमतरता आहे?’
तो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’
श्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’
===========================
१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे. आज जो सेक्युलर दांभिकपणा मी सातत्याने सांगत असतो वा दाखवत असतो, त्या आजाराची लक्षणे हमीदभाईंनी तेव्हाच ओळखली, लिहिली होती व काहीवेळी बोलताना सांगितली सुद्धा होती. या पुस्तकात अशा आजाराचे अनेक तपशील सापडू शकतील. पण हमीदचे पुरस्कर्ते व अनुयायी म्हणवणार्‍यांनी ती किती वाचलीत वा समजून घेतलीत देवजाणे. कारण तेव्हा तो हॉटेलमधला नोकर अजाण मुलगा जे बोलत होता, तेच आज खुलेआम राजकीय वक्तव्य म्हणून मांडले जात असते. तेव्हाही त्याचा हिंदूत्ववाद वा संघाशी संबंध नव्हता आणि आजसुद्धा नाही. पण सेक्युलर अंधश्रद्धेचे अंगारेधुपारे करणार्‍यातच मग्न असलेल्यांना सत्य कोणी सांगायचे व समजवायचे?

Saturday, February 9, 2013